सध्या रशियाच्या युक्रेन, युरोप आणि अमेरिकेबरोबरच्या संबंधांमध्ये बराच तणाव निर्माण झालेला आहे. गेल्या काही महिन्यांपासून रशियाने आपले सुमारे 1 लाख 10 हजार सैनिक युक्रेनच्या सीमेवर तैनात केलेले आहेत. त्यामुळे युक्रेनवर रशिया आक्रमण करण्याच्या तयारीत आहे, अशी भिती पाश्चात्य देशांकडून व्यक्त होत आहे. मॉस्कोकडून ती शक्यता फेटाळून लावली जात आहे. हा तणाव निवळावा यासाठी यात सहभागी असलेली प्रत्येक बाजू आग्रही आहे. मात्र त्याचवेळी यातील मुख्य घटक असलेले अमेरिका आणि रशिया आपापल्या भूमिकांवर ठाम आहेत. पण एकीकडे राजनयिक पातळीवरून हा तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न होत असतानाच दोन्ही बाजूंमध्ये आपापली शक्ती दाखवून देण्याचेही प्रयत्न सुरू आहेत.
युक्रेनच्या पूर्वेकडील डोनबास, दोनेस्क आणि क्रिमीया द्वीपकल्पामधील (Crimean Peninsula) आपल्या समर्थक फुटिरतावाद्यांना रशियाने पाठिंबा दिल्यापासून युक्रेनमधील स्थिती अस्थिर बनली आहे. कीवच्या वाढत्या रशियाविरोधी भूमिकांच्या पार्श्वभूमीवर 2014 मध्ये युक्रेनच्या रशियनबहुल आणि व्यूहात्मकदृष्ट्या महत्वाच्या क्रिमीया द्वीपकल्पावर रशियाने ताबा मिळवला. तेव्हापासून अमेरिका आणि युरोपीय संघाने रशियावर वेगवेगळे निर्बंध घातले आहेत. पण त्याचवेळी अमेरिकेकडून नाटोच्या (NATO) विस्ताराचे प्रयत्नही अविरतपणे सुरू आहेत, ज्यावर रशियाचा मुख्य आक्षेप आहे.
युक्रेन नाटोमध्ये सामील झाल्यामुळे रशियाच्या सुरक्षेवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. म्हणूनच युक्रेनला नाटोचे सदस्यत्व दिले जाऊ नये, ही मागणी मॉस्कोने आग्रहाने लावून धरलेली आहे. त्यावर विचार करण्याऐवजी अमेरिकेडून रशियाला आक्रमक ठरवून आपले धोरण पुढे रेटण्याचा प्रयत्न केला जात आहे. युक्रेनवरून निर्माण झालेल्या या तणावाचा आपल्या आणि एकूणच युरोपच्या सुरक्षेवर परिणाम होत असल्यामुळे हा प्रश्न शांततामय मार्गाने सोडवण्यासाठी फ्रान्स, जर्मनीने पुढाकार घेतला आहे. युरोपीय देशांना रशियाशी संबंध सुरळीत सुरू ठेवणे आर्थिक, व्यापारी दृष्टीने आवश्यक वाटत आहे. पण दुसरीकडे अमेरिकेच्या स्वत:च्या भू-राजकीय गरजांमुळे युरोपीय देशांना स्वतंत्रपणे भूमिका घेणे अवघड होत आहे. या परिस्थितीतच गेल्या काही महिन्यांपासून युरोपात इंधनाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. इंधनाच्या टंचाईमुळे त्याचे दर युरोपात भडकलेले आहेत. त्यामुळे रशियाकडून गॅसपुरवठा होण्याशिवाय युरोपसमोर अन्य पर्याय नाही.
नॉर्ड स्ट्रीम-2 चा मुद्दा
युरोप मोठ्या प्रमाणात रशियातून निर्यात होणाऱ्या इंधनावर अवलंबून आहे. युरोपला हा पुरवठा सध्या युक्रेनमार्गेच नॉर्ड स्ट्रीम-1 वायूवाहिनीद्वारे होत आहे. या वायूवाहिनीमुळे युक्रेनला दरवर्षी सुमारे 1.2 अब्ज अमेरिकन डॉलरचा महसूल मिळत आहे. काही वर्षांपूर्वी कीवकडून या वाहिनीचे वापर शुल्क वाढवून मिळवण्यासाठी अडवणूक होत होती. त्याचा परिणाम युरोपच्या गॅसपुरवठ्यावर झाला होता. त्यामुळे जर्मनीने वाढती मागणी आणि सुरक्षा या कारणांनी बाल्टिक समुद्रातून नॉर्ड स्ट्रीम-2 (Nord Stream-2) वायूवाहिनी टाकण्यासाठी 2018 मध्ये मान्यता दिली.
नॉर्मंडी आराखडा
जर्मनी, फ्रांस, रशिया आणि युक्रेन यांचाय प्रतिनिधींनी फ्रांसमधील नॉर्मंडी येथे चर्चा केली होती. 6 जुलै 2014 रोजी नॉर्मंडी येथे आयोजित करण्यात आलेल्या विजय दिवसाच्या 70 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने या देशांचे नेते पहिल्यांदा भेटले होते आणि त्यामध्ये युक्रेनच्या दोनबास प्रांतातील संघर्ष मिटवण्यावर चर्चा झाली होती. या 4 देशांदरम्यानचा हा एक अनौपचारिक मंच आहे. याच मंचाच्या माध्यमातून युक्रेनचा प्रश्न चर्चेच्या आणि शांततापूर्ण मार्गी लावण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत.
लिंक
https://avateebhavatee.blogspot.com/2022/02/blog-post_12.html
प्रतिक्रिया
25 Feb 2022 - 3:10 pm | शाम भागवत
कोणिही मधे पडू नका हेच तर रशियाचे म्हणणे आहे. युक्रेनने भारताविरोधात भूमिका दोन तीन वेळा घेतलेली असल्याने भारताने युक्रेनच्या बाजूने उभे रहावे हे अमेरिका भारताला कसे सांगू शकेल?
25 Feb 2022 - 3:13 pm | Trump
युक्रेनच्या युध्दात बर्याच लोकांच्या / देशांच्या नांग्या ठेचल्या जात आहेत.
25 Feb 2022 - 3:11 pm | sunil kachure
रशिया,अमेरिका बलाढ्य देश आहेत.
भारत पण कमकुवत देश आहे.
एक पण जागतिक झटका सहन करू शकणार नाही.
अलिप्त राहावे.
उगाच नाहीतर पाकिस्तान पेक्षा पण वाईट अवस्था होईल.
सामर्थ्याचा चुकीचा भ्रम पण भारत सरकार नी करू नये.
एक जरी निर्बंध टाकला तरी अन्न मिळणे मुश्कील होईल.
25 Feb 2022 - 7:41 pm | सुबोध खरे
एक जरी निर्बंध टाकला तरी अन्न मिळणे मुश्कील होईल.
इतका कडक हर्बल तंबाखू कुठे मिळतो सांगा.
पोखरण २ अणुस्फोटानंतर टाकलेल्या कडक निर्बंधामुळे आपल्याकडे किती भूकबळी गेले आहेत?
भारतात अन्नधान्य अतिरिक्त आहे हे आपल्याला माहिती आहे का?
Management of foodgrain surplus key challenge for India: RBI report
https://www.business-standard.com/article/economy-policy/management-of-f...
25 Feb 2022 - 8:03 pm | शाम भागवत
तांदूळामधे भारताचा जगात दुसरा नंबर.
चीनचा पहिला.
25 Feb 2022 - 10:21 pm | sunil kachure
कॅनडा आणि जपान नी आर्थिक मदत देणे (,कर्ज देणे) थांबवण्याचे संकेत दिले.
अमेरिका नी संरक्षण समुर्ग्री विकणार नाही अशी पुडी सोडली.
आणि भारताच्या अणू चाचणी चा फायदा घेवून पाकिस्तान नी पण आणि चाचणी केली.
१९९८ नी आज चा काळ खूप फरक आहे
फक्त मोठे आकडे दिसतात म्हणजे भारतात आर्थिक सुबत्ता आली नाही.
स्वलांबन तर नाहीच नाही
.गाव खेड्यातील आज ची स्थिती आणि १९८८ मधील स्थिती ह्याची तुलना केली तर अधोगती च दिसत आहे.
१९८८ चा काळ.
शेतीला वीज २४ तास होती.
आज आढवड्या मधून काहीच तास ती पण रात्री असते.
सिंचन योजना व्यवस्थित होत्या.
आज सर्व योजना मोडकळीस आलेल्या आहेत.
साखर कारखाना ,बाकी सहकार क्षेत्र योग्य स्थिती मध्ये होते ..आज पूर्ण मोडकळीस आले आहे.
ग्रामीण अर्थव्यवस्था उत्तम असणारे राज्य म्हणून महाराष्ट्र चा दबदबा होता आज फक्त सुखद आठवणी आहेत.
शहरांची अवस्था पण काही वेगळी नाही.
१९८८ आणि त्या नंतर चा काळ..
मुंबई मध्ये नोकऱ्या उपलब्ध होत्या,चांगले पगार होते.
आज चा काळ नोकऱ्या सर्व कॉन्ट्रॅक्ट पद्धती वर.
एक जागा आणि हजारो त्या साठी प्रयत्न करणारे.
ही महाराष्ट्र ची अवस्था .बाकी राज्य विषयी न बोललेले च बर.
25 Feb 2022 - 4:54 pm | Trump
शरणागतीची तयारी सुरु झाली. दोन दिवसपण टिकत नाहीत बहुतेक.
युक्रेन तटस्थतेवर चर्चा करण्यास तयार - युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की
Ukraine ready to discuss neutrality – Ukrainian President Zelensky
https://www.firstpost.com/world/ukraine-to-surrender-ready-to-discuss-ne...
https://www.newsfirst.lk/2022/02/25/ukraine-ready-to-discuss-neutrality-...
---------------
लवकर शरणागती पत्करली तर लवकर स्थैर्य येईल.
25 Feb 2022 - 11:46 pm | कॉमी
फिनलंडच्या प्रधानमंत्र्यांनी युक्रेन इन्व्हेजनमुळे फिनलंड नाटो मध्ये सामील होण्याच्या "चर्चा बदलतील", म्हणजेच नाटो मध्ये सहभागी होण्याची इच्छा सूचित केली होती.
त्यावर प्रतिसाद म्हणून, रशियन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी फिनलंड नाटो मध्ये जोडल्या गेल्यास गंभीर परिणाम होतील असे पत्रकार परिषदेत सांगितले.
इथे वाचा.
26 Feb 2022 - 9:00 am | कॉमी
भारत, रशिया, चायना आणि अरब एमिरेट्स या देशांनी युएन सिक्युरिटी कौन्सिलच्या रशियाला निषेध करायच्या ठरावावर मत देणे टाळले.
26 Feb 2022 - 9:49 am | sunil kachure
भारत,चीन,संयुक्त अरब एमिरती.हे देश तटस्थ राहिले हा निर्णय योग्य च वाटत आहे.
26 Feb 2022 - 1:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
काल सकाळी आठ-साडेआठला स्नानाला जाता जाता, आपल्या वाट्सॅप इंडियावर 'हालात बेकाबू हो रहे है, मोदी मदद करे- युक्रेन' 'मोदी पुतीन और युक्रेन के राष्ट्रपतीसे बात करे युक्रेन' 'नरेंद्र मोदी दुनिया के बहुत मजबूत नेता है- युक्रेन' अशा बातम्यांमुळे मला वाटलं तासा-दोन तासात मा. मोदीजी ' युद्ध नको, बुद्ध हवा' अशी भूमिका जाहीर करतील आणि युद्ध थांबेल असे वाटले पण तसे काही झाले नाही. मला काल स्नानाला दुपारचे बारा वाजले.
काल पाकिस्तानचे प्रधानमंत्री रशियाच्या दौ-यावर जाऊन तिकडे काश्मिरचा प्रश्न असाच आहे वगैरे गरळ टाकून आले. आणि आपण देशांतर्गत निवडणूकात व्यस्त होतो, युक्रेन रशिया युद्धाचे ढग दिसत असतांना युक्रेन मधे शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना आणायला आपल्याकडे जो पर्यंत रशिया युक्रेनमधे घुसत नाही आणि बाँबवर्षाव करीत नाही तो पर्यंत दोन्ही देशाकडे फार लक्ष द्यायचे नाही ही भूमिका मला फार फार आवडली. विमानभाडे प्रचंड वाढलेले असल्यामुळे विद्यार्थ्यांना परतायला अडचणी निर्माण होत आहेत अशा प्रतिक्रिया विद्यार्थ्यांच्या येत होत्या.
रशियाने किव्हवर जोरदार हल्ला चढवल्याच्या बातम्या येत आहेत. युक्रेनने आपल्या नागरिकांनाही युद्धात सहभागी करुन घेतल्याचे दिसत असून 'झुकेगा नही' असे म्हणत मित्र राष्ट्रांनी रशियाला एकाकी पाडावे असे आवाहन युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी केले आहे. युक्रेन राष्ट्राध्यक्षांनी आम्ही एकाकी पडलो असून बलाढ्य देश आम्हास मदत करीत नाहीत असे भाऊक उद्गार काढले आणि ''आम्ही सर्व इथेच आहोत. आपले सर्व नागरिक इथेच आहेत, आमचे सर्व सैन्य इथे आहे, आमच्या देशाचे संरक्षण करत आहोत आणी कायम इथे असेच उभे राहू '' असेही ते म्हणाले.( मूळ ट्वीटर संदर्भ) बातमी अनुवाद ऑनलाइन. फ्रान्स शस्त्रास्त्रे पुरवत असून युद्ध सुरु राहील असेही ते म्हणाले. ही सर्व परिस्थिती पाहता एक छोटासा देश एकाकी लढतोय अशी परिस्थिती दिसत आहे. सर्व देश मात्र, तटस्थपणे याकडे पाहात आहेत. उद्या बलाढ्य राष्ट्र जेव्हा अशा एखाद्या देशावर आक्रमण करतील तेव्हाही अशीच परिस्थिती राहील असे वाटते. मात्र, सैन्य, नागरिक यांची होणारी जीवित हानी. त्याचे परिणाम याकडेही जग असेच अलिप्तपणे पाहात राहतील असे वाटायला लागले आहे.
-दिलीप बिरुटे
26 Feb 2022 - 1:34 pm | Trump
सुप्रभात सर.
कृपया संदर्भ द्या.
माझा संदर्भ:
पहीली सुचना १५ फेब्रुअरीला आली होती आणि रशिया २४ तारखेला युक्रेनमध्ये घुसला.
https://en.wikipedia.org/wiki/2022_Russian_invasion_of_Ukraine
https://www.eoiukraine.gov.in/images/Advisory-15-02.jpg
https://www.eoiukraine.gov.in/advisory.php
कारण युक्रेनने नको तिथे उचापती केल्यात त्यामुळे त्यांना अयुरोपियन लोकांची सहानुभुती नाही. युरोपियन लोकांसाठी युक्रेनचे फारसे मुल्य नाही, त्यासाठी रशियाबरोबर युध्द करावे.
26 Feb 2022 - 1:38 pm | साहना
तुम्ही हा फॉरवर्ड नाही पाठिवला का ? साक्षांत प्रभू कृष्णाप्रमाणे महायानायक लॉर्ड ऑफ द मॅन स्वतः हे विमान घेऊन गेले असे काहींनी लिहायचे बाकी ठेवले होते.
https://knowyourmeme.com/photos/2317130-2021-2022-russia-ukraine-conflict
26 Feb 2022 - 1:56 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अजून तितकं सुरु नाही. पण हेही येऊ शकतं. 'इंडियन स्टूडंट ऑन बोर्ड' असा एक बोर्ड विमानतळाच्या काचेवर लावलेलं वाट्सॅप युनवरसीटीतलं फॉरवर्ड आलंय . रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांना भारतीय विद्यार्थ्यांना इजा होऊ नये, अशी स्पष्ट ताकीद दिली गेली आहे, ही आहे आजची ताकद इथपर्यंत आलंय सध्या.
-दिलीप बिरुटे
26 Feb 2022 - 2:05 pm | Trump
नमस्कार सर.
वाटसअॅप वर जसे लोक बरळतात तसेच काही लोक आंतरजालावर ही संदर्भाशिवाय लिहीतात. शेवटी दोन्ही प्रकाराचे लोक सारखेच.
ढवळ्याशेजारी बांधला पवळ्या, वाण नाही पणा गुण लागला. असो.
दुर्देवाने जे भारतातील उच्चशिक्षित वर्गाकडुन इतरांना मार्गदर्शन हवे ते मिळत नाही.
26 Feb 2022 - 1:24 pm | sunil kachure
सारखे देश प्रत्यक्ष युद्धात सहभागी होत नाहीत ह्याचे महत्वाचे कारण
रशिया समोर आहे.
रशिया युक्रेन ची युद्ध भूमी होवून देणार नाही.
अंतर खंडीय missile चा वापर करून अमेरिका,ब्रिटन च्या भूमीवर युद्ध घेवून जाईल.
तेव्हढी त्याची क्षमता आहे.
इराक असेल किंवा अफगाणिस्तान त्यांची ती क्षमता नव्हती म्हणून हे देश लष्करी कारवाई मध्ये सहभागी होते.
रशिया बाबत त्यांना रास्त भीती आहे.
26 Feb 2022 - 1:36 pm | साहना
दिवस ३ :
**आज माझ्याकडे थेट युक्रेन मधून माहिती आहे.**
माझ्या ओळखीची एक व्यक्ती क्यिव च्या बाहेर आर्सेलर मित्तल ची स्टील फॅक्टरी आहे तिथे काम करत होती. ती आज दिल्लीत परतली. १० दिवस मागे भारतीय सरकार आणि मित्तल ह्यांनी संयुक्तपणे सुनियोजितपणे त्यांना युक्रेन मधून बाहेर काढले होते. त्याच्या मते भारत सरकारने खूप आधीपासून भारतीय नागरिकांना विनंती केली होती कि बाहेर पडा. ज्यांना शक्य नव्हते त्यांना फुकट विमानसेवेची सुद्धा सोया केली होती. अनेक विमाने रिकामी सीट्स घेऊन परत गेली. युक्रेन, रोमानिया, पोलंड इत्यादी भागातून भारतीय दूतावासाने अत्यंत चांगले काम केले अशी माहिती मिळाली. त्याच्या मते जे विद्यार्थी युक्रेन मध्ये अडकले आहेत त्यांच्याशी सहानुभूती असली तरी त्यांच्या साठी भारत सरकारला दोष देणे चुकीचे आहे.
माझ्या मैत्रिणीशी माझे बोलणे झाले. ती सध्या रोमानिया मार्गे अमेरिकेत सुखरूप पोचली तरी तिचे आई वडील खारकीव मध्ये अडकले होते. पती युक्रेनियन सैन्यात आहे. खारकीव वर रशियाने सतत प्रचंड गोळीबार केला होता आणि त्यातून सामान्य लोक सुद्धा म्हणे सुटले नाहीत. तिचे आईवडील कसे बसे आज सुटून दुसऱ्या एका गांवात लपून राहिले आहे. तिथे त्यांच्याकडे जेमतेमच अन्न आणि संपर्काची साधने आहेत. नाटो ने प्रचंड प्रमाणात युक्रेन मध्ये शस्त्रास्त्रे तसेच इतर गोष्टी पाठवल्या आहेत त्यामुळे काही ठिकाणी युक्रेनियन स्वयंसेवकांनी उपग्रह मार्फत वगैरे इंटरनेट सेवा चालू ठेवली आहे. दार काही तासांनी आपले आईवडील किमान जिवंत आहेत कि नाहीत ह्याची माहिती त्याच्या द्वारे तिला मिळत आहे. मी हे थोड्या कठोरपणे लिहिले असले तरी तिची मनस्थिती मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही.
खारकीव मध्ये एक सुप्रसिद्ध बाल हृदय विकार तज्ञ् आहेत ज्यांनी रशियन लोकांसाठी शेकडो फुकट शस्त्रक्रिया केल्या आहेत. त्याच्या इस्पितळावर आज रशियाने बॉम्ब टाकून त्याला नष्ट केले. ह्या हल्ल्याचा लोकल रशियन कमांडर म्हणे एके काळी ह्याच इस्पितळांत आपल्या मुलावर उपचार घेत होता. हि माहिती मला फक्त तिच्याकडून मिळाली असल्याने इनरनेटवर सध्या तरी मिळाली नाही.
**वॉशिंग्टन मधील भारतीय दूतावासातील एका कनिष्ठ ऑफिसरशी बोलणे झाले.**
फक्त भारतीयच नाही तर भारतीयांबरोबर असलेले रशियन सरकारचे चांगले संबंध वापरून अनेक प्रकारची मानवतावादी सेवा युक्रेन मध्ये देण्यासाठी भारत सरकार आणि इतर पाश्चात्य देश सहकार करत आहे असे समजले. आता ह्या व्यक्तीने जास्त नाही सांगितले तरी कदाचित युक्रेन मधील आपले विविध असेट्स ना पाश्चात्य देश भारताच्या मदतीने देशाबाहेर काढू शकतात. (हि माझी अटकळ असून सदर ऑफिसर ने असे काही सांगितले नाही पण भारत नक्कीच ह्या गोष्टींत मोठी भूमिका बजावणार आहे).
**अमेरिकन dhs संबंधित लोकांशी माझे बोलणे**
युक्रेन मधील संकट हे पाश्चात्य देशांसाठी मानवबळाच्या दृष्टीने पर्वणी असून अनेक निर्वासित विविध देश आनंदाने घेतील अशी अटकळ अनेकांनी लावली होती पण किमान अमेरिकन दृष्टिकोनातून ती फोल ठरली आहे. विविध अमेरिकन संघटनांनी जोर लावून सुद्धा DHS ने युक्रेनियन निर्वासित किंवा अमेरिकेत साधय असेलेल्या युक्रेनियन लोकांसाठी काहीही नियोजन केले नाही. इतकेच नव्हे तर काही युक्रेनियन व्यक्ती ज्यांचे विविध प्रकारचे वीझा संपत आले आहेत त्यांना सुद्धा देशांत आणखीन थोडा काळ राहण्यासाठी काहीही पावले आपण उचलणार नाही असेच DHS ची भूमिका राहील असे मला सांगण्यात आले. अर्थांत माझे काँटॅक्ट्स अतिशय खालच्या लेव्हल चे आहेत.
**नाटो ची भूमिका**
माझ्या लेबनॉन बेस्ड सुरक्षा निरीक्षक मित्राच्या माहिती प्रमाणे (ह्याला विविध व्यावसायिक उपग्रह फुटेज चा ऍक्सेस आहे) नाटो ने युक्रेन प्रकरण जिव्हारी लावून घेतले आहे. सध्या फ्रांस आणि अमेरीका हि दोन राष्ट्रे सोडल्यास आणि ब्रिटिश नेव्ही सोडल्यास इतर कुठल्याही नाटो देशाचे सैनिक कुठल्याही युद्धासाठी सज्ज नाहीत. त्यांच्याकडे पाहिजे ती सामुग्री नाही आणि असली तरी युक्रेन रशिया प्रदेशांत लष्करी कारवाईसाठी ज्या प्रकारची तयारी लागते ती नाही. हे सर्व हि मंडळी आधी मान्य करत नव्हती पण आता हि गोष्ट त्यांना मान्य करावीच लागत आहे. त्यामुळे अमेरिका आणि फ्रांस ने पुढाकार घेऊन मोठ्या प्रमाणावर लष्करी सज्जता संपूर्ण युरोप मध्ये निर्माण करायचे ठरवले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत युद्ध पेटले नाही तरी नाटो सर्वत्र विमाने, जहाजे पायदळ विनाकारण तरी फिरवेल (म्हणे).
त्याशिवाय अमेरिकेने म्हणे डिसेम्बर पासून युक्रेन मध्ये मोठ्या प्रचंड प्रमाणात शस्त्रात्रे पाठवली आहे. ह्यांत javelin अँटी टॅंक क्षेपणास्त्रे, ऑटोमॅटिक रायफल्स, स्कोप्स, नाईट व्हिजन यंत्रे इत्यादी आहेत. त्याशिवाय उपग्रह फोन, उपग्रह इंटरनेट यंत्रणा इत्यादी सुद्धा पाठवली आहे.
माझ्या मित्राच्या मते, अमेरिकेने प्लॅन Z च्या खाली आपल्या काही विशेष फोर्सेस ना युक्रेन मध्ये मागल्या वर्षी पाठवले होते (म्हणे). त्यांनी काही युक्रेनियन कमांडोना प्रशिक्षित केले होते. युद्धाच्या परिस्थितींत ह्यांचे काम रशियांत घुसून रशियाच्या काही मोक्याचा गॅस आणि तेल पाईपलाईन्स ला उडवून लावणे हे होते. हि टीम सध्या युक्रेन मध्ये कार्यरत आहे कि रशियाने ह्यांना आधीच नेस्तनाबूत केले आहे हे सध्या कुणालाच ठाऊक नाही.
उपग्रह चित्रा प्रमाणे रशियाने न भूतो ना भविष्यती अश्या प्रकारचे सैन्य युक्रेन सीमेवर गोळा केले होते. साधारण म्हणे एकूण ७५% रशियन सैन्य ह्यांत आहे. काल अतिशय वेगाने रशियाने काही ठिकाणी तात्पुरती इस्पितळे उभारली आणि मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय मदत सीमेवर वळवली त्यावरून रशियेचे अपेक्षेपेक्षा जास्त नुकसान होत आहे असे दिसून येते. सध्या सुमारे १५,००० नाटो वाहने युक्रेन ला विविध प्रकारच्या गोष्टींचा पुरवठा करत आहे. किमान ६,०००,००० राऊंड्स ऑफ अँम्युनिशन क्यिव मध्ये पोचवण्यात आली. सुमारे १०० javelin क्षेपणास्त्रे म्हणे सध्या क्यिव मध्ये आहेत.
त्याशिवाय मागील काही दिवस अर्बन युद्धतंत्र ह्या विषयावर असंख्य पत्रके नाटो ने युक्रेन मधील सैन्याला पाठवली. त्यातील काही ठळक माहिती मला माझ्या मित्राने दिली.
१. क्यिव शहरांतील पूल अगदी शेवटच्या क्षणी उडविण्यात येतील.
२. सर्व रस्तावरचे दिशादर्शक फलक मुद्दाम बदलण्यात येतील.
३. रणगाड्यांची रांग येताच त्यांना कसे निकामी करायचे ह्याची माहिती देण्यांत येत आहे. तर म्हणे पहिला आणि शेवटचा रणगाडा ह्यांना सर्वप्रथम उडवायचे. त्याशिवाय विविध प्रकारचे रशियन रणगाडे कसे ओळखावे आणि प्रत्येकाची कमजोरी काय हि माहिती युक्रेन मध्ये सर्वत्र पोचविण्यात आली आहे. त्याशिवाय म्हणे रणगाड्यांच्या पट्ट्याना तोडूशकणारी विशिष्ट प्रकारची तार सुद्धा युक्रेनियन जनतेला उपलब्ध करून देण्यात आली आहे.
माझ्या मित्राच्या मते युद्धांतील सर्वांत महत्वाचे हत्यार हे शेवटी शिस्त आणि प्रशिक्षण असल्याने ह्या सर्व गोष्टींचा फायदा युक्रेनच्या अप्रशिक्षित जनतेला होणे कठीण आहे.
सुरक्षा वर्तुळांत अजून रशिया क्यिव घेण्यात किंवा कुठल्याही युक्रेनियन शहरावर १००% काबू करण्यात यशस्वी झाली नाही ह्यावर आश्चर्य व्यक्त होत आहे. (म्हणे).
रशियाने म्हणे एकूण ११० कॅलिबर नावाची क्षेपणास्त्रे युक्रेन वर फेकली. हि जबरदस्त महागडी आणि शक्तिशाली क्षेपणास्त्रे असून रशियाकडे फारतर २००-३०० असतील असा पाश्चात्य देशांचा कयास होता. आता कदाचित हा साठा मोठा असू शकतो असे त्यांना वाटते.
भारत-रशियाने संयुक्त पणे विकसित केलेला ब्राह्मोस प्लॅटफॉर्म अजिबात वापरात आला नाही.
**इतर अवांतर माहिती**
- अमेरिकन सरकारने झेलेन्स्की आणि त्याच्या परिवाराला देशांतून सुरक्षित अमेरिकेत आणण्याची ऑफर दिली आहे ती त्यांनी धुडकावून लावली.
https://twitter.com/nntaleb/status/1497391188806012931
https://twitter.com/nntaleb/status/1497274641693487104
- जर्मनीचे गुप्तहेर प्रमुख युक्रेन मध्ये अडकून पडले होते त्यांना जर्मन स्पेशल फोर्सेस ने गुपचूप देशांत परत आणले. हल्ला अनपेक्षित झाल्याने मी अडकलो असे त्यांनी सांगितले. ह्याला तिथेच ठेवायला हवा होता असे माझे मत आहे.
- बहुतेक पाश्चात्य माजी राजनेते जे रशियन कंपन्यांच्या बोर्ड वर होते त्यांनी राजीनामा दिला आहे. अपवाद फक्त जर्मनीच्या माजी चॅन्सलर ह्यांचा. पण एकूण नावे पाहता युरोपियन नेते किती भ्रष्ट आहेत हे दिसून येते. ( शरद पवार कितीही ** असले तरी काँग्रेसी फतव्याच्या विरोधांत जाऊन त्यांनी वाजपेयी ह्यांचे समर्थन आणि अभिनंदन पोखरण नंतर केले होते. )
26 Feb 2022 - 2:39 pm | Trump
छान माहीती.
युध्द म्हटल्यानंतर थोडे फार लोक मरणारच.
26 Feb 2022 - 3:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रतिसादातील पहिल्या उता-यासंबंधी.
आत्ता युक्रेन कीव दुतावासातील सूचना वाचत होतो. (दुवा ) भारतीयांना तेथून काढण्याच्याबाबतीतची प्रक्रिया उशिरा सुरु झालेली दिसते. दुव्यावरील सुचनेवरुन दिनांक वीसपासून त्यांनी ही प्रोसेस सुरु केलेली दिसते. एकवीस फेब्रूवारीला तीन फ्लाईट्स च्या सुचना दिसत आहेत पण मग नंतर एअरस्पेस बंद झाल्यामुळे भारतीय प्रवास करणा-यांना दुतावासाने घरीच थांबण्याच्या राहण्याच्या आणि सतत दुतावासाशी संपर्क साधण्याच्या सुचना दिलेल्या दिसतात. अनेक विद्यार्थी रेल्वेस्थानकात अडकले. बहुतांशी लोकांना वाटले होते की हे संकट टळेल युद्ध होणार नाही. भारतातून किव येथे गेलेले इंडियाचे विमान एअरस्पेस बंद झाल्यामुळे विमान पोहचू शकले नाही अशी एक बातमी नागरीउड्डयन मंत्रालयाने दिली होती. सारांश, सर्व प्रोसेसला उशीर झाला त्यामुळे तिथे भारतीय विद्यार्थी अडकले ही गोष्ट नाही म्हटले तरी मान्य करावे लागते. अर्थात यालाही दोन बाजून असतीलच.
बाकी, तपशीलवार माहिती प्रतिसाद वाचत आहे. सर्व माहितीपूर्ण आहे. मनापासून आभार.
-दिलीप बिरुटे
26 Feb 2022 - 3:39 pm | Trump
प्रविण स्वामी:
रशियाबाबत पंतप्रधान मोदींची भाषा नेहरूंपेक्षा वेगळी नाही आणि भारताला त्याची किंमत मोजावी लागेल
On Russia, PM Modi's language isn't too different from that of Nehru & India will pay costs
26 Feb 2022 - 4:55 pm | कॉमी
चांगला व्हिडीओ आहे, ऐतिहासिक पार्श्वभूमी साठी.
26 Feb 2022 - 4:01 pm | Trump
संयुक्त अरब अमिराती कसे काय तटस्थ राहीले ते कळत नाही??
26 Feb 2022 - 4:42 pm | शाम भागवत
संयुक्त अरब अमिरातीचा सर्वात जास्त विश्वास मोदींवर आहे. कोणि मानो अथवा न मानो.
मोदींनी सांगितले तर पाकिस्तानला सुध्दा झिडकारचील.
असो.
26 Feb 2022 - 4:44 pm | कॉमी
हे कशावरून ? काही पूर्व घटना ?
26 Feb 2022 - 4:45 pm | शाम भागवत
इस्लामिक संघटनेच्या परिषदेच्या वेळेस घडलेल्या घटना आठवा.
26 Feb 2022 - 4:56 pm | कॉमी
काही समजले नाही, विस्ताराने सांगितले तर आभारी असेन.
26 Feb 2022 - 7:09 pm | अमरेंद्र बाहुबली
भागवत काका असले भयानक विनोद नको. युध्दाच्या चर्चेत तर आजिबात नको.
26 Feb 2022 - 7:59 pm | शाम भागवत
:)
26 Feb 2022 - 5:10 pm | शाम भागवत
भारताची उपस्थिती असेल तर पाकिस्तान हजर नसेल असं वक्तव्य इम्रानखानने केलं होतं. तेव्हा पाकिस्तानशिवाय परिषद भरेल असं उत्तर पाकिस्तानला देण़्यात आलं होतं.
26 Feb 2022 - 5:18 pm | Trump
भाऊ तुमची तुलना गैरलागु आहे.
-
जगातील मोठ्या (हिंदकेसरी, महाराष्ट्रकेसरी इ.) पैलवानांची कुस्ती चालु आहे. तुम्ही त्यांच्याबरोबर एका गल्लीतल्या उपद्रवी भणंगाची तुलना करताय.
26 Feb 2022 - 5:54 pm | शाम भागवत
तो भणंग रशियाच्या बाजूने गेलाय. सौदी अमेरिकेबरोबर असायचा. भारत तटस्थ राहिलाय म्हटल्यावर, त्यानेही कोणतीही बाजू घ्यायची नाकारली.
जाऊ दे.
मी काय म्हणतोय ते बरोबर की चूक हे कळायला बरीच वर्षे लागणार आहेत. कारण तेव्हा मोदी प्रेम अथवा द्वेष पूर्णपणे बाजूला ठेऊन विचार केला जाऊ शकेल असे वाटते.
तो पर्यंत जिवंत असेन तर थांबेन म्हणतो. ;)
26 Feb 2022 - 6:10 pm | कॉमी
पण मोदी रशियाची तळी उचलून UAE ला पटवायला जातीलच कशाला ? भारताला रशियाला दुखावणे शक्य नाही म्हणून भारताने मत दिले नाही, त्यात रशियाचे समर्थन मला तर दिसले नाही.
आणि भारताचा मत देण्यामध्ये स्वतःस धक्का न लागू देण्याचा पवित्र आहे, तसा UAE चा काय इंट्रेस्ट आहे हे पाहायला हवे. मोदींनी सांगितले म्हणून UAE ने मत दिले नाही किंवा मोदींचे अनुकरण UAE ने केले हे फार अतिसुलभीकरण आणि वस्तुस्थितीशी न जुळणारे वाटले. UAE चे सुद्धा काही हितसंबंध असतील, ते जाणून घ्यायला ट्रम्प यांच्याप्रमाणे मला सुद्धा आवडतील.
मताचा आदर आहेच.
26 Feb 2022 - 6:13 pm | कॉमी
तसंही, रशिया व्हेटोच करणार असल्याने एकूण ठरावाला अर्थ कमीच होता. असे असताना श्री मोदी यांनी uae ला समजावले किंवा uae ने मोदींचे अनुकरण केले असे वाटत नाही.
26 Feb 2022 - 6:49 pm | शाम भागवत
मी तरी या विषयावर थांबलोय.
:)
26 Feb 2022 - 6:58 pm | कॉमी
ओके, नो प्रेशर.
26 Feb 2022 - 5:58 pm | sunil kachure
रशिया ला UAE ला दुखवायचे नाही.
अफगाणिस्तान ,इराक,मध्ये अमेरिके नीच दहशत वादी निर्माण केले .
अमेरिका हा विश्वास ठेवण्यास योग्य देश नाही
आणि उघड विरोध करून शत्रुत्व घेण्यात शहाणपण नाही.
म्हणून अलिप्त राहणे हा पर्याय स्वीकारला जातो.
26 Feb 2022 - 8:00 pm | मदनबाण
आत्ता पर्यंत साधारण एक लाख युक्रेनियन नागरिकांनी पोलंडची बॉर्डर क्रॉस केली आहे.युक्रेन मध्ये इतर देशातुन दारुगोळा हत्यारे इत्यादी याचा पुरवठा वाढला आहे.
रशियन Topol-M या आयसीबीएमची मॉस्को मध्ये मुव्हमेंट पाहण्यात आलेली आहे. SWIFT बँकिंग सिस्टीम मधुन रशियाला डच्चु देण्यासाठी आता विविध देश आग्रह धरु लागले आहेत. आता रशिया आणि रशिया विरोधी यांच्यात फॉरेन फंड ब्लॉक करण्यावरुन शर्यत सुरु होईल असे दिसते.रशियाचा विरोधात आपण गेलो तर रशियन हॅकर्स त्यांचे पावरग्रीड कोलॅप्स करतील अशी अमेरिकेत असल्याचे समजते. [ टोटल ग्रीड फेल्युअर म्हणजे केवळ हाहाक्कार ]
रशियन तेल ज्या ऑईल टॅ़कर्स मधुन रशिया बाहेर पाठवले जाते त्या ऑइल टँकर कंपन्या सॅक्शन लागण्याच्या भीतीने निदान सध्य काळात तरी वेट अॅड वॉच मोडवर जातील आणि याचा परिणाम स्वरुप कच्च्या तेलाचे भाव अधिक वेगाने वाढु शकतात [ स्ट्रॅटिजिक ऑइल रिझर्व्ह मधुन मोठे देश काही काळ ऑइल रिलीज करुन या भाव वाढीचा मुकाबला करतील, पण लहान देशांची एकंदर बुच्चण लागु शकते.] रशियन मिलेटरीची वाहने/ टँक्स यांच्यावर Z हे इंग्रजी अक्षर [ रशियन भाषातील नव्हे ] काढल्याचे समजते. आपल्या आणि शत्रु च्या ताफ्यात चटकन फरक करण्यासाठी याचा उपयोग होतो, तसेच कुठल्या विभागातली वाहने आहेत हे मिडियात येत असलेल्या फुटेजवरुन देखील हे पटकन ओळखण्यासाठी वापरले जाऊ शकते.
युरोपियन देशात आपपासात भांडणे सुरु होण्यासाठी / लागण्यासाठी ही उत्तम वेळ आहे. आता कोणाची डोकी कोणत्या दिशेला वळत आहेत, ती कशी चालवली जात आहेत,कोणाचा कुठे कुठे स्वार्थ आणि कोणाचे कुठे कुठे हितसंबंध गुंतले आहेत ते अधिक उघड होईल. पुतीनसाठी हे युद्ध लवकर संपणे गरजेचे आहे, हे युद्ध जितके लाबेल तितका अधिक रक्तपात होत जाईल आणि युक्रेनच्या बाजुने अधिकची सहानभुतीची लाट निर्माण करुन त्याचा रशिया विरोधात वापर केला जाईल जे अर्थातच पुतीनला नको असणार.
या युद्धा बद्धल रशियन दृष्टीकोन :- युक्रेन हा रशियाला मोठा धोका आहे. [ क्लोज टु मॉस्को आणि सेंट.पीटर्सबर्ग ]त्यामुळे तो नाटो मध्ये सहभागी होऊ नये आणि तसे होऊन आमच्यावर शस्त्रास्त्र रोखली जाऊन नयेत. युक्रेनला रशियाने या आधी आर्थिक मदत केलेली आहे आणि युक्रेन कडुन अजुन ५ बिलियनची थकबाकी येणे आहे.१९९० मध्ये त्यांनी युक्रेनला वेपन्स आणि मशिनरी देऊ केली होती आणि तुम्ही कधीच नाटो जॉइन करु नका अशी अट / मागणी ठेवली होती. युक्रेन ने मात्र अमेरिकेशी सलगी केली आणि आम्हाला धोका उत्पन्न होईल असे वर्तन सुरु केले.युक्रेन मध्ये अनेक लोक / रशियन / रशियन भाषिक आहेत ज्यांना रशियात परत भाग व्हावे असे वाटत आहे.
एकदा पुतीन ने ओबामाला [ २०१० ] विचारले होते की मेक्सिको अथवा कॅनडात अमेरिका विरोधात वेपन्स डिप्लॉय केले गेलेली चालतील का ? ओबामा अर्थातच नाही म्हणाला म्हणुन स्वतःच्या देशाच्या दोन महत्वपुर्ण शहरांचे रक्षण हे पुतीनचे परम कर्तव्य ठरते.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे | वशिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे || कवी वाल्मीकीसारिखा श्रेष्ठ ऐसा |नमस्कार माझा सद्गुरू रामदासा ||
26 Feb 2022 - 8:12 pm | मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे | वशिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे || कवी वाल्मीकीसारिखा श्रेष्ठ ऐसा |नमस्कार माझा सदगुरु रामदासा ||
26 Feb 2022 - 9:39 pm | Trump
ज्या गतीचे रशियन फौजा युक्रेनमधुन जात, किइवला पोचल्या त्यामुळे त्यांना कोणताही प्रतिकार होताना दिसत नाही. आंतरजालावर हातघाईच्या लढाईचे कोणतेच व्हिडिओ उपलब्ध नाहीत. त्यामुळे रशियन फौजाचे नुकसान म्हणजे नाटोवाल्यांचे बहुतेक मनोयुध्द्द असा प्रकार असावा.
27 Feb 2022 - 2:37 am | साहना
युक्रेनियन लोक फार तर आणखीन ४८ तास तग धरू शकतील दारुगोळ्यापेक्षा पाणी आणि अन्न ह्यांची कमतरता त्यांना जाणवेल.
अजून एकही शहरावर रशियाचा १००% ताबा नाही प्रत्येक ठिकाणी त्यांना अटकाव होत आहे. क्यिव वर सर्वांत आधी ताबा मिळवण्याचा त्यांचा मनसुबा अजून तरी फोल ठरला आहे. दोन Ilyushin Il-76 [१] विमाने पडली गेली हे रशिया साठी धक्कादायक आहे आणि सर्वानाच हि बातमी कदाचित युक्रेनियन प्रोपागंडा असावी असे वाटले होते पण सध्या वेवेगळ्यऊ माध्यमांनी आणि देशांनी ह्या बातमीला दुजोरा दिला आहे. आपल्या अमेरिकन ग्लोबमास्तर प्रमाणे हि महा प्रचंड विमाने असून त्यांत साधारण १००-२०० सैनिक असू शकतात.
मी आधी वर्तवलेल्या भाकिता प्रमाणे :
१. रशियन सैन्य हे बेशिस्त आणि ढिसाळ दिसून येत आहे. त्यांची DEAD आणि SEAD क्षमता फारच कमी होती आणि अजून युक्रेनियन वायुदल क्यिव मध्ये कार्यरत आहे. अनेक रशियन सैनिक हे जबरदस्तीने भरती केलेले सैनिक आहेत आणि नक्की आपण कुठल्या मिशन वर जात आहोत ह्याची माहिती त्यांना आधी नव्हती असे पकडलेल्या सैनिकावरून दिसून येत आहे. काही रशियन सैनिक आणि रणगाडे वाट चुकून आणि डिझेल संपून अडकून राहिले आहेत असे दिसून येत आहे. एका रशियन सैनिकाच्या रेडिओ मेसेजेस वर "नक्की कुणाला मारायचे आहे ? सर्वच लोक आपले लोक वाटत आहेत" असा संदेश लोकांनी ऐकला.
२. राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की ह्यांची प्रतिमा उजळून निघाली आहे. शेवट काहीही झाला तरी पुसी तृदेव किंवा बारीक सारीक गोष्टीवर आपल्या बंकर मध्ये लपून बसणाऱ्या ट्रंम्प-बायडन पेक्षा झेलेन्स्की हे खरे नेते वाटतात. कॉमेडियन नेता झाला आणि नेते विदुषक झाले अश्या प्रकारचे मिम वायरल झाले होते त्यांत तथ्य आहे.
३. पुतीन ह्यांना कदाचित २४ तासांत विजयाची अपेक्षा असावी. झेलेन्स्की पळून जातील आणि नेतृत्वहीन युक्रेनियन आर्मी शस्त्रे टाकून देतील आणि नाटो भेटून निर्बंध टाकण्याच्या आधी युक्रेन मध्ये आपली कठपुतळी उपस्थित करून आपण माघार घेऊ कदाचित असा पुतीन ह्यांचा होरा असावा. हिटलर च्या शेवटच्या काही आठवड्याप्रमाणे कदाचित रशियन मिलिटरी नेतृत्वाने घाबरून पुतीन ह्यांना सत्य परिस्थितीची जाणीव करून दिली नसावी. पुतीन ह्यांनी ज्या प्रकारे जाहीर रित्या आपल्याच अधिकाऱ्यांना सार्वजनिक रित्या सुनावले किंवा ज्या पद्धतीने पुतीन ह्यांना घाबरून सर्व लोक उभे होते त्यावरून पुतीन हे कदाचित एकटे पडले असावेत असे वाटते.
४. भारत सारख्या देशांत कितीही मोठी निदर्शने झाली तरी त्यावरून ती बहुसंख्य जनता आहे असे आम्ही म्हणून शकत नाही पण रशिया सारखे देश उलट आहेत. इथे छोटी निदर्शने सुद्धा मोठ्या असंतोषाचे निदर्शक आहेत. ज्या पद्धतीने संपूर्ण रशियांत उस्फुर्त पणे पुतीन ह्यांच्या विरोधांत निदर्शने होत आहेत आणि पुतीन ह्यांचा अधिकाऱ्यांची मुलेच ज्या पद्धतीने माध्यमावर युद्धाची टीका करत आहेत त्यावरून पुतीन ह्यांचे दिवस भरले आहेत असे मला वाटते.
५. पुतीन ह्यांनी आपल्या जनरल मंडळींवर दबाव टाकला असेल आणि त्यांनी घिसाडघाईने निर्णय घेतले असावेत आणि त्याच्या नादांत आपलेच तरुण सैनिक विनाकारण मारले जातील ह्याची पर्वा केली नाही. म्हणूनच Ilyushin Il-76 सारखी विमाने ह्यांनी विना SEAD शत्रू प्रदेशांत पाठवली आणि गमावली. ह्या गोष्टींनी रशियन सैन्याचे मनोबल कमालीचे खालावणार आहे. उद्या क्यिव पडले तरी रशियन सैन्य हे जास्त काळ इथे राहू शकणार नाही आणि पुतीन ह्यांचे कठपुतळी सरकार सुद्धा युक्रेन चा ताबा ठेवू शकेल असे वाटत नाही. मुख्य म्हणजे रशियन अकार्यक्षमता, सैन्याची बेशिस्त आणि खालावलेले मनोबल, पुतीन ह्यांच्यावर सामान्य रशियन्स ना असेलेला राग हे सर्व आता सार्वजनिक झाले आहे. ह्याचे दूरगामी परिणाम आता जगावर होतील.
[१] https://theaviationist.com/2022/02/26/two-il-76s-shot-down-in-ukraine/
27 Feb 2022 - 11:52 pm | Trump
धन्यवाद प्रतिसादांबद्दल.
खालील प्रतिसाद आंतरजालिय माहीती, आणि मित्रमंडळीशी केलेल्या चर्चेचे फलित आहे. ती माझी मते किंवा विश्लेषण म्हणुन घ्यावीत.
१.
रशियाने सुरवातीला सौम्य शस्त्रांचा मारा केला असे दिसते. जसा जसा विजय मिळवयला वेळ लागेल तशी त्याची संहारकता वाढत जाईल. अजुन तरी विमानातुन बॉम्बफेक सुरु केल्याचे दिसत नाही.
कदाचित लवकरात लवकर आणि कमीत कमी नुकसानीमध्ये विजय मिळवुन ध्येय साध्य करणे अशी योजना दिसते. विमानातुन बॉम्बफेक केली तर जिवीत आणि वित्तहानी भरपुर होईल, जशी जशी हानी वाढेल तसा युक्रेनच्या जनतेचा विरोध वाढेल. विजय मिळाल्यानंतर पुनर्बांधणीसाठी ज्या प्रमाणात नुकसान तिककाच पैसा गुंतवावा लागेल.
गेल्या २ महीन्यामध्ये इतका परस्परविरोधी आरडाओरडा झाला आहे की त्यांचा गोधळ उडाला नसेल तर मोठी गोष्ट. डिझेल संपणे वैगरे छोटी बाब. एकाद-दुसर्या गोष्टीने पुर्णपणे रसद अपुरी आहे किंवा नियोजन अपुर्ण आहे असा निष्कर्ष काढता येत नाही. रशियन, युक्रेनियन लोक बरेचसे एकसारखे दिसतात आणि त्यांच्यातील भेद करणे मुश्कील आहे. त्यामुळे गनिमी कावा (false flag) ची शक्यता समजुन पुन्हा कोणावर हल्ला करायचा आहे विचारणे आणि खात्री करणे चुकीचे नाही. चुकुन आपल्याच लोकांना (friendly fire) मारण्याचे किस्से भरपुर आहेत.
https://en.wikipedia.org/wiki/List_of_friendly_fire_incidents
मला तरी १५ मिनीटाची प्रसिध्दी वाटते. त्यांचे भविष्य युध्द कश्या वळणावर जाते, किती नुकसान होते, श्री पुतीन जिंकल्यानंतर काय मागण्या करतात, युक्रेनला किती जाच करतात त्यावर अवलंबुन आहे. कोणत्याही नेत्याचे पहीले काम स्वता:च्या देशाला आणि जनतेला सुरक्षित ठेवणे हे आहे. दुर्देवाने श्री झेलेन्स्की ते करु शकले नाहीत. श्री बायडन किंवा श्री ट्रंप यांच्याबरोबरची तुर्तास नकोच, एक वर्षानंतर बघुया.
https://en.wikipedia.org/wiki/15_minutes_of_fame
२४ तासांत विजयाची अपेक्षा नसावी. कारण ज्या पध्दतीने युरोपियन आणि तत्सम युक्रेनपाठीमागे उभे होते किंवा उभे राहण्याच्या बाता मारत होते त्याप्रमाणे तसा समज श्री पुतीन करुन घेणार नाहीत. लोकशाहीमध्ये निर्णयाला वेळ लागतो, अशी समज त्यांना नक्कीच असावी. आणि युक्रेनच्या मदतीला येणार ते कोणत्या कायदेशीर पार्श्वभुमीवर तो प्रश्न आहे. आधी युएन सुरक्षा समिती, नंतर सर्वसाधारण सभा अशे टप्पे ओलांडायला लागतात. जर रशियावर कायदे / संकेत मोडल्याचा आरोप करायचा तर कमीत कमी तेच संकेत पाळायला नकोत का, किमान तसे नाटक तरी नको का करायला!
तसे वाटत नाही. श्री हिटलरच्या शेवटच्या दिवसांची तुलना गैरलागु आहे. स्टॅलिनग्राड आणि नार्मेडीनंतर जवळपास जर्मनी हरणार हे सगळ्यांना माहिती होते. युक्रेनचे युध्द रशिया जिंकणार हे तुम्हीच स्वतःच बर्याच ठिकाणी लिहीले आहे. हे नक्कीच रशियन सैन्यधिकार्यांना समजत असेल.
म्हणजे रशियामध्ये पण लोकशाही आहे, जरी ती तथाकथित मुक्त जगाला मान्य नसली तरी. :) असो.
असल्या टिका चार दिवस चालतात. जी लोक युध्दांच्या बाजुने ती शक्यतो निदर्शने करण्याच्या भानगडीत पडणार नाही.
ही शक्यता बरोबर वाटते आहे. विमाने पडणे म्हणजे बहुतेक अतिआत्मविश्वास, शंत्रुला कमी लेखणे किंवा घिसडघाई दिसते.
मनोबल ते आणि अधिकारी किती तयार आहेत त्यावर आहे. रशियन सैनिक युक्रेनियन लोकांचा द्वेष करत नाही. २-३ विडिओमध्ये युक्रेनियन जनता येऊन तोंडवर सुनावताना आढळलेत तरी रशियन सैनिक संयम ठेऊन आहेत, सदर संवाद आदरपुर्ण आहे. पुतीन यांच्यावर सर्वसामान्य जनतेचा विश्वास नाही किंवा राग आहे, हे मत चुकीचे आहे. रशियन जनतेने सोवियत युनियन कोळल्यानतंर झालेले हाल, युरोपियन देशांनी विनाकारण केलेली ससेहोलपट बघितली आहे. कोणतीही जनता नेता जिंकत असताना किंवा जिंकण्याची शक्यता असताना नेत्याबरोबरच असते.
27 Feb 2022 - 1:51 am | Trump
अर्नब गोस्वामीची अरडाओरड आवडत नाही. पण युरोपियन लोकांना तोडांवर झोडले ते पाहुन बरे वाटले.
27 Feb 2022 - 3:19 am | Trump
अमित सेनगुप्ता:
27 Feb 2022 - 3:55 am | Trump
Why Russia attacked Ukraine | Russia Ukraine war
27 Feb 2022 - 9:03 am | sunil kachure
ह्याचा अर्थ रशियन सेना बेशिस्त आहे,त्यांना लढायच व अनुभव असा त्याचा अर्थ नाही
अजून एक पण ताब्यात आले नाही.
ह्याचा अर्थ युक्रेन टक्कर देत आहे असा पण त्याचा अर्थ नाही.
कमीत कमी विनाश होणारी शस्त्र रशिया वापरत आहे
जेणे करून कमी मनुष्य हानी व्हावी.
युक्रेन काय एका तासात शरण येईल.
प्रचंड विनाश करणारी शस्त्र रशिया नी वापरायला प्राधान्य दिले तर .
काश्मीर मध्ये कारवाई करताना भारताला पण सैनिक गमवावे लागतात दोन तीन अतिरेकी मारण्यासाठी.
त्याचा अर्थ भारतीय सैन्य लढण्यास सक्षम नाही असा त्याचा अर्थ नसतो
कमीत कमी बळ,आणि हल्या करताना संयम सैनिकांना ठेवा लागतो.कारण भूमी आपलीच असते.
27 Feb 2022 - 1:39 pm | Trump
संबधित लेखः चीन, रशिया आणि मुक्त समाज - अंतिम भाग
http://www.misalpav.com/node/49895
27 Feb 2022 - 2:29 pm | Trump
रशियन सैन्य खार्किवमध्ये घुसले. ०२/२७/२०२२
---------------
अभ्यासु लोकांनी सदर युक्रेनियन वाहिनी पहावी. भरपुर साहित्य आहे.
https://www.youtube.com/user/obozrevatelcom/videos?view=0
27 Feb 2022 - 2:49 pm | Trump
युक्रेनमधील रशियन युद्ध - कीव: युक्रेनियन आणि रशियन सैन्यामध्ये जोरदार संघर्ष • खार्किव: शेल
-----------------
उत्तम विडिओस
https://www.youtube.com/c/WarLeaker/videos
27 Feb 2022 - 3:58 pm | साहना
भारत युक्रेन आणि रशिया ह्यांच्या संदर्भांत काही चुकीच्या अफवा व्हात्साप्प वर फिरत आहेत त्यांचे खंडन :
मिथ्या : १९९८ मध्ये युक्रेन UNSC चा सदस्य होता आणि त्याने भारताच्या विरोधांत वोट दिला (पोखरण टेस्ट्स नंतर).
सत्य: ११९८ मध्ये युक्रेन UNSC चा सदस्य नव्हता. रशिया ने त्यावेळी भारताच्या विरोधांत मत दिले होते आणि भारताला ४ गोष्टी ऐकवल्या सुद्धा होत्या. युक्रेन ने ह्याच्या उलट भारत पाकिस्तान ने न भांडता स्टेटस क़उओ ठेवावा असे वेगळे स्टेटमेंट दिले होते.
मिथ्या: युक्रेन पाकिस्तानला हत्यारे पुरवतो .
सत्य : युक्रेन ने काही प्रमाणात पाकिस्तानला शस्त्रास्त्रे विकली असली तरी भारत हा युक्रेन चा मोठा ग्राहक असून पाकिस्तान पेक्षा कैक पटीने जास्त शस्त्रास्त्रे भारत युक्रेन कडून घेतो.
28 Feb 2022 - 12:36 am | Trump
कृपया संदर्भ द्यावेत.
कृपया संदर्भ द्यावेत. मी आंतरजालावर शोधतो आहे. जुन्या काळातील असल्याने मिळायला अडचणी येत आहेत.
येथे मला माहीती मिळाली. रशियाचे मत गोल-गोल आणि कुंपणावरचे वाटत आहे. जरी तो प्रथम दर्शनी विरोधात वाटत असला तरी कोणतेही निर्बंध लादायला समर्थन केलेले नाही.
माझा संदर्भः
अधिकृत प्रतिसाद
---------------
युक्रेन UNSC चा १९९८ मध्ये सदस्य नव्हता. मग UNSC
https://www.un.org/press/en/1998/sc6528.doc.htm मध्ये का त्यांचा उल्लेख आहे? तुम्हाला काही कल्पना?
28 Feb 2022 - 12:23 pm | साहना
युक्रेन १९९८ मध्ये UNSC चा सदस्य नव्हता प्रूफ पहा :
https://www.un.org/securitycouncil/content/countries-elected-members
> युक्रेन UNSC चा १९९८ मध्ये सदस्य नव्हता. मग UNSC https://www.un.org/press/en/1998/sc6528.doc.htm मध्ये का त्यांचा उल्लेख आहे? तुम्हाला काही कल्पना?
ठाऊक नाही आणि फरक पडत नाही. मूळ मुद्याशी त्याचा संबंध नाही.
27 Feb 2022 - 7:13 pm | Trump
बातमी खरी आहे का?
प्रथमदर्शनी खरी वाटत आहे.
धक्कादायक! युक्रेन-पोलंड सीमेवर भारतीय विद्यार्थ्यांना बेदम मारहाण
https://www.loksatta.com/desh-videsh/beating-with-indian-students-on-ukr...
28 Feb 2022 - 1:17 am | Trump
28 Feb 2022 - 1:17 am | Trump
28 Feb 2022 - 4:42 am | टिल्लू
यूएन मधे सपोर्ट न केल्याचा राग ते भारतीय विद्यार्थ्यांवर काढत आहेत.
एव्ह्डेच काय यूएन मधिल यूक्रेन्चे राजदूतांनी अप्रत्यक्षरित्या धमकी दिली.
https://www.opindia.com/2022/02/ukraine-ambassador-students-leverage-ind...
युक्रेन-पोलंड बोर्डर वरिल अधिकारी तेथे अनेक तास प्रवास करून, उपाशी थकून बेजार झालेल्या विद्यार्थांना "तुमचे सरकार आम्हाला सपोर्ट करत नाही, मग आम्ही का म्हाणून" असे म्हणून मारझोड करत आहेत.
27 Feb 2022 - 8:34 pm | मदनबाण
युक्रेन मध्ये युद्ध चालु असताना तिथले लोक त्यांचे वर्णद्वेषी वर्तन या गंभीर स्थितीत देखील बदलु शकले नाहीत. असेच वर्तन पोलंडच्या बॉर्डरवर देखील पाहण्यात आले आहे.
साऊथ आफ्रिकन वंशाच्या लोकांना वाईट वागणुक दिली जात आहे, काही ठिकाणी त्यांना ट्रेन मध्ये चढण्यास देखील मनाई करण्यात आली आहे.
रशियाच्या अनेक सरकारी वेब साईट सायबर हल्लात बंद पाडल्या गेल्या आहेत. रशियन स्टॉक मार्केट बद्धल अधिक माहिती घेत असताना [ पुतीन बहुतेक स्टॉक मार्केटचे वाटोळे होऊ शकते ही शक्यता विचारात घ्यायला विसरला की काय ? :))) ] माझ्या लक्षात आले की त्यांच्या मॉस्को एक्सचेंज चे पोर्टल सुद्धा डाऊन आहे. [https://www.moex.com/en/ ] त्यांचा बाजार ५०% खाली बसला असुन याचा फटका तिथल्या सगळ्या मोठ्या कंपन्याच्या बिझनेस आणि बिझनेस टायकुन्सला बसला आहे. या येत्या आठवड्यात रशियन सेंट्रल बँक कितपत त्यांच्या बाजाराला सांभाळेल हे पाहण्यात फार महत्वपूर्ण असणार आहे.
युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षाची प्रतिमा सध्या लार्जर दॅन लाईफ करण्याचा उध्योग अमेरिकन मिडिया करत आहे, कसा हा त्यांचा नेता मैदानात लढा देत उभा आहे याचे गुण वर्णन चालु आहे, पण याच नेत्यामुळे त्यांच्या देशावर आज ही वेळ येऊन ठेवली हे मात्र कोणी सांगत नाही.आपला रशिया समोर टिकाव लागु शकत नाही हे व्यवस्थित माहित असुन केवळ आणि केवळ अमेरिकेच्या फुशारकीवर मुजोरी करण्याची वृती आज हे फळ देत आहे.
सोन्याची किंमत वेगाने वाढली तर बिटकॉइनची घसरली. माझ्या अनुमाना नुसार सोन्याची किंमत आता घसरु देखील शकेल आणि याला २ मुद्दे कारणीभूत ठरु शकतात.
१] सोन्यात प्रोफिट बुकिंग
२] परस्थिती बदलल्याने लोक कॅशसाठी सोन्याची विक्री करतील.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- “At the heart of racism is the religious assertion that God made a creative mistake when He brought some people into being.” :- Friedrich Otto Hertz
27 Feb 2022 - 11:14 pm | रावसाहेब चिंगभूतकर
भारताने आपल्या बॅटलशिप्स युक्रेन च्या किनाऱ्याला लावून सगळ्या नागरिकांना एकदमच उचलून आणायला हवं. तसाही तिथला समुद्र रशीयन्स च्या ताब्यात आहे. बरोबर साऊथ एशियन्स आणि आफ्रिकन्स ना पण आणावे. युरोपीयन्स नंतर घालू देत गोंधळ काय घालायचा ते.
28 Feb 2022 - 11:14 am | साहना
आणि नक्की कुठल्या बंदरांत बरे हि बोट लावावी ?
काल आलेला एक फॉरवर्ड :
मोदींची कमाल ! सरळ पुतीन आणि युक्रेन ला धमकावले. "भारतीय विद्यार्थ्यांना हात लावला तर खबरदार".
भारतीय विद्यार्थी युक्रेन मध्ये अडकले आहेत हि बातमी मिळताच मोदींनी चक्रे फिरवली. सर्वप्रथम त्यांनी आपले घनिष्ट मित्र पुतीन ह्यांना फोन करून क्यिव वरील विमानहल्ले तातडीने बंद करण्यास सांगितले. पण पुतीन ह्यांनी "सध्या रशियन विमाने सुद्धा पाडली जात आहेत एअर इंडिया कसे तिथे पोचेल ?" असे आश्चर्य व्यक्त केले. पण मोदी ह्यांनी आम्हाला विमान नको फक्त २ बस मिळाल्या तरी पुरे आम्ही शेकडो विद्यार्थ्यांना बाहेर काढू असे पुतीन ह्यांना सांगितले. मग पुतीन ने सुद्धा मी बसवर बॉम्ब टाकणार नाही असे वाचन आपल्या मित्राला दिले.
त्याच बाजूला मंत्री जयशंकर ह्यांनी गुगल मॅप्स वरून युक्रेन च्या बाजूला कुठले देश आहेत हे पहिले आणि कुठे बस ची व्यवस्था होईल हे पहिले आणि रोमेनिया मध्ये १० बसेस बुक केल्या. बसेस वर भला मोठा भारतीय ध्वज आणि "इंडियन स्टुडंट्स ऑनबोर्ड" असा स्टिकर लावला आणि भरधाव वेगाने बसेस क्यिव च्या दिशेने रवाना केल्या. ब्रिटिश प्रधान मंत्री बोरिस ह्यांनी मोदींना फोन करून शक्य असल्यास आपल्या काही नागरिकाना अनु शकता का अशी विचारणा केली त्यावर नक्की आणू पण बसायला मिळणार नाही असे ठणकावून सांगितले. त्यानंतर २४ तासांत १० बसेस भरून विद्यार्थी रोमानियांत आणले गेले. काही ठिकाणी आक्रमक रशियन रणगाड्यांनि बाजूला सरून बसेस ला जायला वाट दिली असे मराठी विद्यार्थी अनन्या कोरे ह्यांनी वृत्तपत्रांना सांगितले.
रोमेनिया मध्ये अनेक एअर इंडिया विमाने विद्यार्थ्यांना घेऊन मग देशांत परत आली.
धन्य आहे भारत मातेचा असा पुत्र. काही वर्षे आधी भारताच्या प्रधानमंत्र्यांकडे इतकी ताकद असेल असे कुणालाही वाटले नसेल. म्हणूनच युक्रेनच्या राजदूतांनी भारताला पुतीन कडे बोलण्याचे साकडे घातले आहे.
28 Feb 2022 - 12:15 pm | अमरेंद्र बाहुबली
हसून हसून वाट लागली.
ब्रिटिश प्रधान मंत्री बोरिस ह्यांनी मोदींना फोन करून शक्य असल्यास आपल्या काही नागरिकाना अनु शकता का अशी विचारणा केली त्यावर नक्की आणू पण बसायला मिळणार नाही असे ठणकावून सांगितले.
हे तर कहर होतं.
28 Feb 2022 - 12:37 pm | रावसाहेब चिंगभूतकर
व्हाट्सअप्प बद्दल काही माहिती नाही, पण ओडेसा, सेव्हस्टपोल अशी बंदरे युक्रेन मध्ये आहेत. क्रिमिया ला प्रचंड सागरकिनारा आहे. रशियन यंत्रणेबरोबर जर चांगले संबंध असतील तर समुद्रमार्गे लोकांना बाहेर काढणे हे जास्त सोपे ठरायला हवे. रोडमार्गे दुसऱ्या देशांवर आपली dependency रहाणार आणि त्यांचा पहिला प्रेफ्रँस युक्रेनियन्स ना प्रवेश देण्यावर असणार.
28 Feb 2022 - 3:21 pm | साहना
> ओडेसा, सेव्हस्टपोल अशी बंदरे युक्रेन मध्ये आहेत
ओडिसा नक्की कुणाकडे आहे ठाऊक नाही पण सेवेस्तपोल हे रशियन ताब्यांत आहे. दोन्ही ठिकाणी भारतीय विद्यार्थी जाणार कसे ? जायचे असेलच तर अक्षरशः गोळीबार आणि विस्फोटातून जावे लागेल. आणि त्यासाठी कुठलीही युक्रेनी यंत्रणा मदत करणार नाही.
आणि समजा हे भारतीय विद्यार्थी पोचेलच सेवेस्तपोल मध्ये तर मग बोटीची काय गरज ? रशियांत आपले विमान पाठवून आम्ही अनु शकू कि ! किंवा ओडेसा मध्ये सध्या अनेक व्यापारी जहाजे अडकून पडली आहेत त्यातील एखादे भाड्याने घेऊन सुद्धा इस्तंबूल ला विद्यार्थी आणले जाऊ शकतात.
28 Feb 2022 - 12:40 pm | प्रदीप
जालावर सर्वच बाजूंनी अतिशय मूर्ख लिखाण केले जाते. तसे करणे अनेक संदर्भात अतिशय सोपे आहे. तेव्हा तसले उठवळ लिखाण उचलून त्यावर तुम्ही इथे लिहीत बसला असाल, तर कठीण आहे. नुसतेच सनसनाटी, दिलखेंच लिखाण करावे अथवा न करावे, हा सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे. प्रश्न रहातो, त्या लिखाणाच्या कसाचा.
जाता जाता, तुमच्या ह्या विषयावरील लिखाणांत अमेरिकन सरकारच्या प्रसिद्धी माध्यामांचे हवाले दिलेले आहेत, त्यांची विश्वासार्हता काय आहे? त्यांचे खरे मानले तर इराकमाधे डब्लू. एम. डी. होते म्हणून, तेथे अमेरिकन सैन्य गेले होते. तसेच अलिकडेच भारत व अन्यत्र होत असलेल्या अनेक घटनेंबाबत त्यांची प्रसिद्ध माहिती, तथ्यांच्या अजिबात जवळपासचीही नाही. तेव्हा काही विश्वासार्ह हवाले तुमच्या लिखाणांत दिलेत तर तेही विश्वासार्ह ठरेल.
28 Feb 2022 - 12:58 pm | Trump
+१
श्री साधना छान लिहीतात. गेले काही दिवस त्यांचे लेखन एकांगी होत चालले आहे. अर्थात कोणी कसे लिहावे ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण ज्याची क्षमता असुनही विनाकारण गालबोट लावणारे लिहित असेल तर वाईट वाटते.
आपण भारतीयांनी कोणाचीही तळी न उचलता, आपले आणि आपल्या देशाचे हित पाहिले पाहीजे.
अगदी अगदी.
28 Feb 2022 - 3:17 pm | साहना
>>> तेव्हा तसले उठवळ लिखाण उचलून त्यावर तुम्ही इथे लिहीत बसला असाल, तर कठीण आहे. नुसतेच सनसनाटी, दिलखेंच लिखाण करावे अथवा न करावे, हा सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे. प्रश्न रहातो, त्या लिखाणाच्या कसाचा.
फॉरवर्ड हा निव्वळ विनोदी लिखाणाचा नमुना म्हणून दिला होता त्यातील माहितीवर मी काहीही टिप्पणी केली नाही. लिहिणार्याने सुद्धा उपरोधिक पद्धतीनेच हे लिहिले असावे असे वाटते. मला त्यावर काहीही मत व्यक्त करायचे नव्हते. मूळ लेखकाने भारताने आपली युद्धनौका वगैरे पाठवावी असा दिलेला सल्ला आणि तो विनोदी फॉरवर्ड एकाच गटांतले आहेत.
माझा मूळ प्रश्न रास्त होता. कुठल्या बंदरांत आपली बोट लावावी ? सर्व बंदरे शेवटी ब्लॅक सी मध्ये आहेत जिथे जाण्यासाठी भारतीय बोटीला अरबी समुद्र, रेड सी, इस्तंबूल मार्गे जाऊन यावे लागेल. मूळ लेखकाने युद्धनौका म्हटले आहे म्हणून हे जास्त विचित्र होते. सर्वांत प्रखर युद्ध ह्याच भागात चालले आहे. कुठलीही युक्रेनी ट्रेन किंवा बस ह्या भागांत जाणार नाही. क्यिव खारकीव मधून निर्वासितांना जाण्याचा मार्ग पश्चिमेकडे आहे आणि रशिया सुद्धा लोकांना जायला देत आहे.
>>> तुमच्या ह्या विषयावरील लिखाणांत अमेरिकन सरकारच्या प्रसिद्धी माध्यामांचे हवाले दिलेले आहेत, त्यांची विश्वासार्हता काय आहे?
युद्धकाळांत कुठलीही माहिती प्रोपागंडा असू शकतो त्याशिवाय मी वार्ताहर नाही आणि कुठल्याही माहितीची मी स्वतः शहानिशा करत नाही. म्हणूनच जवळ जवळ प्रत्येक माहिती कुठून आली आहे हे मी सांगत आहे त्यामुळे वाचणाऱ्याने आपापल्या समजुती नुसार त्यावर विश्वास ठेवावा.
फक्त मी वेळ खर्च करून प्रत्यक्ष युक्रेन मधील लोक, भारतीय दूतावासातील लोक ह्यांच्याकडून जी माहिती घेतली आहे त्याची जबाबदारी माझ्यावर आहे.
रशियाच्या दृष्टिकोनातून सत्य काय आहे हे मला तरी समजणे अवघड आहे कारण माझे असंख्य रशियन ओळखीचे आहेत आणि सर्वच मंडळी प्रखर पणे ह्या युद्धाच्या विरोधांत आहेत. कुणालाही काहीही विचारल्यास पुतीन च्या नावाने फक्त शिव्या घातल्या जातात. अजून एकही रशियन व्यक्ती मला अशी सापडली नाही जिने ह्या हल्ल्याचे समर्थन केले आहे. त्यामुळे मी त्यांच्या बाजूने काहीही लिहू शकत नाही.
28 Feb 2022 - 4:36 pm | टर्मीनेटर
तो प्रोपगंडा तुम्ही इथे चालवत आहात हे न कळण्या एवढे मूर्ख आम्ही नक्कीच नाही 😀
बाकी तुमचे विशफूल थिंकिंग चालूदे... युद्धाचा निकाल काय लागतो हे बघण्यात मला जास्त स्वारस्य आहे!
28 Feb 2022 - 5:22 pm | Trump
युक्रेनमुळे मिसळपाववर पण तणाव निर्माण झाला. :)
28 Feb 2022 - 5:42 pm | टर्मीनेटर
तणाव नाही म्हणता येणार पण व्यक्तीसापेक्ष मते म्हणता येईल 😀
साहनाजींची मते फारच एकांगी वाटतात त्यामुळे हा प्रतिसाद प्रपंच!
1 Mar 2022 - 1:08 pm | साहना
> हे न कळण्या एवढे मूर्ख आम्ही नक्कीच नाही
हे स्पष्टीकरण द्यावेसे वाटले ह्याबद्दल आपले धन्यवाद !
28 Feb 2022 - 11:33 pm | रावसाहेब चिंगभूतकर
हे असं का वाटावं हे मला समजत नाही. ओडेसा ते किव्ह अंतर 474 किमी आहे. किव्ह ते पोलंड बॉर्डर अंतर 752 किमी आहे. जर युक्रेन आणि रशिया दोघांशी नीट ताळमेळ राखला तर हे अंतर पार करणे जास्त सोपे आहे. मी समजू शकतो की ओडेसा भागात कदाचित अजूनही युद्ध चालू असावे. पण बाजूलाच मोलदोव्हा आहे त्याची बंदरे चालू असणार. 200 विद्यार्थी एका फ्लाईट मध्ये अशा प्रकारे 100 फ्लाईट्स पुढचे कित्येक आठवडे घेऊन येण्यापेक्षा व्यापारी जहाजे भाड्याने घेऊन बॅटल शिप च्या संरक्षणाखाली (आणि कंट्रोल खाली) जहाजाने मोठ्या संख्येने लोकांना काही दिवसात परत आणता येईल.
माझ्या मते माझा मुद्दा मी वर स्पष्ट केला आहे. निर्वासितांना जाण्याचा रस्ता पश्चिमेकडे आहे कारण युद्ध पूर्वेकडून पश्चिमेकडे येत आहे, नाटो देश पश्चिमेकडे आहेत आणि युक्रेनियन निर्वासितांना फक्त सीमा ओलांडून जायचे आहे. भारतीयांना नंतर चा प्रवास ही करायचा आहे.
1 Mar 2022 - 8:27 am | निनाद
साहना सारख्या चांगल्या लेखकाला बॅश करण्याचे कारण समजले नाही.
लेखनातले मुद्दे पटले नाही तर त्याचा प्रतिवाद करणे समजू शकते.
साहना यांनी माहितीपूर्ण प्रतिसाद येथे दिले आहेत. तेव्हढे तर बॅशिन्ग करणार्यांनी या विषयावर लिहिलेले सुद्धा नाही.
स्वतः लिहायचे नाही आणि इतरांना लिहू द्यायचे नाही अशी भुमिका का असावी याचा अचंबा आहे!
1 Mar 2022 - 12:54 pm | चौथा कोनाडा
सहमत.
27 Feb 2022 - 10:00 pm | sunil kachure
अशी सार्थ भीती वाटत आहे युक्रेन शरण येत नाही हे रशिया च्या प्रतिष्ठेला धोका पोचवणारे आहे.
असा समज रशिया चा होवू शकतो.
कमी नुकसान करणारी शस्त्र आता पर्यंत युद्धात वापरली गेली आहेत.
हे युद्ध असेच चालू राहिले तर .
महा विनाशकारी शस्त्र आणि अस्त्रांचा वापर रशिया करेल.
आणि ते जगासाठी पण धोकादायक असेल.
अणू हल्ला करणाऱ्या तुकडीला सज्ज राहण्याचे आदेश पुतीन ह्यांनी दिलेले आहेत.
28 Feb 2022 - 12:31 am | sunil kachure
आता फक्त तोंडी धमक्या देणे चालू आहे.
युक्रेन आणि रशिया शत्रू चे आम्हीच जास्त नुकसान केले असे मीडिया लं सांगत आहे
अजून पण सौम्य हत्यार च वापरली जात आहेत .
कोण कोणाला मदत करणार ,कशाची करणार ह्या वर चर्चा चालू आहे .युरोपियन देश आगीत तेल टाकत आहेत..
पण पुढे.
रशिया महा विनाशक हत्यार नक्कीच युक्रेन वर टाकणार
प्रचंड नुकसान आणि मनुष्य हानी होईल त्यांनी.
एक तर दोन्ही देश आत्म् सन्मान राखून युद्ध thambavatil.
किंवा युरोपियन राष्ट्रांच्या आहारी जावून .
युद्ध भीषण रूप घेईल.
अमेरिका किंवा कोणताही युरोपियन देश स्वतः युद्धात उतरला तर .
चीन,उत्तर कोरिया पण युद्धात उतरेल.
मग प्रतेक देशाला युद्धात उतरण्या शिवाय दुसरा पर्याय राहणार नाही
तेव्हा भारताला पण तटस्थ राहता येणार नाही.
हे घडू नये
पण असे घडण्याचीच शक्यता आज तरी जास्त वाटत आहे.
28 Feb 2022 - 4:12 am | साहना
* रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन सर्वार्थाने एकाकी पडले आहेत. त्यांनी आपल्या सर्वांत महत्वाच्या जनरल ला राजीनामा देण्यास भाग पाडले आहे अशी अफवा आहे पण अमेरिकन माध्यमानी त्यांना अजून दुजोरा नाही दिला. पुतीन ह्यांच्या मानसिक अवस्थेवर उलट सुलट चर्चा व्यक्त होत आहेत. मॉस्को मध्ये हजारो लोकांनी निदर्शने केली आणि अनेकांना अटक केली. अनेक रशियन नागरिकांनी युक्रेन ला आर्थिक मदत पाठवली म्हणून रशियन सरकारने ह्या लोकांना देशद्रोही ठरवून त्यांना २० वर्षे कारावासाची धमकी दिली आहे.
* विविध खजगी व्यक्ती आणि हॅकर्स नि रशियावर सायबर हल्ला चढविला. काही काळ रशियन टीव्ही वाहिन्या सुद्धा हॅक झाल्या होत्या.
* पुतीन ह्यांनी सध्या आण्विक सज्जतेला लेव्हल २ वर नेले आहे. एकूण ४ लेव्हल्स आहेत. पण ह्या मुळे कुणाला काही फरक पडला असेल असे साधायतरी दिसून आले नाही.
* जर्मनी, पोलंड, फ्रांस इत्यादींनी प्रचंड प्रमाणात युक्रेन ला शस्त्रास्त्रे पाठवली आहेत.
* युक्रेन मधील रशियन आक्रमण फेल ठरले आहे असे एकमत सर्वत्र व्यक्त केले जात आहे. रशियाने शेवटी क्यिव ताब्यांत जरी घेतले तरी आता त्यातून रशियाला आणखीन नुकसानच होणार आहे असे स्पष्ट आहे.
* अमेरिकन गुप्तचर विभागाच्या माहितीनुसार रशिया रसद पुरवठ्यांत अतिशय ढिसाळ आहे. युक्रेन मध्ये सर्वत्र रशियन वाहने आणि रणगाडे मोडून पडले आहेत. काही ठिकाणी डिझेल संपून अडकून पडले आहेत. ह्या ढिसाळपणावर सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ब्रिटिश माध्यमाच्या अनुसार रशिया फारतर १ आठवडा आपल्या सैन्याला रसद पुरवठा करू शकेल. युक्रेन मधील आक्रमण रशियाने आणखीन ७ दिवसांत आटोपते नाही घेतले तर कदाचित पुतीन ह्यांना "बोहोत बे अब्रू होकर तेरे कुचे से हम निकाले" म्हणावे लागेल अशी चिन्हे आहेत.
* भारतीय दूतावासाने रशिया तसेच आजू बाजूच्या काही राष्ट्रांतून आपल्या नागरिकांना आणि विशेषतः गरजू लोकांना (जसे विद्यार्थी) ह्यांना जात गाजावाजा न करता बाहेर काढण्याची तयारी सुरु केली आहे. ज्या प्रमाणे युक्रेन आता भारतीय नागरिकांना होस्टेज ठेवत आहे त्याच प्रमाणे रशिया सुद्धा करू शकतो अशी भीती भारतीय परराष्ट्र मंत्रालयाला वाटत आहे.
* रशियन अर्थव्यवस्था पार कोलमडली आहे. रशियन श्रीमंतांच्या बोटी, घरे वगैरे युरोप ने ताब्यांत घेतली आहेत. एका रशियन टीव्ही सेलेब्रिटीने आपले इटली मधील घर जप्त झाले हे ऐकून काल लाईव्ह टीव्ही वर प्रचंड थयथयाट केला. मार्केट सोमवारी उघडे होताच रशियन रुबल पार कोलमडेल. सध्या काळ्या बाजारांत हा २०० वर पोचला आहे. काही दिवस आधी हा ७५ होता.
* सर्वांत महत्वाचे गोष्ट म्हणजे सामान्य अमेरिकन नागरिक आणि EU नागरिक ह्यांनी युक्रेन ला इतका मोठा सपोर्ट केला कि जर्मनी वगैरेंना त्यांना गांभीर्याने घ्यावे लागले. जर्मनीने तातडीने अनेक मोठे निर्णय घेतले. एक महत्वाचा निर्णय म्हणजे रक्षा बजेट वाढवणे.
* युक्रेन मध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी भारतीय दूतावास खूप प्रयत्न करत आहे. युक्रेन मध्ये अराजक असले तरी दिवसाला शेकडो विद्यार्थ्यांना येन केन प्रकारे भारत बाहेर काढत आहे.
* युक्रेनी सैन्याच्या माहिती प्रमाणे अजून पर्यंत ४००० रशियन सैनिक मारले गेले आहेत आणि १०० पेक्षा जास्त रणगाडे नष्ट करण्यात आले आहे. चेचेन सैन्याची एक तुकडी नष्ट करून अत्यंत क्रूर अशी प्रतिमा असलेल्या त्यांच्या जनरल ला मारण्यात आले आहे. अर्थांत ह्या सर्व गोष्टीवर किती विश्वास ठेवावा हे सांगता येत नाही.
28 Feb 2022 - 12:00 pm | साहना
अमेरिकन वर्तुळातून खालील तर्क फिरत आहेत :
१. पुतीन कदाचित बोटॉक्स घेत असावेत किंवा glucocorticoids घेत असावेत ह्यामुळे त्यांचा चेहेरा थोडा puffy वाटत आहे.
२. त्यांच्या मिटींग्स मध्ये सर्व लोक इतके दूर असतात कि त्यावरून त्यांना इम्यून डिसऑर्डर झाली असावी आणि glucocorticoids हे त्याचे कारण असावे असा अंदाज आहे.
३. काल पुतीन ह्यांनी सार्वजनिक इव्हेंट मध्ये भाग घ्यायचे नाटक केले. एका ठिकाणी काही बांधकाम चालत होते तिथे जाऊन त्यांनी कामगारांशी चर्चा केली. हे कामगार प्रत्यक्षांत कामगारांच्या वेषांत स्थनिक पोलीस होते आणि तिथे सुद्धा पुतिन ह्यांनी किमान १० मीटर डिस्टन्स ठेवले.
पुतीन ह्यांचे हे शेवटचे दिवस आहेत अशी माझी भावना बळकावत चालली आहे. आता काही दिवसांनी समजेल.
28 Feb 2022 - 12:44 pm | साहना
खूप प्रयत्न करून सुद्धा युक्रेन मध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांशी माझा संपर्क होऊ शकला नाही. पण पोलंड मध्ये पोचलेल्या विदेशी लोकांशी आणि त्यांना मदत करणाऱ्या भारतीयांशी लोकांशी संपर्क झाला. काही माहिती :
* युक्रेन ने लढण्यायोग्य पुरुषांना देशांतून बाहेर जायला बंदी घातली आहे. त्यामुळे पश्चिम दिशेने प्रवास करणाऱ्या प्रत्येक पुरुषाला पकडून पोलीस. सैनिक तसेच युक्रेनी सवयंसेवक जबरदस्तीने रक्षा दलांत भरती करत आहेत. ह्याला विरोध करणाऱ्या त्यांच्या बायका मुलांना मारहाण सुद्धा करायला मागे पुढे पाहत नाहीत.
* भारतीय विद्यार्थ्यांना वारंवार आपण युक्रेनी नागरिक नाही, भारतीय आहोत हे सर्व सांगावे लागते तरी सुद्धा प्रसंगी त्यांना प्रवास करण्यापासून मज्जाव केला जातो. काही वेळी भांडण होऊन मारहाण सुद्धा होते.
* एका मुस्लिम विद्यार्थ्याने बंदूक घेऊन प्रवास करण्यासाठी गाडी चोरण्याचा प्रयत्न केला आणि फक्त मुस्लिम लोकांनाच आपण घेऊन जाऊ अशी धमकी दिली त्यामुळे आणखीन वातावरण पेटले.
* ट्रेन मध्ये एका बोगीवर म्हणजे एका मुस्लिम विद्यार्थ्याने चाकू घेऊन भारतीयांना बाहेर फेकले.
* भारतीय लोकांच्या पासपोर्ट वरून पोलंड रोमानिया वगैरेत घुसण्यासाठी व्हिसा लागतो तो भाराइटी विद्यार्थ्याकडे नाही, त्यासाठी भारत सरकारने ह्यांच्या कडून विशेष सवलती मिळवल्या आहेत तरी सुद्धा त्या देशांचा स्टाफ प्रशिक्षित नसल्याने विद्यार्थ्यांना आंत घुसण्यास ते देत नाहीत.
* पोलंड अत्यंत वर्णदंभेंदि देश असून प्रत्येक ठिकाणी त्यांचे धोरण "गोरे लोक प्रथम " इतर सर्व नंतर असे धोरण आहे.
भारताचा UNSC मधील वोट आणि विद्यार्थी ह्यांना देण्यात येणारी वागणूक ह्यांचा संबंध कमी आणि जनरल वंशभेद हे कारण जास्त वाटत आहे. तरी सुद्धा अमेरिकन भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांच्या मते १००% भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनमधून बाहेर काढता येईल अशी खात्री त्यांना आहे. विद्यार्थ्यांनी फक्त पश्चिमी सीमेवर पोचायला पाहिजे.
युक्रेन मध्ये भारतीय वंशाचे युक्रेनी नागरिक सुद्धा आहेत. ह्यातील काहींनी आपले युक्रेनियन पासपोर्ट नष्ट करून आपण भारतीय आहोत असे नाटक करून देशांतून पाळायचा प्रयत्न केला पण त्यांच्याच नातलगांनी त्यांना युक्रेनी पोलिसांच्या ताब्यांत दिले.
युद्धाचा फायदा घेऊन चोरी आणि बलात्कार ह्या गोष्टी सुद्धा होतात. आणि असे झाल्यास युक्रेनी सैनिकांना गरज पडल्यास आपल्याच नागरिकांना ठार मारण्याचे आदेश दिले आहेत. पण बहुतांशी स्वयंसेवक दलाने उक्तृष्ट पणे काम केले आहे. क्यिव पासून पोलंड च्या सीमेवर पोचायला वाहनांना साधारण ६०० किमी अंतर आहे आणि हे कव्हर करायला सध्या म्हणे अनेक दिवस लागतील. पण ठीक ठिकाणी चोरांना नग्न करून त्यांची धिंड लोकांनी काढली होती तर काहीं ठिकाणी चक्क त्यांना रस्त्याचा बाजूला झाडांना वगैरे बांधून ठेवण्यात आले होते अशी दृशे दिसली.
सर्वांत मोठे हाल फक्त बाप असलेल्या मुलांचे होतात कारण बापाला पकडून सैन्यात नेले जाते आणि मूळ बिचारे अनाथ होऊन फिरते. मग कुणी दया येऊन ह्यांना बरोबर घेतात.
28 Feb 2022 - 2:13 pm | sunil kachure
असे स्त्री मुक्ति वाले,पुरोगामी बोंबलत असतात .
मग युक्रेन साठी पुरुषांनी का लढावे ,आणि स्वतःचा जीव धोक्यात का घालावा.
लढण्यासाठी ,जीवाची बाजी देण्यासाठी 50% स्त्रिया हव्यातच
स्त्री मुक्ती आणि पुरोगामी ह्यांनी त्या साठी प्रयत्न करावेत.
28 Feb 2022 - 2:53 pm | कॉमी
युक्रेन नागरिकांना (स्त्रियांना सुद्धा) शस्त्र दिली आहेत, स्त्रिया सुद्धा लढत आहेत.
28 Feb 2022 - 11:20 pm | सुक्या
कुणाला कशाचं अन बोडकीला केसाचं :(
28 Feb 2022 - 3:11 pm | sunil kachure
ही व्यक्ती म्हणजे रशिया किंवा गैर युरोपियन नाहीत.
पुतीन दैव योगाने नसले तरी .
आशिया नी युरोपियन राष्ट्र ना धडा शिकवावा.
28 Feb 2022 - 12:53 pm | कपिलमुनी
युक्रेन चा राष्ट्राध्यक्षामुळे त्या देशावर ही वेळ आली आहे वगैरे अक्कलेचे तारे तोडत आहेत.
युक्रेनच्या अध्यक्षांच्या लढण्यामुळे देश बेचिराख होइल , प्राण हानी , वित्त हानी होइल वगैरे सूर अहेत.
युक्रेनचे अध्यक्ष ही लढाइ हरले तरि युक्रेनचा राष्ट्रवाद यामुळे सदैव जिवंत राहील आणि सोविअॅट पासून त्यांना मुक्तीची प्रेरणा देइल.
भले काही वर्षे लागतील , पण इतिहासातील बलिदाने वाया जात नहीत
28 Feb 2022 - 2:02 pm | प्रदीप
त्याच्यामुळे तर ही परिस्थिती आताच ओढवली आहे. अगोदर झालेल्या करारानुसार, युक्रेन नाटोमधे समाविष्ट होऊ शकत नव्हता. आता त्याचे उल्लंघन करण्याची तयारी ह्या राष्ट्राध्यक्षाने चालवली, तेव्हा रशियाने आपली चाल खेळली आहे. तेव्हा ह्या परिस्थितीस तो स्वतः, व त्याला व युक्रेनी जनतेला चढवणारे पाश्चिमात्या देश जबाबदार आहेत, असे म्हटले, तर त्यांत चूक काय आहे?
सोव्हिएट युनियन १९९१ साली संपले, ना? तुम्हाला बहुधा रशिया म्हणायचे असावे.
पण ह्या असल्या 'आशावादा'ला काही अर्थ नाही. काही वर्षांपूर्वी मध्यपूर्वेत 'अरब स्प्रिंग'चे नाटक खेळले गेले. त्याची सुरूवात ज्या ट्यूनिशियामधून झाली, तेथे आता सर्व काही आलबेल आहे, व जनता अत्यानंदात नहाते आहे, असे आहे का? ते लोण नंतर इजिप्तमधेही गेले. तेथे काय झाले, तर सत्ता मुस्लिम ब्रदरहूडच्या हाती गेली. तेथील सैन्याने वेळीच हस्तक्षेप करून पुढील अनर्थ थांबवला.
तेव्हा लिबीयामधे काय झाले? तेथील स्थिती आता कशी आहे? तेथील जनतेची मुक्ती झाली का?
आणि ह्या पाश्चिमात्य देशांचा व त्यांच्या बगलबच्च्या मीडियाचा तेव्हा खुळपटपणा असा की, चीनमधेहीम अरब स्प्रिंगपासून प्रेरणा घेऊन तेथील जनता उठाव करील असा भोळसट विचार ते प्रसारीत करत होते.
येथेही तेच होणार, ह्याची खूणगाठ मनात आताच बांधणे बरे.
28 Feb 2022 - 3:39 pm | साहना
+१
टायगर हिल घेण्यासाठी भारतीय सैन्याने अक्षरशः जीवाचे रान केले. शेकडो भारतीय सैनिक फक्त काही पाकिस्तानी सैनिकांशी भांडताना मारले गेले कारण भौगोलिक रचनाच तशी होती. आता जीवित हानी होईल म्हणून भारतीय सैन्याने टायगर हिल सोडून द्यायला पाहिजे होते का ?
किंवा शिवाजी महाराजांनी कशाला उगाच स्वराज्य वगैरे निर्माण केले ? सर्वच मराठ्यांनी इस्लाम पत्करला असता तर अगदी आनंदाने डझन बायका घेऊन जगले असते. कशाला संभाजी महाराजांनी जीवाचे हाल करून घेतले ? एका बायकोसाठी का बरे श्रीरामांनी एवढे मोठे युद्ध केले ? सोडून द्यायची होती सीता आणि करायची दुसरी बायको, काय फरक पडतो ? हिंदू मुस्लिम भांडण लावून कशाला पाहिजे राम मंदिर ? राहू दे कि बाबरी मशीद. कशाला इंग्लंड ने हिटलर ला तोंड दिले ? शरणागती पत्करली असती तर कित्येक ब्रिटिश नागरिकांचे प्राण वाचले असते.
हिंसा हे कधीही उत्तर नसते किंवा जीवितहानी वाचवण्यासाठी शरणागती वगैरे भाषणे आम्हाला इकडे बसून ठोकायला सोपे आहे पण शेवटी आपली मूल्ये आपल्यासाठी किती महत्वाची आहेत हे आपण त्यासाठी काय त्याग करू शकतो ह्यावर अवलंबून आहे. त्यापेक्षाही महत्वाचे म्हणजे ज्या समाजांना असली कुठलीही मूल्ये नाहीत, ते समाज तुम्ही त्यांना कितीही शांतता दिली तरी विशेष प्रगती करू शकत नाहीत. ते नेहमीच मागासलेलेच राहतील.
त्याशिवाय युक्रेनी राष्ट्राध्यक्षांना युद्ध हवे आहे हे सुद्धा चुकीचे आहे. पुतीन प्रमाणे ते हुकूमशाह नाहीत. किंवा युक्रेनी जनता किंवा सैनिक त्यांना घाबरून आहे असेही नाही. ते स्वतः आपला जीव धोक्यांत घालून आहेत आणि बहुतांशी लोक स्वखुशीने त्यांच्या मागे उभे आहेत. कुणीही पादल्यास बंकर मध्ये जाऊन लपणारे ट्रम्प/बायडन किंवा पुतीन नाहीत.
युद्धाचा शेवट काहीही असो युक्रेन निःसंशय पणे काही दिवसांत स्वतंत्र तर होईलच पण NATO आणि EU दोन्हीचा भाग होईल. वरून सीमेलगतच्या रशियन प्रदेशांतील मंडळी इथे पळून जाऊन स्वतःला EU चे सभासद बनवून घेण्यात धन्यता ,मानतील.
28 Feb 2022 - 7:51 pm | प्रदीप
टायगर हिल्स काय, छ. शि. मांच्या लढ्याचा उल्लेख काय... ह्या सगळ्यांपेक्षा सध्याची युक्रेनची परिस्थिती वेगळी आहे.
युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षाने, नाटोत सहभागी होण्याची तयारी, ईयू व यू,, एस. ह्यांच्या संगनमताने-- किंबहुना- चिथावणीने केली, व त्यामुळे त्या देशावर आता हा प्रसंग गुदरला आहे. आपला शेजारी जर आपला 'बाप' असेल, तो आपल्यापेक्षा सर्वस्वी बलाढ्य असेल, व छोट्या देशांना त्यांची जागा दर्शवण्याची त्याची तयारी आहे, हे त्याच्या अलिकडच्या इतिहासावरून कळत असेल, तर युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षाने जबाबदारीने पाउले उचलली पाहिजेत. ते त्याने केलेले नाही.
अमेरिकेचीच, व तिथल्या डेमॉक्रॅटिक पक्षाची तुलसी गॅबार्ड युक्रेनच्या 'लोकशाही'बद्दल येथे काय सांगते आहे, ते पहा. ते चुकीचे अथवा विपर्यस्त असले तर तसे कृपया सांगावे. युक्रेनमधे तुमचे 'असंख्य' मित्र आहेत, त्यांना विचारून तुम्ही ह्यावर टिपण्णी करू शकता.
असे मी तरी कोठे म्हटले नाही. किंबहुना हे कुणीही म्हटल्याचे मलातरी ठाऊक नाही. 'युद्ध हवे असणे' व 'बेजबाबदारीने वागल्याने युद्धाला सामोरे जावे लागणे' ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, हे येथे सांगंणे नलगे.
मी दर्शवलेल्या अरब स्प्रिंगच्या घटना अगदी अलिकडच्या आहेत. त्या व आशियाई जागेंतील किमान एका जागेत अलिकडच्या काळांत झालेल्या दंगली/ उठाव वगैरे अर्थात अमेरिका व यू. के. ह्यांच्या चिथावणीमुळे घडून आले होते. ह्या सर्वांत तेथील जनतेने भरपूर मार खाल्ला, हाती काहीच पडले नाही. किंबहुना, काही ठिकाणी तर, 'कालचा गोंधळ बरा होता' असे म्हणायची पाळी तेथील उठावखोर जनतेवर आली. युक्रेनही त्याच मार्गाने जाणार आहे. मग 'तुम हो जाव आगे, हम तुम्हारे साथ हय' असे म्हणणारे मागे पळ काढतील. युक्रेनच्या जनतेच्या नशीबांत, आता आहे त्यापेक्षा अधिक वाईट दिवस येतील.
28 Feb 2022 - 8:17 pm | कॉमी
डेमोक्रॅटिक पक्षाच्या असल्या तरी तुलसी बाई कन्झर्व्हेटिव्ह आहेत. डेम्स मधल्या सुब्बू स्वामी. नुकत्याच सीपॅक (Conservative Political Action Conference) ला गेलेल्या, भरपूर टाळ्या खाऊन आल्या.
बाकी त्या म्हणतायत -
१. विरोधी पक्षाच्या नेत्यांना अटक केली- हे खरे आहे, पण संदर्भहीन आहे. फुटीरतावादी लोकांना मदत केल्याच्या आरोपाखाली आधीच्या अध्यक्षांना अटक केली होती. (आता हे आरोप कितपत खरे हे देव जाणे. पण तुलसीबाईंना जसे सुचवायचे होते तितके क्लिअर कट् प्रकरण खास दिसत नाही.)
२. टीव्ही चॅनेल "प्रो- रशियन" होते म्हणून बंद केले म्हणे, आता हे प्रो रशियनत्व काय प्रकारचे होते कल्पना नाही, पण लोकशाहीत असे टीव्ही च्यानेल बंद करणे तसे चुकीचेच.
तरी, वरील दोन्ही गोष्टी विचारात घेऊन सुद्धा युक्रेन निःसंशय लोकशाहीच आहे. निवडणूक होऊन अध्यक्ष निवडले आहेत. अध्यक्षांचे अप्रूव्हल रेटिंग बऱ्यापैकी चांगलेच राहिले आहे असे समजते, आता तर ते गगनाला भिडले आहे.
बाकी तुलसी बाईंनी सुद्धा घुमजाव करत पुतीनला मागार घेण्याची विनंती केलीये.
आणि ट्रम्प तसेच तुलसी बाई राश्याला आधीपासून प्रिय.
1 Mar 2022 - 3:08 am | साहना
> आपला शेजारी जर आपला 'बाप' असेल, तो आपल्यापेक्षा सर्वस्वी बलाढ्य असेल, व छोट्या देशांना त्यांची जागा दर्शवण्याची त्याची तयारी आहे, हे त्याच्या अलिकडच्या इतिहासावरून कळत असेल, तर युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षाने जबाबदारीने पाउले उचलली पाहिजेत. ते त्याने केलेले नाही.
हाच नियम भारताला लागू पडतो. शेजारचा चीन बलाढ्य असल्याने भारतीयांनी सुद्धा आपली शेपूट खाली घालून कोपऱ्यांत बसावे काय ? किंवा शेजारचा भाला मोठा गुंड आपल्या पोरीची छेड काढत असेल तर आपण रात्री तिला आपणहून त्याच्या घरी सोडून याल काय ?
इथे राष्ट्राध्यक्षांना काय हवे आहे हे सर्वस्वी निरर्थक आहे कारण युद्धास संपूर्ण जनता उस्फुर्त पणे तयार आहे.
भिकार रशियाशी संबंध ठेवण्यापेक्षा EU मध्ये जायला युक्रेनी जनता आधीपासून तयार होती आणि आता तर काही दिवसांत ती EU मध्ये येईल. त्याशिवाय EU ने नागरिकत्व देऊ केल्या "बलाढ्य" बापाचे सैनिक शस्त्रें खाली टाकून आरामात शरणागती पत्करतील.
थोडक्यांत काय तर हे युद्ध युक्रेनी जनतेचे आहे आणि इथे पुतीन महाशयांचे पानिपत होणार आता ह्यांना आपलेच लोक पाणउतार करतील कि ते वैफल्यग्रस्त होऊन विष खातील हे पाहणे मनोरंजक ठरेल.
1 Mar 2022 - 10:42 am | प्रदीप
इथे कुरापत प्रथम कुणी काढली, हा मुद्दा आहे. सदर घटनेत ती युक्रेनने काढली आहे, असे दिसून येते.
3 Mar 2022 - 12:15 am | जव्हेरगंज
2014 मध्ये रशिया ने क्रिमिया ताब्यात घेऊन कुरापत काढली आहे. Nato वगैरे सगळं नंतर आलं.
3 Mar 2022 - 12:37 am | Trump
तुमच्यासाठी माझ्या आधीच्या प्रतिसादामधील वाक्ये डकवतो.
3 Mar 2022 - 1:01 am | जव्हेरगंज
Crimea was part of the Russian SFSR from 1921, and then was transferred to the Ukrainian SSR in 1954, which became independent Ukraine in 1991. The Russian Federation annexed Crimea in March 2014, re-establishing Russian rule of the peninsula, though that annexation is not internationally recognised
https://en.wikipedia.org/wiki/Annexation_of_Crimea_by_the_Russian_Empire
स्टॅलिन चे कारनामे
https://en.wikipedia.org/wiki/Deportation_of_the_Crimean_Tatars
3 Mar 2022 - 1:04 am | Trump
तुमचा मुद्दा काय आहे? स्टॅलीन कि क्रिमिया?
1 Mar 2022 - 12:22 pm | Trump
कशीही कोठेही तुलना.. तुमच्यासाठी माझ्या आधीच्या प्रतिसादामधील वाक्ये डकवतो.
-------
अहो, अजुन खरे युध्द्द चालु झालेच नाही. प्रत्येक विडिओमध्ये वीज, पाणीपुरवठा, बहुतेक गोष्टी सुस्थितीत दिसते आहे. जेव्हा जनता हल्ले करेल तेव्हा त्यांना दणकेपण मिळतील.
आता तुम्ही तुमच्या प्रतिसादांमधील तटस्थता सोडुन, आता उघड-उघडपणे युरोपियनाची तळी उचलाय सुरु केली का? तसे असेल तर सरळपणे लिहा म्हणजे त्याप्रमाणे प्रतिसाद देता येतील.
1 Mar 2022 - 1:25 am | Trump
ज्याप्रमाणे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की समाजमाध्यमांचा वापर करत प्रसिध्दीलोलुपता दाखवत आहेत, कोणतेही राजकीय पार्श्वभुमी नाही, आपल्या देशाला आणि जनतेला विनाकारण युध्दात लोटले त्यामुळे ते युक्रेनचे केजरीवालच जास्त वाटतात.
काहीही तुलना करताय तुम्ही.
6 Mar 2022 - 3:40 pm | Trump
श्री झेलेन्स्की यांच्याबद्दल कोरावर उत्तम मतप्रदर्शन केले आहे. अभ्यासु लोकांना उत्तम संदर्भ आहे.
https://www.quora.com/What-do-Ukrainians-think-of-Volodymyr-Zelensky-as-...
28 Feb 2022 - 1:58 pm | sunil kachure
युक्रेन हा ussa चा हिस्सा होता.
पाश्चिमात्य राष्ट्र महा हुशार आहेत दाखवायचे दात सस्याचे आहेत पण खरे दात जगातील सर्वात क्रूर जनावर चे आहेत
रशिया ची बाजू न्यायाची आहे
अमेरिका सहित युरोपियन राष्ट्रांचा पूर्ण पराभव झाला तर च जगात शांतता निर्माण होईल
28 Feb 2022 - 2:03 pm | sunil kachure
भारता वर ब्रिटिश लोकांनी केलेले अत्याचार केले त्याचे स्मरण करावे.
देशाला धर्मात विभाजन कोणी केले त्याचे स्मरण करावे.
संकट काळी कोण खंबीर पने भारताच्या पाठी उभा होता ह्याचे स्मरण करावे
आणि ह्या विश्व युद्धात रशिया साठी स्वतःला भारताने .झोकून द्यावे
तटस्थ,किती दिवस राहणार
28 Feb 2022 - 4:41 pm | sunil kachure
युक्रेन ,रशिया युद्धात हे सिद्ध होते स्थलांतरित लोकांना कोणावर च निष्ठा नसते,प्रेम नसते
.
.
1993 मध्ये मुंबई मध्ये दंगल झाली .मुंबई संकटात होती तेव्हा .तमाम बाकी राज्यातील लोक मुंबई सोडून पळून गेले
शांतता असताना ,फायदा असताना..आम्ही भारतीय आमचा कसा मुंबई वर हक्क आहे
राज्य घटना कशी आम्हाला मुंबई मध्ये रोजगार करण्यास,धंदा करण्यास परवानगी देते आम्ही भारतीय आहोत .
अशा वल्गना करत होते.पण जेव्हा मुंबई संकटात आली तेव्हा हे सर्व स्वार्थी मुंबई सोडून जात होते .
मराठी लोक सोडून..
युक्रेन मध्ये फायदा उचलायला गेलेले भारतीय
युक्रेन संकटात असताना तो देश सोडून जाण्या साठी. विविध ड्रामा करत आहेत .आज जे भारतीय अमेरिकेची तळी उचलत आहेत स्वार्थ साठी .उद्या अमेरिका संकटात सापडली तर हेच स्थलांतरित भारतीय अमेरिका सोडून जातील .स्थलांतरित लोकांना कसलीच निष्ठा नसते हे जगात घडणाऱ्या काही घटनेतून सिद्ध होते .
फक्त स्वार्थ साधने हाच ह्या लोकांचा हेतू असतो.
28 Feb 2022 - 4:49 pm | अमरेंद्र बाहुबली
+१
परदेशी शिकायचं, तिकडेच सेटल व्हायचं. नी संकट आलं की आम्हाला वाचवा म्हणून भारत सरकारच्या नावाने बोंबलायचं. ही लोक काहीही कामाची नसतात.
28 Feb 2022 - 5:36 pm | कॉमी
लोकांच्या कामासाठी भारत सरकार आहे, भारत सरकारच्या कामासाठी लोकं नाहीत.
28 Feb 2022 - 5:53 pm | टर्मीनेटर
१०० % सहमत!
माझा एक भाचाही आहे तिथे शिकायला. पण तो निव्वळ स्वार्थासाठी तिथे गेला आहे. मग एक देश म्हणुन विचार करता स्वार्थासाठी तिथे गेलेल्यांची जवाबदारी सरकारने का घ्यावी हा प्रश्नही पडतो.
28 Feb 2022 - 6:06 pm | Trump
फुकट घेउन येतात कि पैसेही घेत सरकार?
28 Feb 2022 - 6:13 pm | टर्मीनेटर
अशा परिस्थिती मध्ये फुकट आणावे लागते आणि त्या खर्चाचा भार आमच्यासारख्या करदात्यांवर पडतो.
28 Feb 2022 - 6:17 pm | कॉमी
देशातल्या लोकांना आपल्या देशातल्या लोकांबद्दल ममत्व वाटतं म्हणून. (प्रिज्यूमेबली)
28 Feb 2022 - 6:22 pm | टर्मीनेटर
ममत्व वगैरे बोलायला ठीक आहे हो कॉमीजी... पण जिथे स्वार्थ येतो तिथे सगळी परिमाणे बदलतात.
1 Mar 2022 - 5:09 am | साहना
तक्षिलाचा हा पेपर ह्या संबंधात वाचावा. खूप छान माहिती आहे.
https://takshashila.org.in/policy-brief-capacity-analysis-for-evacuation...
नैतिकता :
परदेशांत अडकलेल्या भारतीयांना देशांत आणण्याची जबाबदारी भारत सरकारची आहे का ? माझ्या मते नाही. पण प्रत्यक्षांत लोकांचा दबाव, करुणाभाव ह्यामुळे वारंवार भारत सरकार ह्यांत ओढले जाईल ह्यांत शंका नाही.
बरे ह्यासाठी सरकारने स्पष्ट नियम करुन काही रेषा केल्या तरी सुद्धा अश्या नियमाना लोकांच्या दबावाखाली सरकार ऐनवेळी बदलेल त्यामुळे असे नियम करून फायदा नाही. उदाहरणार्थ भारत सरकार प्रत्येक प्रदेशासाठी एक झोन नंबर देईल. झोन ३ मध्ये ज्यांना बाहेर पडायचे आहे त्यांना दूतावास मदत करेल पण झोन ४ मधील भारतीयांना करणार नाही तिथे त्यांनी आपल्या जबाबदारीवर राहावे/जावे. इत्यादी. पण एकदा भारतीय चॅनेल्स वर रडणाऱ्या मुलांची चित्रे दाखवली गेली कि मग लोकांच्या दबावाखाली सरकार झुकेल आणि एकदा भारतीय सरकार झुकेल म्हटल्यावर भविष्यांत कदाचित भारतीय नागरिकांना वेठीस धरण्याचे इतर राष्ट्रांचे, बंडखोरांचे धोरण सुद्धा आपोआप वाढेल.
तंबाखू खाऊन कँसर झाल्यानं सरकारने फुकट कँसर ट्रीटमेंट द्यावी का ? दारू पिऊन अपघात करून घेतला तर अश्या व्यक्तीला सरकारी इस्पितळांत फुकट इलाज मिळावा का हे सर्व प्रश्न शेवटी ह्याच सदरांत येतात. इथे सोपी उत्तरे नाहीत.
राजकारण :
सिंदिया ह्यांनी विमानात जाऊन वाचवलेल्या मुलांपुढे भाषण ठोकले, एअरपोर्ट मधून बाहेर येताना प्रत्येक पोराला पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले (जसे हे तिथे युद्ध जिंकून परत येत आहेत). हे सर्व बचाव कार्य अनेक राजकारणी मंडळी आपल्या स्वार्थासाठी आणि आपली प्रतिमा उजळवण्यासाठी वापरून घेत आहेत. आता असेच चालू राहिले तर विनाकारण ज्यांना बचावाची गरज नाही त्यांना सुद्धा "वाचवून" मंडळी आपले फोटो पेपर मध्ये छापून आणायला मागे पुढे पाहणार नाही.
युक्रेनमधील विद्यार्थ्यांची समस्या:
खरी समस्या आता निर्माण होणार आहे. किमान २०,००० विद्यार्थी आता देशांत परत येतील. पैसेही गेले आणि डिग्रीही नाही अशी अस्वस्थ झाल्याने हि मंडळी आता सरकारने नुकसान भरपाई द्यावी किंवा भारतांत मेडिकल ऍडमिशन द्यावे अशी मागणी करणार. मग त्यासाठी कोर्टांत जातील, मग कोर्ट आपले फतवे काढील. हा सर्व गोंधळ माझ्या मते आत्ताच कुठे सुरु होत आहे. येत्या काही महिन्यात हा आणखीन वाढेल.
युक्रेन भारतासाठी अवघड जागीचे दुखणे होते. कारण आक्रमणाच्या आधी भारताने विद्यार्थ्यांवर दबाव टाकून बचावकार्य सुरु केले असते तर भारताला आक्रमणाची अपेक्षा आहे अशी भारताची भूमिका आहे असे सर्वाना वाटले असते. भारतीय दूतावासाला ते नको होते.
भारतीय विद्यार्थी गेल्यास इतर जातील आणि त्यामुळे ह्यांना वेठीस धरता येणार नाही म्हणून युक्रेनी विद्यापीठांनी मुद्दाम विद्यार्थ्यांना "देश सोडल्यास आम्ही डिग्री सुद्दा देणार नाही, परत येऊन कम्प्लिट करायला मिळणार नाही" असे नियम केले (असे मी वाचले).
व्यावहारिक तोडगा :
माझ्या मते परदेशी भारतीयांचे बचावकार्य राजकारणापासून वेगळे करून भारतीय दूतावासाच्या ताब्यांत १००% दिले पाहिजे त्यामुळे राजकारणी मंडळी इथे विनाकारण लुडबुड करणार नाही. सध्या तीन भारतीय मंत्री म्हणजे बचावकार्यासाठी युरोप मध्ये गेले आहेत. ह्याची काय गरज होती ? परराष्ट्र खात्यांत बाबू मंडळींना ह्यांत गती नाही का ? सिंदिया किंवा सिंग नक्की असे काय तारे तिथे तोडणार आहेत ?
तक्षशिला च्या पेपर प्रमाणे साधारण प्रत्येक देशासाठी वेगवेगळी योजना आधीच बनवून ठेवली जाऊ शकते. ह्यांत खाजगी विमा कंपन्या, विमान कंपन्या इत्यादींना सहभागी करून घेतल्यास बचावकार्याची क्षमता वाढू शकते.
ह्या सर्वाला चांगला पर्याय म्हणजे आंतरराष्ट्रीय/राष्ट्रीय विमा कंपन्यांना हाताला घेऊन प्रत्येक प्रदेशाला धोक्याची पातळी देणे. पातळी ओलांडली कि आपोआप बचाव कार्य सुरु केले जाऊ शकते.
त्याशिवाय विद्यार्थी कर्जासाठी बँकांनी बचावकार्य विमा हा अनिवार्य केला पाहिजे. म्हणजे तुम्ही एखाद्या देशांत गेला आणि काही नैसर्गिक आपत्ती किंवा युद्ध ह्यामुळे आपले शिक्षण पूर्ण नाही झाले तर विमा कंपनी आपले कर्ज फेडेल. जे विद्यार्थी कर्ज काढत नाहीत त्यांना सुद्धा हा विमा उपलब्ध असला पाहिजे.
ह्या विम्याची खासियत म्हणजे ज्या देशांत जास्त धोका आहे तिथे आपोआप विम्याचे प्रीमियम वाढत जातील. त्याशिवाय विमा कंपनी बचावकार्य सुद्धा आपल्या हातांत घेऊ शकते. विमा कंपनीने विद्यार्थ्यांना देशांतून बाहेर पडायला सांगितले (विमा कंपनीच्या खर्चाने) आणि विद्यार्थी पडले नाहीत तर आपोआप विमा रद्द होईल. त्यामुळे विद्यार्थी कंपनीचा सल्ला जास्त गांभीर्याने घेतील.
1 Mar 2022 - 10:49 am | प्रदीप
संपूर्ण प्रतिसाद आवडला.
युक्रेनहून सरकारने परत मुंबईत स्वखर्चाने आणल्यावर, मग पुढे, आपापल्या शहरांत पोहोचवण्याची व्यवस्थाही सरकारनेच (अर्थात त्याच्या खर्चानेच) करावी, अशी अपेक्षा काही विद्यार्थी जाहीरपणे व्यक्त करताहेत.
वास्तविक, दिसला कॅमेरा, व मिळाला माईक नाकाखाली, की कुठल्यातरी व्यवस्थेविषयी तक्रार करत सुटणे हा, माझ्या निरीक्षणानुसार, अगदी खास भारतीय अवगुण आहे. इतरस्त्र, व विशेषतः पूर्व आशियांत दिसून येत नाही.
1 Mar 2022 - 10:58 am | रावसाहेब चिंगभूतकर
माझ्या मते परदेशी भारतीयांचे बचावकार्य राजकारणापासून वेगळे करून भारतीय दूतावासाच्या ताब्यांत १००% दिले पाहिजे त्यामुळे राजकारणी मंडळी इथे विनाकारण लुडबुड करणार नाही. सध्या तीन भारतीय मंत्री म्हणजे बचावकार्यासाठी युरोप मध्ये गेले आहेत. ह्याची काय गरज होती ? परराष्ट्र खात्यांत बाबू मंडळींना ह्यांत गती नाही का ? सिंदिया किंवा सिंग नक्की असे काय तारे तिथे तोडणार आहेत ?
माझ्या मते यात तीन गोष्टी आहेत.
1. मंत्रीगणांना वेगवेगळ्या डीपार्टमेंट्स मध्ये समतोल राखण्यासाठी वापरले जाईल. या विद्यार्थ्यांना इमर्जन्सी व्हिसा मिळवून देणे, त्या साठी वेगवेगळ्या डीपार्टमेंट्स शी बोलणे, तातडीच्या गोष्टी खाणे, पैसे, इतर जरूरीच्या गोष्टी उपलब्ध करून देणे इत्यादी. या सर्वसामान्य एम्बसी च्या अखत्यारीत येणाऱ्या गोष्टी नाहीत. एम्बसी च्या लोकांना अशा कामाचा अनुभव ही नसतो. सरकारी नोकर सर्वसाधारणपणे प्रोसिजर फॉलो करतात. तातडीने निर्णय घेण्यासाठी जनप्रतिनिधी तिथे असणे सर्वथा योग्य आहे.
2. दुसरं म्हणजे त्या देशाशी बोलण्यासाठी उच्च स्तरावरील मंत्र्याला जास्त अधिकार असतात. एम्बसी मधील सर्वोच्च अधिकारी सुद्धा सरकारी नोकरच असतो. त्यामुळे जोपर्यंत तो दिल्ली कडून वेगळे आदेश येत नाहीत तोपर्यंत एखादा निर्णय जागेवरच बदलणार नाही. बदलत्या परिस्थितीत हे योग्य आहे.
3. तिसरी गोष्ट म्हणजे एम्बसी च्या लोकांना मंत्री इथे आहे याचा धाक असतो. गोष्टी सिरियसली घेतल्या जातात. मुळात मंत्र्याला इथे पाठवले जाणे हे कदाचित त्यांना अपमानास्पद ही असावे कारण त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उत्पन्न होते, पण सध्या जे ऐकू येत होते की उदाहरणार्थ पोलंड एम्बसी ने नंतर नंतर फोन सुद्धा उचलायचे बंद केले होते, त्याला या मुळे पायबंद बसेल.
मंत्रीगण तिथे युद्धजन्य परिस्थितीत (कदाचित स्वतःचा जीव धोक्यात घालून ) जात आहेत ही नेहमीची गोष्ट नव्हे, ते तिथे फिरायला जात नाहीयेत आणि भारतासाठी परिस्थिती असमान्यपणे गंभीर करून ठेवली गेलेली आहे हे यावरून स्पष्ट होते.
1 Mar 2022 - 1:19 pm | शाम भागवत
येमेनला मला वाटते व्ही के सिंग आपली एक युध्द नौका घेऊन गेले होते. व त्यांनी युध्द चालू असताना अनेक भारतीयांबरोबर ४३ देशांच्या नागरिकांना सोडवले होते. मला वाटते त्यांचा गौरव अनेक देशांनी केला होता व त्यांना एक आंतरराष्ट्रीय सन्मानही प्राप्त झाला होता. भारताला प्रगती करा॑यला कितीही वाव असला तरी भारत अगदी टाकाऊ आहे असे मला तरी वाटत नाही.
28 Feb 2022 - 6:31 pm | रात्रीचे चांदणे
हाच न्याय लावला तर सगळेच स्वार्थासाठी काम करतात म्हणावे लागेल. भारतात राहणारे काय फुकट काम करतात का? टॅक्स भरणारे काय फक्त देश प्रेम आहे म्हणून भरतात का? अडचणीच्या काळात आपल्या देशाने मदत करायची नाही तर कोणी करायची? टॅक्स भरणारे हिथे राहून पैसे कमावतात म्हणूनच टॅक्स आपल्या कमाईवर टॅक्स भारतात. आज जो न्याय देशाला लावला जातोय तोच उद्या आपल्या शहराला, गावाला लावला जाईल. प्रत्येकाने कधी ना कधी स्थलांतर केलेलेच असणार, देशाबाहेर नसेलही केले पण आपला गाव , शहर सोडले असेलच की.
28 Feb 2022 - 6:49 pm | शाम भागवत
संकटात आपण एकशे पाच
भारतात परत आल्यावर हवतरं भांडू.
:)
28 Feb 2022 - 7:50 pm | अमरेंद्र बाहुबली
गाव/शहर वेगळं नी देश वेगळा.
पंजाबवर हल्ला झाला तर तामीळनाडूचा सैनिक ही जिव द्यायला तयार असतो. आता युक्रेन वर हल्ला झाला तर कुणी भारतीयाने का जिव द्यावा?
गावाची ना देशाची तुलना अयोग्य आहे.
जे ऊच्च राहणामाणासाठी युरोपात जातात त्याना तो देश संकटात सापडल्यावर बरं भारत आठवतो.
28 Feb 2022 - 7:53 pm | अमरेंद्र बाहुबली
युक्रेनच्या सिमेवर सैनिक स्थलांतरीतांना लाथाबूक्क्यानी तुडवताहेत ते ह्याच रागातून. मी सैनिक असतो नी भारतावर हल्ला झाल्यावर ईथे पोट भरायला आलेले ईतरदेशीय लोक असे पळताना दिसले असते तर असंच तुडवलं असतं.
28 Feb 2022 - 11:47 pm | धनावडे
ते पुढच्या वर्षी पर्यंत दिल्ली वैगरे वर बॉम्बफेक होणार आहे, आणि मग महायुद्धात आपल्याला पण सैन्यात भरती व्हावं लागणारच आहे, तेव्हा आपण करू असच, तोपर्यंत जरा फिटनेस वर लक्ष द्या गरज आहे देशाला आपली.
1 Mar 2022 - 6:17 pm | अमरेंद्र बाहुबली
ओके कमांडर.
1 Mar 2022 - 12:52 pm | साहना
आता देशांत किंवा देशाबाहेर असा कोण आहे जो निव्वळ निस्वार्थी पणे काम करतो ? बहुतेक लोक शेवटी आपले हित आणि आपल्या परिवाराच्या हितासाठी प्रवास करतात, काम करतात. ह्यांत चुकीचेही नाही आणि ह्या लोकांना स्वार्थी म्हणून वेगळे काढून हिणवण्यात सुद्धा काही अर्थ नाही. पंजाबी लोक जगांत सर्वत्र आहेत. आणि प्रत्येक ठिकाणी संकट सुरु झाले कि ह्यांचा लंगर कसा सुरु आहे ह्याच्या बातम्या येतात. युक्रेन मधील निर्वासित ट्रेन्स मध्ये ह्यांचा लंगर सध्या सुरु आहे. तीच गोष्ट इस्कॉन वाल्यांची युक्रेन तसेच पोलंड, रोमानिया इथे कृष्णमंदिरे लोकांच्या सेवेसाठी आणि अन्नछत्रा साठी सतत चालू आहेत. कॅनडा मधील शीख लोक मोठ्या प्रमाणावर त्यांच्या सैन्यात भरती होतात, तीच गोष्ट अमेरिकेची आहे. चिनी, जपानी किंवा भारतीय लोक सुद्धा त्यांच्या नवीन देशांत मोठा प्रमाणावर सैन्यात भरती होतात. अमेरिकेत तर असंख्य तेलगू लोक निव्वळ अमेरिकन राष्ट्रीयत्व वेगाने मिळावे म्हणून अमेरिकन सैन्यांत भरती होतात इतकेच नाही तर त्यांनी अफगाणिस्तान, इराक मध्ये जीव सुद्धा धोक्यांत घातला आहे.
भारतांत स्थलांतर तर नेहमीच होत आले आहे. कोंकण प्रांतात म्हणे ब्राम्हण लोक परशुराम ह्यांच्या सोबत आले. सारस्वत मंडळी तर उत्तरेहून स्थलांतर करून आली. ह्यांनी कोंकण प्रांतात भरभराट आणली नाही का ? विविध मराठा सरदार स्वराज्यनिमित्त पंजाब, हरियाणा इत्यादी स्थायिक झाले ह्यांनी संकटाच्या वेळी शेपूट घालून पळ काढला का ? तीच गोष्ट पारसी लोकांची. टाटा सारख्या श्रीमंत लोकांनी फ्रांस मध्ये शिक्षण घेतलेच पण तिथल्या सैन्यात सुद्धा भरती झाले. पळून आले नाहीत.
मुबईला धोका उत्पन्न होताच बाहेरील लोक पळून जातात हे अजिबात सत्य नाही. मुबई वरील हल्ला तसेच प्रथम पूर परिस्थितीत बंगाली, बिहारी, तेलगू असोसिएशन लोकांनी प्रचंड मदत कार्य केल्याचे मी स्वतः पहिले आहे. काही लोक गेले असतीलच पण त्याच प्रमाणे अनेक मराठी लोक सुद्धा मुबई सोडून आपल्या गावी गेले असतील.
ते सोडून द्या, मुंबईत तर मजूर मंडळी दररोज जीव धोक्यांत घालून मुंबईकरांना जीवन सुकर करून देतात. भर पावसांत स्वीग्गी वाला आपली डिलिव्हरी घेऊन येणारे, गटारे साफ करणारे, इमारतीवर चढून काचा साफ करणारे, पूर परिस्थितींत टॅक्सी इत्यादी चालविणारे, २६/११ दरम्यान हॉटेलांत सर्व लोकांना सुरक्षित पणे बाहेर काढणारे, कोविड मध्ये नर्स म्हणून हॉस्पिटल मध्ये काम करण्यार्या सर्व व्यक्ती मराठीच असतात का ? राज्याबाहेरील किंवा शहराबाहेर मुळे असणाऱ्या असंख्य व्यक्ती मुंबईच काय किंवा इतर शहरे चालू ठेवतात.
मध्यपूर्वेत मजूर म्हणून काम करणारे भारतीय, मोठ्या शिप्स वर काम करणारे गोवेकर हि मंडळी आपला जीव धोक्यांत घालून ह्या देशांत काम करत आहेत. मध्यपूर्वेत तर असंख्य भारतीय मजूर कामाच्या नादांत मारले जातात.
स्थलांतर, सतत प्रवास, व्यापारासाठी प्रवास ह्या गोष्टी भारतीयांसाठी नवीन नाहीत अत्यंत पुरातन काळा पासून ह्या गोष्टी होत आल्या आहेत. त्यांत चुकीचे काहीच नाही उलट जिथे आपल्या ज्ञानाचा किंवा कौशल्याचा सन्मान होत नाही अश्या प्रदेशांतून तात्काळ स्थलांतर करून जिथे आपला सन्मान होईल तिथे जाऊन राहावे असा सल्ला कौटिल्य आपल्या पुस्तकांत देतात. इतर प्रदेशांत जाऊन प्रसंगी जीव धोक्यांत सुद्धा घालणारे लोक शेवटी आपल्या फायद्यासाठीच जातात, पैश्यासाठीच काम करतात पण स्वार्थी लोक पळून जातात किंवा आपला जीव धोक्यांत घालत नाहीत हा आरोप खोटा आहे. स्थलांतर आणि शौर्य (किंवा भ्याडपणा) ह्यांचा काहीही संबंध नाही.
वर वर आपण मोठे मानवतावादी, सर्वाना समान मानणारे आहोत असा आव आणणारच व्यक्ती प्रत्यक्षांत प्रचंड वंशभेदी, वर्णभेदी, आणि इतर प्रकारचे भेंदि असतात असेच तरी येथील चर्चेवरून वाटते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा पराकोटीचा भेद आणि द्वेष फक्त अंतरराष्ट्रीय पातळीवर नसून, राज्य, भाषामी शहर, गांव आणि कदाचित आता आपली हाऊसिंग सोसायटी पातळीवर सुद्धा हि मंडळी दाखवत आहेत !
> टॅक्स भरणारे काय फक्त देश प्रेम आहे म्हणून भरतात का?
केरला सारख्या राज्याची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर विदेशांत काम करणाऱ्या मजुरांनी पाठविलेल्या पैश्यावर अवलंबून आहे. तीच गोष्ट गोव्याची. दोन्ही राज्यांनी आपल्या विदेशांत राहणाऱ्या लोकांसाठी खास सरकारी डिपार्टमेंट सुरु केले आहे, उपकार म्हणून नाही तर त्यांच्याकडून पैसे येतात म्हणून.
1 Mar 2022 - 1:10 pm | कॉमी
सहमत आहे.
1 Mar 2022 - 3:32 pm | रावसाहेब चिंगभूतकर
100% सहमत
1 Mar 2022 - 8:21 pm | हरवलेला
उत्तम प्रतिसाद.
1 Mar 2022 - 10:39 pm | डाम्बिस बोका
परदेशी भारतोयं बद्दल हि पोटदुखी खूप वेळा दिसते.
देशाच्या बाहेर जाणारे लोक हे देशाच्या कामाला येतात हे ह्या जळू लोकांना काळात नाही.
आज सर्व जगभर विखुलेले भारतीय शिक्षण, व्यापार, करून देशासाठी एक प्रतिनिधी होतात. त्याचे फायदे कळायला थोडी दूरदृष्टी असावी लागते. दुर्दैव कि घर ना ऑफिस एवढेच विश्व असणाऱ्या लोकांना हे कळत नाही
2 Mar 2022 - 3:11 am | निनाद
हेच म्हणणार होतो, तर माझ्या पेक्षा जास्त विस्तृत आणि व्यवस्थितपणे मांडलेला प्रतिसाद!
28 Feb 2022 - 7:55 pm | sunil kachure
युद्ध ही दोन देशातील सरकार मधील च असतात.सामान्य लोक विनाकारण त्याची शिकार बनतात .सरकार काय पॉलिसी राबवते किंवा काय निर्णय घेत आहे..
ह्या वर नियंत्रण फक्त जागरूक,, हुशार जनता असेल तर च शक्य असते.
पण सरासरी जनता इतकी जागरूक नसते किंवा कोणत्या तरी विचार श्रेणी ची गुलाम असते..
मग असे युद्ध सारखे प्रसंग येतात.
युक्रेन आणि रशिया मध्ये युद्ध होण्या इतकी स्थिती का आली..
माझ्या मते .
युक्रेन रशिया चा पारंपरिक कट्टर विरोधक असलेल्या अमेरिकेला दारापर्यंत घेवून आला.
हेच कारण असावे
भाऊ की मध्ये पण घराच्या शत्रू ल स्वतःची जागा विकून शत्रू ला शेजारी राहण्यास संधी देण्या मुळे ग्रामीण भागात भांडण होतात
तसाच काही तरी रशिया आणि युक्रेन चा प्रॉब्लेम आहे
2 Mar 2022 - 9:49 am | आलो आलो
याच विचारसरणीची लोक इंग्रज यायच्या आधी मुघलांच्या आणि नंतर इंग्रजांच्या चाकरीत धन्य होऊन गेले ...
28 Feb 2022 - 11:17 pm | आलो आलो
जेवणं झाली असतील मिपाकरांची .....मग होऊन जाऊदे परत एकदा सुरुवात ....पोटावर हाथ फिरवत फिरवत
1 Mar 2022 - 8:35 am | निनाद
हाथ हा हिंदी शब्द आहे - मराठी शब्द हात असा आहे.
1 Mar 2022 - 9:55 am | आलो आलो
घ्या एव्हढ्या वेळेस सांभाळून ___/\___
1 Mar 2022 - 12:51 am | sunil kachure
युद्ध हे सैनिक पातळीवर च लढले जावं.हा स्टँडर्ड विचार झाला आणि तो योग्यच आहे.
सामान्य लोकांस निशाणा बनवणे माणुसकी विरुद्ध आहे.
रशिया नी युक्रेन मधील शहरांवर हल्ला चढवला आहे. बॉम्ब हल्ले केले आहेत.
अशी सर्व मीडिया दाखवत आहे.
पण रशिया चे असे म्हणणे आहे हा आरोप चुकीचा आहे
रशियन फौज सामान्य लोकांस टार्गेट करत नाहीत..फक्त सैनिकी ठिकाणावर च हल्ले केले जात आहेत.
मीडिया चुकीचं दाखवत आहे.
नक्की कोणाचे सत्य आहे.
रशिया योग्य बोलत असेल तर मीडिया नी गंभीर होणे गरजेचे आहे.
जबाबदारी नी reporting करणे गरजेचे आहे.
आज पर्यंत युद्ध चालू आहे ते युक्रेन च्या भूमीवर चालू आहे.
ह्याचा अर्थ सरळ नुकसान फक्त युक्रेन च होत आहे.
युक्रेन अध्यक्षांनी स्वतःचा गर्व बाजूला ठेवून चर्चेला प्राधान्य द्यावे..
स्वतःच्या हट्ट पायी स्वदेश च बरबाद होण्यासारखी वागू नये.
युक्रेन चे सत्ता उलथून लावण्यासाठी मर्यादित लष्करी कारवाई करून युक्रेन सरकार मधील नेत्यांना रशिया कैद करू शकतो
तो मार्ग रशिया नी अवलंबला पाहिजे.
मनुष्य हानी चे समर्धन होवू शकत नाही.
1 Mar 2022 - 9:50 am | डाम्बिस बोका
सध्या जागतिक मीडिया Ukraine च्या बाजूने आहे. पूर्ण अमेरिकेत छोट्या गोष्टी मोठ्या करून सांगितल्या जात आहेत.
e.g. सहा वर्षांच्या मृत्यू वगैरे. युद्ध हे वाईटच पण वस्तुस्तिथी कशी दाखविली जाते त्यावर बरच काही आहे.
आतापर्यंत फारतर १००० जण मारले गेले आहेत. मला वाटते Putin handling it very carefully .
इराक युद्धमध्ये १ आठवड्यात ८०,००० लोकांना मारले आमच्या लोकशाहीप्रेमी अमेरिकेने.
खालची BBC बातमी वाचा. Ukraine ने भारतीय लोकांनां फार वाईट वागणूक दिली.
https://www.bbc.com/marathi/international-60555760
1 Mar 2022 - 10:27 am | रात्रीचे चांदणे
इंडिया टुडे च्या बातमीनुसार फेसबुक, ट्विटर ने ukrain विरिद्धच्या बातम्या फेक म्हणून काढून टाकल्या आहेत. सध्यातरी बातम्यांवर जे अमेरिका आणि युरोप ला जे पाहिजे तेच बघायला मिळत आहे. फेसबुकवर ukrain सैन्य कसे बहादूरीने लढत आहे याचे शेकडो विडिओ पोस्ट होत आहेत, ukrain चे सैन्यच नाहीतर साधी जनता ही रशियन सैनिकांच्या समोर येऊन शिव्या देत आहेत. रशियन सैन्य मात्र मुकाट्याने ऐकून घेत आहेत. Quora वरतीही रशियन बाजू घेणाऱ्या पोस्ट अचानक गायब झालेल्या आहेत.
1 Mar 2022 - 10:31 am | निनाद
हे युद्ध सोशल मिडियावरचे आहे! मिस-इन्फॉर्मेशन, डिस-इन्फॉर्मेशन पासून सर्व काही वापरले जाणार!
1 Mar 2022 - 12:17 pm | साहना
* ४० मैल लांबीची महाप्रचंड रशियन कॉन्व्हॉय (काफिला) उत्तरेकडून क्यिव च्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. ह्यांत नक्की काय आहे ठाऊक नाही पण सैन्य, light armoured vehicles, रसद इत्यादी असेल असा कयास आहे.
https://pbs.twimg.com/media/FMshs0NXIAU_W3-?format=jpg&name=medium
* पोलंड आणि बल्गेरिया ह्यांनी एकूण सुमारे ४० मिग आणि सुखोई विमाने युक्रेनला दिली आहेत. युक्रेनी पायलट नि हि काही तास आधी ताब्यांत घेतली.
* तुर्की चे TB२ ड्रोन्स युक्रेन ने आधी प्रभावी पणे वापरले होते पण रशियन्स नि ते उडवून लावले होते अशी माहिती होती पण काळ आणखीन ड्रोन फुटेज उपलब्ध झाली. हे नवीन आहेत कि आधीचेच ठाऊक नाही.
* टर्कीच्या ह्या ड्रोन्स ना आता भयंकर मागणी येईल. भारताने सुद्धा हे द्रोण घ्यायचे ठरवले होते पण शेवटी इस्रायली ड्रोन्स घेतले. अमेरिकन प्रिडेटर ड्रोन्स ची ऑर्डर भारताने हल्लीच रद्द केली आहे.
* भारताने युक्रेनला मानवतावादी मदत पाठविण्याचे आश्वासन दिले आहे.
* भारत रशियाने एकत्र निर्माण केलेले ब्राम्होस क्षेपणास्त्र इथे वापरले जाईल का ह्यावर सर्वांची नजर होती. रशियाने प्रभावी पणे ते वापरले असते तर भारताला ह्याची जास्त निर्यात करता आली असती. पण ते वापरले गेले नाही.
* ट्रम्प तसेच ओबामा ह्या दोन्ही राष्ट्राध्यक्षांच्या हाताखाली काम केलेली, पुतीन ह्या विषयावर गाढा अभ्यास असलेली श्रीमती हिल ह्यांनी पॉलिटिको ला ह्या विषयावर विस्तृत मुलाखत दिली. माझ्या मते फार छान आहे. हिल आणि ट्रम्प ह्यांचे शेवटी भांडण झाले होते.
https://www.politico.com/news/magazine/2022/02/28/world-war-iii-already-...
थोडक्यांत : "पुतिन ह्यांनी उचललेली पावले हि अनपेक्षित नाही. उलट ट्रम्प पुतीन भेटीत पुतीन ह्यांनी अगदी स्पष्ट पणे ट्रम्प ह्यांना ह्या विषयावर धमकावले होते (हिल ह्या त्यावेळी तिथे उपस्थित होत्या) पण ट्रम्प तसेच इतर पाश्चात्य मंडळींनी त्यांना गांभीर्याने घेतले नाही. आण्विक अस्त्रे पुतीन वापरणार का ? तर १००% होय. इतकेच नव्हे तर पुतीन ह्यांनी ह्या आधी आण्विक शस्त्रे तसेच जैव शस्त्रे लंडन मध्ये वापरून काही लोकांना ठार मारले होते. एक जैव अस्त्र तर अत्तराच्या बाटलीतून पाठवले होते आणि हजारो लोकांना मारण्याची क्षमता त्यांत होती पण शेवटी जास्तीत जास्त ३ लोक मेले."
* पुतीन ह्यांना काही रोग झाला असेल किंवा त्यांची मानसिक स्तिथी ठीक नसेल ह्याला हिल ह्यांनी दुजोरा नाही दिला. हा माणूस आधीपासून असाच होता आम्हीच त्याला गांभीर्याने घेत नव्हतो असे सांगितले.
* युक्रेन मधील डिंप्रो हि महत्वाची नदी आहे. दिना ह्या देवीवरून ह्या नदीचे नाव आहे किंवा हि नदीच दिना हि देवी आहे. रिग्वेदांत ह्या देवीचा उल्लेख आहे. इतर नदीची नवे सुद्धा दनु ह्या शब्दावरूनच आहेत. दनु ह्या संस्कृत शब्दाचा अर्थ "पाणी" असा होतो. दानुद म्हणजे वाहणे.
* युक्रेन मधील युद्धावरून वर्णभेद हा विषय वर आला आहे. भारतीय लोक आणि काळ्या लोकांवर युक्रेनियन सैन्याने अत्याचार केला आहे अश्या बातम्या येत आहेत. पण रोमा हे भटके लोक भारतातून युक्रेन आणि पूर्व युरोपिय प्रदेशांत हजारो वर्षांपासून आहेत, जुना भारतीय हिंदू धर्म सुद्धा ह्यांनी (काही प्रमाणात) जोपासला आहे. ह्या लोकांवर ह्या प्रदेशांत अनेक वर्षांपासून अत्याचार होत आहे. ह्यावर सुद्धा ह्या निमित्ताने टिप्पणी करावी लागली. अमेरिकेत सुद्धा काही रोमा लोक आहेत आणि आजही भटके प्रकारचे आहेत. ट्रेलर वगैरे घेऊन त्यांत राहतात. पेवर्स म्हणजे फुटपाथ निर्माण करणे हा ह्यांचा प्रमुख व्यवसाय, आणि हे काम विविध ठिकाणी असल्याने हि मंडळी भटकत राहू शकते. युरोप मध्ये ह्यांच्यावर हि मंडळी चेटूक करते आणि लहान मुले चोरते असे आरोप ह्यांच्यावर केले जातात. सध्या युक्रेन मधील रोमा लोक जंगलांत भटकून जंगली फुले, फळे विकून पोट भरतात.
1 Mar 2022 - 12:28 pm | Trump
तेच तर आहे ना.
तथाकथिक मुक्तता, स्वातंत्र्य युरोपियन गोर्यांची तळी उचलणांना आहे. त्यांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे वेगळे.
1 Mar 2022 - 11:08 am | sunil kachure
आर्थिक निर्बंध आणि विविध बाकी निर्बंध रशिया वर युरोपियन राष्ट्र आणि अमेरिका टाकतं आहे.
रशिया ची बदनामी होईल अशा न्यूज पेरल्या जात आहेत.
रशिया कसा दोषी आहे ह्याचा प्रचार चालू आहे
युरोपियन राष्ट्र भडकावणारा प्रचार करत आहेत.
ह्याचा परिणाम म्हणून रशिया नी अण्वस्त्र हल्ला केला तर त्याचे भीषण परिणाम जगाला भोगावे लागतील.
जगात सर्वात जास्त अण्वस्त्र रशिया कडे आहेत.
अँटी missile सिस्टीम फक्त अमेरिका आणि रशिया कडेच आहे असे ऐकून आहे.
पण बाकी देशांना अण्वस्त्र हल्ल्याचा प्रतिकार करण्याची संधी पण मिळणार नाही.
युद्ध अण्वस्त्र पर्यंत जावू नये.
ह्या साठी सर्व राष्ट्रांनी संयम आणि जबाबदारी नी वागल पाहिजे.
1 Mar 2022 - 11:48 am | प्रदीप
ह्या रशिया- युक्रेन संघर्षामुळे, तथाकथित प्रगत देशांतील पुरोगामी वगैरे जनतेचा वर्णवाद आता उघड होऊ लागला आहे. येथे काही व्हिडीयो क्लिप्स आहेत, ती पहावीत.
1 Mar 2022 - 12:36 pm | Trump
खुप धन्यवाद.
युरोपियन लोकांकडुन दुसर्या कोणत्या अपेक्षा ठेवणार!!!
1 Mar 2022 - 12:49 pm | sunil kachure
रशिया विरुद्ध प्रचार आणि रशिया कशी युद्ध हरेल..
असा प्रचार
हा फक्त एजेंडा आहे.
रशिया काय करू शकतो ह्याची जाणीव युरोपियन राष्ट्रांना पण चांगलीच आहे.
ह्या युद्धात तरी रशिया ची बाजू न्यायाची आहे.
युक्रेन ची चुकीची भूमिका आहे..
अगदी बाजू च्या नेपाल नी भारताचे दुष्मन देश पाकिस्तान किंवा चीन ल लष्करी तळ उभारायला दिला तर भारत पण नेपाल वर हल्ला करेल..
रशिया पेक्षा वेगळा भारत पण वागणार नाही.
तैवान वर चीन हल्ला करतो ह्याला पण हीच करणे आहेत .चीन विरोधी देशांना मदत करणे.
Trump म्हणत आहे ते योग्य आहे.
अजून खरे युद्ध सुरूच झाले नाही
युक्रेन ची जनता युद्ध मध्ये सहभागी होत आहे है जगाने मान्य केली.
की रशिया सरसकट सर्व युक्रेन वर घातक अस्त्रांचा वापर करेल.
सैनिक ठिकाण आणि रहिवासी भाग असा फरक करणार नाही
आणि जग रशिया ला युद्ध नियम मोडले म्हणून दोष पण देवू शकणार नाहीं
1 Mar 2022 - 2:38 pm | sunil kachure
युक्रेन चे नेतृत्व प्रगल्भ नाही,बिनडोक व्यक्ती ल युक्रेनी जनतेने निवडून दिलेले आहे.
चुकीच्या लोकांना निवडून देणे आणि सत्तेवर बसवणे देशासाठी किती धोकादायक असते ह्याचे जीवंत उदाहरण म्हणजे युक्रेन .
भारताच्या नशिबाने ..
नेहरू,इंदिराजी ,नरसिंह राव ,मनमोहन सिंग सारखी हुशार लोक भारताचे नेतृत्व करत होते.
चुकीच्या व्यक्ती ल सत्तेवर बसवणे किती धोकादायक असतें
हे भारतीय लोकांस पण हळू हळू माहीत पडेल कम
1 Mar 2022 - 2:38 pm | sunil kachure
युक्रेन चे नेतृत्व प्रगल्भ नाही,बिनडोक व्यक्ती ल युक्रेनी जनतेने निवडून दिलेले आहे.
चुकीच्या लोकांना निवडून देणे आणि सत्तेवर बसवणे देशासाठी किती धोकादायक असते ह्याचे जीवंत उदाहरण म्हणजे युक्रेन .
भारताच्या नशिबाने ..
नेहरू,इंदिराजी ,नरसिंह राव ,मनमोहन सिंग सारखी हुशार लोक भारताचे नेतृत्व करत होते.
चुकीच्या व्यक्ती ल सत्तेवर बसवणे किती धोकादायक असतें
हे भारतीय लोकांस पण हळू हळू माहीत पडेल कम
1 Mar 2022 - 2:46 pm | sunil kachure
सर्व सामान्य युक्रेन लोकांवर हल्ला सौम्य करावा .
आणि ही वेळ ज्या लोकांमुळे आली ते युक्रेन चे अध्यक्ष आणि बाकी सल्लागार,मंत्री ह्यांना कमांडो चा वापर करून अटक करावी.
गुन्हेगार हीच लोक आहेत.
सर्व सामान्य जनता नाहीं
1 Mar 2022 - 2:55 pm | शाम भागवत
ज्या काही बातम्या येत आहेत त्या सर्व खर्या व वस्तुनिष्ठ असून त्यात कोणाचाही अजेंडा नाही व कोणतीही न्यूज पेड नाही असे मिपावर ज्याला वाटत असेल आणि तो जर हिरीरीने त्या बातमीचे सर्मर्थन करत असेल तर त्याला माझा......
🙏
1 Mar 2022 - 3:53 pm | कॉमी
युक्रेनमध्ये एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचे समजते.
1 Mar 2022 - 5:00 pm | Bhakti
खुप दुःखद.
1 Mar 2022 - 7:23 pm | कुमार१
+११
आदरांजली.
1 Mar 2022 - 5:12 pm | साहना
कर्नाटक राज्यांतील नवीन ग्यानगौडा ह्या मुलाचा खारकीव शहरांत मृत्यू झाला. नवीन अन्न घेण्यासाठी मार्केट मध्ये रांगेत उभा असता रशियाने डागलेले मिसाईल जवळ असलेल्या चौकांत पडले आणि त्यांत त्याचा जागीच मृत्यू झाला. रशियन सैन्याने त्याला गोळी घातली हि बातमी खोटी असून त्याचा मृत्यू रहिवाशी भागावर पडलेल्या क्षेपणास्त्रामुळे झाला आहे.
1 Mar 2022 - 5:51 pm | आनन्दा
चला नवीन धागा काढा.
युद्ध काही अजून 8 दिवस थांबत नाही.
आत्ता कुठेतरी असे वाचले की युक्रेनमध्ये कोणत्या तरी बायो लॅब मध्ये अमेरिकेची बायो वेपनस आहेत, त्यावर पुतीनचा डोळा आहे, त्यासाठी हे युद्ध चालू आहे..
1 Mar 2022 - 6:07 pm | कॉमी
साहनाजींनी पुढचा प्रतिसाद धागा म्हणून टाकावा.
1 Mar 2022 - 8:26 pm | धर्मराजमुटके
ट्वीटर हे जगातील कोणत्याही देशाचे अधिकृत संपर्क माध्यम आहे काय ? आजकाल कोणीही उठतो, काहीही ट्वीट करतो.
मुळात आंतराष्ट्रीय प्रकरणात सरकार शिवाय दुसर्या कोणीही सहभागी होणे कितपत योग्य आहे ?
ही बातमी.......
1 Mar 2022 - 8:51 pm | कॉमी
फार लाजिरवाणा प्रकार झाला हा.
1 Mar 2022 - 9:22 pm | Trump
युरोपियन गोर्या लोकांचा दाभिकपणा मस्तपैकी उघड होतो आहे. आता गोरे युरोपियन मरत आहेत म्हणुन सगळ्यांची जीव वर खाली होत आहे. काल एक गोरा, रशियाचा निषेध करणे कसे गरजेचे आहे ते सांगत होता, त्याला ह्याच युध्दाचा निषेध का, आधी कोणत्या युध्दाचा निषेध केल्याय का हे विचारले. शेवटी रडायला लागला.
वरुन कितीही समानतेचा आव आणला तरी आतील वंशश्रेठत्वचा पीळ कसा सोडणार!!!-
आता श्री पुतीन म्हणत आहेत ते बरोबर वाटायला लागले आहे. रशियाला हरवण्यासाठी युरोपियन लोक भरपुर पैसा ओतत आहेत. दुसरे प्रगती करतील ते कसे बघवेल!!!. असो.
2 Mar 2022 - 9:08 pm | Trump
नाझी आणि युरोपियन लष्कर
1 Mar 2022 - 10:47 pm | मदनबाण
साधारण २४ फेब्रुवारी पासुन O [ ओ ] मार्किंग असलेला TOS-1A Thermobaric Rockets लॉन्चर [ "heavy flamethrower" ] पाहण्यात आला होता, हा आग ओकणारा दैत्य त्याच्या ६ ते १० किलोमिटरच्या टप्प्यात असलेली टार्गेट्स अचुक न्यूट्रिलाईझ करु शकतो. आता अधिकचा रक्तपात होणार अशी एकंदर लक्षणे दिसत आहेत. असेच Z मार्किग असलेले दैत्य देखील पाहण्यात आले आहेत.
याच्या Thermobaric Blast च्या जवळ असणार्या व्यक्तींचे फुफ्फुस फाटु शकते, डोळे फुटु शकतान आणि हाडे देखील मोडु शकतात याच बरोबर माणासाची वाफ देखील होऊ शकते.
वरील व्हिडियोची सत्यता माहित नाही पण हा काल युक्रेन मध्ये झालेला Thermobaric Blast दाखवतो.
मल्टीपल रॉकेट हल्ले :-
अंधारातील युद्ध :-
जाता जाता :- Exclusive: Nord Stream 2 owner considers insolvency after sanctions
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- War does not determine who is right - only who is left. :- Bertrand Russell