कालच्याला आपण दिंडोरे आन यादव फॅमिलीला भेटलो..
आता त्या यादवाच्या उजव्या अंगाला राहतुया दावणे कुटुंब. तर ह्या दावण्याच्या फॅमिलीला आम्ही वाड्यातील समदी मंडळी "कोळसा फॅमिली" म्हणतुया.
आता त्यासणी तसा का म्हणत्यात ते सांगायची गरज नाय हाये तुम्हासणी तवढं तुमासणी बुध्दी असलच.
तर बघा पाव्हणं, ह्या कोळसा फॅमिलीत बी चार लोक हायेत. कोळसा-कोळसी आणि त्यांची दोन पोर, एक पोरग, आणि एक प्वॉर.
तुम्हासणी म्हणुन सांगतो पाव्हण, ह्यो कोळसं खानदान त्यांच थोबाड गोरं व्हण्यासाठी काय काय करित न्हायती तेवढं इचारा. ते फेअर ऍन्ड लव्हली की काय ते हातावर पिळत्याती आणि हु म्हणुन फासत्यात थोबाडावर, पण आईच्यान सांगतो त्या समद्या कोळसांच्या थोबाडावर त्याचा काय बी परिणाम नाय बघा, तळहातावर फेअर ऍन्ड लव्हली घासुन घासुन त्या कोळसांचे तळहात मात्र गोरं झ्याल्यात.
आता ह्यो दावण्या राहतुया १० बाय १२ च्या एकाच खोली मन्धी, कस काय जमतया त्याच त्यालाच ठाव. तर ते कोळसा फॅमिली लै लै चिक्काट.. अव त्याच्या घरात मी ट्युब लाईट कधी बघीतली नाही बघल तवा ह्याच्या घरात ह्यो झिरो बल्ब लावलेला असतुया. एकतर हायती समन्दी काळी त्यात घरात उजेद बी नाय, कशी धडकत नसतील एकमेकांना देवाक ठाव.
अवो ती कोळसीन बी तसलीच, आजु बाजुच्या बायांनी भांडी घासुन खरकाटं ओतलं की त्या खरकटातल्या मिरच्या घेऊन येईल आणि त्या मिरच्याबी स्वयंपाकात वापरील काय भरोसा नाय त्या बाईचा.
आम्ही कवा बी त्यांच्या घरला काय खात नाय, अगोदर ती बया साधुक च्या चा घोट बी देत नाय ते येगळं, पण चिकुन माकुन काय दिलंच खायाला तर घरात संपत नसंल म्हणुन देणार.
तो कोळसा घर बांधतुया म्हणं, पण मला वाटतया ह्यो घर बांधताना बी ह्यांच्या कडनं ईट आन, त्याची वाळु आण, त्याच सिमिन्ट आण असं करीत असणार.
ह्याच्यी दोन्ही पोर म्हन्जी वाड्याला ताप हाये नुसता ताप. अवो, कळत बी नाय घरातलं कवा काय धापुन नेतील. त्याच्या घरला जाताना कोण बी व्हाण घालुन जात नाय बघा, नाय तर गेलंच म्हणुन समजा तुमचं व्हाण. त्या कोळसांच पोरगं थापा तर एवढं मारतुया म्हणुन सांगु, त्याच्या नादाला लागुन आमच्या पोरांसणी वाईट वळणं लागायची वो. त्याची पोरं एवढी गुणी असल्यांनच आमच्याच जिवाला घोर हाये. कधी त्याच घर बांधुन पुर्ण होतया आणि ही पिडा इथुन जातीया ह्याची समन्दी वाड्यातील लोक वाटच बघत्यात.
ह्या दावणेच्या बाजुला राहतया ते कुटुंब लै लै सुशिक्षित बर का पाव्हणं.. त्या कुटुंबाच नाव हाये..रांगणेकर.
तर ह्या कुटुंबा बद्दल वाड्यातील समन्द्या बापयासणी लै लै आपुलकी हाये, का ते सांगतुया, जरा तुमचं कान हिकड करा.
अव ह्या रांगणंकर कुटुंबात हायती पाच माणस, नवरा-बायकु, दोन पोर आणि म्हातारी.
तर ही रांगणेकर बाई लै लै पिरमल बघा, दिसला बापया की पडला हीचा पदर. आता ती तरी काय करल म्हणा नवराच हाये असला शेळपट की त्याला सवताच्या बाईचा पदर धरता येईना मग ती तरी का करल बिचारी.
तिला हायती दोन पोर. मोठं पोरग म्हणजी पोरगी व्हता व्हता वाचली आणि पोरगा झाला अशातली गत. अव ते पोरगं काय रांगोळ्या काढतया, काय सजावट करतया, गोड तर इतकं बोलतुया की प्वार असती तर सुन म्हणुन आणली असती बघा घरला. घाकलं अजुन लैच लहानग हाय त्यामुळं त्याच गुण इशेश नाहित आजच्याला.
तर वाड्यातील समन्धी बाया माणसं ह्या रांगणेकरच्या बाईस तीच्या माघारी "रम्भी" म्हणत्यात. वाड्यातील बापड्यांकडं बघुन गोड शाण हसणार, या की राव घरी म्हणणार्. फकस्त बायकुच्या धाकान वाड्यातील कोणता बी बापया तिच्या घरला जायला मागत नाय. अव नुसतं ती रम्भी समोर जरी आली तरी छातीत कसं धडाधडा व्हतया, आणि कानातुन वाफा निघत्याती. पण पाव्हणं ह्या कानातुन वाफा काय तिला बघुन निघत्यात अस नव्ह बरं का, अवो तिला बघताना आपल्या बायकुन जरी बघितलं नसलं तरी आजु बाजुच्या बाया ह्यायतच की चुगली कराया, आणि मिठ मसाला लावुन सांगाया. मग तुमची कानशिलं नुसत्या बायकुच्या पिरमल शब्दांनीच लाल व्हत्यात.
आता तिचा नवरा घरात असला काय नसला काय समदं सारखंच, बिचार्याचा आवाज कवाच ऐकु येत नाय. तसा ह्या कुटुंबाचा वाड्यातील बापड्या माणसांसणी काय बी त्रास नाय पण बाया माणसं मात्र ही रम्भी कवा हिकडुन निघुन जातीया त्याची वाटच बघतायती.
अपूर्ण
प्रतिक्रिया
25 Apr 2009 - 8:20 am | प्रमोद देव
वळख परेड लय भारी.
आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)
25 Apr 2009 - 9:00 am | क्रान्ति
जोरदार! कोळसा फ्यामिली लैच भारी!
:))
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com
25 Apr 2009 - 7:38 pm | प्राजु
सहमत. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
25 Apr 2009 - 9:03 am | विनायक प्रभू
तै, छान चाल्लय.
25 Apr 2009 - 9:12 am | मदनबाण
ह्या कोळसा फॅमिलीत बी चार लोक हायेत. कोळसा-कोळसी आणि त्यांची दोन पोर, एक पोरग, आणि एक प्वॉर.
हा.हा.हा...कोळसे फ्यॅम्येली जोरदारच हायत !!! :D
मोठं पोरग म्हणजी पोरगी व्हता व्हता वाचली आणि पोरगा झाला अशातली गत. अव ते पोरगं काय रांगोळ्या काढतया, काय सजावट करतया, गोड तर इतकं बोलतुया की प्वार असती तर सुन म्हणुन आणली असती बघा घरला.
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
तर वाड्यातील समन्धी बाया माणसं ह्या रांगणेकरच्या बाईस तीच्या माघारी "रम्भी" म्हणत्यात.
ह्म्म..लहानपणी मी मामाच्या कोल्हापुरी वाड्यात राहायला जायचो तेव्ह्या वाड्याचा मालक त्याच्या मुलीला ऐ जंबे...ऐ जंबे अशी हाक मारायचा...कोल्हापुरी लोकांची हाक मारायची पद्धतच निराळी हाय !! :)
(अट्टल कोल्हापुरी ;) )
मदनबाण.....
I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.
25 Apr 2009 - 10:46 am | अवलिया
छान ! मजा येत आहे वाचायला !!
--अवलिया
25 Apr 2009 - 11:56 am | परिकथेतील राजकुमार
एकतर हायती समन्दी काळी त्यात घरात उजेद बी नाय, कशी धडकत नसतील एकमेकांना देवाक ठाव.
हे जबर्याच =))
मस्त चालु आहे ओळख. पुढचे भाग पटा पटा येउद्या आता.
भाग -१ उघडत का नाहिये ?
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
25 Apr 2009 - 1:00 pm | समिधा
तुमास्नी लिवायला लई झ्याक जमलय बगा..
येउद्यात पुढच भाग बिगी बिगी.
समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)
25 Apr 2009 - 1:15 pm | स्वाती दिनेश
वळखपरेड लय भारी असे प्रमोदकाकांसारखेच म्हणते.
भाग १ दिसत नाही,:(
स्वाती
25 Apr 2009 - 1:22 pm | नंदन
मस्त, खासकरून कोळसा फ्यामिली. पुढच्या भागांची वाट बघतो.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
25 Apr 2009 - 1:26 pm | टारझन
वा !! मस्तंच ... पण थोडंसं हिणवल्यासारखं लिहीलंय का .. कोळसे फॅमिलीला ? कारण बोलण्याचे दोन हेतू असतात ..
असो !! चालायचंच ...
टारझन कोळसे-पाटील
25 Apr 2009 - 1:26 pm | ऋषिकेश
:)
फ्यामिली आवडली
बाकी भाग एक कुठे आहे?
ऋषिकेश
25 Apr 2009 - 6:43 pm | शितल
आता संपादित केले आहे पहिल्या भागाची लिंक ही ओपन होत आहे.
हा भागाच्या वाचकांचे आणि ह्या भागातील वाड्यातील मंडळी आवडली हे कळविणा-यां सर्वांचे आभार. :)
धन्यवाद! :)
25 Apr 2009 - 2:29 pm | दशानन
=))
लै भारी !
थोडेसं नवीन !
25 Apr 2009 - 3:05 pm | बिपिन कार्यकर्ते
मस्त ओळख !!! शितलबाय मस्त लिवतिय!!!
बिपिन कार्यकर्ते
25 Apr 2009 - 6:36 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कोळसा फॅमीली आवडली...पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
-
-दिलीप बिरुटे
25 Apr 2009 - 7:22 pm | मनीषा
असावी , ---- असं वाटतय .
कोळसा आणि कोळसी ---- मस्तच
27 Apr 2009 - 5:47 pm | अनामिक
हा भाग वाचायला उशीर झाला, पण ह्यो भागबी लै झ्याक लिवलाय तै तुमी... पुढला भाग लवकर टाक आता.
-अनामिक