डायरी डायरी

परिकथेतील राजकुमार's picture
परिकथेतील राजकुमार in जनातलं, मनातलं
24 Apr 2009 - 12:19 pm

दुर्मिळ दुर्मिळ पत्रे जमवण्याचा आमचा छंद आपण जाणताच. अशाच घडामोडीत एक डायरी आमच्या हाताला लागली. काही पाने आहेत काहि नाहीत अशा अवस्थेतली ती डायरी मिपाकराची आहे कळाल्यावर आम्ही अत्यानंदीत झालो. त्या डायरीतील काहि नोंदी आपल्यासाठी.

१ जानेवारी :-
च्यायला वर्षाच्या सुरुवातीलाच नाट लागला. आमचा नववर्षाच्या शुभेच्छा हा धागा त्या प्रा. डॉ. बिरुटेंनी उडवला. का तर म्हणे एकाच विषयाचे २/३ धागे कशाला ? शुभेच्छा द्याव्या घ्याव्यात तेव्हड्या कमीच हे ह्यांना कधी कळणार ? आणी #$#@$#@$ आम्ही कायम लोकाच्या धाग्यावरच इतरांना शुभेच्छा देत बसायचे होय ?

१२ जानेवारी :- गणपतीच्या स्वेटरवरुन रणकंदन माजले. मला तर आता बाप्पा हे बघुन गांगुली सारखा स्वेटर काढुन तो हवेत उडवुन सगळ्यांना लाथा घालतो काय असे वाटत होते.

२६ जानेवारी :-
संघ परीवारच्या धाग्यावर कलंत्री आणी गोडसे वाल्यांची तुफान हाणामारी झाली. मी गांधीला शिव्या घातल्या ! नंतर कलंत्रींना व्यनी करुन गांधीं विषयीचे लोकांचे हिणकस विचार वाचुन दुख: झाल्याचे कळवले.

६ फेब्रुवारी
माझी कविता चोरलेली आहे हे त्या परानी दाखवुन दिले. माझी कविता उडली. परा स्वत:ला अती शहाणा समजतो. इथले चित्रपटातले संवाद माझे म्हणुन मुक्तपिठ मध्ये चिकटवतो हे सांगितले मिपावर तर ह्या माणसाला तोंड दाखवायला जागा राहिल का ?

१४ फेब्रुवारी
अदितीला मैत्री करते का विचारले तर वसकन मांजरी सारखी अंगावर आली. दुपारी टार्‍या येउन धमकीवजा खरड टाकुन गेला आहे. अरे हाSSSSड घाबरत नाही म्हणाव.

१९ फेब्रुवारी :-
जय भवानी जय शिवाजी..!

१० मार्च :-
होळीच्या दिवशी रंग खेळतात का रंगपंचमीला ह्यावरुन पुन्हा दंगल उसळली. मराठी चित्रपटातील संवादच दळभद्री हा धागा एकमेकांची तोंडे रंगवण्याच्या नादात भरकटला.

१३ मार्च :-
जय भवानी जय शिवाजी...!

२७ मार्च :-
गुढीपाडवा सण मोठा, नाही आनंदा तोटा.
डुप्लीकेट आय डी ची खव आणी व्यनी चालु झाली. आता भिडा म्हणाव.

२९ मार्च :-
अदितीच्या लेखाची डुप्लीकेट आयडीनी चांगली टिंगल केली.

३० मार्च :- खर्‍या आयडीनी लिहायची लाज वाटते का ? अशी अवलियाची खरड आली आहे. काहि दिवस डुप्लिकेट आयडी बंद ठेवावा लागणार.

१ एप्रील :-
एप्रीलफुल करणारी पाकृ अवलियानी टाकली होती. तिथे 'हा शुद्ध मुर्खपणा आहे अशी' प्रतिक्रीया देउन आलो.

५ एप्रील :-
उचक्रमा वरुन पराचा लेख उडाला. आज मस्त अख्खी क्वार्टर मारली.

७ एप्रील :-
मोगॅंबो खुश हुवा ! टार्‍याचा लेख कधीही उडवला जाईल अशी तात्यानी तंबी दिली. टार्‍याचा चेहरा पाहायला मज्जा आली असती. ऑफिस मधल्या मित्रांसाठी चहा आणी भजी मागवली.

२८ एप्रील :-
अवलियाची कथा चोरीची असल्याचा आरोप झाला. सगळ्यांबरोबर मी पण दोन्ही आयडींनी हात धुवुन घेतला. अजी ऐसा मोका फिर कहा मिलेगा.

३ मे :-
जुन्या पुस्तकात सापडलेली दारुवरची कविता मिपावर टाकली. तात्यानी भरभरुन दाद दिली त्यामुळे अजुनही प्रतिसाद वाढले. धनंजयनी 'हि कविता आधी कुठेतरी वाचल्याचे स्मरते' असे लिहिले आहे.

५ मे :-
धनंजयच्या फाऊंडवर बळचकर प्रतिसाद दिला आहे. धनंजयशी ओळख वाढवली पाहिजे. 'त्या' पुस्तकात अजुनही ५/६ कविता आहेत.

१४ मे :-
मी लिहिलेल्या लेखाचे परानी विडंबन केले. पराच्या बैलाला घो आणी तिकडे प्रतिसाद देणार्‍यांच्या बैलाला पण घो !

१६ मे :- पराच्या लेखावर डुप्लिकेट आयडीनी खरमरीत प्रतिक्रीया दिली आहे. त्याच आयडीनी तात्याला व्यनी करुन हे हिन आणी हिणकस विडंबनाचे प्रकार थांबवा अशी विनंती केली आहे.

२२ मे :-
कार्यकर्तेंच्या धाग्यावार श्रावण मोडकांशी वाद झाला.

२५ मे :-
मोडकांची खरड आली आहे. छोटा डॉनच्या प्रतिसादापेक्षा सुद्धा मोठी आहे. वाचुन मेंदुचे सेल उलटे सुलटे फिरले. अरे जड जड म्हणजे किती जड ? शाट काहि कळाले नाही. झक मारली आणी ह्या माणसाशी वाद घातला.

२८ मे :-
तुमचे ज्ञान बघुन थक्क झालो अशी मोडकांना खरड टाकली आहे. धनंजयला हाय हॅलो ची खरड टाकली आहे.

२९ मे :-
पुस्तकातली अजुन एक कविता मिपावर डकवली आहे. प्राजु आणी जागुचे 'वा छान उत्तम' असे प्रतिसाद आले आहेत.

२ जुन :-
प्राजुच्या कवितेला भरभरुन प्रतिसाद दिला आहे.

१७ जुन :-
कोकण ट्रीप मस्त झाली. मिपावर फोटो आणी कविता डकवली आहे.

२२ जुन :-
ह्याला म्हणतात नशीब ! स्वत: काढलेले फोटो मिपावर डकवले होते तर २ दिवस मिपाच डाउन.

२८ जुन :-
कार्यकर्तेंनी पुस्तकाच्या नावासकट माझ्या चोरलेल्या कविता पकडुन दिल्या. तात्यानी माझ्याच धाग्यावर मला तंबी देउन धागा उडवुन लावला.

१ जुलै :-
इतर चोरलेल्या धाग्यांचे काय असा मुद्दा उपस्थीत करुन डुप्लिकेट आयडीनी मिपावर वाद घातला.

३ जुलै :-
डुप्लिकेट आयडी उडाला. खर्‍या आयडीनी ह्यापुढे फक्त वाचनमात्र.

विनोदमौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

24 Apr 2009 - 12:32 pm | श्रावण मोडक

हहपुवा... अनेक चेहरे डोळ्यांसमोर तरळून गेले. सगळे कसे तुझ्या चेहऱ्यावर मॉर्फ केल्यासारखे!!!
एक डायरी, पन्नास आयडी, दहाएक वास्तविक माणसं असलं काही तरी कॉम्बो दिसतंय.

प्रकाश घाटपांडे's picture

24 Apr 2009 - 12:26 pm | प्रकाश घाटपांडे

काही डायर्‍यांची नोंद फक्त मनात असते . अशांची संख्या भरपुर आहे. त्यांची नोंद आली तर काय?
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

24 Apr 2009 - 12:35 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
पर्‍या, मेल्या किती रे भोचक, आगाऊ, दुष्ट आणि हलकट आहेस तू! कॉकटेलचे फोटो का नाही टाकलेस?

अदिती
स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'प॓च' असावा अस॓ थोडीच आहे?

अनंता's picture

25 Apr 2009 - 11:12 am | अनंता

=))

हा हा हा... आता मी फेमस होणार!!
सुबरु वन, सुबरु टू , सुबरू थ्री....

घाशीराम कोतवाल १.२'s picture

24 Apr 2009 - 12:36 pm | घाशीराम कोतवाल १.२

रोज कोणा कोणावर विडंबनात्मक लिहिणार्या

पराच्या बैलाला घो !!!

हसुन हसुन पुरेवाट झाली बा परा तु धन्य आहेस
**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

अवलिया's picture

24 Apr 2009 - 12:41 pm | अवलिया

हा हा हा
=))
माझे नाव वापरलेस लेका रॉयल्टी दे !!!
बाकी त्या डुप्लिकेट आयडींच्या लेखनाच्या पद्धतीने वरिजीनल लगेच कळत होते बर का !! ;)

--अवलिया

विनायक प्रभू's picture

24 Apr 2009 - 1:08 pm | विनायक प्रभू

पी.उच्च. डी.

शिप्रा's picture

24 Apr 2009 - 1:30 pm | शिप्रा

>>एप्रीलफुल करणारी पाकृ अवलियानी टाकली होती. तिथे 'हा शुद्ध मुर्खपणा आहे अशी' प्रतिक्रीया देउन आलो>>
=)) भारी आहेस ..मस्त लिहिले आहे ..इमॅजिन करुनच हसु येत आहे

ब्रिटिश टिंग्या's picture

24 Apr 2009 - 2:05 pm | ब्रिटिश टिंग्या

लै भारी!

बिपिन कार्यकर्ते's picture

25 Apr 2009 - 4:03 pm | बिपिन कार्यकर्ते

सहमत!!!

पर्‍या, मेल्या, म्हणूनच परवा पुण्यात भेटलो तेव्हा सारखा तुझा हात माझ्या बॅगेकडे जात होता. माझी डायरी ढापायचा विचार होता ना तुझा? ;)

बिपिन कार्यकर्ते

वेताळ's picture

24 Apr 2009 - 2:11 pm | वेताळ

खुसखुशित लिखाण आवडले.
खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ

वेताळ's picture

24 Apr 2009 - 2:12 pm | वेताळ

खुसखुशित लिखाण आवडले.
खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ

मदनबाण's picture

24 Apr 2009 - 2:15 pm | मदनबाण

अशाच घडामोडीत एक डायरी आमच्या हाताला लागली.
दिसली डायरी...वाचली पानं... अन् लिवलं इथं. काय ? ;)

मदनबाण.....

I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.

बाकरवडी's picture

24 Apr 2009 - 4:53 pm | बाकरवडी

जबराट ! =)) =)) =))

:B :B :B बाकरवडी :B :B :B

नितिन थत्ते's picture

24 Apr 2009 - 5:06 pm | नितिन थत्ते

हा इतिहासाचार्य प रा(जवाडे) जुनी दप्तरं वाचण्यात पटाईत दिसतो. ह्याला मिळतात कशी?
स्वगत्: या नानाला लिहिण्याच्या पद्धतीवरून वरीजिनल कळते काय? सावध रहायला पायजेलाय.
खराटा
(रंग माझा वेगळा)

क्रान्ति's picture

25 Apr 2009 - 8:40 am | क्रान्ति

=)) =)) =))
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com

टारझन's picture

25 Apr 2009 - 9:50 am | टारझन

परा भौ ... आपल्याला वाकडा सलाम ___/\___
चालू देत ... च्यायला मी कधी कोणत्या आयडी ला धमक्या दिल्या बे ? आणि आता एप्रिल मे चालू आहे .. तुला काय भविष्यातली पानं पण मिळाली का काय ?

घाटावरचे भट's picture

25 Apr 2009 - 9:59 am | घाटावरचे भट

आयला भारीए!!!

ढ's picture

25 Apr 2009 - 11:28 am |

मस्तच लिहिलंय आपण परा.
खमंग आणि चटकदार !!!

विसोबा खेचर's picture

25 Apr 2009 - 11:30 am | विसोबा खेचर

जय भवानी जय शिवाजी जय तात्याजी.

'जय भवानी जय शिवाज' इतपत ठीक आहे. परंतु त्यालाच जोडून आलेले 'जय तात्याजी' हे शब्द संपादित केले आहेत. अगदी मस्करीत किंवा 'ह घ्या' सदरातदेखील शिवाजी या नावाशेजारी कुणा ऐर्‍यागैर्‍याचे नाव येता कामा नये. सर्व सभासदांनी शिवाजी या नावाचे पावित्र्य राखावे ही विनंती!

बाकी, डायरीची पाने जबराच! वाचून मस्त मजा वाटली!:)

और भी आने दो..! :)

तात्या.

परिकथेतील राजकुमार's picture

25 Apr 2009 - 11:38 am | परिकथेतील राजकुमार

अरेच्या !
अहो तात्या त्या दोन तारखा तुम्ही निट बघितल्यात तर तुमच्या लक्षात येइल की त्या दोन्ही दिवशी शिवजयंती साजरी केली जाते. एक तिथीनुसार आणी एक सरकारी.

त्या घोषणेत फक्त शिवबांचा उदो उदो आणी त्या दिवशी तुमची कवितेवर प्रतिक्रीया आली म्हणुन डायरी लेखकानी खुश होउन जय तात्याजी असे पण जोडले आहे , येव्हडेच दाखवायचा माझा उद्देश होता.

स्वगत : डायरीच्या पुढच्या पानात ह्या घटनेचा उल्लेख करुन ह्या तात्यांचा निशेध नोंदवला पाहिजे. ;)

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

नाटक्या's picture

25 Apr 2009 - 3:20 pm | नाटक्या

हे आधी कुठेतरी वाचल्याचे स्मरते.

अरे हो!! आठवले...

ही डायरी वाचून मला पुलंच्या बटाट्याची चाळ या पुस्तकातील "काही वासर्‍या" या लेखाची आठवण आली. छान लिहीले आहेत परा.

(तात्या, आणखी एक चोरी.. पकडा त्या *** पराला)

- नाटक्या
(अर्थ म्हणतो दारू-दारू, नाटक्या म्हणतो कॉकटेल-कॉकटेल)

शितल's picture

25 Apr 2009 - 7:02 pm | शितल

प-या,
सध्या तुझ्या सायबर कॅफेवर सुंदर पोरी यायच्या बंद झाल्या आहेत की काय.:?
किती ही तुझी कुशाग्र बुध्दीमत्ता.:)

शलाका's picture

25 Apr 2009 - 10:35 pm | शलाका

संदर्भ कळले नाहीत पण डायरी वाचायला मजेशीर वाटली.

शलाका

अवांतर: १३ मार्चच्या नोंदीवर अजुनही जय तात्या असा उल्लेख तसाच आहे

ऋषिकेश's picture

27 Apr 2009 - 11:35 am | ऋषिकेश

संदर्भ कळले नाहीत पण डायरी वाचायला मजेशीर वाटली

+१

ऋषिकेश

प्राजु's picture

25 Apr 2009 - 10:37 pm | प्राजु

भलताच अभ्यासू हो तू!
मस्तच!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

मुक्तसुनीत's picture

26 Apr 2009 - 8:55 am | मुक्तसुनीत

"परिकथेतिल राजकुमारची " वासरी वाचून "भाव दाटले मनि अनामिक !" ;-)

लय भारी पराभौ. यातले चिमटे नि गुदगुल्या कुणाकुणाला आहेत ते मला बिलकुल कळलेले नाही/कळले तरी असले पालथे धंदे करणार्‍यांचे आय्डी पाहिल्याक्षणी विसरलो होतो. पण या असल्या आयडींना मारलेल्या टपल्या (आणि त्यांच्या डुप्लिकेट , उडवलेल्या आयडींच्या मृतात्म्याना वाहिलेले तीळ नि पिंड !) जबर्‍या !

परिकथेतील राजकुमार's picture

27 Apr 2009 - 10:28 am | परिकथेतील राजकुमार

प्रतिसाद देणार्‍या व न देणार्‍या सर्वांचे आभार ___/\___

आभारी
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

आंबोळी's picture

27 Apr 2009 - 2:37 pm | आंबोळी

परा....
आरे कित्ती हुशार, कित्ती अभ्यासू आहेस तू.... मला तर भारीच कौतूक वाटते बघ तुझे. पोपच्या हाता खालचा अधीकारी व्हायचीच योग्यता आहे बघ तुझी.

स्वगतः आयाला खेचायला काय लिमीट ठेवतो का नाही हा गडी. याच्याशी दोस्ती वाढवली पाहीजे.... कधी धोतराला हात घालेल नेम नाही.

प्रो.आंबोळी

लईच्च भारी, सगळे संदर्भ न समजताही वाचायला अंमळ मजा आली! :D
(खुद के साथ बातां : रंग्या, पराला 'खववाचस्पती' अशी पदवी द्यावी का रे? :? :>)

चतुरंग

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Apr 2009 - 6:06 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डायरी वाचून हहपुवा झाली ! :)

पाषाणभेद's picture

27 Apr 2009 - 6:35 pm | पाषाणभेद

मधल्या तारखांना काय काय केले ते ही लिहीले तर वाचालया बरे होईल.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)

टिउ's picture

27 Apr 2009 - 8:01 pm | टिउ

बरेच संदर्भ कळाले नाही पण वाचायला मजा आली...परा जोरात आहे एकदम!

बाकी पानं मिळाली तर बघा! ;-)

अभिज्ञ's picture

27 Apr 2009 - 9:46 pm | अभिज्ञ

जबरि घेतलि आहेस.

अभिज्ञ.

--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.