अहिल्येश्वर मंदिर

केदार भिडे's picture
केदार भिडे in जनातलं, मनातलं
10 Jan 2022 - 2:29 pm

डिसेम्बर २०२१ मध्ये बहिणीसोबत मध्य प्रदेशचा दौरा झाला. इंदोर, ओंकारेश्वर, महेश्वर, मांडू या ठिकाणांना भेट दिली. त्याचा वृत्तांत लिहायचा आहे. तत्पूर्वी हा एक छोटा लेख.

नर्मदेच्या उत्तर तीरावर वसलेले एक छोटे शहर म्हणजे महेश्वर. तिथे विणल्या जाणाऱ्या साड्यांसाठी ते प्रसिद्ध आहे. तसेच नर्मदेवर अतिशय सुंदर घाट तिथे आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी इंदोर संस्थानची राजधानी १७७२ मध्ये महेश्वर येथे हलवली. त्यांच्याच कारकिर्दीत महेश्वर येथे राजवाडा, मंदिरे, नदीवर प्रशस्त घाट बांधले. मराठी इतिहासातील या कर्तृत्ववान राज्यकर्तीने आपला देह ठेवला तोही याच ठिकाणी. अहिल्या फोर्ट या नावाने परिचित असलेल्या किल्ल्यातील अहिल्येश्वर मंदिर आणि त्या समोरील होळकर घराण्यातील छत्री यांच्यावरील कलाकुसर सुंदर आहे. अहिल्येश्वर मंदिराच्या कळसावर दिसणारे स्वयं-साधर्म्य (self-similarity) हा या लेखाचा विषय आहे.
महेश्वर येथे एका सकाळी चहा पीत असताना आम्हाला हा सुंदर प्रकार दिसला.
चित्र १ मध्ये अहिल्येश्वर मंदिर आणि त्याचा कळस यांचे छायाचित्र दिसते आहे. चित्र दिसत नसतील तर अगदी शेवटी Google Docs ची लिंक आहे त्यावर जाऊन पाहावे.
a
https://lh3.googleusercontent.com/pw/AM-JKLXkFXTAF_vw9EJ3ma4ANBAkcryqfl2...

चित्र २ मध्ये वर्तुळ करून दाखवलेले मानवी चेहरे (अगदी वर) आणि कुणी चतुष्पाद प्राणी आणि त्याच्या खाली असणारी खिडकी हे पाहावेत. कळसाच्या चारही बाजूना असे मानवी चेहरे आणि प्राणी आहेत हे चित्रावरून लक्षात येईल. त्यानंतर चित्र २ मध्ये तुटक वर्तुळाने दाखवलेले छोटे कळस पाहावेत. मध्यभागी असलेल्या मोठ्या कळसाच्या चारही कोपऱ्यांवर प्रत्येकी एक असे चार छोटे कळस आहेत. या छोट्या कळसांचे वैशिष्ट्य हे की ते मोठ्या मध्यभागी असलेल्या कळसाचीच प्रतिकृती आहेत.
b
https://lh3.googleusercontent.com/pw/AM-JKLWQeE0ltjkvWFetmo4PiGQxTLfScp7...

चित्र ३ मध्ये छोट्या कळसांवरील मानवी चेहरे, प्राणी आणि खिडक्या हे तुटक वर्तुळांनी दाखवले आहेत. तसेच मोठ्या कळसाचा भाग असलेला प्राणी आणि त्याच्या खाली असलेली खिडकी हे ही मध्ये वर्तुळ करून दाखवले आहेत. अशा प्रकारे मुख्य कळसाभोवती त्याच्याच प्रतिकृती उभारून स्वयं-साधर्म्य साधले आहे.
3

https://lh3.googleusercontent.com/n_FN7R9xijUjRmIX4BenbDfsDk46WQeuf78EBp...

https://docs.google.com/document/d/11GWgZX_jkAh5Wledlem2o6sRObDWYK4KweqL...

कलालेख

प्रतिक्रिया

केदार भिडे's picture

10 Jan 2022 - 2:37 pm | केदार भिडे

यावेळी Google photos चा वापर करूनही चित्र दिसत नाहीत. पुन्हा काहीतरी चुकले. लेखाच्या शेवटी असलेली Google Docs ची लिंक पाहावी.

टर्मीनेटर's picture

10 Jan 2022 - 2:46 pm | टर्मीनेटर

Google Docs ची लिंक पाहावी.

ती पाहिली. मंदिराचा फोटो छान दिसतोय त्यात, पण वर्तुळातल्या गोष्टी स्पष्ट दिसत नसल्याने त्यातले सौन्दर्य अनुभवता आले नाही! ते फोटो झूम करून काढायला हवे होते असे वाटले.

केदार भिडे's picture

10 Jan 2022 - 6:23 pm | केदार भिडे

आमच्या कॅमेराची मर्यादा कारण आमच्याकडे केवळ फोन होता. तरीही एकदा संगणकावर Google docs उघडून पहा. फोनवर दिसत नाहीये नीट.

तिसर्‍या फोटोला पब्लिक अ‍ॅक्सेस दिला नाही का?
दिला की सांगा किंवा परत लिंक द्या
मिपावर फोटो चिकटवण्याची पाकृ बघण्या करता इथे क्लिक करा
पैजारबुवा,

केदार भिडे's picture

10 Jan 2022 - 6:27 pm | केदार भिडे

मी insert image न करता केवळ लिंक जिथे पाहिले तिथे टाकली, ही चूक झाली असणार.
तसेच सर्व अल्बम शेअर्ड आहे. तसेच फोटो लिंकवर क्लिक केल्यावर उघडतायत. केवळ पेजवर लोड होत नाहीत.

तरीपण ही तिसऱ्या फोटोची लिंक परत देतोय.

https://lh3.googleusercontent.com/pw/AM-JKLWbuL_p8lcmTy1TeL5NS6I3aMasZeF...

चांदणे संदीप's picture

10 Jan 2022 - 6:34 pm | चांदणे संदीप

मी पण नोव्हेंबर २०२१ मध्ये महेश्वरला भेट देऊन आलो. अप्रतिम असे ठिकाण आहे.
तुम्ही कॅमेर्‍यात टिपलेले स्वयं-साधर्म्य मी आणि माझ्या मित्रांनी जवळून निरखून पाहिले. मजा आली.

सं - दी - प

चौथा कोनाडा's picture

11 Jan 2022 - 5:20 pm | चौथा कोनाडा

खुपच सुंदर !

कंजूस's picture

11 Jan 2022 - 5:46 pm | कंजूस

अशी शांतपणे निरीक्षण करत भ्रमंती करायला हवी.

जागेचे नाव माहेश्वर आहे. महेश्वर म्हणजे महा इश्वर.

केदार भिडे's picture

12 Jan 2022 - 11:46 am | केदार भिडे

मराठी विश्वकोश किंवा
https://vishwakosh.marathi.gov.in/20241/
खरगोन जिल्ह्याची हिंदीतली वेबसाईट
https://khargone.nic.in/

या दोन्ही ठिकाणी 'महेश्वर' (काना विरहीत) असेच लिहिले आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Jan 2022 - 1:53 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर्व फोटो दिसत आहेत. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या मंदिर रचना जवळ जवळ सारख्याच वाटतात.

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

12 Jan 2022 - 2:18 pm | प्रचेतस

छान लिहिलंय.
ही नागर शैलीतली मंदिरं आहेत. कळसावरील प्राण्यांची शैली ही गॉथिक शैलीतल्या गॉरगोयल्सवरुन प्रेरित आहे.

कंजूस's picture

12 Jan 2022 - 4:16 pm | कंजूस

हे कैलाश पर्वताचे शिखरांचे प्रतिक आहेत. तसेच ते इतर देवालयांनाही वापरले आहेत.

कॅलक्यूलेटर's picture

12 Jan 2022 - 6:04 pm | कॅलक्यूलेटर

लेख मालेच्या प्रतीक्षेत.