शरदोत्सव !

Bhakti's picture
Bhakti in जनातलं, मनातलं
25 Dec 2021 - 12:18 pm

१. वसंतोत्सव
२.ग्रीष्मोत्सव
३.वर्षा

परतीचा पाऊस आपली पावले जोरदार आपटत निघाला असतो.बरेचदा समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्याने वादळ धडकून नासधूस होत राहते. पावसाने पूर्ण रजा घेतल्यावर आल्हाददायी थंड हवा वाहू लागते.चिखल नाहीसा होऊन जमिनी पायी फिरण्यासाठी योग्य आहेत.नितळ शांतता रमू लागते.शेवंती,झेंडूच्या फुलांनी मोहक चादर सृष्टीला नेसविली असते.नवरात्रीच्या उत्सवात या फुलांनी आणि इतर फुलांनी एक उर्जेची उपासना अधोरेखित होत राहते.

त्यांनतर कोवळ्या थंडीने सजलेल्या दीपावलीच्या सुवासिक पहाट! वर्षातील सर्वात निवांत दिवसांची ,माणिकताईंची गाणी,दिवाळी पहाट संगीत कार्यक्रमाचे सुख सारी सारी रेलचेल शरदातीलच . काही फुलं प्रकर्षाने मोहित करत राहतात.कांचन –आपट्याची सुंदर गुलाबी फुलं! तलावातील कमळांची मुक्त बहरण.पितृपाठात अनेक भाज्यांची आवाक अधिक दिसते.

ऑक्टोबर उष्णतेचे दहा –वीस दिवस संपले की पानगळीचा हंगाम लाल पिकलेल्या पानांच्या उन्मळून जमिनीवर पडलेला खच नजरेस दिसतो.माझ्या परदेशातील मैत्रिणीने ऑटम AUTUMN च कौतुक करत मस्त फोटो टाकले होते,तिला गमतीने म्हटलं इकडे ये आणि उंबराची गळलेली पान एक तास झाडून घे मग कळेल खरा ऑटम  असा हा इकडे थकलेला ऋतू भासतो.झाडांच्या काड्या न काड्या पसरून ओक बोक रूप त्यांना शोभत नाही.विरक्त झाडाने पायथ्याशीच आपलं जून रूप त्यागलेले !!

पहाटे धुक्याची चादर अलवार पांघरून सृष्टी गुलाबी झालेली आणि थोड्याच वेळात तिची दवांची मोती माळ पानांवर अलगद उतरते.निळे आकाश आणि पिंजलेले पांढरसे नभ पाहतच राहाव वाटत. ज्वारीची पिक पूर्ण तयार होत ताठ डोलत गोजिरवाणी दिसतात.कुरणांवर चरणाऱ्या गाई तृप्त दिसत आहेत. दिवस मावळतीचे रंग जरा लवकरच ओढून शरद रात्रीना मुक्त उधळण बहाल करतो.ढगांना अजिबात या पटलावर फिरण्यास परवानगी नसते. काळ्या रंगांच्या वस्त्रांवर शुभ्र चांदण खडी ,सौंदर्यात रात राणी मुक्त हसत हसते .कोजागिरीला तिच्या भाळीची गोल चंद्र बिंदी आणि त्याची प्रभावळ सोबत केशर दुधाचे पेले ,गप्पा गाण्यांची मैफिल अजून काय पाहिजे.शांता शेळके यांच “शारद सुंदर”हे गीत ही सगळी हुरहूर ,गुलाबी हवा मादक वातावरण निर्मिती करते.

काही शरद ऋतु वर्णन:

अपाम् उद्वृत्तानां निजम् उपदिशन्त्या स्थितिपदं
दधत्या शालीनाम् अवनतिम् उदारे सति फले।
मयूरानाम् उग्रं विषम् इव हरन्त्या मदम् अहो
कृतः कृत्स्नस्यायं विनय इव लोकस्य शरदा ||

(३.८ मुद्राराक्षस ,विशाखदत्ता)
पाण्याच्या फुगलेल्या प्रवाहाला पुन्हा कक्षेत बांधणारा,भाताच्या पिकांना सहज वाकवणारा,मोराची असीम इच्छा नष्ट करणारा पहा हा शरद ऋतू अजस्त्र गोष्टी शांत करतोय .
या वर्णनातच शरदाला शांत असा शारदेचा वरदहस्त असणारा दाखविला आहे.

अभिव्ऱ्ष्टा महामेघैर्निर्मलाश्चित्रसानवः।
अनुलिप्ता इव आभान्ति गिरयश्चन्द्ररश्मिभिः॥

(वाल्मिकी रामायण)
शरद ऋतूमध्ये पर्वतांची शिखरे मेघांनी मुक्त होत ,चंद्राच्या प्रखर किरणांनी न्हाहून गेली आहेत .
या वर्णनात शारदीय चंद्र रात्रीचे सौंदर्य अधोरेखित होते.
तसेच शरदातील अनेक नद्यांना नव वधुंचे रूपक दिले गेले आहे ,ज्या लाजत मुरडत शांत वाहत आहेत.

़काही पुष्पवैभव-
१.आपटा(कान्चन )
१
२.अफ्रिकन सॉसेज
१
३.पान्ढरी अपराजिता.
3
सन्दर्भ :
https://venetiaansell.wordpress.com/2010/09/25/sharad/
https://sreenivasaraos.com/2012/09/20/sharad-ritu-season-of-tender-beaut...

जीवनमानआस्वाद

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

25 Dec 2021 - 12:29 pm | कुमार१

सुंदर च !

सरिता बांदेकर's picture

25 Dec 2021 - 2:13 pm | सरिता बांदेकर

व्वा काय मस्त शब्दसंपदा वापरलीय. मस्तच.
हॅट्स ॲाफ टू यू.

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

25 Dec 2021 - 2:36 pm | ॲबसेंट माइंडेड ...

सुंदर.

Bhakti's picture

25 Dec 2021 - 9:29 pm | Bhakti

सर्वांचे धन्यवाद!
शरद ऋतूत पावसाळा, उन्हाळा,हिवाळा यांचा संगम दिसतो.यं दिवस यंदा तर दोन दिवस जबरदस्त वातावरण होत , प्रत्येकाच्या दारात महाबळेश्वर अवतरला होता.

चौथा कोनाडा's picture

26 Dec 2021 - 8:54 pm | चौथा कोनाडा

वाह, क्या बात हय, सुंदरच !!

ज्ञानोबाचे पैजार's picture

27 Dec 2021 - 9:05 am | ज्ञानोबाचे पैजार

फारच झकास लिहिले आहे,

आवडले

पैजारबुवा,

जेम्स वांड's picture

27 Dec 2021 - 10:14 am | जेम्स वांड

निव्वळ अप्रतिम प्रकटन आहे, ललित लेखनात पण तरल भाव आणणे फार कमी लोकांना जमते, त्यापैकी एक आपण. तुमचे लिखाण मिपाची शान वाढवते म्हणलं तर कोणी चूक म्हणणार नाही.

पुढील लेखनास शुभेच्छा....

ही केवळ पाकळी आहे,ते संदर्भ पूर्ण फुलं आहेत.
😃

प्रचेतस's picture

27 Dec 2021 - 12:32 pm | प्रचेतस

रामायणात तर शरद ऋतुचे वर्णन आहेच, मात्र हरिवंशात देखील ते आले आहे.

आतापर्यंतच्या थोड्याफार वाचनाने(जालावरच्याच) रामायण,ऋतूसंहार हे दोन ग्रंथ समजले होते.हरिवंश पाहते.

मित्रहो's picture

27 Dec 2021 - 1:09 pm | मित्रहो

छान लेख

श्वेता व्यास's picture

27 Dec 2021 - 5:39 pm | श्वेता व्यास

सुंदर

सर्वांना खुप खुप धन्यवाद!

सुरसंगम's picture

27 Dec 2021 - 7:01 pm | सुरसंगम

मस्त मुक्तक आवडले.

कंजूस's picture

27 Dec 2021 - 7:32 pm | कंजूस

सुंदर.

गोरगावलेकर's picture

27 Dec 2021 - 7:42 pm | गोरगावलेकर

आवडले

टर्मीनेटर's picture

27 Dec 2021 - 11:27 pm | टर्मीनेटर

लेखन आवडले 👍

सर्वांना खुप खुप धन्यवाद
:)

मदनबाण's picture

3 Jan 2022 - 10:27 pm | मदनबाण

छान लिहलं आहे.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Pucho Na Yaar Kya Hua... :- Zamaane Ko Dikhana Hai

Bhakti's picture

4 Jan 2022 - 9:55 am | Bhakti

धन्यवाद :)

नागनिका's picture

4 Jan 2022 - 6:05 pm | नागनिका

अपराजिता आणि गोकर्ण वेगळे का?

Bhakti's picture

4 Jan 2022 - 6:35 pm | Bhakti

एकच

Bhakti's picture

4 Jan 2022 - 6:37 pm | Bhakti

धन्यवाद:)

मुक्त विहारि's picture

4 Jan 2022 - 6:25 pm | मुक्त विहारि

आवडले

Bhakti's picture

4 Jan 2022 - 6:36 pm | Bhakti

धन्यवाद :)