उपाय सुचवा

परिकथेतील राजकुमार's picture
परिकथेतील राजकुमार in जनातलं, मनातलं
22 Apr 2009 - 1:04 pm

आमच्या आग्रहाखातार मिपावासी झालेल्या आमच्या मित्राला आपण आता चांगलेच ओळखायला लागला आहात. काल आमचे हे मित्रवर्य पुन्हा एकदा त्यांचे दुर्मुखलेले थोबाड घेउन आमच्याकडे हजर झाले.

आम्ही :- काय रे नरसाळ्या असा मसणऊद्यागत चेहरा करायला काय झाले ?

मित्र :- वेडे वाकडे उडले राव मिपा वाले :(

आम्ही :- का ? कसे काय ?

मित्र :- एक तेजोभंगावर लेख काय लिहायला घेतला सगळ्यांनी पार टिकास्त्र सोडुन सोडुन तेजोभंग करुन टाकला माझा.
बास आता ठरले... ह्या मिपाकर कंपुबाजांना त्राहि भगवन करुन सोडायचे ! उपाय सांग चल... रात्री बसायचे का ?

रात्री बसायला मिळतय हे समजल्याबरोब्बर आमचा सैतानी मेंदु काम करायला लागला.

आम्ही :- तु काय ठरवले आहेस ?

मित्र :- आता असे लिहायचे की ह्या मिपावरचे कमीत कमी २५% सभासद पळुन गेले पाहिजेत. बस ! बदला बदला आणी बदला.
कौल, कथा, कविता जे काय मिळेल त्यातुन ह्या मिपाचे स्टॅंडर्ड कमी करणार मी. माझे लेख वाचत नाहीत काय, आता दिवसाला ४/४ लेख मीच लिहितो.. मग काय कराल ?

आम्ही :- ह्म्म्म्म्म्म्म काहि योजना आखली आहेस का ?

मित्र :- सगळ्यात आधी एक कौल टाकणार आहे, 'मुलाचे मुलाकडे आणी मुलीचे मुलीकडे असलेले लैंगीक आकर्षण.'

आम्ही :- असल्या कौलाला प्रतिक्रीयांचे आवर्षण पडणार !

मित्र :- अरे हाSSSSड ! हव्यात कोणाला प्रतिक्रीया ? आता उरलो फक्त टूकार लेखना करता.

आम्ही :- ह्म्म्म्म्म्म्म

मित्र :- त्यानंतर अजुन एक कौल मतदानावर ! 'दारु पिउन मतदानाला जावे की नको ? पिल्यास कोणती प्यावी आणी कुठुन मिळवावी?'

आम्ही :- भले शाब्बास.

मित्र :- त्यानंतर एक कथा माझ्या मित्राची आणी त्याच्या प्रेयसीच्या बहिणीच्या पंटरच्या भावाची. 'सोळाव वरीस धोक्याच'

आम्ही :- 'पित कथा' लिहायचा विचार दिसतोय ...

मित्र :- ते सुरुवात करीन तेंव्हा ठरवीन. आणी उगाच कायद्याचे भय दाखवु नकोस. धागा उडवला तर उडवला... मी पण फाट्यावर मारायला शिकलोय आता !

आम्ही :- तु 'मै बदला लुंगा' अशा शिर्षकाची कथा का नाही टाकत ?

मित्र :- लोक त्यात पण कॉकटेलचा फोटु मागतील. हलकट दुष्ट कंपुबाज !

आम्ही :- अरे अरे शांत हो ! येव्हडा का उद्विग्न होत आहेस ?

मित्र :- काय करु ? काय करु सांग ना .... आजकाल माझा धागा लोक एकमेकांची टिंगल करायला वापरतात. खव मध्ये करायची चर्चा माझ्या धाग्यावर करतात. यतेच्छ टिंगल करुन झाली की माझा धागा उडवतात आणी म्हणतात कायद्याचे भय आहे...

खरच काय सल्ला द्यावा बरे ह्याला ? काही सुचतय का तुम्हाला ?

विनोदमौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

घाशीराम कोतवाल १.२'s picture

22 Apr 2009 - 1:27 pm | घाशीराम कोतवाल १.२

तुमचा मित्र भयानक आहे हो
आताच मिपाचा एव्हडा व्देषपुर्ण पाठलाग का करित आहे तो ?
काहिच कळत नाहि बुवा समजावा त्याला आपण सुज्ञ आहात मालक =)) ;) .
**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

अनंता's picture

22 Apr 2009 - 4:49 pm | अनंता

मला वाटते, हा प्रश्न केवळ आणि केवळ तात्यांच्या अखत्यारितला आहे.
माझ्या माहितीप्रमाणे मिपाचे मालक तात्या अभ्यंकरच आहेत.

अवलिया's picture

22 Apr 2009 - 1:33 pm | अवलिया

परासेठ, बाकीचे जावु द्या !
तुमच्या या धाग्याला कायद्यापासुन संभाळा म्हणजे झाले !
भलतेच शेफारला आहात तुम्ही आजकाल!
असो ! बसु आज सांजच्याला त्याला घेवुन, थोडे तुम्हालाही समजवायचे आहेच !!

--अवलिया

निखिल देशपांडे's picture

22 Apr 2009 - 1:31 pm | निखिल देशपांडे

आपण त्याला आजच रात्री घेउन बसावे.....
त्याला आधी "अम्लेत कसी ब्न्वायचे???" हा नवीन धागा काढण्यास सुचवावे!!!!!

==निखिल
आमचा सध्याचा संशोधनाचा विषय :- मुंबईतिल रिक्षांचे मिटर

विनायक प्रभू's picture

22 Apr 2009 - 1:34 pm | विनायक प्रभू

एकच.
पाय लावुन पळावे.

अवलिया's picture

22 Apr 2009 - 1:36 pm | अवलिया

कुठे ? :?

--अवलिया

विनायक प्रभू's picture

22 Apr 2009 - 1:37 pm | विनायक प्रभू

तीथे.

परिकथेतील राजकुमार's picture

22 Apr 2009 - 1:57 pm | परिकथेतील राजकुमार

कोणाच्या ?

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

सूहास's picture

22 Apr 2009 - 2:55 pm | सूहास (not verified)

सुहास
सध्या " सखाराम गटणे" कोठे दिसत नाहीत.

मराठमोळा's picture

22 Apr 2009 - 3:14 pm | मराठमोळा

उपाय मागणार्‍याने आणी ज्याच्याकडे मागितला आहे त्या दोघांनी सुटी घेऊन काही दिवस पंढरपुरला किंवा पिकनिकला जावे व अंतर्जालापासुन काही दिवर दुर रहावे..

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

परिकथेतील राजकुमार's picture

22 Apr 2009 - 3:17 pm | परिकथेतील राजकुमार

ह्म्म्म्म पंढरपुर ....
तुम्हाला पंढरपुरच बरे सुचले हो ?
आता आमचे हितचिंतक छोटा डॉन यांनी पंढरपुरचे मध्ये जे वर्णन केले होते ते आम्हास खरे वाटु लागले आहे.

चोळामोळा
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

भडकमकर मास्तर's picture

22 Apr 2009 - 3:39 pm | भडकमकर मास्तर

लोक त्यात पण कॉकटेलचा फोटु मागतील. हलकट दुष्ट कंपुबाज !

हाहाहाहा
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

पिवळा डांबिस's picture

23 Apr 2009 - 10:36 am | पिवळा डांबिस

त्या नाटक्याने आणि पिडांने चार फोटो काय टाकले आता भक्तिमार्गावरच्या धाग्यालाही लोकं पहिले कॉकटेलचा फोटो दाखवा म्हणतात!!!!
:)
आणि भडक मकर मास्तरांसारखे लोकं त्या फोटोतही शेरलॉक होम्सगिरी करतात!!!!
:)

शितल's picture

22 Apr 2009 - 5:07 pm | शितल

प-या,
त्या मित्राच्या मदतीला जास्त धावु नको नाही तर तु़ला ही त्याच्या सोबतीला तो जाईल तेथे जावे लागेल..;) (ह्.घे.)

प्राजु's picture

22 Apr 2009 - 6:27 pm | प्राजु

जरा आवर लेखणी..
नाहीतर कायदा तुझ्यावरही लागू होईल... ;)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

Suhas Narane's picture

22 Apr 2009 - 6:48 pm | Suhas Narane

लेक काही सम्जला नाही,.

यन्ना _रास्कला's picture

23 Apr 2009 - 5:11 am | यन्ना _रास्कला

नायतर फट् म्हनता बरमहत्या

*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यानी पहिला पोलीसी सवाल
केला, डायवर कोन हाय !