सुचना
प्रिय मिसळपाव सदस्य,
आपल्या मिसळपाववरील योगदानाची आम्ही नोंद घेतली आहे. मात्र, अलीकडील काही पोस्ट्स/प्रतिक्रियांमध्ये व्यक्तिगत टीका, शिवीगाळ, विशिष्ट राजकीय अजेंडा, घसरलेला भाषेचा स्तर, असे सातत्याने दिसून येत आहे. मिसळपाव हे मुक्त अभिव्यक्तीसाठीचे व्यासपीठ असले तरी, येथे काही मूलभूत नियम व सभ्यतेची अपेक्षा राखली जाते.
आपल्या लक्षात आणून देतो की:
1. कोणत्याही व्यक्तीवर (मिसळपाववरील सदस्य, राजकीय नेते इत्यादी) व्यक्तिगत स्वरूपाची टीका सहन केली जाणार नाही.
2. राजकीय अजेंडा रेटणे, पक्षनिष्ठा पसरवणे किंवा इतर सदस्यांना चिथावणी देणारी विधानं करणे हे संस्थळाच्या धोरणात बसत नाही.
आपल्याला विनंती आहे की आपण आपल्या प्रतिसादांची शैली पुन्हा एकदा तपासून पाहावी व संस्थळाच्या मर्यादेत राहून सहभाग घ्यावा. भविष्यात याच प्रकारची कृती आढळल्यास, आपले सदस्यत्व तात्पुरते वा कायमचे निलंबित केले जाऊ शकते.
आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे.
– मिसळपाव व्यवस्थापन टीम
प्रतिक्रिया
12 Sep 2021 - 10:38 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
(आपल्या धाग्यावर यायचे योग येतील असे वाटले नव्हते, श्रीगणेशा आपल्याकडून कधी कधी काहीही करुन घेतो) :)
-दिलीप बिरुटे
12 Sep 2021 - 11:23 am | Bhakti
छान बाप्पाने सुन्दर कल्पकता दिली आहे.
12 Sep 2021 - 4:11 pm | तुषार काळभोर
मस्त सजावट प्रा डॉ साहेब..
12 Sep 2021 - 10:18 pm | सुक्या
मस्त सजावट !! झोपाळ्यावरचा बाप्पा छान आहे ... मागची दगडी भिंतही छान आहे ...
12 Sep 2021 - 2:03 pm | सरिता बांदेकर
छान आरास.
शेअर केल्याबद्दल धन्यवाद.
12 Sep 2021 - 2:24 pm | Rajesh188
सुक्या आणि dr छान सजावट केली आहे.अप्रतिम फोटो दोघांचे पण.
12 Sep 2021 - 5:33 pm | चौथा कोनाडा
हेच म्हणतो !
+१
सुक्या यांची सजावट कलरफुल्ल आणि नक्षीदार
आणि प्राडॉ यांची कल्पक आणि सुंदर !
12 Sep 2021 - 6:08 pm | सुरिया
सुक्यारावांची सजावट कलरफुल्ल आणि छान आहे पण........
सजावटीसाठी वापरायच्या थर्मोकोलवर बंदी आहे ना?
पहिल्या अटेम्प्टला ५००० रु. दुसर्याला १०००० तर तिसर्याला २५००० आणि तीन महिने तुरुंग्वास आहे.
.
दिलिप बिरुटे यांचा पारावरच्या झाडाच्या फांदीला टांगलेला झुला सुंदर. थोडा ग्राउंड क्लीअरन्स हवा होता झोपाळ्याला असे वाटते. ;)
12 Sep 2021 - 7:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नोटेड....! =))
-दिलीप बिरुटे
12 Sep 2021 - 10:21 pm | सुक्या
थर्मोकोलवर बहुतेक भारतात बंदी आहे. ईकडे ही सजावट दुकानात मिळत होती तेव्हा विकत घेतली होती तीच सजावट दर वर्षी वापरतो.
15 Sep 2021 - 8:09 pm | श्रीनिवास टिळक
गेले काही दिवस वेगवेगळ्या मालिकांवर पण गणरायाचे दर्शन होत आहे आणि त्याची आरती पण ऐकू येत आहे. त्याबरोबरच गणरायाची मूर्ती "eco-friendly"असावी असाही योग्य प्रचार होत आहे. हि चांगलीच गोष्ट आहे. पण eco-friendly हे मूर्तीचे विशेषण खटकते. त्याला पर्यायी मराठी शब्द काय असू शकेल? नैसर्गिक किंवा पर्यावरण मित्र/मैत्र का पर्यावरण पूरक?
15 Sep 2021 - 10:16 pm | सुक्या
पर्यावरण पूरक हा जास्त जवळचा वाटतो. मातीची मुर्ती असावी हा नियम आता बरेच लोक पाळताना दिसत आहेत हे नक्कीच स्वागतार्ह पाउल आहे. अजुन पुढे जात घरच्या घरी विसर्जन हा ही एक नवा पायंडा पडतो आहे. त्यामुळे गणेशोत्सव अजुन पर्यावरण पूरक होईल हे नक्की.
प्रतीसादाबद्दल धन्यवाद !!
16 Sep 2021 - 1:38 pm | अनिंद्य
'पर्यावरणस्नेही' हा शब्द बऱ्यापैकी रुळत आहे, योग्य वाटतो.
16 Sep 2021 - 6:00 pm | श्रीनिवास टिळक
परिसरस्नेही किवा परिसरपूरक गणपती हेही चालू शकतील का?
13 Sep 2021 - 10:58 am | सर्वसाक्षी
13 Sep 2021 - 7:43 pm | तुषार काळभोर
गॅस शेगडीचा नॉब बंद आहे.
14 Sep 2021 - 11:22 am | सर्वसाक्षी
14 Sep 2021 - 9:55 pm | सुक्या
सुंदर सजावट !! बाप्पाच्या डोक्यावर छत्र लावायचा प्रयत्न केला या वर्षी पण तो फसला. पुढच्या वर्षी जरुर करुन पाहीन . . .
15 Sep 2021 - 12:29 pm | चौथा कोनाडा
सुंदर सोनचाफ्याच्या आड दडलेले पीतवर्णी प्रभावळ दाखवणारे बाप्प्पा आवडले !
(मुर्ती पितळेची दिसतेय. नुसती मुर्ती पहायला आवडेल !)
15 Sep 2021 - 5:27 pm | Bhakti
सुरेख!