श्री गणेश लेखमाला २०२३

1

माझ्या घरचा बाप्पा !!!

सुक्या's picture
सुक्या in मिपा कलादालन
12 Sep 2021 - 4:03 am

नमस्कार मिपाकरहो,

सगळ्यांच्या घरी बाप्पाचे आगमन झाले आहे. दरवर्षी बाप्पाची मनोभावे पुजा करताना सर्व जण खुप सुंदर अशी आरास करतात. काही जण तर अगदी जीव ओतुन सुंदर देखावे करतात. यावर्षी सगळ्या मिपाकरांच्या घरच्या बाप्पाचे दर्शन व्हावे म्हणुन हा धागाप्रपंच ..

मग येउ द्या तुमच्या घरच्या बाप्पाचे फोटो ... सुरुवात मी माझ्यापासुन करतो ... हा माझ्या घरचा बाप्पा . . .

.

.

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Sep 2021 - 10:38 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

shri Ganesha

(आपल्या धाग्यावर यायचे योग येतील असे वाटले नव्हते, श्रीगणेशा आपल्याकडून कधी कधी काहीही करुन घेतो) :)

-दिलीप बिरुटे

Bhakti's picture

12 Sep 2021 - 11:23 am | Bhakti

छान बाप्पाने सुन्दर कल्पकता दिली आहे.

तुषार काळभोर's picture

12 Sep 2021 - 4:11 pm | तुषार काळभोर

मस्त सजावट प्रा डॉ साहेब..

सुक्या's picture

12 Sep 2021 - 10:18 pm | सुक्या

मस्त सजावट !! झोपाळ्यावरचा बाप्पा छान आहे ... मागची दगडी भिंतही छान आहे ...

सरिता बांदेकर's picture

12 Sep 2021 - 2:03 pm | सरिता बांदेकर

छान आरास.
शेअर केल्याबद्दल धन्यवाद.

Rajesh188's picture

12 Sep 2021 - 2:24 pm | Rajesh188

सुक्या आणि dr छान सजावट केली आहे.अप्रतिम फोटो दोघांचे पण.

चौथा कोनाडा's picture

12 Sep 2021 - 5:33 pm | चौथा कोनाडा

हेच म्हणतो !
+१
सुक्या यांची सजावट कलरफुल्ल आणि नक्षीदार
आणि प्राडॉ यांची कल्पक आणि सुंदर !

सुरिया's picture

12 Sep 2021 - 6:08 pm | सुरिया

सुक्यारावांची सजावट कलरफुल्ल आणि छान आहे पण........
सजावटीसाठी वापरायच्या थर्मोकोलवर बंदी आहे ना?
पहिल्या अटेम्प्टला ५००० रु. दुसर्‍याला १०००० तर तिसर्‍याला २५००० आणि तीन महिने तुरुंग्वास आहे.
.
दिलिप बिरुटे यांचा पारावरच्या झाडाच्या फांदीला टांगलेला झुला सुंदर. थोडा ग्राउंड क्लीअरन्स हवा होता झोपाळ्याला असे वाटते. ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Sep 2021 - 7:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

थोडा ग्राउंड क्लीअरन्स हवा होता झोपाळ्याला असे वाटते. ;)

नोटेड....! =))

-दिलीप बिरुटे

सुक्या's picture

12 Sep 2021 - 10:21 pm | सुक्या

थर्मोकोलवर बहुतेक भारतात बंदी आहे. ईकडे ही सजावट दुकानात मिळत होती तेव्हा विकत घेतली होती तीच सजावट दर वर्षी वापरतो.

श्रीनिवास टिळक's picture

15 Sep 2021 - 8:09 pm | श्रीनिवास टिळक

गेले काही दिवस वेगवेगळ्या मालिकांवर पण गणरायाचे दर्शन होत आहे आणि त्याची आरती पण ऐकू येत आहे. त्याबरोबरच गणरायाची मूर्ती "eco-friendly"असावी असाही योग्य प्रचार होत आहे. हि चांगलीच गोष्ट आहे. पण eco-friendly हे मूर्तीचे विशेषण खटकते. त्याला पर्यायी मराठी शब्द काय असू शकेल? नैसर्गिक किंवा पर्यावरण मित्र/मैत्र का पर्यावरण पूरक?

सुक्या's picture

15 Sep 2021 - 10:16 pm | सुक्या

पर्यावरण पूरक हा जास्त जवळचा वाटतो. मातीची मुर्ती असावी हा नियम आता बरेच लोक पाळताना दिसत आहेत हे नक्कीच स्वागतार्ह पाउल आहे. अजुन पुढे जात घरच्या घरी विसर्जन हा ही एक नवा पायंडा पडतो आहे. त्यामुळे गणेशोत्सव अजुन पर्यावरण पूरक होईल हे नक्की.

प्रतीसादाबद्दल धन्यवाद !!

अनिंद्य's picture

16 Sep 2021 - 1:38 pm | अनिंद्य

'पर्यावरणस्नेही' हा शब्द बऱ्यापैकी रुळत आहे, योग्य वाटतो.

श्रीनिवास टिळक's picture

16 Sep 2021 - 6:00 pm | श्रीनिवास टिळक

परिसरस्नेही किवा परिसरपूरक गणपती हेही चालू शकतील का?

सर्वसाक्षी's picture

13 Sep 2021 - 10:58 am | सर्वसाक्षी

B

तुषार काळभोर's picture

13 Sep 2021 - 7:43 pm | तुषार काळभोर

गॅस शेगडीचा नॉब बंद आहे.

सर्वसाक्षी's picture

14 Sep 2021 - 11:22 am | सर्वसाक्षी

B

सुक्या's picture

14 Sep 2021 - 9:55 pm | सुक्या

सुंदर सजावट !! बाप्पाच्या डोक्यावर छत्र लावायचा प्रयत्न केला या वर्षी पण तो फसला. पुढच्या वर्षी जरुर करुन पाहीन . . .

चौथा कोनाडा's picture

15 Sep 2021 - 12:29 pm | चौथा कोनाडा

सुंदर सोनचाफ्याच्या आड दडलेले पीतवर्णी प्रभावळ दाखवणारे बाप्प्पा आवडले !
(मुर्ती पितळेची दिसतेय. नुसती मुर्ती पहायला आवडेल !)

Bhakti's picture

15 Sep 2021 - 5:27 pm | Bhakti

सुरेख!