आहुती ????????

खिलजि's picture
खिलजि in जे न देखे रवी...
4 May 2021 - 3:27 pm

यज्ञास बैसलों आम्ही

आहुतीचा मान घ्यावा

भरा झोळी माझीच फक्त

भरभराटीचा आशिष द्यावा

अवकाळी पाऊस , भूकंपाची जोड त्याला

घरे पडली भूकंप येता , पडल्या दगड आणि विटा

त्याच चोरुनी यज्ञ मांडला

आता आहुतीसाठी आटापिटा

तिथे दूरवर चूल पेटली

राखण करती दोन मशाली

भाकरी रांधण्या तिथेच बैसली

सुन्न चेहरा घेऊन माउली

महत्प्रयासे पार मशाली

आता राहिली फक्त माउली

तिला एकदा का आडवी केली

आहुतीची मग चिंता मिटली

माऊलीचा भोग चढवितो

जगणं आलंय जिवा

क्षुब्ध व्हाल अशी आस धरितो

भरभराटीचा आशिष मज द्यावा

====================================

सिद्धेश्वर विलास पाटणकर

समाजजीवनमानडावी बाजूव्यक्तिचित्रणज्योतिष

प्रतिक्रिया

राघव's picture

4 May 2021 - 4:49 pm | राघव

तिला एकदा का आडवी केली

जीवघेणं.. :-(

शानबा५१२'s picture

26 Aug 2021 - 8:09 pm | शानबा५१२

कविता दोन चार वेळा वाचावी लागली तेव्हा समजली. पण कोणीही परीस्थीतीशे एवढी हार मानावी? असे करणे मुर्खपणाचे आहे.

गॉडजिला's picture

26 Aug 2021 - 10:19 pm | गॉडजिला

अन वास्तव विशद करणे या दोन वेगळ्या बाबी आहेत.

कविता भीषण आहे सर खिलजी. ऑर आने दो तरी कसे म्हणावे :(