सिलींडर ५

नीलकंठ देशमुख's picture
नीलकंठ देशमुख in जनातलं, मनातलं
23 Jul 2021 - 8:29 am

सिलींडर ५
आडगाव फाटा आणि बैलगाडी ब-याच अंतरावर . गाडीवाल्याला ओरडून ओरडून ओरडून आवाज दिले.पण तो बहुतेक झोपलेला.सिलीडर तिथपर्यंत कसे न्यायचे? खरेतर मामानी सिलिंडर गाडीपर्यंत न्यायला मदत केली असती.ते तयार ही होते.आपणच लग्न जमले असे सांगून पायावर कुर्‍हाड मारून घेतली.आता पश्चाताप करून काय उपयोग? बराच विचार केल्यावर युक्ती सुचली.सिलिंडर आडवे केले,व लहान मुले गाडी गाडी खेळतात तसे ढकलत नेऊ लागलो. संध्याकाळचे वेळी,निर्मनुष्य,शांत सडकेवर सिलिंडर घरंगळल्याचे आवाजाने वेगळेच वातावरण तयार झाले.त्या आवाजाने गाडीवाल्याने झोप मोडली.लगबग केल्याचे दाखवत जवळ आला.तो पर्यंत मी सिलिंडर ढकलत,गाडीचे जवळ आणले होते.'आत्ताच डोळा लागला'.ओशाळून हसत तो म्हणाला. मी बोलण्याच्या परिस्थितीत नव्हतो.खूणेनेच सिलिंडर गाडीत ठेवायला सांगितले.
' फाट्यावर सकाळीच आलो होतो, लई उशीर झाला काय झालं?त्याने विचारले. मी  न बोलता सिलिंडर उचलायची खूण केली.दोघांनी उचलून सिलिंडर गाडीत ठेवले.दोरीने बांधले.गाडीला बैल जुंपले.गाडी सुरु झाली,आणि त्याची टकळी ही.'मी सकाळीच येणार म्हणून  पहाटेच बैलगाडी घेऊन फाट्यावर आला होता. फकस्त न्याहारी आणली होती.बैलांची वैरण बी थोडीच आणली .दुपारची भाकर पण खाल्ली नाही.
हाटलीत च्या अन भजी फकस्त घेतली.किती यष्ट्या,गेल्या.हॉटेल बंद करून हाटेलवाला निघून गेला,शेवटी वाट पाहून पाहून झोपला, झाकड पडल्यावर निघूनजाणार होता',वगैरे वगैरे.निमुटपणे ऐकत होतो.आपली कहानी संपल्यावर,मला उशीर का झाला हे  पुन्हा विचारले. खरंतर सांगायसारखे खूप होते.थकून गेलो होतो,त्यामुळे प्रवासाचा थोडक्यात गोषवारा सांगून ,सविस्तर हालहवाल घरी व मित्रांना कथन करण्यासाठी राखून ठेवला.त्याचे समाधान झाले नव्हते,त्यामुळे चौकशा सुरूच होत्या.मी जुजबी ऊत्तरे देत होतो.पाऊण तास गाडीत वाटेवरचे धक्के खात खात एकदाचा गावी पोहचलो.अंधार झाला होता.रस्त्यावर मिनमिनते दिवे लागले होते.आमच्या घरी सिलिंडर येणार ही बातमी गल्लीत आधीच पसरलेली होती.गाडीचा आवाज येताच घरचेच नाही तर गल्लीतील बहुतेक दारे ऊघडली.चेहरे बाहेर डोकावले.अनेकजण गाडीजवळ येऊन,'कसे असते  सिलींडर बघू तरी,' म्हणून जवळ येऊन निरीक्षणकरू लागले.चौकशा सुरू झाल्या.सिलिंडर उचलून घरात न्यायला पाचसहाजण एकदम पुढे झाले.त्या ओढाताणीत सिलिंडर पडते की काय वाटले.त्यांना कसेतरी आवरून सिलिंडर घरात नेले.अनेकजण आताच गॅसवरच्या चहाची चव घ्यायला तयार होते.सकाळी बघू असे सांगून सगळ्यांची पाठवणी केली.घरच्यांनाही गॅस सुरू करायची घाई होती.आणि यायला एवढा वेळ का लागला ते जाणून घ्यायचीही.पण माझा थकलेला चेहरा पाहून माझी दया आली.त्यामुळे गॅस सकाळी सुरू करायचे ठरवले.आईने चुलीवरच केलेला चहा घेऊन,प्रवास वर्णन ऐकवले.'स्थळाचा'उल्लेख तेवढा टाळला.जेवण केले आणि झोपी गेलो.
झोपेत टेम्पो,आणि सिलिंडरचीच स्वप्ने पडत होती. सिलिंडर वर,शेळ्या उड्या मारताहेत.ड्रायव्हर,क्लिनर,मामा,भाचा ,बापूसाहेब, कमी ,कमीची आई आदी मंडळी टेम्पोत बसली आहेत,मी टेम्पो ढकलत आहे,अशी दृश्ये दिसत होते.बापरे.!पुन्हा टेम्पो! खडबडून जागा झालो.घरीच अंथरुणावर होतो हे लक्षात आल्यावर जीव भांड्यात पडला.सूर्य बराच वर आला होता. गॅस सुरू करायचा होता.काही मित्र पण त्यासाठी घरी आले होते.म्हणून ती मोहीम हाती घेतली.शेगडीला नळी जोडली.पण सिलिंडर जोडायचे कसे?रेग्युलेटरच नव्हते.शोधाशोध केली. सापडत नव्हते.अनेक शंका मनात. बीडलाच राहिले की काय?की टेम्पोत विसरले?की गॅसवाल्यानेच दिले नव्हते.विचार करूनही काहीच आठवेना.रेग्युलेटर सापडले तर  देवाला गुळाची शेरणी वाटायचेह कबुल केले.ब-याच वेळाने,खुंटीवर पिशवीकडे लक्ष गेले आले.त्यात तरी पाहू म्हणून पिशवी काढली तर रेग्युलेटर तिथे!शेवटी एकदाची गॅस जोडणी झाली.गॅस सुरू झाला.गॅसवरचा पहिला चहा.घरच्यांसह सर्वानी घेतला.चव तर आपल्या चहाचीच आहे,असे  काहींचे मत पडले.  काहींना मात्र खूपच वेगळा लागला.गॅसवर केलेले जेवण कसे लागते ते चाखून पाहायची मित्रांची इच्छा होती.परंतु ती पूर्ण होऊ शकली नाही.कारण सिलिंडर वाहतूकीचा अनुभव लक्षात घेऊन,गॅसचा वापर फक्त चहासाठीच आणि अगदी अत्यावश्यक असेल तेव्हाच करायचा असा धोरणात्मक निर्णय आम्ही घरच्यांनी घेतला होता.
बाकी गावात पहिलीच गॅस शेगडी आल्याचा आनंद वेगळाच होता.अनेक जण पाहायला येऊ लागले.त्यांच्यासाठी चहा करण्यात आजच सिलिंडर संपते की काय अशी भिती वाटू लागली. मग नुसता गॅस दाखवायचा  व काही महत्वाचे लोकांसाठी चुलीवरच चहा करायचा असे ठरवले. आपणही आपल्याघरी गॅस घ्यायचाच असे स्त्रीहट्ट,होऊ  लागले...काहींनी तसे ठराव पण केले.आलेल्या पैकी अनेकांना सिलिंडर कसे आणले याची हकीकत सांगावी लागलो.ती  स्टोरी ऐकून ऐकून घरातीलच नाही तर मित्रांनाही पाठ  झाली.काही वेळाने माझ्या ऐवजी तेच परस्पर स्वतःची आणखी भर घालून ती स्टोरी  सांगू लागले.सिलिंडर आणणे, हे हनुमानाने द्रोणागिरी पर्वत उचलून आणला तेवढे जरी कठीण नाही ,तरी बरेच कठीण काम आहे,आणि ते कठीण काम मी पार पाडले म्हणजे मी  फार युक्तीबाज आणि शक्तीमान पुरुष आहे असे काही लोकांचे मत झाले.ते त्यांनी  चहा घेताना बोलून दाखवले. चहा पिऊन गेलेल्या,आणि गॅसवरचे स्वयंपाकाचा स्वाद घ्यायला उतावीळ असणा-यांपैकी काही नतद्रष्ट मात्र,'हा सगळा फालतूपणा आहे, मुळात गॅसचा वापर शरीराला घातक आहे,तसेच सिलिंडर आणणे चुटकीचे काम आहे,मी बावळट असल्याने एवढा आटापिटा करावा लागला',असे बोलल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून कळले अख्खा दिवस गॅसवरच गेला.दुसरे दिवशी परत जायचे होते.
संध्याकाळी गल्लीतल्या नानूकाकांनी घरी बोलावले.गॅसची,सिलिंडरची आस्थेने चौकशी केली.मी त्यांना फायदे समजावून सांगितले.पुन्हा एकदा सिलिंडर कसे आणले त्याची उजळणी झाली.नानुकाका,काकू फारच प्रभावित झाल्याचे दिसले.काकांनी काकूंना माझ्यासाठी चहा करायला सांगितले.'काही खायला पण घेऊन ये वकील साहेबासाठी,'असेही वर सांगितले.हे नानूकाका आणि काकी,चिकट म्हणून प्रसीध्द होते.लोक उगीच
बदनामी करतात एखाद्याची,चिवडा खाताना विचार आला.चिवड्याला वास होता,पण शेवटी चिवडा तो चिवडाच की,आणि किती प्रेमाने दिलेला!चहा घेताना,मी परत कधी येणार याची काकांनी चौकशी केली.'येतोय पुढच्या शनिवारी.काही काम आहे का?'चहा चिवड्यालाजागून विचारले.'अरे बरं झालं,ते काय झालं ,हिचा भाऊ आहे ,सप्लाय खात्यात बीडला,माहीत आहेत नं?त्याच्या घरी काम होते." हे ऐकले की मनी  एकदम चांदणेच फुलले.काकूच्या या भावाची स्मार्ट मुलगी कॉलेज मधे होती,ती आठवली.धडधड वाढली.कुठल्यातरी  निमित्ताने तिच्या घरी जायची संधी मिळत असेल तर आणखी काय हवे होते?."जाईन की काय काम आहे सांगा ",मी अधीर होऊन विचारले."अरे त्याने,आमच्या नावे गॅस घेतलाय." काकानी सुरुवात केली."शेगडी अन सिलिंडर येऊन पडलंय त्याच्या घरी.ते इकडे कसे  आणायचा हाच प्रश्न होता.टेम्पोवाला तुझा मित्रच आहे म्हणल्यावर काळजीच नाही.येताना शेगडी अन सिलिंडर तेवढं घेऊन ये तुझ्या मित्राच्या टेम्पोतनं''.काकानी आपले पत्ते उघडे केले.बापरे!म्हणजे पुन्हा टेम्पो,पुन्हा सिलिंडर आणि वर शेगडी ही !
पण आता नाही म्हणणे शक्य नव्हते.मी मुकाट्याने मान हलवली.

            सहा महिन्यानंतर .........

( हे अनेक शिनुमा,शिरीयेल यांच्या सौजन्याने )
     गावात आणि आजूबाजूच्या गावी अनेकांकडे गॅस शेगड्या आल्या.सिलिंडर पुरवठा अर्थातच  बीडहून!
मी,गॅस एजंसीवाले,टेम्पोवाले,यांच्याशी वेगवेगळे  तोंडी करार करुन,टेम्पोतून सिलिंडर वहातूकीचा व ग्रामीण ग्राहकांना पुरवण्याचा बेकायदेशीर पण किफायतशीर जोडधंदा सुरू केला.तो वकीलीच्या कायदेशीर पण तोट्यातल्या धंद्यापेक्षा जोरात चालू लागल्याने,नंतर वकीली हाच जोडधंदा बनवला.

                            नीलकंठ देशमुख .
          nilkanthvd1@gmail.com
   (समाप्त)

..

,

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

श्रीगुरुजी's picture

23 Jul 2021 - 8:57 am | श्रीगुरुजी

मस्त! मजा आली.

सौंदाळा's picture

23 Jul 2021 - 8:58 am | सौंदाळा

खल्लास एकदम
द मा मिरासदारांची आठवण झाली हा भाग वाचुन
उत्तम कहाणी. रोज नवीन भाग येत असल्याने सलगता राहिली आणि उत्सुकता कुठेही कमी झाली नाही.
पुलेशु

नीलकंठ देशमुख's picture

23 Jul 2021 - 5:54 pm | नीलकंठ देशमुख

खूप धन्यवाद,प्रतिसादाबद्दल .

वामन देशमुख's picture

23 Jul 2021 - 9:10 am | वामन देशमुख

बेक्कार हसत राहिलो, आणि तुमच्या सिलेंडरसारखाच गडाबडा लोळत राहिलो, नीलकंठ देशमुख साहेब! खरंच खूप मजा आली!

बाकी, जशी कथा फुलत गेली तशीच लेखनशैलीही फुलत गेली असे वाटते. म्हणजे उत्तरोत्तर पंचेस, कोट्या वगैरे अगदी मस्त येत गेल्या. सिलेंडर डिलिव्हरीचा धंदा हा तर अगदी कहर आहे!

नीलकंठ देशमुख's picture

23 Jul 2021 - 5:54 pm | नीलकंठ देशमुख

धन्यवाद प्रतिसादाबद्दल. छान वाटले.

Bhakti's picture

23 Jul 2021 - 9:14 am | Bhakti

क्या बात!एकदम खास !

नीलकंठ देशमुख's picture

23 Jul 2021 - 5:54 pm | नीलकंठ देशमुख

धन्यवाद प्रतिसादाबद्दल मनापासून आभार

सुखी's picture

23 Jul 2021 - 9:29 am | सुखी

हे हे हे... झकास गोष्ट..

नीलकंठ देशमुख's picture

23 Jul 2021 - 5:55 pm | नीलकंठ देशमुख

धन्यवाद प्रतिसादाबद्दल आभार

सुबोध खरे's picture

23 Jul 2021 - 9:47 am | सुबोध खरे

लै म्हंजे लैच झकास

नीलकंठ देशमुख's picture

23 Jul 2021 - 5:55 pm | नीलकंठ देशमुख

धन्यवाद प्रतिसादाबद्दल

योगी९००'s picture

23 Jul 2021 - 9:56 am | योगी९००

खरंच खूप मजा आली. हा भाग पण मस्त झालाय.

नीलकंठ देशमुख's picture

23 Jul 2021 - 5:56 pm | नीलकंठ देशमुख

प्रतिसादाबद्दल धन्यवाद. छान वाटले.

गुल्लू दादा's picture

23 Jul 2021 - 10:09 am | गुल्लू दादा

आता तुमच्यापासून आमच्या अपेक्षा वाढल्या आहेत. येऊ द्या नवीन काहीतरी. धन्यवाद.

नीलकंठ देशमुख's picture

23 Jul 2021 - 5:57 pm | नीलकंठ देशमुख

धन्यवाद. छान वाटले. प्रयत्न करीन. अपेक्षा पूर्ण करण्याचा

गॉडजिला's picture

23 Jul 2021 - 11:15 am | गॉडजिला

सीजन टू येऊ दे... नवा गडी नवं राज्य म्हणत.. तसेही धंद्याचे काही अनुभव आले असतीलच की सिलेंडर पोचवायच्या ?

वाट बघत आहेच.

नीलकंठ देशमुख's picture

23 Jul 2021 - 5:59 pm | नीलकंठ देशमुख

छान वाटले वाचून. भट्टी जमून यावी लागते.
ही तर जमली असे प्रतिसादावरून वाटते बघूया.

मराठी_माणूस's picture

23 Jul 2021 - 11:38 am | मराठी_माणूस

खुप मस्त.

एक शंका. रेग्युलेटर कसा बसवला, कारण त्या काळी एजंसी चा मेकॅनिक एका विशिष्ट पान्याने तो बसावायचा. आता सारखा सहज बसवण्याजोगा नव्हता.

नीलकंठ देशमुख's picture

23 Jul 2021 - 6:15 pm | नीलकंठ देशमुख

धन्यवाद. ते सिक्रेट आहे..

तुषार काळभोर's picture

23 Jul 2021 - 12:18 pm | तुषार काळभोर

साठा शिलींडराची कहाणी, सुफळ संपूर्ण झाली!!
बाकी नानूकाकूंच्या भावाच्या घरी काय झाले, ती एक रोचक उपकथा आली तरी चालेल :)

नीलकंठ देशमुख's picture

23 Jul 2021 - 6:02 pm | नीलकंठ देशमुख

धन्यवाद. बघूया तिथे काय होईल ते!पण ते ही आपल्या हाती नसते.

कंजूस's picture

23 Jul 2021 - 1:22 pm | कंजूस

कित्येक दिवसांत चांगली कथा वाचनात आली नव्हती. शैलीही बहारदार. उगाच पाल्हाळ नाही. नेमकं ठोसे मारून सांगितले.

नीलकंठ देशमुख's picture

23 Jul 2021 - 6:10 pm | नीलकंठ देशमुख

खूप धन्यवाद प्रतिसादाबद्दल वाचून उत्साह वाढला

रंगीला रतन's picture

23 Jul 2021 - 1:31 pm | रंगीला रतन

एक नंबर कथा झाली!

रेग्युलेटर सापडले तर देवाला गुळाची शेरणी वाटायचेह कबुल केले.

नवस फेडलात का? :)

नीलकंठ देशमुख's picture

23 Jul 2021 - 6:12 pm | नीलकंठ देशमुख

धन्यवाद.
तेव्हा नाही पण आता तुम्हा लोकांचे जे प्रेम मिळत आहे त्यामुळे आता शेरनी वाटावी वाटते आहे.

सोत्रि's picture

23 Jul 2021 - 2:19 pm | सोत्रि

खुमासदार कथा!

प्रत्येक भागातले पंचेस खासच होते. मझा आला.

- (सिलींडरसाठी कधीही आटापिटा न करावा लागलेला) सोकाजी

नीलकंठ देशमुख's picture

23 Jul 2021 - 6:13 pm | नीलकंठ देशमुख

आभारी आहे. छान वाटले.

नीलकंठ देशमुख's picture

23 Jul 2021 - 6:13 pm | नीलकंठ देशमुख

आभारी आहे. छान वाटले.

नीलकंठ देशमुख's picture

23 Jul 2021 - 6:13 pm | नीलकंठ देशमुख

आभारी आहे. छान वाटले.

बापूसाहेब's picture

23 Jul 2021 - 4:21 pm | बापूसाहेब

हाहा.. मजा आली..
5 ही भाग अत्यंत मजेशीर..

नीलकंठ देशमुख's picture

23 Jul 2021 - 6:14 pm | नीलकंठ देशमुख

आभार मनापासून. उत्साह वाढला.

सरिता बांदेकर's picture

23 Jul 2021 - 4:54 pm | सरिता बांदेकर

मस्त किस्सा आणि त्याची मांडणी पण खुमासदार.

नीलकंठ देशमुख's picture

23 Jul 2021 - 6:14 pm | नीलकंठ देशमुख

धन्यवाद. खूप छान वाटले प्रतिसाद वाचून

अभिजीत अवलिया's picture

23 Jul 2021 - 7:04 pm | अभिजीत अवलिया

छान शेवट.

अनिरुद्ध.वैद्य's picture

23 Jul 2021 - 8:37 pm | अनिरुद्ध.वैद्य

मस्तय!!

नीलकंठ देशमुख's picture

23 Jul 2021 - 9:34 pm | नीलकंठ देशमुख

धन्यवाद.

रमेश आठवले's picture

23 Jul 2021 - 8:48 pm | रमेश आठवले

एका सिलिंडर साठी किती तास ऑक्सिजन वर काढावे लागले याची सुरेख आणि चमत्कारिक कहाणी सुफल संपूर्ण झाली.

नीलकंठ देशमुख's picture

23 Jul 2021 - 9:36 pm | नीलकंठ देशमुख

धन्यवाद. तुम्हा वाचकांचे काही क्षण छान गेले हे महत्वाचे.

योगी९००'s picture

23 Jul 2021 - 8:52 pm | योगी९००

असाच एक किस्सा ऐकीवात होता. फक्त तो फ्रीज (रेफ्रीजरेटर) बाबत होता.

साधारण १९८४ च्या सुमारास तसा रेफ्रीजरेटरचा वापर चांगला होता पण मेनली शहराकडील लोकांच्यातच जास्त दिसायचा. असाच ओळखीतल्या एकाने त्याच्या गावाकडे रेफ्रीजरेटर नेला. (नेताना त्याला सिलेंडर सारखा त्रास नाही झाला मात्र). त्यानंतर गावातले बरेच लोक उगाचच यांच्याकडे रेफ्रीजरेटर बघायला व गार पाणी प्यायला यायचे. कोणाकडे पाहूणे येणार असतील तर यांच्याकडे गार पाण्याच्या बाटल्या, बर्फ वगैरे आधीच बुक व्ह्यायचे. रस्तावरून येता जाता उगाचच चौकशी करायच्या उद्देशाने लोकं यांच्याकडे यायचे. काही गाववाले तर फ्रीजचे गार पाणी पिऊन नंतर यापेक्षा आपल्या विहीरीतल्या पाण्याच्या गारव्याने जास्त समाधान मिळते असे काहीतरी बोलायचे. घरचे फार वैतागले होते. यांचा बघून वर्षा-दोनवर्षात गावातल्या इतर काही लोकांनी रेफ्रीजरेटर घेतल्यावर यांचा हा ताप कमी झाला.

नीलकंठ देशमुख's picture

23 Jul 2021 - 9:37 pm | नीलकंठ देशमुख

छान. या निमित्ताने फ्रिज आठ वले!

सुक्या's picture

23 Jul 2021 - 11:36 pm | सुक्या

अहो इतकेच काय ... आमच्या पुर्ण गावात एका कडे रेफ्रीजरेटर होता . . . त्यावर .. " रेफ्रीजरेटर ने लाईट बिल खुप येते" पासुन " रेफ्रीजरेटर मधले गार पाणी बाधते. आपले माठाचे पाणी उत्तम" इथपर्यंत बाता होत होत्या ....

सुक्या's picture

23 Jul 2021 - 11:39 pm | सुक्या

सिलींडर पुराण आवडले ... हे नमुद करायचे राहीले ... मजा आली.. वाचुन ..

नीलकंठ देशमुख's picture

24 Jul 2021 - 7:36 am | नीलकंठ देशमुख

धन्यवाद. अभिप्राय वाचून छान वाटले

गोरगावलेकर's picture

24 Jul 2021 - 12:47 pm | गोरगावलेकर

अतिशय खुमासदार लेखन. तिसरा आणि चौथा तर कमालच

नीलकंठ देशमुख's picture

24 Jul 2021 - 2:50 pm | नीलकंठ देशमुख

धन्यवाद प्रतिसादाबद्दल

गामा पैलवान's picture

24 Jul 2021 - 2:40 pm | गामा पैलवान

नीळकंठ देशमुख,

बाटला घरी नेला खरा पण परत कसा केलात? त्यासाठी काय काय करावं लागलं त्याचीही इष्टोरी येउद्या! :-) हिच्यासारखीच खुमासदार शैलीत पायजे हां.

तुम्ही कथाकथनात उतराच. आम्हां वाचकांना मेजवानी मिळेल.

आ.न.,
-गा.पै.

नीलकंठ देशमुख's picture

24 Jul 2021 - 4:40 pm | नीलकंठ देशमुख

बाटला? कळले नाही.
तुम्हाला सिलिंडर म्हणायचे आहे का?
इष्टोरी आवडली हे बाकी छान.
मला ही छान वाटले

गामा पैलवान's picture

25 Jul 2021 - 12:07 am | गामा पैलवान

नीळकंठ देशमुख,

होय, बाटला म्हणजे सिलिंडर. बाटलीचं पुल्लिंग.

परत नेतांना काय यातायात करावी लागली? एसटीत घेतला का? रिकामा असेल तर न्यायला काहीच हरकत नसावी बहुतेक.

आ.न.,
-गा.पै.

पाषाणभेद's picture

24 Jul 2021 - 4:17 pm | पाषाणभेद

भारी लिहीले आहे एकदम झाकास!

नीलकंठ देशमुख's picture

24 Jul 2021 - 4:38 pm | नीलकंठ देशमुख

धन्यवाद

चौथा कोनाडा's picture

24 Jul 2021 - 5:18 pm | चौथा कोनाडा

मस्त मजा आली सिलेंडर सोबत प्रवास करायला आणि फरफट अनुभवायला !

🥇

नीलकंठ देशमुख _/\_ पुढील लेखनाच्या प्रतिक्षेत !

नीलकंठ देशमुख's picture

24 Jul 2021 - 7:28 pm | नीलकंठ देशमुख

धन्यवाद. आपणा सर्वानाच लिखाण वाचून आनंद मिळाला, हे कळतंय प्रतिसाद पाहून. छान वाटते आहे. पण जबाबदारी ही वाढली आहे.
पाहूया कितपत निभावता येईल ते.

स्मिताके's picture

25 Jul 2021 - 4:50 pm | स्मिताके

सर्व भाग वाचले. मस्त! आणखी लिहा. यात अनेक उपकथानके दडलेली दिसताहेत.

नीलकंठ देशमुख's picture

25 Jul 2021 - 7:24 pm | नीलकंठ देशमुख

धन्यवाद प्रतिसादाबद्दल. प्रयत्न करतो. अनेक वाचकांना यात पुढे काही असेल असे वाटत आहे. त्यामुळेच मलाही तसे वाटू लागलंय.

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

28 Jul 2021 - 2:14 pm | ॲबसेंट माइंडेड ...

सर्व भाग वाचले. कथा मजेदार झाली आहे.

नीलकंठ देशमुख's picture

28 Jul 2021 - 6:15 pm | नीलकंठ देशमुख

धन्यवाद प्रतिसादाबद्दल

मदनबाण's picture

29 Jul 2021 - 8:18 pm | मदनबाण

लिखाण आवडले...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - China on Radar: India Deploys Rafale Fighters on Eastern Front

नीलकंठ देशमुख's picture

30 Jul 2021 - 11:07 am | नीलकंठ देशमुख

धन्यवाद प्रतिसादाबद्दल

कपिलमुनी's picture

30 Jul 2021 - 12:18 am | कपिलमुनी

एकदम चकली लिखाण आहे

नीलकंठ देशमुख's picture

30 Jul 2021 - 11:08 am | नीलकंठ देशमुख

धन्यवाद प्रतिसादाबद्दल. चकली आवडली हे छान झाले