रे

साहना's picture
साहना in जनातलं, मनातलं
29 Jun 2021 - 2:42 am

सत्यजित रे ह्या माणसाबद्दल मला खरोखरच आत्मीयता वाटत आली आहे. जी प्रौढ व्यक्ती लहान मुलांचे मनोरंजन करू शकते किंवा मुलांच्या दृष्टिकोनातून लिहू शकते ती व्यक्ती खरोखरच प्रतिभाशाली आणि हृदयाची चांगली असते असे माझे प्रांजळ मत आहे. ह्यात केल्विन आणि हॉब्स चे बिल वॉटर्सन, अमेरिकन TV मिस्टर रॉजर्स (त्यांचा हि काँग्रेस मधील साक्ष जरूर एका [१]), आलीस इन वोडरलँड चे लेविस ह्या लोकांचा अंतर्भाव ह्यांत होतो. साने गुरुजी ह्यांचे लिखाण मला आवडले नसले तरी माणूस म्हणून ते निःसंशय खूप चांगले होते असे वाटते. सत्यजित रे ह्यांचे नाव ह्यांत खूप वरचे आहे.

नेटफ्लिक्स ऍमेझॉन इत्यादींनी भारतीय मनोरंजनाच्या वाळवंटांत अनेक गुलाबाची फुले फुलवली आहेत. त्यातील रे हि अँथॉलॉजि अत्यंत सुदर आहे. सत्यजित रे ह्यांच्या चार कथा इथे प्रस्तुत करण्यात आल्या आहेत. रे ह्यांच्या कथा तुम्ही वाचल्या असतील तर तुम्हाला आठवेल कि त्या नेहमीच अत्यंत सोप्या भाषेतील होत्या, छोट्या होत्या आणि सरळ सोपे कथानक होते. त्यांची अनुकूल हि कथा इंग्रजी पाठ्यपुस्तकांत होती.

पण ह्या चार कथांना इतक्या समर्थपणे टीव्ही वर आणले आहे कि त्या सोपेपणात सुद्धा किती प्रघल्भता आहे जे जाणवते. मी कथानकांना सांगून इथे तुमचा रसभंग करणार नाही. फक्त पहिल्या कथेवर बोलते (फोरगेट मी नोट). विविध लोकांनी ह्या सिरीज वर लिहिताना हंगामा है क्यू बरपा ह्याची स्तुती केली आहे तर बहुरुपिया आणि फोरगेट मी नोट वर टीका केली आहे. चित्रपट समीक्षक जे विविध प्रमुख माध्यमांतून लिहितात त्यांच्या बद्दल मला अजिबात प्रेम नाही. हे लोक समीक्षक बनतात कसे हेच समजत नाही.

फोरगेट मी नोट हि कथा साधारण असे अनेकांनी लिहिले असले तरी माझ्या मते अत्यंत उच्च दर्जाची कथा आहे. अली फैसल ने अफलातून अभिनय केला आहे. कंप्यूटर प्रमाणे तल्लख बुद्धिमत्ता आणि स्मरणशक्ती असणाऱ्या इप्सित च्या स्मरणशक्तीत अचानक ब्लाइन्ड स्पॉट्स येऊ लागतात. आपल्या ज्या प्रतिभेने आपले आयुष्य घडवले ती प्रतिभाच वाळू प्रमाणे हातांतून सुटत आहे ह्याची जाणीव होतंच तो कसा सैरभैर होतो ह्याचे अतिशय स्लो पद्धतीने दर्शन आम्हाला घडते. पैसे जाणे, प्रिय व्यक्तीचा मृत्यू हे सर्व आम्ही सहन करू शकतो. पण जी गोष्ट आम्हाला आमची ओळख देते तीच गेली तर ? रे ह्यांनी ह्या विलक्षण भावनेवर इतकी सुंदर कथा लिहिली ह्यांत त्यांच्या प्रतिभेचे दर्शन होते. हि भावना किंवा भय मनोरंजक प्रकारचे नाही पण ज्या प्रमाणे पाथेर पांचालीत रे आम्हाला सध्या सोप्या जीवनाची क्लिष्टता दाखवतात आणि आम्ही विस्मय चकित होतो, दुःखी होतो तीच भावना माझ्या मते फोरगेट मी नोट मध्ये आम्ही अनुभवू शकतो. अर्थांत श्रीजित मुखर्जी हे सत्यजित रे सारखे निर्देशक नसले तरी खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी हि कथा मांडली आहे.

पाथेर पांचालीत तिन्ही चित्रपटांत ट्रेन सीन्स आहेत. पहिल्या चित्रपटात निरागस अपू आणि त्याची बहीण पळत पळत ट्रेन पाहण्यासाठी जातात. ह्या सिन मध्ये त्यांची निरागसता दिसते. त्यांचे आयुष्य बंदिस्त असून दूरवरून आलेली ट्रेन आणि दूरवर जाणारी ट्रेन पाहून आपल्या विश्वाच्या बाहेर आणखीन मोठे जग असावे असेच कदाचित ती लहान मुले विचार करत असावीत. दुसऱ्या चित्रपटांत अपूची विधवा आई नेहमीच ट्रेन चा आवाज ऐकते, आपला तरुण मुलगा कधीतरी येईल हीच अशा ती ट्रेन ची शिट्टी तिला दिसत असते. तिसऱ्या चित्रपटात अपूचे लग्न होते आणि कोलकातातील त्या गजबजलेल्या शहरांत ट्रेन ची शिट्टी त्याच्या विश्वाचा भाग आहे. त्या उघड्या मैदानांत पाळणाऱ्या त्या छोट्या पोराने ती शेवटी ती ट्रेन प्राप्त केली आहे, मागे राहिली आहे ती फक्त त्याची निरागसता. रे ह्यांनी एका मुलाखतीत ह्या तिन्ही ट्रेन सीन्स वर भाष्य केले होते.

त्याच प्रमाणे आम्ही इप्सित चे विश्व पाहतो. जो पर्यंत त्याची तल्लख स्मरणशक्ती असते तो पर्यंत सर्वजण त्याला जिनिअस म्हणून पाहतात, त्याची स्तुती करतात. त्याला आपण सोडून आणखीन काही दिसत नाही. त्याचे वर्गमित्र, मित्र मैत्रिणी सर्व काही त्याच्यासाठी दुय्यम, असते. पण एक छोटासा डाऊट मात्र हे सर्व विश्व कोलमडून टाकतो. त्याच्या घराच्या पार्टीत त्याचा वर्गमित्र येतो आणि त्याच्या बायकोला हाय वर्गमित्राबद्दल इप्सित ने काही विशेष सांगितले नसते हे ऐकून तो मित्र थोडा चमकतो आणि ओशाळतो. अगदी १ सेकंड चा सिन आहे पण त्यांत तुम्हाला इप्सित आणि त्याच्या मित्रांचे डायनॅमिक्स समजते.

पोटभरू समीक्षकांचे समीक्षण खड्यात फेकून रे मधील चारही कथानके जरूर पहा.

ray

[१] https://www.youtube.com/watch?v=fKy7ljRr0AA

संस्कृतीसमीक्षा

प्रतिक्रिया

सोत्रि's picture

29 Jun 2021 - 3:21 am | सोत्रि

सगळ्याच कथा भन्नाट आहेत! प्रत्येक कथेचा टर्निंग पॅाईंटही खास आहे.
सगळे कलाकार आणि त्यांची कलाकारी अफलातून आहे, खासकरून मनोज बाजपेयी.

समीक्षकांचे समीक्षण

दिखावे पे मत जाओ अपनी अकल लगाओ।

- (अपनी अकल लगानेवाला) सोकाजी

कॉमी's picture

29 Jun 2021 - 7:27 am | कॉमी

सत्यजित रेंची फेलुदा मालिका लहानपणी अत्यंत आवडीची होती. अजूनही आवडते.

बाकी रे ची कास्ट इतकी छान आहे की पाहणे आलेच.

Forget me not च्या साधारण विषयावरच Flowers for Algernon नावाची सुरेख कादंबरी आहे.

कॉमी's picture

29 Jun 2021 - 7:27 am | कॉमी

सत्यजित रेंची फेलुदा मालिका लहानपणी अत्यंत आवडीची होती. अजूनही आवडते.

बाकी रे ची कास्ट इतकी छान आहे की पाहणे आलेच.

Forget me not च्या साधारण विषयावरच Flowers for Algernon नावाची सुरेख कादंबरी आहे.

पण शेवटची युट्युबवरची लिंक रे ची नाही.

अर्धवटराव's picture

30 Jun 2021 - 4:54 pm | अर्धवटराव

खुसपटच काढायची म्हटलं तर इथे ही विशिष्ट धर्मीयांचा/धर्माचा चांगुलपणा, रसीकता आणि हिंदुंची अजागळता सटल पद्धतीने दाखवली आहेच ;)...
बहुरुप्याचा शेवट काहि पटला नाहि. पण तो कथेचा भाग झाला. सादरीकरण, अभिनय तर उत्तमच आहे.

खुसपटच काढायची म्हटलं तर इथे ही विशिष्ट धर्मीयांचा/धर्माचा चांगुलपणा, रसीकता आणि हिंदुंची अजागळता सटल पद्धतीने दाखवली आहेच ;)...

कला ही कला गणली जावी म्हणून हे प्रकार भारतात नियमित होतात त्याचे कोणालाच काही वाटत नाही... ;(

अर्धवटराव's picture

30 Jun 2021 - 6:19 pm | अर्धवटराव

प्रतिसाद नीटसा कळला नाहि.
कला ही कला गणली जावी , पण म्हणून हे प्रकार भारतात नियमित होतात त्याचे कोणालाच काही वाटत नाही... ;(

असं काहि म्हणायचं आहे का?

कोणालाच काही वाटत नाही हे तर खरं आहे. या सगळ्या भानगडीतुन होणार्‍या नुकसानाची जाणीव नसणं, हि कदाचीत मुख्य अडचण आहे.

गॉडजिला's picture

30 Jun 2021 - 10:48 pm | गॉडजिला

सहमत आहे. आपण योग्य अर्थ लावला आहे.