मिपा छायाचित्रण कला स्पर्धा २०२१- स्पर्धे करता नाही

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in मिपा कलादालन
26 Jun 2021 - 10:53 am

छायाचित्रण कला स्पर्धा दणाक्यात सुरु झाली आहे. मिपाकरांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

स्पर्धक एका गटात एकच छायाचित्र देउ शकत असल्याने त्यांच्या आवडत्या छायाचित्रांचा आस्वाद इतर मिपाकरांना घेता यावा म्हणून हा धागा सुरु करत आहोत.

या धाग्यावर प्रतिसादामधे मिपाकर आपली आवडती छायाचित्रे देउ शकतात. (कितीही)

धाग्याची सुरुवात प्रशांत आणि टर्मिनेटर यांच्या या तीन छायाचित्रांनी करत आहोत.

PRASHANT
प्रशांत

Terminator 1
गोव्यातील शापोरा किल्ल्यावरून दिसणारा समुद्र
-टर्मीनेटर

Judgement Day

देवबाग ते वालावल च्या रस्त्यावर चिपी विमानतळजवळील एका पुलावरून दिसणारे दृष्य
- टर्मीनेटर

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

26 Jun 2021 - 10:56 am | तुषार काळभोर

वाह! बहोत खूब!!

प्रचेतस's picture

26 Jun 2021 - 11:06 am | प्रचेतस

हे भुलेश्वरच्या पठारावर काढलेले छायाचित्र

a

गोरगावलेकर's picture

27 Jun 2021 - 10:45 pm | गोरगावलेकर

हे चित्र पाहून जबलपूरहून कान्हाला जात असताना चालत्या गाडीतून घेतलेला एक फोटो आठवला

हे गतवर्षी मार्चमध्ये काढलेले जीवधन किल्ल्याचे छायाचित्र

a

Bhakti's picture

26 Jun 2021 - 4:21 pm | Bhakti

भारी आहे.

ज्ञानोबाचे पैजार's picture

26 Jun 2021 - 3:46 pm | ज्ञानोबाचे पैजार

Bahubali Thali

पैजारबुवा,

तुषार काळभोर's picture

26 Jun 2021 - 12:20 pm | तुषार काळभोर

म्हणजे एवढं ताट फोटोत मावलंच कसं?
अन् पोटात तरी मावलंच कसं?

प्रचेतस's picture

26 Jun 2021 - 4:27 pm | प्रचेतस

जीवघेणा फोटू आहे.

लॉकडाऊन सरल्यावर एका रविवारी नक्की डाव साधणार...

सनईचौघडा's picture

26 Jun 2021 - 12:13 pm | सनईचौघडा

फक्त थाळी आणि सायकलचे चित्रे तेव्हढी दिसत आहेत बाकीची ५ चित्रे दिसत नाही आहेत.

प्रचेतस's picture

26 Jun 2021 - 12:53 pm | प्रचेतस

आता दिसतेय का किल्ल्याचे चित्र? मला थाळी दिसत नाहीये.

किल्ला दिसला, खुप मस्त फोटो आहे.
पण सायकल आणि किल्ला सोडून एकही फोटो दिसत नाही.

गुल्लू दादा's picture

26 Jun 2021 - 12:48 pm | गुल्लू दादा

मला फक्त सायकल दिसते आहे....बाकी सगळी चित्रे गैरहजर.

चौथा कोनाडा's picture

26 Jun 2021 - 1:07 pm | चौथा कोनाडा

प्रशांत आणि टर्मिनेटर यांची प्रचि जबरदस्त आहेत !
प्रचि काढतानाचे त्यांचे अनुभव सविस्तरपणे वाचायला आवडतील !

बाकी, सायकल, जीवधन किल्ला देखील सुंदरच !
बाहुबली थाळीचं प्रचि दिसलं नाही. कदाचित डेल्टा प्लस व्हेरियंट"ची बाधा झालीय का ते तपसावे लागेल !

कॉमी's picture

26 Jun 2021 - 1:46 pm | कॉमी

१. पाऊस आणि फुलं

२. दृश्य
सुर्यास्त-

बहे रामलिंग

झाड

३.ईतर

प्रचेतस's picture

26 Jun 2021 - 4:28 pm | प्रचेतस

भारी आहेत मॅक्रोज.
बहे रामलिंग कुठे आहे? जाम भारी ठिकाण दिसतंय.

बहे बेट रामलिंग/ बहे बोरगाव वाळवा तालुक्यात (सांगली) बोरगाव गावाजवळ आहे. हि जागा कृष्णानदीच्या मधले एक बेट आहे. राममंदिर खूप जुने आहे, पण गर्दी खूप जास्त नसते. हे रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या अकरा मारुतींपैकी एक आहे. मंदिरामागे छोटा ओढा आहे.

आणि नदीत बोटिंग वैगेरे पण आहे, पण त्यात फार मजा नाही.

मस्त जागा आहे.

प्रचेतस's picture

26 Jun 2021 - 6:37 pm | प्रचेतस

भारी, इथं नक्कीच एक भटकंती होईलच आता.

सर्वसाक्षी's picture

28 Jun 2021 - 3:41 pm | सर्वसाक्षी

क्रांतिसिंह नाना पाटील यांचं बहे गाव ते हेच का ?

कॉमी's picture

1 Jul 2021 - 10:15 pm | कॉमी

तेच बहे बोरगाव.

Bhakti's picture

26 Jun 2021 - 4:40 pm | Bhakti

वाह वाह! मस्त मस्त!

Bhakti's picture

26 Jun 2021 - 4:20 pm | Bhakti

चंद्र
1
किरळ
2

गुल्लू दादा's picture

26 Jun 2021 - 5:56 pm | गुल्लू दादा

काय मेजवानी आहे. वरील सर्व फोटो आवडले. विशेषतः लेखातील शेवटचा, प्रचेतस यांचा भुलेश्वरच्या पठारावरील फार सहज, कॉमी यांचे कमळ आणि बहे रामलिंग तर खूपच सुंदर. सर्वांना धन्यवाद. येऊ द्या अजून. प्रेक्षक तयार आहेत. ;)

गोरगावलेकर's picture

27 Jun 2021 - 9:22 pm | गोरगावलेकर

माझेही काही अगदी नवीनतम फोटो
ठिकाण : लोणावळा
फोटो दिनांक : २६ व २७ जून २०२१
मोबाईल कॅमेरा : विवो एक्स ६०

टाटा धरणाची भिंत व रस्त्याच्या पुलाच्या दगडी कमानी

टेकडीहून दिसणारा देखावा

टायगर पॉईंटच्या जवळ

अम्बी व्हॅली येथून दिसणारा कोराईगड

प्रचेतस's picture

27 Jun 2021 - 9:52 pm | प्रचेतस

व्वा..! एकदम भारी आलेत फोटो.

तुषार काळभोर's picture

27 Jun 2021 - 10:25 pm | तुषार काळभोर

दुसरा फोटो कमाल सुंदर आहे!

गुल्लू दादा's picture

27 Jun 2021 - 10:54 pm | गुल्लू दादा

दुसरा फोटो खूप आवडला. बाकीचे पण छान आहेत. धन्यवाद.

कॉमी's picture

28 Jun 2021 - 7:47 am | कॉमी

सर्व फोटो मस्त आहेत, दुसरा फोटो विशेष आवडला. आकाश खूप सुंदर आले आहे त्यात.

सर्वच फोटो छानच आहेत.पहिला फोटो तर चित्र रेखाटल्या सारखा वाटतोय.

@ गोरगावलेकर
टाटा धरणाची भिंत व रस्त्याच्या पुलाच्या दगडी कमानी
या एका फोटो मुळे माझ्या मित्रां बरोबर इथे आलो असल्याच्या आठवणींना उजाळा मिळाला, आम्ही सगळ्यांनी अचानक पावसाळ्यात भुशी डॅम ला जायचे ठरवले आणि कोणतेही प्लॅनिंग न करता चक्क हाफ पँटवर आम्ही सगळे ठाण्यातुन निघालो... मला नीटशी वेळ आठवण नाही पण रात्रीच्या साधारण २:०० ते ३:०० च्या सुमारास आम्ही याच रस्त्यावर होतो. डॅमवर पोहचणारे आम्हीच पहिले होतो... तिथल्या पायर्‍यांवर बसलो आणि त्यावरुन वाहणार्‍या पाण्याचा मनमुराद आनंद घेतला. :) जेव्हा लोकांचे येणे सुरु झाले आणि गर्दी वाढु लागली तसा आम्ही परतीचा प्रवास सुरु केला.
-
--
---
रागवणार नसाल तर सांगतो... तुम्ही या फोटोत एचडीआर प्रयोग केलाला असेल तर तो किंचीत प्रमाणात अधिक झाला आहे.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Allu Arha's Anjali Anjali Video Song || Allu Arha | #HBDAlluArha

कंजूस's picture

2 Jul 2021 - 6:48 am | कंजूस

Zeiss camera भारीच आहे.
४८,१३,१३ एमपी . विडिओ गिंबलसह.

तुषार काळभोर's picture

28 Jun 2021 - 11:53 am | तुषार काळभोर

१. मुरुड, दापोली.

.
लेनोवो के६ पॉवर

२. मुंढवा नदी पुल, पुणे
.
लेनोवो के८ नोट

३. कानिफनाथ डोंगर (दक्षिणेकडील रस्त्याच्या सुरुवातीला)
1
आसुस मॅक्स एम२

४. आकाशवाणी, हडपसर, पुणे
4
आसुस मॅक्स एम२

Bhakti's picture

27 Jun 2021 - 10:55 pm | Bhakti

मस्तच!

गुल्लू दादा's picture

27 Jun 2021 - 10:55 pm | गुल्लू दादा

तुषार तुमचे दोन्ही फोटो जाम आवडलेत. अजून असतील तर येऊद्या. धन्यवाद.

चौथा कोनाडा's picture

28 Jun 2021 - 12:33 pm | चौथा कोनाडा

जबरदस्त आहेत फोटो !
रंगसंगती : वाह क्या बात हैं !

कॉमी's picture

28 Jun 2021 - 3:07 pm | कॉमी

सुंदर !

नावातकायआहे's picture

27 Jun 2021 - 11:25 pm | नावातकायआहे

मस्त!!!!! सर्व च फोटो छान आहेत!!!!

सर्वसाक्षी's picture

29 Jun 2021 - 11:28 am | सर्वसाक्षी

अनेक प्रकाशचित्रकारांची अतिशय सुंदर चित्रे! हा धागा म्हणजे पर्वणीच आहे

PHOTO

२०१५ साली पन्हाळा ते पावनखिंड ला जाताना काढलेला.
त्यावेळी moto E वर काढला असल्यामुळे थोडा ब्लर आहे.

सर्वसाक्षी's picture

30 Jun 2021 - 11:01 am | सर्वसाक्षी

बरेच दिवस गायब असलेला वेडा राघू अचानक डिसेंबर ते फेब्रुवारी या काळात आमच्या परिसरात वावरताना दिसो लागला. रुबाबात उच्चसनी बसल्यागत तो केबलवर बसून सतत इकडे तिकडे पहताना दिसायचा. मधेच एकदम वेगाने उडून जायचा आणि काही क्षणात परत यायचा. निरिक्षणा अंती लक्षात आलं की तो नावाला जागून मधमाशा पकडून खातो. दूरवर असलेली लहानशी मधमाशी त्याला लांबून दिसते म्हनजे नजर जबरदस्त असली पाहिजे. या वेडा राघूच्या मी टिपलेल्या काही छबी

be1

be2

be3

be4

be5

be6

be7

मदनबाण's picture

30 Jun 2021 - 7:26 pm | मदनबाण

@ सर्वसाक्षी काका

जितक मला स्मरते त्या नुसार ही तीच तार आहे ज्याच्यावर पोपट बसले होते... त्याचे फोटो मी तुमच्याच घरातुन काढले होते,आपला कट्टा झाल्यावर तुमच्या घरी आल्यावर मला पटकन टिपता आले होते. याच बरोबर पन्हाची चव अजुन देखील आठवणीत आहे, कारण माझ्या आईच्या हातच्या पन्हाच्या चवी नंतर त्याच चवीचा आस्वाद मला तुमच्या सौभाग्यवतींच्यामुळे मिळाला होता.
आजकी ताजा खबर - ठाण्यात झाली "पोपट" पंची म्हणजेच एक ठाणे कट्टा…अगदी अचानक !!
बाकी तोंडात किडा पकडलेला फोटो आणि काही दिवसांपूर्वी पुण्यात चुकुन गवा आला आणि तो बिचारा जीव गमवुन बसला होता. या दोन्ही आठवणींवरुन माझाच धागा देखील परत आठवला. :- काही क्षण टिपलेले... ४ पशु आणि पक्षी.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Allu Arha's Anjali Anjali Video Song || Allu Arha | #HBDAlluArha

सर्वसाक्षी's picture

8 Jul 2021 - 5:46 pm | सर्वसाक्षी

एकदा सवड काढ आणि ये. सध्या खंड्या आणि तांबट मुबलक आहेत. तांबटांची पिल्ल इकडुन तिकडे सतत उडत असतात

राघव's picture

8 Jul 2021 - 5:50 pm | राघव

खूप सुंदर! आवडले!

गोरगावलेकर's picture

30 Jun 2021 - 1:45 pm | गोरगावलेकर

आपले सर्व फोटो आवडले

सर्वसाक्षी's picture

8 Jul 2021 - 5:48 pm | सर्वसाक्षी

धन्यवाद

गोरगावलेकर's picture

30 Jun 2021 - 1:46 pm | गोरगावलेकर

सुंदरच टिपला आहे वेडा राघू

कंजूस's picture

1 Jul 2021 - 9:57 pm | कंजूस

सर्व फोटो आवडलेत.
निसर्गचित्रे भरपूर आहेत. पोर्ट्रेट्स टाका.

गोरगावलेकर's picture

1 Jul 2021 - 11:35 pm | गोरगावलेकर

उंटिणीचं (सांडणीचं ) दूध काढणे म्हणजे एक कसरतच.
ठिकाण: राष्ट्रीय ऊंट अनुसंधान केंद्र , बिकानेर
दिनांक : २४ नोव्हेंबर २०१६
कॅमेरा : EOS 700D

सांडणीच्या दुधाला थोडीशी खारट चव असते. यापासून बनवलेले पदार्थ मात्र चविष्ट लागतात. (चहा,कॉफी, कुल्फीची चव चाखली आहे.)

सुक्या's picture

2 Jul 2021 - 2:51 am | सुक्या

निवांत . . .
x

x

फुले . . .
x

रोषणाई
x

गुल्लू दादा's picture

2 Jul 2021 - 7:35 am | गुल्लू दादा

सुक्या तुमचा पहिला फोटो खूप आवडला. धन्यवाद.