मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मिपा छायाचित्रण कला स्पर्धा २०२१- स्पर्धे करता नाही

साहित्य संपादक · · मिपा कलादालन
छायाचित्रण कला स्पर्धा दणाक्यात सुरु झाली आहे. मिपाकरांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. स्पर्धक एका गटात एकच छायाचित्र देउ शकत असल्याने त्यांच्या आवडत्या छायाचित्रांचा आस्वाद इतर मिपाकरांना घेता यावा म्हणून हा धागा सुरु करत आहोत. या धाग्यावर प्रतिसादामधे मिपाकर आपली आवडती छायाचित्रे देउ शकतात. (कितीही) धाग्याची सुरुवात प्रशांत आणि टर्मिनेटर यांच्या या तीन छायाचित्रांनी करत आहोत. PRASHANT प्रशांत Terminator 1 गोव्यातील शापोरा किल्ल्यावरून दिसणारा समुद्र -टर्मीनेटर Judgement Day देवबाग ते वालावल च्या रस्त्यावर चिपी विमानतळजवळील एका पुलावरून दिसणारे दृष्य - टर्मीनेटर

वाचने 102816 वाचनखूण प्रतिक्रिया 288

चौथा कोनाडा Sat, 06/26/2021 - 13:07
प्रशांत आणि टर्मिनेटर यांची प्रचि जबरदस्त आहेत ! प्रचि काढतानाचे त्यांचे अनुभव सविस्तरपणे वाचायला आवडतील ! बाकी, सायकल, जीवधन किल्ला देखील सुंदरच ! बाहुबली थाळीचं प्रचि दिसलं नाही. कदाचित डेल्टा प्लस व्हेरियंट"ची बाधा झालीय का ते तपसावे लागेल !

In reply to by प्रचेतस

कॉमी Sat, 06/26/2021 - 18:30
बहे बेट रामलिंग/ बहे बोरगाव वाळवा तालुक्यात (सांगली) बोरगाव गावाजवळ आहे. हि जागा कृष्णानदीच्या मधले एक बेट आहे. राममंदिर खूप जुने आहे, पण गर्दी खूप जास्त नसते. हे रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या अकरा मारुतींपैकी एक आहे. मंदिरामागे छोटा ओढा आहे. आणि नदीत बोटिंग वैगेरे पण आहे, पण त्यात फार मजा नाही. मस्त जागा आहे.

गुल्लू दादा Sat, 06/26/2021 - 17:56
काय मेजवानी आहे. वरील सर्व फोटो आवडले. विशेषतः लेखातील शेवटचा, प्रचेतस यांचा भुलेश्वरच्या पठारावरील फार सहज, कॉमी यांचे कमळ आणि बहे रामलिंग तर खूपच सुंदर. सर्वांना धन्यवाद. येऊ द्या अजून. प्रेक्षक तयार आहेत. ;)

गोरगावलेकर Sun, 06/27/2021 - 21:22
माझेही काही अगदी नवीनतम फोटो ठिकाण : लोणावळा फोटो दिनांक : २६ व २७ जून २०२१ मोबाईल कॅमेरा : विवो एक्स ६० टाटा धरणाची भिंत व रस्त्याच्या पुलाच्या दगडी कमानी   टेकडीहून दिसणारा देखावा  टायगर पॉईंटच्या जवळ  अम्बी व्हॅली येथून दिसणारा कोराईगड

In reply to by गोरगावलेकर

मदनबाण Wed, 06/30/2021 - 19:14
@ गोरगावलेकर टाटा धरणाची भिंत व रस्त्याच्या पुलाच्या दगडी कमानी या एका फोटो मुळे माझ्या मित्रां बरोबर इथे आलो असल्याच्या आठवणींना उजाळा मिळाला, आम्ही सगळ्यांनी अचानक पावसाळ्यात भुशी डॅम ला जायचे ठरवले आणि कोणतेही प्लॅनिंग न करता चक्क हाफ पँटवर आम्ही सगळे ठाण्यातुन निघालो... मला नीटशी वेळ आठवण नाही पण रात्रीच्या साधारण २:०० ते ३:०० च्या सुमारास आम्ही याच रस्त्यावर होतो. डॅमवर पोहचणारे आम्हीच पहिले होतो... तिथल्या पायर्‍यांवर बसलो आणि त्यावरुन वाहणार्‍या पाण्याचा मनमुराद आनंद घेतला. :) जेव्हा लोकांचे येणे सुरु झाले आणि गर्दी वाढु लागली तसा आम्ही परतीचा प्रवास सुरु केला. - -- --- रागवणार नसाल तर सांगतो... तुम्ही या फोटोत एचडीआर प्रयोग केलाला असेल तर तो किंचीत प्रमाणात अधिक झाला आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - Allu Arha's Anjali Anjali Video Song || Allu Arha | #HBDAlluArha

तुषार काळभोर Mon, 06/28/2021 - 11:53
१. मुरुड, दापोली. . लेनोवो के६ पॉवर २. मुंढवा नदी पुल, पुणे . लेनोवो के८ नोट ३. कानिफनाथ डोंगर (दक्षिणेकडील रस्त्याच्या सुरुवातीला) 1 आसुस मॅक्स एम२ ४. आकाशवाणी, हडपसर, पुणे 4 आसुस मॅक्स एम२

सर्वसाक्षी Tue, 06/29/2021 - 11:28
अनेक प्रकाशचित्रकारांची अतिशय सुंदर चित्रे! हा धागा म्हणजे पर्वणीच आहे

सर्वसाक्षी Wed, 06/30/2021 - 11:01
बरेच दिवस गायब असलेला वेडा राघू अचानक डिसेंबर ते फेब्रुवारी या काळात आमच्या परिसरात वावरताना दिसो लागला. रुबाबात उच्चसनी बसल्यागत तो केबलवर बसून सतत इकडे तिकडे पहताना दिसायचा. मधेच एकदम वेगाने उडून जायचा आणि काही क्षणात परत यायचा. निरिक्षणा अंती लक्षात आलं की तो नावाला जागून मधमाशा पकडून खातो. दूरवर असलेली लहानशी मधमाशी त्याला लांबून दिसते म्हनजे नजर जबरदस्त असली पाहिजे. या वेडा राघूच्या मी टिपलेल्या काही छबी be1 be2 be3 be4 be5 be6 be7

In reply to by सर्वसाक्षी

मदनबाण Wed, 06/30/2021 - 19:26
@ सर्वसाक्षी काका जितक मला स्मरते त्या नुसार ही तीच तार आहे ज्याच्यावर पोपट बसले होते... त्याचे फोटो मी तुमच्याच घरातुन काढले होते,आपला कट्टा झाल्यावर तुमच्या घरी आल्यावर मला पटकन टिपता आले होते. याच बरोबर पन्हाची चव अजुन देखील आठवणीत आहे, कारण माझ्या आईच्या हातच्या पन्हाच्या चवी नंतर त्याच चवीचा आस्वाद मला तुमच्या सौभाग्यवतींच्यामुळे मिळाला होता. आजकी ताजा खबर - ठाण्यात झाली "पोपट" पंची म्हणजेच एक ठाणे कट्टा…अगदी अचानक !! बाकी तोंडात किडा पकडलेला फोटो आणि काही दिवसांपूर्वी पुण्यात चुकुन गवा आला आणि तो बिचारा जीव गमवुन बसला होता. या दोन्ही आठवणींवरुन माझाच धागा देखील परत आठवला. :- काही क्षण टिपलेले... ४ पशु आणि पक्षी.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - Allu Arha's Anjali Anjali Video Song || Allu Arha | #HBDAlluArha

गोरगावलेकर गुरुवार, 07/01/2021 - 23:35
उंटिणीचं (सांडणीचं ) दूध काढणे म्हणजे एक कसरतच. ठिकाण: राष्ट्रीय ऊंट अनुसंधान केंद्र , बिकानेर दिनांक : २४ नोव्हेंबर २०१६ कॅमेरा : EOS 700D  सांडणीच्या दुधाला थोडीशी खारट चव असते. यापासून बनवलेले पदार्थ मात्र चविष्ट लागतात. (चहा,कॉफी, कुल्फीची चव चाखली आहे.)