सांगली जिल्ह्यातील ऐतिहासिक -दंडोबा देवस्थान - Hill Station in Sangli - Dandoba Hills

व्लॉगर पाटील's picture
व्लॉगर पाटील in भटकंती
18 Jun 2021 - 11:11 am

दंडोबा ऐतिहासिक देवस्थान - Hill Station in Sangli - Dandoba Hills

दंडोबा डोंगर -
गेल्या वर्षी lockdown मध्ये गावाकडे(तासगांव , सांगली ) होतो. तर म्हंटलं यावेळी आपला सांगली जिल्हा explore करू आणि आपल्या जिल्ह्यातील काही पर्यटन स्थळ लोकांपर्यंत पोहचवू. पाच ग्रामपंचायतींच्या हद्दीत सुमारे ११५० हेक्टरवर पसरलेल्या या डोंगरावर पुरातन दंडनाथाचं मंदिर असून; डोंगर पोखरून एका गुहेत बांधलेलं हे एक भव्य मंदिर, गुहेतच नागाच्या वेटोळ्यात दंडनाथाची मूर्ती आहे, समोर दगडातच कोरलेला सभा मंडप देखील आहे. प्रदक्षिणा घालण्यासाठी अतिशय सुरेख पद्धतीने रस्तादेखील असून पुरातन काळातील चित्रं आता कालौघानं पुसट झाली आहेत. पावसाळ्याच्या दिवसात या मंदिरात पाणी भरलेलं असत आणि प्रदक्षिणा मार्गात लाईट ची सोय नाही तेंव्हा जर तुम्ही भेट देत असाल तर नक्की काळजी घ्या. श्रावण सोमवारी इथे भव्य यात्रा भरते , संपूर्ण जिल्ह्यातून तसेच जिल्ह्याबाहेरचे शिवभक्त मोठ्या संख्येने येतात.
डोंगरावर सुमारे तीनशे वर्षापूर्वीचं शिखर आजही सुस्थितीत इतिहासाचा साक्षीदार म्हणून उभं आहे. डोंगरमाथ्यावरचे शिखर आश्चर्यकारक आहे. इथले पुजारी आणि देवस्थानच्या मते हे शिखर मंदिराचं आहे. याची रचना पहिली तर हे लक्षात येतं, की त्याचा उपयोग वॉच टॉवर म्हणूनही करता यावा. हे शिखर पाच माजली असून; सर्वांत वरचा भाग आहे तिथं चार ते पाच माणसं उभी राहू शकतील एवढीच जागा आहे. पहिल्या टप्प्यावर जायला पायऱ्या आहेत, पण तिथून पुढं वरती जायला मानवनिर्मित पायऱ्या नाहीत; सध्या तिथं एक दगड आहे ज्याचा उपयोग करून वरती जाता येतं. चौथ्या टप्प्यावर वरती जाण्यासाठी पायऱ्या आहेत. एका वेळी एकच माणूस जाईल एवढीच जागा आहे. वरती गेल्यावर या परिसरातला अंदाजे साठ ते सत्तर किलोमीटरचा प्रदेश दिसतो. स्थानिक लोकांच्या मते जर वातावरण चांगलं असेल तर इथं उभं राहिल्यावर विजापूरच्या गोल-घुमटाचं शिखर दिसतं. दंडोबाचा डोंगर एक उंचीवरचं देवस्थान असून इथं कोणताही किल्ला नाही. याच्या बाजूलाच (अंदाजे ४-५ किलोमीटरवर) जुना पन्हाळा नावाचा किल्ला आहे. पण इथं किल्ला नसल्यामुळे या शिखराचं बांधकाम नेमकं कोणत्या हेतूनं आणि कोणाच्या काळात झालं आहे याचे संदर्भ कुठेही उपलब्ध नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं नसावं, कारण बांधकामाची शैली पाहून आपण हे सांगू शकतो. तसंच हा भाग जास्त काळ आदिलशहाच्या राज्यामध्ये होता. शिवछत्रपतींनी हे बांधलं असतं तर इथं एखादा छोटासा का होईना, किल्ला नक्कीच बांधला असता.

हे सांगली जिल्ह्यातील भोसे या गावाजवळ आहे , दंडोबा डोंगरावर जाण्यासाठी २ रस्ते आहेस , जर तुम्हाला ट्रेकिंग ची आवड असेल तर तुम्ही तर तुम्ही सिद्धेवाडी कडूनच ट्रेक way चा वापर करू शकता, आणि खरंच जर तुम्हाला हि ट्रिप फुल्ली एन्जॉय करायची असेल आणि जर तुम्ही एक दिवस देऊ शकत असाल तर सिद्धेवाडी कडून डोंगराचा पायथा लागतो त्या बाजूने तुम्ही ट्रेक करू शकता, ट्रेकिंग करून गेलात तर हा तुमच्यासाठी एक अविस्मरणीय अनुभव राहील , तुम्हाला विविध प्रकारचे प्राणी, पक्षी आणि फुले तुम्हाला ट्रेकिंग वय वर पाहायला मिळेल. पावसाळ्यामध्ये इथले दृश्य मनमोहक आणि अतिशय सुंदर असते .

या डोंगराचा ‘क’ दर्जाच्या पर्यटनस्थळांमध्ये समावेश होऊनही म्हणावा तसा विकास न झाल्याची खंत या भागाला भेट दिल्यावर सतावत राहते.

कसं जाल -

पुणे-सांगली-मिरज-कवठेमहांकाळ-खरशिंगफाटा-दंडोबा डोंगर

अंतर : सुमारे २७५ किमी.

योग्य कालावधी : ऑगस्ट ते डिसेंबर

प्रतिक्रिया

कंजूस's picture

18 Jun 2021 - 11:56 am | कंजूस

विडिओ आवडला.

व्लॉगर पाटील's picture

18 Jun 2021 - 2:26 pm | व्लॉगर पाटील

धन्यवाद !!!

Bhakti's picture

18 Jun 2021 - 12:14 pm | Bhakti

छान

व्लॉगर पाटील's picture

18 Jun 2021 - 2:26 pm | व्लॉगर पाटील

धन्यवाद !!!

चौथा कोनाडा's picture

18 Jun 2021 - 1:19 pm | चौथा कोनाडा

व्वा, मस्तच ठिकाण !
पाच मजली शिखरावरून देखावा सुंदर आहे !
व्हिडियो झकास ! +१

व्लॉगर पाटील's picture

18 Jun 2021 - 2:25 pm | व्लॉगर पाटील

धन्यवाद !!!

मला जायचे होते. तिकडचा एक जण म्हणाला जाऊ नका. हरणं सोडली आहेत. बाकी काही नाही. किर्लोस्करवाडीला कारखाना. पलूसला एप्रिलात जत्रा.

औदुंबर मात्र रम्य आहे. तिथेच चितळे डेअरी आहे.

तासगावच्या पटवर्धनांचे गणपती देऊळ आहे. पंचमीला रथयात्रा पाहायला जा. कवठेएकंड ( सांगली -तासगाव रस्त्यावर, तासगावपासून पाच किमी.) शंकराचे देऊळ आणि दसऱ्याला फटाके-दारुकाम रात्रभर असते.

बरीच ठिकाणं आहेत.

हो मी तासगावचाच आहे, तुम्ही सांगितलेल्या सगळ्या ठिकाणांना या आधी भेट दिली आहे पण त्यावेळी विडिओ बनवत नव्हतो , काही दिवसातच यांचा हि व्हिडिओ मालिका बनवून मि . पा . साठी नक्कीच सादर करू

कपिलमुनी's picture

18 Jun 2021 - 2:36 pm | कपिलमुनी

रथयात्रेचा व्हिडिओ सेपरेट टाकला तर चालेल .

कंजूस's picture

22 Jun 2021 - 1:06 pm | कंजूस

किंवा मोजकेच लोक रथ ओढत असतील.

रथ उत्सवाचा हा एक आपला विडिओ नक्की पहा

https://youtu.be/yCBgxgY5nNQ

कंजूस's picture

22 Jun 2021 - 1:08 pm | कंजूस

सोमेश्वर नाही.

Ravindra yadav's picture

26 Jun 2021 - 1:22 pm | Ravindra yadav

तुम्ही मला सुचवू शकता का,माझी १एकर शेती भाडेतत्वावर देणे आहे

कपिलमुनी's picture

18 Jun 2021 - 2:34 pm | कपिलमुनी

यंदा सांगलीला गावी गेले कि इकडे फेरी मारणे लिस्ट मध्ये अ‍ॅडवले आहे

कॉमी's picture

18 Jun 2021 - 3:41 pm | कॉमी

मागच्या वर्षी तुफान पावसात तिथे जाणे झाले. वरील मंदिर दगडाच्या आत कोरल्यासारखे आहे. तिथे आम्ही गेलो तेव्हा लाईट गेलेले. त्यामुळे प्रदक्षिणा मार्गावर (खरतर भुयारात!) प्रचंड अंधार होता. त्यामुळे एकदम तुंबाड फील आला होता.

चावटमेला's picture

18 Jun 2021 - 5:20 pm | चावटमेला

मी लहान असताना सांगलीतल्या शाळेतील मुलांसाठी दंडोबा क्रॉस कंट्री रनिंग स्पर्धा भरत असत, त्याची आठवण झाली. अर्थात मी जन्मजात आळशी असल्यामुळे त्यात कधी भाग घेतला नाही :) सांगलीच्या आजूबाजूला पाहण्यासारखी बरीच ठिकाणे आहेत, पण आमची मजल हरिपूर, नरसोबा वाडीच्या पुढे फारशी कधी गेली नाही. आता कधी पुन्हा सांगलीला जाणं झालं तर दंडोबाला नक्की भेट देईन.

दंडोबा क्रॉस कंट्री रनिंग स्पर्धा यासाठी आम्हीपण पण जायचो

गोरगावलेकर's picture

22 Jun 2021 - 12:37 pm | गोरगावलेकर

शिखराहून दिसणारा देखावा मस्तच.

व्लॉगर पाटील's picture

21 Jul 2021 - 5:55 pm | व्लॉगर पाटील

धन्यवाद !!!

चौकस२१२'s picture

25 Jun 2021 - 6:25 am | चौकस२१२

ताकारी चा डोंगर आणि अभयारण्य पण जिल्ह्यात आहे ( बहुतेक )

व्लॉगर पाटील's picture

21 Jul 2021 - 5:54 pm | व्लॉगर पाटील

Sagareshwar Deer sanctuary - हो सांगली जिल्ह्यात ताकारी न कडेगाव जवळ असलेलं हे मानवनिमित्त जंगल आहे , इथे भरपूर प्रमाणात हरीण आहेत . सागरेश्वर - एका भव्य पुरातन मंदिर आहे , श्रावणात मोठी यात्रा पण असते . हे एक सांगली जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळ आहे

Nitin Palkar's picture

20 Jul 2021 - 8:29 pm | Nitin Palkar

व्हिडिओ आणि समालोचन दोन्ही सुंदर.

व्लॉगर पाटील's picture

21 Jul 2021 - 5:49 pm | व्लॉगर पाटील

धन्यवाद !!!

व्लॉगर पाटील's picture

21 Jul 2021 - 5:53 pm | व्लॉगर पाटील

धन्यवाद !!!

व्लॉगर पाटील's picture

21 Jul 2021 - 5:53 pm | व्लॉगर पाटील

धन्यवाद !!!