सांगली जिल्ह्यातील ऐतिहासिक -दंडोबा देवस्थान - Hill Station in Sangli - Dandoba Hills
दंडोबा ऐतिहासिक देवस्थान - Hill Station in Sangli - Dandoba Hills
दंडोबा डोंगर -
गेल्या वर्षी lockdown मध्ये गावाकडे(तासगांव , सांगली ) होतो. तर म्हंटलं यावेळी आपला सांगली जिल्हा explore करू आणि आपल्या जिल्ह्यातील काही पर्यटन स्थळ लोकांपर्यंत पोहचवू. पाच ग्रामपंचायतींच्या हद्दीत सुमारे ११५० हेक्टरवर पसरलेल्या या डोंगरावर पुरातन दंडनाथाचं मंदिर असून; डोंगर पोखरून एका गुहेत बांधलेलं हे एक भव्य मंदिर, गुहेतच नागाच्या वेटोळ्यात दंडनाथाची मूर्ती आहे, समोर दगडातच कोरलेला सभा मंडप देखील आहे. प्रदक्षिणा घालण्यासाठी अतिशय सुरेख पद्धतीने रस्तादेखील असून पुरातन काळातील चित्रं आता कालौघानं पुसट झाली आहेत. पावसाळ्याच्या दिवसात या मंदिरात पाणी भरलेलं असत आणि प्रदक्षिणा मार्गात लाईट ची सोय नाही तेंव्हा जर तुम्ही भेट देत असाल तर नक्की काळजी घ्या. श्रावण सोमवारी इथे भव्य यात्रा भरते , संपूर्ण जिल्ह्यातून तसेच जिल्ह्याबाहेरचे शिवभक्त मोठ्या संख्येने येतात.
डोंगरावर सुमारे तीनशे वर्षापूर्वीचं शिखर आजही सुस्थितीत इतिहासाचा साक्षीदार म्हणून उभं आहे. डोंगरमाथ्यावरचे शिखर आश्चर्यकारक आहे. इथले पुजारी आणि देवस्थानच्या मते हे शिखर मंदिराचं आहे. याची रचना पहिली तर हे लक्षात येतं, की त्याचा उपयोग वॉच टॉवर म्हणूनही करता यावा. हे शिखर पाच माजली असून; सर्वांत वरचा भाग आहे तिथं चार ते पाच माणसं उभी राहू शकतील एवढीच जागा आहे. पहिल्या टप्प्यावर जायला पायऱ्या आहेत, पण तिथून पुढं वरती जायला मानवनिर्मित पायऱ्या नाहीत; सध्या तिथं एक दगड आहे ज्याचा उपयोग करून वरती जाता येतं. चौथ्या टप्प्यावर वरती जाण्यासाठी पायऱ्या आहेत. एका वेळी एकच माणूस जाईल एवढीच जागा आहे. वरती गेल्यावर या परिसरातला अंदाजे साठ ते सत्तर किलोमीटरचा प्रदेश दिसतो. स्थानिक लोकांच्या मते जर वातावरण चांगलं असेल तर इथं उभं राहिल्यावर विजापूरच्या गोल-घुमटाचं शिखर दिसतं. दंडोबाचा डोंगर एक उंचीवरचं देवस्थान असून इथं कोणताही किल्ला नाही. याच्या बाजूलाच (अंदाजे ४-५ किलोमीटरवर) जुना पन्हाळा नावाचा किल्ला आहे. पण इथं किल्ला नसल्यामुळे या शिखराचं बांधकाम नेमकं कोणत्या हेतूनं आणि कोणाच्या काळात झालं आहे याचे संदर्भ कुठेही उपलब्ध नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं नसावं, कारण बांधकामाची शैली पाहून आपण हे सांगू शकतो. तसंच हा भाग जास्त काळ आदिलशहाच्या राज्यामध्ये होता. शिवछत्रपतींनी हे बांधलं असतं तर इथं एखादा छोटासा का होईना, किल्ला नक्कीच बांधला असता.
हे सांगली जिल्ह्यातील भोसे या गावाजवळ आहे , दंडोबा डोंगरावर जाण्यासाठी २ रस्ते आहेस , जर तुम्हाला ट्रेकिंग ची आवड असेल तर तुम्ही तर तुम्ही सिद्धेवाडी कडूनच ट्रेक way चा वापर करू शकता, आणि खरंच जर तुम्हाला हि ट्रिप फुल्ली एन्जॉय करायची असेल आणि जर तुम्ही एक दिवस देऊ शकत असाल तर सिद्धेवाडी कडून डोंगराचा पायथा लागतो त्या बाजूने तुम्ही ट्रेक करू शकता, ट्रेकिंग करून गेलात तर हा तुमच्यासाठी एक अविस्मरणीय अनुभव राहील , तुम्हाला विविध प्रकारचे प्राणी, पक्षी आणि फुले तुम्हाला ट्रेकिंग वय वर पाहायला मिळेल. पावसाळ्यामध्ये इथले दृश्य मनमोहक आणि अतिशय सुंदर असते .
या डोंगराचा ‘क’ दर्जाच्या पर्यटनस्थळांमध्ये समावेश होऊनही म्हणावा तसा विकास न झाल्याची खंत या भागाला भेट दिल्यावर सतावत राहते.
कसं जाल -
पुणे-सांगली-मिरज-कवठेमहांकाळ-खरशिंगफाटा-दंडोबा डोंगर
अंतर : सुमारे २७५ किमी.
योग्य कालावधी : ऑगस्ट ते डिसेंबर
वाचने
18585
वाचनखूण
प्रतिक्रिया
25
छान आहे.
In reply to छान आहे. by कंजूस
धन्यवाद !!!
छान
In reply to छान by Bhakti
धन्यवाद !!!
व्वा, मस्तच ठिकाण !
In reply to व्वा, मस्तच ठिकाण ! by चौथा कोनाडा
धन्यवाद !!!
ताकारी स्टेशनजवळ सोमेश्वर अभयारण्य.
In reply to ताकारी स्टेशनजवळ सोमेश्वर अभयारण्य. by कंजूस
काही दिवसातच यांचा हि व्हिडिओ मालिका बनवू
In reply to काही दिवसातच यांचा हि व्हिडिओ मालिका बनवू by व्लॉगर पाटील
रथयात्रेचा व्हिडिओ
In reply to रथयात्रेचा व्हिडिओ by कपिलमुनी
सध्या बंद असेल.
In reply to सध्या बंद असेल. by कंजूस
रथ उत्सवाचा हा एक आपला विडिओ नक्की पहा
In reply to ताकारी स्टेशनजवळ सोमेश्वर अभयारण्य. by कंजूस
दुरुस्ती - सागरेश्वर.
In reply to ताकारी स्टेशनजवळ सोमेश्वर अभयारण्य. by कंजूस
शेती भाडेतत्वावर देणे
मस्त स्पॉट
छान जागा आहे.
मी लहान असताना सांगलीतल्या
In reply to मी लहान असताना सांगलीतल्या by चावटमेला
दंडोबा क्रॉस कंट्री रनिंग स्पर्धा यासाठी आम्हीपण पण जायचो
आवडला व्हिडीओ
In reply to आवडला व्हिडीओ by गोरगावलेकर
धन्यवाद !!!
ताकारी
In reply to ताकारी by चौकस२१२
Sagareshwar Deer sanctuary
सुरेख वर्णन!
In reply to सुरेख वर्णन! by Nitin Palkar
धन्यवाद !!!
In reply to सुरेख वर्णन! by Nitin Palkar
धन्यवाद !!!
धन्यवाद !!!