घरपरती आणि त्यातील अडथळे

उपयोजक's picture
उपयोजक in काथ्याकूट
12 Jun 2021 - 12:11 pm
गाभा: 

भारतात पहिला ख्रिश्चन धर्मोपदेशक इ.स.५२ साली केरळात आला. पहिले मुस्लिम आक्रमण इ.स.७११ मधे झाले. तेव्हापासून या धर्मियांकडून भारतात जबरदस्तीने किंवा पैशाचं आमिष दाखवून किंवा भ्रामक गोष्टी सांगून हिंदूंचे धर्मांतर करण्याचे यथाशक्ती प्रयत्न सुरु आहेत. ऐतिहासिक काळात मुस्लिम शासकांनी प्रामुख्याने तलवारीच्या जोरावर दहशत पसरवून तर ख्रिश्चनांनी तलवार,बंदूक आणि पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांमधे गायीची चरबी लावलेले पाव टाकून कितीतरी हिंदूंचे धर्मांतर केले. याव्यतिरिक्त हिंदू धर्मातील जातीच्या पिरॅमिडमधे सर्वात तळाशी असणार्‍यांना तुम्हाला हिंदू धर्मात सन्मानाची वागणूक मिळत नाही; आमचा धर्म दयाळू आहे. तुम्ही तो धर्म स्विकारा वगैरे सहानुभूतीपूर्ण भाषणे देऊन इजा न करता अशा लोकांचे धर्मांतर केले गेले. सद्य काळात तलवार,बंदूक यांच्याकरवी धर्मांतर करणे शक्य नसल्याने लव जिहाद मार्फत मुस्लिम बनवणे, आर्थिक मदतीच्या बदल्यात ख्रिश्चन बनवणे हे प्रकार अजूनही सुरु आहेत. यातही ख्रिश्चन धर्मप्रसारक हे आघाडीवर आहेत. हिंदू मंदिरांप्रमाणे चर्चची रचना करणे, येशुला हिंदू पद्धतीप्रमाणे पुजा करणे हे प्रकार सातत्याने होतात. आता तर यापुढे जाऊन हिंदू मंदिरामधेच ख्रिश्चन धर्मातल्या खुणा घुसडणे हा प्रकार दक्षिण भारतात फार होतो आहे. तिरुपतीच्या बालाजी मंदिराच्या कमानीवर नक्षीकामादरम्यान येशुचे क्रॉस लावले गेले होते. नंतर आक्षेप घेतल्यावर ते काढून हिंदू पद्धतीच्या श्रीफल असलेल्या कलशांची नक्षी जोडण्यात आली. काही वर्षांपूर्वी काही नन धर्मप्रसारासाठी तिरुपती मंदिर प्रांगणात पोहचल्याचं वाचलं असेल. केरळच्या सबरीमलाच्या मंदिरात हिंदूंनी जाऊ नये म्हणून तिथल्या ख्रिश्चनांनी आणलेल्या अडथळ्यांबद्दल आपण वाचलं असेलच. काही महिन्यांपूर्वी आंध्रप्रदेशात हिंदू मंदिरांची तोडफोड करण्याचा सपाटाच तिथल्या ख्रिश्चन धर्मीय आक्रमकांनी लावला होता.शेवटी आंध्रच्या मुख्यमंत्र्यांना (जे स्वत: ख्रिश्चनच आहेत) त्यांना या प्रश्नात लक्ष घालावं लागलं. अर्थात हे ढोंगच होतं. कारण याच जगनमोहन रेड्डी यांचे मामा हे कागदोपत्री हिंदू असून प्रत्यक्षात ख्रिश्चन आहेत. ते तिरुपती मंदिराच्या ट्रस्टवर महत्वाच्या पदावर आहेत. ही नेमणूक कोणामुळे झाली असेल हे सांगायला नको. त्यांच्या बोर्डावरील नेमणूकीला हिंदू संघटनांनी आक्षेप घेतला होता पण बहुदा कमी पडल्याने ते अजूनही तिथे आहेत. पुढच्या काही वर्षात केरळचा धर्मांतराचा वेग कमी होईल इतक्या वेगाने हे सुरु आहे. कागदोपत्री हिंदू पण प्रत्यक्षात ख्रिश्चन.
पैसे देऊन किंवा आजार बरा होणे याबद्दल भ्रामक गोष्टी सांगून भारतातले ख्रिश्चन धर्मोपदेशक धर्मांतर करत असतात. भारतात धर्मप्रसाराचा वेग मुस्लिमांच्या तुलनेत ख्रिश्चनांचा खूप जास्त आहे. मागे एका मोठ्या हिंदुत्ववादी नेत्याने ख्रिश्चन धर्मोपदेशक हे सायलेंट पॉयझनसारखे असल्याचे म्हटले होते.

तमिळनाडूत इंग्रजांच्या काळात आलेले ख्रिश्चन धर्मोपदेशक किती ढोंगी होते हे सांगणारा आर्किऑलॉजिस्ट एच नागास्वामींचा व्हिडिओ
https://youtu.be/N3D9_F83Gus

भारतात जितके मुस्लिम आहेत त्यातल्या जवळपास ९९% जणांचे पूर्वज हे हिंदू होते. तलवारीच्या जोरावरच यातल्या बहूसंख्यजणांचे धर्मांतर झाले आहे. काश्मीरमधे राजा हरिसिंग असताना तिथल्या मुस्लिमांनी हिंदू धर्म स्विकारण्याची तयारी दर्शवली होती.पण मुर्ख हिंदू धर्माचार्यांनी याला नकार दिला. सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक अल्लारखाँ यांचे पूर्वज मुळचे काश्मीरी ब्राह्मण. पण मुस्लिम बादशहाने त्यांच्या हिंदू राजाला मुस्लिम करु नये म्हणून त्याबदल्यात यांच्या पूर्वजांनी इस्लाम स्विकारला.

टिपू सुलतानने मेलुकोटे या गावच्या ३०० वैष्णव ब्राह्मणांची हत्या केल्यामुळे तिथे दिवाळी साजरी होत नाही. त्याबद्दलचा हा व्हिडिओ

https://youtu.be/F5FSA0bACZ8

धर्मांतर या विषयाबाबत देशात एक महत्वाचा भेद आहे. पंजाब,काश्मीर वगळता उत्तरभारत हा दक्षिण भारताच्या तुलनेत अफाट लोकसंख्या असलेला आणि कामासाठी देशात कुठेही जाण्याची तयारी असलेल्या लोकांचा प्रदेश. तर दक्षिण भारत हा उत्तर भारताच्या तुलनेत विकसित आणि कमी लोकसंख्या असलेला प्रदेश. दारिद्यामुळे ,लोकसंख्येमुळे टिकेचा धनी झालेला उत्तरभारत हिंदूधर्माला चिकटून राहणे याबाबत मात्र दक्षिण भारतापेक्षा कमालीचा सरस आहे. सद्यकाळात उत्तरभारतात उच्चवर्णीयांनी धर्मांतर केल्याची फार उदाहरणे नाहीत. याउलट धर्मांतर याबाबत दक्षिण भारतात अक्षरश: खेळखंडोबा झालेला अाहे. हिंदू धर्माबद्दल तुलनेने कमी असणारी आस्था हेच मुख्य कारण आहे. आंध्रात रेड्डी जातीच्या काही लोकांनी बर्‍याच वर्षांपूर्वी ख्रिश्चन धर्म स्विकारला आहे. रेड्डी ही आंध्रातली पूर्वीपासूनची उच्चवर्णीय आणि पैसे राखून असणारी जात आहे. तरीही धर्मांतर झाले आहे. दक्षिणभारतीय हे उ.भा च्या तुलनेत जास्त भावनिक किंवा हळवे असल्याने, सोशिकपणा कमी असल्याने धर्मांतरे होत असावीत.

यावरुन दक्षिण भारतीयांचा सोशिकपणा ठरवावा का?

https://www.google.com/amp/s/www.thehindu.com/society/no-glory-in-dying/...

नाही म्हणायला अगदी गेल्या काही वर्षांपासून भाजप दक्षिणेत बर्‍यापैकी काम करु लागल्यापासून काही स्थानिक हिंदू मुन्नानीसारख्या हिंदू संघटना अस्तित्वात आल्या आहेत. पण तत्पुर्वी हे फारसे नव्हते. दक्षिण भारतीय जो धर्म स्विकारतील तो श्रद्धेने पाळतात अगदी उ.भारतीयांना लाजवतील इतका. पण फक्त
गरीबी, आजारपण यामुळे नैराश्य आणि ख्रिश्चन किंवा मुस्लिम मुलगीच्या प्रेमात पडून तिचा धर्मबदलासाठी हट्ट हे तीन अडथळे नसतील तरच.
ए आर रहमान गरीबीमुळे किंवा बिकट परिस्थितीमुळे तर युवन शंकर राजा, अभिनेते AVM राजन असे दक्षिणेतले बरेच प्रसिद्ध मुळचे हिंदू लोक प्रेमात पडून मुस्लिम किंवा ख्रिश्चन झालेले आहेत. हा असला प्रकार बॉलीवूड किंवा एकूण उत्तर भारतात इतक्या पटकन घडत नाहीत. याबाबतीत उत्तरभारताचे कौतुक केलेच पाहिजे.

उत्तरप्रदेशात जसे मंदिर पाडून मशिद बांधली गेली होती तसेच चेन्नईतल्या मैलापूरच्या शंकराच्या मंदिराबाबत आहे. हे मंदिर सध्या जिथे आहे तिथे नव्हते. ते समुद्रकिनारी होते. ते जुलमी पोर्तुगीजांनी तोफा डागून पाडले आणि त्याठिकाणी चर्च उभारले.

http://indiafacts.org/the-mylapore-st-thomas-myth-that-doesnt-seem-to-di...

त्यानंतर १६ व्या शतकात सध्याचे मंदिर उभारले गेले. उत्तरप्रदेशातल्या लोकांनी जसा लढा देऊन मंदिर पुन्हा उभारत आहेत तसा मंदिराच्या मूळ जागेसाठी लढा तमिळ हिंदूंनी दिला नाही.
---------------------------------------------------------

धर्मांतर या अनुषंगाने काही प्रश्नदेखील आहेत. मिपावरच्या या विषयातल्या जाणकारांकडून याबाबत काही माहिती मिळावी.

१. ज्यांची किंवा ज्यांच्या पूर्वजांची धर्मांतरे ही त्यांच्या मनाविरुद्ध झाली आहेत अशा लोकांना पुनश्च हिंदूधर्मात परतण्याबद्दल शासकीय स्तरावर जोरदार प्रबोधन करता येऊ शकते का?
शासकीय स्तरावर का? तर ऐतिहासिक काळात भारतात हिंदूंची झालेली बहुतांश धर्मांतरे ही जबरदस्तीने झालेली आहेत. म्हणजे हा एकप्रकारे अन्यायच आहे. जसे इतिहासकाळात सामाजिक उतरंडीत उच्चवर्णीयांकडून झालेल्या अन्यायामुळे मागे पडलेल्या समाजांना आरक्षण देऊन पुढे आणले जाते तसेच या जबरदस्तीच्या धर्मांतराबाबत का होऊ शकत नाही? कारण त्याकाळी मनाविरुद्ध धर्म स्विकारलेला आहे. त्याकाळी घरपरतीची संधी मिळाली नाही किंवा शक्य झाले नाही. पण भारत स्वतंत्र झाल्यावर ही संधी मिळायला हरकत काय? संविधानानुसार भारतात कोणालाही कोणत्याही धर्म स्विकारण्याची मुभा आहे.पण हा कायदा झाला. त्या कायद्याला पोषक असे वातावरण नाहीये. म्हणजे अशा प्रकारे कायदेशीररित्या धर्म बदलता येतो ही माहिती ज्यांच्या पूर्वजांनी ऐतिहासिक काळात जुलमाने मुस्लिम किंवा ख्रिश्चन धर्म स्विकारला त्यांच्या सध्याच्या वंशजांपर्यंत पोहचली नसेल तर त्यांच्यापर्यंत ती पोहचवून पूर्वी झालेल्या अन्यायातून आज मुक्ती मिळवायला मदत करणे हे देशाच्या प्रशासनिक कारभारात यायला काय हरकत आहे? हे केल्यानंतरही ज्यांना मुस्लिम किंवा ख्रिश्चनच रहायचे आहे त्यांना राहू द्यावे.पण ज्यांना हिंदू धर्मात परतायचे आहे त्यांना शासकीय स्तरावरुन मदत मिळायला हरकत काय? त्यासाठी आधी तुम्ही हिंदू धर्मात परतू शकता हे प्रबोधन करणे ही पहिली पायरी आहे.

२. ऐतिहासिक काळी तत्कालीन सर्वच जातींमधे धर्मांतरे झाली आहेत. पण यात दलित,अस्पृश्य जातीच्या लोकांची संख्या भरपूर आहे. सामाजिक अन्यायामुळे किंवा भितीमुळे किंवा काही साशंकतेमुळे जसे की आपल्या जातीचे हिंदू लोक आपल्याला स्विकारतील का अशा शंकेमुळे धर्मबदलास विरोध करणे समजू शकतो.पण तत्कालीन उच्चवर्णीय जातीतल्या ज्या लोकांना जबरदस्तीने मुस्लिम किंवा ख्रिश्चन व्हावे लागले त्यांचे आजचे वंशज आजही मुस्लिम किंवा ख्रिश्चन आहेत. अगदी ब्राह्मणांसारखी जातीच्या पिरॅमिडमधे सर्वात वरच्या स्तरावर असणार्‍या जातीतले लोकही आजही मुस्लिम किंवा ख्रिश्चन आहेत.

https://en.m.wikipedia.org/wiki/Roman_Catholic_Brahmin

यांना काय म्हणणार? ब्राह्मण म्हणणार की ख्रिश्चन म्हणणार?
अगदी उदाहरण हवं असेल तर शफी इनामदार किंवा बॅरिस्टर अंतुले. कोकणात कुठेसा खान बहादूर पांगारकर मार्गही आहे म्हणे. या उच्चवर्णीयांच्या सध्याच्या वंशजांनी पुनश्च हिंदू धर्म न स्विकारण्याचे कारण काय असावे? की जी भिती वंचित जातींना आहे तीच यांनाही आहे? बाजीराव पेशवे - मस्तानी यांपासून जी वंशावळ सुरु झाली ती आजही मुस्लिमच आहे. त्यांनी बापाचा हिंदू धर्म स्विकारायला काय अडचणी असाव्यात?

३. भारतातले ख्रिश्चन धर्मोपदेशक आजार बरा करण्याच्या नावाखाली हिंदूंचे नदीत स्नान करुन बाप्तिस्मा करतात. वर असेही सांगतात की बाप्तिस्मा दिला म्हणजे धर्मांतर नव्हे. मग नक्की काय प्रक्रिया झाली की ख्रिश्चन धर्मात प्रवेश होतो? शिवाय अशी बरीचशी धर्मांतरे ही संबंधित शासकीय अधिकार्‍यापुढे जसे की मॅजिस्ट्रेट वगैरे होत नाहीत. ख्रिश्चन धर्मोपदेशक आणि तो धर्म स्विकारणारा या दोघांचा होकार मिळाला की झाले असा प्रकार होतो. अशा धर्मांतराला कायद्याने मान्यता नसेल तर पोलिस किंवा कायदेविषयक संस्था याकडे डोळेझाक का करतात? इतकी भरमसाठ धर्मांतरे कशी होतात? अशा धर्मोपदेशकांना अटक का होत नाही?

४. भारताचा नकाशा पाहिला तर गुजरातपासून ते प.बंगालपर्यंत किनारपट्टीच्या प्रदेशात ख्रिश्चन धर्मीयांचे प्रमाण जास्त आहे. किनारपट्टीच्या प्रदेशातच ख्रिश्चन धर्म इतका का पसरला असेल?

५. सद्यकाळात धर्मांतर करणार्‍या हिंदूंमधे गरीब,अशिक्षित हिंदूंचे प्रमाण जास्त असणे सहज शक्य आहे.पण काही वर्षांपूर्वी उल्हासनगरमधे हजारो सिंधी हिंदूंनी ख्रिश्चन धर्म स्विकारला.

https://www.google.com/amp/s/www.afternoonvoice.com/ulhasnagar-sindhis-d...

यामागचे नक्की कारण काय? कारण सिंधी हा समाज गरीबही नाही आणि अशिक्षितही नाही. व्यावसायिकतेत पुढारलेला हा समाज दीनवाणा,बापडा देखील नाही मग काय कारण आहे या धर्मांतराचं?

६. मुस्लिमांमधे धर्माचा पगडा इतका असण्याचं कारण काय असावं? गरीब हिंदू जर गरीबीला कंटाळून मुस्लिम किंवा ख्रिश्चन होत असेल तर हेच गरीब मुस्लिमांबाबत का होत नसेल? गरीबीला कंटाळून ते इस्लाम का सोडून हिंदू किंवा ख्रिश्चन का होत नसावेत?

७. केरळमधे हिंदूंची संख्या दिवसेंदिवस घटते आहे. आक्रस्ताळी मुस्लिम धर्मियांची तिथे दादागिरी बरीच वर्षे सुरु आहे. ख्रिश्चन धर्मोदेशकही सुखनैव काम करत आहेत. २०१४ पासून केंद्रात हिंदुत्ववादी विचारांचे सरकार आहे. केंद्राची ताकद ही नक्कीच राज्यसरकारपेक्षा जास्त असते. मग त्याच ताकदीचा वापर करुन भाजप केरळातल्या मुस्लिमांच्या, ख्रिश्चनांच्या या दादागिरीला आळा का घालू शकत नाही? किंवा याचप्रमाणे इतिहासात शिवरायांपासून पेशव्यांपर्यंत मराठा साम्राज्य असताना जे जुलमाने मुस्लिम/ख्रिश्चन बनले त्या सर्वांना पुन्हा हिंदू धर्मात का आणले नाही? नेताजी पालकरांना हिंदू धर्मात परत घेतले मग बाकीच्यांना का नाही?

८. सेंट झेविअर हा केरळमधे कमालीचा प्रभावी धर्मोपदेशक होऊन गेला. दिवसाला शेकडो जणांना ख्रिश्चन बनवायचा. याच्या नावाने इतक्या शाळा,महाविद्यालये असणे हे हिंदू धर्माला खिजवणे आहे का? एखाद्या कॉलेजचं नाव अौरंगजेब महाविद्यालय किंवा शाळेचं शाहिस्तेखान विद्यालय हे खपवून घेतले जात नसेल तर या सेंट झेविअरला झुकते माप का?

प्रतिक्रिया

उत्तम मांडणी केली आहे. घर वापसी करणे हे कागदोपत्री जरी शक्य असले तरी प्रत्यक्ष त्या कुटुंबाला हिंदू धर्मात कोठे ठेवायचे हा मोठाच प्रश्न आहे. हे कोणत्याही पध्दतीने ठरवले तरी प्रत्यक्ष राहणे, रोटी बेटी व्यवहार करणे आताचे नातेसंबंध, आर्थिक, धार्मिक संबंध कसे बदलणार हे कोणाही व्यक्तीला किंवा सरकारला कायद्याने ठरवणे शक्य नाही. सध्या तरी याला वाट पाहण्याशिवाय आणि हिंदू धर्मात अंतर्गत बदल आणि परिस्थिती बदल करणे हाच उपाय आहे. एक शक्यता आहे. जातीआधारीत आरक्षण बदलून ते आर्थिक केले तर हिंदू धर्मात घरवापसी ला मदत होऊ शकते.

गॉडजिला's picture

13 Jun 2021 - 11:26 am | गॉडजिला

जातीआधारीत आरक्षण बदलून ते आर्थिक केले तर हिंदू धर्मात घरवापसी ला मदत होऊ शकते.

लोकांना जाती आधारित आरक्षण खटकते पण जाती आधारीत धर्म पटतो हा विरोधाभास न्हवे तर काय आहे ?

उपयोजक's picture

13 Jun 2021 - 2:52 pm | उपयोजक

ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्मात भेद, जाती, पंथ नाहीत का? आजपर्यंत ज्या मुस्लिम , ख्रिश्चनांनी धर्मांतर करुन हिंदू धर्म स्विकारला त्यांना हिंदू धर्मातली कोणती ना कोणती तरी जात मिळालीच असेल ना? शिवाय पाव टाकून ख्रिश्चन बनवलेल्या काही जातींनी आपल्या आडनावासोबत परंपरागत व्यवसायाचे नावही जोडले आहे. जेणेकरून भविष्यात हिंदू धर्मात घेतलेच तर कोणत्या जातीत घ्यावे ते त्यांच्या पूर्वजांनीच जातीचे नाव आडनावाला जोडून सुचवले आहे. शिवाय जरी जोडले नसले तरी त्यांच्या परंपरागत व्यवसायावरुन ते कळू शकते.रोटी बेटी व्यवहाराचा प्रश्नदेखील यामुळे किचकट होणार नाही. किंबहूना हिंदू धर्मात काही जातींमधे लग्नासाठी मुली मिळणे कठीण झाले आहे त्याचीही धार कमी होईल.

साहना's picture

13 Jun 2021 - 8:34 am | साहना

> सेंट झेविअर हा केरळमधे कमालीचा प्रभावी धर्मोपदेशक होऊन गेला. दिवसाला शेकडो जणांना ख्रिश्चन बनवायचा. याच्या नावाने इतक्या शाळा,महाविद्यालये असणे हे हिंदू धर्माला खिजवणे आहे का? एखाद्या कॉलेजचं नाव अौरंगजेब महाविद्यालय किंवा शाळेचं शाहिस्तेखान विद्यालय हे खपवून घेतले जात नसेल तर या सेंट झेविअरला झुकते माप का?

भारतीय घटना ख्रिस्ती आणि इस्लामिक लोकांना शिक्षण संस्था चालवण्याचे जास्त अधिकार देते.

उपयोजक's picture

13 Jun 2021 - 2:58 pm | उपयोजक

भारतीय घटना ख्रिस्ती आणि इस्लामिक लोकांना शिक्षण संस्था चालवण्याचे जास्त अधिकार देते.

मान्य. पण सेंट झेविअर या नावाला आक्षेप आहे. हा झेविअर जुलमी होता. शिवाय हिंदूना ख्रिश्चन बनवून माझा आनंद गगनात मावेना असे काहीसे त्याने लिहून ठेवले आहे. ख्रिश्चनांमधे शांत प्रवृत्तीचे सेंट असतील ना? पण या अशा वृत्तीच्या संताचे नाव देऊ नये असे मनोमन वाटते. अब्दुल कलाम महाविद्यालय यात आक्षेपार्ह काहीच नाही. पण शाहिस्तेखान विद्यालय हे नाव कसे मान्य करावे?

गॉडजिला's picture

13 Jun 2021 - 1:14 pm | गॉडजिला

बाजीराव पेशवे - मस्तानी यांपासून जी वंशावळ सुरु झाली ती आजही मुस्लिमच आहे. त्यांनी बापाचा हिंदू धर्म स्विकारायला काय अडचणी असाव्यात?

रामायण वाचले पण रामाची सीता कोण असा हा प्रश्न आपण विचारला आहे...

मुस्लिमांमधे धर्माचा पगडा इतका असण्याचं कारण काय असावं? गरीब हिंदू जर गरीबीला कंटाळून मुस्लिम किंवा ख्रिश्चन होत असेल तर हेच गरीब मुस्लिमांबाबत का होत नसेल? गरीबीला कंटाळून ते इस्लाम का सोडून हिंदू किंवा ख्रिश्चन का होत नसावेत?

जाती व्यवस्थेचे अस्तित्व हा अधिकृत हिंदू बनण्यात / हिंदू धर्माचा प्रसार होण्यात प्रमुख अडसर आहे, नुसते हिंदू तत्वज्ञान / जीवनशैली स्वीकारून कोणी कोणाला हिंदू म्हणत नाही :( हे खरं दुखणं आहे.

उपयोजक's picture

13 Jun 2021 - 3:06 pm | उपयोजक

मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मात अजिबात भेद नाहीयेत? जाती, पंथ नाहीयेत? ज्यु , ख्रिश्चन , मुस्लिम या तिघांचा मूळपुरुष एकच असूनही हे तिघे हजारो वर्षांपासून भांडत आहेत की. अगदी रक्तरंजित युद्धे झाली त्यांच्यामधे.
याउलट भारतात जैन,बौद्ध,शिख यांचे मूळ हिंदू धर्म असूनही हिंदू आणि जैन,बौद्ध,शिख यांच्यात रक्तरंजित लढाया किती झाल्या? तात्विक वाद किंवा हिंदू मंदिराचे जैन, बौद्ध मंदिर करणे किंवा उलट असे झाले असेल पण जीवघेण्या मारामार्‍या हजारो वर्षे सुरु आहेत का यांच्यामधे?
हिंदू धर्म श्रेष्ठ का आहे हे या व्हिडिओमधे ऐका. सर्व खुलासा होईल.

https://youtu.be/92WtVVbA5jQ

हिंदू धर्म श्रेष्ठ का आहे हे या व्हिडिओमधे ऐका. सर्व खुलासा होईल.

का ऐकु ? मला आधीच माहीत आहे हिंदू धर्म श्रेष्ठ का आहे ते.
चर्चा दोष काय आहेत याची आहे...

भारतात जैन,बौद्ध,शिख यांचे मूळ हिंदू धर्म असूनही हिंदू आणि जैन,बौद्ध,शिख यांच्यात रक्तरंजित लढाया किती झाल्या?

अब्जावदी जरी झाल्या असत्या तरी त्या आंतर हिंदु गणल्या गेल्याने त्याची तुलनाच इतर धर्मीयांच्या आक्रमणाशी करता येत नाही.. ते सोढा.. हिंदु देवही हिंदु राक्षस सोडुन इतरांशी लढल्याचे फारसे प्रचलीत पुराण कथात ऐकु येत नाही...इतिहासात कीमान शाहीस्थेखानाची बोटे आहेत, अफझलखान वध आहे पण पुराणात यापध्दतीचे काहीच फारसे प्रसीध्द नाही.. त्यामुळे कीतीही लढाया झाल्या तरी हिंदुच जिंकले व हारलेही हीच शिकवण पुराण देते.. मग त्याची तुलना कशाला

धर्म ही सेल्फ डिक्लेरेशन बाब आहे काय ? म्हणजे उदाहरणार्थ बाप्तिस्मा असो वा नसो, कोणत्याही रिच्युअल किंवा कटकटीशिवाय मी (एक कल्चरल हिंदू) स्वतःला ख्रिस्ती म्हणू शकतो काय ? हा कायदेशीर अथवा धार्मिक दृष्टीतून प्रश्न नसून, सामाजिक दृष्टीतून आहे. म्हणजे एखादा माणूस तुम्हाला म्हणाला, मी मुसलमान आहे, तर तसे असण्याची सिद्धता असते काय, कि त्याचे मुसलमानत्व सिद्ध केले जाऊ शकते ? तशी काही गोष्ट असते तर का ?
जर सेल्फ डिक्लेरेशन बाब असेल तर अर्थात मी रिलीजन-फ्ल्यूईड झालो, कधीही बदलू शकतो.

का धर्म हा कल्चरल मुद्दा आहे ? तुम्ही ईद साजरी करत असाल तर मुसलमान, आणि दिवाळी साजरा करत असाल तर हिंदू ?
आणि मी काही वेळेस कल्चरली ख्रिस्ती पण असतोच कि, ख्रिसमसला चर्चचा अँबियन्स आवडतो म्हणून जातो, तेव्हा ख्रिस्ती कल्चरचा भाग असतो. मग मी धर्म-फ्ल्यूईड झालो काय ? मग धर्म हि अशी सर्वायुष्य व्यापी बाब आता राहिली आहे काय ?
कल्चरल बाब असेल तर खूप इंटरमिक्सिन्ग होत असते. इतकेच काय, धर्मपरिवर्तन केलेले बरेच लोक अजूनसुद्धा आपल्या प्रथा परंपरा पाळत असतात, मग त्यांचे सेल्फ-डिक्लेरेशन इतर असून कल्चरली ते हिंदू आहेत का ?

आणखी एक प्रश्न. जेव्हा लोकं हिंदू धर्मात परत यावीत अशी अपेक्षा असते तेव्हा काय पातळीवर हि अपेक्षा असते ? म्हणजे त्यांनी आपले रीतिरिवाज बदलावेत हि अपेक्षा असते, का त्यांनी आपले विचार बदलावेत (धर्माचा अभ्यास करावा) हि अपेक्षा असते, का फक्त लेबल (सेल्फ डिक्लेरेशन) (xyz चे abc) बदलावे इतकीच अपेक्षा असते ?

उपयोजक's picture

13 Jun 2021 - 3:18 pm | उपयोजक

१. कान टोचले की हिंदू धर्मीय बापाच्या पोटी जन्मलेल्या अपत्याचा हिंदू धर्मात प्रवेश होतो.
२. एकतर पूर्णपणे निरिश्वरवादी तरी असावे किंवा मग ईश्वर मानायचा असेल तर ज्याला ईश्वर मानायचे तो ज्या धर्माचा असेल तो धर्म स्विकारावा. म्हणजे अल्लाहला मानायचे असेल तर इस्लाम स्विकारावा किंवा येशु किंवा अजून कोण्या ख्रिश्चन देवाला मानत असेल तर ख्रिश्चन होऊन मानावे. धर्माने हिंदू आणि घरात हिंदू धर्मीय देवाऐवजी येशुचा फोटो लावणे, येशुला भजणे किंवा कागदोपत्री मुस्लिम असून हिंदू धर्मीय देवतांना भजणे किंवा ख्रिश्चन असून हिंदू देवाचे नाव स्वत:साठी वापरणे हे असले धेडगुजरी प्रकार किंवा एक‍ावेळी दोन डगरींवर पाय ठेवणे चुकीचेच. यामुळे किचकटपणा , गोंधळ अजून वाढतो. काही हिंदू दर्ग्यात जातात , ख्रिसमसला चर्चमधेही सहज जाऊन येतात. याचा अर्थ त्यांनी धर्म बदलला किंवा हिंदू धर्मावरची आस्था आटली असा अर्थ लावता येणार नाही. स्विकारलेल्या धर्मातील आक्षेपार्ह गोष्टी बदलण्यास आग्रही असावेच पण स्विकारलेल्या धर्मातल्या चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करुन वाईट गोष्टींना वैतागलो हे सतत सांगणे म्हणजे कातडीबचाव धोरण झाले. धर्म स्विकारताना तो गुणदोषांसकट स्विकारावा.

कॉमी's picture

13 Jun 2021 - 3:23 pm | कॉमी

एकतर हे नाहीतर ते असे अल्टिमेटम विनाकारण देत आहात असे वाटते.

असो.

कॉमी's picture

13 Jun 2021 - 3:25 pm | कॉमी

काही हिंदू दर्ग्यात जातात , ख्रिसमसला चर्चमधेही सहज जाऊन येतात. याचा अर्थ त्यांनी धर्म बदलला किंवा हिंदू धर्मावरची आस्था आटली असा अर्थ लावता येणार नाही.

माझे म्हणणे असे आहे असे तुम्हाला वाटले असल्यास गैरसमज आहे. माझे म्हणणे अत्यंत वेगळेच काहीतरी होते.

फायनल असो.

१)आक्षेप आमिष दाखवून धर्म परिवर्तन करणे
२) भीती दाखवून धर्म परिवर्तन करणे.
३) लग्नाच्या आडून धर्म परिवर्तन करणे .
ह्याला आक्षेप आहे.
आणि वरून तिन्ही गोष्टीचा वापर हा सुनियोजित रिती नी होतो त्या पाठी संघटना असते.
त्या मुळे हा प्रश्न धर्म पाळण्याचे स्वतंत्र ह्या सदरात येत नाही.
तर धर्म परिवर्तन करण्यासाठी कट कारस्थान करणे ह्या सदरात येते.
आणि हे गुन्हेगारी कृत आहे.
त्या कृत्याला राज्य घटनेचा हवाला देवून पवित्र करता येणार नाही.
आणि राज्य घटनेला सुद्धा ते अपेक्षित नाही.

चौकस२१२'s picture

14 Jun 2021 - 10:00 am | चौकस२१२

मी (एक कल्चरल हिंदू) स्वतःला ख्रिस्ती म्हणू शकतो काय ?
तुम्ही हवे ते म्हणू शकाल . पण हा प्रश्न ख्रिस्ती धर्म गुरूला जरूर विचारणा.. ते नक्की म्हणतील... " अरे मांनसा कल्चरल हिंदू तरी कशाला रे .. ये आमच्यात ये .. पूर्णत्वाने ये .." आणि तयात त्यांचे हि काही चुकणार नाही म्हणा.. अशी दुहेरी स्थिती आपली झाली आहे त्यांची नाही
अभ्यास म्हणून / कुतूहल म्हणून कोणत्याही धर्माचा अभ्यास करावं .. त्यात काही वावगं नाही
आणि हिंदू असू शकाल किंवा "नॉन प्रक्टीसिंग हिंदू " असू शकाल पण अशी भेसळ काय समजत नाही
भारतातात आणि इतर देशात कुतुहूल म्हणून आणि स्थापत्यशास्त्रराचे नमुने म्हणून आपण कोणत्याही मशिदीत किंवा चर्च मध्ये जायला तयार आहोत आणि केले आहे .. त्याने अर्हताःतच माझा जन्माचा धर्म बुडत नाही पण असले दोन्ही दगरीवर पाय ठेवण्याची गरज भासत नाही
आणि दुसरे म्हणजे ( स्वतःचं स्वार्थसाठी _ अडचणीत आल्यावर मला जर देवाचा धावा कार्याचा असेल तर मी माझ्य धर्मातील देवाचा कारेन दुसरया कशाला ? उगाचच?

कॉमी's picture

14 Jun 2021 - 5:43 pm | कॉमी

१. ख्रिस्ती धर्मगुरुकडे मी का जाईन ? मला ख्रिस्त्यांचा आणि फॉरदॅटमॅटर कोणाचाही धर्म काय सांगतो याच्याशी देणेघेणे नाही आहे. मी "एखाद्या धर्माचा असणे म्हणजे काय असते ?" हा प्रश्ण सामाजिक दृष्टिकोनातून पाहात आहे, धार्मिक किँवा कायदेशीर नाही. मी स्वत:ला कायदेशीर रित्या काहीही म्हणू शकतो हे तर मला माहीतच आहे. पण कायदेशीर आणि सामाजिक दृष्टिकोनात काही फरक आहे का- हे मी समजण्याचा प्रयत्न करतोय. मी हेच विचार्तोय तुमचा धर्म कोणता हे पाहण्यासाठी काही निकष असतात का ? , माझे म्हणणे आहे बहुदा नसतात. हे सेल्फ सर्टिफायडच असते.

त्याने अर्हताःतच माझा जन्माचा धर्म बुडत नाही पण असले दोन्ही दगरीवर पाय ठेवण्याची गरज भासत नाही

दोन डगरी तुम्हाला वाटत असू शकतात. मला नाही वाटत. कारण तुम्ही कोणत्या डगरीवरचे आहात याला तुमच्या म्हणण्याशिवाय दुसरा निकष नाहीच. भौतिक क्रिया- चर्च मध्ये जाणे आणि देवळात पण जाणे, हे तुमच्या दृष्टीने दोन डगरीवर पाय ठेवणे नाही, पण मी माझ्याच तोंडाने स्वतःलाच काय म्हणतो हे दोन डगरी वरचे झाले ह्यात अत्यंत विनोदी विरोधाभास नाही काय ??? धर्म बुडत वैगेरे तर अर्थातच नसतो, दुसरे कोणीही तुम्हाला (आजकाल) धर्म बुडवणारे म्हणुन निष्कासीत करु शकत नाही. जे करु पाहातात त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचे स्वातंत्र्य कायद्याने सर्वांना दिले आहे.

२. नॉन प्रॅक्टिसिंग म्हणजे काय ही व्याख्या सुद्धा वेळेनुसार बदलत गेली आहे असे वाटते. आज नॉन प्रॅक्टिसिंग म्हणजे फक्त सणावारात,जे बेसिकली आनंदासाठीच असतात, त्यात भाग न घेणे म्हणजे नॉन प्रॅक्टिसिंग हिंदू असेल तर बार खुपच खालावला आहे असे दिसते. पूर्वीचा बार बघायचा झाला तर आत्ता माझ्या डोळ्यासमोर आनंदी गोपाळ सिनेमाचे उदाहरण येते. पत्नीला शाळेत जाता यावं म्हणुन गोपाळ ख्रिस्ती होण्यास तयार असतो. त्याच्या हिंदू आणि ब्राम्हण असण्यामध्ये समाजाची अपेक्षा सामावली असते की स्त्रियांनी उच्चशिक्षण घेऊ नये. आज तशा काही अपेक्षा हिंदू/मुस्लीम/ख्रिस्ती होण्याकडून आहेत काय ? की तुम्ही ख्रिस्ती असाल तर तुम्ही अमुकतमुक करणे/न करणे अपेक्षित आहे, अन्यथा तुम्हाला स्वत:ला हिंदू/ख्रिस्ती/मुस्लिम म्हणवुन घेता येणारच नाही ? (पुनः, अश्या अपेक्षा समाजाकडून आहेत का ? हा प्रश्न आहे. धार्मिक ग्रंथांकडून आहेत का हा प्रश्न नाही.)
बघा, मी दिवाळी दसरा साजरा करतो म्हणुन मला प्रॅक्टिसिंग हिंदू होता येते, ते नाही केले तरी माझा धर्म बुडाला असे आता कोणी म्हणणार नाहीच. हिंदू असण्यामागे हिंदू तत्वज्ञान वाचले पाहिजे ह्या गोष्टी नाहीतच का ? म्हणजे मी कुठल्या काळात काय वस्तूंचा आस्वाद घेतो इतकीच धर्माची प्रॅक्टिस शिल्लक आहे काय ?

३. आणि हिंदू असू शकाल किंवा "नॉन प्रक्टीसिंग हिंदू " असू शकाल पण अशी भेसळ काय समजत नाही.

भेसळ मिश्रण मी चर्च मध्ये जातो, ख्रिस्ती कल्चरचा आस्वाद घेतो इथेच झाली आहे. त्यानंतर मी स्वतःला काय म्हणतो, ख्रिस्ती, हिंदू, किंवा धर्म-फ्ल्युइड- हे फक्त लेबल झाले. लेबल मी स्वतःच स्वताला देत आहे. ते मी हवे तेव्हा बदलू सुद्धा शकतो. त्या लेबलला कितपत महत्व आहे ?

४. हे सर्व भौतिक आहे आणि साहजिक आहे. पण याचा अर्थ आपण ख्रिस्ती "झालो" असे नक्कीच नाही.

समाजाच्या, किंवा समाजाचा भाग असणार्‍या (उदा.-तुमच्या) दृष्टीने ख्रिस्ती असण्याचे काय निकष आहेत ? माझ्यामते उत्तर- मी ख्रिस्ती आहे असे म्हणणे हा एकुलता एक निकष. जर ख्रिस्ती कल्चरमध्ये सहभाग घेऊन सुद्धा व्यक्ती ख्रिस्ती होत नसेल, तर मग सेल्फ-डिक्लेरेशन हाच निकष झाला. आज काल, धर्माची प्रॅक्टिस म्हणजे एखादे तत्वज्ञान समजून त्यावर विश्वास असणे ही संकल्पना हळूहळू आटत जाऊन तुम्ही कोणत्या गोष्टी खाता, अंगावर घालता, कोणते सण साजरे करता याकडे चालली आहे. आणि तुम्ही त्यापेक्षा भिन्न वस्तू खात/घालत/साजरा करत असला तरी आज कोणी तुम्हाला धर्मभ्रष्ट म्हणू शकत नाही.
निष्कर्ष- तुम्ही कोणत्या धर्माचे आहात याचा तुम्ही काय करता याच्याशी फार कमी संबंध आहे. तुम्ही काय म्हणता याच्याशीच सगळा संबंध आहे. तुमचा धर्म ही संपूर्ण पणे सेल्फ-सर्टिफायड गोष्ट आहे.

ह्या सगळ्यानंतर आलेला माझा धाग्याला अनुसरुन मूळ प्रश्न आणि सारांश;
१. एखादा माणुस एखाद्या धर्माचा आहे म्हणजे काय असते ?-
अ. सेल्फ सर्टिफिकेशन
ब. कल्चर- सण, कपडे, खानपान
क. तत्वज्ञान माहीत असने आणि त्यावर विश्वास असणे .
माझ्या परिने शोधलेले उत्तर- मिनिमम निकष हा (अ.) म्हणजे सेल्फ सर्टिफिकेशन हा असतो. मी दररोज चर्चला जाऊनसुद्धा ख्रिस्ती नाही असे असू शकते. चर्चला एकदाही न जाता ख्रिस्ती आहे असे सुद्धा म्हणू शकतो. हिंदू तत्वज्ञान (उदा. अद्वैतवाद.) कशाशी खातात माहित नसून सुद्धा तुम्ही हिंदू असू शकता. नास्तिक असून्सुद्धा कल्चरली हिंदू/मुस्लिम्/ख्रिस्ती असू शकता. (माझ्यासारखे.) म्हणुन- फक्त आणि फक्त सेल्फ सर्टिफिकेशन.

पुढे-

घरवापसीत काय अपेक्षित आहे ?
१. सेल्फ सर्टिफिकेशन बदलणे ? अबक लेबल काढून कडई लेबल चिकटवणे ?
२. कल्चर बदलणे ? मग जे लेबल अहींदू लाऊन कल्चरली हिंदूच आहेत त्यांचे काय ?
३. की धर्माचा आभ्यास करणे आणि त्यानुसार आयुष्य अवलंबणे- जे पुश्कळ हिन्दू लेबलवाले- ( उदा.- मी.) सुद्धा करत नाहीत ?

चौकस२१२'s picture

16 Jun 2021 - 3:58 pm | चौकस२१२

कॉमी, कदाचित माझा पहिला प्रतिसाद आपल्यावर टीका केल्या सारखा झाला ... हेतू तो नवहता
तो प्रतिसाद तसा होता कारण तुमचा प्रश्न नीट कलळा नव्हता त्यानंतर थोडा कळतोय म्हणे पर्यंत तुमचं हा सविस्तर प्रतिसादाने अजूनच गोधळात टाकले ...
तुमचा धर्म ही संपूर्ण पणे सेल्फ-सर्टिफायड गोष्ट आहे. असे असेल तर मग नक्की व्याख्या होऊ शकत नाही .. या चर्चेला पण फार अर्थ उरत नाही असे वाटते प्रत्येकाचे "सर्टिफिकेशन" वेगळे असू शकत १८०° अशातून !
तरी जाता जाता
- माणूस ३-४ पदतीने स्वतःच्या "धार्मिक ओळखीचे" वर्णन करू शकतो
१) संपूर्ण धार्मिक/ नास्तिक
२) साक्स्क्रुतीने फक्त अमुक धर्माचा / किंवा जास्त योग्य शब्दात म्हणजे सामाजिक ओळखीने अमुक धर्माचा ( मी नेहमी मांडले आहे कि मी अजिबात धार्मिक नाही केवळ सामाजिक दृष्टया हिंदू आहे + जन्मले आणि वाढलो म्हणून चालीरीती / सवयी म्हणाल तर हिंदय गाभा पण तो हि विरळ झालेला )
३) स्वीकारलेल्या धर्माचे काटेकोर पालन करणारा ...

कॉमी's picture

17 Jun 2021 - 10:32 am | कॉमी

नाही हो, तुम्ही टीका केली असे मला नाही वाटले. चिल.

असे असेल तर मग नक्की व्याख्या होऊ शकत नाही .. या चर्चेला पण फार अर्थ उरत नाही असे वाटते प्रत्येकाचे "सर्टिफिकेशन" वेगळे असू शकत १८०° अशातून !

एक्साक्टली ! मला वाटते असेच असते, आणि असावेसुद्धा.

चौकस२१२'s picture

14 Jun 2021 - 10:19 am | चौकस२१२

ख्रिसमसला चर्चचा अँबियन्स आवडतो म्हणून जातो, तेव्हा ख्रिस्ती कल्चरचा भाग असतो. मग मी धर्म-फ्ल्यूईड झालो काय ?
तुमचा प्रश्न जरा जास्त कळ ला...
हे सर्व भौतिक आहे आणि साहजिक आहे. पण याचा अर्थ आपण ख्रिस्ती "झालो" असे नक्कीच नाही
उदाहरण द्यायचे तर लाखो परदेशी भारतीयां प्रमाणे माझी पण गेली कित्येक वर्षे दिवाळी हिंदू बहुल प्रदेशात गेली नाही त्यामुळे ख्रिसमस ला वार्षिक सुट्टी + छान हवा ( दक्षिण गोलार्ध ) + एकूणच सगळी कडे सना सुडाचे वातवरण आणि हा देश फारसा धार्मिक नसाल तरी मुख्य प्रवाह ख्रिस्ती त्यामुले खाजगी आणि सरकारी उत्सव ख्रिस्ती सणवार / प्रथे वर बेतलेले त्यामुळे मला सुद्धा तेवहा एक प्रकारचा उत्साह / उत्सवी वाटते.. पण ते फक्त भौतिक ...ख्रिस्ती धर्माचा काह्ही संबंध नाही
दिवाळी चे किल्ले, गणपती ची आरास पाहायचो ते आता ख्रिसमस ची रोषणाई !

चौकस२१२'s picture

14 Jun 2021 - 10:22 am | चौकस२१२

अनि
धर्म-फ्ल्यूईड झालो काय
मलातरी तसे वाटत नाही .. ऐहक सुख घेतोय सणाचे वातवरण संख्या बहुल धर्माचे मग आपल्याला हि थोडे उत्साही वाटणे साहजिक आहे

हिंदू धर्मीय मुस्लिम किंवा Christan धर्मात जात आहेत ह्याचा विचार राज्य पातळीवर न करता गाव पातळीवर केला पाहिजे.
मी ज्या सातारा जिल्ह्यात राहतो तिथे जे दलित हिंदू उच्च वर्णीय हिंदू कडून पिळवणूक थांबावी आणि अपमान स्पद वागणुकी ला कंटाळून काही वर्षांपूर्वी बुद्ध धर्मात गेले त्या नंतर हिंदू धर्म सोडून मुस्लिम किंवा Christan झालेले एक कुटुंब ,व्यक्ती माझ्या तरी पाहण्यात आलो नाही.
मग नक्की कुठे धर्म परिवर्तन लोक करत आहेत?
तर आदिवासी समाजात जिथे खूप गरिबी आहे.कोणतीच सोयी सुविधा नाहीत.हिंदू धर्मीय संस्था त्यांच्या संपर्कात नाहीत त्यांना मदत करत नाहीत.
त्या लोकांना मदतीचे आमिष दाखवून परिवर्तन होत आहे.
आदिवासी लोकांनी धर्म बदलल्याची अनेक उदाहरणे मिळतील.
धर्म बदलला म्हणून त्यांचे रिती रिवाज बंद केले जात नाहीत त्या मुळे पुढील धोका पण त्यांच्या लक्षात येत नाही.
एका पिढीत स्वीकारलेल्या धर्माचे रीतिरिवाज पाळाच असे सांगत नाहीत.
एक दोन पिढ्या गेल्या नंतर हळू हळू ते पूर्ण नवीन धर्माचे पालन करतात .
आणि ते पण कट्टर पने.
मूळ मुस्लिम धर्मीय,ख्रिस्त धर्मीय लोकांपेक्षा जास्त कडवे असतात.

गुल्लू दादा's picture

13 Jun 2021 - 6:08 pm | गुल्लू दादा

धर्म बदललेले मूळ पेक्षा खूप कट्टर असतात. याच उदाहरण खूप जवळून पाहिलंय.

चौथा कोनाडा's picture

14 Jun 2021 - 5:11 pm | चौथा कोनाडा

धर्म बदललेले मूळ पेक्षा खूप कट्टर असतात. याच उदाहरण खूप जवळून पाहिलंय.

या वर तपशीलवार वाचायला आवडेल.
मी जे काही दोन चार धर्मांतरीत मराठी भाषीक पाहिले होते ते मागच्या दोन तीन पिढ्यांपुर्वी झालेले होते.
त्यांच्या वागणूकीत फार कट्टरपणा पहायला नाही मिळाला.
(माझ्या परभारे काही करत असतील असे काही जाणवले नाही)

हिंदु धर्म परतीची यशस्वी उदाहरणे देखील असतील तर वाचायला आवडेल.

कॉमी's picture

14 Jun 2021 - 5:19 pm | कॉमी

माझा अनुभव असाच आहे.

चौकस२१२'s picture

18 Jun 2021 - 7:08 am | चौकस२१२

काही गोष्टींवर पण अवलंबून आहे .. धर्म बदलल्या नंतर ती व्यक्ती १) अल्पसंख्यानक राहते कि २) अख्या समाजणेच धर्म बदलल्याने बहुसंख्यांक राहते तसेच शहरात अकि छोट्या गावात इत्यादी
विस्तृत करतो
- अल्पसंख्यानक भारतातील हिंदू बहुल भागात एखाद्याने धर्म बदललेलं तर त्याला स्वतःचा वेगळेपण जपणे भाग असते + नवीन धर्मातील " जुन्यआ " लोकांची पसंती मिळवणे हे जरुरीचे असते
- बहुसंख्यांक : इंडोनेशिया : मूळ अजिबात इस्लामी नसलेला देश च्या देश मुस्लिम धर्मांतरित झाला.. म्हणजे धर्मांतर झालेला बहुलच राहिला . मग वेगळे सिद्ध करणे कोणाची पसंती मिळवणे हे फार जरुरुचे नाही उलट "आम्ही धर्म बदलला तरी संस्कृती बदलेली नाही ( नोटेवर गंणपती , जकार्तात करून अर्जुनाचा भव्य पुतळा वगैरे ...) अशी टिपण्णी ( अरबांना उद्देशून ) इंडोनेशिया चाय राष्ट्राध्यक्षांनी केली होती ती प्रसिद्ध आहे ( अशी संस्कुर्ती सोडलेली नाही ची उद्धरे म्हणजे अलिबाग भागातील जु , किंवा मराठी भाषिक ख्रिस्ती ( प्रोटेस्टंट ) समाज

उद्या समजा भारतीय हिंदू आणि इंडोनेशियातीलबालीचे हिंदू एकत्र राह्यला लागले तर जरी धर्म एक असला तरी पुढे पुढे वेगळपणातून तेढ निर्माण होऊ शकते .. असो पण तो वेगळा विषय झाला

चौकस२१२'s picture

14 Jun 2021 - 9:29 am | चौकस२१२

किंवा याचप्रमाणे इतिहासात शिवरायांपासून पेशव्यांपर्यंत मराठा साम्राज्य असताना जे जुलमाने मुस्लिम/ख्रिश्चन बनले त्या सर्वांना पुन्हा हिंदू धर्मात का आणले नाही?
उत्तम कारण मीमांसा केली आहेत आपण
असे अनेकांचं मनात असले तरी लोकशाहीत तसे सक्तीने करणे शक्य नाही...
निदान आहेत त्या हिंदूंचे धर्मांतर थांबवणे या साठी प्रयत्न कऱ्याला पाहिजेतच पण ते सरकार नाही करू शकत .. ( फक्त सक्तीचे धर्मांतर होत असेल तर सरकार कारवाई करू शकते ) पण धर्मांतर सक्तीचे नाही असे भास्वने सोप्पे असावे .. म्हणून हे चालते

यातून सर्वात मोठा धडा हा ज्या हिंदूंना " यसे धर्मांतर यात वाईट काही नाही किंवा "काय फरक पडतो" असे वाटते यांनी घेतले पाहिजे .. पण ते तर डोळ्याला झापडे लावून बसली आहेत ... तलवार पाजळत इसिस आले कि ते हे बघत नाही कि तुम्ही जोशी / शर्मा, पाटील कि कांबळे कि मंडल आहात ते, तुम्ही "काफीरच "

धर्मांतर थाम्बवयाला हवे असे म्हणायला कोणी धर्मानंदः हिंदू असावे लागत नाही... फक्त एक सामाजिक प्रश्न या कडे पाहता यायचा प्रामाणिक पणा पाहिजे
अब्राहमीक धर्मांचे शतकानुशतके हेच प्रयत्न चालू आहेत कि इतरांना कसे अप्लायकडे वळवावे ...
हिंदू बसले आहेत बुवाबाजी आणि "आम्ही माता वाले " आम्ही शैव आणि आम्ही वैष्णव करीत किंवा मी केरळी आधी मी तामिळ आधी ... इत्यादी

भारतात जन्मले असते तर त्यांची विचारसरणी मुळ हिंदुच ठरवली गेली असती...

त्यामुळे हिंदुना सध्या जे धर्माच्या नावाखाली इतरांचे चालते ती धार्मीक न्हवे तर निव्वळ राजकिय बाब आहे ही गोष्टच उमजत नाही आणि ते अजुनही दोन धर्मातील तेढ इतकेच याचे अवलोकन करतात पण वस्तुस्थिती हि आहे आजच्या काळात दोन धर्मातील लोक धार्मिकतेसाठी म्हणुन इतर धर्मियांसोबत युध्द द्वेष ठेवत असतील तर त्यात धार्मीक/सांस्क्रुतिक प्रगती काहीही नाही हे फक्त राजकीय युध्द आहे आणी आपले अस्तित्व टिकवायला हे समर्पित भावनेने देशासाठी लढले पाहिजे

Rajesh188's picture

14 Jun 2021 - 2:47 pm | Rajesh188

भारतात जे सर्व धर्मीय राहतात त्यांची संस्कृती जवळपास सारखीच आहे.मुस्लिम पण ज्वारी ची भाकरी खातात आणि बाकी धर्मीय पण.
तेच सर्व बाबतीत आहे.
भारतात जे राहतात ते हिंदू संस्कृती चीच पाळतात .
देशाला धार्मिक द्वेष परवडणार नाही.
फक्त जबरदस्ती नी कोणी धर्म बदलत असेल ,धार्मिक बाबी थोपवत असेल,धर्माच्या नावखाली हिंसा करत असेल,धर्मव्या नावावर बाकी धर्मीय लोकांशी हिंसक वागत असेल तर अशा लोकांना कठोर शासन झालेच पाहिजे .
मग ते कोणत्या ही धर्माचे असू ध्या.
धार्मिक निष्ठा,धार्मिक तत्व,देव,मग ते कोणत्या ही धर्माचे असू द्यात त्याची कोणी टिंगल टवाळी करत असेल तर विचार स्वतंत्र ह्या नावाखाली ते सहन करता येणार नाही.
अत्यंत कठोर शिक्षा त्या साठी हवी
अगदी ईशा निंदा सदराखाली जी मुस्लिम राष्ट्रात दिली जाते तेवढीच कठोर शिक्षा हवी.
भारताला धर्मावर आधारित विभाजन परवडणार नाही .

चौथा कोनाडा's picture

16 Jun 2021 - 1:06 pm | चौथा कोनाडा

भारताला धर्मावर आधारित विभाजन परवडणार नाही
ते ऑलरेडी झालेय !
ठराविक गट, पक्ष सोडले तर इतरेजन हिंदू आपले शत्रू आहेत अश्या भावनेने काही घटकांची वेळोवेळी तळी उचलत असतात !
त्यामुळे सतत ध्रुवीकरण आणि सामजिक अशांतता नांदत असते.
माझ्या मते सध्याचे केंद्रसरकार हे टाळायचा प्रयत्न करुन पुढे जात आहे, हिंदुंना दिलासा देण्याचा प्रयत्न्न करत आहे !

चौकस२१२'s picture

18 Jun 2021 - 7:32 am | चौकस२१२

भारतात जे राहतात ते हिंदू संस्कृती च पाळतात .

क्षमा करा राजेश पण प्रत्यक्षात तसे आहे का? आणि किती %
तसे असते तर
- योगाचा प्रसार म्हणजे हिंदू धर्माचाच प्रसार अशी आरडा ओरडा काही अल्पसंख्यांकाकांकडून झाली नसती
- गोव्यात मराठी कोकणी वादात , मराठी म्हणजे जणू हिंदूंची पाठराखण आणि कोकणी ला पाठींबा म्हणजे जणू ख्रिस्ती धर्माची असले वातवरण का झाले असते?
भारताची नाळ हिंदू आहे हे उघडपणे मान्य कऱ्याला लोक का एवढी कचरतात ! मग त्यासाठी संघ परिवाराचे समर्थक असण्याची काह्ही जरुरी नसते !
उगाच अधे वेढे सामान्य माणसे हि घेतात आणि राजकारणी पण ..

हा हे खरे कि आपण भारतीयच आहोत हे अनके भारतीय वंशाच्या अल्पसंख्याकांना भारताबाहेर गेल्यावर कळते / उमगते
- गोव्याची ख्रिस्ती नेऊ झीलंड ला भेटलं: काय रे कुठलं.. मी ना मी ,,हा पोर्तुंगीज ! चार पेग झाल्यावर आला वळणावर
पाहिलेलं संवाद
१)
गोरा विचारतो: तुम्ही कुठले
देशी : मी ख्रिस्ती
गोरा : नाही तुम्ही कुठले
देशी: मी कॅथॉलिक
गोरा: नाही हो तुम्ही कुठले म्हणजे तुम्ही कोणत्या देशाचे / वंशाचे
देशी: हा तसा मी भारतीय ....
गोर आणि मी गालातल्या गालात हसतोय

२) भारतांबेहर नोकरीसाठीचा अर्ज भरतोय
प्रश्न: तुमची नागरिकता? उत्तर असले पाहिजे भारतीय , मी तसे लिहितो , डॅनिअल मात्र लिहितो भारतीय आणि कंसात ( कॅथॉलिक ) एक कानाखाली द्यवीशी वाटली त्याच्या . का रे बाबा प्रश्नात विचारलंय का तुझा धर्म? नागरिक विचारलाय ना ? मग लाज वाटत एकी आपण कोणीतरी वेगळे आहोत हे दाखवय्यांचेय !

- मध्य प्रदेशातील ख्रिस्ती ऑस्ट्रेल्यात भेटला ... एक दिवस म्हणला चर्च ला उत्सव आहेत फूड फेस्ट येणार का, गेलो .. सगळेच ख्रिस्ती पण प्रत्येक वेगवेगळ्या देशाचे आणि वंशाचे या बाब्याने अप्लाय फूड स्टॉल वर आनंदाने भारतीय ध्वज फडकवलेला शेजारी फिलिपिनो चा झेंडा वैगरे
- गोव्यातील ख्रस्ती ४ भाऊ सहकुटुंब ऑस्ट्रेलायत स्थलांतरित झाले.. त्यातील जास्त शिकलेलं आणि तरुण आपली भारत बरोबर नाळ कशी फारशी नाही हे सांगण्यात मशगुल.. दोन पेग झाल्यावर मोठा भाऊ तास कमी शिकलेले आणि वयात उशिराने स्तहलन्तर केल्यामुळे नीटसा जॅम ना बसवू शकलेला मात्र भावूक होऊन म्हणाला , माझ्य देहचि गावाची खूप आठवणे येत .. मी तिथलाच .. हे इकडे आलो खरा पण ते काही खरं नाही ... फरक बघा विचारात

- यूएई आणि सौदी मध्ये "अप्लाय धर्माचं देशात आलो म्हणून सुरवातीला हुरखून जाणारा भारतीय अल्पसंख्यानक हळू हळू समजून चुकतो कि आपण तसे उपरेच आहोत ! मग एरलिफ्ट झाल्यावर " व काय माझा देश "

अर्थात सर्व असे आहेत असे नाही .. आणि सर्वांवर शंका घेण्याची गरज नाही पण इंग्रजीत जी म्हण आहे कि "व्हेन पुश कम्स तो शोव्ह " देश आधी कि धर्म .. मग बघ काय उत्तर मिळते ते .. इंग्रजीत "अंडरकरन्त ".. असो
अल्पसंख्यायनक भारतीयांकडून चांगले अनुभव हि आले आहेत .. आणि हिंदू भारतीयांकडून (" यो नो व्हॉट " पद्धतीचे ) वाईट अनुभ हि आले आहेत

रात्रीचे चांदणे's picture

14 Jun 2021 - 3:07 pm | रात्रीचे चांदणे

हिंदू धर्मात घरवापसी करायची तर कोणी करायची? म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे ख्रिश्चन धर्मात चर्च मार्फत धर्मांतर केले जाते आणि बऱ्याच वेळा पैशाचं अमिश दाखवून धर्मातर केले जाते. म्हणजे चर्च ला कुठून तरी देणग्या मिळत असतील. हिंदू धर्मात अशी कोणती शाखा आहे का जी धर्मांतरवर काम करेल.

याला उत्तर आहे पण लोकांची मते जाणुन घेणे रोचक ठरेल...

हिन्दु हा शब्द आपल्या कोनत्या ग्रन्थात प्रथम आला? धर्म ही सन्कलपना आपल्याकदे नव्हती. आपन पाश्च्यातान्चे अनुकरन थाम्बवले पाहिजे.

सोत्रि's picture

15 Jun 2021 - 5:58 am | सोत्रि

ज्जे बात!

हिन्दु हा शब्द आपल्या कोनत्या ग्रन्थात प्रथम आला?

ह्या प्रश्नाचे उत्तर जेव्हा शोधण्याचा प्रयत्न होईल तो सुदिन!

- (धर्म म्हणजे निसर्गनियम असे मानणारा) सोकाजी

गॉडजिला's picture

15 Jun 2021 - 1:22 pm | गॉडजिला

धर्म म्हणजे निसर्गनियम हे सुध्दा कोणीतरी पढवलेच असेल ना ? की जिव, भौतीक व रसायन शास्त्रासंबंधी पुस्तके धर्मग्रंथ मानता ?

विषेशतः सद्य स्थितीवर चर्चा करताना यांना भुतकाळ तर हमखास आठवतो...

तुर्त ब्रम्हा, विष्णु , महेश वगैरे देवतांचे (वा त्यांच्या अवतार व पुराण कथात उल्लेखलेल्या इतर संबधित देवतांची) विवीधमार्गी उपासना जे करतात अथवा ज्यांचे पुर्वज करत होते व धर्मांतरीत झाले नाहीत ते सर्व हिंदुच होत. हे समजुन घेउन चर्चा करा... इतकं बेसिक स्पश्टीकरण द्यावे लागते ते चर्चा काय करु शकतील हा मुद्दा तुर्त बाजुला राहुदे.

गॉडजिला's picture

15 Jun 2021 - 1:40 pm | गॉडजिला

वरील देवता वा त्यांचे उपासक वगैरेनी दिलेल्या विवीध उपासनांचा तत्वज्ञानाचा परत स्विकार करुन त्यामार्गावर जमेल तितक्या निष्ठेने / ताक्तीने चालु लागणे ज्याची सध्य परीस्थीतीत अनिवार्य घटनात्मक कायदेशीर अधिक्रुतता म्हणुन सर्व सरकारी कागदपत्रांवर आपल्या धर्माचा हिंदु असा उल्लेख करणे होय.

ही अनिवार्य अशासाठी आहे की ही बाब तुम्हाला संविधानाने दिलेले कायदेशीर लाभ, निर्बंध वगैरे वगैरे गोश्टी लागू करते... याचा तुमच्या आत्मीक प्रगतीशी उघड संबंध जरी येत नसला तरी भारत देशात तुमच्या भौतीक जगातील ह्क्कांचे यातुन संरक्षण होते.

NiluMP's picture

15 Jun 2021 - 7:26 pm | NiluMP

vote bank democracy is new tool of these people, the best example is India and Europe?

Y there no terror attack in Japan and Russia and China and North Korea?

बाकी सर्व समाजाच्या समाजाच्या हितासाठी काम करणाऱ्या संस्था आहेत.त्या त्यांच्या धर्म बांधवांच्या मदतीला हजर असतात.
कोणी आजारी असेल गरीब असेल तर त्यांना मदत केली जाते.शिक्षणासाठी मदत केली जाते.
संकट काळी मदत कोणी करत असेल तर कोणी पण तिकडे आकर्षित नक्कीच होणार.
बहुसंख्य हिंदू असून ह्या देशात हिंदू च्या मदतीला येणाऱ्या हिंदू संघटना नाहीत.
जाती वरून हिंदू च हिंदू वर अन्याय करत आहेत.
संकट काळी हिंदू म्हणून कोणतीच हिंदू संघटना मदत करत नाही.
फक्त भावनिक आव्हान करणे वांझ पणाचे लक्षण आहे
हिंदू धर्म सोडत असतील तर त्याला हिंदू धर्मीय च जबाबदार आहेत

गुल्लू दादा's picture

16 Jun 2021 - 8:25 am | गुल्लू दादा

जो पर्यंत जातीभेद नष्ट होणार नाही तो पर्यंत हिंदू एकजूट होणार नाही. कठीण दिसतंय एकजूट होणं.

गॉडजिला's picture

16 Jun 2021 - 2:10 pm | गॉडजिला

हे जातीभेद प्रकरण धरलं तर चावतय अन सोडलं तर पळतय या क्याटेगरीत मोडते.

मी जातीभेद मानत नाही असे म्हणून याचे समाधान होऊ शकत नाही...

आणि जगातील याच्चावत धार्मिक लोकांना आजच्या काळात धर्म ही एक राजकीय बाब झाली आहे हे देखील मान्य होत नाही त्यामुळे... आपण अलिप्त होऊ यांची फक्त मजा बघायची या पलीकडे हाती फारसे काहीच नाही...

मग ती वर्चस्वाची भावना जाती मधून व्यक्त होतें.
भाषेवरून हीच भाषा श्रेष्ठ ही भावना असते.
रंगा वरून वर्चस्व ची भावना असते गोरे हे श्रेष्ठ आणि काळे हे कनिष्ठ ही भावना पण मनात खोलवर रुजलेली आहे.
प्रंतावरून पण तीच भावना असते.
तीच पुढे जावून हा धर्म श्रेष्ठ की तो धर्म श्रेष्ठ असा वाद असतो.
आधुनिक विज्ञान च ह्या वर मार्ग काढेल.
जे गुणसूत्र ही श्रेष्ठ ची भावना निर्माण करते तेच गुणसूत्र शरीरात निष्क्रिय केले पाहिजे.
आणि माणसात असणारा आक्रमक पण निर्माण करणारी गुणसूत्र पण निष्क्रिय केली पाहिजे .
मुलाचा जन्म झाल्या बरोबर.

गॉडजिला's picture

16 Jun 2021 - 2:35 pm | गॉडजिला

निसर्ग नियम तोडायचा म्हणता ?

पाकिस्तान एक धर्मीय असून पण बंगला भाषिक मुस्लिम लोकांवर अनंत अत्याचार झाले.
जाती नष्ट झाल्या तरी दुसरे कोणते तरी कारण काढून अत्याचार होत च राहणार .
माणसात असणारा agressive पना कमी करावाच लागेल.

गॉडजिला's picture

16 Jun 2021 - 3:00 pm | गॉडजिला

युं वॉन्ट

मुक्त विहारि's picture

16 Jun 2021 - 11:28 am | मुक्त विहारि

चर्चा वाचत आहे...

मदनबाण's picture

17 Jun 2021 - 8:19 pm | मदनबाण

भारताचा नकाशा पाहिला तर गुजरातपासून ते प.बंगालपर्यंत किनारपट्टीच्या प्रदेशात ख्रिश्चन धर्मीयांचे प्रमाण जास्त आहे. किनारपट्टीच्या प्रदेशातच ख्रिश्चन धर्म इतका का पसरला असेल?
उत्तर पूर्व भारत { सेव्हन सिस्टर्स } हा देखील गळ्यात क्रॉस घालुन बसलाय की ! फार मोठ्या प्रमाणात तिथे धर्मांतर झालेल आहे. मदर तेरेसांना डोक्यावर घेतल गेल, मदर म्हणुन जणु काही या देशाची आई होउन उद्धार करायला आली होती असे वातावर कोणी निर्माण केले असावे ? [ कोणी तरी केल्या शिवाय ते झाले नाही, बरोबर? ]
ती मरणाच्या दारात असलेल्या देखील धर्मांतरीत करायची.. आणि आपल्या इथे आजच्या काळात देखील तिच्यावर कोणी अग्रलेख लिहला की *डीत शेपुट घालुन तो मागे घेतात आणि माफी वगरै मागतात... बाकीचे दिवस ते हिंदूंनाच अक्कल शिकवत असतात, तेव्हा त्यांच्यावर अशी वेळ का येत नाही ? असाही प्रश्न आपल्याला पडला पाहिजे ना ? [ नाही, त्याशिवाय *डीत शेपुट घालायला लावणारी शक्ती कोण ते सुद्धा कळेल ना या निमित्त्याने. ]

मुस्लिमांमधे धर्माचा पगडा इतका असण्याचं कारण काय असावं?
कारण त्यांना तसं तयार केलं जात... मदरसे हे त्याचे मूळ.
जर तुमची मानसिकता दुसर्‍या धर्मीयांच्या मुली / स्त्रीया पळवणे आणि तिचा भोग घेण हा अधिकार आहे अशी तयार केली गेली आणि उरलेले दुसर्‍यांच जे काही आहे ते लुटणं आणि कापणं याची तुम्हाला दिक्षा दिली जात असेल तर पगडा आवडीने फिट बसेल.
काश्मिर मधुन जेव्हा हिंदू कापले गेले आणि बायका उचलुन नेल्या तेव्हा देशातील किती मुसलमानांनी या विरुद्ध आंदोलने केली ? किती मुसलमान जनतेने पंडीतांना न्याय मिळावा म्हणुन आवाज उठवला ? हा.हा.हा... हिंदूंना अजुनही हे कळतं नाही की बकरीची खाटिका बरोबर मैत्री होउ शकत नाही !

जाता जाता :- अजुन फक्त पिढ्या [ आजच्या काळातले उदा. :- पहिल्या पिढीतल्या पृथ्वीराजाच्या घराणात तिसर्‍या पिढीतील स्त्री ने तैमूर जन्मास घातला. ] आजच्या नविन पिढीतील आणि पुढच्या पिढीतील हिंदू जर स्वधर्माप्रती कट्टर + धर्मांध , लढवय्ये झाले नाही तर त्यांच्या पुढील पिढीतील मुली आणि स्त्रिया नग्न करुन परत मंडीत विक्रीस उभ्या ठेवलेल्या दिसतील इतके नक्की ! पुन्हा नविन स्तंभ उभारला जाइल आणि त्यावर परत लिहले जाईल....दुख्तरे हिन्दोस्तान.. नीलामे दो दीनार.
*** मला खरंतर अपशब्द वापरायला अजिबात आवडत नाही, परंतु हिंदू भाटांना अजुन दुसरा शब्द वापरावा वाटला नाही त्या बद्धल क्षमस्व !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Victory is always possible for the person who refuses to stop fighting. :- Napoleon Hill

चौकस२१२'s picture

18 Jun 2021 - 7:43 am | चौकस२१२

मदनबाण... संकुचित समजले जाईल याची तमा ना बाळगता आपल्या म्हण्य्याशी १००% सहमत

इस्लाम आणि ख्रिश्चान धर्म जग पादाक्रांत करण्याचं प्रयत्न वर्षानुवर्षे करीत आहेत पण आपण हिंदू मात्र ह्रास बघणारं.
ध्रमन्ध होऊ नका पण केवळ एक सामाजिक हक्क म्हणून हे अतिक्रमण थम्बव बघा डोळे उघडे करून ..
उद्या भारतात हिंदूंचा मान राखण्याची नीती जर काँग्रेस ने ठेवली तरी चालेल ..
तो काही भाजपचा मक्ता नाही

मदनबाण's picture

18 Jun 2021 - 1:28 pm | मदनबाण

हिंदूंचा मक्ता कोणा एका पक्षाने नव्हे तर सर्व पक्षांनी घेतला पाहिजे, हा त्यांचा देश आधी आहे आणि नंतर इतर धर्मींयांचा देखील कारण ते धर्मांतरीत केले आहेत आणि जात आहेत.आक्रमकांनी केलेल्या आक्रमणामुळे हिंदू कापले गेले आणि धर्मांतरीत केले गेले आजही धर्मांतरीत केले जातात.
जिथे या देशात मुस्लिम धर्मांतरीत केले तसेच ख्रिश्चन देखील. आज युरोपची परिस्थिती डोळसपणे पाहिली तर त्यांना जे हिंदुंनी सहन केले / भोगले ते भोगावे लागत आहे आणि गंमत पहा की आपल्याकडे ख्रिस्ती धर्मांतर वेगाने झाले आणि होत असताना युरोपातील देशांना आता आपण ख्रिश्चन कसे राहु याची चिंता लागली आहे. या युरोपात अपवाद केवळ पोलंडचा आहे, पोलिश नागरिक आणि त्यांचे नेते या बाबतीत तडजोड करण्यास अजिबात तयार नाहीत.

नॉर्वे / स्वीडन मधील लोकांचे डोळे आता कुठे उघडले आहेत...

इतरही त्याच मार्गाने जात आहेत :-

आता आपली स्थिती...
इतिहास साक्षी आहे की हिंदू स्त्रियांची जितकी विटंबना केली गेली आहे तितकी कोणत्याच धर्मातील स्त्रियांची झालेली नाही आणि यापुढे भविष्यात जर परत ती तशी होउ नये असे जर हिंदूंना वाटत असेल तर त्यांनी पाउले उचललीच पाहिजेत.
नाहीतर परत आरोळ्या येतील...
दो दीनार..... दो दीनार... दो दीनार...हिन्दुओं की खूबसूरत औरतें.. शाही लडकियां.. कीमत सिर्फ दो दीनार.. ले जाओ.. ले जाओ.. बंदी बनाओ... एक लौंडी... सिर्फ दो दीनार.. दुख्तरे हिन्दोस्तां.. दो दीनार.. ! भारत की बेटी.. मोल सिर्फ दो दीनार.. !

जाता जाता :- पंतप्रधान वाजपेयी जेव्हा परराष्ट्र मंत्री होते तेव्हा त्यांनी अफगाणिस्तानला भेट दिली होती आणि ते स्वतः गझनी / गजनीला पहायला गेले होते. [ बहुधा तोच स्तंभ पाहण्यासाठी ज्यावर दुख्तरे हिन्दोस्तान, नीलामे दो दीनार हे वाक्य कोरलेले आहे. ]

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- “Whenever we want to combat our enemies, first and foremost we must start by understanding them rather than exaggerating their motives.” :- Criss Jami

1) हिंदू वर टीका हिंदू च करतात.
२) धर्मात ustav खूप महत्वाचे काम करतात.
पण सार्वजनिक गणेश उस्तवावर कोण टीका करत .
ना मुस्लिम करत ना ख्रिस्त.
हिंदू आणि हिंदू द्वेशी पुरगमी हीच लोक टीका करतात.
३) सोसायटी,सरकारी ऑफिस,कॉलेज इथे सत्यनारायण च्या पूजेला कधीच मुस्लिम आणि ख्रिस्त धर्मीय लोकांनी विरोध केला नाही.
हिंदू नाव घेतलेले पुरोगामी च करत असतात.
४) आयुर्वेद, वेद,गीता,ह्यांच्या वर टीका कोण करत.
पहिलं हिंदू असणारे पण आता धर्म बदलेले तरी नाव तीच ठेवलेली लोक.
मुस्लीम लोक नाही टीका करत.
हिंदू संस्कृती budavi म्हणून कोण प्रयत्न करत आहे हिंदू च.
देवळात जाणार नाहीत.
पूजा अर्चा करणार नाहीत.
आपल्याच प्राचीन संस्कृती वर टीका करणार.

इतरांना कृतीत बिजी अस्ल्याने त्याना टिका करायला वेळ कुठं आहे...

Rajesh188's picture

17 Jun 2021 - 8:47 pm | Rajesh188

हिंदू नी कोणत्याच राजकीय पक्षांच्या नादाला लागायची गरज नाही हिंदुत्व वादी म्हणून घेणारा पक्ष म्हणून स्वतःची ओळख सांगणाऱ्या पक्षाने सत्तेवर येवून सुद्धा हिंदू आर्थिक बाबतीत सक्षम होतील ह्या साठी विशेष काही प्रयत्न केले नाहीत.
हिंदू धरण वाढवा टिकाव म्हणून धर्माच्या पातळीवर च प्रयत्न करायला हवेत.

उपयोजक's picture

18 Jun 2021 - 9:35 pm | उपयोजक

palestine

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- “Photography is the story I fail to put into words.”:- Destin Sparks

हिंदू साठी भारत ही एकमेव भूमी आहे पृथ्वी च्या पाठीवर.हा भारत हिंदू बहुसंख्य देश आहे हिंदू साठी एकमेव सुरक्षित आणि हक्काचा देश आहे.
काश्मीर सोडले तर सर्व राज्याचे मुख्यमंत्री हिंदू आहेत.
हिंदू हिंदू असा सारखा गजर राजकीय पक्ष करत असतात त्यांनी हिंदू आर्थिक, शैक्षणिक,तंत्रज्ञान, मध्ये जगात सर्वोच्च स्थानी असावेत म्हणून किती तळमळी नी प्रयत्न केले.?
भारताच्या कानाकोपऱ्यात राहणारा हिंदू नागरिकाला त्याची प्रगती करता यावी म्हणून किती प्रयत्न केले?
हिंदू उद्योग पती ,हिंदू प्रशासकीय अधिकारी,हिंदू मंत्री ,ह्यांनी हिंदू प्रगत व्हावेत ,प्रबळ व्हावेत म्हणून काय प्रयत्न केले?
भारतातील खेड्यापाड्यात राहणाऱ्या नागरिक पासून शहर,महानगरात राहणाऱ्या हिंदू ना जगातील सर्वोत्तम जीवन जगता यावे म्हणून काय केले?
ह्या सर्वाची उत्तर आहे काहीच नाही केले.
उलट हा देश गरीब च कसा राहील म्हणून .
शेतकरी ,कामगार,ह्यांचे शोषण च केले.
भ्रष्ट कारभार करून देशातील नागरिकांना त्यांच्या हक्क पासून वंचित केले.
न्याय मिळण्यासाठी पण इथे वीस पंचवीस वर्ष वाट बघावी लागते.तो पण मिळेल ह्यांची खात्री नाही.
कसले हिंदू हिंदू करताय .फक्त सत्तेसाठी.
इथले हिंदू इतके धर्म प्रेमी असते तर भारताला आज सर्वोच्च स्थानी नेवून ठेवला असता.
कारण भारत हाच एकमेव भूमी हिंदू कडे आहे.
मुस्लिम लोकांना पण असेच मूर्ख बनवले त्यांच्या राजकीय पुढाऱ्यांनी.
मुस्लिम धर्माची जगात जास्त संख्या असून सुध्दा.
गरिबीत जीवन जगणाऱ्या लोकात मुस्लिम धर्मीय च असतील.
मुस्लिम लोकांचे एक पण राष्ट्र आर्थिक ,लष्करी
,सामाजिक ,बाबतीत जगात सर्वोच्च नाही.
त्या मुळे हिंदू संकटात,मुस्लिम संकटात अशी बोंब मारणाऱ्या लोकांकडे लक्ष न देणे हेच उत्तम.

जो राजकीय पक्ष ,संघटना हिंदू बलवान झाला पाहिजे .हिंदू चे हिंदुस्तान हे राष्ट्र जगात बलवान झाले पाहिजे असा प्रामाणिक हेतू म्हणून हिंदू एकजुटीचा मंत्र सांगत असतात.
त्यांनी घरोघरी जावून हिंदू च्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत.
ज्यांना गरज आहे त्यांना आर्थिक ,कायदेशीर मदत केली पाहिजे.
जे हिंदू उद्योगपती आहेत त्यांनी त्यांच्या कंपनीत,संस्थेत,दुकानात जे हिंदू काम करत आहेत त्यांचे आर्थिक शोषण करू नये.
प्रशासकीय अधिकारी ,पोलिस ह्यांनी हिंदू ना लगेच योग्य न्याय द्यावा.
हे ज्यांना जमत असेल त्यांनी च हिंदू हिताच्या गप्पा माराव्यात.
स्वार्थी हिंदू ना सत्ता मिळावी म्हणून शोषित लोकांनी सर्व दुःख ,अडचणी विसरून ह्या स्वार्थी लोकांना मदत करायची काही गरज नाही.
धर्म परिवर्तन करून मदत मिळत असेल तर हिंदू नी धर्म परिवर्तन का करू नये?

एक समाधानाची बाब म्हणजे ex-मुस्लीम समुदाय आहे

असं म्हटलं जातं की प्रिंटिंग प्रेस क्रिश्चन धर्म संपवला आणि सोशल मीडिया मुस्लिम धर्म संपवेल

असं म्हटलं जातं की प्रिंटिंग प्रेस क्रिश्चन धर्म संपवला आणि सोशल मीडिया मुस्लिम धर्म संपवेल

असं म्हटलं जातं की प्रिंटिंग प्रेस क्रिश्चन धर्म संपवला आणि सोशल मीडिया मुस्लिम धर्म संपवेल

बापूसाहेब's picture

20 Jun 2021 - 4:02 pm | बापूसाहेब

असं का म्हटलं जात ????
काही स्पेसिफिक कारणे???