घरपरती आणि त्यातील अडथळे
भारतात पहिला ख्रिश्चन धर्मोपदेशक इ.स.५२ साली केरळात आला. पहिले मुस्लिम आक्रमण इ.स.७११ मधे झाले. तेव्हापासून या धर्मियांकडून भारतात जबरदस्तीने किंवा पैशाचं आमिष दाखवून किंवा भ्रामक गोष्टी सांगून हिंदूंचे धर्मांतर करण्याचे यथाशक्ती प्रयत्न सुरु आहेत. ऐतिहासिक काळात मुस्लिम शासकांनी प्रामुख्याने तलवारीच्या जोरावर दहशत पसरवून तर ख्रिश्चनांनी तलवार,बंदूक आणि पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांमधे गायीची चरबी लावलेले पाव टाकून कितीतरी हिंदूंचे धर्मांतर केले. याव्यतिरिक्त हिंदू धर्मातील जातीच्या पिरॅमिडमधे सर्वात तळाशी असणार्यांना तुम्हाला हिंदू धर्मात सन्मानाची वागणूक मिळत नाही; आमचा धर्म दयाळू आहे. तुम्ही तो धर्म स्विकारा वगैरे सहानुभूतीपूर्ण भाषणे देऊन इजा न करता अशा लोकांचे धर्मांतर केले गेले. सद्य काळात तलवार,बंदूक यांच्याकरवी धर्मांतर करणे शक्य नसल्याने लव जिहाद मार्फत मुस्लिम बनवणे, आर्थिक मदतीच्या बदल्यात ख्रिश्चन बनवणे हे प्रकार अजूनही सुरु आहेत. यातही ख्रिश्चन धर्मप्रसारक हे आघाडीवर आहेत. हिंदू मंदिरांप्रमाणे चर्चची रचना करणे, येशुला हिंदू पद्धतीप्रमाणे पुजा करणे हे प्रकार सातत्याने होतात. आता तर यापुढे जाऊन हिंदू मंदिरामधेच ख्रिश्चन धर्मातल्या खुणा घुसडणे हा प्रकार दक्षिण भारतात फार होतो आहे. तिरुपतीच्या बालाजी मंदिराच्या कमानीवर नक्षीकामादरम्यान येशुचे क्रॉस लावले गेले होते. नंतर आक्षेप घेतल्यावर ते काढून हिंदू पद्धतीच्या श्रीफल असलेल्या कलशांची नक्षी जोडण्यात आली. काही वर्षांपूर्वी काही नन धर्मप्रसारासाठी तिरुपती मंदिर प्रांगणात पोहचल्याचं वाचलं असेल. केरळच्या सबरीमलाच्या मंदिरात हिंदूंनी जाऊ नये म्हणून तिथल्या ख्रिश्चनांनी आणलेल्या अडथळ्यांबद्दल आपण वाचलं असेलच. काही महिन्यांपूर्वी आंध्रप्रदेशात हिंदू मंदिरांची तोडफोड करण्याचा सपाटाच तिथल्या ख्रिश्चन धर्मीय आक्रमकांनी लावला होता.शेवटी आंध्रच्या मुख्यमंत्र्यांना (जे स्वत: ख्रिश्चनच आहेत) त्यांना या प्रश्नात लक्ष घालावं लागलं. अर्थात हे ढोंगच होतं. कारण याच जगनमोहन रेड्डी यांचे मामा हे कागदोपत्री हिंदू असून प्रत्यक्षात ख्रिश्चन आहेत. ते तिरुपती मंदिराच्या ट्रस्टवर महत्वाच्या पदावर आहेत. ही नेमणूक कोणामुळे झाली असेल हे सांगायला नको. त्यांच्या बोर्डावरील नेमणूकीला हिंदू संघटनांनी आक्षेप घेतला होता पण बहुदा कमी पडल्याने ते अजूनही तिथे आहेत. पुढच्या काही वर्षात केरळचा धर्मांतराचा वेग कमी होईल इतक्या वेगाने हे सुरु आहे. कागदोपत्री हिंदू पण प्रत्यक्षात ख्रिश्चन.
पैसे देऊन किंवा आजार बरा होणे याबद्दल भ्रामक गोष्टी सांगून भारतातले ख्रिश्चन धर्मोपदेशक धर्मांतर करत असतात. भारतात धर्मप्रसाराचा वेग मुस्लिमांच्या तुलनेत ख्रिश्चनांचा खूप जास्त आहे. मागे एका मोठ्या हिंदुत्ववादी नेत्याने ख्रिश्चन धर्मोपदेशक हे सायलेंट पॉयझनसारखे असल्याचे म्हटले होते.
तमिळनाडूत इंग्रजांच्या काळात आलेले ख्रिश्चन धर्मोपदेशक किती ढोंगी होते हे सांगणारा आर्किऑलॉजिस्ट एच नागास्वामींचा व्हिडिओ
https://youtu.be/N3D9_F83Gus
भारतात जितके मुस्लिम आहेत त्यातल्या जवळपास ९९% जणांचे पूर्वज हे हिंदू होते. तलवारीच्या जोरावरच यातल्या बहूसंख्यजणांचे धर्मांतर झाले आहे. काश्मीरमधे राजा हरिसिंग असताना तिथल्या मुस्लिमांनी हिंदू धर्म स्विकारण्याची तयारी दर्शवली होती.पण मुर्ख हिंदू धर्माचार्यांनी याला नकार दिला. सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक अल्लारखाँ यांचे पूर्वज मुळचे काश्मीरी ब्राह्मण. पण मुस्लिम बादशहाने त्यांच्या हिंदू राजाला मुस्लिम करु नये म्हणून त्याबदल्यात यांच्या पूर्वजांनी इस्लाम स्विकारला.
टिपू सुलतानने मेलुकोटे या गावच्या ३०० वैष्णव ब्राह्मणांची हत्या केल्यामुळे तिथे दिवाळी साजरी होत नाही. त्याबद्दलचा हा व्हिडिओ
https://youtu.be/F5FSA0bACZ8
धर्मांतर या विषयाबाबत देशात एक महत्वाचा भेद आहे. पंजाब,काश्मीर वगळता उत्तरभारत हा दक्षिण भारताच्या तुलनेत अफाट लोकसंख्या असलेला आणि कामासाठी देशात कुठेही जाण्याची तयारी असलेल्या लोकांचा प्रदेश. तर दक्षिण भारत हा उत्तर भारताच्या तुलनेत विकसित आणि कमी लोकसंख्या असलेला प्रदेश. दारिद्यामुळे ,लोकसंख्येमुळे टिकेचा धनी झालेला उत्तरभारत हिंदूधर्माला चिकटून राहणे याबाबत मात्र दक्षिण भारतापेक्षा कमालीचा सरस आहे. सद्यकाळात उत्तरभारतात उच्चवर्णीयांनी धर्मांतर केल्याची फार उदाहरणे नाहीत. याउलट धर्मांतर याबाबत दक्षिण भारतात अक्षरश: खेळखंडोबा झालेला अाहे. हिंदू धर्माबद्दल तुलनेने कमी असणारी आस्था हेच मुख्य कारण आहे. आंध्रात रेड्डी जातीच्या काही लोकांनी बर्याच वर्षांपूर्वी ख्रिश्चन धर्म स्विकारला आहे. रेड्डी ही आंध्रातली पूर्वीपासूनची उच्चवर्णीय आणि पैसे राखून असणारी जात आहे. तरीही धर्मांतर झाले आहे. दक्षिणभारतीय हे उ.भा च्या तुलनेत जास्त भावनिक किंवा हळवे असल्याने, सोशिकपणा कमी असल्याने धर्मांतरे होत असावीत.
यावरुन दक्षिण भारतीयांचा सोशिकपणा ठरवावा का?
https://www.google.com/amp/s/www.thehindu.com/society/no-glory-in-dying/article19644990.ece/amp/
नाही म्हणायला अगदी गेल्या काही वर्षांपासून भाजप दक्षिणेत बर्यापैकी काम करु लागल्यापासून काही स्थानिक हिंदू मुन्नानीसारख्या हिंदू संघटना अस्तित्वात आल्या आहेत. पण तत्पुर्वी हे फारसे नव्हते. दक्षिण भारतीय जो धर्म स्विकारतील तो श्रद्धेने पाळतात अगदी उ.भारतीयांना लाजवतील इतका. पण फक्त
गरीबी, आजारपण यामुळे नैराश्य आणि ख्रिश्चन किंवा मुस्लिम मुलगीच्या प्रेमात पडून तिचा धर्मबदलासाठी हट्ट हे तीन अडथळे नसतील तरच.
ए आर रहमान गरीबीमुळे किंवा बिकट परिस्थितीमुळे तर युवन शंकर राजा, अभिनेते AVM राजन असे दक्षिणेतले बरेच प्रसिद्ध मुळचे हिंदू लोक प्रेमात पडून मुस्लिम किंवा ख्रिश्चन झालेले आहेत. हा असला प्रकार बॉलीवूड किंवा एकूण उत्तर भारतात इतक्या पटकन घडत नाहीत. याबाबतीत उत्तरभारताचे कौतुक केलेच पाहिजे.
उत्तरप्रदेशात जसे मंदिर पाडून मशिद बांधली गेली होती तसेच चेन्नईतल्या मैलापूरच्या शंकराच्या मंदिराबाबत आहे. हे मंदिर सध्या जिथे आहे तिथे नव्हते. ते समुद्रकिनारी होते. ते जुलमी पोर्तुगीजांनी तोफा डागून पाडले आणि त्याठिकाणी चर्च उभारले.
http://indiafacts.org/the-mylapore-st-thomas-myth-that-doesnt-seem-to-die-part-2/
त्यानंतर १६ व्या शतकात सध्याचे मंदिर उभारले गेले. उत्तरप्रदेशातल्या लोकांनी जसा लढा देऊन मंदिर पुन्हा उभारत आहेत तसा मंदिराच्या मूळ जागेसाठी लढा तमिळ हिंदूंनी दिला नाही.
---------------------------------------------------------
धर्मांतर या अनुषंगाने काही प्रश्नदेखील आहेत. मिपावरच्या या विषयातल्या जाणकारांकडून याबाबत काही माहिती मिळावी.
१. ज्यांची किंवा ज्यांच्या पूर्वजांची धर्मांतरे ही त्यांच्या मनाविरुद्ध झाली आहेत अशा लोकांना पुनश्च हिंदूधर्मात परतण्याबद्दल शासकीय स्तरावर जोरदार प्रबोधन करता येऊ शकते का?
शासकीय स्तरावर का? तर ऐतिहासिक काळात भारतात हिंदूंची झालेली बहुतांश धर्मांतरे ही जबरदस्तीने झालेली आहेत. म्हणजे हा एकप्रकारे अन्यायच आहे. जसे इतिहासकाळात सामाजिक उतरंडीत उच्चवर्णीयांकडून झालेल्या अन्यायामुळे मागे पडलेल्या समाजांना आरक्षण देऊन पुढे आणले जाते तसेच या जबरदस्तीच्या धर्मांतराबाबत का होऊ शकत नाही? कारण त्याकाळी मनाविरुद्ध धर्म स्विकारलेला आहे. त्याकाळी घरपरतीची संधी मिळाली नाही किंवा शक्य झाले नाही. पण भारत स्वतंत्र झाल्यावर ही संधी मिळायला हरकत काय? संविधानानुसार भारतात कोणालाही कोणत्याही धर्म स्विकारण्याची मुभा आहे.पण हा कायदा झाला. त्या कायद्याला पोषक असे वातावरण नाहीये. म्हणजे अशा प्रकारे कायदेशीररित्या धर्म बदलता येतो ही माहिती ज्यांच्या पूर्वजांनी ऐतिहासिक काळात जुलमाने मुस्लिम किंवा ख्रिश्चन धर्म स्विकारला त्यांच्या सध्याच्या वंशजांपर्यंत पोहचली नसेल तर त्यांच्यापर्यंत ती पोहचवून पूर्वी झालेल्या अन्यायातून आज मुक्ती मिळवायला मदत करणे हे देशाच्या प्रशासनिक कारभारात यायला काय हरकत आहे? हे केल्यानंतरही ज्यांना मुस्लिम किंवा ख्रिश्चनच रहायचे आहे त्यांना राहू द्यावे.पण ज्यांना हिंदू धर्मात परतायचे आहे त्यांना शासकीय स्तरावरुन मदत मिळायला हरकत काय? त्यासाठी आधी तुम्ही हिंदू धर्मात परतू शकता हे प्रबोधन करणे ही पहिली पायरी आहे.
२. ऐतिहासिक काळी तत्कालीन सर्वच जातींमधे धर्मांतरे झाली आहेत. पण यात दलित,अस्पृश्य जातीच्या लोकांची संख्या भरपूर आहे. सामाजिक अन्यायामुळे किंवा भितीमुळे किंवा काही साशंकतेमुळे जसे की आपल्या जातीचे हिंदू लोक आपल्याला स्विकारतील का अशा शंकेमुळे धर्मबदलास विरोध करणे समजू शकतो.पण तत्कालीन उच्चवर्णीय जातीतल्या ज्या लोकांना जबरदस्तीने मुस्लिम किंवा ख्रिश्चन व्हावे लागले त्यांचे आजचे वंशज आजही मुस्लिम किंवा ख्रिश्चन आहेत. अगदी ब्राह्मणांसारखी जातीच्या पिरॅमिडमधे सर्वात वरच्या स्तरावर असणार्या जातीतले लोकही आजही मुस्लिम किंवा ख्रिश्चन आहेत.
https://en.m.wikipedia.org/wiki/Roman_Catholic_Brahmin
यांना काय म्हणणार? ब्राह्मण म्हणणार की ख्रिश्चन म्हणणार?
अगदी उदाहरण हवं असेल तर शफी इनामदार किंवा बॅरिस्टर अंतुले. कोकणात कुठेसा खान बहादूर पांगारकर मार्गही आहे म्हणे. या उच्चवर्णीयांच्या सध्याच्या वंशजांनी पुनश्च हिंदू धर्म न स्विकारण्याचे कारण काय असावे? की जी भिती वंचित जातींना आहे तीच यांनाही आहे? बाजीराव पेशवे - मस्तानी यांपासून जी वंशावळ सुरु झाली ती आजही मुस्लिमच आहे. त्यांनी बापाचा हिंदू धर्म स्विकारायला काय अडचणी असाव्यात?
३. भारतातले ख्रिश्चन धर्मोपदेशक आजार बरा करण्याच्या नावाखाली हिंदूंचे नदीत स्नान करुन बाप्तिस्मा करतात. वर असेही सांगतात की बाप्तिस्मा दिला म्हणजे धर्मांतर नव्हे. मग नक्की काय प्रक्रिया झाली की ख्रिश्चन धर्मात प्रवेश होतो? शिवाय अशी बरीचशी धर्मांतरे ही संबंधित शासकीय अधिकार्यापुढे जसे की मॅजिस्ट्रेट वगैरे होत नाहीत. ख्रिश्चन धर्मोपदेशक आणि तो धर्म स्विकारणारा या दोघांचा होकार मिळाला की झाले असा प्रकार होतो. अशा धर्मांतराला कायद्याने मान्यता नसेल तर पोलिस किंवा कायदेविषयक संस्था याकडे डोळेझाक का करतात? इतकी भरमसाठ धर्मांतरे कशी होतात? अशा धर्मोपदेशकांना अटक का होत नाही?
४. भारताचा नकाशा पाहिला तर गुजरातपासून ते प.बंगालपर्यंत किनारपट्टीच्या प्रदेशात ख्रिश्चन धर्मीयांचे प्रमाण जास्त आहे. किनारपट्टीच्या प्रदेशातच ख्रिश्चन धर्म इतका का पसरला असेल?
५. सद्यकाळात धर्मांतर करणार्या हिंदूंमधे गरीब,अशिक्षित हिंदूंचे प्रमाण जास्त असणे सहज शक्य आहे.पण काही वर्षांपूर्वी उल्हासनगरमधे हजारो सिंधी हिंदूंनी ख्रिश्चन धर्म स्विकारला.
https://www.google.com/amp/s/www.afternoonvoice.com/ulhasnagar-sindhis-drifting-away-from-hinduism.html
यामागचे नक्की कारण काय? कारण सिंधी हा समाज गरीबही नाही आणि अशिक्षितही नाही. व्यावसायिकतेत पुढारलेला हा समाज दीनवाणा,बापडा देखील नाही मग काय कारण आहे या धर्मांतराचं?
६. मुस्लिमांमधे धर्माचा पगडा इतका असण्याचं कारण काय असावं? गरीब हिंदू जर गरीबीला कंटाळून मुस्लिम किंवा ख्रिश्चन होत असेल तर हेच गरीब मुस्लिमांबाबत का होत नसेल? गरीबीला कंटाळून ते इस्लाम का सोडून हिंदू किंवा ख्रिश्चन का होत नसावेत?
७. केरळमधे हिंदूंची संख्या दिवसेंदिवस घटते आहे. आक्रस्ताळी मुस्लिम धर्मियांची तिथे दादागिरी बरीच वर्षे सुरु आहे. ख्रिश्चन धर्मोदेशकही सुखनैव काम करत आहेत. २०१४ पासून केंद्रात हिंदुत्ववादी विचारांचे सरकार आहे. केंद्राची ताकद ही नक्कीच राज्यसरकारपेक्षा जास्त असते. मग त्याच ताकदीचा वापर करुन भाजप केरळातल्या मुस्लिमांच्या, ख्रिश्चनांच्या या दादागिरीला आळा का घालू शकत नाही? किंवा याचप्रमाणे इतिहासात शिवरायांपासून पेशव्यांपर्यंत मराठा साम्राज्य असताना जे जुलमाने मुस्लिम/ख्रिश्चन बनले त्या सर्वांना पुन्हा हिंदू धर्मात का आणले नाही? नेताजी पालकरांना हिंदू धर्मात परत घेतले मग बाकीच्यांना का नाही?
८. सेंट झेविअर हा केरळमधे कमालीचा प्रभावी धर्मोपदेशक होऊन गेला. दिवसाला शेकडो जणांना ख्रिश्चन बनवायचा. याच्या नावाने इतक्या शाळा,महाविद्यालये असणे हे हिंदू धर्माला खिजवणे आहे का? एखाद्या कॉलेजचं नाव अौरंगजेब महाविद्यालय किंवा शाळेचं शाहिस्तेखान विद्यालय हे खपवून घेतले जात नसेल तर या सेंट झेविअरला झुकते माप का?
वर्गीकरण
वाचने
23995
वाचनखूण
प्रतिक्रिया
62
उत्तम मांडणी केली आहे. घर
In reply to उत्तम मांडणी केली आहे. घर by जानु
अवांतर
In reply to उत्तम मांडणी केली आहे. घर by जानु
@जानु
> सेंट झेविअर हा केरळमधे
In reply to > सेंट झेविअर हा केरळमधे by साहना
@साहना
बाजीराव पेशवे - मस्तानी
In reply to बाजीराव पेशवे - मस्तानी by गॉडजिला
@गॉडजिला
In reply to @गॉडजिला by उपयोजक
हिंदू धर्म श्रेष्ठ का आहे हे
प्रश्न- तुमचा धर्म समाजात कसा ठरतो ?
In reply to प्रश्न- तुमचा धर्म समाजात कसा ठरतो ? by कॉमी
@कॉमी
In reply to @कॉमी by उपयोजक
माझा प्रश्न तो नव्हता.
In reply to @कॉमी by उपयोजक
असो म्हणलंय तरीही,
In reply to @कॉमी by उपयोजक
तुम्ही चुकीच्या ट्रॅक वर जात आहात.
In reply to प्रश्न- तुमचा धर्म समाजात कसा ठरतो ? by कॉमी
मी (एक कल्चरल हिंदू) स्वतःला
In reply to मी (एक कल्चरल हिंदू) स्वतःला by चौकस२१२
हम्म.
त्याने अर्हताःतच माझा जन्माचा धर्म बुडत नाही पण असले दोन्ही दगरीवर पाय ठेवण्याची गरज भासत नाहीदोन डगरी तुम्हाला वाटत असू शकतात. मला नाही वाटत. कारण तुम्ही कोणत्या डगरीवरचे आहात याला तुमच्या म्हणण्याशिवाय दुसरा निकष नाहीच. भौतिक क्रिया- चर्च मध्ये जाणे आणि देवळात पण जाणे, हे तुमच्या दृष्टीने दोन डगरीवर पाय ठेवणे नाही, पण मी माझ्याच तोंडाने स्वतःलाच काय म्हणतो हे दोन डगरी वरचे झाले ह्यात अत्यंत विनोदी विरोधाभास नाही काय ??? धर्म बुडत वैगेरे तर अर्थातच नसतो, दुसरे कोणीही तुम्हाला (आजकाल) धर्म बुडवणारे म्हणुन निष्कासीत करु शकत नाही. जे करु पाहातात त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचे स्वातंत्र्य कायद्याने सर्वांना दिले आहे. २. नॉन प्रॅक्टिसिंग म्हणजे काय ही व्याख्या सुद्धा वेळेनुसार बदलत गेली आहे असे वाटते. आज नॉन प्रॅक्टिसिंग म्हणजे फक्त सणावारात,जे बेसिकली आनंदासाठीच असतात, त्यात भाग न घेणे म्हणजे नॉन प्रॅक्टिसिंग हिंदू असेल तर बार खुपच खालावला आहे असे दिसते. पूर्वीचा बार बघायचा झाला तर आत्ता माझ्या डोळ्यासमोर आनंदी गोपाळ सिनेमाचे उदाहरण येते. पत्नीला शाळेत जाता यावं म्हणुन गोपाळ ख्रिस्ती होण्यास तयार असतो. त्याच्या हिंदू आणि ब्राम्हण असण्यामध्ये समाजाची अपेक्षा सामावली असते की स्त्रियांनी उच्चशिक्षण घेऊ नये. आज तशा काही अपेक्षा हिंदू/मुस्लीम/ख्रिस्ती होण्याकडून आहेत काय ? की तुम्ही ख्रिस्ती असाल तर तुम्ही अमुकतमुक करणे/न करणे अपेक्षित आहे, अन्यथा तुम्हाला स्वत:ला हिंदू/ख्रिस्ती/मुस्लिम म्हणवुन घेता येणारच नाही ? (पुनः, अश्या अपेक्षा समाजाकडून आहेत का ? हा प्रश्न आहे. धार्मिक ग्रंथांकडून आहेत का हा प्रश्न नाही.) बघा, मी दिवाळी दसरा साजरा करतो म्हणुन मला प्रॅक्टिसिंग हिंदू होता येते, ते नाही केले तरी माझा धर्म बुडाला असे आता कोणी म्हणणार नाहीच. हिंदू असण्यामागे हिंदू तत्वज्ञान वाचले पाहिजे ह्या गोष्टी नाहीतच का ? म्हणजे मी कुठल्या काळात काय वस्तूंचा आस्वाद घेतो इतकीच धर्माची प्रॅक्टिस शिल्लक आहे काय ? ३.आणि हिंदू असू शकाल किंवा "नॉन प्रक्टीसिंग हिंदू " असू शकाल पण अशी भेसळ काय समजत नाही.भेसळमिश्रण मी चर्च मध्ये जातो, ख्रिस्ती कल्चरचा आस्वाद घेतो इथेच झाली आहे. त्यानंतर मी स्वतःला काय म्हणतो, ख्रिस्ती, हिंदू, किंवा धर्म-फ्ल्युइड- हे फक्त लेबल झाले. लेबल मी स्वतःच स्वताला देत आहे. ते मी हवे तेव्हा बदलू सुद्धा शकतो. त्या लेबलला कितपत महत्व आहे ? ४.हे सर्व भौतिक आहे आणि साहजिक आहे. पण याचा अर्थ आपण ख्रिस्ती "झालो" असे नक्कीच नाही.समाजाच्या, किंवा समाजाचा भाग असणार्या (उदा.-तुमच्या) दृष्टीने ख्रिस्ती असण्याचे काय निकष आहेत ? माझ्यामते उत्तर- मी ख्रिस्ती आहे असे म्हणणे हा एकुलता एक निकष. जर ख्रिस्ती कल्चरमध्ये सहभाग घेऊन सुद्धा व्यक्ती ख्रिस्ती होत नसेल, तर मग सेल्फ-डिक्लेरेशन हाच निकष झाला. आज काल, धर्माची प्रॅक्टिस म्हणजे एखादे तत्वज्ञान समजून त्यावर विश्वास असणे ही संकल्पना हळूहळू आटत जाऊन तुम्ही कोणत्या गोष्टी खाता, अंगावर घालता, कोणते सण साजरे करता याकडे चालली आहे. आणि तुम्ही त्यापेक्षा भिन्न वस्तू खात/घालत/साजरा करत असला तरी आज कोणी तुम्हाला धर्मभ्रष्ट म्हणू शकत नाही. निष्कर्ष- तुम्ही कोणत्या धर्माचे आहात याचा तुम्ही काय करता याच्याशी फार कमी संबंध आहे. तुम्ही काय म्हणता याच्याशीच सगळा संबंध आहे. तुमचा धर्म ही संपूर्ण पणे सेल्फ-सर्टिफायड गोष्ट आहे. ह्या सगळ्यानंतर आलेला माझा धाग्याला अनुसरुन मूळ प्रश्न आणि सारांश; १. एखादा माणुस एखाद्या धर्माचा आहे म्हणजे काय असते ?- अ. सेल्फ सर्टिफिकेशन ब. कल्चर- सण, कपडे, खानपान क. तत्वज्ञान माहीत असने आणि त्यावर विश्वास असणे . माझ्या परिने शोधलेले उत्तर- मिनिमम निकष हा (अ.) म्हणजे सेल्फ सर्टिफिकेशन हा असतो. मी दररोज चर्चला जाऊनसुद्धा ख्रिस्ती नाही असे असू शकते. चर्चला एकदाही न जाता ख्रिस्ती आहे असे सुद्धा म्हणू शकतो. हिंदू तत्वज्ञान (उदा. अद्वैतवाद.) कशाशी खातात माहित नसून सुद्धा तुम्ही हिंदू असू शकता. नास्तिक असून्सुद्धा कल्चरली हिंदू/मुस्लिम्/ख्रिस्ती असू शकता. (माझ्यासारखे.) म्हणुन- फक्त आणि फक्त सेल्फ सर्टिफिकेशन. पुढे- घरवापसीत काय अपेक्षित आहे ? १. सेल्फ सर्टिफिकेशन बदलणे ? अबक लेबल काढून कडई लेबल चिकटवणे ? २. कल्चर बदलणे ? मग जे लेबल अहींदू लाऊन कल्चरली हिंदूच आहेत त्यांचे काय ? ३. की धर्माचा आभ्यास करणे आणि त्यानुसार आयुष्य अवलंबणे- जे पुश्कळ हिन्दू लेबलवाले- ( उदा.- मी.) सुद्धा करत नाहीत ?In reply to हम्म. by कॉमी
सेल्फ सर्टिफिकेशन
In reply to सेल्फ सर्टिफिकेशन by चौकस२१२
नाही.
In reply to प्रश्न- तुमचा धर्म समाजात कसा ठरतो ? by कॉमी
ख्रिसमसला चर्चचा अँबियन्स
In reply to ख्रिसमसला चर्चचा अँबियन्स by चौकस२१२
अनिधर्म-फ्ल्यूईड झालो काय
थोडे विश्लेषण करावे लागेल
In reply to थोडे विश्लेषण करावे लागेल by Rajesh188
सहमत
In reply to सहमत by गुल्लू दादा
धर्म बदललेले मूळ पेक्षा खूप
धर्म बदललेले मूळ पेक्षा खूप कट्टर असतात. याच उदाहरण खूप जवळून पाहिलंय.या वर तपशीलवार वाचायला आवडेल. मी जे काही दोन चार धर्मांतरीत मराठी भाषीक पाहिले होते ते मागच्या दोन तीन पिढ्यांपुर्वी झालेले होते. त्यांच्या वागणूकीत फार कट्टरपणा पहायला नाही मिळाला. (माझ्या परभारे काही करत असतील असे काही जाणवले नाही) हिंदु धर्म परतीची यशस्वी उदाहरणे देखील असतील तर वाचायला आवडेल.In reply to धर्म बदललेले मूळ पेक्षा खूप by चौथा कोनाडा
+१
In reply to धर्म बदललेले मूळ पेक्षा खूप by चौथा कोनाडा
काही गोष्टींवर पण अवलंबून
किंवा याचप्रमाणे इतिहासात
In reply to किंवा याचप्रमाणे इतिहासात by चौकस२१२
जगातिल कोण्त्याही धर्माचे प्रणेते
सहमत आहे
In reply to सहमत आहे by Rajesh188
भारताला धर्मावर आधारित विभाजन
भारताला धर्मावर आधारित विभाजन परवडणार नाहीते ऑलरेडी झालेय ! ठराविक गट, पक्ष सोडले तर इतरेजन हिंदू आपले शत्रू आहेत अश्या भावनेने काही घटकांची वेळोवेळी तळी उचलत असतात ! त्यामुळे सतत ध्रुवीकरण आणि सामजिक अशांतता नांदत असते. माझ्या मते सध्याचे केंद्रसरकार हे टाळायचा प्रयत्न करुन पुढे जात आहे, हिंदुंना दिलासा देण्याचा प्रयत्न्न करत आहे !In reply to सहमत आहे by Rajesh188
भारतात जे राहतात ते हिंदू
हिंदू धर्मात घरवापसी करायची
In reply to हिंदू धर्मात घरवापसी करायची by रात्रीचे चांदणे
फार चांगला मुद्दा मांडला आहे
हिन्दु हा शब्द आपल्या कोनत्या
In reply to हिन्दु हा शब्द आपल्या कोनत्या by तिता
ज्जे बात!
In reply to ज्जे बात! by सोत्रि
धर्म म्हणजे निसर्गनियम हे
In reply to हिन्दु हा शब्द आपल्या कोनत्या by तिता
हिंदु कोण हा भल्या भल्यांचा चर्चीक वैचारीक गोंधळ आहे...
In reply to हिंदु कोण हा भल्या भल्यांचा चर्चीक वैचारीक गोंधळ आहे... by गॉडजिला
आणी घरपरती म्हणजे
अनिवार्य घटनात्मक कायदेशीर अधिक्रुतता
vote bank democracy is new
हिंदू आणि मुस्लिम सोडून
In reply to हिंदू आणि मुस्लिम सोडून by Rajesh188
सहमत
In reply to सहमत by गुल्लू दादा
:)
In reply to :) by गॉडजिला
वर्चस्वाची भावना अतिशय तीव्र आहे माणसात
In reply to वर्चस्वाची भावना अतिशय तीव्र आहे माणसात by Rajesh188
हे राम
In reply to हे राम by गॉडजिला
हो तोच एक खात्रीचा मार्ग आहे
In reply to हो तोच एक खात्रीचा मार्ग आहे by Rajesh188
बी द चेंज
रोचक धागा
भारताचा नकाशा पाहिला तर
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Victory is always possible for the person who refuses to stop fighting. :- Napoleon HillIn reply to भारताचा नकाशा पाहिला तर by मदनबाण
मदनबाण... संकुचित समजले जाईल
In reply to मदनबाण... संकुचित समजले जाईल by चौकस२१२
हिंदूंचा मक्ता कोणा एका
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- “Whenever we want to combat our enemies, first and foremost we must start by understanding them rather than exaggerating their motives.” :- Criss JamiIn reply to हिंदूंचा मक्ता कोणा एका by मदनबाण
हिंदू धर्म वाढवा म्हणून मी स्वतः काय करतो
In reply to हिंदू धर्म वाढवा म्हणून मी स्वतः काय करतो by Rajesh188
हिंदू वर टीका हिंदू च करतात. खरे आहे...
हिंदू नी
मार्मिक
हिन्दू तन-मन, हिन्दू जीवन, रग-रग हिन्दू मेरा परिचय!
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- “Photography is the story I fail to put into words.”:- Destin Sparksहिंदू साठी भारत ही एकमेव भूमी आहे
जो हिंदू बलवान पाहिजे
एक समाधानाची बाब म्हणजे ex
असं म्हटलं जातं की प्रिंटिंग
असं म्हटलं जातं की प्रिंटिंग
असं म्हटलं जातं की प्रिंटिंग
In reply to असं म्हटलं जातं की प्रिंटिंग by NiluMP
असं का म्हटलं जात ????
म्हणून??