हैदराबाद मध्ये कोणी दहावा तेरावा करणार पंडित माहीत आहे ?

एकुलता एक डॉन's picture
एकुलता एक डॉन in जनातलं, मनातलं
30 May 2021 - 7:35 pm

हैदराबाद मध्ये कोणी दहावा तेरावा करणार पंडित माहीत आहे ?

५ दिवसाआधी आजी ( आई ची आई एक्स पायर झाली ,गावाकडे ,
तिचा मुलगा ,माझा मामा ३ वर्ष आधीच गेला
तिचा माझ्यावर जीव होता ,त्यामुळे मला दहावा व तेरावा करायचा आहे
पण मी हैदराबाद मध्ये अडकलो आहे
कोणी मदत करू शकेल ?

संपादक मंडळ यांशी ,हा धागा प्रशोंत्तरे सदरात टाकायला पाहिजे पण गाम्भीर्य आणि लगो लगता म्हणून येथ टाकत आहे
समजून घ्यावे

समाज

प्रतिक्रिया

कंजूस's picture

30 May 2021 - 8:49 pm | कंजूस

सिटी बस.स्टँडजवळ, समोर मराठी मंडळ आणि मराठी वाचनालय आहे . तिथे उघडे असते तर काही काम झाले असते.
सध्या तिकडचा लॉकडाऊन कसा आहे माहिती नाही.

रमेश आठवले's picture

31 May 2021 - 9:24 pm | रमेश आठवले

मिपाचे सदस्य वामन देशमुख हैद्राबाद संबंधी लेख लिहीत असतात. त्यांना व्यनि करून बघा,

रमेश आठवले's picture

31 May 2021 - 9:24 pm | रमेश आठवले

मिपाचे सदस्य वामन देशमुख हैद्राबाद संबंधी लेख लिहीत असतात. त्यांना व्यनि करून बघा,

वामन देशमुख's picture

31 May 2021 - 9:40 pm | वामन देशमुख

एकुलता एक डॉन,

तुम्हाला व्यनी केला आहे.

सध्याचा काळ कोणती वेळ कोणावर कशी आणेल हे खरेच सांगता येत नाही. आपल्याला या दुख्खातुन पुढे चालत रहायचा मार्ग आणी शक्ति अवश्य लाभो _/\_

दैवजात ही दुख्खे भरता दोष ना कुणाचा, पराधिन आहे जगती पुत्र मानवाचा... दोष ना कुणाचा.

एकुलता एक डॉन's picture

1 Jun 2021 - 7:38 am | एकुलता एक डॉन

आजी जगाच्या व्यापातून सुटली , मामा दारुड्या होता ,माझे वडील एक्सपायर झाले त्या दिवशी पण दारू पिऊन नाचत होता
नोकरी केली नाही ,आजीच्या पैस्यातुन कपड्याचे दुकान टाकले ,मामी आणि मुलगा काम करायचे तो उंडारयाचा
बाकी २ मुलि,माझी आई पण त्या पण आजीला सांभाळायला तयार नव्हत्या ,नुकतेच मामाच्या मुलीचे लग्न झाले ती पण माहेरीच बसून आहे

त्यामुळे तिच्या जाण्याचे जास्त दुःख नाही ,देव देव करायची ,मोक्ष प्राप्ती तिला होणारच

शाम भागवत's picture

1 Jun 2021 - 8:29 am | शाम भागवत

त्यामुळे तिच्या जाण्याचे जास्त दुःख नाही ,देव देव करायची ,मोक्ष प्राप्ती तिला होणारच

🙏

एकुलता एक डॉन's picture

1 Jun 2021 - 8:15 am | एकुलता एक डॉन

वामन सर
व्यनि मिळाला
धन्यवाद

आमच्या गावाच्या गुरुजीं नुसार ४० दिवसापर्यंत विधी करायला मुभा आहे ,हैदराबाद मध्ये लोक डाऊन मध्ये अडकलोय त्यामुळे विकांताला करेल म्हणतो

काम सोपे होते.
"माझं काही करू नका, कावळेबिवळे बोलावू नका."

मदनबाण's picture

1 Jun 2021 - 9:09 pm | मदनबाण

तुमच्या दु:खाचा भार हलका व्हावा म्हणुन मी प्रार्थना करतो. _/\_

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Sometimes life hits you in the head with a brick. Don't lose faith. :- Steve Jobs

पाषाणभेद's picture

8 Jun 2021 - 5:25 am | पाषाणभेद

आदरांजली!
जाणारा जातो, पण मोठी पोकळी निर्माण करून जातो.

माझ्यामते 'श्रध्दायुक्त स्मरण म्हणजेच श्राद्ध !!'
त्यामुळे छा छू गीरी करण्याची गरज आहेच का ?
आयमीन दिवसबिवस.
भावना दुखवत नाहीये, मी ही माझ्या पिताश्री मातोश्रींचे श्राध्दवगैरे पहील्या वर्षापासून करत नाही.
जिवंत असतांना सर्व प्रेम / लाड पुरवले.
झाडामधे आणि माणसामधे फरक नसतो, जिवंत असतांना सावली व फळं देतात ,मेल्यावर खत किंवा इंधन होतो आपण.

पण तुम्ही शोधा पंडीतजी विधीवगैरे करणारे.
काळजी घ्या.