हे सगळं अघळपघळ आहे. कोठेही लिनियर फ्लो नाही, एकसंध विचारांची अखंड तैलधारावत कंटीन्युईटी नाही. जसं सुचत गेलं तसं लिहित गेलो. लिहिण्याचा उद्देश नाही हेतु नाही, हां , कधीं कधी आपलेच जुने लेखन वाचुन आपल्या विचारांचा प्रवास कसा झाला हे पाहायला आणि परत अनुभवायला मिळते ते एक भारी वाटते असा काहीसा थोडाफार भोंगळ उद्देश आहे असे म्हणता येईल . पण बाकी काही नाही, हे सारं स्वांन्त:सुखाय आहे !
______________
आनंद ही फार व्यक्ति सापेक्ष संकल्पना आहे. मान्य अगदी मान्य. ज्याची त्याची आनंदाची व्याख्या भिन्न असते. अगदी एकाच घरात जन्मलेल्या, एकाच आई वडीलांनी वाढवलेल्या सख्या भावंडांमध्ये आनंदाच्या व्याख्या वेगळ्या असु शकतात मग अगदी ते जुळे असले तरीही !
पण तरीही असं काही तरी आहे , अ कॉमन थ्रेड , एक समान धागा जो अगदी प्राचीन काळापासुन अगदी आजपर्यन्त अस्तित्वात आहे, आनंदाची एक व्याख्या , एक विचार जो कि अनेक अनेक लोकांच्यात समान आहे , अनेक लोकांनी तो समान अनुभव घेतला आहे , शब्दबध्द करुन ठेवलाय . मी त्या विषयी बोलतोय.
______________
भारतातील हिंदु समाजा मध्ये ढोबळमानाने दोन गट आहेत , एक ज्यांना २५०० -३००० वर्षांचा दैदिप्यमान इतिहास आहे, ज्यात साहित्य आहे संगीत आहे कला आहे तत्वज्ञान आहे उपनिषदे आहेत आनंद आहे ८०० १००० वर्षांचा अस्तित्वाचा संघर्ष आहे आणि त्या संघर्षात टिकुन उरलेले तावुन सुलाखुन निघालेले साहित्य आहे ! आणि दुसरा गट आहे की ज्यांच्यासाठी इतिहास म्हणजे केवळ शोषणाचा इतिहास आहे. अन नजिकचा २०० वर्षाचा इतिहास आहे ज्यात पाश्चिमात्य तत्वज्ञानाशी ओळख झालेली आहे अन नवीन निहिलिस्टिक विचारधारा पुन्हा उमगायला लागली आहे !
आता पहिल्या गटाला दुसर्याच्या आनंदाच्या व्याख्या कळणार नाहीत अन दुसर्याला पहिल्याचा कळणार नाहीत ! न कळो बापडे, आपण आधीच म्हणालो तसे - आनंद ही फार व्यक्तीसापेक्ष संकल्पना आहे !
_________________________
तसंही आपल्याला कोणाला काहीही पटवुन द्यायचं नाहीये . आनंद ही बायनरी संकल्पना आहे. ती कमी जास्त होत नाही. It is not about more or less. It is about completeness. त्यामुळे कोणाला काही सांगत बसण्याचा प्रश्णच येत नाही. हे सारं स्वांन्तःसुखाय आहे.
_________________________
बाकी बहुतांश लोकांना ह्या आनंदाची गरजच नाहीये . व्यवस्थित भौतिक सुखे असावीत , कोणत्याही विवंचना नसाव्यात , किमान आर्थिक तरी नसाव्यात , इतके जमले की लोकं सुखी असतात . मस्त खाऊन पिऊन खुष असावं , सणसमारंभ साजरे करावेत , लग्नं मुंज वगैरे कार्यात भारी भारी भरजरी साड्या दागिने घालुन मिरवावं, किंव्वा मोठ्ठ्या गाड्या घ्यावात , जमेल तेव्हा मित्रांसोबत दारु बिरु बईठक व्हावी , अधुन मधुन ट्रिप्स व्हाव्ह्यात , फॉरेन , थायलंड वगैरे झाल्यास बेस्टच ! एकुणच भौतिक जगात एक आर्थिक विवंचना नसल्या कि बेसिक सुखी होता येते .
पण फार मोजकी अशी माणसे असतात की ज्यांना ह्यासगळ्या मेलोड्रामाच्या पलिकडे जाऊन "आनंद म्हणजे नक्की काय ? व्हॉट अॅक्च्युअली मेक्स मी हॅप्पी ? " असा प्रश्न पडतो आणि त्याचे उत्तर शोधावेसे वाटते !
_________________
मला लहानपणापासुन प्रश्न पडायचा कि बहुतांश संत हे पुरुषच का असतात ? अध्यात्मासारख्या क्षेत्रातही पुरुषांची मक्तेदारी का ? स्त्रिया अगदीच नाहीत असे नाही, पण प्रमाणात पाहिलं तर अगदीच नगण्य ! असे का बरें असावे ?
हे जे आपण आनंदाविषयी बोलत आहोत , त्यासाठी एक प्रकारची कंसिस्टंसी ऑफ थॉट्स , विचारांची एकसंधता आवश्यक आहे. हे सातत्य राखणे स्त्रियांना पुरुषांपेक्षा जास्त अवघड आहे . निसर्गाने घालुन दिलेलं चक्र आहे, हामोन्सच्या उतारचढावांमुळे विचारांची एकाग्रता राखणे नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे. आणि विवाहित पुरुषांची आयुष्य अविभाज्यरित्या पत्नीशी जोडली गेलेली असल्याने त्यांनाही त्यांनाही ह्या हार्मोन्स च्या उतार चढावांचे परिणाम भोगावे लागतात. हां अर्थात तुकोबा एकनाथांच्या सारखे पुर्णपणे अलिप्त होणे हा पर्याय असतो पण तो महाकर्मकठीण योग आहे .
पण तुकोबांच्या सारख्या संपुर्ण वैराग्याने जमते हे निश्चित !
_________________
बाकी काहीही म्हणा पण हा अमृतानुभव एक अफलातुन ग्रंथ आहे. रादर कोणीतरी म्हणल्याप्रमाणे कदाचित ह्या विषयावरील इतका भारी ग्रंथ संस्कृतातही नाही. आता ह्या पाचव्या अध्यायात सत्चिदानंदपदत्रय विवरण केले आहे. सत म्हणजे पवित्र , चित म्हणजे समथिंग फुल्ल ऑफ लाईफ आणि आनंद म्हणजे आनंद ब्लिस्स!
सत्ता प्रकाश सुख । या तिहीं तीं उणे लेख ।
जैसें विखपणेंचि विख । विखा नाहीं ॥ ५-१ ॥
कांति काठिण्य कनक । तिन्ही मिळोनि कनक एक ।
द्राव गोडी पीयुख । पीयुखचि जेवीं ॥ ५-२ ॥
सत्ताचि कीं सुख प्रकाशु । प्रकाशुचि सत्ता उल्हासु ।
हें न निवडे मिठांशु । अमृतीं जेवीं ॥ ५-७ ॥
सत्ता म्हणजे स्वरुपसत्ता, प्रकाश म्हणजे ज्ञानाचा प्रकाश आणि सुख म्हणजे स्वानुभुतीचे सुख असे काहीसे, ह्या तिन्ही गोष्टी भिन्न दिसत असल्या तरी त्या भिन्न नाहीत. सत्ता हाच सुखाचा प्रकाश आहे की प्रकाश हाच सत्तेचा आनंद आहे आहे . जसे झळाळी कठिणपणा आणि सोनेपणा हे तिन्ही वेगवेगळे नसुन सोन्याचेच गुण आहेत , किंव्वा द्रव असणे , गोड असणे आणि अमृत असणे ह्या तीन्ही वेगळ्या गोष्टी नसुन एकच आहेत तसे !
तैसें असताचिया व्यावृत्ती । सत् म्हणों आलें श्रुति ।
जडाचिया समाप्ती । चिद्रूप ऐसें ॥ ५-१० ॥
दुःखाचेनि सर्वनाशें । उरलें तें सुख ऐसें ।
निगदिलें निश्वासें । प्रभूचेनि ॥ ५-११ ॥
एवं सच्चिदानंदु । आत्मा हा ऐसा शब्दु ।
अनन्यावृत्ति सिद्धु । वाचक नव्हे ॥ ५-१३ ॥
तसं मुळातच असत असे काही नाही हे सांगण्याकरता सत ह्या शब्दाचा उगम आहे आणि जड निर्जीव चेतनारहित असे काही नाही हे सांगण्या करता चित ह्या शब्दाचा उगम आहे. ( व्यावृत्ती म्हणजे एखाद्या गोष्टी अभाव नाही हे सांगणे) . मुळात दु:ख असं काही नाहीच बस आनंदच आनंद आहे हे सांगण्याकरता आनंद ह्या शब्दाचा उगम आहे !
म्हणुन सत्चिदानंद आत्मा हा शब्द अनव्यावृती अर्थात हे नाही त्याचे निराकरण करणारा आहे , आत्म्याचे वर्णन करणारा नव्हे !
आणि अचिदाचेनि नाशें । आलें जें चिन्मात्रदशे ।
आतां चिन्मात्रचि मा कैसें । चिन्मात्रीं इये ॥ ५-२९ ॥
ऐसें यया सुखपणें । नाहीं दुःख कीर होणें ।
मा सुख हें गणणें । सुखासि काई ? ॥ ५-३१ ॥
म्हणोनि सदसदत्वें गेलें । चिदचिदत्वें मावळलें ।
सुखासुख जालें । कांहीं ना कीं ॥ ५-३२ ॥
आतां द्वंद्वाचें लवंचक । सांडूनि दुणीचे कंचुक ।
सुखमात्रचि एक । स्वयें आथी ॥ ५-३३ ॥
वरी एकपणें गणिजे । तें गणितेनसीं ये दुजें ।
म्हणोनि हें न गणिजे । ऐसें एक ॥ ५-३४ ॥
तैसें सुखा आतोनि निथणें । तें सुखीयें सुखी तेणें ।
हें सुखमात्रचि मा कोणें । अनुभवावें ? ॥ ५-३५ ॥
मुळात अचित अर्थात चेतनारहित असे काही नाही हे सांगण्याकरता ज्या चित ह्या शब्दाची निर्मीती आहे तर मग त्याला चित असे कसे म्हणता येईल ? जिथे इतके सुख आहे की दु:ख म्हणजे काय ह्याची जाणीवही नाही तिथे सुख आहे हे म्हणण्याला तरी काय अर्थ ! म्हणुन असत नाही म्हणतो तेव्हा तिथेच सत हे देखील जाते, अचिद नाही म्हणतो तिथे चित जाते , जिथे दु:खच नाही तिथे सुख असे काही असण्याचा संभवच येत नाही ! आता हे द्वंद्वाचे सुख दु:ख ह्या द्वैताचे मिथ्याभान सोडुन जे उरले ते च आधीपासुन होते ते सुख आहे! पण ते सुख आहे अस म्हणताना त्या सुखाचा अनुभव घेणारा असा कोणातरी दुसरा आहे हा संभव निर्माण होतो म्हणुन ते आहे असे म्हणताही येत नाही! मुळात सर्वच सुख आहे तर सुख आहे हे अनुभव घ्यायला तरी दुसरं कोण उरलं ??
तैसें आपुलेनि सुखपणें । नाहीं जया सुखावणें ।
आणि नाहीं हेंही जेणें । नेणिजे सुखें ॥ ५-३७ ॥
आरिसा न पाहतां मुख । स्वयें सन्मुख ना विन्मुख ।
तेवीं नसोनी सुखासुख । सुखचि जें ॥ ५-३८ ॥
हे स्वरुप असं आहे की संपुर्ण सुख असल्याने तिथे त्याचा अनुभव घ्यायला दुसरा असा कोणी नाहीच , सर्वच सुख आहे , दु:ख असं काही नाहीच आणि हे नाहीच हे जाणायलाही कोणीही नाहीच ! जसं की आरसा पाहिला तर तुम्ही सन्मुख असता अन नाही पाहिला तरी विन्मुख असता असे काही असते का ? नाही ना ? मुख हे असतेच तसेच दु:ख नाही आणि सुख ही नाही असे काहीसे हे "सुख" आहे !
नाना नाशु साधूनि आपुला । बोधु बोधें लाजिला ।
नुसुधेपणें थोंटावला । अनुभउ जेथे ॥ ५-५८ ॥
आता ह्याचा अनुभव कसा यावा ? मुळातच हा जो बोध आहे त्याने बोध आहे ह्या बोधाचाही , अर्थात स्वतःचाही नाश करुन घेतला तर नाहीपणे उरला असा जो अनुभव तो! ते सुख ! अॅब्सोल्युट बिल्स्स !!
म्हणोनि बंधमोक्षाचें व्याज । नाहीं ; निमालें काज ।
आतां निरूपणाचें भोज । वोळगे जही ॥ ५-६६ ॥
आणि पुढिला कां आपणापें । वस्तु विसराचेनि हातें हारपें ।
मग शब्देंचि घेपे । आठवूनियां ॥ ५-६७ ॥
येतुलियाहि परौतें । चांगावें नाहीं शब्दातें ।
जही स्मारकपणें कीर्तीतें । मिरवी हा जगीं ॥ ५-६८ ॥
मुळात जिथे बंधन नाही तिथे मोक्ष असायचा संभवच नाही . दोन्हीचा नाश झाला अन हे निरुपण उरले ! पण ह्या निरुपणाच्या निमित्ताने , ह्या शब्दांच्या निमित्ताने विस्मरण झालेल्याला स्वरुपाचे स्मरण होते हे मात्र निश्चित ! पण परमात्म्याची स्मृती करुन देणारा , रादर आपण परमाता आहोत ह्याचे जे विस्मरण झाले आहे त्याचा नाश करणारा शब्द म्हनुन हा सच्चिदानंद शब्द मिरवत असला तरीही ह्या पेक्षा ह्याचा जास्त काही उपयोग नाही !
|| श्री कृष्णार्पणमस्तु ||
_________________
आता हे आहे हे असं आहे . हे कसं सांगणार कोणालाही समजाऊन ? आणि सांगायची गरज तरी काय ! दासबोधात अनुर्वाच्च समाधान नावाचा एक समास आहे ! समर्थांनी आधीच लिहुन ठेवलं आहे !
तुज वाटे हे जागृती । मज झाली अनुभवप्राप्ती ।
या नांव केवळ भ्रांती । फिटलीच नाहीं ॥ ५५॥
अनुभव अनुभवीं विराला । अनुभवेंविण अनुभव आला ।
हाही स्वप्नींचा चेइला । नाहींस बापा ॥ ५६॥
जागा झालिया स्वप्नऊर्मी । स्वप्नीं म्हणसी अजन्मा तो मी ।
जागेपणीं स्वप्नऊर्मी । गेलीच नाहीं ॥ ५७॥
स्वप्नीं वाटे जागेपण । तैशी अनुभवाची खूण ।
आली परी तें सत्य स्वप्न । भ्रमरूप ॥ ५८॥
जागृति यापैलीकडे । तें सांगणें केवीं घडे ।
जेथें धारणाचि मोडे । विवेकाची ॥५९॥
म्हणोनि तें समाधान । बोलतांचि न ये ऐसें जाण ।
निःशब्दाची ऐशी खूण । ओळखावी ॥ ६०॥
तुला वाटतंय की तुला ह्या आनंदाची प्राप्ती झालीय , जागृती झालेली आहे पण बाबा हे असं वाटणे हेच अजुनही तुझी भ्रांती फिटली नाही ह्याचे चिन्ह आहे. अमृताचा अनुभव आला , तो त्या अनुभवातच विरुन गेला, आता अनुभवाविरहीत असा अनुभव येत आहे असे वाटणे ही ही तु अजुन स्वप्नातच असल्याचे चिन्ह आहे ! जसं स्वप्नामध्ये स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नात तुम्ही जागे झालात तरी अजुनही तुम्ही स्वप्नातच आहात ना ! जेव्हा ह्या स्वप्नातुन जागे व्हाल तेव्हा बोलण्यासारखे काय उरणार आहे ? म्हणुनच समाधान हे अनुर्वाच्च अर्थात बोलुन दाखवण्यासारखे नाहीय .
जसं अज्ञानखंडण ह्या प्रदीर्घ अध्यायाच्या नंतरच्या ज्ञानखंडन ह्या अत्यंत छोटेखानी अध्यायात माऊली म्हणतात तसे की अज्ञान तर नाहीच नाही पण ज्ञानही नाही :
एवं ज्ञानाज्ञानें दोन्ही । पोटीं सूनि अहनी ।
उदैला चिद्गगनीं चिदादित्यु हा ॥ ८-१९ ॥
असो खुप पुढचा अध्याय आहे तो ! तुर्तास तुकोबांच्या ह्या अभंगाचा "अनुभव" घेऊ -
4139
स्थिरावली वृत्ती पांगुळला प्राण । अंतरींची खुण पावुनियां ॥1॥
पुंजाळले नेत्र जाले अर्धोन्मिलित। कंठ सद्गदित रोमांच आले ॥ध्रु.॥
चित्त चाकाटलें स्वरूपा माझारी । न निघे बाहेरी सुखावलों ॥2॥
सुनीळ प्रकाश उदैजला दिन । अमृताचें पान जीवनकळा ॥3॥
शशिसूर्या जाली जीवें ओंवाळणी । आनंदा दाटली आनंदाची ॥4॥
तुका ह्मणे सुखें प्रेमासी डुलत । वीरालों निश्चिंत निश्चिंतीने ॥5॥
________________/\________________
संदर्भ :
१) अमृतानुभव - सत्संगधारा http://satsangdhara.net/dn/amrut.htm
२) अमृतानुभव - हभप.दत्तराज देशपांडे संपादित - https://archive.org/details/amritanubhava_changdev_pasashti
३) अमृतानुभ - श्री. राजेंद्र वैशंपायन ह्यांच्या सुमधुर आवाजात ध्वनीफित - https://www.youtube.com/watch?v=0Pg8p6N0_u8
४) तुकाराम गाथा - https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A...
५) समान विषयावर असलेला समर्थांचा अप्रतिम ग्रंथ - आत्माराम - http://satsangdhara.net/db/atmaram.htm
___________________/\_____________________
(क्रमशः .... बहुतेक)
प्रतिक्रिया
17 May 2021 - 9:38 am | Bhakti
वाह!
नुकताच पाहिलेला इन्सेप्शन आठवला.
जसं स्वप्नामध्ये स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नात तुम्ही जागे झालात तरी अजुनही तुम्ही स्वप्नातच आहात ना !
हे जे आपण आनंदाविषयी बोलत आहोत , त्यासाठी एक प्रकारची कंसिस्टंसी ऑफ थॉट्स , विचारांची एकसंधता आवश्यक आहे. हे सातत्य राखणे स्त्रियांना पुरुषांपेक्षा जास्त अवघड आहे . निसर्गाने घालुन दिलेलं चक्र आहे, हामोन्सच्या उतारचढावांमुळे विचारांची एकाग्रता राखणे नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे.
याउलट स्त्रीयांकडे सातत्य अधिक असते असे मला वाटत..
17 May 2021 - 2:41 pm | गॉडजिला
याउलट स्त्रीयांकडे सातत्य अधिक असते असे मला वाटत..
म्हनजे मालकडे कंसिस्टंसी ऑफ थॉट्स कॉब पेक्षा अती असल्याने जेंव्हा ती स्व्प्नात मरुन स्वप्नातुन जागी झाली तेंव्हाही तीला आपण अजुन स्वप्नातच आहोत असे वाटले व त्यातुन जागे होण्यासाठी तिने खरेच आत्महत्या केली... हम्म्म दॅत इज अॅन इंतरेस्टींग थ्योरी तु कन्सीदर... ;)
17 May 2021 - 11:31 am | ज्ञानोबाचे पैजार
हा भागही आवडला, लिहित रहा...
पैजारबुवा,
17 May 2021 - 12:13 pm | खेडूत
आवडलं आहे.
जे विचार वाचताना किंवा चिंतनात येतात ते लिहून ठेवल्याचा फायदाच होतो. धन्यवाद.
17 May 2021 - 12:18 pm | धर्मराजमुटके
लेख आवडला पण स्त्रियांबाबतीत मांडलेला प्रश्न अजुनही अनुत्तरीतच आहे. कोणाला उत्तर सापडले असेल तर इथे लिहा प्लीज.
17 May 2021 - 2:49 pm | गॉडजिला
एकही गोश्ट जिच्य अस्तित्वाचा काडीचा पुरावा नसताना ती आहे असे ग्रूहीत धरुन तिचे कलात्मक तात्वीक सादरीकरण म्हणजेच तथाकथीत अध्यात्म होय...
तसं मुळातच असत असे काही नाही हे सांगण्याकरता सत ह्या शब्दाचा उगम आहे आणि जड निर्जीव चेतनारहित असे काही नाही हे सांगण्या करता चित ह्या शब्दाचा उगम आहे.
- म्हणजे काही नाही हे सांगण्यासाठीच दोन्ही शब्दांचा उगम आहे... वा... हॅवींग सेक्स फॉर वर्जीनीटी म्हणतात ते हेच प्रकरण असावे.
18 May 2021 - 11:20 am | प्रसाद गोडबोले
मी सहसा माझ्या लेखनावर प्रतिसाद देत नाही कारण मला कोणालाही काहीही पटवुन द्यायची गरज वाटत नाही .
पण , गॉडजिला , तुमचे इथले प्रतिसाद, मिपावरील अन्यत्र प्रतिसाद , शब्दांची निवड आणि एकुणच वर्तणुक पाहुन उत्सुकता चाळवली , तुमचे जरा आडनाव सांगता का ? तुम्ही दुसर्या गटातील असावेत असा एक प्राथमिक अंदाज बांधलेला आहे, तो जरा तपासुन पहावा असे म्हणतो !
अर्थात कोणत्याही गटातील असलात तरी काहीही हरकत नाही , सहज कुतुहल वाटले म्हणुन विचारलें.
जन देव तरी पाया चि पडावे | त्याचिया स्वभावे चाड नाही ||१||
अग्नीचे सौजन्य शीतनिवारण | पालवी बांधोनि नेता नये ||२||
तुका म्हणे विंचु सर्प नारायण | वंदावे दुरोन, शिवो नये ||३||
:)
18 May 2021 - 1:27 pm | गॉडजिला
तुमचे जरा आडनाव सांगता का ? तुम्ही दुसर्या गटातील असावेत असा एक प्राथमिक अंदाज बांधलेला आहे, तो जरा तपासुन पहावा असे म्हणतो
हाच तर प्रमुख प्रॉब्लेम आहे. ज्याचा जवळ खरे ज्ञान आहे त्याच्याकडे देण्यासाठी मार्ग आणी करुणा या दोनच गोष्टी उरतात.... मग समोरचा व्यक्ती दरोडेखोर असो की चक्रवर्ती सम्राट, सोन्याचा व्यापारी असो की स्मशानात राबणारा असो.. चोर असो की न्यायमुर्ती असो वा इतर कोणीही... ज्ञानी माणसाच्या अनुभवाला सर्व भेदरहीत दिसतात प्रयत्न करुनही तो त्यांच्यात भेद/गट/ आडणाव ओळख करु शकत नाही म्हणून सर्वाना केल्या जाणार्या उपदेशात त्याच्या कधी फरकही येत नाही. तो व्यक्ती व्यक्तीत कसलाही भेदच करु शकत नसल्याने सर्वाना समान वागणूक , समान उपदेश व समान मार्ग उपलब्ध करतो...
या उलट ज्याच्याकडे समग्र ज्ञानाची अनुभुती नाही (पण ती आहे असा गर्व आहे) तो माणसा माणसात वर्ण, आडणाव, पत्, प्रतिष्ठा यांचे भेद उभे करतोच वर त्याला अध्यात्मीक अनुष्ठानही देतो कारण निखालस ज्ञान त्याच्याकडे उपलब्ध नसते....
18 May 2021 - 2:41 pm | प्रसाद गोडबोले
ओके.
ज्याअर्थी आपण साध्या सोप्प्या प्रश्नाला सरळ उत्तर द्यायच्या ऐवजी फाटे फोडत भलतीकडेच विषय नेला आहे त्यावरुन माझा तर्क बरोबर च होता असे गृहीत धरत आहे !
धन्यवाद :)
18 May 2021 - 3:48 pm | गॉडजिला
त्यामुळे कोणता प्रश्न सोपा व कोणते सुस्पश्ट उत्तर फाटेफोड हे तुम्हीच ठरवणार,
तसंही आपल्याला कोणाला काहीही पटवुन द्यायचं नाहीये म्हणजेच कोणाचे काही पटवुनही घ्यायचे नाहीये ही नाण्याची अर्धी बाजु नेमकी लिखणात येणार नाही.
तुम्ही काय सत्य मानावं अथवा असत्य... हे तुमचं तुम्ही बघणार पण रेफरन्स मात्र ज्ञानोबा तुकोबांचे पेरणार...
आणी वर समोरच्याला सुनावणार साध्या सोप्प्या प्रश्नाला सरळ उत्तर द्यायच्या ऐवजी फाटे फोडत भलतीकडेच विषय नेला आहे त्यावरुन माझा तर्क बरोबर च होता असे गृहीत धरत आहे ! हा ध्यात्मीक चाळा मला तरी अत्यंत नवीन असल्याने जरा खेद वाटला पण आपण त्याची का म्हणून फिकीरे करावे भले ?
18 May 2021 - 3:55 pm | गॉडजिला
हॅवींग सेक्स फॉर वर्जीनीटी म्हणतात ते हेच प्रकरण असावे असे म्हटले की तुम्हाला मुद्यावर चर्चा करायची सोडुन समोर्च्याचे आडनाव विचारायची हुक्की आली इथेच फाटेफोड सुरु झाली होती हे स्वांत सुखाय आनंदलहरी जिरल्या तर ध्यानात यावे ना... समोरच्याचे प्रोफायलींग करावे वाटणे हे मुळातच त्याने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर नसण्याचे लक्षण आहे हे तुकोबांनीच सांगीतले आहे बरे... पण हा धागाच स्वांत सुखाय असल्याने तुकोबांचे ते म्हणने आठवले तर कुठे काय बिघडले ?
18 May 2021 - 4:38 pm | प्रसाद गोडबोले
चर्चा करायचीच नाहीये .
तसेही तुम्ही गट. क्रं २ मधील आहात . तुमच्या मुळ प्रतिसादात सरळ सरळ अनभ्यासातुन येणारा द्वेषमुलक मत्सर दिसत होता त्यावरुनच स्पष्ट झाले होते . त्यामुळे मला काही बोलायची आवश्यकताच नाही. प्रोफायलिंग करणारा मी कोण ! तुकोबांनीच आधी लिहुन ठेवले आहे मी अजुन काय बोलणार : तुकाराम गाथा अभंग क्र. ४००६ .
( हे इथे कॉपीपेस्ट करायचेही माझे डेरींग नाही. तुम्हाला हौस असेल तर शोधुन वाचा.)
इत्यलम :)
18 May 2021 - 5:47 pm | गॉडजिला
चर्चा करायचीच नाहीये कारण सारं स्वांन्त:सुखाय आहे ! मग त्यासाठी हवे तसे वर्गीकरण करुन मोकळे... अत्यंत वरवरचे सुख आणखी काय.
तुकोबांनीच आधी लिहुन ठेवले आहे मी अजुन काय बोलणार : तुकाराम गाथा अभंग क्र. ४००६ .
हे तुमचं तुम्ही ठरवणार पण रेफरन्स मात्र ज्ञानोबा तुकोबांचे पेरणार... हे मी अधी म्हटले होते तसेच वागत आहात. कारण कारण सारं स्वांन्त:सुखाय आहे
18 May 2021 - 5:49 pm | गॉडजिला
चर्चा करायचीच नाहीये कारण सारं स्वांन्त:सुखाय आहे
कारण तोंडघषी पडण्यापेक्षा समोरच्याला तुम्ही यातले म्हणजे असेच बोलणार हे सुनावणे जास्त सोपे असते. त्यासाठीच तर गटबाजी निर्माण केली गेली.
18 May 2021 - 6:10 pm | कॉमी
अभंग ४००६ चा रेफ देऊन काय साध्य करायचे होते? (वाचला.)
18 May 2021 - 7:28 pm | गॉडजिला
काहीही साध्य करायचे नाही हे कळावे म्हणूनच तर प्रतिसाद दिलाय... हॅविंग सेक्स फॉर वर्जीनीटी... आणखी कायं.
18 May 2021 - 6:47 pm | गामा पैलवान
गॉडझिला,
मी असहमत आहे. या न्यायाने माणसं विष्ठा का खातात, असा प्रश्नही विचारता येईल. आहार म्हणजे सूर्यप्रकाश अधिक विष्ठा. आपलं शरीर बरोब्बर सूर्यप्रकाश शोषून घेतं आणि तो यथोचित धातूंच्या रूपात शरीरात साठवून ठेवतं. जो भाग साठवला जाऊ शकंत नाही तो विष्ठा म्हणून बाहेर सारला जातो.
मग माणसं दररोज अन्न खातात ती खरंतर प्रामुख्याने विष्ठाच म्हणायला पाहिजे. कारण की सूर्यप्रकाश हा सघन ( म्हणजे घन, द्रव, वायू इत्यादि ) पदार्थ नव्हे. काय म्हणता ?
आ.न.,
-गा.पै.
18 May 2021 - 7:17 pm | गॉडजिला
मला तर आपण निरुत्तर केलेत, थँक्स फॉर ओपनींग माइ आइ़ आपल्याला पायाच्या अंग्ठ्यापासुन दंडवत पैलवानजी... _/\_ अदभुद...
असो... आता विज्ञानाकडे वळुयात कारण मामला स्वांत सुखाचा आहे मुद्देसुदपणा हवाय कुणाला ?
कारण की सूर्यप्रकाश हा सघन ( म्हणजे घन, द्रव, वायू इत्यादि ) पदार्थ नव्हे. काय म्हणता ?
इतकेच म्हणतो की त्यात घनता नसती तर सघन पदार्थाने तो अडला नसता.
19 May 2021 - 2:33 pm | गामा पैलवान
गॉडझिला,
मामला स्वांतसुखाचा आहे हे अगदी बरोबर ओळखलंत तुम्ही. मग वादंच मिटला म्हणायचा.
आ.न.,
-गा.पै.
19 May 2021 - 2:41 pm | गॉडजिला
हॅविंग सेक्स फॉर वर्जीनीटी... आणखी कायं.
20 May 2021 - 1:48 am | गामा पैलवान
करेक्ट. विष्ठेत सूर्यप्रकाश मिसळल्याने ती चविष्ट होते व लोकं तिला अन्न म्हणतात. ही एका प्रकारची ईश्वरी कृपाच आहे.
-गा.पै.
20 May 2021 - 8:17 am | गॉडजिला
जरा स्पष्ट कराल का ?
20 May 2021 - 10:06 am | प्रसाद गोडबोले
ईश्वरी कृपा नाही, प्रत्यक्ष ईश्वर !
न लवितां ऊंसु । तैं जैसेनि असे रसु ।
तेथिंचा मीठांशु । तोचि जाणे ॥ ५-४० ॥
पाणी कल्लोळाचेनि मिसें । आपणपें वेल्हावे जैसें ।
वस्तु वस्तुत्वें खेळों ये तैसें । सुखें लाहे ॥ ७-१३५ ॥
सर्वं खल्विदं ब्रह्म | सर्वं विष्णुमयं जगत् ||
__/\__
20 May 2021 - 10:24 am | गॉडजिला
यात मुळात भेद करणेच कठीण आहे पण ज्याचे अधिष्ठानच भेदाभेद करणे आहे(आणी वर त्याला आनंदाचा काळ अशी उपमा देणी आहे) तो नक्किच ईश्वरी कृपा व प्रत्यक्ष ईश्वर या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे पुन्हा पुन्हा ठासुन सांगत राहील. कौमार्य प्राप्त्यर्थे रतीसुखे विनियोगः...
20 May 2021 - 10:44 am | गॉडजिला
दोरा सर्पाभासा |
साचपणे दोरु का जैसा ||
द्रुश्टा द्रुश्या तैसा |
द्रश्टा साचु||
अर्थात दोरीला जरी आपण सर्प मानले तरी ति जशी दोरी असते तसेच, अहंभावयुक्त गटबाजीचा आनंद हा कीतीही अध्यात्मीक वाटला तरी ती विष्ठा असते...
17 May 2021 - 3:19 pm | प्रचेतस
छान लिहिताय प्रगो सर
18 May 2021 - 6:02 pm | गॉडजिला
तुमच्या मुळ प्रतिसादात सरळ सरळ अनभ्यासातुन येणारा द्वेषमुलक मत्सर दिसत होता त्यावरुनच स्पष्ट झाले होते .
आपण आपणास अभ्यासु/विद्वान समजत आहात म्हणून तुम्ही स्वतःला गट क्रं १ मधे टाकता ? हे राम. हे तर आजुनच वाईट :(
20 May 2021 - 11:07 am | कॉमी
गॉडझिलाला किंग घिडोरा सापडला आहे.