ह्या धाग्याचा उद्देश, फक्त हसणे आणि हसवणे, इतपतच आहे. मी वाचलेले काही विनोद देतो...
--------------
"येथे हवा भरून मिळेल...!!"
लेखक - डॉ. आर. डी. कुलकर्णी.
काही वर्षापूर्वी माझ्या दवाखान्यात घडलेला मजेदार किस्सा. एक दिवस दुपारी दवाखाना बंद करण्याच्या वेळेला, साधारण मध्यमवयीन दिसणारा रुग्ण माझ्याकडे आला. त्याला अधून मधून चक्कर यायची असं त्यानं सांगितलं. तपासणी करत असताना त्या अनुषंगाने काही प्रश्न विचारून मी त्याचा रक्तदाब पाहायला लागलो.
तो जरा गोंधळल्यासारखा झाला आणि म्हणू लागला की “डाक्टर साहेब, मी लई गरीब माणूस हाये. मला आसलं काय बी बांधू नगा." अर्थात ग्रामीण भागामध्ये काम करत असताना अशा गमतीशीर गोष्टींची मला सवय होतीच. त्या मुळे मला याचे फारसे आश्चर्य वाटले नाही. मी त्याला थोडं समजावून सांगितलं आणि तपासणी नंतर काही औषधं लिहून दिली. दोन आठवड्यानंतर परत यायला सांगितले.
साधारण पंधरा दिवसानंतर ते महाशय माझ्याकडे परत आले. सोबत अजून एक जण होता. त्या दिवशी घडलेल्या प्रकारामुळे ते माझ्या पक्के लक्षात राहिले होते. मी त्यांना कसं आहे असं विचारलं असतां, अगदी हसत हसत “समदं बैजवार हाये, आता काय बी तरास न्हाय, चक्कर बी नाय आली पुन्यांदा." असे उत्तर आले. फेरतपासणीसाठी आले असे समजून मी त्यांना औषध लिहून दिलेला कागद मागितला आणि लिहून दिलेली सगळी औषधे नीट घेतली नां हे ही विचारले. त्यावर ते म्हणाले, "कसला कागुद? कसली औषदं? म्या काय नाय घेतलं."
मला काही समजेना आणि मी परत विचारले की, अहो तुम्हीच म्हणालात ना आता मला काही त्रास नाही ते कसं?.
त्यावरचं त्यांचं उत्तर ऐकून मलाच चक्कर यायची बाकी होती. ते गृहस्थ म्हणाले, "डाक्टर, असं काय करतायसा. त्या टायमाला तुमी पट्टा बांधून हावा नाय कां भरली माझ्या हातात, घरी जाईस्तोवर माझी चक्कर थांबली की. बिगर औषध पाण्याचं काम झालं बगा माझं. लई भारी हाये तुमी. म्हणून आज माझ्या पावण्याला घिवून आलोय हावा भरायला. त्यास्नी बी चक्कर येतीया. तेवढी हावा भरा लवकर."
हे ऐकून आता मलाच चक्कर येवून दातखीळ बसायची मात्र बाकी होती.
---------
बायको :-- अहो, उन्हाने माझी स्किन खूप ऑयली ऑयली झालीय, सांगा
मी काय करू???
नवरा :-- विमबार लाव... सगळा चिकटपणा घालवतो...!!!
-----------
प्रतिक्रिया
11 May 2021 - 9:01 am | श्रीरंग_जोशी
भन्नाट आहे विनोद.
11 May 2021 - 9:50 am | मुक्त विहारि
एकमेकांना मदत करू
11 May 2021 - 10:40 am | मुक्त विहारि
Hrithik Roshan ...जगातील सर्वात सुंदर व देखणा तरूण...
Jeff Bezos... जगातील सर्वात श्रीमंत माणुस...
Bill Gates...जगातील सर्वात हुशार व कर्तबगार माणुस....
हे आपल्या बायकांना सूख व आनंदात नांदवू शकले नाहीत...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
ह्यांच्या पेक्षा आमचे हे कितीतरी पटीने बरे, अशी कुणकुण सध्या कानावर पडत आहे...
11 May 2021 - 10:50 am | गॉडजिला
धमाल विनोद आहेत... वाट्सपपेक्षा इथे वाचणे अजुन धमाल वाटते. हा धागा २००+ होउदे
11 May 2021 - 11:30 am | राघव
गुरुजी: कंपासच्या सहाय्यानं एक केंद्र बिंदू धरून वर्तुळ काढा.
विद्यार्थी आकृती काढतो.
गुरुजी: हे कसलं वेडंवाकडं वर्तुळ काढलंय?
विद्यार्थी: केंद्रानं साथ नाही दिली गुरुजी!
11 May 2021 - 1:46 pm | उपयोजक
आठ के ठाठ!
हा विनोदाचा धागा आहे. म्हणजे इथे विनोद लिहायचे. विनोद म्हणजे जे वाचून हसायला येईल असे काहीतरी लिहायचे. हसायला तर हवंच. हसण्यासाठी विनोद हवेत. विनोदामुळे हसायला येतं. तेच इथे लिहायचे. असं काहीतरी लिहायचं जे वाचून हसायला येईल. विनोद म्हणजे अतिशयोक्ती. अतिशयोक्तीपूर्ण असं काहीतरी इथे लिहायचं. ते वाचल्यावर हसू आलं पाहिजे. हसायला आलं की समजायचं विनोद झाला. विनोद झाला की आपल्याला हसायला येतंच. तेच इथे लिहायचं. हसायला आलं पाहिजे..............कंटीन्यु
11 May 2021 - 2:18 pm | Ujjwal
लिहिणार्याची तयारी आहे हो. किंबहुना चांगलीच तयारी आहे. पण तुमची वाचायची तयारी आहे का?
11 May 2021 - 7:08 pm | मुक्त विहारि
तुमचे विनोद, तुमची जबाबदारी
11 May 2021 - 7:07 pm | मुक्त विहारि
कितीही विनोद लिहू शकता
11 May 2021 - 3:08 pm | धर्मराजमुटके
मुवि ! राजकीय धाग्यांवर पुरेसे मनोरंजन / विनोद होत असताना हा वेगळा धागा काढायचे प्रयोजन समजले नाही. इकडे अराजकिय विनोद लिहायचे आहेत का ?
11 May 2021 - 7:06 pm | मुक्त विहारि
बिंधास्त लिहायचे ....
11 May 2021 - 7:54 pm | कॉमी
11 May 2021 - 7:56 pm | कॉमी
वडील : पोरा आमच्या जमान्यात कीती संस्कारी चित्रपट असायचे आणि आता........???
मुलगा : गप बसा आता सगळे तुमच्या जमानेवालेच पकडले जात आहे ....
# me too
.......
(हा खास पच्चीम महाराष्ट्रातल्यांसाठी)
(लॉकडाऊन चालू असताना-)
सम्या शाळा रे ?
-अजून कुटं अजून पूर आहे की
-----------------
एका माणसाला खूप दिवसांपासून शौचास येत नसते. तो डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर त्याची तक्रार ऐकून एक औषध काढतात.
-हे एकदम जालीम औषध आहे. घ्यायचं आणि न थांबता घरी जायचं.
(वाटीत औषध ओततात.)
-घरी जायला किती वेळ लागतो ?
>वीस मिनिटे (थोडं औषध परत बाटलीत टाकतात.)
-कसा आलाय ?
>चालत (अजून थोडं औषध बाटलीत टाकतात.)
-कितव्या मजल्यावर राहता ?
>तिसऱ्या. (अजून थोडं औषध बाटलीत टाकतात.)
-लिफ्ट आहे काय ?
>नाही. (अजून थोडं औषध बाटलीत टाकतात.)
-हा, आता हे प्या आणि चटकन निघा, थांबू नका.
दोन दिवसांनी डॉक्टरांना त्याचाच फोन येतो.
-काय रे, झालं काय नीट ?
>डॉक्टर तुमच गणित जरा चुकलं, फक्त पाच फुटांनी रेस हरलो.