आदरणीय पंतप्रधान मा. मोदी यांचं सरकार आल्यापासून देशात अनेक गंभीर प्रश्न निर्माण झालेले आहेत, ते सोडविण्यासाठीचे प्रयत्न करण्याऐवजी जे प्रश्नच नव्हते, त्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्याचा सतत प्रयत्न केला जातो. सरकारसमोरील प्रश्न आणि त्याची सोयीस्कर उत्तरांनी देशात विविध माध्यमं सतत चर्चेत असतात. गेल्या वर्षभरापासून करोना या विषाणुच्या संक्रमाने भर घातली. आज जवळपास चार लाखांवर बाधीतांचा आकडा पोहचला आहे, मृत्युचं प्रमाणही वाढत आहेत. भारताच्या एकून आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे केव्हाच निघाले आहेत, अशावेळी असलेल्या व्यवस्थेत माणसं कशीतरी भयावह अवस्थेत जगत आहे, भारतीय जनता आपापल्या सगेसोय-यांच्या गमावलेल्यांच्या दुखात खिन्न मनाने कसेबसे आलेला दिवस ढकलत आहेत.जगण्याची शाश्वती राहीली नाही, अशी एक अनामिक भिती माणसाच्या मनात भरुन राहीलेली आहे. दुसरीकडे लशींचा देशातला, राज्यातला तुटवडा आणि लशीकरणाने विषानुवर नियंत्रण आणन्याचा प्रयत्न केंद्रस्तरावरुन प्रयत्न केला जात आहे. जगभरात करोना विषानुवर नियंत्रण येत असल्याचे दिसत आहे, त्याचवेळी भारताची अवस्था दुस-या लाटेत दिवसेंदिवस अधिक दयनीय होत चालली आहे. गेल्या वर्षभरापासून येणा-या विषाणुंच्या लाटेबाबत आपण गाफील राहीलो, प्रयत्न करण्याऐवजी स्वत:च कौतुक करण्यात केंद्रीय नेतृत्त्व गुंतलेले दिसले. आणि त्याचे आज परिणाम भारतीय जनतेला भोगावे लागत आहे. आता इतर देशांच्या तुलनेत आपले मृत्युदर कमी आहे, बाधीत संख्या कमी आहे, आकडे कमी आहेत, साख्यंकी, वगैरे दाखवून आपली परिस्थिती भली आहे, हे दाखविण्यात आता काहीही अर्थ उरला नाही, वास्तव समजून घेण्याची वेळ आली आहे.
देशभरात आरोग्यव्यवस्थेची मरणासन्न अवस्था झालेली आहे,आपत्ती व्यवस्थापनाचे धडे काय असतात त्याची कल्पना नसलेले नेतृत्व लोकांना जगण्याची उभारी देऊ शकले नाही. लोकांचे दुखदायक व्हीडीयो माध्यमातून फिरत आहेत. आपण जगू की नाही याची शाश्वती आता उरली नाही, अशी भिती प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली आहे, अशावेळी जनतेमधे आश्वासक वातावरण करण्याऐवजी आपण कुंभमेळे भरवता ? आपण ठरवलं असतं तर ते थांबवता आलं असतं आता वाढलेल्या संसर्गाचे आकडे यायला लागले आहेत. पश्चिम बंगालची निवडणूक आपण प्रतिष्ठेची केली. मा.पंतप्रधान, देशाचे गृहमंत्री, केंद्रीयमंत्रीमंडळातील मंत्री, आमदार, खासदार, अभिनेते त्यांच्या रॅल्या, ते मोर्चे ती भाषणं यात अशावेळी जनतेच्या दु:खावर फुंकर घालण्याऐवजी आपणास पश्चिम बंगालची निवडणूक महत्वाची वाटली. रोम जळत होते तेव्हा निरो फिडल वाजवत होता अशा गोष्टीची आठवण होत होती. इतके, हे नेते आणि नेतृत्व असंवेदनशील असू शकतात ही कल्पनाच सहन होऊ शकत नाही. जीवाचा आटापीटा करुनही पश्चिम बंगाल मधे आपला दारुण पराभव झाला. जनतेने आपणास साफ़ नाकारले, एक संदेश दिला की आपण कोणत्या विषयांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे त्याचं एक आत्मभान जनतेने दिले. . जनतेची आवश्यकता काय आहे, यातून आपण काही शिकाल अशी अपेक्षा करणे गैर आहे. विकत घेतलेली माध्यमं आपला जयजयकारात व्यस्त आहेत. कोणत्याही माध्यमाने हॉस्पीटल्समधील आवश्यक बेडची संख्या सांगितली नाही, उपचार कुठे मिळू शकतो ते सांगितले नाही, आपण करीत असलेल्या चुंकावर मौन बाळगले. मात्र पश्चिम बंगालमधे आपण कसे विजयी व्हाल त्याचे खोटे आकडेमोड करीत विविध वाहिन्या व्यापून टाकलेल्या होत्या. करोनाच्या पहिल्या लाटेत एका चित्रपटसृष्टीतील अभिनेत्यावर दिवसभर वाहिन्या त्याच विषयावर चर्चा करीत राहील्या तेव्हाही आपण जनतेच्या आवश्यकतेकडे अक्षम्य दुर्लक्ष केले.
जनतेला उपचार, लशीकरण, आणि योग्य मार्गदर्शन यांचे योग्य नियोजन हवे होते. ऑक्सीजनचा तुटवडा जाणवत होता, इंजेक्शचा तुटवडा होता. लोक रुग्णालयाबाहेर तळमळतांनाची छायाचित्रे व्हीडीयो व्हायरल होत होती, आजही होत आहेत. मा.सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतरही आपल्यात काहीही जवाबदारीचं भान दिसलं नाही. आपण वाढती लोकसंख्या आणि तुटपुंज्या उपायात आम्ही किती काम करीत आहोत हे दाखविण्यात व्यस्त राहीलात. आपण टीका करणा-यांवर कायदेशीर कार्यवाहीत व्यस्त राहीलात. मा.सर्वोच्च न्यायालयास सांगावे लागले की सकारवर टीका करणा-यांवर आपण कार्यवाही कराल तर याद राखा, आपल्या दडपशाहीबद्दल मा.न्यायव्यवस्थेला आपलाला समज द्यावी लागते. आपण जनतेच्या गरजांकडे दुर्लक्ष आजही करीत आहात. आपली असंवेदनशीलता अनेकदा दिसून आली. आसामचा प्रचार असो, की पश्चिमबंगालचा प्रचार असो. बाकी इतर पक्षांच्या नेतृत्वाने काय केले यापेक्षा आपण एक आदर्श उभा करायला हवा होता. राजकारण करायला माणसं जगली तर भविष्यकाळात आपणास भरपूर राजकारण करता येणार आहे. दीर्घकालीन नियोजनांचा अभाव, विविध पक्षांच्या भूमिका, पक्षीय धोरणे, मतभेद या पलिकडे जाऊन राष्ट्रहित लक्षात घेऊन नियोजन करणे गरजेचे होते.
जगभरातील आंतरराष्ट्रीय दैनिके दुस-या लाटेतील भारताच्या बेजवाबदारीबद्दल लिहित असतांना आपण त्या त्या राष्ट्रांना आपापल्या परदेशातील दुतावासामार्फत भारताची बदनामी थांबवा, असे म्हणत आहात. सरकारवर टीका करणा-यांची ट्वीटर खाती गोठवायला सांगत आहात. आपल्या देशातील माध्यमे कदाचित आपल्याविरुद्ध लिहिणार नाहीत, सरकारच्या प्रशासनाबद्दल लिहिणार नाहीत कारण त्यांचे हित त्यात गुंतलेले आहेत, भारतीय माध्यमांना पॅकेजेसप्रमाणे वार्तांकन करावे लागतही असेल, परंतु परदेशातील सरकारे, लोक आणि देश नागरिकांचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य जपतात त्या टीकेचा आदर करतात, आपणास टीका सुद्धा सहन होत नाही. टीकेकडे सकारात्मक पद्धतीने बघायला हवे, त्यातले चांगले म्हणून काही घ्यावे असे आपण आणि आपल्या मंत्रीमंडळास वाटत नाही. आपण आपल्या अपयशाचे खापर राज्यांवर फोडण्याचे प्रयत्न करीत आहात, कुरघोडीचे राजकारण करीत आहात असे वाटावे इतकी ती तफावत आपल्या प्रशासकीय भेदाच्या वर्तनातून दिसून येते.
भारतीय जनतेने आपणास बहुमताने निवडून दिले आहे ते जनता पूर्वीच्या सरकारांमुळे त्रस्त होती, अपेक्षांना उतरत नव्हती म्हणून. आपण काही चमत्कार कराल, काही बदल कराल, आपल्या वकृत्वामुळे लोक भारावून गेले होते. आपण जसे जसे, जे जे म्हणाल ते ते लोकांनी केले. आपण दिवे लावा म्हणालात, लोकांनी दिवे लावले, आपण थाळीनाद करा म्हणालात लोकांनी आपल्या डोक्याचा वापर न करता थाळी नाद केला. आपण जे जे म्हणाल ते ते सर्व केले. अजूनही आपण काही चमत्कार कराल म्हणून जनता आपल्याकडे आस लावून बसली आहे, पण दुर्दैवाने आपलं अपयश आता लपविणे शक्य नाही. सरकारातील सध्याच्या अवस्थेबद्द्ल निवडून दिलेले प्रतिनिधीसुद्धा बोलत नाहीत, दयनिय अवस्थेबद्दल तक्रार करीत नाहीत. सत्तेच्या मोहापोटी लोकांच्या गरजांबद्दल प्रतिनिधी बोलत नाहीत, इतके लाचार लोकप्रतिनिधी पहिल्यांदा बघावे लागत आहेत.
सध्या सोशियल मिडियात मा.पंतप्रधान यांच्यावर खुप टीका होतांना दिसते, टींगल टवाळी होतांना दिसते. प्रधानमंत्र्यांबद्दलचा आदर लोक विसरत चालले आहेत, ही टीका थेट सन्माननीय पंतप्रधान आणि गृहमंत्री यावर असते, देशभरातून त्यांच्यासंबंधी संतप्त प्रतिक्रिया उमटत असतात, टीका करणे ही सहज प्रतिक्रिया असते. पंतप्रधान म्हणून असलेल्या जवाबदा-यांपासून त्यांन पळ काढता येणार नाही, लोकभावनेचा विचार करावाच लागेल. आज परदेशात लशीवाटपापेक्षा देशात लशींची आवश्यकता आहे, परराष्ट्रीय धोरण म्हणून काही मदत करावी लागत असेल पण आपण जगाला मदत करीत आहोत त्याचवेळी इथे देशात काय अवस्था आहे, हा विचार करु नये असा संतप्त सवाल लोक करीत असतात.
भारतीय जनतेने काही आमुलाग्र बदल होतील म्हणून जनतेने सत्तांतर केले. पण गेली काही वर्षात असलेल्या प्रश्नांचा नीपटारा झाला का ? वाढती बेरोजगारी, वाढती महागाई, गरिबी, या आणि असंख्य प्रश्नांना घेऊन सत्तेवर आपण आलात आता त्यात काही बदलही झाले नाहीत. खोटे युक्तीवाद केले तरी, असलेल्या प्रश्नांपासून सुटका होऊ शकत नाही, लोकांनी ज्यासाठी निवडून दिलं, तो हेतू पूर्ण झाला नाही तर लोक बदल घडवतात हा या देशातला इतिहास आहे, लोकशाहीने भल्या भल्यांचे होत्याचे नव्हते केले. तरीही आपण काहीही शिकला नाहीत, आपण जे ठरवू ते झाले पाहिजे या अट्टाहासाने देशाला अजून किती वेठीस धरणार, संकटाच्या खाईत लोटणार हा प्रश्न आहे, अशावेळी आता काही बदल होणे आवश्यक वाट्ते.
सध्याचं प्रशासनातील पंतप्रधानांचं अपयश पाहता, लोक ज्या पद्धतीने पंतप्रधान पदाची त्यांच्या भाषणाची खिल्ली उडवत आहेत ते सर्व पाहता, आता पक्षाच्या कार्यकर्ते, नेते, आणि सल्लागारांनी तज्नांनी आता नेतृत्त्वात बदल करण्याची आवश्यक्ता वाटते. आपणास बहुमत आहे, त्यामुळे आपण पंतप्रधान आणि मंत्रीमंडळ बदलू शकत नसलो, तरी आता अन्य चेह-यांना प्रयोग म्हणून आता नव्या चेह-याला नवी संधी दिली पाहिजे, आपल्याकडून जे काही नेतृत्त्व म्हणून अपेक्षित आहे, त्यात जर काही होत नसेल तर आता भाकरी फ़िरवली पाहिजे. भाकरी फ़िरवली नाही तर ती करपते त्या प्रमाणे सध्याच्या नेतृत्वात आता बदल करणे आवश्यक आहे, असे वाटते. आपल्या सरकारमधे अनेक अनुभवी व्यक्ती आहेत, कोणास तरी नवी संधी दिली पाहिजे. सुडाचे राजकारण न करता आता माणसाच्या जगण्याला प्राधान्य देणा-या कृतीची गरज आहे.
नाकर्ते शासन-प्रशासनामुळे माणसाच्या जगण्याची शाश्वती वाटत नसेल तर लोकांना अशी शक्तीशाली व्यवस्था लोकशाहीच्या माध्यमातून बदलता येते, हा येथील इतिहास आहे, पक्षातील लोकप्रतिनिधींची एक मर्यादा असते, सत्तेचा लोभ असतो. परंतु ज्या नागरिकांचे नातेवाईक गमावले गेले आहेत त्या नागरिकांनी सनदशीर मार्गाने सरकारच्या धोरणाला विरोध केला पाहिजे, नागरिक म्हणून तरी आपली काहीही मजबुरी नाही. सरकारविरुद्ध शिक्षितांनी लिहिले बोलले पाहिजे. सरकारला बहुमत आहे, सध्या सत्तांतर शक्य नाही, परंतु, पंतप्रधान मोदी यांची पक्षीय कारकीर्द पाहता, इतिहास सोडून द्या. पण, पक्षाच्या पद्धतीप्रमाणे त्यांना नेता म्हणून जसे निवडले तसे त्यांचं नेतृत्त्व आता बदलण्याची वेळ आली आहे. एका नव्या चेह-याची गरज आहे, पंतप्रधान मोदी यांचा अपयशी कारकीर्दीचा पाढा असाच वाढत राहीला तर तो पक्षाला घातक ठरेलच पण देशासाठी ही वाटचाल घातक ठरणार आहे. त्यामुळे वेळीच ही व्यवस्था बदलेल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. पश्चिम बंगालच्या अनुभवावरुन काही तरी शिकून भारतीय लोकांना ’अच्छे दिन’ येतील अशी अपेक्षा करु या, पश्चिम बंगालने या दोन्ही नेत्यांना स्पष्ट थेट नाकारले आहे आणि देशाला वाचवले. एक नवा संदेश बंगालने दिला आहे. हुकुमशाही प्रवृत्तीला लगाम लावला आहे. लोक अशा कोणत्याही भूलथापीला बळी पडत नाही, हे पश्चिम बंगालने दाखवून दिले, तरीही, पक्षाने तीनाचे सत्तर पंचाहत्तर कसे केले, याच जयजयकारात पक्ष राहणार असेल, आणि 'गीरे भी तो टांग उपर'करुनच फ़िरायचे असेल तर तर पक्षाची अवस्था पून्हा एकदा दोन खासदारांवर जाऊन थांबायला वेळ लागणार नाही. आणि जनता म्हणून तोपर्यंत आपण सर्व देशोधडीला लागलेले असू...!
प्रतिक्रिया
6 May 2021 - 8:09 pm | प्रचेतस
=))
कुणाला मी डावा वाटतो, कुणाला मी उजवा वाटतो. :)
6 May 2021 - 9:00 pm | चंद्रसूर्यकुमार
कभी तू कम्युनिस्ट लगता है कभी तू सोशालिस्ट लगता है कभी कॅपिटलिस्ट लगता है कभी लिबर्टेरिअन लगता है.
तू जो अच्छा समझे ये तुझपे छोडा है.....
ह.घ्या.हे.वे.सां.न.ला
6 May 2021 - 9:49 pm | प्रचेतस
=))
6 May 2021 - 7:59 pm | सुबोध खरे
हल्ली?
या महाशयांनी २०१३ , २१०१४ , २०१५ २०१८ आणि २०१९ मध्ये आर्थिक मंदी येईल असे भाकीत केले होते.
२०१३ The economist who predicted the financial crisis just sounded another alarm—it would be wise to listen this time
https://qz.com/126875/the-economist-who-predicted-the-financial-crisis-j...
२०१४ A Global Financial Guru Who Predicted the Crisis of 2008 Says More Turmoil May Be Coming
https://time.com/3099587/india-central-bank-raghuram-rajan-global-financ...
२०१५ Raghuram Rajan warns of repeating Great Depression mistakes
https://www.livemint.com/Politics/rQi4UUuMHXQAyKEW2N1yXP/World-economy-m...
२०१८ Raghuram Rajan warns of another toxic build-up
https://www.businesstoday.in/current/economy-politics/raghuram-rajan-war...
२०१९ India is in the midst of growth recession, says Raghuram Rajan
https://scroll.in/latest/946168/india-is-in-the-midst-of-growth-recessio...
असे अनेक दुवे आहेत.
हि आर्थिक मंदी कुठे कुणाला दिसली तर कळवा.
मी श्री रघुरामान राजन यांच्या वैयक्तिक आर्थिक मंदी बद्दल बोलत नाहीये
त्यांना श्री मोदी यांनी हाकल्ल्यापासून केवळ प्रकाशात राहण्या साठी अशी भाकिते हे महाशय करत आले आहेत.
सतत ८ वर्षे एखाद्याची आर्थिक भाकिते चुकत असतील तर त्याला अर्थतज्ज्ञ म्हणायचे का हा एक प्रश्न लोकांना पडला आहे
6 May 2021 - 8:06 pm | प्रचेतस
हल्ली म्हणजे गव्हर्नरपद गेल्यापासून असेच म्हणावयाचे होते.
8 May 2021 - 9:52 am | वामन देशमुख
6 May 2021 - 8:01 pm | सुबोध खरे
हायला
२०२० चे करोना मुळे मंदी चे भाकीत सुद्धा याना करता आलेले नाही.
How did Raghuram Rajan miss his chance to “predict” Coronavirus recession after “predicting” doom 5 years in a row?
https://www.opindia.com/2020/05/raghuram-rajan-coronavirus-prediction-fi...
6 May 2021 - 8:08 pm | आग्या१९९०
कोविड लसीच्या वेगवेगळ्या दराबद्दल सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला कारण विचारले होते, त्याबद्दल काही खुलासा केला का केंद्राने?
6 May 2021 - 8:09 pm | बापूसाहेब
काल नळाला पाणी आले नाही.. नवीन पंतप्रधानांची गरज.. !!!
एवढे tweet बघायचे बाकी राहिले आहे.. स्वरा भास्कर ही बिनडोक बाई आहे. हिच्या मुलाखती आणि विविध प्रश्नावरील मत ऐकली की डोक गरगरायला होत.. एवढी हाईप का दिली जाते अश्या लोकांना.. ??
7 May 2021 - 9:32 am | मुक्त विहारि
पोपटांचे बोलवते धनी वेगळेच असतात ....
8 May 2021 - 12:12 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आज काँग्रेसनेत्या सोनिया गांधी आणि अरुंधती रॉय यांनीही करोनाकाळात उपाययोजनाबाबत अपयशी ठरलेल्या पंतप्रधान मोदी यांच्या कार्यशैलीवर प्रश्न उभे केले आहेत. आता हळुहळु सर्वत्रच पंतप्रधान यांच्या करोनाकाळातील उपाययोजनांच्या बाबतीत कठोर टीका होत आहे, मा. सर्वोच्च न्यायालय तर दररोज केंद्रसरकारच्या तीस-या लाटेबाबतच्या उपाययोजनांच्या बाबतीत ताशेरे ओढत आहेत, सरकार म्हणून आपण काय करीत आहात असे प्रश्न सतत विचारत आहेत. अरुंधती रॉय म्हणतात-
''Hundreds of thousands of us will die, unnecessarily, if you don’t go. So, go now. Jhola utha ke. With your dignity intact. You can have a great life ahead, of meditation and solitude. You yourself have said that’s what you want. That won’t be possible if you allow this mass dying to continue.
There are many in your party who can take your place for now. People who know they must get on even with political opponents in this moment of crisis. Whoever that person is – from your party, with the approval of the Rashtriya Swayamsevak Sangh – can head the government and a crisis management committee'' अधिक वृत्त (दुवा)
-दिलीप बिरुटे
8 May 2021 - 12:40 pm | सुबोध खरे
हिचे काश्मीर वरचे तोडलेले तारे आणि पाकिस्तानची आणि नक्षलवादी लोकनची बाजू घेताना पाहिले /वाचले तर तिळपापड होतो.
हिला देशद्रोहासाठी जन्मठेपच दिली पाहिजे असे माझे स्पष्ट मत आहे.
Recently in a video that is doing rounds on social media shows, Roy claiming that Pakistan has never deployed its military against its own people.
She has divided opinion by speaking out in support of the Naxalite insurgency, for casting doubt on Pakistan's involvement in 2008 Mumabi attacks and on Jammu and Kashmir issue.
https://www.oneindia.com/india/what-did-arundhati-roy-say-on-kashmir-tha...
बिरुटे सर
मोदी द्वेषात तुम्ही इतकी अत्यंत खालची पातळी गाठली आहे कि तुम्हाला देशातील बहुसंख्य लोकांचे मत डावलून अरुंधती रॉय सारख्या देशद्रोही बाईचा सुद्धा आधार घ्यावासा वाटतो आहे.
इतका पराकोटीचा द्वेष मी केवळ सुमार केतकर किंवा श्री जितेंद्र आव्हाड सारख्या लोकातच पाहिला आहे आणि त्यांची निष्ठा कुठे वाहिली आहे हे उघड आहे.
(प्रतिसाद संपादित)
8 May 2021 - 12:55 pm | यश राज
8 May 2021 - 12:56 pm | यश राज
8 May 2021 - 12:56 pm | यश राज
8 May 2021 - 1:02 pm | यश राज
8 May 2021 - 1:03 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
डॉक्टरसाहेब, करोनाकाळात आदरणीय पंतप्रधानांच्या नेत्रुत्वाबद्दल मनात येणा-या लोकांच्या सहज भावना आहेत. एखाद्याचे मत आवडणे न आवडणे हाही व्यक्तीसापेक्ष असा विचार आहे, सहमती-असहमती येणारी मतं ही प्रसार माध्यमातील आहेत, त्यामुळे इथे प्रतिसादात त्यांचे संदर्भ घेतले आहेत. आपणास ते चूक वाटले असेल त्याचा आदर आहेच. आता ती मतं विचारांच्या बाबतीत योग्यतेची आहेत किंवा नाही तोही विचार व्यक्ती आणि समुहसापेक्ष आहेत असे वाटते. आपण केलेल्या व्यक्तीगत शेरेबाजीबाबत बोलण्यासारखं काही नाही. आपला तान समजू शकतो.
-दिलीप बिरुटे
8 May 2021 - 1:36 pm | सुबोध खरे
आय एस आय हा भारताची शत्रू असलेल्या संघटनेची भाषा बोलणाऱ्या व्यक्तीचा आधार आपल्याला घ्यावासा वाटला?
धन्य आहे.
याचा ताण अजिबात नाही तर संताप आहे.
8 May 2021 - 2:01 pm | प्रचेतस
अरुंधती रॉय अत्यंत फालतू बाई आहे.
8 May 2021 - 3:34 pm | चौकस२१२
शँम्पेन पिऊन महालात बसून "गरीबांचे कसे होणार " याची चिंता करारी जी लोक असतात त्यातीलच ह्या अरुंधती रॉयम एकदा भर सभेत ( भारताबाहेरील ) त्यांना मी विचर्ल होत त्कि ( त्यावेळी विषय होता नर्मदा धरणाचा ) कि मॅडम आपलं विरोध नक्की कशाला आहे
१) धरग्रस्तांचे नीट पुनरवसं झाले नाही त्याला कि २) धारण बनवणे या कल्पनेलाच
बाईंचं उत्तर " धरणा म्हणजे जणू अणुबॉम्ब फोडणे " म्हणजे मूळ प्रक्षणाला बगल ...
असो ठीक अंतर्गत प्रश्ना बद्दल मत वेगळे असू शकते पण जेवहा राष्ट्रीय सुरक्षा सारखया विषयवार जर हि व्यक्ती असले तर तारे तोंडत असेल तर त्याला क्षमा नाही
8 May 2021 - 3:24 pm | श्रीगुरुजी
विद्यावाचस्पती प्राध्यापक,
सुझन अरूंधती रॉय यांच्या मौलिक सूचनेला आपण अनुमोदन देऊन त्याचा गांभीर्याने पाठपुरावा करावा ही नम्र विनंती!
8 May 2021 - 3:01 pm | इरसाल
आता काही बातम्या वाचता वाचता मला एक आयडीया सुचली. त्याने एकाच दगडात दोन पक्षी मारले जातील.
श्री.मोदी यांना पंतप्रधान या पदावरुन काढुन (ते संवैधानिकरित्या शक्य नाही तरीपण) त्यांच्या जागेवर श्री. उद्धव ठाकरे यांना बसवावे.
भाजपवाल्यांनी मन मोठे करुन याचा स्वीकार करावा(आधी युती होती म्हणुन). त्याने काय होईल....
भारत देशाला नवा पंतप्रधान व महाराष्ट्राला ताज्या, तरुण, तडफदार नी फडफडीत रक्ताचा नवा मुख्यमंत्री मिळेल (मुलालापण वचन दिलेच असेल नां)
8 May 2021 - 3:21 pm | श्रीगुरुजी
आजच मोदी व ठाकरे यांंच्यात दूरभाष संभाषण झाले. केंद्राने महाराष्ट्रासाठी वेगळे आरोग्य ऍप बनवून द्यावे अशी ठाकरेंनी मागणी केली. आता साधे मोबाईल ऍप सुद्धा मोदींनीच बनवून द्यायचे का?
8 May 2021 - 3:29 pm | आग्या१९९०
राज्याला आरोग्य ॲप बनवण्यासाठी केंद्राने परवानगी द्यावी असे मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागणी केली आहे. केंद्राचे कोवीन ॲप अगदी भिकार आहे, सारखे क्रॅश होते.
8 May 2021 - 3:37 pm | श्रीगुरुजी
ओह, वाहिन्यांवर चुकीची बातमी सांगितली.
8 May 2021 - 3:41 pm | आग्या१९९०
कधी खरं सांगतात? २०१४ नंतर सगळे चॅनल हेच करत आहेत
8 May 2021 - 5:19 pm | श्रीगुरुजी
२५ मे २०१४ पर्यंत सांगत होते की.
8 May 2021 - 5:56 pm | आग्या१९९०
हो, तेव्हाही अर्धसत्य माहिती दिली जायची, नंतर पूर्ण असत्य चालू झाले.
8 May 2021 - 6:41 pm | श्रीगुरुजी
म्हणजे एनडीटीव्ही, मटा, सामना, लोकमत, लोकसत्ता, पुढारी, सकाळ, आनंद बझार पत्रिका न्यूज, आजतक, हिंदुस्थान टाईम्स . . . हे सुद्धा पूर्ण असत्य सांगतात?
8 May 2021 - 6:43 pm | श्रीगुरुजी
वायर, क्विंट, प्रिंट, कॅरॅवॅन ही निष्पक्ष नावे लिहायचो विसरलोच की.
8 May 2021 - 8:02 pm | आग्या१९९०
सगळी म्हणजे सगळी चॅनल. प्रिंट मीडिया अद्यापतरी ठीकठाक आहेत.
8 May 2021 - 8:59 pm | श्रीगुरुजी
म्हणजे मटा, सामना, लोकमत, लोकसत्ता, पुढारी, सकाळ, हिंदुस्थान टाईम्स, प्रिंट, वायर, क्विंट, तरूण भारत वगैरे अजूनही पूर्ण सत्य बातम्या देतात.
9 May 2021 - 11:04 am | सुखीमाणूस
आणि नवीन ॲप बनवण्याच्या निमित्ताने केन्द्राकदे पैसे मागण्याची आणि त्यात गफला करण्याची पण सोय होइल.
8 May 2021 - 3:31 pm | आग्या१९९०
एकंदरीत केंद्र सरकारचा सगळाच कारभार ढिसाळ असल्याने त्यांच्याकडून ॲप बनवून घ्यायची कोण रिस्क घेईल?
8 May 2021 - 8:12 pm | राहुल मराठे
https://www.news18.com/news/india/what-explains-pm-narendra-modis-silenc...
8 May 2021 - 8:41 pm | अमर विश्वास
अरे हा धागा अजून चालूच आहे का ...
म्हणजे प्राध्यापकांनी अजून आशा सोडलेली दिसत नाही
चालूदे
8 May 2021 - 10:34 pm | प्रसाद गोडबोले
२०२४ पर्यंत आशा सोडायची नाहीये हो .
8 May 2021 - 11:10 pm | आग्या१९९०
ॲड हॉक कारभारी आता सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शनाने कारभार करणार ,त्यामुळे आता कितीही वर्षे राज्य केले तरी चालेल. शिकतील हळू हळू.
https://www.ndtv.com/india-news/supreme-court-forms-task-force-to-look-i...
8 May 2021 - 11:34 pm | सुखीमाणूस
म्हणजे २०२४ ला कोण निवडुन येणार हे ठरले म्हणायचे
9 May 2021 - 12:23 am | आग्या१९९०
हो ३००+ असले तरी "अडाण्याचा गाडा" सुप्रीम कोर्टालाच हाकावा लागणार.
9 May 2021 - 11:01 am | सुखीमाणूस
प्रर्श्णान्चे भिजते घोन्गडे ठेवुन कुठलेही निर्णय न घेता मनमोहन सिन्ग यानी जो राज्यकार्भार चालवला तो ज्याना योग्य वाटतो त्याना मोदी सरकारचा काम म्हऩजे अडाण्याचा गाडाच वाटणार...
9 May 2021 - 11:19 am | आग्या१९९०
सुप्रीम कोर्टबरोबर Lancet ने केंद्राचे कान टोचले.
https://www.loksatta.com/pune-news/corona-virus-by-prime-minister-narend...
9 May 2021 - 11:34 am | मुक्त विहारि
भाजप शिवाय इतरांना मत देणे म्हणजे, बंगालची पुनरावृत्ती होण्याचेच चान्सेस जास्त ....
https://m.youtube.com/watch?v=230GEf8tLFE
8 May 2021 - 11:38 pm | श्रीगुरुजी
दलालांचे आंदोलन सुरू होते तेव्हा जानेवारी महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने नवीन कृषी कायद्यांना तात्पुरती स्थगिती देऊन कायद्यांचा अभ्यास करण्यासाठी व शेतकऱ्यांचे आक्षेप समजून घेण्यासाठी चार सदस्यीय समिती नेमली होती. ते सर्व प्रकरण अजून अधांतरी आहे.
श्रीरामजन्मभूमी खटला सुरू असताना त्यात तडजोडीने तोडगा निघावा यासाठी सर्वोच्च न्यायालयाने त्रिसदस्यीय समिती नेमली होती. त्यातून काहीही निष्पन्न न झाल्याने शेवटी खटला सुरू करून निकाल द्यावा लागला.
या प्रकरणातही टास्क फोर्स नेमून काहीही निष्पन्न होईल असे दिसत नाही.
9 May 2021 - 12:17 am | आग्या१९९०
ह्यावेळी तसे होणार नाही.
8 May 2021 - 11:46 pm | सुखीमाणूस
मत अगदी पक्क झाल आहे.
स्थानिक पक्श नकोच राज्य करायला कुठेही.. ते फक्त विरोधक म्हणुन चान्गले काम करु शकतात
अरविन्द केजरिवाल चान्गला पर्याय उभा करतील असे वाटले होते पण दिल्ली कोरोना उद्रेका मुळे असे वाटणे दुर झाले.
कौन्ग्रेस् परत गान्धी कुटुम्बाशिवाय पर्याय देउ शकली तर भारतासाठी चान्गले होइल.
देशाला एकसन्ध ठेवायचे तर चान्गले राष्ट्रव्यापी नेत्रुत्व देणारा आणि लोकशाही पध्ततिने चालणारा पक्शच हवा.
9 May 2021 - 1:19 am | प्रसाद गोडबोले
देशात कोणताही पक्ष सत्तेत असो, देश एकसंधच रहाणार आहे ह्या बद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही !
काँग्रेसच्या मुलभुत विचारसरणीतच घोळ आहे. अगदी अत्ता "राष्ट्रसेवा दल वाले " म्हणाले की हिंदुंची मंदिरे आणि देवस्थाने कोरोना साठी द्या, त्यांचा निधी कोरोनासाठी वापरा !! अन्य धार्मिक सस्थांविषयी बोलायची ह्यांची हिंमत आहे का ?
जसे कम्युनिस्ट पक्षात निरनिराळे गट आहेत - मार्क्सवादी , लेनीनवादी , माओवादी वगैरे तसे काही काँग्रेसमध्ये गट पडले - उदाहरणार्थ - इंदिरा काँग्रेस , मॉकगांधी काँग्रेस , लालबालपाल काँग्रेस , गोखले आगरकर काँग्रेस तर एकवेळ त्यातील काही जणांना मत देण्याचा किमान विचार कराता येईल ! पण पप्पु पिंकी काँग्रेसला फक्त पंजाब मध्येच मते मिळु शकतात . ख्या ख्या ख्या
महाराष्ट्रात मात्र आमचे मत फक्त राष्ट्रवादी काँग्रेसला च !
#शेटजी भडजीच्या हातात महाराष्ट्राची सत्ता देणार काय ? लाख काय करोडो मेले तरी चालतील पण आम्ही #टरबुज्या #अनाजीपंत ला परत मुख्यमंत्री होऊ देणार नाही. (असं मी म्हणत नाहीये , असं मी ऐकत आहे पच्चिम महाराष्ट्रात ... नेहमीच ... =))) )
9 May 2021 - 11:31 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पंतप्रधानांच्या कार्यपद्धतीवर आता काही लिहावे बोलावे वाटत नाही, इतकं नेतृत्वहीन आणि बेजवाबदार नेतृत्त्व आपल्याला लाभले आहे, नेतृत्वात बदल केले नाही तर देशात काय घडेल हे आता सांगणे कठीण झाले आहे. आज देशात पुन्हा चार लाखाचा आकडा रुग्णसंखेने ओलांडला आहे, लसींचा तुटवडा, उपचारांची बोंब आणि दररोज मृत्युमुखी पडणारे असंख्य भारतीय आता हे दृश्य पाहवत नाही. आपत्तीच्या काळात इतकं फुसकं नेतृत्त्व लाभेल, असे स्वप्नातही कोणा भारतीयास वाटले नसेल. एकीकडे सरकारच्या बेजवाबदारपणाला त्रासून मा.सर्वोच्च न्यायालयाला दखल घेऊन एका योग्य कार्यप्रणालीसाठी समिती नेमून काम करावे लागत आहे, हे आपल्या भारतीयांचं दुर्दैव आहे.
दुसरीकडे, जगप्रसिद्ध वैद्यकशास्त्रातील 'लॅन्सेट' या नियतकालिकेत आपल्या संपादकीय मधे काल लिहिले आहे की, पंतप्रधान मोदी यांच्या सरकारने करोना विषाणुमुळे निर्माण झालेले संकट हाताळण्यात अपयश आले आहे, सरकारवर टीका करणा-याचे ट्वीटर खाते गोठवून करोनावर नियंत्रण आणता येणार नाही, त्याचबरोबर सरकारला ''आत्मसंतुष्टता'' भोवली अशी खरपुस टीका लॅन्सेटने केली आहे. भारत पहिल्या लाटेनंतर सावरलेल्या परिस्थितीमुळे हुरळून गेला आणि त्यामुळे नियंत्रणात येत असलेले संकट वाढत गेले. परिस्थिती चांगली होती तेव्हा कृतीदलाची बैठक घेऊन कार्यवाही आवश्यक होती तेव्हा काहीच केले नाही. (काय करणार पश्चिम बंगालची निवड्णूक अतिशय महत्वाची होती, दोन महिने तिकडे प्रचारातकच गेले). सत्ता पिपासू या पेक्षा वेगळं काय करणार.
लॅन्सेट ने दी इन्स्टीट्यूट फॉर दी हेल्थ मेट्रिकस अँड इव्हॅल्युशन या संस्थेचा हवाला देऊन म्हटलं आहे की, १ ऑगष्टपर्यंत भारतात दहा लाख लोकांचे बळी जाण्याची शक्यता आहे, तसे झाले तर ते मोदी सरकारने बेजवाबदार वर्तनाने ओढवून घेतलेले संकट असेल अशी भिती व्यक्त करण्यत येत आहे. लॅन्सेटनेही कुंभमेळा, निवडणूका प्रचार रॅल्या आणी गर्दीवरही टीका केली आहे, सरकार म्हणून यावर प्रतिबंध नियमांचे पालन करता आले नाही असे ते म्हणतात. सरकारने साथीचा मुकाबला करतांना आत्मसंतुष्टता मानली अशी टीकाही केली आहे.
भारतातील करोना रुग्णांच्या हालपेष्टा समजण्यपलिकडे गेल्या आहेत. रुग्णालये भरली आहेत, डॉक्टर आणि स्टाफ थकलेले आहेत, समाजमाध्यमातून डॉक्टर्स, नागरिक. प्राणवायू, बेड्स, औषधीचे मागणी करीत आहेत असे चित्र दिसत आहे. केंद्रीय आरोग्यमंत्र्याच्या बेजवाबदार वर्तनाचा लॅन्सेटने उल्लेख केला आहे. दुसरी लाट येण्याआधी आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी भारतात करोनाची लाट संपल्यात जमा आहे, अशा अविर्भावात वक्तव्ये केली होती. सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण झाल्यामुळे निर्धोक झाल्यासारखे सारखे सरकार पाठ थोपटवून घेत होते, त्यामुळे दुस-या लाटेची तयारी करता आली नाही. करोना साथ संपली असे समजून भारताने उशीरा लसीकरण सुरु केले, त्यामुळे लसीकरण मोहीम फसली त्याबाबतही केवळ लोकसंखेच्या केवळ दोन टक्के लसीकरणाचे लसीकरण झाले, राज्यपातळीवर लसीकरण फसले, त्यावरही टीका केली आहे.
आता काय केले पाहिजे याबाबतीत लॅन्सेटने काही उपाययोजना सुचविल्या आहेत. (अहो, आमच्या नेत्यांना काहीही कोणी सांगायची गरज नाही, ते खुप हुशार आहेत. कप्पाळ ठोकून घेण्याची वेळ आली यांच्या हुशारीपुढे)
सदोष लसीकरण कार्यक्रमाची सुसूत्रीकरण, लसीकरणाचे वेग वाढविणे, लसीचे वितरण ग्रामीण आणि शहरी असे दोन्ही ठिकाणी समान पद्धतीने करावे. सरकारने वेळोवेळी माहिती जनतेला द्यावी. दर १५ दिवसात जे काही घडते आहे त्याची माहिती द्यावी. करोनाचा चढता आलेख खाली आणन्यासाठी देशव्यापी टाळेबंदीचा उपाय सुचवला आहे.
देशातील आणि जगभरातील वृत्त आणि प्रसारमाध्यमांनी लॅन्सेटमधील लेखनास प्रसिद्धी देऊन भारताच्या अवस्थेबद्द्ल आपली मतं मांडली आहेत. लॅन्सेटने सुचविलेल्या उपायांवर सरकार काहीही करणार नाही. निर्बूद्ध सरकार आणि नेतृत्त्वही तसेच असल्यामुळे सरकारकडून काहीही अपेक्षा करणे आता व्यर्थ आहे. आज वीस एक राज्यात लॉकडाऊन कमी जास्त प्रमाणात सुरु आहेत, त्यामुळे केंद्रसरकार लॉकडाऊन करणार नाही असे वाटते. आता दुसरी लाट ओसरुन तिस-या लाटेला सामोरे आपल्या सर्व भारतीयांना जावे लागणार आहे, असे दिसते.
आपण आपली आणि आपल्या कुटूंबाची काळजी घ्या इतकेच आपल्या हातात आहे. विनाकारण घराबाहेर पडू नका, सॅनिटाइजरचा वापर, साबण-पाण्याचा वापर करुन हात नियमित धुत राहा. मास्कचा वापर करा....!
लॅन्सेटचा दुवा.
-दिलीप बिरुटे
9 May 2021 - 11:52 am | आग्या१९९०
विमान जमिनीवर आले
https://www.loksatta.com/mumbai-news/prime-minister-lauds-state-fight-ag...
9 May 2021 - 1:14 pm | Bhakti
दुसरी लाट येऊ शकते हे सगळे वैज्ञानिक निक्षून सांगत असताना, जनतेला गाफिल ठेवले गेले.कोणतीच तयारी केली नाही.थोडी सजगता ठेवली असती तर किती जीव वाचले असते.खुशाल लसी दुसऱ्या देशांना दिल्या...हेच राष्ट्र प्रथम का?इतकी हुशार लोक(वैज्ञानिक) असताना एवढा अडाणीपणा झालाच कसा.हा इतिहास कधीच विसरता येणार नाही.