आदरणीय पंतप्रधान मा. मोदी यांचं सरकार आल्यापासून देशात अनेक गंभीर प्रश्न निर्माण झालेले आहेत, ते सोडविण्यासाठीचे प्रयत्न करण्याऐवजी जे प्रश्नच नव्हते, त्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्याचा सतत प्रयत्न केला जातो. सरकारसमोरील प्रश्न आणि त्याची सोयीस्कर उत्तरांनी देशात विविध माध्यमं सतत चर्चेत असतात. गेल्या वर्षभरापासून करोना या विषाणुच्या संक्रमाने भर घातली. आज जवळपास चार लाखांवर बाधीतांचा आकडा पोहचला आहे, मृत्युचं प्रमाणही वाढत आहेत. भारताच्या एकून आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे केव्हाच निघाले आहेत, अशावेळी असलेल्या व्यवस्थेत माणसं कशीतरी भयावह अवस्थेत जगत आहे, भारतीय जनता आपापल्या सगेसोय-यांच्या गमावलेल्यांच्या दुखात खिन्न मनाने कसेबसे आलेला दिवस ढकलत आहेत.जगण्याची शाश्वती राहीली नाही, अशी एक अनामिक भिती माणसाच्या मनात भरुन राहीलेली आहे. दुसरीकडे लशींचा देशातला, राज्यातला तुटवडा आणि लशीकरणाने विषानुवर नियंत्रण आणन्याचा प्रयत्न केंद्रस्तरावरुन प्रयत्न केला जात आहे. जगभरात करोना विषानुवर नियंत्रण येत असल्याचे दिसत आहे, त्याचवेळी भारताची अवस्था दुस-या लाटेत दिवसेंदिवस अधिक दयनीय होत चालली आहे. गेल्या वर्षभरापासून येणा-या विषाणुंच्या लाटेबाबत आपण गाफील राहीलो, प्रयत्न करण्याऐवजी स्वत:च कौतुक करण्यात केंद्रीय नेतृत्त्व गुंतलेले दिसले. आणि त्याचे आज परिणाम भारतीय जनतेला भोगावे लागत आहे. आता इतर देशांच्या तुलनेत आपले मृत्युदर कमी आहे, बाधीत संख्या कमी आहे, आकडे कमी आहेत, साख्यंकी, वगैरे दाखवून आपली परिस्थिती भली आहे, हे दाखविण्यात आता काहीही अर्थ उरला नाही, वास्तव समजून घेण्याची वेळ आली आहे.
देशभरात आरोग्यव्यवस्थेची मरणासन्न अवस्था झालेली आहे,आपत्ती व्यवस्थापनाचे धडे काय असतात त्याची कल्पना नसलेले नेतृत्व लोकांना जगण्याची उभारी देऊ शकले नाही. लोकांचे दुखदायक व्हीडीयो माध्यमातून फिरत आहेत. आपण जगू की नाही याची शाश्वती आता उरली नाही, अशी भिती प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली आहे, अशावेळी जनतेमधे आश्वासक वातावरण करण्याऐवजी आपण कुंभमेळे भरवता ? आपण ठरवलं असतं तर ते थांबवता आलं असतं आता वाढलेल्या संसर्गाचे आकडे यायला लागले आहेत. पश्चिम बंगालची निवडणूक आपण प्रतिष्ठेची केली. मा.पंतप्रधान, देशाचे गृहमंत्री, केंद्रीयमंत्रीमंडळातील मंत्री, आमदार, खासदार, अभिनेते त्यांच्या रॅल्या, ते मोर्चे ती भाषणं यात अशावेळी जनतेच्या दु:खावर फुंकर घालण्याऐवजी आपणास पश्चिम बंगालची निवडणूक महत्वाची वाटली. रोम जळत होते तेव्हा निरो फिडल वाजवत होता अशा गोष्टीची आठवण होत होती. इतके, हे नेते आणि नेतृत्व असंवेदनशील असू शकतात ही कल्पनाच सहन होऊ शकत नाही. जीवाचा आटापीटा करुनही पश्चिम बंगाल मधे आपला दारुण पराभव झाला. जनतेने आपणास साफ़ नाकारले, एक संदेश दिला की आपण कोणत्या विषयांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे त्याचं एक आत्मभान जनतेने दिले. . जनतेची आवश्यकता काय आहे, यातून आपण काही शिकाल अशी अपेक्षा करणे गैर आहे. विकत घेतलेली माध्यमं आपला जयजयकारात व्यस्त आहेत. कोणत्याही माध्यमाने हॉस्पीटल्समधील आवश्यक बेडची संख्या सांगितली नाही, उपचार कुठे मिळू शकतो ते सांगितले नाही, आपण करीत असलेल्या चुंकावर मौन बाळगले. मात्र पश्चिम बंगालमधे आपण कसे विजयी व्हाल त्याचे खोटे आकडेमोड करीत विविध वाहिन्या व्यापून टाकलेल्या होत्या. करोनाच्या पहिल्या लाटेत एका चित्रपटसृष्टीतील अभिनेत्यावर दिवसभर वाहिन्या त्याच विषयावर चर्चा करीत राहील्या तेव्हाही आपण जनतेच्या आवश्यकतेकडे अक्षम्य दुर्लक्ष केले.
जनतेला उपचार, लशीकरण, आणि योग्य मार्गदर्शन यांचे योग्य नियोजन हवे होते. ऑक्सीजनचा तुटवडा जाणवत होता, इंजेक्शचा तुटवडा होता. लोक रुग्णालयाबाहेर तळमळतांनाची छायाचित्रे व्हीडीयो व्हायरल होत होती, आजही होत आहेत. मा.सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतरही आपल्यात काहीही जवाबदारीचं भान दिसलं नाही. आपण वाढती लोकसंख्या आणि तुटपुंज्या उपायात आम्ही किती काम करीत आहोत हे दाखविण्यात व्यस्त राहीलात. आपण टीका करणा-यांवर कायदेशीर कार्यवाहीत व्यस्त राहीलात. मा.सर्वोच्च न्यायालयास सांगावे लागले की सकारवर टीका करणा-यांवर आपण कार्यवाही कराल तर याद राखा, आपल्या दडपशाहीबद्दल मा.न्यायव्यवस्थेला आपलाला समज द्यावी लागते. आपण जनतेच्या गरजांकडे दुर्लक्ष आजही करीत आहात. आपली असंवेदनशीलता अनेकदा दिसून आली. आसामचा प्रचार असो, की पश्चिमबंगालचा प्रचार असो. बाकी इतर पक्षांच्या नेतृत्वाने काय केले यापेक्षा आपण एक आदर्श उभा करायला हवा होता. राजकारण करायला माणसं जगली तर भविष्यकाळात आपणास भरपूर राजकारण करता येणार आहे. दीर्घकालीन नियोजनांचा अभाव, विविध पक्षांच्या भूमिका, पक्षीय धोरणे, मतभेद या पलिकडे जाऊन राष्ट्रहित लक्षात घेऊन नियोजन करणे गरजेचे होते.
जगभरातील आंतरराष्ट्रीय दैनिके दुस-या लाटेतील भारताच्या बेजवाबदारीबद्दल लिहित असतांना आपण त्या त्या राष्ट्रांना आपापल्या परदेशातील दुतावासामार्फत भारताची बदनामी थांबवा, असे म्हणत आहात. सरकारवर टीका करणा-यांची ट्वीटर खाती गोठवायला सांगत आहात. आपल्या देशातील माध्यमे कदाचित आपल्याविरुद्ध लिहिणार नाहीत, सरकारच्या प्रशासनाबद्दल लिहिणार नाहीत कारण त्यांचे हित त्यात गुंतलेले आहेत, भारतीय माध्यमांना पॅकेजेसप्रमाणे वार्तांकन करावे लागतही असेल, परंतु परदेशातील सरकारे, लोक आणि देश नागरिकांचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य जपतात त्या टीकेचा आदर करतात, आपणास टीका सुद्धा सहन होत नाही. टीकेकडे सकारात्मक पद्धतीने बघायला हवे, त्यातले चांगले म्हणून काही घ्यावे असे आपण आणि आपल्या मंत्रीमंडळास वाटत नाही. आपण आपल्या अपयशाचे खापर राज्यांवर फोडण्याचे प्रयत्न करीत आहात, कुरघोडीचे राजकारण करीत आहात असे वाटावे इतकी ती तफावत आपल्या प्रशासकीय भेदाच्या वर्तनातून दिसून येते.
भारतीय जनतेने आपणास बहुमताने निवडून दिले आहे ते जनता पूर्वीच्या सरकारांमुळे त्रस्त होती, अपेक्षांना उतरत नव्हती म्हणून. आपण काही चमत्कार कराल, काही बदल कराल, आपल्या वकृत्वामुळे लोक भारावून गेले होते. आपण जसे जसे, जे जे म्हणाल ते ते लोकांनी केले. आपण दिवे लावा म्हणालात, लोकांनी दिवे लावले, आपण थाळीनाद करा म्हणालात लोकांनी आपल्या डोक्याचा वापर न करता थाळी नाद केला. आपण जे जे म्हणाल ते ते सर्व केले. अजूनही आपण काही चमत्कार कराल म्हणून जनता आपल्याकडे आस लावून बसली आहे, पण दुर्दैवाने आपलं अपयश आता लपविणे शक्य नाही. सरकारातील सध्याच्या अवस्थेबद्द्ल निवडून दिलेले प्रतिनिधीसुद्धा बोलत नाहीत, दयनिय अवस्थेबद्दल तक्रार करीत नाहीत. सत्तेच्या मोहापोटी लोकांच्या गरजांबद्दल प्रतिनिधी बोलत नाहीत, इतके लाचार लोकप्रतिनिधी पहिल्यांदा बघावे लागत आहेत.
सध्या सोशियल मिडियात मा.पंतप्रधान यांच्यावर खुप टीका होतांना दिसते, टींगल टवाळी होतांना दिसते. प्रधानमंत्र्यांबद्दलचा आदर लोक विसरत चालले आहेत, ही टीका थेट सन्माननीय पंतप्रधान आणि गृहमंत्री यावर असते, देशभरातून त्यांच्यासंबंधी संतप्त प्रतिक्रिया उमटत असतात, टीका करणे ही सहज प्रतिक्रिया असते. पंतप्रधान म्हणून असलेल्या जवाबदा-यांपासून त्यांन पळ काढता येणार नाही, लोकभावनेचा विचार करावाच लागेल. आज परदेशात लशीवाटपापेक्षा देशात लशींची आवश्यकता आहे, परराष्ट्रीय धोरण म्हणून काही मदत करावी लागत असेल पण आपण जगाला मदत करीत आहोत त्याचवेळी इथे देशात काय अवस्था आहे, हा विचार करु नये असा संतप्त सवाल लोक करीत असतात.
भारतीय जनतेने काही आमुलाग्र बदल होतील म्हणून जनतेने सत्तांतर केले. पण गेली काही वर्षात असलेल्या प्रश्नांचा नीपटारा झाला का ? वाढती बेरोजगारी, वाढती महागाई, गरिबी, या आणि असंख्य प्रश्नांना घेऊन सत्तेवर आपण आलात आता त्यात काही बदलही झाले नाहीत. खोटे युक्तीवाद केले तरी, असलेल्या प्रश्नांपासून सुटका होऊ शकत नाही, लोकांनी ज्यासाठी निवडून दिलं, तो हेतू पूर्ण झाला नाही तर लोक बदल घडवतात हा या देशातला इतिहास आहे, लोकशाहीने भल्या भल्यांचे होत्याचे नव्हते केले. तरीही आपण काहीही शिकला नाहीत, आपण जे ठरवू ते झाले पाहिजे या अट्टाहासाने देशाला अजून किती वेठीस धरणार, संकटाच्या खाईत लोटणार हा प्रश्न आहे, अशावेळी आता काही बदल होणे आवश्यक वाट्ते.
सध्याचं प्रशासनातील पंतप्रधानांचं अपयश पाहता, लोक ज्या पद्धतीने पंतप्रधान पदाची त्यांच्या भाषणाची खिल्ली उडवत आहेत ते सर्व पाहता, आता पक्षाच्या कार्यकर्ते, नेते, आणि सल्लागारांनी तज्नांनी आता नेतृत्त्वात बदल करण्याची आवश्यक्ता वाटते. आपणास बहुमत आहे, त्यामुळे आपण पंतप्रधान आणि मंत्रीमंडळ बदलू शकत नसलो, तरी आता अन्य चेह-यांना प्रयोग म्हणून आता नव्या चेह-याला नवी संधी दिली पाहिजे, आपल्याकडून जे काही नेतृत्त्व म्हणून अपेक्षित आहे, त्यात जर काही होत नसेल तर आता भाकरी फ़िरवली पाहिजे. भाकरी फ़िरवली नाही तर ती करपते त्या प्रमाणे सध्याच्या नेतृत्वात आता बदल करणे आवश्यक आहे, असे वाटते. आपल्या सरकारमधे अनेक अनुभवी व्यक्ती आहेत, कोणास तरी नवी संधी दिली पाहिजे. सुडाचे राजकारण न करता आता माणसाच्या जगण्याला प्राधान्य देणा-या कृतीची गरज आहे.
नाकर्ते शासन-प्रशासनामुळे माणसाच्या जगण्याची शाश्वती वाटत नसेल तर लोकांना अशी शक्तीशाली व्यवस्था लोकशाहीच्या माध्यमातून बदलता येते, हा येथील इतिहास आहे, पक्षातील लोकप्रतिनिधींची एक मर्यादा असते, सत्तेचा लोभ असतो. परंतु ज्या नागरिकांचे नातेवाईक गमावले गेले आहेत त्या नागरिकांनी सनदशीर मार्गाने सरकारच्या धोरणाला विरोध केला पाहिजे, नागरिक म्हणून तरी आपली काहीही मजबुरी नाही. सरकारविरुद्ध शिक्षितांनी लिहिले बोलले पाहिजे. सरकारला बहुमत आहे, सध्या सत्तांतर शक्य नाही, परंतु, पंतप्रधान मोदी यांची पक्षीय कारकीर्द पाहता, इतिहास सोडून द्या. पण, पक्षाच्या पद्धतीप्रमाणे त्यांना नेता म्हणून जसे निवडले तसे त्यांचं नेतृत्त्व आता बदलण्याची वेळ आली आहे. एका नव्या चेह-याची गरज आहे, पंतप्रधान मोदी यांचा अपयशी कारकीर्दीचा पाढा असाच वाढत राहीला तर तो पक्षाला घातक ठरेलच पण देशासाठी ही वाटचाल घातक ठरणार आहे. त्यामुळे वेळीच ही व्यवस्था बदलेल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. पश्चिम बंगालच्या अनुभवावरुन काही तरी शिकून भारतीय लोकांना ’अच्छे दिन’ येतील अशी अपेक्षा करु या, पश्चिम बंगालने या दोन्ही नेत्यांना स्पष्ट थेट नाकारले आहे आणि देशाला वाचवले. एक नवा संदेश बंगालने दिला आहे. हुकुमशाही प्रवृत्तीला लगाम लावला आहे. लोक अशा कोणत्याही भूलथापीला बळी पडत नाही, हे पश्चिम बंगालने दाखवून दिले, तरीही, पक्षाने तीनाचे सत्तर पंचाहत्तर कसे केले, याच जयजयकारात पक्ष राहणार असेल, आणि 'गीरे भी तो टांग उपर'करुनच फ़िरायचे असेल तर तर पक्षाची अवस्था पून्हा एकदा दोन खासदारांवर जाऊन थांबायला वेळ लागणार नाही. आणि जनता म्हणून तोपर्यंत आपण सर्व देशोधडीला लागलेले असू...!
प्रतिक्रिया
3 May 2021 - 11:28 am | प्रचेतस
मोदींना बदलण्याची गरज वाटत नै. मोदी हे तो मुमकीन है म्हणतातच ना. बंगालात सर्वच प्रचार करत होते, खुद्द ममतांच्या सभांचा आकडा मोदींच्या सभांपेक्षा जास्तच आहे, त्यांच्याबद्दल तुम्हाला आक्षेप दिसत नाही. बरं मोदी योग्य वाटत नसतील तर दुसरे कोण हाही प्रश्नच आहे.
शिवाय देशभरातील 45 टक्क्यावरील करोना रुग्ण महाराष्ट्रातील आहेत, पण राज्य सरकारवर तुमच्या टीकेचा एकही बाण पडताना दिसत नाही, त्याचे काय? सगळ्याला मोदीच जबाबदार कसे?
3 May 2021 - 11:31 am | प्रचेतस
शिवाय निकाल लागल्यावर प्लास्टरमधला पाय सुमडीत बाहेर येऊन व्हीलचेअर पण गायब झालेली दिसते आणि दीदी एकदम टुणटुणितपणे बाहेर आलेल्या दिसतात त्यांचे काय?
3 May 2021 - 11:46 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
राजकारणात अनेक गोष्टी समोर आणि पडद्यामागे चाललेल्या असतात. कोणी दाढी ठेवतो, कोणी प्लॅष्टर ठेवतो, कोणी धार्मिक स्थळांना मदत करतं, कोणी जयश्रीरामच्या घोषणा देतो, या आणि अशा असंख्य गोष्टी मतांच्या राजकारणांसाठी सुरु असतात. आज तरी त्यांना मोमता दिदींना निर्वीवाद बहुमत मिळालं आहे, त्यामुळे त्यांच्या अशा गोष्टी समजून उमजूनही लोकांनी त्यांना स्वीकारलं आहे, हे मान्य करावे लागते.
-दिलीप बिरुटे
3 May 2021 - 2:33 pm | बापूसाहेब
वाह.. हीपोक्रसी की भी सीमा होती है प्राध्यापक साहेब.. आपला तो बाबू आणि दुसऱ्याच ते कार्ट..
नरेंद्र मोदी सुद्धा निर्विवाद बहुमत की काय असतं ना तेच मिळवून निवडून आलेत..
छापा काटा करून किंवा ५ ३ २ खेळून नाही.. !!! किंवा बापाला दिलेलं वचन पूर्ण करायचं होत म्हणून तिथं ओढून ताणून जाऊन बसलेले नाहीत.
4 May 2021 - 10:37 am | संजय पाटिल
+१
3 May 2021 - 11:36 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
खरं तर, भाजपाकडे फार मोठी नेत्यांची फळी आहे. दुर्दैवाने काही वर्षांपासून सद्य मंत्रीमंडळातील नवे चेहरेच समोर येत नाहीत. मला जर विचाराल दुसरा कोण ? तर मला नितीन गडकरी एक अभ्यासू चेहरा समोर येतो. दुसरे योगी आहेत. पण शक्य नाही असे वाटते. आज ना उद्या तुम्हाला एक नवा चेहरा समोर आणावाच लागेल. बाकी प्रश्न फक्त सद्य केंद्र सरकारातील नव्या चेह-याविषयी आहे, नव्या नेतृत्वाविषयी त्यामुळे राज्य आणि त्यांचे विषय हा माझ्या लेखनाचा विषय नाही.
आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक आभार.
-दिलीप बिरुटे
3 May 2021 - 11:39 am | प्रचेतस
योगी तुम्हाला चेहरा वाटत असेल तर बोलणंच खुंटलं.
3 May 2021 - 11:53 am | गॉडजिला
कोवीड संपेपर्यंत मनमोहनसींग याना नायक (चित्रपट ) स्टाईल पंप्र करुन टाकावे सर्वानी एकत्र येउन व देशहिताचा विचार करुन
3 May 2021 - 11:56 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कट्टर हिंदुत्वाचा एक चेहरा समोर ठेवावाच लागेल म्हणून धडाकेबाज लिडर म्हणून आदित्य योगीनाथ यांनाच पुढे करावे लागेल. अमित शहा, जे.पी.नड्डा, राजनाथ सिंह असे अनुक्रम लावले तरी सध्याचं भारतीय राजकारण पाहता त्यांनाच समोर आणावे लागेल. आणि पुढील निवडणूकीत यांच्याच सभा धडाकेबाज पद्धतीने राबवावे लागतील. बघा मी काय म्हणतो ते विसरु नका. अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कोणाला नवा चेहरा म्हणून पुढे आणेल तेही महत्वाचे आहेच.
-दिलीप बिरुटे
3 May 2021 - 12:20 pm | प्रचेतस
जोपर्यंत मोदी यश देताहेत तोपर्यंत दुसरं कुणीही येणार नाही, २०२४ ला पण मोदीच येतील, आणि त्यानंतर त्यांना यश मिळवता नाही आलं तरच इतर कोणी येईल आणि त्यानंतर मोदीही अडवाणींसारखे अडगळीत जातील. मुख्य नेते जपून ठेवण्याची काँग्रेससारखी परंपरा भाजपात नाही.
3 May 2021 - 1:16 pm | कॉमी
मोदी नकोत आणि योगी चालतात हे काय पचले नाही. मोदी योगीपेक्षा कित्येक पटीने चांगले.
3 May 2021 - 1:47 pm | आग्या१९९०
नितीन गडकरी अगदी योग्य आहेत पंतप्रधानपदासाठी. त्यांची कार्यशैलीच त्यांच्या पक्षाला भविष्यातील निवडणुका जिंकून देतील, पुलावामा सारख्या घटनांचा आधार घ्यावा लागणार नाही कधीच.
4 May 2021 - 11:56 am | गोंधळी
बरं मोदी योग्य वाटत नसतील तर दुसरे कोण हाही प्रश्नच आहे.
सुब्र्मण्यम स्वामी पर्याय असु शकेल. उच्च शिक्षीत आहेत व भारतीय व्यवस्थेची/परीस्थीतीची जाण आहे.
4 May 2021 - 12:06 pm | सुबोध खरे
थुकरट वाडीच्या चार टिनपाट लोकांना मोदी नको असे वाटत असेल तर वाटू द्या.
भारतभरात ३०३ (५६ %) जागावर श्री मोदी याना जनतेने बहुमताने निवडून दिले आहे.
आजही श्री मोदींच्या नावावर निदान ५० % पेक्षा जास्त जागा निवडून येतात हि वस्तुस्थिती नजरे आड करून श्री मोदींना पर्याय निवडण्याची वल्गना करणे हा भंपकपणाच आहे.
ममता दीदी महाराष्ट्रात, कर्नाटकात उत्तर प्रदेशात राजस्थानात किंवा मध्य प्रदेशात एक तरी लोकसभेची जागा निवडून आणू शकतील का?
२०१९ च्या लोकसभा निवडणुकात निव्वळ बंगाल मध्ये ४२ पैकी २२ खासदार निवडून आणताना त्यांच्या तोंडाला फेस आला होता काहीही नसताना श्री मोदींच्या नावावर भाजपाला १८ जागा आल्या होत्या हे इतक्यातच विसरले वाटतं का निवडक विस्मरण झालंय.
उगाच मोदींना पर्याय म्हणून त्यांना उभा करायचे भंपक दावे करण्यापेक्षा वस्तुस्थिती जाणून घ्या.
4 May 2021 - 2:34 pm | गोंधळी
उगाच मोदींना पर्याय म्हणून त्यांना उभा करायचे भंपक दावे करण्यापेक्षा वस्तुस्थिती जाणून घ्या.
वस्तुस्थिती गुलाम अंध भक्तांनी जाणुन घ्यायची गरज आहे.
पैश्यांच्या जोरावर ,मिडियाला/विरोधी पक्षातील लोकांना प्रचंड प्रमाणात पैसे देवुन त्यांना गप्प करुन, सुप्रिम कोर्ट,निवड्नुक आयोग, सिबिआय,......... ह्यांना हाताशी धरुन सत्ता मिळ्वत आली आहे. हे खोटे आहे का???
हिम्मत असेल तर विरोधी पक्षातील एकालाही न घेता ,विकासाच्या मुद्द्यावर जिंकुन दाखवा.
जिथे अमेरिका /ईंग्लंन्ड वगैरे देश आपल्या देशातील लोकांसाठी आगाउ लस बुक करुन ठेवत होते तेव्हा फक्त चमकोगिरिकरन्या साठी ह्यांचे महान देव बाकीच्या देशात लस/ऑक्सीजन पाठवत होते. आप्ल्याच देशातील लोकांना लस मिळत नसताना लस उत्सव साजरा करायला सांगने हा महामुर्खपणा नाही आहे का???
आम्हाला अभिमान आहे गुलाम नसण्याचा.
4 May 2021 - 2:48 pm | श्रीगुरुजी
पैश्यांच्या जोरावर ,मिडियाला/विरोधी पक्षातील लोकांना प्रचंड प्रमाणात पैसे देवुन त्यांना गप्प करुन, सुप्रिम कोर्ट,निवड्नुक आयोग, सिबिआय,......... ह्यांना हाताशी धरुन सत्ता मिळ्वत आली आहे. हे खोटे आहे का???
हे १०० टक्के खोटे आहे. या मार्गाने सत्ता मिळविता येत असती तर बंगाल, दिल्ली, केरळ, तामिळनाडू वगैरे राज्यात पराभव झाला नसता.
हिम्मत असेल तर विरोधी पक्षातील एकालाही न घेता ,विकासाच्या मुद्द्यावर जिंकुन दाखवा.
बहुतेक सर्व पक्षात इतर पक्षातून आलेले/आणलेले नेते आहेत. अगदी नेहरूंच्या काळापासून हे सुरू आहे.
भाजपने २०१४ व २०१९ ची निवडणुक विकासाच्या मुद्द्यांवरच जिंकली होती. तेव्हा जाहीरनाम्यात श्रीराम मंदीराचा उल्लेखही नव्हता. त्यामुळे भाजपने श्रीराममंदीराचा मुद्दा सोडला अशी टीका झाली होती. म्हणजे तो मुद्दा घेतला तर जातीयवादी राजकारण अशी टीका आणि नाही घेतला तर घेतला नाही म्हणून टीका.
तेव्हा फक्त चमकोगिरिकरन्या साठी ह्यांचे महान देव बाकीच्या देशात लस/ऑक्सीजन पाठवत होते.
कोविशिल्ड ही लस भारताची नसून ऑक्सफर्डची आणि व भारतात त्या लसीचे फक्त उत्पादन होत आहे. कोवॅक्सिन भारतीय लस आहे. दोन्ही लसींंसाठी लागणारे बरेच घटक इतर देशांकडून येतात व करारानुसार त्यांना या लसींचा काही प्रमाणात पुरवठा करावाच लागतो. परंतु हे समजणे मोदीद्वेषाने अंध झालेल्यांच्या आवाक्याबाहेरचं आहे.
आम्हाला अभिमान आहे मोदीद्वेषाने अंध झाल्याचा.
4 May 2021 - 5:32 pm | गोंधळी
बहुतेक सर्व पक्षात इतर पक्षातून आलेले/आणलेले नेते आहेत. अगदी नेहरूंच्या काळापासून हे सुरू आहे.
ओ तेच ना नेहरु आणि तुम्च्यत मग काय फरक आहे.
२०१९ ची निवडणुक विकासाच्या मुद्द्यांवरच जिंकली होती.
खुप चुक. उलट तेव्हा मोकळ रान होत कारण समोर कोणच नव्हत. म्हणुन जिंकले .
कोविशिल्ड ही लस भारताची नसून ऑक्सफर्डची आणि व भारतात त्या लसीचे फक्त उत्पादन होत आहे. कोवॅक्सिन भारतीय लस आहे. दोन्ही लसींंसाठी लागणारे बरेच घटक इतर देशांकडून येतात व करारानुसार त्यांना या लसींचा काही प्रमाणात पुरवठा करावाच लागतो
“I’ve been victimised very unfairly and wrongly,” he claimed. Poonawalla further said that he did not boost the vaccine production capacity because “there were no orders” तुम्च्या मोदींनी पाहीजे त्या प्रमाणात लसींच्या orders च दिल्या नव्हत्या.कारण १८/१९ तास बंगाल कसे जिंकायचे याचे काम करत होते.
Threats from powerful, head will be chopped off if I comment on elections or Kumbh: SII CEO Adar Poonawalla
असे का म्हणाले असतील. कारण ते हिंदु द्वेषी आहेत बरोबर ना???
जाउदे आमचच नशीब खराब म्हणुन आम्हाला चांगला/योग्य पंतप्रधान मिळत नाही आता ह्याला त्याला मोदी काय करणार ?????
4 May 2021 - 6:04 pm | चौथा कोनाडा
मोकळं रान मिळूच का दिलं ?
पप्पू आणी मड्डम शिवाय आहेच कोण तुमच्याकडे ?
तुम्हाला जमत नाही म्हणून काहीतरी टुकार कारणं पुढं नका करू.
4 May 2021 - 6:19 pm | श्रीगुरुजी
ओ तेच ना नेहरु आणि तुम्च्यत मग काय फरक आहे.
काय हे, हे सुद्धा सांगायला हवं? हे फरक जगजाहीर आहेत. चीन, काश्मीर, वेगळे कायदे असे अनेक गुंते नेहरूंनी करून ठेवले आणि हे सरकार हे गुंते सोडवित आहे. हे फरक दिसत नाहीत का?
खुप चुक. उलट तेव्हा मोकळ रान होत कारण समोर कोणच नव्हत. म्हणुन जिंकले .
येथे तुम्हीच स्वतःचा मूळ दावा चुकीचा आहे हे सिद्ध केलंत.
मोदींनी पाहीजे त्या प्रमाणात लसींच्या orders च दिल्या नव्हत्या.कारण १८/१९ तास बंगाल कसे जिंकायचे याचे काम करत होते.
https://www.google.com/amp/s/m.businesstoday.in/lite/story/received-orde...
Threats from powerful, head will be chopped off if I comment on elections or Kumbh: SII CEO Adar Poonawalla
हे वाक्य मुद्दाम मोडूनतोडून लिहिलंय. मूळ वाक्य खाली दिलंय.
On being asked who must carry the blame for the situation India finds itself in, Poonawalla said, "If I give you the right answer, or any answer, my head would be chopped off.
I can't comment on the elections or Kumbh Mela. It's too sensitive.
I don't think even God could have forecast it was going to get this bad."
महाराष्ट्राला सर्वात आधी लस दिली नाही तर तुमच्या कारखान्यातून लसीचा एकही ट्रक बाहेर जाऊन देणार नाही - मविआ आघाडीतील राजू शेट्टी
पूनावालांना महाराष्ट्रासाठी व देशासाठी खूप काही करता आलं असतं. - धाकटे पवार
खंडणी, धमक्या यासाठी कोणते पक्ष कुप्रसिद्ध आहेत हे माहिती असेलच. केंद्राने लसीसाठी पूनावालांना १७२८ कोटींचे advance payment केले आहे, यावर पुढाऱ्यांचं लक्ष असतंच.
4 May 2021 - 7:24 pm | श्रीगुरुजी
खंडणी, धमक्या यासाठी कोणते पक्ष कुप्रसिद्ध आहेत हे माहिती असेलच. केंद्राने लसीसाठी पूनावालांना १७२८ कोटींचे advance payment केले आहे, यावर पुढाऱ्यांचं लक्ष असतंच.
उद्योजक अंबानी धमकी प्रकरण ताजे आहे. त्यामागे कोण होते हे देखील बाहेर आले आहे.
4 May 2021 - 7:34 pm | सुबोध खरे
सिरम इन्स्टिट्यूटला लस बनवायचे तंत्रज्ञान देताना ऑक्सफर्ड ऍस्टरा झेनेका UNICEF, Gavi, the Vaccine Alliance (formerly the Global Alliance for Vaccines and Immunization, or GAVI,(WHO), the Coalition for Epidemic Preparedness Innovations (CEPI), and others organisations.यांनी आणि सिरम इन्स्टिट्यूटने करार केलेला होता.
या कराराप्रमाणे सिरम इन्स्टिट्यूटला लसीचे डो स इतर देशांना देणे कायद्याने बंधनकारक होते. उलट या संघटनांनी सिरम इन्स्टिट्यूटला लस न दिल्याबद्दल( भारताकडे वळवल्याबद्दल) कायदेशीर नोटीस दिली आहे.
उगाच माहिती नसताना श्री मोदींच्या बद्दल शिमगा करण्यात काय हशील आहे.
Amid India Surge, Gavi Asserts Serum Institute’s Obligation to Supply Vaccines
https://science.thewire.in/health/amidst-india-surge-serum-institute-leg...
4 May 2021 - 8:11 pm | प्रदीप
अगोदरही सांगून झालेले आहे. तरीही काहीजण तेचतेच पुन्हापुन्हा उगाळत बसलेले असतात.
4 May 2021 - 7:08 pm | सुबोध खरे
घोडा चतुर घोडा चतुर
श्री मोदींचे अंध भक्त आहेत आणि गुलाम किंवा चमचे गोऱ्या काकीचे आहेत
तुम्ही अंध भक्त आहात कि गुलाम चमचे हे एकदा स्वच्छ सांगा
घोडा चतुर घोडा चतुर नको
4 May 2021 - 9:23 pm | गोंधळी
सर विनंती आहे व्ययक्तीक शेरेबाजी न देता मुद्द्यांवर चर्चा व्हावी.
5 May 2021 - 9:14 am | सुबोध खरे
वस्तुस्थिती गुलाम अंध भक्तांनी जाणुन घ्यायची गरज आहे.
हे आपलेच वाक्य आहे ना ?
5 May 2021 - 10:36 am | गोंधळी
थुकरट वाडीच्या चार टिनपाट लोकांना मोदी नको असे वाटत असेल तर वाटू द्या.
सुरुवात कोणी केली. सर डोळे उघडे ठेवा.
मला व्ययक्तीक होण्यात जराही रस नाही.
5 May 2021 - 10:47 am | सुबोध खरे
हायला
थुकरट वाडी हि चला हवा येऊ द्या या मालीकेतील एक जागा आहे.
आणि आपला पगार किती आणि आपण बोलतो किती हे भान नसलेल्याना आणि ज्यांनी मोदी द्वेषाची गरळ ओकली आहे त्यांना मी म्हणतोय.
तुम्ही कशाला स्वतःला चिकटवून घेताय?
गुलाम अंध भक्त हे शब्द तुम्हीच काढले आहेत. मग मिरच्या कशाला झोंबतात?
4 May 2021 - 12:25 pm | सुखीमाणूस
मोदिना पर्याय नाही हे सिध्द होतय या अश्या नावान्मुळे...
नशीब आत्ता मोदी पन्तप्रधान आहेत म्हणुन.. तळागाळातुन आलेला नेताच गरिबान्चे हाल आणि उत्पन्नाची निकड समजु शकतो...
मागल्या वर्षी लौकडाउन लावला म्हणुन ओरडा तर यावर्षी नाही लावला म्हणुन..
खरतर शेतकरी आन्दोलन ज्या पद्धतिने रेटले गेले आणि परत परत आवाहन करुन लोकाना देशभरातुन बोलावले गेले ते पहाता हेच खरे कारण आहे साथ वेगाने पसरण्याचे..
11 May 2021 - 6:23 am | नगरीनिरंजन
बिरुटे सरांनी फारच संयमित लिहीलंय त्यामुळे चांगली चर्चा होईल असे वाटले.
परंतु, श्री मोदी अमरपट्टा घेऊन आले असल्यासारखं “मोदी नाही तर कोण?“ हा प्रश्न विचारणे; किंवा संपूर्ण देशाच्या सरकारी कार्यकारी यंत्रणेचा वैधानिक प्रमुख असलेल्या माणसाला “तो एकटा काय करणार?“ असे म्हणणे इत्यादी बालिशपणा पहिल्याच प्रतिसादात वाचून पुढची “चर्चा” वाचायचे कष्ट टळले.
3 May 2021 - 11:49 am | यश राज
ये लॉजिक कुछ समझ्या नही. प. बंगालने या दोन्ही नेत्यांना नाकारले(असं तुम्हाला वाटतंय म्हणुन मानुया, तसेहि तुम्हाला ३ चे ७७ झाले हे पण मान्य नाही) पण देशाला कसे वाचवले बुवा???
हे पण कै च्या कै, हुकुमशाही दिदि ला निवडुन म्हणे हुकुमशाही प्रवृत्तीला लगाम लावला आहे.. डेड लॉजिक.
बाकी राज्य सरकार व त्यांचे फेल्युअर तुमच्या अख्तयारित येत नाही हे तुम्ही वरच्या प्रतिसादात नमुद केले हे विशेष.
3 May 2021 - 12:13 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
एक : बंगालच्या जनतेने भाजपाला सरकार म्हणून पसंती दिली असती तर, देशभर असा संदेश विद्यमान केंद्र सरकारच्या माध्यमातून गेला असता की विद्यमान केंद्र सरकार जे जे काही काम करीत आहे ती ती कामे योग्य मार्गाने चालली आहेत. 'मा, माटी आणि माणूस' हा ज्यांचा नारा होता त्यांना लोकांनी स्वीकारले. सध्याच्या काळात सरकारचं अपयश हे उठून दिसणारे आहे, त्यांच्या विजयाखाली ते सरकारचे अपयश झाकून गेले असते. धर्मनिरपेक्ष शक्तींना यापुढे सद्य सरकारच्या विरोधात सर्व शक्तीनिशी एकत्र मोट बांधता येईल, या आणि अशा गोष्टी करायला आता इतर पक्षांना संधी मिळेल म्हणून आणि आडमार्गाने देशाला धार्मिक कट्टरवाद्यांच्या भूमिकेकडे घेऊन जाणा-या विचारांना थोपवण्याचं काम बंगालींनी केले म्हणून देश वाचवला असे म्हणून त्याकडे पाहिले पाहिजे.
बाकी प्रतिसादाबद्दल आभार.
3 May 2021 - 12:21 pm | यश राज
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद,
बाकी धर्मनिरपेक्षतेच्या बुरखा पांघरुन खालील प्रकारे वोट कसे मागता येतात हे तुम्ही आणि धर्मनिरपेक्ष दिदीच जाणो.
https://timesofindia.indiatimes.com/elections/assembly-elections/west-be...
4 May 2021 - 11:29 am | चौकस२१२
धार्मिक कट्टरवाद्यांच्या भूमिकेकडे
आडमार्गाने म्हणजे संसदीय लोकशाहीतून निवडून येऊन कि काय?
एक देश एक कायदा म्हणजे धार्मिक कट्टरवाद्यांच्या भूमिकेकडे
जम्मू काश्मीर चा प्रश्न सोडवण्यासाठी ठोस पाऊले उचलने म्हणजे धार्मिक कट्टरवाद्यांच्या भूमिकेकडे
भारतीय नागरिक आधी ( कोणत्या का धर्माचा असो ) म्हणून सिटिझिंशिप ऍक्ट केला म्हणजे धार्मिक कट्टरवाद्यांच्या भूमिकेकडे
जगात भारताची दाखल गेहेतली जावी आणि आशियात आंतरराष्ट्रीय व्यापारात भारताची बाजू सबळ केली धार्मिक कट्टरवाद्यांच्या भूमिकेकडे
मुस्लिम स्त्रियांना सामनात दणी जुलमी घटस्फोटापासून वाचवले धार्मिक कट्टरवाद्यांच्या भूमिकेकडे
सरकारी मालकीच्या उद्योगातून " काम करा" हे सांगाणे म्हणजे धार्मिक कट्टरवाद्यांच्या भूमिकेकडे
मेक इइन इंडिया असे स्वतःचं देशाला फायदे होणारे काही राबवले म्हणजे धार्मिक कट्टरवाद्यांच्या भूमिकेकडे
आणि हो २०१४ पासून अचानक करोड हिंदू असहिष्णू झाले नाही का ? धार्मिक कट्टरवाद्यांच्या भूमिकेकडे
3 May 2021 - 11:59 am | सुबोध खरे
कशाला उगाच एकांगी आणि पूर्वग्रहदूषित मताचे खंडन करायचे?
राहू द्या कि त्यांना आनंदात.
जाता जाता -- काँग्रेस मुक्त भारत नाही तरी काँग्रेसमुक्त बंगाल पासून सुरुवात झाली आहेच.
3 May 2021 - 12:00 pm | कंजूस
केरळ आणि बंगालात कॉम्युनिस्ट विचारांचे लोक अधिक आहेत. तिथे दुसरे विचारांचे सरकार येणे अशक्य.
4 May 2021 - 11:36 am | चौकस२१२
पण ते खरंच कम्युनिस्ट तरी आहेत का? पचेल एक त्यांना कम्युनिस्ट पण ???
नुसतेच विद्रोही दिसतात
एकीकडे बंगाल संस्कृती , केरळ संस्कृती वैगरे चा बाजार मांडून पैसे कमवतातच कि
आणि बंगाल मध्ये ३०% मुस्लिम त्यांना कसे कम्युनिस्ट होणे परवडेल ?
3 May 2021 - 12:02 pm | कंजूस
चालू द्या अशीच प्रगती.
3 May 2021 - 12:09 pm | सुबोध खरे
१९६० मध्ये महाराष्ट्र आणि गुजरातच्या नंतर समृद्धी आणि अर्थव्यवस्थेच्या क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेले बंगाल राज्य कम्युनिस्टांनी १३ व्या स्थानावर नेऊन ठेवले आणि ममता दीदीनि १७ व्या क्रमांकावर नेऊन ठेवले आहे.
बंगाली लोकांना स्वतःच्या पायावर कुर्हाड मारून घ्यायची सवय लागली आहे त्याला कोण काय करणार?
चालू द्या.
3 May 2021 - 12:12 pm | गॉडजिला
बंगाली लोकांना स्वतःच्या पायावर कुर्हाड मारून घ्यायची सवय लागली आहे त्याला कोण काय करणार?
एकमेव निश्पक्ष निरीक्षणात्मक प्रतिसाद. क्या बात है..
3 May 2021 - 12:20 pm | खेडूत
डॉक्टर साहेब, लेख आवडला, पण काहीसा अपुरा वाटला.
म्हणजे त्यांना पदावरून हटवण्याची कारणं फक्त गेल्या वर्षातली संकलित झालीत. आधीच्या वीस वर्षातली कारणांची यादी हवी होती. दोनतीन भाग होतील पण ठीक आहे.
आज चाचा असते तर १३२ व्या वयातही त्यांनी उत्तम पंतप्रधान म्हणून प्रशंसा मिळवली असती असं आमच्या बिल्डींगमधलया बापूराव हेगिष्टे यांचं मत आहे.
परवाच न्यूयॉर्क टाइम्स मध्ये अगदी अश्याच अर्थाचा लेख आला, काल दिल्लीतल्या असीम अली या विद्वानाने असेच मत मांडले. जेव्हा गल्लीबोळ ते न्यूयॉर्कपर्यंत सगळे विद्वान असेच मत मांडतात तेव्हाच त्याची दाखल घ्यावीशी वाटते.
पुढचा पंतप्रधान महाराष्ट्रातून कुणीतरी असावा असे मात्र वाटत राहते!
3 May 2021 - 1:45 pm | मुक्त विहारि
आपलीच माणसे एकमेकांचे पाय खेचतात .
यशवंतराव चव्हाणां सारख्या माणसाला पण, आपल्याच माणसांनी विरोध केला....
3 May 2021 - 1:50 pm | धर्मराजमुटके
असे काही नाही. महाराष्ट्रातील एक मोठे नेते कायम भावी पंतप्रधान असतात.
3 May 2021 - 12:20 pm | प्रसाद गोडबोले
लेखातील अनेक मुद्दे पटले.
पवार साहेब आधीच म्हणाले होते - शेट्ट्जी आणि भडजीच्या हातात सत्ता देणार काय ? पहा काय झालं , देशातील जनता आता त्याचेच परिणाम भोगत आहे ! महाराष्ट्रातील जनतेच्या नेत्यांनी मात्र टरबुज्या अनाजीपंताला सत्तेतुन खाली खेचला आणि पहा लगेच काय भारी परिणाम झालेला आहे . महाराष्ट्रात सर्वात कमी करोनाचे पेशंट आहेत, माणस्सामागे एक वेन्टिलेटर आहे, ऑक्सिजन चा तर सुक्काळ झालेला आहे . मृत्युदर तर जवळपास शुन्य आहे ! जे काही मरत आहेत ते मोदी आणि शहांच्या मुळे मरत आहेत. मोदींच्या राज्यातील शेटजींच्या रेमडीसिव्हिरने जितके लोक मरत आहेत त्या पेक्षा जास्त लोकं केवळ कोमट पाणी पिऊन बरें होत आहेत , किंबहुना आजारीच पडत नाहीयेत ! मुंबईतुन आरामात १०० कोटी स्टेट टॅक्स वसुल केला जात आहे !
सातवाहन , राष्ट्रकुट आणि यादवांच्याकाळातही महाराष्ट्राने जी संमृध्दीची शिखरे पाहिली नव्हती ती ह्या महाविकास आघाडीच्या कार्यकालात महाराष्ट्र पहात आहे !
आता मोदीचें नेतृत्व बदलण्याचा एकच उपाय = पाच राज्यांच्या निवडणुकात दैदिप्यमान यश मिळवाणार्या, देशातील सर्वात प्राचीन राजकीय पक्षाच्या लोकोत्तर नेतृत्वाला- राहुलजीं गांधीजींना सर्व पक्षांनी राजकीय नेता म्हणुन घोषित करावे आणि महाराष्ट्राचा पॅटर्न देशात लावावा आणि शेट्ट्जी आणि भडजींचे हे सरकार उलथुन टाकावे !
एकदा का सरकार पाडले की अनेक लोकहिताचे कार्यक्रम धडाडीने राबवता येईल जसे की कृषी कायदे रद्दबातल करुन परत सर्वाधिकार बाजारसमित्यांच्या आनी तेथील आपल्या पंटर लोकांच्या हातात देणे , एन.आर.सी रद्दकरुन बांग्लादेशातील सर्वच्या सर्व लोकांना, रोहिंग्यांना एकदाच भारताचे फुकट नागरिकत्व देऊन टाकणे. काश्मीरमध्ये परत कलम ३७० लागु करणे आणि नृशंस आतंकवादी जम्मुमधील हिंदु आणी लडाख मधील बौध्द धर्मियांना कायमचा धडा शिकवणे . रामंदिराचे जेवढे काही बांधकाम झाले आहे ते पाडुन , त्या जागी ७८६ गायी कापुन पुन्हा बाबरी मशीदीची स्थापना करणे . जी.एस.टी रद्दकरुन त्या ऐवजी परत जुनी सिस्टिम आणाणे जेणेकरुन स्थानिक लेव्हलला आपल्याच लोकांना १०० कोटी वसुल करता येतील ! नोटाबंदीचे प्रायश्चित्त म्हणुन लोकांना घरातच नोटा छपण्याची परमिशन देणे !
आणि सर्वात महत्वाचे म्हणजे देशभरात लोकांना कोमट पाणी पिणे सक्तीचे करणे किंबहुना तसा कायदाच आणणे !
असे अनेक लोकहिताचे कार्यक्रम करता येतील , आम्हाला आमचा अल्पमतीने जे सुचले ते लिहिले , अजुन बरीच कामे करायची आहेत त्यांचि लिस्ट करण्या करता एक थिंक ट्यँक स्थापन करावा ज्यात - कन्हैय्या कुमार , उमर खालिद , शर्जिल इमाम , वरवराराव , अरुन फरारा , सुधा भार्द्वाज , कुनाल काम्रा, अनुराग कश्यप, स्वराभास्कर सारख्या अनेक विचारवंताना समाविष्ट करावे , पण त्याचे नेतृत्व करण्यास योग्य व्यक्ती म्हणजे फक्त एकच - जाणता राजा !!
4 May 2021 - 11:48 am | चौकस२१२
मार्कस बाबू पाय कुठे आहेत धरावे म्हणतो
असो पण जाणत्या राजाला हे नाही माहित कि - राजस सुकुमार यांनी पूर्वी आपण जनेउधारी असल्याचे म्हणले होते , आजी आणि पणजोबा तरी होते वडील अर्धे , आणि मग स्वतः ते निदान १/४ तरी होतात त्यामुळे उरावर हा जनेउधारी बसणार मग ...
आणि हो गेला बाजार आपण दिलेलया यादीत खालील नावे टाकावीत मेधा पाटकर . अरुंधती रॉय , बरखा , राजदीप, कमला हसन आणि महेष भट्ट ( च्यामारी हे "ज धरी दोन्ही कँपात असतात ! जाणत्याराजांना त्रास होत असेल या सगळी पगड्यांचा !
गुप्त बातमी: मोदींचे खरे नाव आपटे किंवा निदान गेला बाजार कुलकर्णी तरी असावे आणि शहा तर नक्कीच शर्मा, शुक्ल किंवा आचर्या किंवा साठे असावेत !
4 May 2021 - 11:49 am | चौकस२१२
मार्कस बाबू पाय कुठे आहेत धरावे म्हणतो
असो पण जाणत्या राजाला हे नाही माहित कि - राजस सुकुमार यांनी पूर्वी आपण जनेउधारी असल्याचे म्हणले होते , आजी आणि पणजोबा तरी होते वडील अर्धे , आणि मग स्वतः ते निदान १/४ तरी होतात त्यामुळे उरावर हा जनेउधारी बसणार मग ...
आणि हो गेला बाजार आपण दिलेलया यादीत खालील नावे टाकावीत मेधा पाटकर . अरुंधती रॉय , बरखा , राजदीप, कमला हसन आणि महेष भट्ट ( च्यामारी हे "ज धरी दोन्ही कँपात असतात ! जाणत्याराजांना त्रास होत असेल या सगळी पगड्यांचा !
गुप्त बातमी: मोदींचे खरे नाव आपटे किंवा निदान गेला बाजार कुलकर्णी तरी असावे आणि शहा तर नक्कीच शर्मा, शुक्ल किंवा आचर्या किंवा साठे असावेत !
3 May 2021 - 12:51 pm | अमर विश्वास
भा ज पा काही नेतृत्व बदल करत नाही
तेंव्हा तुम्हाला चार वर्षांनी संधी मिळेल तेंव्हा करून टाका
हाय काय अन नाय काय
3 May 2021 - 1:41 pm | मुक्त विहारि
आणि मग राष्ट्रवादी पक्ष, भाजपशी युती करून दोन-चार केंद्रीय मंत्रीपदांवर तडजोड करतील....
शिवसेनेला मिळालेले हे शेवटचे मुख्यमंत्री पद आणि आता तर केंद्रात शिवसेनेला एकही मंत्रीपद भविष्यात मिळणार नाही ....
महाराष्ट्र राज्यातील रिक्त खासदार पदे, भाजपने तामिळनाडू आणि केरळमधून भरून काढली तर, राष्ट्रवादीचा तिथेही पत्ता कट ....
पुढची लोकसभा निवडणूक पण मोदीच जिंकणार ....
चकमक झाली, लोकसभा मोदींचीच
3 May 2021 - 1:09 pm | अमर विश्वास
आणि हो .. अजून एक ...
Health is a State subject
काही नाही ... ते इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणून एक जुन पुस्तक आहे .. त्यात लिहिलंय हो
3 May 2021 - 1:41 pm | बापूसाहेब
ठेच लागली म्हणून पायच कापून टाकावा अश्या धाटणीचा लेख.
मला पित्ताचा त्रास होतो. कधीकधी जास्त पित्त झालं की मग मी स्वतः च मिठाचे बोट घशात घालून स्वतः हून उलटी करून पित्त काढून टाकतो.. हि जिलेबी अश्याच प्रकराची आहे..
आत्ताच्या आत्ता मोदी यांनी राजीनामा देऊन पंतप्रधनपदाची खुर्ची खाली करावी.. व खुर्ची काढून त्या ठिकाणी एक सोफासेट ठेवावां.. आणि त्यावर पप्पू महाशय, कोमट पाण्याचा ब्रँड आंबेसिडार, चार तालुक्याचे जाणता राजे, आप्ल्या आजी प्रमाणे नाक असणाऱ्या प्रियांका ताई , ममता बानो, दिगु राजा, अखिलेश जी, लालू जी आणि तेजस्वी यादव या सर्वांना बसवावे.. असे केल्यावर देश १०० वर्षे पुढे जाईल, प्रत्येकाला सरकारी नोकरी भेटेल.. शेतकऱ्याला इतका पैसा भेटेल की तो शेतात पण एअर कंडीशन लावेल.. स्त्रिया रस्त्यावर रात्री बरा वाजता पण खुशाल हिंडतील. कोरोना ढुंगणाला पाय लावून चीन मधे पळून जाईल.. आणि सर्वत्र रामराज्य.. ( सॉरी सेकुलर राज्य) अवतरेल...
3 May 2021 - 1:42 pm | आग्या१९९०
निवडणूक लढविण्याची तयारी सोडल्यास केंद्र सरकारचा कारभार हा Ad hoc पद्धतीनेच चालू आहे. अर्थव्यवस्था ते आरोग्य सेवा पूर्णपणे अपयशी.