सध्या मी काय पाहतोय ? भाग ५

मदनबाण's picture
मदनबाण in जनातलं, मनातलं
24 Apr 2021 - 1:32 pm

समांतर :- सुहास शिरवळकर यांच्या पुस्तकावर [ कादंबरी ] आधारित ही मराठी आणि हिंदीत असलेली वेब सिरीज एक मास्टर पीस आहे. मी ही पहिल्यांदा हिंदीत आणि नंतर मराठीत पाहिली. मला मराठीत ही वेब सिरीज अधिकच जास्त आवडली. कुमार महाजन आणि चक्रपाणी यांच्या आयुष्या बद्धल असलेली ही सिरीज तुम्हाला खिळवुन ठेवते. दोन वेगळे व्यक्ती परंतु हस्तरेखा मात्र सारख्याच असणार्‍या या व्यक्तींचे आयुष्य अगदी समांतर चालत असते. हा चक्रपाणी नक्की कोण ?आणि त्याच्या आयुष्यात काय घडलय ? त्याचा कुमार महाजनशी कसा आणि काय संबंध आहे ? चक्रपाणीच्या आयुष्यात घडलेल्या घटनांचा कुमार आयुष्याशी नेमका कसा संबंध असणार असतो ? अश्या अनेक आणि इतर प्रश्नां पैकी काहींची उत्तरे तुम्हाला पहिल्या सिझन मध्ये मिळतील आणि बाकीच्या प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी २ रा सिझन येण्याची वाट पहावी लागेल, जी अर्थातच मी आतुरतेने पाहत आहे.
या मालिकेत कुमार महाजन च्या भुमिकेत स्वप्नील जोशी तर चक्रपाणीच्या भुमिकेत बी आर चोप्रा यांच्या महाभारत मालिकेत कृष्णाची अविस्मरणीय भुमिका साकारणारे नितिश भारद्वाज दिसतात.
कुमारच्या बायकोची भुमिका तेजस्वीनी पंडीत ने केली असुन ती एकदम खवा-मावा दिसते ! :) यात तिने उत्कट चुंबन दृष्ये देखील अगदी मन लावुन दिली असुन प्रेक्षकांची मने देखील उत्कट होतील अशी ती झाली आहेत. :)))
जर तुम्ही आत्ता पर्यंत ही वेब सिरीज पाहिली नसेल तर एका रोमांचक गुढ अनुभवाला तुम्ही पारखे आहात, तेव्हा दुसरा सिझन येण्याचा आधीच पहिला सिझन पहाच.

तुमची ही सोय इथे आहे :- https://www.mxplayer.in/show/watch-samantar/season-1/identical-stranger-...

मदनबाण.....

कलाप्रकटन

प्रतिक्रिया

नक्कीच समांतर पाहतो आता..

Just आता your honor पाहिली series..
Best आहे..

Bhakti's picture

25 Apr 2021 - 1:26 pm | Bhakti

भारी
;)

चौथा कोनाडा's picture

30 Apr 2021 - 5:35 pm | चौथा कोनाडा

या गाण्यावर तर आपण फीदा आहे !
काय तेच्यामायला, भारी आवाज हाय उसाच्या रसाचा !
रॅपसाँग सारखं अस्सल मातीतलं गाणं, लै झ्याक !
गणेशा +१

आग्या१९९०'s picture

25 Apr 2021 - 10:27 am | आग्या१९९०

मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आऊट ऑफ बॉक्स विचार करणारे आहेत. भरलेले नाही परंतू निदान रिकामे टँकर विमानाने नेता येईल ही त्यांचीच कल्पना स्वीकारली गेली.

कॉमी's picture

25 Apr 2021 - 10:30 am | कॉमी

ह्या दोघांची नावे बघून काही धर्माधारीत कमेंट आल्या. तर केरळ मेडिको विद्यर्थ्यांनी त्यांचा कडाडून प्रतिकार केला आणि ह्यांचे गाणे इंटरनेटच्या कानाकोपऱ्यात पोहोचले.

काय अफलातून एनर्जी आहे यांची. १०-१५ वेळा तरी पहिला व्हिडीओ.

गॉडजिला's picture

25 Apr 2021 - 10:53 am | गॉडजिला

ण्रुत्यावर मी हजार वेळा फिदा... हा अर्धा मिनीट १० मिपा कट्यांचा तोडीची झिंग देतोय. अ‍ॅक तर रासपुतिन माझे फार आवडते गाणे त्यात या पोट्यांनी जो जोश आणी ताल पकडला आहे त्याला तोड णाही. बोनीएम युग्युग जिओ.

मदनबाण's picture

25 Apr 2021 - 12:51 pm | मदनबाण

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- KHAIRIYAT (BONUS TRACK) :- CHHICHHORE

नि३सोलपुरकर's picture

26 Apr 2021 - 3:31 pm | नि३सोलपुरकर

साई पल्ल्वी हि एक अफलातुन डान्सर आहे , मारी -२ मधील धनुश सोबत चित्रित केलेला rowdy baby हे देखील मस्त आहे .

बाकी सोबत दिलेले गाणे हे तेलंगणातील लोकसंगीत ह्या प्रकारातील असुन ,गीतकाराने एका मुलाखतीत ह्याचे सुंदर विवेचन केलेले आहे .

Bhakti's picture

26 Apr 2021 - 4:47 pm | Bhakti

साई पल्लवीच हे देखील सुंदर गाणं आहे
इडी song नाकू वन्टी .

गॉडजिला's picture

26 Apr 2021 - 5:17 pm | गॉडजिला

व्हॉट अ ब्युटिफुल साँग.

मदनबाण's picture

28 Apr 2021 - 6:24 pm | मदनबाण

इडी song नाकू वन्टी
गाणं फार आवडलं ! :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Naa Romba Busy... :- Vasuvum Saravananum Onna Padichavanga

राघव's picture

4 May 2021 - 1:16 pm | राघव

ती अफलातून डान्सर आणि अभिनेत्री आहे. :-)

हा डान्सही उत्कृष्ट केलाय.. साई पल्लवी

हो भारीच आहे साई पल्लवी!
आणि पडी पडी लेचे गाण्यात सुंदरच दिसतेय.
हे पण छान आहे.

गॉडजिला's picture

4 May 2021 - 5:02 pm | गॉडजिला

इतर जसे नाचतात तसेच ती नाचत आहे. मॉडेल्सप्रमाणेच टोन्ड शरीरयष्टी राखली आहे. फक्त तिचा USP नो मेकप लुक हाच काय ते तिचे वेगळेपण आहे. आवर्जुन भाळावे आसे काही मला वाटले नाही. इतर मतांचा पुर्ण सन्मान आहे.

फक्त तिचा USP नो मेकप लुक हाच काय ते तिचे वेगळेपण आहे. आवर्जुन भाळावे आसे काही मला वाटले नाही. इतर मतांचा पुर्ण सन्मान आहे.
+१००
मला नयतारा त्यातल्या त्यात जरा आवडते,याच बरोबर नित्या मेननही [ निदान अभिषेक बच्चन बरोबर Breathe: Into the Shadows मध्ये तरी चिकणी दिसली होती]
n1

नयनताराचे आवडते गाणे देउन जातो...

जाता जाता :- हल्ली साऊथ मधे रसाळ गोंडस फळे मिळणे दुर्मीळ झाले आहे की काय ?

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Unna Paartha Naeram... :- All in All Azhagu Raja

चौथा कोनाडा's picture

6 May 2021 - 6:03 pm | चौथा कोनाडा

असा वेगळा धागा काढा राव :
दक्षिणेकडील फळफळावळ

:-)

गॉडजिला's picture

8 May 2021 - 1:32 pm | गॉडजिला

शाहीदचे गंदी बात गाणेच दिस्ते आहे

शाम भागवत's picture

30 May 2021 - 10:53 am | शाम भागवत

मला नित्या मेननची ही जाहिरात आवडते.दिलखुलास हसणं बघण्यासाठी
आणि
उत्तम अभिनय, निर्मळ मोहक हालचाली, दिग्दर्शन व फोटोग्राफीसाठी नित्या मेननचा राजा रविवर्मा मधला हा सीन एकूण १२ मिनिटांच्या सीनमधे शेवटचे एक मिनिट सोडलं तर फक्त ७-८ वाक्ये आहेत. ती कळली नाहीत तरी अर्थ कळतो. १०:२८ नंतरची शेवटची काही सेकंद तर संयत अभिनयाचा कहरच आहे.

मदनबाण's picture

30 May 2021 - 9:51 pm | मदनबाण

टायटन ची जाहिरात आणि राजा रविवर्मा मधील सीन देखील पाहिला. टायटनची जाहिरात फार सुंदर आहे.
घडाळ्या वरुन जे आठवलं ते आता सांगतो...
एक काळ असा होता की हिंदूस्थानातील प्रत्येक व्यक्तीच्या हातात एचएमटी कंपनीचे घड्याळ होते. आज नव्या पिढीला या घडाळ्या बद्धल फार कमी माहिती आहे.
मध्यंतरी मला नविन घड्याळ घ्यायची फार हुक्की आली होती, तेव्हा जालावर वेगवेगळी घड्याळे पाहिली तेव्हा पहिल्यांदा टाळक्यात एचएमटी चे नाव अचानक आले
त्यांच्या साईटवर गेलो, त्यात माझ्या स्मरणात असलेले एचएमटी जनता देवनागरी घड्याळ शोधु लागले आणि मला ते मिळाले देखील. आता बहुतेक वेबसाइट अपडेट झाली आहे आणि देवनागरी घड्याळ आता मला काही दिसत नाही ! :( बहुधा स्टॉक संपला आणि अवेटिंग असावा.]
या घडाळ्यावर असलेला एक माहितीपट देखील मी पाहिला, तो खाली देत आहे.

एचएमटी चा शोध संपल्यावर मी अ‍ॅमेझॉन इंडियावर गेलो,तिथे घड्याळे पाहु लागलो, तिथे मला दोन घड्याळे फार भावली.
१] Invicta Pro Diver Unisex Wrist Watch 8926OB
हे बहुधा अ‍ॅमॅझॉन इंडियावर सगळ्यात जास्त कंमेंट केलेले घड्याळ असावे. [११,०८३ ] या मॉडेलवर अधिक माहिती घेतल्यावर कळले की हे rolex submariner homage आहे. तसेच हे Automatic Japanese Seiko movement वर आधारित आहे.

२] Timex 21 Jewel Automatic Analog Silver Dial TWEG16702

मी माझ्या पहिल्या पगारातुन टायटन चे घड्याळ घेतले होते जे मी अजुनही वापरतो... आता हाताला ते जरा घट्ट होते पण तरी देखील ते वापरतो.
वरती अ‍ॅमेझॉन वरती असलेली दोन्ही घड्याळे मला आवडली पण ती माझ्या बजेटच्या बाहेर आहे अशी माझा मनाची समजुत घातली. :)
पण कधी घ्यायचेच झाले तर मी TWEG16702 हेच घेइन. हातात घातल्यावर किती भारी दिसेल याचा अंदाज घेण्यासाठी मी युट्युबचा आधार घेतला आणि खालील व्हिडियो पाहिला :-

मला Quartz Watch वरुन मेकॅनिकल अ‍ॅटोमॅटिक वर मुव्ह होण्याची इच्छा हे सगळं हा खटाटोप करण्या मागे होता, Quartz Watch एकदा बॅटरी घातली की ते बॅटरी संपल्यावर बंद पडते,पण मेकॅनिकलचे तसे नाही. यामुळे तुम्ही कुठेतरी त्या घडाळ्याशी जोडले जाता जे Quartz Watch होत नाही कारण ते चालु राहणारच असते हे तुमच्या मेंदुला देखील पक्के ठावूक झालेले असते. :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- "Life is what happens when you're busy making other plans." :- John Lennon

शाम भागवत's picture

30 May 2021 - 10:26 pm | शाम भागवत

माझाही असाच अनुभव आहे. जेव्हां केव्हां हातातलं घड्याळ बंद पडतं तेव्हां तेव्हां त्यानंतर लागलीचच काहीतरी गंभीर अडचण माझ्यासमोर आलेली आहे.

मी खरेदी करायला तयार आहे, अनेकदा मी गंभिर अडचणीत असुनही मला त्याचे नीट आकलन होत नाही. तुमच्या घड्याळाचा मला नक्किच बहुमोल उपयोग होउ शकतो.

शाम भागवत's picture

30 May 2021 - 11:09 pm | शाम भागवत

तुमचे हातातलं घड्याळ विकायचे आहे का ?
😀
निवृत्तीनंतर मी गेली अनेक वर्षे घड्याळ वापरतच नाही आहे. त्यामुळे आज चालू असलेले घड्याळचं माझ्याकडे नाही आहे.
😀

मदनबाण's picture

25 Apr 2021 - 5:49 pm | मदनबाण

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- KHAIRIYAT (BONUS TRACK) :- CHHICHHORE

असा मी असामी's picture

26 Apr 2021 - 1:52 pm | असा मी असामी

A R रहमान चे संगीत म्हणजे एक नशा आहे. " ९९ songs" ची गाणी कदाचित लगेच आवडणार नाहीत (आणि भरपूर A
R ची इतर गाणी ) पण २-३ वेळा ऐकली कि तीच तीच ऐकत बसता.
सगळी गाणी मस्तच आहेत , त्यात माझे सगळयात जास्त आवडते ज्वालामुखी

असा मी असामी's picture

26 Apr 2021 - 1:52 pm | असा मी असामी

A R रहमान चे संगीत म्हणजे एक नशा आहे. " ९९ songs" ची गाणी कदाचित लगेच आवडणार नाहीत (आणि भरपूर A
R ची इतर गाणी ) पण २-३ वेळा ऐकली कि तीच तीच ऐकत बसता.
सगळी गाणी मस्तच आहेत , त्यात माझे सगळयात जास्त आवडते ज्वालामुखी

असा मी असामी's picture

26 Apr 2021 - 7:10 pm | असा मी असामी

पार्ट १ मागच्या वर्षी आला होता. पार्ट २ जास्त आवडला
पार्ट १ -

पार्ट २ -

असा मी असामी's picture

26 Apr 2021 - 7:11 pm | असा मी असामी

comments २ वेळा का प्रकाशित होत आहेत?

सूर्यपुत्र's picture

27 Apr 2021 - 12:12 pm | सूर्यपुत्र

जीत की जिद (झी५) पहावी. अफलातून आहे.

-सूर्यपुत्र.

मदनबाण's picture

28 Apr 2021 - 6:24 pm | मदनबाण

खरं तर मी जगातील सर्वात शक्तीशाली असे हिंदूस्थानातील रेल्वे इंजिन WAG 12 आणि त्या संबंधीत व्हिडियो पाहत होतो, तेव्हाच एक सुंदर डॉक्युमेंटरी माझ्या नजरेस पडली आणि ती मी पाहिली. ती खाली देत आहे तसे परिस्थिती बदलल्या नंतरचा व्हिडियो देखील त्याच्या बरोबर देत आहे.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Naa Romba Busy... :- Vasuvum Saravananum Onna Padichavanga

रंगीला रतन's picture

28 Apr 2021 - 7:12 pm | रंगीला रतन

हॅंगओव्हर सिरीज पुन्हा बघतोय! काल १ व २ बघीतला, आज रात्री ३ बघणार. सुरूवातीचा जिराफ वाला सीन आठवुन अत्ताच हसायला येतय :)

मदनबाण's picture

28 Apr 2021 - 7:58 pm | मदनबाण

याच बरोबर व्हॉट्अ‍ॅप वर आलेला लेख जसाचा तसा देत आहे :-

खारे वारे मतलई वारे (भाग ९)... विनीत वर्तक ©

गेल्या काही दिवसात आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतात वाहणाऱ्या वाऱ्यांच्या दिशेत अचानक बदल झालेला दिसून येतो आहे. हा बदल आंतरराष्ट्रीय कूटनीती किंवा चाणक्य नितीचा भाग म्हणून इतिहासाच्या पानावर नोंदला जाईल. गेल्या एका महिन्यात भारतात कोरोना च्या दुसऱ्या त्सुनामी ने हल्ला केला आहे. गेले वर्षभर कोरोना च्या तावडीतून भारतीय अर्थव्यवस्था बाहेर पडण्याची चिन्ह दिसत असताना दुसऱ्या त्सुनामी चा तडाखा बसलेला आहे. जगभरात आलेल्या पहिल्या त्सुनामी मधे अमेरिकेचं नुकसान सगळ्यात जास्ती झालं होतं. त्यावेळेस कोरोना विरुद्ध लढण्यासाठी अमेरिका संपूर्णपणे कोलमडत असताना या रोगाविरुद्ध ढाल म्हणून हायड्रोऑक्सीक्लोरोक्वीन ह्या गोळीला महत्व प्राप्त झालं होतं. त्या वेळेस तडफडणाऱ्या अमेरिकेला भारताने मदतीचा हात दिला होता. दुसऱ्या त्सुनामी च्या लाटेत भारत गटांगळ्या खायला लागल्यावर अमेरिकेने मात्र काढता पाय घेतला.

हा पाय मागे घेण्यामागे कारणीभूत होता तो ६ फेब्रुवारी २०२१ चा दिवस जेव्हा भारताने अतिशय महाग असणाऱ्या फायझर कंपनीच्या लसीला मान्यता दिली नाही. ही लस जवळपास ३००० रुपये ते ४००० रुपयाला पडणार होती. फायझर कंपनीला अमेरिकेत केलेल्या चाचण्यांवर भारतात लस विकण्याची मुभा हवी होती पण भारताने ती मान्य केली नाही. भारतातल्या लोकांवर या लसीचा काय परिणाम होतो तो बघितल्या नंतर आपण मान्यता देऊ असं भारताकडून सांगण्यात आलं. फायझर ने तयार केलेल्या लसीमुळे अनेक जणांना रक्ताच्या गुठळ्या तसेच इतर सिरीयस कॉम्प्लिकेशन झाल्याच्या घटना अमेरिकेत समोर आलेल्या होत्या. त्यामुळे भारताने भारतीयांवर याच्या चाचण्या झाल्यावर आपण भारतात ती विकण्यासाठी परवानगी देऊ असं भारताने कळवलं. या गोष्टी न पटल्याने पैश्याच्या जोरावर भारतीय मार्केट काबीज करू इच्छिणाऱ्या फायझर च्या स्वप्नांना तडा गेला. त्यातून त्यांनी सपशेल माघार घेतली.

अमेरिका मधे अधिराज्य करणाऱ्या या कंपनीला भारतीय मार्केट हातातून गेल्याच कुठेतरी टोचलं होत त्यामुळेच याची एक लॉबी अमेरिकेच्या प्रशासनावर भारतातील लसी रोखण्यासाठी दबाव टाकत होती. भारतात तयार होणाऱ्या लसीसाठी लागणारा कच्चा माल हा अमेरिकेतून जात होता. साहजिक त्यावर अंकुश ठेवला की भारतातील लसीच उत्पादन थांबेल आणि भारताला फायझर आणि जॉन्सन एन्ड जॉन्सन च्या लसीला मान्यता देण्याशिवाय पर्याय उरणार नाही. त्या संधीची अमेरिकेतील एक लॉबी वाट बघत होती. सिरम इन्स्टिट्यूट ला होणारा कच्चा मालाचा पुरवठा अमेरिकेने Defense Production Act (DPA) ह्या कायद्याचा आधार घेऊन थांबवला. तो थांबताच एक लॉबी प्रचंड सक्रिय झाली. भारतातील केसेस झपाट्याने वाढू लागल्या आणि भारत सरकारवर सगळीकडून दबाव वाढू लागला. भारतातील विकला गेलेला मिडिया आणि आपली पिल्लावळ याचा फायदा घेत भारताने कशी चूक केली असं दाखवण्यात ही लॉबी यशस्वी झाली.

पण भारत आता पूर्वीचा राहिलेला नाही हे समजण्यास अमेरिकन लॉबीला उशीर झाला. तिकडे पद्धतशीरपणे भारताची गळचेपी करून अमेरिका फर्स्ट चा नारा बायडेन आणि भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांनी दिला. यातून जगाला आणि अमेरिकेला कुठेतरी आपण योग्य पावलं अमेरिकेच्या भल्यासाठी उचलल्याचे दाखवून द्यायचं होतं पण मागच्या दराने वेगळाच गेम सुरु होता. हे सगळं करताना ही लॉबी विशेष करून फायझर आणि जॉन्सन आणि जॉन्सन सारखी बलाढ्य कंपन्या ज्या लसीच्या जीवावर उड्या मारत होत्या त्या हे विसरल्या की आपला लगाम भारतीय कंपनीच्या हातात आहे. मुंबई मधील VAV Lifesciences & VAV Lipids ही कंपनी फायझर आणि जॉन्सन आणि जॉन्सन च्या लसी बनवण्यासाठी लागणार अतिशय महत्वाचं असं highly purified 'synthetic phospholipids' (gene-based lipid nanoparticles (LNPs) देत होती. जे महाराष्ट्रातील रत्नागिरी इकडे बनवलं जात आहे.

अमेरिका च्या भारतीय वंशज असलेल्या कमला हॅरिस यांनी अमेरिका फर्स्ट चा नारा दिल्यावर तीन दिवस गोष्टी अतिशय शांततेत गेल्या. भारत सरकारने यावर कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती पण बुद्धिबळाच्या चाली पडद्यामागून खेळल्या जात होत्या. भारत सरकारने तातडीने सिरम आणि भारत बायोटेक ला ४५०० कोटी रुपयांचा निधी कच्चा माल भारतात तयार करण्यासाठी उपलब्ध करून दिला. त्या शिवाय भारताने गेले वर्षभर जगातील प्रत्येक छोट्या, मोठ्या देशाला मदत मग ती औषधांच्या स्वरूपात, लसींच्या स्वरूपात केलेली होती. त्यामुळे अमेरिका सोडून जगातील सगळेच देश भारतासाठी उभे राहिले. रशिया, फ्रांस,युनायटेड किंगडम , युरोपियन युनियन, सिंगापूर, यु.ए.ई., इस्राईल, जर्मनी अशी सगळी अमेरिकेची मित्र राष्ट्र भारताच्या उपकारामुळे किंवा मित्रत्वाच्या नात्याने भारतासाठी उभी राहिली. त्यामुळे अमेरिका फर्स्ट ची जागतिक स्तरावर नाचक्की झाली. ते नाही होत तोवर आपल्याच पक्षातील लोकांच्या विरोधी भावनांना सामोरं जाण्याची नामुष्की बायडेन सरकारवर आली. भारतीय-अमेरिकन लॉबी, अमेरिकन थिंक टॅंक अश्या सगळ्याच बाजूने बायडेन प्रशासनावर त्यांनी भारताविरुद्ध टाकलेल्या पावला विरुद्ध नाराजीचा सूर उमटायला सुरवात झाली. आपण सोडलेला बाण वाऱ्यांची दिशा बदलल्यामुळे उलट फिरून आपल्याच दिशेने येत असल्याचं बायडेन आणि हॅरिस दोघांना स्पष्ट झालं.

भारताच्या सुरक्षा सल्लागारांनी अमेरिकेला तुम्ही आमचा लगाम खेचला तर तुमचा लगाम आमच्या हातात आहे हे विसरू नका हे स्पष्ट केलं. इकडे महत्वाचं होत की ही समज अमेरिकेला भारताच्या सुरक्षा सल्लागारांनी दिली न की कोणत्या राजकीय नेत्याने. त्याचा परिणाम स्पष्ट होता आम्ही शेरास सव्वाशेर आहोत ती वेळ येऊ देऊ नका. त्यानंतर लगेच बायडेन आणि हॅरिस यांना आपलीच लाज वाचवण्यासाठी तातडीने पावलं टाकली. बायडेन यांच्या ट्विट नंतर हॅरिस यांनी ट्विट केलं पण झालेलं नुकसान जास्ती झालं आहे हे लक्षात आल्यावर बायडेन यांनी स्वतःहून भारताच्या पंतप्रधानांना फोन करून आपण भारताला मदत करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं स्पष्ट केलं.

इकडे हे खूप महत्वाचं आहे की भारताने हाजी हाजी केली नाही. अमेरिका आणि त्यांच्या प्रशासनाने आपल्या वागण्याने स्वतः स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला आहे. एकतर भारताच्या हद्दीत भारताला न सांगता आपली नौका नेणं त्या नंतर अमेरिका फर्स्ट च्या नावाखाली भारताची गळचेपी करणं भारत- अमेरिका संबंधांना गालबोट लावून गेलं आहे हे नक्की आहे. या वेळेस अमेरिका स्पष्टपणे बॅकफूट आणि डॅमेज कंट्रोल मोड मधे आहे. सध्या भारतासाठी कोरोना च्या त्सुनामी ला आटोक्यात आणणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्यामुळे अमेरिकेने केलेल्या या नुकसानीचे काय दूरगामी परिणाम भारत- अमेरिका संबंध आणि एकूणच जागतिक स्तरावर होतात हे बघण्यासाठी काही कालावधी जावा लागेल. पण एक मात्र नक्की मतलई वाऱ्यांनी आता खाऱ्या वाऱ्याची दिशा पकडली आहे आणि अमेरिकेला येत्या काळात ते बोचणारे असतील.

फोटो स्रोत :- गुगल

सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

जालावर शोध घेतल्यावर लेखकाचे पेज मिळाले :- https://vartakvinit.blogspot.com/
https://vartakvinit.blogspot.com/2021/04/blog-post_27.html

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Naa Romba Busy... :- Vasuvum Saravananum Onna Padichavanga

Bhakti's picture

29 Apr 2021 - 10:06 pm | Bhakti

+१ ब्लॉग​

रंगीला रतन's picture

29 Apr 2021 - 10:36 pm | रंगीला रतन

इथल्या शायना बाईंना दिला पाहीजे हा लेख वाचायला! त्यांना लैच कौतुक आहे फायझरच.
ता.क. मढं बशीवल या कीबोर्डाच, जल्ला फडणवीस ऐवजी फर्नांडीस टाईपतोय आणि साहना ऐवजी शायना टाईपतोय सुळीचा!
सॅारी हं फडणवीस नाना! सॅारी ॲाल्सो हं साहना बाई!

गॉडजिला's picture

29 Apr 2021 - 8:33 pm | गॉडजिला

एक अफलातुन, सायफाय, उत्कंटावर्धक पण रोमहर्षक नसलेला बॉंडपट. मिपावर कोणीच बघितला नाही ?

रंगीला रतन's picture

29 Apr 2021 - 10:47 pm | रंगीला रतन

टेनेट हा बॉंडपट आहे?
मला नव्हत माहीत. शी, लाज वाटली मला स्वत:ला ००७ चा फ्यान म्हणवुन घ्यायची!

येस. टेनेट हा अफलातुन, सायफाय, उत्कंटावर्धक पण रोमहर्षक नसलेला नोलान दिग्दर्शीत बॉंडपट आहे.

बॉण्डपट बनवायचा होता, जमले नाही, गुप्तहेराचे नाव न घेता बॉन्डपट काढला. कॅनन किंवा ऑफिशियल बॉन्डपट नाही.

गॉडजिला's picture

30 Apr 2021 - 7:44 pm | गॉडजिला

अरे सॉरी सॉरी सॉरी... मला जेम्स बाँडचा चित्रपट न्हवे तर कथानक वाइज बाँडपट असे सांगायचे होते. ओफिशिअल बाँडपट तर नो टाइम टु डाय असेल.

रंगीला रतन's picture

30 Apr 2021 - 7:56 pm | रंगीला रतन

तेच म्हणतो मी!
००७ चा आलेला पिक्चर आणी मला माहीत नाही? असे आक्रीत कसे काय घडले बुवा :)

टेनेट मधे सगळं आहे, मजा सोडुन. नोलान बहुतेक आनंद घेणे ही बाब चित्रपटात घालायला विसरुन गेला होता.

रंगीला रतन's picture

30 Apr 2021 - 10:55 pm | रंगीला रतन

टेनेट बघुन सोडावा म्हणतो!
सोनेरी पेय लै म्हंजे लैच आवडतं पण नको, विषय ००७ चा चालु आहे तर मग व्होडका+मार्टीनी, शेकन.. नॅाट.. स्टर्ड.. हे परफेक्ट राहील :)

गॉडजिला's picture

1 May 2021 - 10:32 am | गॉडजिला

पेयं गदागदा हलवुन नाही तर सावकाश ढवळुन एकत्रीकरण करु.

टेनेट पाहुन झालाय, तो बॉन्डपट नाही तर सायफाय अ‍ॅक्शन थ्रिलर मुव्ही आहे. बॉन्ड शिवाय बॉन्डपट कसा काय असु शकतो ! :)))

च्यामारी सगळीकडे आत्ता कोव्हीड कोव्हीड चाललयं, टकुरं पार फिराया लागलयं ! कोनाला फोन बी केला तर त्या बयेची कोव्हीड टेप चालुच व्हते. बंद करा च्यामारी ती टेप. लोकांसनी किती बोअर करायच तीच टेप वर्षभर वाजवुन. मगं इचार केला या कोव्हीड थिमवर असलेलीच वेबसिरीज आहे काय ? ते पहावं. तर चक्क सापडली ! माझा पहिला सिझन पाहुन झालाय आणि दुसरा सिझन येण्याची वाट पाहतोय. :)
कोव्हीड काळात पूर्णपणे घरातच शूट झालेली ही आगळी वेगळी सिरीज मला आवडली, म्हणजे ठीक-ठाक आहे. खाली ट्रेलर देउन ठेवतो.

नक्की साहिलची भानगड काय आहे ? हे पहिल्या सिझन मध्ये समजेल आणि त्याचा नक्की झांगड गुत्ता काय हाय हे तुम्हाला शेवटच्या भागात उमगेल, पण थोडसं... बाकीच पुढ्याच्या सिझन मध्ये समदं समजेल.

मध्यंतरी अजुन एक सायफाय चित्रपट KIN पाहिला होता, चित्रपट पाहुन झाल्यावर एकुण वाटलं की याचा पुढचा सिक्वेल येइल आणि तो अजुन भारी असेल. याचा देखील ट्रेलर देउन ठेवतो.

जाता जाता :-

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Jeene Laga Hoon Lyrical... :- Ramaiya Vastavaiya

रंगीला रतन's picture

30 Apr 2021 - 8:06 pm | रंगीला रतन

फोन बी केला तर त्या बयेची कोव्हीड टेप चालुच व्हते. बंद करा च्यामारी ती टेप.
मला ती टेप वाजली की दुरसंचार मंत्र्याच्या माता आणि भगीनीची लैच आठवण येते :) बिचाऱ्या त्यादोघींना सारखी उचकी लागाला नको म्हणुन कुणाला फोन करणेच टाळतोय!

Bhakti's picture

30 Apr 2021 - 10:58 pm | Bhakti

:)

रंगीला रतन's picture

30 Apr 2021 - 11:49 pm | रंगीला रतन

हॅंगओव्हर उतरला :)
आज रॅामकॅाम बघावासा वाटतोय. टॅाम क्रुजचा Knight and Day लावतो आणी अचरट स्टंट्सची मजा घेतो.
ता.क. आपल्याला कॅमरून डायझ आवडते! शुभ रात्री

Bhakti's picture

1 May 2021 - 10:42 pm | Bhakti

मुंबई vs चेन्नई
हाय ड्रामा!
तो मोकळ्या स्टेडियमवर तयार केलेला पब्लिक साउंड फारच हासू आलं
https://www.hindustantimes.com/cricket/ipl/inside-ipl-s-ministry-of-soun...

सध्या माझा मोर्चा ढोकला अने फाफडा साथे फरसांड कडे वळवला आहे. :) येस्स अर्थातच गुजराती वेब सिरीज आणि चित्रपटाकडे मी वळलो असुन त्याचे मुख्य कारण अर्थातच प्रतिक गांधी हे आहे.
विठ्ठल तीडी ही वेब-सिरीज ७ मे ला रिलीज होत असुन मला ती पाहण्याची इच्छा निर्माण झाली आहे

ના દારૂ ના બીડી વિઠ્ઠલ તીડી...

याच बरोबर Wrong Side Raju हा गुजराती चित्रपट [ अर्थातच प्रतिक गांधीचा ] पहायचे ठरवले आहे. चित्रपट डाउनलोड मारुन ठेवला आहे, पण युट्युबवर देखील पाहण्यास उपलब्ध आहे.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Gori Radha Ne Kalo Kaan... :- Wrong Side Raju

असा मी असामी's picture

4 May 2021 - 2:48 pm | असा मी असामी

अजून मराठी सारखे गुजराती मध्ये picture निघत नाहीत. तरी आधी पेक्षा खूप परिस्थिती चांगली आहे.

Ahmedabad Palanpur Via Kadi Kalol,દેશ રે જોયા દાદા પરદેશ રે જોયા (माहरेची साडी सारखा चालला होता हा सिनेमा ) पासून ચલ મન જીતવા જઇયે, રેવા, હૅલ્લરો

ચલ મન જીતવા જઇયે पहिला नसेल तर आवश्य पाहा

ચલ મન જીતવા જઇયે पहिला नसेल तर आवश्य पाहा
ओक्के.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Unna Paartha Naeram... :- All in All Azhagu Raja

फॅंटसी सायफाय पेक्शाही हा चित्रपट समाज व माणुस या विषयावर जास्त केंद्रीत आहे. विज्ञानाच्या सहायांने माणुस छोटा करता येणे शक्य झालेले असते (श्रंक, काही इंच उंचीचा). त्यामुळे आता त्याला रहायला जागा कमी, खायला अन्न कमी म्हणुनच खिशातले काही हजार डॉलर्स एक्विवॅलंट टु अ फ्यु मिलीअन डोलर्स ठरु शकतात, पृथ्वीवरील रिसोर्सेस कमी वापरले जातात वगैरे वगैरे. हे डाउनसाईझिंग अर्थातच ऐच्छीक आहे पण यातुन अनेक प्रश्नही समोर येउ लागतात त्यावर हा चित्रपट भाष्य करतो

The Mandalorian
द मँडलोरियन. दोन्ही सीझन पाहून झाले. आता ३ऱ्या सिझन ची वाट बघतोय.
याची खासियत म्हणजे ग्रीन स्क्रीन ऐवजी मोठ्ठया एलईडी स्क्रीन्स वापरून चित्रीकरण केलंय. त्यामुळे वेगवेगळ्या लोकेशन्स वर जाऊन शूटिंग करण्याचा खर्च आणि वेळ दोन्हींची बचत होते. vfx मधील जाणकारांना green spill माहिती असेल. मुख्य नायकाचे चिलखत व शिरस्त्राण चकचकीत असल्याने green spill चे दुष्परिणाम हि टाळता येतात. boba fett चे पुनरागमन आश्चर्यचकित करून जाते. यापेक्षा जास्त स्पॉईलर्स देत नाही. बाकी दोन्ही seasons भारी आहेत.

आनंदी गोपाळ आज कुठं बघितला. फार छान सिनेमा आहे. गोपालरावांचे पात्र थोडे वॉटर डाऊन करून अँटीहिरो न वाटता हिरो सारखे वाटावे असे दाखवले अशी शंका आहे, तरी जे काही फिक्शन समोर वाढले ते सुरेख आहे.

सगळीच गाणी फार सुरेख आहेत, पण तू आहेस ना गाण्यात सिनेमा संपतो, ते म्हणजे एक नंबर. जसराज जोशी स्ट्राईक्स अगेन.

मदनबाण's picture

6 May 2021 - 3:05 pm | मदनबाण

हा ट्रेलर माझ्या पाहण्यात आला आणि हा चित्रपट मी पाहण्याचे ठरवले आहे, हेच कोर्ट बाबतीत देखील आहे, या दोन्ही चित्रपटां बाबत दिग्गजांनी इतक काही जालावर लिहुन ठेवलं आहे की अजुन काही लिहण्याची गरजच उरलेली नाही.

बादवे... Wrong Side Raju ज्याचा वरती उल्लेख केला आहे तो पाहिला आणि आवडला देखील [ ठीक-ठाक आहे ] चित्रपटातील ट्विस्ट अगदी शेवटी दाखवला आहे आणि अगदी १० मिनिटात आटपला आहे... प्रतिक गांधीचा अभिनय अर्थातच अप्रतिम आहे.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Kangal Irandal... :- Subramaniapuram

कॉमी's picture

10 May 2021 - 6:36 pm | कॉमी

सुंदर सिनेमा आहे.
शास्त्रीय संगीताच्या परंपरेचे ओझे वाहून नेणाऱ्या शिष्याची गोष्ट. खरोखरचे अंडरडॉग मुख्य पात्र. कलेशी निष्ठा राखणे आणि स्वतःचे जीवन सुधारणे या दोन गोष्टीतला द्वंद्व फार छान दाखवला आहे.

एक आणि एक संवाद खरा खुरा वाटतो. कुठेही नाटकीकरण नाही. अगदी वेगळाच सिनेमा आहे.

बघायलाच हवा असा सिनेमा आहे. नाविन्यपूर्ण अनुभव मिळेल. शास्त्रीय संगीताच्या जगाची झलक मिळेल.

मदनबाण's picture

14 May 2021 - 7:32 pm | मदनबाण

मी कोर्ट आणि The Disciple... दोन्ही पाहिले. मी ज्या प्रकारचे चित्रपट बघतो त्या प्रकारचे हे दोन्ही चित्रपट नक्कीच नाहीत. परंतु ज्याला वास्तवदर्शी चित्रिकरण म्हणता येइल असे हे दोन्ही चित्रपट आहेत. कोर्ट चित्रपटाने माझ्या संयमाची परिक्षा घेतली ! :) पण असे वेगळे चित्रपट देखील पहायला पाहिजे हे माझ्या मेंदुला समजले ! :)

@ गॉडजिला
बाँड चे नाव घेतलेस म्हणुन मी SPECTRE पाहिला. :) त्यात बाँड ने २ वेळा आनंद घेतला आहे. एव्हढेच सोडले तर कथेत अजिबात जीव नाही !
आय इन स्काय चा तू दिलेला ट्रेलर पाहिला, ट्रेलर वरुन तरी चित्रपट पहावा वाटतोय, पण त्याची आणि समांतरची तुलना योग्य नाही. समांतर वेब सिरिज असुन आय इन स्काय हा ड्रोन वॉरफेअर वरचा चित्रपट आहे.

शाहीदचे गंदी बात गाणेच दिस्ते आहे

म्हातारा सुलेमान खान त्याच्या चित्रपटात तिकडचीच [ दक्षिणेतली ] हिट गाणी घेतो आणि फालतु चित्रपट बनवुन करोडो कमावतो.

============================================================================================
@ चंद्रसूर्यकुमार
भाग मिल्खा भाग हा सुंदरच चित्रपट आहे. :)

@ Bhakti
Bruno Mars - Just The Way You Are हे माझे देखील आवडते गाणं आहे.

@ गणेशा

your honor वेळ मिळाल्यास नक्की पाहिन, सध्या वेब सिरिज पाहण्याला आराम दिला असुन अ‍ॅनिमेशन मुव्ही पाहण्याकडे कल वळला आहे.
==============================================================================
काही काळापुर्वी तुंबाड पाहिला होता, तो परत एकदा चांगल्या प्रिंट मध्ये बघितला. याच बरोबर THE CROODS: A NEW AGE [ Raya and the Last Dragon पहायचा बाकी आहे अजुन ] आणि The Three Musketeers पाहिला.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Soppanasundari... :- Veera Sivaji

गॉडजिला's picture

14 May 2021 - 8:22 pm | गॉडजिला

आय इन स्काय चा तू दिलेला ट्रेलर पाहिला, ट्रेलर वरुन तरी चित्रपट पहावा वाटतोय, पण त्याची आणि समांतरची तुलना योग्य नाही. समांतर वेब सिरिज असुन आय इन स्काय हा ड्रोन वॉरफेअर वरचा चित्रपट आहे.
नाय नाय नाय नाय नाय... समांतर म्हणजे समांतर (डावे)चित्रपट हो...
बाकी समांतर वेब सीरीज ही तर सुशींची कथा होती बहुतेक तिचा अन आय इन स्काय चा काहीच संबंध नाही :)

स्पेक्टर हा पुर्ण हुकलेला चित्रपट आहे किंबहुना क्रेगला कसीनो रोयाल नंतर तगडी स्क्रिप्टच मिळाली नाहीये. अन त्यात स्पेक्टर अन रोग नेशन एकाच सुमारास आले असल्याने स्पेक्टर तर अजुन सुमार वाटला होता.

Bhakti's picture

6 May 2021 - 8:21 pm | Bhakti

आज खूप दिवसांनी Discovery Science Channel पाहत होते.या करोनाने टीव्ही लावायची सोय ठेवली नाहीये.पण तेव्हा इन्का संस्कृती विषयी माहितीपट पाहिला पुन्हा यूट्यूब शोधला ,दोन तीन पाहिले आता हा पाहते.मोडेन पण वाकणार नाही असा बाणा असल्याने ही संस्कृती स्पनिशशी लढतांना संपूर्ण नष्ट झाली.पण तोपर्यंत त्यांनी चांगल्या प्रकारे civilization राबविले होते.

मदनबाण's picture

6 May 2021 - 10:27 pm | मदनबाण

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Kangal Irandal... :- Subramaniapuram

गॉडजिला's picture

7 May 2021 - 8:45 am | गॉडजिला
Bhakti's picture

8 May 2021 - 9:34 pm | Bhakti

तसे यांची जवळपास सगळीच गाणी आवडतात पण ह्या गाण्याचे मराठी अनुवाद लिहायचं एकदा निवांत सो नेहमी ऐकलं पाहिलं जातं.

धर्मराजमुटके's picture

9 May 2021 - 11:56 pm | धर्मराजमुटके

मी मराठी मालिकांचा चाहता नाही मात्र अचानक हे संकेतस्थळ बघण्यात आले. त्यात मराठी मालिकांची शीर्षकगीते दिली आहेत. मालिका कशा ही असोत मात्र बहुसंख्य मालिकांची शीर्षकगीते उत्तम आहेत.

हा दुवा

Bhakti's picture

10 May 2021 - 1:59 pm | Bhakti

मालिका कशा ही असोत मात्र बहुसंख्य मालिकांची शीर्षकगीते उत्तम आहेत.
सध्या आर्या आंबेकरने गायलेले 'माझा होशील का'मालिकेचे शीर्षकगीत छान आहे.जुन्यामध्ये श्रेया घोषालचे 'खुलता कळी ही खुलेना' अप्रतिम!

चंद्रसूर्यकुमार's picture

10 May 2021 - 2:05 pm | चंद्रसूर्यकुमार

विकांताला अ‍ॅमॅझॉन प्राईमवर सायना नेहवालवर सायना हा चित्रपट बघितला. चित्रपट ठिक आहे. मी बघितलेल्या अशा बायोपिक्समध्ये मला आवडलेला अगदी ऑल टाईम फेव्हरेट म्हणजे भाग मिल्खा भाग. धोनी पण चांगला आहे. त्या तुलनेत हा चित्रपट थोडा फिका वाटला.

एम.एक्स. प्लेयरवर किलिंग ऑफ वीरप्पन हा चित्रपट आला आहे. तो आता बघायचा आहे.

भाग मिल्खा भाग हा माझा आवडता चित्रपट आहे..
कधी हि tv ला लागला कि पाहतोच.. घरचे वैतागतात..

टायटॅनिक नंतर मी सर्वात जास्त वेळा पाहिला असलेला हा चित्रपट..

आता वरती म्हणालो तसे समांतर पाहतो आहे... भारी आहे...गुढ..

भाग मिल्खा भाग खरच छान सिनेमा आहे, त्यातलं Flash back तंत्र कमालीने वापरला आहे धोनी बरा आहे.पण अशा सिनेमांना मसाला लावतात कधी जास्त.. त्या तुलनेत Sachin A Billion Dream वेगळाच बायोपिक प्रयोग आहे.

चंद्रसूर्यकुमार's picture

10 May 2021 - 9:12 pm | चंद्रसूर्यकुमार

गेल्या तीनेक आठवड्यात नेटफ्लिक्सवर 'अ सुटेबल बॉय' ही सिरीज बघितली. विक्रम सेठ या लेखकाच्या त्याच नावाच्या कादंबरीवर ही सिरीज आधारीत आहे. नुकत्याच स्वतंत्र झालेल्या भारतातील, विशेषतः बंगालमधील पहिल्या पाच वर्षातील पार्श्वभूमी या सिरीजला आहे. नेटफ्लिक्सच्या सिरीजचा एक दर्जा नक्कीच असतो तो या चित्रीकरणातून जाणवतो. ही सिरीज एकूण सहाच भागात आहे आणि कथा एकूण चार कुटुंबांभोवती फिरते. लता नावाच्या १९ वर्षाच्या 'लग्नाळू' मुलीसाठी एक 'सुटेबल बॉय' शोधणे या कोणत्याही कुटुंबात होणार्‍या घटनेभोवती सगळी कथा फिरते. शेवटपर्यंत नक्की कोण 'सुटेबल बॉय' होणार याची उत्कंठा लागून राहते. माझा तरी त्या चार कुटुंबांचा एकमेकांशी संबंध काय आणि कोण कोणत्या कुटुंबातील आहे याचा सुरवातीला थोडा गोंधळ झाला होता. ही सिरीज सहाच भागात आहे आणि सिझन वगैरे भानगड नाही त्यामुळे बघायला कंटाळवाणी होत नाही.

वैधानिक इशारा-- सिरीजमधील काही दृष्ये अगदी निळ्या चित्रपटात शोभावी अशी आहेत. त्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक वगैरेंबरोबर ती सिरीज बघताना कुचंबणा होऊ शकेल.

गणेशा's picture

11 May 2021 - 7:27 pm | गणेशा

https://youtu.be/YhCNeMzr64M

ज्यांना शिव्या आवडत नाही त्यांनी ऐकू नये..

Use headphone only

Bhakti's picture

11 May 2021 - 9:51 pm | Bhakti
कुमार१'s picture

14 May 2021 - 7:58 pm | कुमार१

२ छान पाहिले :
‘अमल’ हा हिंदी : यावर स्वतंत्र धागा काढलाय

'मिनारी' हा कोरिअन. अमेरिकी शहरातून स्थलांतरित होऊन खेड्यात शेतीसाठी गेलेल्या कुटुंबाची कहाणी . छानच.

संजय पाटिल's picture

15 May 2021 - 5:00 pm | संजय पाटिल

यातला नायक अमेरीकेत शेति करायला महिंद्रा ट्रॅक्टर वापरतो हे बघुन भारी वाटलं...

खरंतर ५० + झाले
धागा नविन काढाया पाहिजे
पन लिवाव काय हेच पक्क
नसल्याने ह्यालाच रेटत हाय... :)

वरती पंढरीच्या विठुराया कविता अनेकदा ऐकली आणि प्रत्येक वेळी डोळ्यात पाणी आल्यानं, मनं अजुन कोडगं झालं नसल्याची माझीच मला खात्री पटली !

'संक्या, काहीही व्हायलंय बे हे...

Whatsapp Kavita

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Soppanasundari... :- Veera Sivaji

पंढरीच्या विठूराया ने खरेच गलबलून येते, अप्रतिम कविता आहे.

सिनेमा बघून रडणे हे माझ्यासाठी एकदम दुर्मिळ आणि रिफ्रेशिंग अनुभव असतात. मिपावरच कोणीतरी सुचवलेला ट्रायल ऑफ शिकागो ७ सिनेमातल्या काही घटनांमुळे डोळ्यातून पाणी आले आणि आश्चर्य वाटलं. तारे जमी पर नंतर आताच ! :) छान सिनेमा आहे शिकागो ७.

राधे सिनेमा फारच टीका उठली आहे.
हआहैको मधला प्रेम नंतर बजरंगी भाईजानच आवडता आणि माझ्या मुलीला त्यातली मुन्नी :) मुलीबरोबर कितीही वेळा पाहू शकते हा सिनेमा आणि हे दोन सिनतर फारच आवडतात.

राधे सिनेमा फारच टीका उठली आहे.
खरं तर... ह्या म्हातार बाबाचे चाळेच इतके घाणेरडे असतात की त्याचे चित्रपट म्हणजे केवळ मर्कटलिला.
हा विकृत माणुस आणि मुंबई पोलिस माझ्या मनातुन तेव्हाच कायमचे उतरले जेव्हा रविद्र पाटिल हा लावारिस मौत मेला ! :(

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- HARIVARAASANAM ORIGINAL TUNE ON VEENA BY VEENASRIVANI

मुक्त विहारि's picture

30 May 2021 - 3:20 pm | मुक्त विहारि

माहिती बद्दल धन्यवाद

राघवेंद्र's picture

16 May 2021 - 9:00 am | राघवेंद्र

Aspirants आज UPSC च्या अभ्यासावर बनवलेली मालिका youtube वर बघितली. मस्त आहे

भयंकर क्रेझ आहे त्याची सध्या... अक्षरशः होपलेस लोक यासाठी प्रयत्न करताना जो महानपणाचा आव आणतात ते बघुन तर जर चुकुन हा निवडला गेला तर काय होइल या नुस्त्या विचारानेही धडकी भरते.

खरे तर हे प्रकरणच कोबायाशीमारु (स्टार ट्रेक) आहे. तुम्ही जितक्या जास्त संखेने परिक्षा द्याल तितकेच अवघड तुमची निवड बनेल.

बाकी जसे कोटा फॅक्टरी काढले तसेच आस्पायरंट काढले, पिचर्स सोडले तर टीवीएफ मधे तसाही दम नाही.

या मालिका तशा चांगल्या आहेत पण दोन निरीक्षणे
१) तर या मालिकांमध्ये जो प्रॉयोजक असतो त्याच्या सेवेचा किंवा उत्पदनाचा उल्लेख केलेला दिसतो ( ऊन अकादमी असेल किंवा कोणी म्युच्युअल फंड असेल ) पण तो उल्लेख ( प्रोडक्त्त प्लेसमेंट ) सरळ सरळ कळतो कि उबग येतो ..
हे भाडीपा मध्ये पण द्या झूम म्हणून ५ भागांची मालिका जुन्य नाटकांवर आधारित , त्यांनचा प्रायोजक "बीरा " बियर पण त्याचे ( प्रोडक्त्त प्लेसमेंट ) इतके ओढून ताणून आणलेले आहे ..
२) Aspirants तर दुसरे निरीक्षण :यातील मुख्य व्यक्तिरेखा जी आहे ती एक एपिसोड मध्ये किती वेळा स्वेटर बदलते ते पहा .. मान्य आहे कि दिल्लीत स्वेटर जस्ट असतात लोकांकडे आणि हि व्यक्तिरेखा जरी विद्यार्थी असली तरी नोकरीतून वेळ काढून परीकेशेच्या तयारी साठी दिल्लीत आली आहे म्हणजे त्याच्याकडे पैसे आहेत .. तरी पण एवढे स्वेटर !

राघवेंद्र's picture

17 May 2021 - 9:02 am | राघवेंद्र

चौकस, तूमची नजर एकदम चौकस आहे. सही पकडे हो :)

अबोमिनेबल-अनिमेशन सिनेमा.
येती या क्रिअचरला त्याच्या घरापर्यंत एव्हरेस्टला नेण्यासाठी यी आणि छोट्या मित्रांची गोष्ट आहे.:)

जुइ's picture

30 May 2021 - 3:05 am | जुइ

हा चित्रपट चित्रपटग्रुहात जाऊन पाहिला आहे.

Bhakti's picture

30 May 2021 - 2:38 pm | Bhakti

मी माझ्या मुलीबरोबर घरीच पाहिला,खुपचं खुश होती ती.तसाच दुसरा सिनेमा म्हणजे कुंफू पांडा , मज्जा येते मुलांबरोबर असे सिनेमे पाहताना :)

जुइ's picture

30 May 2021 - 7:28 pm | जुइ

आम्ही माय लेकिने अजून एक पाहिला तो म्हणजे लायन किंग आणि फ्रोझन २

कॉमी's picture

17 May 2021 - 9:13 pm | कॉमी

आवडता सिनेमा पुन्हा बघितला.
त्यातला आवडता प्रसंग- V अक्षरापासून इतके शब्द आहेत, हे कळते. मस्त संवाद.

Evey-who are you ?
V-who? Who is but the form following the function of what, and what I am is a man in a mask.
Evey- Oh I can see that.
V-Of course you can. I'm not questioning your powers of observation, I'm merely remarking upon the paradox of asking a masked man who he is.
But on this most auspicious of nights permit me then, in lieu of the more commonplace sobriquet to suggest the character of this dramatis persona.
Viola!
In view, a humble vaudevillian veteran cast vicariously as both victim and villain by the vicissitudes of fate. This visage, no mere venere of vanity is a vestige of vox populi, now vacant, vanished. However this valorous visitation of a bygone vexation stands vivified and has vowed to vanquish the venal and virulent vermin vanguarding vice and vouchsafing the violently vicious and voracious violation of volition!
The only verdict is vengeance, a vendetta, held as a votive not in vain, for the value and veracity of such shall one day vindicate the vigilant and the virtuous.
Verily, this vichyssoice of verbiage veers most verbose. So let me add simply that it is my honour to meet you, and you may call me V.