शेअरमार्केट ची बाराखडी... भाग २.१ : Technical Analysis - Heikin-Ashi charts आणि bollinger bands

गणेशा's picture
गणेशा in अर्थजगत
4 Apr 2021 - 4:02 pm

आधिचे भाग -

भाग ० : Basics - By गणेशा - https://misalpav.com/node/48553
भाग ०.१: मार्जिन - By बिटाकाका - https://misalpav.com/node/48574
भाग १: Fundamental Analysis - By गणेशा - https://misalpav.com/node/48578
--------------------------------------

प्रस्तावना :
प्रस्तावना लिहावी लागण्याची तशी गरज नसेल असे आधी मला वाटलेले.. पण तसे नसल्याने लिहितो.

आता आपण Technical Analysis पाहणार आहोत. Historical price आणि volume यावरून statistical trend नुसार एक trading discipline करने म्हणजे technical analysis..
आता हे analysis प्रत्येकाचे वेगळे असु शकते.. प्रत्येकाचे आकलन आणि execution वेगवगेळ असु शकते.. एक point एखाद्याला buying सुचवू शकतो.. तोच एखाद्याला selling वाटतो..

१. त्यामुळे Technical Analysis मध्ये प्रत्येक व्यक्तीच्या Analysis चा आणि प्रत्येक method चा respect करावा असे मला वाटते... Market हे discipline शिकवते पण त्याच बरोबर respect others हि quality हि ते आपल्यात build करू शकते...आणि याचा उपयोग आपल्याला सर्व ठिकाणी होऊ शकतो.

आता हे वेगवेगळे निष्कर्ष का येतात? तर समजा बाहेर पाउस पडत असताना आपण काही जणांना त्याचे पाणी आणायला सांगितले तर काही जण बाटली भरून पाणी आणतात.. काही छत्री उलटी धरून त्यात पाणी झेलतात.. काही बॅरल पत्र्याखाली किंवा गच्ची च्या आउटलेट ला ठेवतात..काही बादली भरुन पाणी आणातात, भले चिखल कपड्यांना लागुन ते आणलेले पाणी ते कपडे धुण्यातच गेले तरी चालेल आणि काहीजण खिडकीतुन हात बाहेर काढून आपल्या तळहातावर पावसाचे पाणी झेलतात..
पण ह्यातले कोणते बरोबर हे व्यक्ती सापेक्ष असते... तळहातावर पाणी झेलानारा हि जास्त आनंदी असु शकतो..त्याच्या म्हणण्याने तो सुखी असतो.. तसेच इतर ही..
असेच अगदी share market मध्ये असते...analysis वेगवगेळे असते.. आणि मिळणारा नफा हा सुद्धा वेगवेगळा असतो.

२. Charts हे stock च्या price आणी volume movements चा graphical representation असतात.. त्या त्या Time Frame मधली movement तो दाखवत असतो.. जरी तो trading signal देवुन , भविष्यातील price movement कशी असेल हे दर्शवित असला तरी हे लक्षात घेतले पाहिजे, Charts हे price आणी volume प्रमाणे historical statistical values वरुन बनले जातात, ना की Charts वरुन future price बनली जाते.
आणि हे लक्षात आले कि आपल्याला उमगते कि technical analysis हे १०० % बरोबर नसते.. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचे स्वताचे असे analysis बनले जाते, आणि त्या प्रमाणे त्याने बघितले पाहिजे की आपले ७०-८० % analysis बरोबर आले पाहिजे, जर असे झाले तरच ती व्यक्ती यश्वस्वी होण्याच्या मार्गावर असते.

३. जास्त technical analysis methods ची सरमिसळ सुद्धा कामाला येत नाही.. Analysis करताना हे लक्षात घ्यायचे की आपल्याला कुठली method चांगली वाटते आणि बरोबर ठरते.. त्यानुसार आपल्या २-३ methods वापरून analysis केल्यास success rate जास्त असु शकतो आणि आपले Confusion कमी होते.

४. सर्वात महत्वाचे, ही लेखमाला ज्यांना share market चे ज्ञान घ्यायचे आहे किंवा अर्थसाक्षर व्हायचे आहे त्यांच्या साठी आहे, या मधुन माझा वयक्तीक असा कुठलाही हेतु आणि स्वार्थ नाही.. आणि मी कोणाकडुन ही पैसे घेवुन गुंतवणुक सल्ले देत नाही.. या लेखमाले मधुन माझे फक्त २ स्वार्थ आहेत, एक म्हणजे माझ्या ज्ञानाची उजळणी व्हावी आणि मला ही इतर जनांचे ज्ञान मिळावे आणि दुसरे म्हणजे मला हे सारे लेख इंग्रजी मध्ये हवे आहेत, त्याचा एक पाया येथे बनावा..

----------------

Heikin-Ashi charts

Heikin-Ashi चा शब्दशा अर्थ म्हणजे average bar.

Candle stick charts या By default chart मध्ये प्रत्येक Candle ही त्या time frameची (आपण time frame = 1D म्हणजे १ दिवस अशीच सगळी कडे घेवुयात), Open, Close , High and Low ह्या values दाखवते.

Heikin-Ashi technique काय करते तर ह्या Candle stick charts ला जास्त easier पद्धतीने वाचायला , आणि त्यापासुन trend analysis करायला मदत करते. ते तुम्हाला Uptrend किंवा downtrend दर्शविते.

Heikin-Ashi Candle ही दिसायला Candle stick charts मधील Candle सारखीच असली तरी ती वेगळ्या पद्धतीने Calculate केली जाते.

आपण प्रत्येक Heikin-Ashi Candle कशी chart वरती plot केली जाते ते पाहुयात.

Open= 1/2 * (Open of Previous Bar + Close of Previous Bar)
म्हणजेच Open हा previous bar चा midpoint असतो

Close= 1/4 (Open+High+Low+Close of Previous Bar)
म्हणजेच Open हा previous bar चा average price असते.

High आणि Low values मात्र त्याच मागच्या Previous Bar च्या जश्याच्या तश्या असतात.

आपण येथे आता chart बघुयात.

१. Candle stick chart Vs Heikin-Ashi chart


या चार्ट्स वरुन आपल्या लक्षात येते की, Heikin-Ashi chart मध्ये Uptrend किंवा downtrend त्या stock मध्ये चालु झाली आहे का ते smoother पणे आपल्याला कळते. याचा उपयोग करुन आपण आपली position कुठे घ्यायची आणि कुठे विकायची हे ठरवु शकता.

या Heikin-Ashi chart ला फक्त एकटे न वापरता या बरोबर आपण जर bollinger bands चा आपण वापर केला तर आपली position आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या value ला खरेदी करता येते किंवा विकता येते.

bollinger bands

Stocks हे Volatile असतात, म्हणजे रोज ज्या पध्दतीने Stocks High आणि Low बनवत असतात त्याला आपण त्या time frame ची Volatility म्हणु
हा Volatility report आपल्याला nse च्या site वरती ही मिळतो.
साध्या statistic च्या भाषेत यालाच आपण standard deviation म्हणतो.
आणि standard deviation आपल्याला readymade पणे ज्या indicator ने कळते त्या चे नाव आहे bollinger band.
आणि या मध्ये आपल्याला standard deviation बरोबर Moving Average पण कळत असल्याने फक्त Moving Average हा वेगळा indicator , chart वरती लावण्याची आपल्याला गरज लागत नाही.

आता तुम्ही पहिल्यांदा Heikin-Ashi मध्ये तुमचा chart, Convert करा. त्यानंतर तुम्ही indicator मधुन bollinger band select करा.

असा..

नंतर bollinger band ला Right click करुन खालील फोटो मध्ये दाखवले आहे तसे त्याचे setting करुन घ्या

या setting मध्ये Period मी २० निवडला आहे, म्हणजे 20DMA २० दिवसाचे moving average नुसार values plot होतील.
आणि standard deviation = १ आहे.

bollinger band हे नेहमी pair मध्ये काम करते . म्हणुन आपण आनखिन एक या सारखाच दुसरा bollinger band, chart वरती plot करायचा.
यावेळेस setting सगळे तसेच ठेवायचे फक्त standard deviation = २ ठेवायचे. म्हणजे तो SD ला multiplier करतो आणि chart वरती bands तयार होतात. Upper band , middle band आणि lower band.

आता वरच्या फोटोत दाखवल्या प्रमाणे तुम्ही Heikin-Ashi मध्ये तुमचा chart बदलला नसल्यास तो त्यात बदला. तो आधी किंवा नंतर तुम्ही तो बदलु शकता.

आता तुमचा chart असा दिसेल
bollinger bands

म्हणजे आता Heikin-Ashi बरोबर तुमच्याकडे bands असतील, वरचा हिरवा रंगाचा वरचा band , खालचा लाल रंगाचा आणि मध्ये निळी लाईन ही moving average दर्शविते.

Analysis for Positional Trading

प्रथमता हे लक्षात घ्या, bollinger bands ची width जेव्हडी जास्त तेव्हडी volatility त्या stock मध्ये जास्त.
Positional Trading करताना नेहमी लक्षात घ्या volatility ही कमी पाहिजे, Intra day trading ला volatility जास्त असल्यावर फायदा होतो.Positional Trading ला मात्र ती कमी हवी.

आपल्याला Heikin-Ashi trend दाखवते, ज्या वेळेस stock Candle ह्या lower band मधुन वरती जाताना moving average cross करत असतील तेंव्हा तुम्ही तो stock खरेदी करायचा.. आणि जेंव्हा Upper band मधुन trend reversal झाल्यावर(किण्वा moving average खाली येताना cross करत असेल तेंव्हा ) तो stock विकायचा.

माझे सांगायचे झाल्यास मी गेल्या महिन्यात ३२६ रुपयाला, वरती दिलेला बंधन बँक हा stock विकत घेतला आणि ३६० ला तो विकला. माझ्या Analysis ने तो ३७५ जाणार होता, ३७० गेल्यावर माझ्या trailing stop loss हिट झाला.
------------

थांबतो.. समोर समजुन सांगायला खुप सोप्पे आहे, लिहायला तेव्हडेच अवघड.. समजुन घ्या.. अभ्यास करा..आणि अभ्यासावरती कायम विश्वास ठेवा...
जग जे negative बोलत असते, त्यात त्यांचा अभ्यास नसल्याने अपयश आलेले असते हे लक्षात घ्या.. Slow and steady हीच यशाची खरी गुरुकिल्ली आहे..
वाचायला किचकट वाटाले तरी प्रयत्न करा.. नक्कीच हे इतके अवघड नाहीये..

- गणेशा..

प्रतिक्रिया

बेकार तरुण's picture

4 Apr 2021 - 5:00 pm | बेकार तरुण

लेख आवडला...

मुक्त विहारि's picture

4 Apr 2021 - 6:30 pm | मुक्त विहारि

माहिती बद्दल धन्यवाद

शाम भागवत's picture

4 Apr 2021 - 6:47 pm | शाम भागवत

👌

अमर विश्वास's picture

4 Apr 2021 - 7:01 pm | अमर विश्वास

गणेशा भाऊ

उत्तम माहिती ... शक्य तेव्हड्या सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न आवडला .... लिहीत राहा

चंद्रसूर्यकुमार's picture

4 Apr 2021 - 8:13 pm | चंद्रसूर्यकुमार

लेख आवडला. मी स्वतः हायकेन आशी वापरत नाही आणि त्याविषयी फारशी माहिती मला नाही. त्यामुळे त्याविषयी काही लिहित नाही. त्याविषयी वाचायला हवे. इतरही बरीच नावे ऐकली आहेत- कॅगी, रेंको, पॉईंट् अ‍ॅन्ड फिगर वगैरे. पण नुसती नावेच ऐकली आहेत :)

दोन मुद्दे:

१. पोझिशनलला व्होलॅटिलिटी कमी पाहिजे असे म्हटले आहे. शेअरमार्केटमध्ये बर्‍याच टर्म्सची एकच प्रमाण व्याख्या नाही. त्यामुळे मी किंवा अन्य कोणी पोझिशनल म्हणजे जे अभिप्रेत धरत असेल तीच व्याख्या सगळ्यांची असेल असे नाही. तेव्हा पोझिशनल म्हणजे नक्की कोणती टाईमफ्रेम तुम्ही गृहित धरली आहे? कारण त्याप्रमाणे नक्की डेली/विकली/मंथली चार्ट बघावा हे बदलेल.

२. दुसरे म्हणजे व्होलॅटिलिटी कमी असताना एन्ट्री करायची यामागे नक्की काय कारण असावे? मला वाटत होते की आपल्याला ज्या टाईमफ्रेमवर ट्रेड करायचा आहे त्या टाईमफ्रेमवर व्होलॅटिलीटी जास्त असेल अशावेळी ज्या दिशेने मूव्ह आहे त्या दिशेने ट्रेड घ्यावा (लाँग किंवा शॉर्ट) आणि एक वरची टाईमफ्रेम सपोर्ट करत असेल तर ट्रेड फायद्यात जायची शक्यता जास्त. तसेच ट्रेन्डलाईन ब्रेकआऊट वगैरे पाहिजे. त्या परिस्थितीत सगळ्याच जोरात मूव्ह येते आणि भरपूर फायदा करून देणारा ट्रेड होतो. हा झाला मोमेन्टम ट्रेड.

व्होलॅटिलीटी कमी असताना म्हणजे बोलिंजर बारीक असताना एन्ट्री घेतली तर बरेच फॉल्स सिग्नल्स येतात. लेखात दिलेलाच सेट-अप (हायकेन आशी आणि बोलिंजर १ आणि २) वापरून रिलायन्सला डेली चार्ट खाली देत आले.

Reliance

जेव्हा कँडल्स बोलिंजरला (अपर किंवा लोअर) लागून जातात तेव्हा सगळ्यात वेगाने मूव्ह येते. अशावेळी लाँग किंवा शॉर्ट पोझिशन घेतलेली सगळ्यात फायदेशीर ठरेल. पण त्यावेळी व्होलॅटिलीटी जास्त असते. चार्टच्या उजवीकडील भागात जेव्हा रिलायन्स साईडवेज जात आहे तेव्हा व्होलॅटिलीटी कमी आहे आणि बरेच फॉल्स सिग्नल येत आहेत. तेव्हा व्होलॅटिलीटी कमी असताना बोलिंजर बारीक असतात अशावेळी फॉल्स सिग्नलपासून वाचायला नक्की कोणते मार्ग अवलंबता?

गणेशा's picture

4 Apr 2021 - 10:57 pm | गणेशा

मी किंवा अन्य कोणी पोझिशनल म्हणजे जे अभिप्रेत धरत असेल तीच व्याख्या सगळ्यांची असेल असे नाही. तेव्हा पोझिशनल म्हणजे नक्की कोणती टाईमफ्रेम तुम्ही गृहित धरली आहे? कारण त्याप्रमाणे नक्की डेली/विकली/मंथली चार्ट बघावा हे बदलेल.

एकदम बरोबर.. Positional time frame हि व्यक्ती सापेक्ष किंवा stock perspective असु शकते.. त्यामुळे प्रत्येकाची संकल्पना वेगळी असेल.
मी स्वतः साधारणता महिना - दोन महिने किंवा तीन महिने या कालावधी साठी stock घेतो.. कधी कधी मात्र महिन्याचे target १० दिवसात hit झाले तर तेंव्हा exit करतो, कधी कधी stock खाली गेला लवकर तर avg करतो.

मी स्वतः फक्त हेच analysis वापरत नाही याबरोबर मी msad/ adx हे technique पण वापरतो.. आणि volume व rsi वर पण नजर असते.
त्यामुळे या एकाच analysis चे म्हणाल तर मी शक्यतो १ day ची candle पाहतो.

या मध्ये म्हणूनच मी २० days चे moving avg पाहतोय.. त्याचा जवळ जवळ अर्थ मागच्या एक महिनाच्या data वरून मी analysis करत आहे...

हे सर्व paramter हे व्यक्तीनुसार नक्कीच बदलतील..

MipaPremiYogesh's picture

16 Apr 2021 - 6:12 pm | MipaPremiYogesh

जर शॉर्ट टर्म transaction केले तर टॅक्स कसा आणि किती बसतो?

अमर विश्वास's picture

16 Apr 2021 - 8:59 pm | अमर विश्वास

शॉर्ट टर्म ट्रेडिंग गेन (less than one year ) हे तुमचे उत्पन्न (Direct Income) धरले जाते ... त्यामुळे ते तुमच्या पगार + बाकीचे उत्पन्न यात जोडले जाते. व इनकम टॅक्स च्या स्लॅब्स प्रमाणे टॅक्स भरावा लागेल

चंद्रसूर्यकुमार's picture

16 Apr 2021 - 9:25 pm | चंद्रसूर्यकुमार

शॉर्ट टर्म ट्रेडिंग गेन (less than one year ) हे तुमचे उत्पन्न (Direct Income) धरले जाते ... त्यामुळे ते तुमच्या पगार + बाकीचे उत्पन्न यात जोडले जाते. व इनकम टॅक्स च्या स्लॅब्स प्रमाणे टॅक्स भरावा लागेल

नाही शेअर्स डिलीव्हरी न घेता इन्ट्राडे ट्रेड केले असतील तर त्यातून येणारे उत्पन्न हे स्पेक्युलेटिव्ह इनकम (मराठी शब्द?) धरून ते उत्पन्न आपल्या एकूण उत्पन्नात धरले जाऊन आपल्या आयकराच्या स्लॅबप्रमाणे त्यावर कर भरावा लागतो. पण जर डिलीव्हरी घेतली असेल तर शेअर्सवरील शॉर्ट टर्म फायद्यावर (शेअर विकत घेऊन तो बारा महिन्याच्या आत विकला तर होणारा फायदा हा शॉर्ट टर्म फायदा धरला जातो) सरसकट १५% कर आकारला जातो. म्हणजे आपण आयकराच्या सर्वात वरच्या ३०% स्लॅबमध्ये असलो तरी शेअरवरील शॉर्ट टर्म कॅपिटल गेन वर १५% इतकाच कर भरावा लागतो.

फ्युचर्स आणि ऑप्शन्सचे सगळे व्यवहार हे बिझनेस इनकम म्हणून धरले जातात. डेरिव्हेटिव्हमध्ये ट्रेडिंग केल्याचा एक फायदा म्हणजे आपण अनेक प्रकारचे अन्यथा होणारे खर्च हे त्या बिझनेससाठीचे खर्च म्हणून दाखवू शकतो आणि त्यातून कर कमी भरावा लागतो. हे अधिकृतपणे करता येते आणि यात कोणतीही करचुकवेगिरी नाही. तेव्हा आपला डेरिव्हेटिव्हमधून झालेला फायदा वजा हे सगळे खर्च मिळून जेवढे उत्पन्न असेल त्यावर आपल्या आयकराच्या स्लॅबप्रमाणे कर भरावा लागतो. जर तोटा झाल्यास तो पगार सोडून इतर उत्पन्नाशी सेट-ऑफ करता येतो आणि तसे न करता आल्यास हा तोटा तब्बल ८ वर्षे 'कॅरी फॉरवर्ड' करता येतो आणि या ८ वर्षाच्या काळात डेरिव्हेटिव्ह किंवा अन्य कोणत्याही बिझनेसमधील उत्पन्नाबरोबर सेट-ऑफ करून कर कमी करू शकतो.

अमेझॉन ने असच काहीतरी करून नफा झालेला असताना सुद्धा पूर्वीच्या तोट्याचा फायदा घेऊन टॅक्स वाचवला होता / भरायचा टाळला होता ना?

चंद्रसूर्यकुमार's picture

16 Apr 2021 - 10:15 pm | चंद्रसूर्यकुमार

याविषयी माहिती नाही.

मराठी_माणूस's picture

17 Apr 2021 - 12:20 pm | मराठी_माणूस

कॅपिटल गेन च्या वरची कर आकारणी कश्या प्रकारे होते हे छान समजावले आहे. धन्यवाद.

गणेशा's picture

4 Apr 2021 - 11:18 pm | गणेशा

२. दुसरे म्हणजे व्होलॅटिलिटी कमी असताना एन्ट्री करायची यामागे नक्की काय कारण असावे? मला वाटत होते की आपल्याला ज्या टाईमफ्रेमवर ट्रेड करायचा आहे त्या टाईमफ्रेमवर व्होलॅटिलीटी जास्त असेल अशावेळी ज्या दिशेने मूव्ह आहे त्या दिशेने ट्रेड घ्यावा (लाँग किंवा शॉर्ट) आणि एक वरची टाईमफ्रेम सपोर्ट करत असेल तर ट्रेड फायद्यात जायची शक्यता जास्त. तसेच ट्रेन्डलाईन ब्रेकआऊट वगैरे पाहिजे. त्या परिस्थितीत सगळ्याच जोरात मूव्ह येते आणि भरपूर फायदा करून देणारा ट्रेड होतो. हा झाला मोमेन्टम ट्रेड.

सांगतो.
Breakout आणि मग volatility..ह्या तश्या depend गोष्टी पण होऊ शकतात..

प्रत्येक व्यक्तीच्या experience नुसार trade मध्ये entry कधी झाली पाहिजे तर early stage मध्ये.. मग हि early stage depend राहते ती म्हणजे
अ. Support and Resistance ला आणि
ब. Breakout ला.

त्यामुळे entry हि लवकर support जवळ झाल्यास जेंव्हा break out होईल तेंव्हा तो reaiatance तोडून वरती गेलेला असेल.

येथे मी stocks २-३ महिने hold करत असल्याने हे achivable होते...

आणि म्हणूनच जेंव्हा volatility कमी असेल तेंव्हाच तुम्ही lower band ला किंवा support level ला (uptrend होताना ) entry घेतल्यास, जेंव्हा break out होईल किंवा volatility तुमच्या favor मध्ये expand होईल तेंव्हा तुम्हाला जास्त फायदा होईल.

चंद्रसूर्यकुमार's picture

5 Apr 2021 - 9:20 pm | चंद्रसूर्यकुमार

त्यामुळे entry हि लवकर support जवळ झाल्यास जेंव्हा break out होईल तेंव्हा तो reaiatance तोडून वरती गेलेला असेल.

आणि म्हणूनच जेंव्हा volatility कमी असेल तेंव्हाच तुम्ही lower band ला किंवा support level ला (uptrend होताना ) entry घेतल्यास, जेंव्हा break out होईल किंवा volatility तुमच्या favor मध्ये expand होईल तेंव्हा तुम्हाला जास्त फायदा होईल.

म्हणजे तुम्ही सपोर्टला डबल बॉटम/ फेक ब्रेकडाऊन वगैरे होत असेल तिथे स्विंग ट्रेड घेता. पण स्विंगला ट्रेड घेताना बॉलिंजर बारीक नसतात. कारण किंमत खाली येत असेल आणि सपोर्टच्या जवळ खरेदी आली म्हणून किंमत वर आली अशी परिस्थिती असेल तर त्यावेळी बॉलिंजर बारीक असणार नाहीत. उदाहरणार्थ रिलायन्सने जानेवारी २०२१ च्या शेवटी डबल बॉटम केला होता तेव्हा बॉलिंजरचा आकार बघा.

reliance

अर्थात नुसत्या डबल बॉटमवर ट्रेड मी तरी घेणार नाही. मुळात तो शेअर अपट्रेंडमधला पाहिजे आणि तात्पुरता खाली आल्यामुळे सपोर्टला जाऊन डबल बॉटम करत असेल तर तो शेअर लाँग साईडला खेळायला चांगला. पण डाऊनट्रेंडमधल्या शेअरने डबल बॉटम केला तर तो चालेल याची शक्यता त्या मानाने कमी. तसेच डबल बॉटमबरोबर डायव्हर्जेन्स (आणि रिव्हर्स डायव्हर्जेन्स असेल तर अजून चांगले) पाहिजेत आणि लोअर बॉलिंजरची दिशा वरच्या बाजूला वळली पाहिजे.

गणेशा's picture

5 Apr 2021 - 10:59 pm | गणेशा

तुम्ही म्हणता ते थोड्या प्रमाणात बरोबर आहे. ( तुम्ही चार्ट वरती हायकेन अ‍ॅशी कँडल्स घेतल्या नाहीयेत बहुतेक)
मी येथे काय विचार करतो ते सांगतो.

नोव्हेंबर मध्ये volatility जास्त होती , आणि नंतर stock हा एका रेंज मध्ये जात होता. नंतर फेब मध्ये त्याने पुन्हा बॉटम केला आणि ९ फेब ला, तो lower band मधुन मागील २० दिवसाचे moving avg ओलांडत आहे.(Up trend)
त्याच वेळेस खाली, MACD मध्ये मला कळते आहे buying वाढत आहे, आणि त्यातील काळी रेषा लाल रेषेला ओलांडुन वरती चालली आहे.
ADX ला ही हिरवी रेषा लाल रेषे ला ओलांडुन वरती चालली आहे.
आणि volatility ही तेंव्हा ही जास्त नाही ( व्यक्ती सापेक्ष असेल ती, काही वेळेस experience ने तुम्ही bottom ला share buy केला असता)
पण Bollinger band प्रमाणे आणि MACD प्रमाणे मी तो ९ फेब ला १९४७ रुपयाच्या दरम्यान buy करेल.

नंतर

या फोटोत दिसत आहे तसे, १५ मार्च ला मी जेंव्हा MACD मध्ये selling वाढुन काळी रेषा लाल रेषेला छेदुन खाली चालली आहे, तेंव्हा हा share २१८० जवळ विकुन टाकेल.

(नोव्हेंबर नंतर या stock मध्ये volatility जास्त नाहिये अजुनही असे माझे मत आहे. हा एकाच रेंज मध्ये फिरताना आधीच्या पेक्षा येथे volatility तुम्हाला जास्त वाटत आहे, पण तसे नाहिये.. )

गणेशा's picture

5 Apr 2021 - 11:21 pm | गणेशा

प्रत्येक व्यक्तीच्या experience नुसार trade मध्ये entry कधी झाली पाहिजे तर early stage मध्ये.. मग हि early stage depend राहते ती म्हणजे
अ. Support and Resistance ला आणि
ब. Breakout ला.

हे मी वरती बोललो होतो, त्या नुसार मी Support ला reliance buy करण्याचा प्रयत्न केला होता.
(तुम्ही experience नुसार तुमचे analysis चांगल्या पद्धतीने करु शकता)
खालील buy breakout फोटॉ मध्ये दिसत आहे,
मी २ नोव्हेंबर ला Support जवळ ( पहिल्या bottom च्या एक दिवस आधी) हे २ शेअर १९६५ आणी १९०३ रुपया ला खरेदी केले.
आणि नंतर पुन्हा bottom तयार झाला आहे असे समजुन, ११ जानेवारी ला १९०८ रुपयाला हा शेअर मी खरेदि केला आहे.

माझ्याकडे असलेल्या शेअर चे buy breakout

गणेशा's picture

4 Apr 2021 - 11:33 pm | गणेशा

व्होलॅटिलीटी कमी असताना बोलिंजर बारीक असतात अशावेळी फॉल्स सिग्नलपासून वाचायला नक्की कोणते मार्ग अवलंबता?

आता मी लॅपटॉप समोर नाहीये, मोबाईल वरून chart ला limitations आहेत, तरी मी diagram देतो आहे.

आता मी false signal साठी volume आणि adx आणि macd वापरत आहे, त्याबद्दल पुढे मी नंतरच्या भागात सविस्तर लिहिलच..

Bollinger band चे स्वतः मध्ये काही limitations आहेत ते मी लिहिण्याचा खाली प्रयत्न करतो..

गणेशा's picture

4 Apr 2021 - 11:38 pm | गणेशा

आणि येथे mention करायचो राहिलो मी कि super trend हि या बरोबर मला मदत करते, पुढचा भाग मी या वर घ्यावा म्हणतो.

गणेशा's picture

5 Apr 2021 - 12:13 am | गणेशा

John Bollinger ह्याने जेंव्हा हा indicator तयार केला तेंव्हा त्याचे म्हणणे होते हा stand alone indicator नाहीये.. हा indicator तुम्हाला price volatility दाखवतो..परंतु तुम्ही याबरोबर non correlated tool use करावेत.

याला कारण आहे कि bolinger band हा reactive प्रकारात मोडतो..ना की predictive. हा price movement दाखवतो ना कि price prediction.

परंतु मी आधी याला rsi बरोबर वापरायचो आणि आता MACD बरोबर.
Macd /adx हे माझे अलीकडे आवडते indicator झाले आहेत, त्यामुळे bollinger band + MACD मला भरपूर profit मिळवून देतात.

याचे दुसरे एक limitation आहे कि प्रत्येक trade ला २० days moving avg बरोबर fit बसत नाही असे मला वाटते.. परंतु मी ते कधी change केले नाही..

अवांतर :

Relaince चे उदाहरण दिले आहे तुम्ही आणि तो माझ्या fundamental long term मध्ये समाविष्ट आहे..म्हणुन थोडे अवांतर लिहितो..

हा stock मी पहिल्यांदा १००० रुपयाला घेतला होता. मध्ये हि एकदा मी २ shares add केले त्यात.

नंतर अलीकडे तो १८५०- २२०० जवळ बरेच दिवस फिरत आहे, फक्त experience ने मी तो १८५० च्या जवळ वेगवगळ्या वेळेस पुन्हा खरेदी करून ठेवून दिला आहे..

असाच experience मी short term साठी आता jm financial आणि biocon यांना वापरतो..
असे काही stocks आपण कायम घेत राहिलो तर आपल्याला ते फक्त chart बघुन आपोआप कळतात कि हे वर जाणार कि खाली..

असे २० पेक्षा जास्त stocks आहेत कि MACD आणि BOLLINGER BAND च्या आधीच माझ्या मनात त्यांची काय movement होईल असे मला कळते..
येथे मी माझे ज्ञान सांगत नाही.. मला सांगायचे आहे experience ने तुम्हाला काही stocks बरोबर support level ला घेता येतात.
आणि त्यांचा resitance काय आहे हे तुम्हाला कळते..

जसे माझ्या main उदा मध्ये मी बंधन bank घेतला होता.. माझ्या म्हणण्याने तो break out जवळ चालला होता.. पण जर खाली आला तर profit book करणे इष्ट म्हणुन तो मी त्याच्या आधीच्या ३५८ च्या लेवल ला तो stop loss लावला..

हे सगळे व्यक्ती सापेक्ष असल्याने प्रत्येक जण असाच करेल हे मात्र नक्कीच होत नाही..

----

तुम्ही तुमच्या techniques explain केल्यास मला जास्त आवडेल..
आणि एक मी fibonacci बद्दल बरेच ऐकले आहे, पण मी त्या method चा कधीच अभ्यास करू शकलो नाही..

थांबतो.. Good night..

Thanks for nice questions..

प्रचेतस's picture

5 Apr 2021 - 8:58 am | प्रचेतस

उत्तम लेख.
तांत्रिक विश्लेषण हे किचकट वाटत असल्याने त्यापासून दूरच राहिलो होतो. आता तुझ्या लेखांनी हे काहीसे सुगम होऊ लागले आहे.

गोंधळी's picture

5 Apr 2021 - 10:32 am | गोंधळी

जे शेअर्स ऑप्शन/फ्युचर मध्ये ट्रेड होतात त्यांना ही पध्द्त लागु होईल का?

गणेशा's picture

5 Apr 2021 - 12:07 pm | गणेशा

मी स्वतः कधीच future options केले नाही त्यामुळे सांगता येत नाही..
पण नक्कीच हि पद्धत तेथे उपयोगी नसेल असे मला वाटते..

तुषार काळभोर's picture

5 Apr 2021 - 11:14 am | तुषार काळभोर

१. मूळ लेखात ज्या नव्या टर्म्स आहेत, त्यांच्या (किमान) बेसिक व्याख्या आहेत.
उदा. >>Heikin-Ashi chart = Heikin-Ashi चा शब्दशा अर्थ म्हणजे average bar.
>> आणि standard deviation आपल्याला readymade पणे ज्या indicator ने कळते त्या चे नाव आहे bollinger band.
नंतरच्या प्रतिसादांमध्ये काही टर्म्सचा थेट उल्लेख आल्याने त्या डोक्यावरून गेल्या.
उदा. MACD, RSI, ADX : यांचा काहीच गंध नसल्याने, जे सर्व स्पष्टीकरणा आहे, ते अपूर्ण वाटतं.
यांविषयी पुढ्च्या भागात लिहितो, असं तुम्ही सांगितलंय. पण किमान व्याख्या आली असती तर बरं झालं असतं.

२. हे सगळं स्पष्टीकरण (बंधन + रिलायन्स) रेट्रोस्पेक्टिव्ह आहे. एखादं चालू उदाहरण आपण पाहू शकतो का?

१. नंतरच्या प्रतिसादांमध्ये काही टर्म्सचा थेट उल्लेख आल्याने त्या डोक्यावरून गेल्या.
उदा. MACD, RSI, ADX : यांचा काहीच गंध नसल्याने, जे सर्व स्पष्टीकरणा आहे, ते अपूर्ण वाटतं.
यांविषयी पुढ्च्या भागात लिहितो, असं तुम्ही सांगितलंय. पण किमान व्याख्या आली असती तर बरं झालं असतं.

हे वेगवगेळ indicators आहेत त्या गोष्टी लगेच सांगितल्यावर खुप confusion वाढेल.. आपण हळू हळू जाऊयात :-)macd swinging होणारे market दर्शवित असल्याने मला आवडते..

२. हे सगळं स्पष्टीकरण (बंधन + रिलायन्स) रेट्रोस्पेक्टिव्ह आहे. एखादं चालू उदाहरण आपण पाहू शकतो का?

बंधन चे मी चालू उदाहरण दिलेले आहे.. मी नुकताच तो stock sell केला profit book करून.

मला हि method वापरताना कुठले तरी example द्यायचे होते सो मी बंधन घेतला..
मार्केट मध्ये external activity मुळे जर उलटापालथ नाही झाली तर तुम्ही हा indicator कधीही कुठे हि पाहू शकता...

Macd आल्यावर तुम्हाला ह्या indicator ची त्याबरोबर सांगड घातल्याने ट्रेड करायला मज्जा येईल

पण एवढं अ‍ॅनालिसिस कधी केलं नव्हतं. (त्यामुळेच अपयश मिळालं, असं आता वाटतं.)
त्यामुळे फक्त ब्लुचिप मध्ये दीर्घकालीन गुंतवणुक केली आहे.
या लेखमालेमुळे पुन्हा शॉर्टटर्म (एक आठवडा ते २-३ महिने) करता येईल अशी अपेक्षा आहे.
(डे ट्रेडींग हा माझा प्रांत नाही यावर माझा विश्वास बसला आहे. जेव्हा बाकी काही न करता, दिवसभर फक्त अभ्यास करून ट्रेडिंग करता येईल, तेव्हाच हे जमेल. डे ट्रेडिंग हे फावल्या वेळात करायचे काम नाही)

गणेशा's picture

5 Apr 2021 - 12:20 pm | गणेशा

या लेखमालेमुळे पुन्हा शॉर्टटर्म (एक आठवडा ते २-३ महिने) करता येईल अशी अपेक्षा आहे.

पैलवान साहेब,
profit होईलच.. फक्त royalti द्या मला :-)) :-))
एक विनंती.. या indicator बरोबर आणखिन एक दोन indicator चा अभ्यास करून मग ट्रेड करा...

अर्थात. दुधाने तोंड पोळलंय!
आता बर्फ टाकलेला मठ्ठासुद्धा मी फुंकूनच पिणार!

शा वि कु's picture

5 Apr 2021 - 1:25 pm | शा वि कु

भारी समजावून सांगितलय !

गणेशा's picture

6 Apr 2021 - 2:12 pm | गणेशा

आभार..

सर्वांचे आभार,

असल्या किचकट गोष्टीं वाचायला पेशंन्स लागत असेल..

मी हे धागे लिहिले नसते तर कदाचीत हे धागे मीच वाचले नसते..
:-)

तुषार काळभोर's picture

6 Apr 2021 - 4:08 pm | तुषार काळभोर

मी फेब्रुवारी च्या मध्ये ITC घेतला. 226ला.
अर्थात लाँग टर्म.
मागच्या दोन तीन दिवसात हे वाचून त्याच्याकडे रेट्रोस्पेक्तिवली बघितलं, तर असं दिसतंय, जिथं विकायचा सिग्नल होता, नेमका तिथं मी विकत घेतला.
प्लीज चुकत असेल तर करेक्शन सुचवा.

हायकिन ऍशी बोलिंजर बँड मध्ये खालच्या दिशेने आहे, त्याचवेळी MACD काळी रेष लाल रेषेला छेदून वर गेली.
म्हणजे शॉर्ट टर्म खाली जाण्याचा सिग्नल.

गणेशा's picture

6 Apr 2021 - 6:08 pm | गणेशा

प्रथमता २ गोष्टी सांगतोय ( फुकटच्या ) आणि नंतर बोलतो.
१. लाँग टर्म जर आपण शेअर घेतला तर आपण तो नियमीत कायम प्रत्येक डीप ला घेत जायचे.. आणी Technical analysis शक्यतो त्याला वापरायची नाही.
२. आपण नविन गोष्टी मध्ये चुकत असतो, आणी शिकत असतो, त्यामुळे चुक किंवा काही तोटा म्हणजे ती गोष्ट शिकायची फी असे समजायचे. आणि शिकण्याला बंधन नसते. दुसरी गोष्ट ITC Fundamentally एकदम चांगला स्टॉक आहे आणि त्यावर कर्ज नाहीये. त्यामुळे स्टॉक बरोबर निवडला आहे पण हा खुप स्लो स्टॉक आहे.

तरीही.. आता तुमच्या प्रश्नाचे उत्तर सांगतो.
ITC चा चार्ट येथे देतोय ..

तुम्ही २२६ ला म्हणजे वरच्या लेवल ला असताना हा स्टॉक घेतला आहे. जर तुम्ही शॉर्ट टर्म साठी घेतला असता तर तुमचा निर्णय चुकीचा असता.
तुम्ही तो अंदाजे ८ फेब च्या आसपास तो स्टॉक घेतला आहे . तेंव्हा ITC ने २२ फेब ला ५ रुपये प्रती शेअर dividend declare केला होता आणी म्हणुन buyer वाढले होते.
त्या आठवड्या नंतर त्याने खालील ट्रेंड पकडला होता. तुमचे लाँग टर्म buying हे bottom ला झाले पाहिजे असे मला वाटते.
त्याच बरोबर तुम्ही त्याची हालचाल कुठल्या रेंज मध्ये आहे ते पण पाहिले पाहिजे, न्युज बेस कुठले ही शेअर कधीच घेवु नका.
आणि corporate action जवळा ही घ्यायचे नाही.

( या मुळे हे नक्की झाले की तुम्हाला बोलिंजर बँड कळतो आहे, आणि हे माझ्या साठी आनंदाची गोष्ट आहे )

अवांतर :
माझ्याकडे १५२ आणि २०० या प्रमाणे १७६ ला ITC लाँग टर्म साठी घेतलेला आहे.

तुषार काळभोर's picture

6 Apr 2021 - 6:45 pm | तुषार काळभोर

ITC फंडामेंटली मजबूत असल्याने पैसे होते तेव्हा जास्त वाट न बघता घेतले.
नंतर 200च्या जवळ अव्हेरेज करायच्या ऐवजी एकच नेसले घेतला. 16200.

आता आयटीसी 210 च्या आत यायची वाट बघतोय.
(आतापर्यंत सगळी गुंतवणूक - सगळे ब्लू चीप- हातात पैसे असले की लगेच केली आहे. बॉटम ची वाट न बघता. लाँग टर्म गुंतवणूक असल्याने काही % कमी होण्याची वाट बघितली नाही.)

वरच्या प्रतिसादात जे लिहिलं आहे, तो पश्र्चाताप नसून तुम्ही दोघांनी केलेल्या चर्चेला मी केलेल्या खरेदीशी ताडून बघितलं. कितपत समजलंय त्याचा अंदाज घेत होतो.

टेक्नीकल अ‍ॅनालिसिस शिकण्याचा प्रयत्न चालू आहे. चांगल्या माहितीबद्दल धन्यवाद मित्रा.
बरेचसे शब्द अनोळखी आहेत. कदाचित पुढच्या काही भागांत त्याबद्दल लिहिणार असशील. वाचतोय. :-)

सर लेखमाला खुपच सुन्दर आहे.

मी पण अन्दाजे ह्याच वेळेस (१ year आधी) share market मधे investment करायला सुरुवात केली.
माझ्या आज पर्यन्तच्या अनुभवानुसार खालील प्रमाणे काहीतरी वेगळे करायचा प्रयत्न केला.
१. chart : Combination of Ichimoku Clouds, Pivot Points
२. Fibonacci Series: १,२,३,५,८,१३,२१,३४,५५,८९,............
समजा: SBIN चे मी २१ स्टॉक घेतले आहेत.
Stock sell (for e.g., १३, ८, ५……… ह्या क्रमाने विक्री करतो) आणि stock purchase (for e.g. ३४, ५५,८९,… ह्या क्रमाने खरेदी करतो ).
३. Stock आपल्या ५२ वीक "हाय"च्या १०%/१५% कमी असेल तर खरेदी करायला सुरुवात करतो.
४. Stock आपल्या मागील "हाय"च्या १५% असेल तर विकायला करायला सुरुवात करतो.
खरेदी/विक्रीचे % आपण स्वता: decide करु शकता.

ह्याचा मला Profit book करते वेळी आणि average off ला फायदा झाला.

सध्या SBIN: प्रयोग करुन बघु शकता असे माझे वयक्तिक मत आहे.

गणेशा's picture

6 Apr 2021 - 9:36 pm | गणेशा

धन्यवाद..

सर नका म्हणु प्लीज.. गणेशा बस..
-----

१. chart : Combination of Ichimoku Clouds, Pivot Points
२. Fibonacci Series: १,२,३,५,८,१३,२१,३४,५५,८९,............

ह्या दोन्ही गोष्टी प्लीज समजावुन सांगा व्यवस्थीत..
Fibonacci Series मला शिकायची आहे खुप दिवसा पासुन पण अजुन मुहुर्त लागला नाही.
सेपरेट बहग लिहिल्यास ही छान वाटेल..

धन्यवाद, गणेशा! अतिशय उपयुक्त माहिती अतिशय सरळ सोप्या शब्दात मांडल्याबद्दल आभारी आहे. काही शंका आहेत पण त्या मला स्वतःलाच नीट मांडता येत नाहीयेत. जरा निवांत वेळ मिळाला की मांडायचा प्रयत्न करतो.

नक्कीच, त्या शंकामुळे माझा अभ्यास आणखिन वाढेल,
त्यामुळे नक्की विचारा

मराठी_माणूस's picture

7 Apr 2021 - 11:37 am | मराठी_माणूस

एक मुलभुत शंका.
कोणत्या शेअर चा टेक्निकल अ‍ॅनालिसिस करायचा तो शेअर कोणत्या निकषावर निवडायचा ?

गणेशा's picture

7 Apr 2021 - 2:35 pm | गणेशा

शंका बरोबर आहे..

कारण आपण fundamental धाग्यात पाहिले कि आपण share कसे निवडतो ते.
पण technical मध्ये आपण तसे कुठलेच उदाहरण दिले नाहीयेत..

Technical हे तुम्हाला price movement आणि इतर गोष्टीं दाखवत असल्याने
Price movement, volume,delivery percentage आणि अश्याच technical गोष्टींनी stock निवडायचे असतात..
त्याला तसे fundamental कुठले हि paramter fit होत नाही..
तरीही मी बऱ्यापैकी कर्ज नसलेल्या कंपनी आणि बऱ्यापैकी चांगले( fundamentaly )stocks technical अभ्यासाने short term साठी घेतो..
काही जण mid cap किंवा small cap मधले जास्त stock खरेदी करतात..

पण technical study नेच positional stocks निवडावेत

MipaPremiYogesh's picture

16 Apr 2021 - 5:54 pm | MipaPremiYogesh

उपयुक्त लेखमाला गणेश . मी पण जानेवारी पासून सुरु केले आहे शेअर मार्केट मध्ये पैसे ठेवणे. मला एक लक्षात आले कि कि खूप उशिरा सुरुवात केली , साधारण नोकरी लागली तेंव्हापासून लगेच सुरु करायला हवं होते ,असो देर आये दुरुस्त आये म्हणायचे . fundamental analysis जमायला लागले आहे आता technical analysis चा अभ्यास करतो. अजून एक प्रश्न शेअर मार्केट शिकण्या साठी काही कोर्सेस करावे का? असल्यास कोणाकडे शिकावे?
सध्या मी रोज १ तास Youtube च्या माध्यमातून शिकतो आहे आणि हि लेखमाला वाचत आहे.

MipaPremiYogesh's picture

16 Apr 2021 - 5:57 pm | MipaPremiYogesh

फोटो दिसत नाहीयेत. काय कारण असेल?

ज्ञान's picture

9 May 2021 - 2:06 pm | ज्ञान

Kirloskar ferro.
उद्या एक Nano cap share टाकेन.