शेअरमार्केट ची बाराखडी... भाग १ : Fundamental Analysis

Primary tabs

गणेशा's picture
गणेशा in अर्थजगत
29 Mar 2021 - 2:55 pm

आधिचे भाग -

भाग ० : Basics - By गणेशा
भाग ०.१: मार्जिन - By बिटाकाका
--------------------------------------------

प्रथमता आपण हे लक्षात घेऊ की Fundamental Analysis हे दिर्घकालीन गुंतवणुकीसाठी केले जाते.. म्हणजे फक्त Long term portfolio बनवण्यासाठी Fundamental Analysis चा उपयोग होतो. Short term shares साठी हे Analysis लागु पडत नाही.
आणि दुसरी गोष्ट, बर्याचदा आपण Fundamental Analysis हे खुप कठीण असते, किंवा त्यात पार Account /balance sheets वगैरे अवघड गोष्टी पहाव्या लागतात असे म्हणुन आपण या गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करतो पण तसे करणे चुकीचे आहे.
तर मी शक्य तितके सोप्पे करौन सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, माझे उदिष्ट्य हे तुम्हाला हे ज्ञान मिळणे हेच आहे, त्यामुळे आपण थोडे सोप्या पद्धतीने जावुयात, वाटल्यास आपल्याला थोडा वेळ लागला ( किंवा काही जास्त भाग लागले ) तरी चालेल..

Fundamental Analysis basics:

तर Fundamental Analysis मध्ये ढोबळ मानाने त्या कंपनीच्या खाली दिलेल्या तीनच गोष्टी पहावयाच्या असतात. त्यात उपप्रकार आहेत. पण मुळ या तीनच गोष्टी पाहतात. आणि सेबीच्या नियमानुसार कंपणीला त्यांच्या साईट्स वर ह्या गोष्टी सांगणे बंधनकारकच असते. त्यामुळे हा सर्व डेटा तुम्हाला त्या कंपणींच्या वेबसाईट्स वरती पहायला मिळतोच मिळतो.
या basics वरती पण मी जरा जास्त सांगतो, कारण basics गोष्टी निट कळाल्यास पुढे काही अवघड वाटणार नाही.

Fundamental Analysis :-
१. कंपनीचे balance sheet - थोडक्यात कंपणीचे Assets किती आहे आणि Liabilities (खर्च,देणे) कीती आहे याचा ताळेबंद.
२. कंपनीचे Profit & Loss Account
३. Ratios (हे पुढे आपण पाहणार आहोतच)

आता या गोष्टींचा आपण पुढे अभ्यास करणार आहोत.
त्या अगोदर balance sheet मध्ये - Liabilities मध्ये काय काय येते ते थोडक्यात पाहु.
तर Liabilities मध्ये येते- १. कंपनी Promoter चे पैसे ( equity capital ) २. Reserve fund ३. कंपनीवरती असणारे कर्ज (Debt).
तर Assets मध्ये येते - १. Building २. Machineries ३. Stocks & Inventory ४. Liquid Cash ५. Receivable cash ६. कंपणीचे Investment.

तसेच
Profit & Loss मध्ये खालील गोष्टी प्रामुक्याने नमुद केलेल्या असतात..
1. Revenue ( total sales) 2. Expenses 3. Operating Profit 4. Operating Profit margin (%) 5. Other Income from other sources 6. Interests on loan 7. Depreciation 8. Profit before Tax 9. Total Tax amount 10. Net Profit 11. Earning per share (EPS) 12. Given Dividend

ह्या सगळ्या टर्म पाहुन तुम्ही गोंधळुन गेला असेल तर तशी काही काळजी करण्याची आवश्यकता नाही. कारण Fundamental Analysis मध्ये आपण प्रामुख्याने Ratios पाहणार आहे, आणि त्या मध्ये वरील balance sheet आणि Profit & Loss वापरुन आपल्याला readymade Ratios बर्याच sites देतात, आपण त्या साठी screener.in हि site पाहु.
उदा. Profitability rations , liquidity ratios असे त्याचे काही टाइप्स असतात. मी जास्त येथे न सांगता आपण ते सरळ उदा. घेवुन पुढे पाहुच.

Fundamental Analysis Advance :

खरे तर व्यवस्थीत समजावुन सांगण्यासाठी theory माध्यम थोडे अवघड आहे, परंतु आपण एक कंपनी घेवुन वरती मी काय म्हणतो आहे ते आपण थोडक्यात पाहु.
आधी मी तुम्हाला थोडक्यात सगळे ratios आणि इतर पाहु, नंतर आपण ते हळु हळु मोजकेच पाहु..

चला तर , आपण TCS ह्या IT sector मधील कंपनीचा fundamental study example म्हणुन बघु :-

फोटो १.

या फोटोत दिसत असल्या नुसार आणि तुम्ही अधिक तुमचे ratios येथे अ‍ॅड करु शकता.
या फोटोत दिसत असलेल्या main गोष्टी मध्ये promoter holding , NPM, EPS, Profit , PE ,Debt, Sales growth ect दिसत आहे, ते चांगले आहे का हे पाहुन आपण हा share, Fundamentally चांगला आहे क ते ठरवतो.. आपण पुढे हेच पाहणार आहे.
त्या अगोदर काही फोटो देतो ..

फोटो २.comparison

बर्याचदा Long term stock पाहतना , आपण त्या सेक्टर मधील Top कंपनी किंवा Fast growing कंपणी पाहत असतो, त्या साठी हि comparison पाहणे योग्य ठरते, यामुळॅ आपल्याला आपण निवडलेला stock इतर stocks बरोबर पडताळुन पाहता येतो. जर इतर stock आपण निवडलेल्या stock पेक्षा चांगला असेल तर आपण त्या stock चा अभ्यास करुन तो निवडला पाहिजे. किंवा आपण हाच stock का निवडतोय हे आपल्याला नक्कीच ठळक पणे माहीत पाहिजे.

फोटो ३.Profit & Loss report

Profit & Loss report मध्ये तुम्ही त्यातवरती नमुद केलेल्या १२ घटकांचा Historical अभ्यास करु शकता, आणी त्यावरुन तुम्हाला हे कळते की कंपनी गेल्या वर्षांपासुन त्याच्या Net profit , Earning per share अश्या मध्ये growth करती आहे का? कशी growth आहे आणि इतर.
याच प्रमाणे तुम्ही Balance sheet चा अभ्यास करु शकता.

फोटो ४. Balance sheet

आता वरची सगळी माहीती तर मिळालीच आहे , पण ती माहीती आपल्या Analysis करावी लागते, आपली मते त्यानुसार बनवावे लागतात.
प्रत्येक व्यक्ती हे वेगवेगळ्या पद्धत्तीने विचार करते, सचिन तेंडुलकर ला शिकवणार्‍या आचरेकरांनी कित्येक लोकांना बॅटींग शिकवली असेल पण ते गुण आत्मसात करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते.. तसेच Analysis चे असते, तरीही Fundamental Analysis हे असलेल्या माहितीवरुन केले जात असल्याने सोप्पे आणि सरळ असते ते Technical analysis प्रमाणे व्यक्तीसापेक्ष कमी असते..

आता आपण हे आपल्याला वरती मिळालेल्या Fundamentals वरुन Analysis करुयात आणि हाच या लेखाचा सर्वात महत्वाचा गाभा आहे.
आपल्याला share market मध्ये येण्यास कितीतरी गोष्टी कारणीभुत असतात, पण अभ्यास कसा करावा आणि का करावा हे ज्याला कळाले तो कदाचीत लगेच यशस्वी होणार नाही, परंतु यश त्याच्याकडे नक्कीच येइल. ह्या संपुर्ण लेखाचे उद्धीष्ट्य हा असा अभ्यास करयचा हा नसुन, तुम्ही अभ्यास केला पाहिजे हा आहे, त्यामुळॅ आपण निवडक गोष्टी येथे पाहु.. बाकी राहिलेल्या गोष्टी तुम्हीच अभ्यास कराव्यात असे वाटते...

Analysis

Analysis करताना, मी स्वता growth , safety ,Earnings per share वाढते आहे का कायम, PE ration कमी आहे का? , promoter holding ५० % पेक्षा जास्त आहे का, capital जास्त आहे का ,cash flows व्यवस्थीत आहेत का हे पाहतो.
त्या अनुशंघाने आपण आता काही Analysis पाहुयात.

A. SAFTY

१. DEBT EQUITY RATIO

A high debt equity ratio is a bad sign for the safety of investment.
ज्या कंपनीच्या निव्वळ संपत्तीच्या तुलनेत जास्त कर्ज असते अशा कंपनीला आपल्या नफ्याचा एक मोठा भाग व्याज आणि मूळ रक्कम भरण्यात खर्च करावा लागतो.
जर काही कालावधीत कर्ज कमी होत असेल तर ते चांगले लक्षण आहे. उलटपक्षी, वाढते कर्ज हे एक वाईट चिन्ह आहे. ज्या कंपन्यांचे कर्ज इक्विटी प्रमाण ०.५ पेक्षा जास्त आहे त्यांना टाळले पाहिजे.

मुळ फोटो १ मध्ये पण आपल्याला हा debt चा आकडा दिसतो. १.० debt म्हणजे जेव्हडी equity तेव्हडेच कर्ज. काही कंपनींवरती तर खुप सारे कर्ज असते, अश्या कारणांमुळेच अशोक लेलँड सारख्या चांगल्या कंपन्यांना मी घेतले नाही. कारण माझ्या साठी कर्ज नसलेल्या कंपनी महत्वाच्या आहेत.
Banking and NBFC हे मात्र या नियमाला अपवाद आहेत, कारण त्यांचे कामच एका ठिकानाहुन कर्ज घेवुन दुसर्याला जास्त कर्ज देणे आहे.

२.CURRENT RATIO

Current Ratio = Current Assets / Current Liabilities

This ratio denotes the operating financial health of the company.

कंपनीने त्वरित liabilities करण्यायोग्य मालमत्तेसह त्वरित देय देण्याची क्षमता यात मोजली जाते with Current Assets यात येते सध्याच्या मालमत्तांमध्ये रोख रक्कम, अल्प मुदतीची गुंतवणूक, प्राप्य वस्तू, यादी इ.

सध्याचे current ratio of 2 आदर्श मानले जाते. ज्या कंपन्यांचे current ratio प्रमाण 1 पेक्षा कमी आहे त्यांना टाळावे.

३. INCOME VS OPERATING CASHFLOW

Operating Cash Flow = EBIT (Earnings Before Interest & Tax ) + Depreciation & Amortization – Changes in Working Capital

For an ideal company, the operating cash flow हा सामान्यत: निव्वळ उत्पन्नापेक्षा जास्त असेल आणि शक्यतो तो उत्पनवाढी बरोबर समांतर पण असेल. म्हणजे उत्त्पन्न वाढतेय तसे operating cash flow सुद्धा वाढतो अहे असे.

जर तो समांतर नसेल आणि त्यात huge deviation असेल तर कंपनीमध्ये काही तरी गडबड आहे हे समजावे.

B. GROWTH

१. REVENUE

An increasing revenue हा एक चांगल्या कंपनीची खूण असते. या उलट decreasing revenue ची कंपनी आपण दुर्लक्षीत करावी.

२. NET PROFIT VS EPS GRAPH

Along with the revenue, the profit of the company should also grow ज्या कंपनीचा नफा स्थिर किंवा कमी होत असेल तो टाळला पाहिजे.
A company whose profit is stagnant or decreasing should be avoided.

EPS = Net Profit/Number of Shares.
Ideally both should follow the same growth pattern, unless the company has diluted its equity.

C. PERFORMANCE

१. RETURN ON EQUITY ( RoE)

Return on Equity म्हणजे कंपनीच्या निव्वळ किंमतीच्या बाबतीत नफा किती मिळतो याचे मोजमाप
RoE ज्या कंपनीची जास्त ती जास्त वेगात वाढु शकते
It is advisable to target companies that have RoE greater than 15%.

२. FREE CASH FLOW

Free Cash Flow= Cash flow from operations – Investment in operating Capital

Free Cash Flow हा कंपणीच्या विस्तारात मुख्य भुमिका निभावतो. उदा नवीन मशीनरी खरेदी, नविन गुन्तवनुक वगैरे
A consistently negative FCF म्हणजे सध्य स्तिथीत कंपनी आताच आपल्या operating गरजा पुर्ण करु शकत नाही, अश्या कंपन्यांना लांब ठेवावे.

अश्या पध्दतीने कित्येक सारे parameterआणि ratios पाहुन कंपनी फंडामेंटल कसे आहे हे आपण ठरवु शकतो. येथे आपण थोड्याच गोष्टी पाहिल्या असल्या तरी तय जास्त महत्वाच्या होत्या.. त्याच बरोबर PE ratio कमी होत जाताना आणि EPS वाढ होताना आपण भविष्यात या कंपनीच्या Shares ची किंमत अंदाजे किती जावु शकते हे आपण वर्तवु शकतो..
आता लिहुन लिहुन खुप कंटाळा आल्याने थांबतो. अभ्यासासाठी शुभेच्छा...

- गणेशा
(Owner, GPA Finance Consultancy)

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

29 Mar 2021 - 6:34 pm | मुक्त विहारि

काही गोष्टी समजल्या...

अतिशय सुंदर, माहितीपूर्ण लेख. अतिशय व्यवस्थित मांडणीसाठी आपले अभिनंदन आणि आभार! वाचनखूण साठवून ठेवण्यासारखा लेख!

श्रीगुरुजी's picture

29 Mar 2021 - 9:59 pm | श्रीगुरुजी

उत्तम माहिती! वाचनखूण साठविली आहे.

अमर विश्वास's picture

29 Mar 2021 - 10:51 pm | अमर विश्वास

अप्रतिम लेख गणेशाभाऊ ....
माझ्या जुन्या नोट्स आठवल्या ... त्यावेळी तुमची ही लेखमाला आली असती तर माझे शिकण्याचे खूप कष्ट वाचले असते ...
पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत ...

एकच गोष्ट ऍड करावीशी वाटते ...

जर शेअर्स "इन्व्हेस्टमेंट" म्हणून घेणार असाल तर .. (एक वर्षाहून (खरतर तीन ) अधिक काळ होल्ड करणे याला मी इन्व्हेस्टमेंट म्हणतो )
प्रथम Sector Analysis पहाणे महत्वाचे ठरते
उदाहरणार्थ
https://www.moneycontrol.com/stocks/marketstats/sector-scan/bse/year-to-...
ही लिंक बघा ... सॉफ्टवेअर / फायनान्स / इन्शुरन्स हे सेक्टर्स उत्तम परफॉर्म करत आहेत.

तसेच सेक्टरल गव्हर्नमेंट पॉलिसी पहाणे पण महत्वाचे ...

एकदा सेक्टर्स शॉर्टलिस्ट केले कि मग त्या सेक्टर मधल्या कुठल्या कंपनीचे शेअर्स घ्यायचे ते गणेशभाऊंनी वर दिलेच आहे ...
सेक्टोरल ग्रोथ बद्दल लिहीन वेळ मिळेल तसे ...

Happy Investing

गणेशा's picture

29 Mar 2021 - 11:24 pm | गणेशा

धन्यवाद.

तुम्ही दिलेली लिंक मला माहित नव्हती.. मस्त आहे.

तरीही या भागात मी sector selection सांगितले नाही कारण मागच्या बेसिक भागात मी ते सांगितले होते म्हणुन या भागात कदाचीत तो भाग आला नाही.

पण अश्या लिंक वरून sector पाहतात हे मला माहीती नव्हते.
मी व्यवहार ज्ञानाने
IT / finanace / fmcg / telecom /amc / digital cards/ pharma/material- chemical

हे sector निवडून मग कंपनी निवडलेल्या आहेत.
त्या नंतर hdfc life हि इन्शुरन्स कंपनी मी add करन्याच्या विचारात आहे, या कंपनी ने मला short term पण फायदा दिला आहे खुप.
Fundamental अजून केले नाही या कंपनीचे..
तसेच tyre मध्ये apollo tyre, cement मधील काही shares मी कायम short term साठी वापरतो. ते जणू काही long term सारखेच माझ्याकडे थोड्या थोड्या काळा साठी कायम असतात. Profit book करून खाली गेले कि घेतो पुन्हा.

Total १५ shares करायचेत मला ५ -८ वर्षा साठी.
परंतु अजून एक वर्षात फक्त १०-१२ shares आहेत माझ्याकडे long term साठी.

सेक्टोरल ग्रोथ बद्दल एक धागा येऊद्या.
कारण steel, auto, defense, agri, power psu हे sector माझे तितके अभ्यास न केलेले आहेत.

Power sector मधील चांगलाfundamental share च्या मी शोधात आहे.

आणि इतक्यात तरी, मी शेयर मध्ये, गुंतवणूक करणार नाही...

पण, कौटिल्याच्या अर्थशास्त्रा नुसार, काही गोष्टीचा अंदाज घेऊ शकतो...

1. अन्न, वस्त्र, निवारा आणि वैद्यकीय सेवा मुलभूत गोष्टी. त्यामुळे इथली गुंतवणूक Long टर्म

2. दळणवळण, ही Medium Term

3. मौजमजा आणि घरगुती उपकरणे, ही Short Term

4. इतर सटरफटर पण, उपयोगी
-----------
ह्या त्रिसुत्री वर जर गुंतवणूक केली असती तर ....

1. अन्न .... स्वतःची शेत जमीन,
कीटकनाशके .... Dow
खते ..... Gujrat Fertilizers आणि इतर कंपन्या

2. वस्त्र.... रेमंडस्, पीटर इंग्लंड, लुई फिलीप, रिलायन्स

3. निवारा ... मुख्यतः, सीमेंट आणि लोखंड आणि टाइल्स

सिमेंट ... सगळ्यात जास्त कुठले खपते ते, कारण सिमेंट मध्ये कमीशन जोरदार असणार, लोकल मार्केट कमीशन बेसीसवर चालते..
ACC, अंबूजा

लोखंड.... टाटाला पर्याय नाही आणि मित्तल

टाइल्स.... जाॅन्सन

वीज ... अदानी, टाटा

वैद्यकीय सेवा ... ल्युपिन, रेडीज, बायर, फायझर, (कासव छाप मच्छर अगरबत्ती... ही कंपनी, पोस्टापेक्षा जास्त व्याज नक्कीच देत असेल, असा अंदाज आहे...)
--------
2. दळणवळण

अ, मोटरसाइकिल ... हीरो, बजाज,
ब, कार ... मारूती, टाटा, महिंद्रा, Hyundai
क, इंधन ... अरामको, HPCL,BPCL, IOC, ONGC
ड, वायरलेस दळणवळण ... Relience, Tata
इ, माहिती आणि तंत्रज्ञान, अझीम प्रेमजी, टाटा, मुर्ती, कॅनबे
फ, आर्थिक व्यवसाय... HDFC, SBI,

3. मौजमजा आणि घरगुती उपकरणे, सॅमसंग, LG, Godrej

4. सटरफटर..... पेट्रोकेमिकल आधारित, ABB, SIEMENS,
---------------

वरील माहिती, ही फक्त अंदाजपंचे आखलेली आहे...माझी एका नव्या पैशाची देखील, शेयरमध्ये गुंतवणूक नाही.

प्रचेतस's picture

30 Mar 2021 - 8:21 am | प्रचेतस

उत्कृष्ट लेख.
साध्या सोप्या शब्दात उत्तम माहिती दिली आहेस. जियो.

वामन देशमुख's picture

30 Mar 2021 - 9:21 am | वामन देशमुख

'
गणेशा, बिटाकाका तसेच या मालिकेतील धाग्यांवरचे प्रतिसादक,

स्टॉक मार्केटची माहिती खूप चांगल्या प्रकारे मिळतेय. मी या उद्योगात नाही पण माझे जे मित्र या उद्योगात आहेत आणि मिपावर नाहीत त्यांना लिंका पाठविल्या आहेत + पाठवीत राहीन.

लिहीत राहा, कदाचित माझ्यासारख्या मार्केट-उदासीन लोकांना या उद्योगात शिरण्याची प्रेरणा मिळेल!

- उद्योगी वामन

'

उत्तम लिहीत आहेस.उपयुक्त संकलन,मांडणी, प्रतिसाद.. मस्त

चंद्रसूर्यकुमार's picture

30 Mar 2021 - 9:53 am | चंद्रसूर्यकुमार

उत्तम लेख. वाचत आहे.

फंडामेंटल अ‍ॅनॅलिसिस करताना आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. आणि ती म्हणजे बॅलन्स शीट, इनकम स्टेटमेंट वगैरे इतिहास असतो आणि शेअरची किंमत भविष्यात त्या कंपनीची असलेली नफा मिळवायची क्षमता यावर अवलंबून असते. गेली काही वर्षे वेगवेगळी गुणोत्तरे उत्तम असली तरी भविष्यात तसे होईलच असे नाही. त्यामुळे फंडामेंटल अ‍ॅनॅलिसिस करताना अकाऊंटिंग स्टेटमेन्ट्सबरोबरच संबंधित क्षेत्रात काय चालू आहे याचा अभ्यासही करणे गरजेचे असते. कारण कोणत्याही कंपनीच्या नफा मिळवायच्या क्षमतेवर परिणाम घडविणारे अक्षरशः शेकडो घटक असतात. उदाहरणार्थ सरकारी धोरणे आणि कर हा महत्वाचा घटक असतो. समजा जी.एस.टी प्रमाणे कर बदलले तर नक्कीच किती नफा कंपनी मिळवू शकेल यावर परिणाम होतो. तसेच या कंपनीचे ग्राहक कोण आहेत, कंपनीची उत्पादने नक्की कुठे विकली जातात, त्या बाजारपेठांमध्ये काय चालले आहे हे बघणे पण अत्यावश्यक असते. १९९५ पासून डिसेंबर २०१७ पर्यंत मदरसन सुमी या शेअरने अक्षरशः २५०-३०० पटींनी रिटर्न दिले होते. डिव्हिडंड येईल तो वेगळाच. पण ही कंपनी गाड्यांसाठी लागणारे सुटे भाग बनवत असल्याने वाहन क्षेत्रामध्ये २०१८ पासून मंदी आल्यामुळे या शेअरच्या किंमतीवर किती परिणाम झाला हे बघायला मिळेलच. २०२० पासून हा शेअर जरा सावरला आहे. ल्युपिन, सिप्ला वगैरे फार्मा कंपन्यांना एखाद्या औषधासाठी अमेरिकन एफ.डी.ए कडून मान्यता मिळाली की नाही यावरही बरेच काही अवलंबून असते. सप्टेंबर २०१६ मध्ये जिओ हे वादळ आले आणि भारतीय टेलिकॉम क्षेत्रात मोठी उलथापालथ त्याने केली. आयडीयाच्या शेअरचे काय झाले यावरून ते समजेल. आयडियाची या वादळात वाट लागली पण भारती एअरटेलची दुर्गती झाली नाही याचे कारण भारती आफ्रिकन देशांमध्येही आहे त्यामुळे तिथून भारतीला उत्पन्नाचा (आणि नफ्याचा) स्त्रोत होता. एखादी कंपनी (उदा. आयटी) निर्यात करत असेल तर त्या देशातील धोरण (उदाहरणार्थ ट्रम्पतात्या आणि बायडननाना यांच्या धोरणांत या बाबतीत फरक आहे), डॉलरच्या दरात काय आणि कसे चढउतार होतील आणि त्यातून भविष्यात कंपनीच्या नफा मिळवायच्या क्षमतेवर किती आणि कसा परिणाम होईल हे पण बघावे लागते. तेव्हा सांगायचा मुद्दा हा की कंपनीचा फंडामेंटल अ‍ॅनॅलिसिस करताना अकाऊंटिंग स्टेटमेन्ट्सबरोबर या सगळ्या गोष्टी पण लक्षात घ्याव्या लागतात.

मी 'बी-स्कूल ग्रॅड' असल्याने स्वतःला 'लै शाना' समजून सुरवातीला मी फक्त फंडामेंटल अ‍ॅनॅलिसिस करत असे. पण नंतर लक्षात आले की इतक्या अनेकविध घटकांचा अभ्यास करून मग एखाद्या शेअरविषयी 'व्ह्यू' बनविणे हे माझ्यासारख्या एकट्या माणसाच्या क्षमतेपलीकडचे असते. आणि अनेकदा (नव्हे जवळपास प्रत्येकवेळी) बातमी एखाद्या वर्तमानपत्रात छापून येण्यापूर्वी मोठ्या वित्तीयसंस्थांना आधीच माहित झालेली असते आणि त्यामुळे ती बातमी आपल्यापर्यंत पोचेपर्यंत त्या बातमीचा वापर करून नफा कमावायची क्षमता बर्‍यापैकी कमी झालेली असते.

त्यामुळे मी पूर्णपणे टेक्निकल अ‍ॅनॅलिसिसकडे वळलो. टी.ए वरील लेखांची वाट बघत आहे.

बेकार तरुण's picture

30 Mar 2021 - 11:35 am | बेकार तरुण

छान लेख आणी उत्तम प्रतिसाद....

त्यामुळे मी पूर्णपणे टेक्निकल अ‍ॅनॅलिसिसकडे वळलो. टी.ए वरील लेखांची वाट बघत आहे. >>> तुम्हीच मनावर घ्या...

त्यामुळे ती बातमी आपल्यापर्यंत पोचेपर्यंत त्या बातमीचा वापर करून नफा कमावायची क्षमता बर्‍यापैकी कमी झालेली असते. >>> हे मोठ्या कंपन्याच्या बाबतीत होत का जास्ती करुन स्मॉल अन मिड कॅपच्या बाबतीत?

चंद्रसूर्यकुमार's picture

30 Mar 2021 - 1:08 pm | चंद्रसूर्यकुमार

हे मोठ्या कंपन्याच्या बाबतीत होत का जास्ती करुन स्मॉल अन मिड कॅपच्या बाबतीत?

हे स्मॉल आणि मिड कॅपच्या बाबतीत जास्त होते. रिलायन्स, टी.सी.एस सारख्या काही लाख कोटी मार्केट कॅपिटलायझेशन असलेल्या कंपन्यांच्या शेअरच्या किंमतीवर असा परिणाम करता येणे अगदी मोठ्या वित्तीयसंस्थांच्या आवाक्यात असेल ही शक्यता कमी.

स्मॉल कॅप कंपन्यांच्या बाबतीत हे व्हायची शक्यता जास्त याविषयी माझ्या ओळखीच्याचा (अगदी मित्र नाही पण ओळखीचा) एक अनुभव आहे. तो XLRI जमशेदपूर मधून MBA झाला आहे. त्याला तिथे एका कोर्समध्ये मिळालेल्या असाईनमेंटमध्ये कोणत्याही कंपनीचा पूर्ण अभ्यास करून ती आपल्याला विकत घ्यायची असेल तर प्रति शेअर किती किंमत द्यावी हे ठरवायचे. अर्थात कंपनीचा सगळाच अभ्यास करायचा होता म्हणजे industry study, competitor analysis, SWOT analysis वगैरे सगळे आले. ही ग्रुप असाईनमेंट होती आणि प्रत्येक ग्रुपमध्ये पाच विद्यार्थी होते. प्रोफेसर नवीन होता आणि बराच उत्साह त्याला होता म्हणून त्याने सगळ्या ग्रुपची प्रेझेंटेशन झाल्यावर हे सगळे ग्रुप रिपोर्ट त्याच्या वेबपेजवर पोस्ट केले होते. सगळ्या ग्रुपनी आपापली एक काल्पनिक कंपनी स्थापन करून आपापल्या कंपन्यांचे नाव घेऊन ते रिपोर्टमध्ये लिहिले होते.

माझ्या ओळखीच्याच्या ग्रुपने अहमदाबादमधील एक लहान फार्मा कंपनी acquire करणार असा रिपोर्ट बनविला. आणि त्यांनी दिलेली किंमत शेअरच्या मार्केटमधील किमतीपेक्षा कमी होती. मनीकंट्रोलवरील एका अतीउत्साही वार्ताहाराला त्या फार्मा कंपनीच्या नावाने गुगल सर्च केल्यावर XLRI च्या वेबसाईटवर हा रिपोर्ट मिळाला. झालं. सबसे पेहले सबसे तेज होण्यासाठी त्याने मनीकंट्रोलवर बातमी टाकली की जमशेदपूरमधील एक कंपनी या अहमदाबाद मधील फार्मा कंपनी शेअरच्या सध्याच्या किमतीपेक्षा कमी भावात विकत घेणार.

अहमदाबादची ही कंपनी लहान स्मॉल cap होती. कोणालाही माहीत नसलेली, कधी नाव न ऐकलेली जमशेदपूरमधील कोणतीतरी कंपनी या कंपनीला स्वस्तात घेणार म्हटल्यावर शेअरचा भाव धडाधड खाली आला. कंपनीच्या मॅनेजमेंटला समजायला मार्ग नव्हता की नक्की काय झाले म्हणून शेअर इतका आपटला. शेवटी झाला प्रकार लक्षात आल्यावर कंपनीच्या मॅनेजमेंटने आपल्या कंपनीला कोणीही acquire करणार नाही असे स्पष्टीकरण दिले आणि मगच शेअर सावरला.

इतर ग्रुपनी रिलायन्स, मायक्रोसॉफ्ट वगैरे acquire करणार असेही रिपोर्ट दिले होते. अर्थातच त्यांच्या शेअर किंमतीवर अजिबात परिणाम झाला नाही. ही अहमदाबादची कंपनी small cap असल्याने त्या शेअरवर इतका परिणाम झाला. सबसे पेहले सबसे तेजच्या नादात असे होते.

गणेशा's picture

30 Mar 2021 - 2:05 pm | गणेशा

क्लिंटन जी,
प्रथमता प्रतिसादा बद्दल धन्यवाद. तुमच्या बिझीनेस क्षेत्रातील डीग्री, ज्ञान आणि अनुभव भारी आहे, त्यामुळे तुमच्या प्रतिसादाला जास्त महत्व आहे.उलट तुम्ही वेळोवेळी तुमचे knowledge येथे दिल्यास त्या सारखी चांगली गोष्ट नक्कीच दूसरी कोणती नाही..

त्यामुळे फंडामेंटल अ‍ॅनॅलिसिस करताना अकाऊंटिंग स्टेटमेन्ट्सबरोबरच संबंधित क्षेत्रात काय चालू आहे याचा अभ्यासही करणे गरजेचे असते. कारण कोणत्याही कंपनीच्या नफा मिळवायच्या क्षमतेवर परिणाम घडविणारे अक्षरशः शेकडो घटक असतात.

बरोबर .. हे महत्वाचे आहे. परंतु इतका क्लिष्ट अभ्यास करताना माणुस कधी कधी हे सगळे नको म्हणतो म्हणुन माझ्या मुळ लेखात ह्या बर्याच गोष्टी मी include केल्या नाहीत.कारण debt,brand, holding,free cash flow या गोष्टी , इतर सर्व गोष्टींबरोबर बदलतात, त्यामुळे फोकस या वर ठेवला होता.

सरकारी कर आणि धोरणे कायम अल्कहोल कंपणी बद्दल बदलतात आणि बर्याचदा ते जास्त असतात, त्यामुळे तो सेक्टर मी कधीच अभ्यासला नाही.. आणि तुम्ही म्हणता आहात ते येथे जास्त लागु पडते आहे

अनेकदा (नव्हे जवळपास प्रत्येकवेळी) बातमी एखाद्या वर्तमानपत्रात छापून येण्यापूर्वी मोठ्या वित्तीयसंस्थांना आधीच माहित झालेली असते आणि त्यामुळे ती बातमी आपल्यापर्यंत पोचेपर्यंत त्या बातमीचा वापर करून नफा कमावायची क्षमता बर्‍यापैकी कमी झालेली असते.

नाही,
आपण जर long term बद्दल बोलत असु तर जवळील काळातील नफा तोटा यांचा विचार न केलेला जास्त उत्तम. नाही तर आपण कधीच long term portfolio ला न्याय देवु शकणार नाही. आणी long term Investment म्हणजे एकदाच शेअर खाली आल्यावर Investment करुन सोडुन न देता, त्यात कायम systematic Investment करत राहणे होय. म्हणजे तुम्ही Mutual Fund प्रमाणे म्हणु शकता.

मी पूर्णपणे टेक्निकल अ‍ॅनॅलिसिसकडे वळलो. टी.ए वरील लेखांची वाट बघत आहे.

मी ते लेख लवकर लिहिन, पण माझी तुम्हाला कायम विनंती राहिल की त्यातील काही लेख तुम्ही लिहिल्यास जास्त योग्य राहिल, तुम्ही जास्त न्याय देवु शकताल त्या लेखांना, आणी ज्ञान मिळवणे हाच शुद्ध हेतु असल्याने ते जास्त योग्य हि राहिल..

तरीही

त्यामुळे फंडामेंटल अ‍ॅनॅलिसिस करताना अकाऊंटिंग स्टेटमेन्ट्सबरोबरच संबंधित क्षेत्रात काय चालू आहे याचा अभ्यासही करणे गरजेचे असते. कारण कोणत्याही कंपनीच्या नफा मिळवायच्या क्षमतेवर परिणाम घडविणारे अक्षरशः शेकडो घटक असतात.

यावर खाली separate प्रतिसादा मध्ये scoring system सांगतो मी केलेली

चंद्रसूर्यकुमार's picture

30 Mar 2021 - 3:56 pm | चंद्रसूर्यकुमार

आपण जर long term बद्दल बोलत असु तर जवळील काळातील नफा तोटा यांचा विचार न केलेला जास्त उत्तम. नाही तर आपण कधीच long term portfolio ला न्याय देवु शकणार नाही. आणी long term Investment म्हणजे एकदाच शेअर खाली आल्यावर Investment करुन सोडुन न देता, त्यात कायम systematic Investment करत राहणे होय.

हो बरोबर. पण हे करतानाही कुठेतरी चार्ट रिडींग करायला हवे असे मला तरी वाटते. अर्थात शेअरमार्केटमध्ये जितके लोक तितक्या वेगवेगळ्या ट्रेडींग्/इन्व्हेस्टींग स्टाईल्स आहेत त्यामुळे कोणतीच एक पध्दत १००% बरोबर किंवा १००% चूक असू शकत नाही. तरीही सांगायचा मुद्दा म्हणजे २००८ च्या सुमारास सुझलॉन, जेपी असोसिएट्स वगैरे शेअर्सना सुगीचे दिवस होते. पण २०११ पासून त्या दोन शेअर्सनी राम म्हणायला सुरवात केली त्यात आजही फार फरक नाही. २००८ मध्ये सुझलॉन ४०० पेक्षा जास्तला विकला जात होता तोच आज ५-५.५० या रेंजमध्ये आहे. तेव्हा २०२१ मध्ये सुझलॉनचे हजारो शेअर्स असतील तरी त्यांचा काही उपयोग नाही. त्यापेक्षा इतकी वर्षे सुझलॉनमध्ये अ‍ॅव्हरेजींग करायला वापरलेले पैसे अपट्रेंडमधील शेअर विकत घ्यायला वापरले असते तर ते नक्कीच जास्त चांगले झाले असते. तेव्हा शेअर खाली आला म्हणून विकत घेणे सोडायचे नाही हे बरोबर. पण असा शेअर एच.डी.एफ.सी बँक किंवा तत्सम असावा, सुझलॉन-जेपी नको.

चंद्रसूर्यकुमार's picture

31 Mar 2021 - 10:19 am | चंद्रसूर्यकुमार

सरकारी कर आणि धोरणे कायम अल्कहोल कंपणी बद्दल बदलतात आणि बर्याचदा ते जास्त असतात, त्यामुळे तो सेक्टर मी कधीच अभ्यासला नाही.. आणि तुम्ही म्हणता आहात ते येथे जास्त लागु पडते आहे

कर हा सरकारी धोरणांचा एक भाग झाला पण करांव्यतिरिक्त सरकारी धोरणांमध्ये बरेच काही असते. आता विमा क्षेत्रात ४९% वरून ७४% वर एफ.डी.आय ला परवानगी देण्यात आली आहे. ते पण एक सरकारी धोरणच आहे. पेट्रोल-डिझेलचे भाव सरकारी नियंत्रणाबाहेर नेणे, वीज डिस्ट्रीब्युशन कंपन्यांमध्ये स्पर्धा आणणे वगैरे पण सरकारी धोरणेच आहेत. मनमोहन पंतप्रधान असताना त्यांच्या सरकारच्या धोरणांमुळे वीज निर्मिती क्षेत्राचा मोठा खेळखंडोबा झाला होता. आधी नवा वीजप्रकल्प उभारायला परवानगी द्यायची पण नंतर पर्यावरणविषयक क्लिअरेन्स महिनेमहिने-वर्ष वर्ष द्यायचे नाहीत (हे उलटे करायला काय हरकत होती कोणास ठाऊक- म्हणजे पर्यावरणविषयक सगळे काही क्लिअर असेल तरच बांधकाम सुरू करायला परवानगी द्यायची), प्रकल्प पूर्ण होत आला तरी प्रकल्पासाठी कोळसा कुठून येणार याचा पत्ता नाही वगैरे. आताही जिओच्या बाबतीत कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया, टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथोरीटी ऑफ इंडिया वगैरेंनी नरो वा कुंजरो वा अशा पध्दतीची भूमिका घेतली होती. यातून होते असे की तो प्रश्न फक्त त्या क्षेत्रापुरता मर्यादित राहात नाही तर तो बँकिंगमध्येही जातो कारण एन.पी.ए तयार होतात. तेव्हा सांगायचा उद्देश हा की सरकारी धोरणांचा सगळ्याच क्षेत्रांवर परिणाम होतो- फक्त अल्कोहोल नाही.

तुम्ही म्हणताय ते १००% अतिशय बरोबर आहे.
प्रत्येक गोष्ट एकमेकांशी निगडित होत जाते..आणि त्याचे effect अनेक वेगवगेळ्या ठिकाणी पाहायला मिळतात..

--
एन. पी. ए. मुळे बँकिंग sector चे नुकसान होतेच, शिवाय बँका तर आता त्यांच्या नफ्याचा काही भाग या एन. पी. ए. साठी राखून ठेवू लागल्यात, त्यामुळे मिळणाऱ्या नफ्या चा फायदा तितक्या प्रमाणात भागधारकाला होत नाही. आणि हि रक्कम analysis करताना आधी विचारात धरली जात नसे..उदा. मागील Bob चा result.. फायदा असला तरी अशी रक्कम side ला काढल्यामुळे net profit कमी झालेले होते..

याव्यतिरिक्त, मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे होते, बँकिंग चा विषय आला आहे तर येथेच विचारतो.माणुस अभ्यास करताना त्याचे सगळ्या क्षेत्रात ज्ञान असतेच असे नाही.. वेगवगेळ्या क्षेत्रासाठी खुप प्रश्न उभे असतात त्यामुळे या क्षेत्रासाठीचे काही प्रश्न मला पडलेले होते, भले मी त्यामुळे hdfc आणि hdfc amc सोडून मी इतर ठिकाणी लांबची गुंतवणूक टाळली,

प्रश्न

आपल्याला yes बँकेचे उदाहरण चांगलेच माहिती आहे..
मला विचारायचे आहे, त्या बँकेला पुन्हा उभारी घेण्यासाठी ज्या संस्था पुढे आल्या, त्यांना त्यांच्या मनात तसे असो वा नसो, पैसे गुंतवण्यास सरकार भाग पाडू शकते का?
कि भविष्यातील फायदा म्हणुन ते गुंतवणूक करतात...गुंतवणूक करण्यासाठी काही criteria वर त्यांना select केले जाते कि तसे नसते.

Mutual fund managers ना हाताला धरून सरकार किंवा कोणी हि त्यांना हवे त्या ठिकाणी पैसे गुंतवायला भाग पाडू शकते का?

Yes bank हि चांगल्या बँकेत गणली जाते,
पण उद्या रूपी किंवा तत्सम बँकेच्या बाबतीत पण असे केले जावू शकते का?
एक ठेवीदार किंवा भागधारक म्हणुन त्या संचालकांवर खटले चालले काय किंवा अटक झाली काय नफ्याच्या किंवा ठेवीच्या स्वरूपात त्यांना ठोस काहीच मिळत नाही..

आताच लक्ष्मी विलास बँकेचे पण उदाहरण आहेच, भागीदारांचे सगळे पैसे शून्य झाले जरी ती bank foreign बँकेला विकली गेली..मान्य आहे ठेवीदार कि भागीदारक यात निर्णय घेताना ठेवीदारांचा विचार तरी झाला, नुकसान होणारच आहे, पण असे काही कायदे नाहीयेत का कि सर्वांचे हित त्यात जपले जावू शकतील?

चंद्रसूर्यकुमार's picture

31 Mar 2021 - 8:37 pm | चंद्रसूर्यकुमार

हि रक्कम analysis करताना आधी विचारात धरली जात नसे..उदा. मागील Bob चा result.. फायदा असला तरी अशी रक्कम side ला काढल्यामुळे net profit कमी झालेले होते..

प्रोव्हिजनिंगची रक्कम आधी विचारात धरली जात नसे म्हणजे? एन.पी.ए साठी रिझर्व्ह बँकेच्या नियमांप्रमाणे प्रोव्हिजनिंग करणे आणि नफ्यातून ती रक्कम कमी करणे हे नेहमीच केले जाते. कोणी सी.ए ही चर्चा वाचत असतील तर त्यांनी याविषयी लिहिले तर चांगले होईल.

मला विचारायचे आहे, त्या बँकेला पुन्हा उभारी घेण्यासाठी ज्या संस्था पुढे आल्या, त्यांना त्यांच्या मनात तसे असो वा नसो, पैसे गुंतवण्यास सरकार भाग पाडू शकते का?

बर्‍याचदा मोठ्या वित्तीय संस्था बुडल्या तर त्याबरोबर अर्थव्यवस्थेचे नुकसान होते आणि असे नुकसान झाल्यास त्याचा त्रास सगळ्यांनाच होऊ शकेल. या प्रकाराला too big to fail असे म्हणतात. त्यामुळे अनेकदा अशा इतर वित्तीय संस्था येस बँकेसारख्या बुडायला आलेल्या संस्थेला वाचवायला येतात. यात सरकारकडून सक्ती किती होते याची कल्पना नाही पण सरकार/ रिझर्व्ह बँक इत्यादींच्या पुढाकाराने हे होते हे नक्की. अमेरिकेत १९९८ मध्ये एल.टी.सी.एम म्हणून अशी मोठी वित्तीय संस्था बुडायला आली होती तेव्हा सरकारने पुढाकार घेऊन काही संस्था आणि वॉरन बफे यांच्याकडून एल.टी.सी.एम ला टेकू द्यायला सांगितले होते. फायनान्सच्या जगतात सगळे रिस्क आणि रिटर्न भोवती फिरत असते. जर एखाद्या संस्थेत गुंतवणुक खूप स्वस्तात करायला मिळाली (म्हणजे अपेक्षित रिटर्न जास्त असतील) आणि रिस्क त्या तुलनेत कमी असेल तर इतर संस्था अशाप्रकारे गुंतवणुक करायला तयार होतात. अशावेळी गुंतवणुक करणार्‍या संस्था आपल्या काही अटी घालतात त्यात ज्या मॅनेजमेंटने ती संस्था बुडेपर्यंत आणली त्या मॅनेजमेंटला हाकलणे वगैरे अटी असतात. त्याप्रमाणे १९९८ मध्ये एल.टी.सी.एम मध्ये जॉन मेरीवेदर म्हणून सी.ई.ओ होता त्याला जावे लागले आणि वॉरन बफे, बँक ऑफ अमेरिका वगैरेंनी मॅनेजमेंट आपल्या ताब्यात घेतली. येस बँकेतही गुंतवणुक करणार्‍यांमध्ये स्टेट बँक वगैरेंबरोबर डी-मार्टचे राधाकृष्ण दमानी पण होते. या सगळ्यांना येस बँकेचे शेअर खूप स्वस्तात मिळाले आणि मॅनेजमेंटवर नियंत्रण आणून जर बँकेची तब्येत सुधारता आली तर भरपूर रिटर्न मिळवून बाहेर पडायचे असा अशा गुंतवणुकदारांचा प्लॅन असतो. तेव्हा सगळे काही रिस्क आणि अपेक्षित रिटर्न या दोन गोष्टींभोवती फिरत असते. आजच बातमी वाचली की येस बँक परत एकदा निफ्टी-५० चा भाग होणार आहे. म्हणजे ताबडतोबीचे संकट दूर झाले हे नक्की. तसेच येस बँक निफ्टी-५० मध्ये आल्यानंतर त्या शेअरमध्ये ई.टी.एफ ची वगैरे गुंतवणुक येईलच.

पण उद्या रूपी किंवा तत्सम बँकेच्या बाबतीत पण असे केले जावू शकते का?

हा कळीचा प्रश्न आहे. येस बँक देशातील पहिल्या १०-१२ मध्ये असलेली मोठी बँक होती म्हणजे ती too big to fail होती. त्यामुळे येस बँक वाचवायला सगळ्यांनीच धावपळ केली. पण येस बँकेपूर्वी ४-५ महिने पी.एम.सी बँक पण अशीच संकटात आली होती. त्यावेळी ती बँक वाचवायला इतकी धावपळ झाली नाही कारण ती बँक too big to fail नव्हती. तेव्हा रूपी बँकेला वगैरे वाचवायला सरकारी पातळीवर धावपळ व्हायची शक्यता फारच कमी. आतापर्यंत तशा लहानसहान पतपेढ्या वगैरे कित्येक बुडल्या आहेत पण त्या वाचवण्यासाठी इतके प्रयत्न झालेले नाहीत.

पण असे काही कायदे नाहीयेत का कि सर्वांचे हित त्यात जपले जावू शकतील?

फायनान्सच्या जगतात हे होणे नाही. किंबहुना सगळ्यांचे हित जपणे हे फायनान्सच्या मूळ तत्वाच्याच विरोधात आहे. ते मूळ तत्व म्हणजे expected returns are directly proportional to risk. त्यामुळे चांगले दिवस चालू असतील तर इक्विटीवाल्यांना भरपूर रिटर्न मिळतील पण वाईट दिवस आले तर मात्र इक्विटीवाल्यांना मार खावा लागेल.

गणेशा's picture

31 Mar 2021 - 10:47 pm | गणेशा

मनपूर्वक धन्यवाद...

------

Analysis करताना हि रक्कम लक्षात घेतली नव्हती, म्हणजे मी माझे उदा. देत होतो. Short term साठी मी ४८ rs ने bob घेतला होता, माझ्या म्हणण्या प्रमाणे बँकेला फायदा झाला होता पणcovid मुळे npa च्या जास्त राखीव ठेवी मुळे तो म्हणावा तितका न दिसल्याने share पडला.
( bob ने तरीही २ महिन्यात मला पैसे कमवून दिले कारण तो ६४ + गेला.)

गणेशा's picture

30 Mar 2021 - 2:08 pm | गणेशा

त्यामुळे फंडामेंटल अ‍ॅनॅलिसिस करताना अकाऊंटिंग स्टेटमेन्ट्सबरोबरच संबंधित क्षेत्रात काय चालू आहे याचा अभ्यासही करणे गरजेचे असते. कारण कोणत्याही कंपनीच्या नफा मिळवायच्या क्षमतेवर परिणाम घडविणारे अक्षरशः शेकडो घटक असतात. - क्लिंटन

.
.
या अश्या अनेक घटकांचा कंपनी वरती परिणाम होतो, भविष्यातील किंमत scoring system ने हि काढता येवु शकते म्हणुन मी काही गोष्टी केल्या होत्या.. त्या या लेखात खरे तर मी टाकल्या नाहीत, कारण इतके क्लिष्ट काम कोणी करणार नाही, मी स्वता हि हे आता वापरत नाही..
पण आता मुद्दा आला आहे तर सांगतो..
.
.
scoring system

.
.
माझ्या कडे सुरुवातीला Abbot India हा share Aurobindo बरोबर माझ्या Long term portfolio मध्ये होता, पण किंमत जास्त आणी मला कायम घेता येथि नव्हता, म्हणुन मी या share ची भविष्यातील किंअत पाहण्याचा प्रयत्न केला होता..
.
.

.
.

या फोटो मध्ये दाखवल्या प्रमाणे Market Cap,Competition,Debt,Brand Recognition,Business Reach,Comliance and Regulatory Front, Margins, Management,Promoter Holding, Personal View
या Parameter चा अभ्यास करुन त्याला माझ्या म्हणण्या नुसार Grade दिल्या . १० पैकी मी किती मार्क देइल असे.

त्या नंतर ह्या माहीतीच्या आधारे, मी आता खरी तर कीती किंमत हवी आपण योग्य किंमतीला घेतलाय का शेअर आणि भविष्यात किती किंअत होईल याचा अभ्यास करायला घेतला आणी मला आश्चर्य वाटले..
.
.

.
.
ह्या माहीती मुळे Abbot India मी १८००० रुपयाला ४००० नफा कमवुन माझ्या Long term portfolio मधुन काढुन टाकला.
हा अभ्यास बरोबर नसेल ही, परंतु हे सारे Parameter पाहुन केलेला निर्णया मुळे माझा याच सेक्टर मधील अ‍ॅरोफार्मा ३५० रुपया वरुन ९०० रुपये गेला आणि Abbot अजुनही तिथेच आहे १४००० रुपया जवळ.
.
तर हे Parameter नक्कीच उपयोगी असतात, पण आपण Long term portfolio मध्ये जास्त कंपनी न घेता १२-१५ कंपनी घेवुन त्यांना कायम ट्रॅक करायचे आहे.
जास्त कंपनी एक तर लक्ष ठेवता येत नाही.. आणी गडबड होउ शकते..

- गणेशा

बिटाकाका's picture

30 Mar 2021 - 3:32 pm | बिटाकाका

पण आपण Long term portfolio मध्ये जास्त कंपनी न घेता १२-१५ कंपनी घेवुन त्यांना कायम ट्रॅक करायचे आहे.

पूर्णपणे सहमत!मी त्यापुढे जाऊन म्हणेन की लॉंग टर्म, शॉर्ट टर्म किंवा इन्ट्राडे काहीही असुद्या, जास्तीत जास्त २० स्क्रिप्टस एकावेळी ट्रॅक कराव्यात.

चंद्रसूर्यकुमार's picture

30 Mar 2021 - 3:44 pm | चंद्रसूर्यकुमार

धन्यवाद. स्कोरिंग सिस्टीम किंवा त्याप्रमाणेच काही पध्दतींविषयी मी मागे वाचले होते आणि त्याप्रमाणे मी थोडेफार खेळायचा प्रयत्नही केला होता. पण मला सगळ्यात मोठी अडचण आली मुद्दा क्रमांक ४,५ आणि ६ मध्ये. एखाद्या कंपनीचा ब्रँड किती ओळखीचा आहे हे जास्त करून फार्मा कंपन्यांविषयी ठरविणे कठीण जाते. समजा सिप्ला ५० औषधे विकत आहे आणि ल्युपिन ६० औषधे विकत आहे. त्यापैकी काही औषधांमध्ये सिप्लाचा ब्रँड जास्त ओळखीचा असेल तर काहींमध्ये ल्युपिनचा. आणि त्यातही ब्रँड ओळखीचा हे नक्की कसे ठरवावे? उदाहरणार्थ कोलेस्टेरॉलच्या औषधांमध्ये लिपिटॉर चांगला ब्रँड की लेस्कोल हे घरी बसून ठरविणे कठीण जाते. इंडस्ट्री रिपोर्ट वगैरे मिळतात पण अनेकदा हे रिपोर्ट पूर्ण फार्मा इंडस्ट्री किंवा जेनेरीक ड्रग्ज वगैरेंवर असतात. कोलेस्टेरॉल औषधांवरील रिपोर्ट हवा असेल तर तो खूप स्पेसिफिक रिपोर्ट झाला. असे रिपोर्ट बाहेर मिळतात का हे पण माहित नाही आणि मिळत असल्यास किती किंमतीला हे पण माहित नाही.

असेच काहीसे उरलेल्या दोन मुद्द्यांविषयी. त्यामुळे हे सगळे विश्लेषण पूर्णपणे वस्तुनिष्ठ राहू शकेल का हा प्रश्न नक्कीच उभा राहतो. हा प्रकार टेक्निकल अ‍ॅनॅलिसिसमध्ये होतो कारण सगळ्यांना एकच पॅटर्न दिसेल असे नाही त्यामुळे एकाच चार्टवरून घेतलेले निर्णय परस्परविरोधी असू शकतात. तरीही घरी बसून सगळी माहिती मिळविणे हा प्रकार मला तरी अधिक कठीण वाटला त्यामुळे फंडामेंटल मध्ये मला तरी जास्त अडचणी आल्या.

असो. लेख वाचत आहे.

गणेशा's picture

30 Mar 2021 - 4:35 pm | गणेशा

बरोबर, धन्यवाद.

असेच कुठल्याही sector मधील कुठली कंपनी घेतली पाहिजे यावर माझे ठाम एक कंपनी येण्या ऐवजी बऱ्याचदा ४-५ कंपन्या येत असत.

मग अश्या वेळेस राहिलेल्या कंपनी ज्या मी long term ला वापरत नाही, त्या मी short term ला घेतो बऱ्याचदा.
उदा. Biocon, fed bank, cipla, tata consumer, hdfc life, icici bank, apolo tyre, sbi ect

ह्या अश्या कंपन्या आहेत, ज्या मी long term ला घेतल्या नाही, पण त्या माझ्याकडे असतात, भले त्या blue chip सारख्या असून जास्त हालत नाही, पण त्या confirm योग्य Level ला घेतल्यास फायदा देतात. Profit book करायचे आणि खाली आल्यावर पुन्हा घ्यायचे.
या कंपन्यात मी mid term इन्व्हेस्टमेंट करतो असे पण म्हणू शकेल मी.
या निर्णयामुळे actual इतर short term कंपन्या साठी चे analysis मला योग्य करता येते, करण मला supporting या कंपन्या असतात.

Penny stocks मी शक्यतो घेत नाही.. भले फायदा जास्त नाही झाला तरी चालेल.

ह्या अश्या कंपन्या आहेत, ज्या मी long term ला घेतल्या नाही, पण त्या माझ्याकडे असतात, भले त्या blue chip सारख्या असून जास्त हालत नाही, पण त्या confirm योग्य Level ला घेतल्यास फायदा देतात. Profit book करायचे आणि खाली आल्यावर पुन्हा घ्यायचे.
या कंपन्यात मी mid term इन्व्हेस्टमेंट करतो असे पण म्हणू शकेल मी.

स्काल्पिंग. हे करावेच लागेल, नाही तर मूळ रेवेन्यू वाढणार कसा? योग्यच आहे हे. :-)

राघव's picture

1 Apr 2021 - 11:50 am | राघव

कमीतकमी फार्मा सेक्टर मधे तरी ब्रँडींगचा विचार करून भागत नाही.
त्यापेक्षा थोडे जनरलायझेशन केलं तर -

  • कोणती फार्मा कंपनी साधारण कोणत्या आजारासाठीची औषधे बनवते आणि त्या आजाराचे प्रमाण किती [पुढील संधी किती]
  • कंपनी कोणत्या रीजनमधे काम करते [ऑपरेटींग कॉस्ट किती]
  • सेल्स वाढ कशी आहे [देशांतर्गत आणि देशाबाहेर]

यावरून साधारण अंदाज घेणे शक्य होऊ शकेल. अर्थात् हे चांगलेच वेळखाऊ काम आहे. :-)

चंद्रसूर्यकुमार's picture

1 Apr 2021 - 12:36 pm | चंद्रसूर्यकुमार

हे चांगलेच वेळखाऊ काम आहे.

चांगलेच वेळखाऊ नाही तर एकट्या माणसाच्या क्षमतेपलीकडील प्रकार आहे असे वाटते. अशा प्रकारच्या रिसर्च करायला क्रिसीलसारख्या संस्थांमध्ये मोठ्या टिम्स असतात आणि त्यांच्याकडे स्वतः गोळा केलेला किंवा ग्राऊंड लेव्हलच्या माहितीचे विश्लेषण करणार्‍या संस्थांकडून विकत घेतलेला डेटा असतो. असा इंडस्ट्री रिपोर्ट बनवून क्रिसील किंवा तत्सम संस्था बँका/ म्युच्युअल फंड वगैरे संस्थांना काही लाखांमध्ये विकतात. अशाप्रकारे कोणतीही माहिती दिमतीला नसताना एकटा माणूस घरी बसून हे काम करणार कसे? आणि फार्मा कंपनीसाठी केलेला अभ्यास असेल तो स्टील कंपन्यांसाठी उपयोगी पडणार नाही. त्यासाठी वेगळा अभ्यास लागेल. एकूणच हा प्रकार घरी बसून एकट्या माणसाकडून होणे फारच कठीण- जवळपास अशक्यच. मग त्यापेक्षा टेक्निकल अ‍ॅनॅलिसिस का करू नये- कारण या सगळ्या मोठ्या वित्तीय संस्था इतका अभ्यास करून निर्णय काय घेणार तर शेअर एकतर विकत घ्यायचे किंवा विकायचे. ते किंमत आणि व्हॉल्युमच्या आकड्यांमध्ये दिसून येईलच. मग नुसते त्यावरच लक्ष का केंद्रीत करू नये?

प्रचेतस's picture

2 Apr 2021 - 10:40 pm | प्रचेतस

Prowess किंवा capitaline सारखे डाटाबेस वापरून हे काम बरेच सुलभ होते.

चंद्रसूर्यकुमार's picture

3 Apr 2021 - 10:17 am | चंद्रसूर्यकुमार

Prowess किंवा capitaline सारखे डाटाबेस वापरून हे काम बरेच सुलभ होते.

मी प्रॉवेस वापरलेले नाही पण कॅपिटलाईन बरेच वापरले आहे. वैयक्तिक सबस्क्रीप्शनसाठी वर्षाला लाखभरापेक्षा जास्त फी त्यासाठी असते. ते वैयक्तिक सबस्क्रीप्शन माझ्याकडे पण नव्हते. मी बी-स्कूलमध्ये आणि बँकेत असताना तिकडच्या संस्थात्मक सबस्क्रीप्शनमधून ते बघितले होते. वर्षाला लाख रूपये या सबस्क्रिप्शनसाठी मोजायचे असतील तर आपला पोर्टफोलिओ पण तसाच मोठा हवा. तसा नसेल तर इतके पैसे भरून ते सबस्क्रीप्शन घेण्यात काहीच अर्थ नाही. आणि नुसते इक्विटी ट्रेडींग असेल (म्हणजे डेरिव्हेटिव्ह नसेल) तर फीसाठी भरलेली रक्कम हा खर्च दाखवून त्यावर टॅक्स कमी लागेल असेही नसते.

कॅपिटलाईन वापरून काही काळ लोटला आहे पण माझ्या आठवणीप्रमाणे त्यात सगळ्या कंपन्या आणि त्यांच्या उपकंपन्या (सबसिडिअरी) यांची अकाऊंटिंग स्टेटमेन्ट्स असतात पण अनेकविध मार्केट्समध्ये कोणत्या कंपनीचा किती मार्केटशेअर आहे वगैरे विदा त्यात नसतो. नुसत्या अकाऊंटिंग स्टेटमेन्ट्ससाठी हे सबस्क्रिप्शन घ्यायची गरजही नाही. लिस्टेड कंपन्यांची अकाऊंटिंग स्टेटमेन्ट्स त्यांच्या वेबसाईट्सवरच असतात. या व्यतिरिक्त इकॉनॉमिक आऊटलुक, सेक्टर आऊटलुक वगैरे रिपोर्टचे वेगळे सबस्क्रीप्शन असल्यास कल्पना नाही. पण त्यासाठीही असेच लाख रूपये मोजायची तयारी हवी. अर्थात भारतीय लोक जुगाड करण्यात वाकबगार असतात त्यामुळे एकच सबस्क्रीप्शन अनेक जणांमध्ये शेअर वगैरे कोणी करत असल्यास कल्पना नाही.

गणेशा's picture

3 Apr 2021 - 11:42 am | गणेशा

Prowess किंवा capitaline
आणि वरती राघव यांनी लिहिलेले स्कलपिंग हि नावे मी पहिल्यांदाच ऐकत आहे...

चंद्रसूर्यकुमार's picture

3 Apr 2021 - 12:22 pm | चंद्रसूर्यकुमार

शेअरबाजारात वेगवेगळ्या कालावधीसाठी उतरणारे लोक असतात. तो कालावधी अगदी काही मिनिटे ते कित्येक वर्षांपर्यंत असतो. स्काल्पिंग म्हणजे अगदी थोड्या कालावधीसाठी केलेला ट्रेड. हा कालावधी काही मिनिटांचा असतो. एकट्या माणसाला अशाप्रकारे ट्रेड करायचे असेल तर खूपच शिस्त लागेल. कारण यातून बर्‍यापैकी पैसा मिळवायचा असेल तर मार्जिन वापरणे गरजेचे आहे. नाहीतर अगदी रिलायन्ससारख्या शेअरमधून एखाद-दोन रूपये काढायचे असतील तर मार्जिन न वापरता कितीसा पैसा मिळणार? मार्जिनमुळे रिस्क वाढतेच आणि जितक्या कमी कालावधीसाठी ट्रेड असेल तितकी व्होलॅटिलीटी अधिक असते. आपण मंथली चार्टवर ट्रेड करत असू तर महिन्यातून एकदा चार्ट बघितला तरी हरकत नाही. पण स्काल्पिंगसाठी १ किंवा ५ मिनिटांचा चार्ट अशी कमी टाईमफ्रेम असते. त्यामुळे स्क्रीनपुढे सतत चिकटून राहणे आले आणि सतत कँडल वरखाली होत असतील तर तितक्या प्रमाणात माईंड मॅनेजमेंट सांभाळणे कठीण जाते. वित्तीय संस्था अल्गोरिदम वापरून स्काल्पिंग अगदी सर्रास करतात.

हो, कॅपिटलाईनला लिमिटेशन्स बर्‍याच होत्या मात्र त्याची सबस्क्रिप्शन फी इतकी जास्त असेल हे माहित नव्हते. सीएमआयईची प्रोवेस, कॅपेक्स, इंडस्ट्री आउटलूक, इकोनॉमिक आउटलूक वगैरे बरीच पॉवरफुल टूल्स आहेत. मात्र त्यांचे वेगवेगळे सबस्क्रिप्शन आहे अणि त्यांची फीस पण जास्त असावी.

चंद्रसूर्यकुमार's picture

3 Apr 2021 - 1:44 pm | चंद्रसूर्यकुमार

सीएमआयईची प्रोवेस, कॅपेक्स, इंडस्ट्री आउटलूक, इकोनॉमिक आउटलूक वगैरे बरीच पॉवरफुल टूल्स आहेत. मात्र त्यांचे वेगवेगळे सबस्क्रिप्शन आहे अणि त्यांची फीस पण जास्त असावी.

हो वैयक्तिक सबस्क्रीप्शन फी वेगवेगळ्या प्रॉडक्ट्साठी १ लाख १० हजार ते २ लाख ७८ हजार इतकी आहे. https://www.cmie.com/kommon/bin/sr.php?kall=warticle&dt=2019-10-23%2014:...

कॅपिटलाईनची फी वर्षाला दीड लाख आहे https://www.capitaline.com/Demo/Plus.aspx

या सगळ्यावर १८% जी.एस.टी पण लागेल. तेव्हा किमान एखाद कोटीचा पोर्टफोलिओ असेल आणि अशा अभ्यासावरून पोर्टफोलियोमधील शेअर निवडले जात असतील तरच असे सबस्क्रीप्शन घेण्यात अर्थ आहे.

शानबा५१२'s picture

30 Mar 2021 - 3:17 pm | शानबा५१२

ह्या लेखाच्या लेखकांनी फार उपयुक्त माहीती दीली आहे, त्याबद्दल त्यांचे मनापासुन आभार!

ज्ञानोबाचे पैजार's picture

31 Mar 2021 - 12:10 pm | ज्ञानोबाचे पैजार

या निमित्ताने एक नवे दालन अभ्यासा करता खुले होत आहे.
लिहित रहा
पैजारबुवा,

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Apr 2021 - 2:55 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वाचतोय. आभारी आहोत.

-दिलीप बिरुटे

आपण सर्वप्रथम लक्षात घेऊ की शेअर ची किंमत कशी ठरते ?

सर्वप्रथम कंपनी भांडवल उभे करायला(primary market)बाजारात येते तेंव्हा तिचा IPO (initial public offerings) येतो. इथे जमा झालेला पैसा कंपनीकडे जातो व कंपनी फक्त यावरच dividend देते.

नंतर तिचे लोकांमधे (secondary Market) आपापसात ट्रेडिंग सुरू होते. थोडक्यात शेअर ची किंमत जी सद्या आहे अथवा टीव्ही वर दिसते ती किंमत म्हणजे त्या कंपनीच्या शेअरचा शेवटचा व्यवहार कितीला झाला याची माहिती असते. व ही किंमत ठरायला लाखों शेअर्स मधून फक्त एका शेअरचा खरेदी व्यवहार घडणे पुरेसे असते.

भले भले अभ्यासक चुकतात कारण मार्केट हे फक्त पैसाch नियंत्रित करू शकतो. आणि कोणीकितीही अभ्यासू असला तरी एका दोघा माणसाच्या हातात मार्केटची दिशा ठरेल इतका पैसा दीर्घकाळ तर अजिबात नसतो. परिणामी शेअर मार्केट हे तेजडीया व मंडेदिया म्हणजेच बुल्स आणि बियार्स लॉबी नियंत्रित करतात. त्यांचं ज्ञान असल्या खेरीज अथवा त्यांच्या योजनांशी आपली strategy जुळून येण्याखेरीज कोणताही व्यवहार जोखमीचाच न्हवे तर नुकसानीचाच.

मग सामान्य माणसाने यात जावं की नको ? तर उत्तर आहे होय डोळे मिटून जावे जर त्याला गोल्डन रुल माहीत असेल आणि तो म्हणजे मार्केटमध्ये कसल्याही लाटा येओत थांबायचा संयम असेल तर सत्य हेच आहे की मार्केट हे फक्त वरच्या दिशेकडे प्रवास करते आहे त्याच्या जनमा पासून.....