आधिचे भाग -
शेअरमार्केट भाग ० : Basics - By गणेशा - https://misalpav.com/node/48553
शेअरमार्केट भाग ०.१: आर्थिक नियोजन आणी गुंतवणुक - By गणेशा (current धागा)
शेअरमार्केट भाग १: Fundamental Analysis - By गणेशा - https://misalpav.com/node/48578
शेअरमार्केट भाग २.१: Technical Analysis -By गणेशा - https://misalpav.com/node/48607
--------------------
शेअरमार्केट भाग अ: मार्जिन - By बिटाकाका - https://misalpav.com/node/48574
--------------------
म्युच्युअल फंड्स भाग १ : By अमर विश्वास - https://misalpav.com/node/48621
------------------------------------------------------------------------------
नोट :
१. प्रथमता मी अमर विश्वास यांना न कळवताच त्यांची धागा लिंक येथे दिली आहे त्या बद्दल दिलगिरी.
२. खरे तर :-) हा धागा मी काढलेला नव्हता, आणि बेसिक धाग्याच्या वेळेस कसी गुंतवणुक असावी हे थोडक्यात सांगितले होते. परंतु डॉ.खरे यांच्या बर्याचस्या प्रतिसादावरुन आणि गाई च्या धाग्यामुळे मला वयक्तीक हा विषय थोडा Divert होतो आहे किंवा थोडा निगीटीव्ह बाजुकडे झुकतो आहे काय ही मला शंका आली.. परंतु प्रत्येकाचे वेगळे लॉजिक असते आणी प्रत्येक जन त्याच्या त्याच्या बाजुला बरोबर असु शकतो..त्यांचे म्हणाणे रास्त असेल पण ते वाचणारे मात्र निगीटीव्ह विचार करतील असे वाटले म्हणुन हा धागा भाग माझ्या भाग २.१ झाल्या नंतर लिहायला घेतो आहे.
काही वेळेस माणसाला व्यवस्थित निर्णय घेता येत नाही.. किंवा काही गोष्टी उशिरा समजतात..
म्हणून हा धागा मी काही संभ्रम असतील तर दूर व्हावेत या साठी लिहायला घेतो आहे.
३. अमर विश्वास झाले , मी झालो ..धाग्यावरुन कळत असेलच की वयक्तीक कुठली ही लालसा आमच्या धाग्यात नाही. खरे तर कोणाला विनाकाराण समजावुन सांगण्याच्या फंदात पडु नये असे बरेच जन म्हणातात, पण या धाग्यांचे स्वरुप कोणाला तरी या मुळे भविष्यात फायदा झाला तर उत्तम असे असल्याने कृपया वेगळे मत बनवु नये.. माझा स्वार्थ हा आहे की मला हे धागे माझ्या साईट साठी इंग्रजी मध्ये हवे आहेत आणि ज्ञानाची उजळणी ही होइलच त्यामुळे इतरांना फायदा झाला तर मस्त आणि माझे ही काम झाले हा निव्वळ हेतु.
यातुन कुठले ही आमिष किंवा अर्थाजन मिळवण्याचा हेतु नाही.. तो मला शेअरमार्केट आणि माझा व्यवसाय देते आहेच.
--------------------------------------------------------------------------
आर्थिक नियोजन कसे असावे हा या धाग्याचा मुळ उद्देश आहे.
ते कसे कारावे ते आपण पाहु
१. आपण आपले उत्पन्न स्त्रोत लिहुन काढावेत
२. उत्पनाची आदर्श गुंतवणुक किंवा विभागणी कशी आसावी.
आपण आपले उत्पन्न स्त्रोत लिहुन काढावेत
आपले स्त्रोत काय काय असु शकते तर
१, आपल्या व्यवसायातुन येणारा नफा
२. किंवा नोकरदार असाल तर येणारा पगार
३. भाड्याचे उत्पन्न ( फ्लॅट्,मशिन किंवा इतर काही)
४. व्याजाचे पैसे ( एफडी किंवा इतर सेवा)
५. Dividend
आता हे आपण लिहुन काढले की आपल्या या उत्पनाची आदर्श विभागणी आणी गुंतवणुक कशी करावी हे ठरवावे ..
उत्पनाची आदर्श गुंतवणुक किंवा विभागणी
१. Tax - सर्वात पहिल्यांदा उत्पन्नावर प्रत्येकाला त्याचा Tax सरकारला द्यावा लागतो..
२. wealth creation-
हा खुप IMP भाग आहे. हा महत्वाचा का आहे तर समजा आताचा व्यवसाय किंवा नोकरी म्हणजे जे काही उत्पन्न असेल तर त्याचा काही भाग तुम्ही बाजुला काढला पाहिजे.. कारण उद्या तुमची नोकरी गेली तर त्या ह्या साठवलेल्या पैश्याने तुमची कमाई चालु राहिली पाहिजे.. हा महत्वाचा भाग आहे, आणि बरेच लोक या भागाकडे खुप उशिरा येतात, बरेच लोक saving आणि investment या दोन्हीमध्ये खुप उशिर करतात किंवा संभ्रमित असतात.
wealth creation मध्ये तुम्ही काय काय केले पाहिजे तर
अ. यात तुम्हाला, असे नाही की डायरेक्ट लाँग टर्म इन्वेस्टमेंटच केली पाहिजे, ना की कोठे तरी चांगले शेअर मध्ये पैसे टाकायचे..
यात तुम्ही पहिल्यांदा तुमच्या महिन्याच्या उत्पन्नाच्या ६ पट रक्कम ( तुमचे सहा पगार असे ही म्हणु शकता) तुम्ही तुमच्या बँकेत fixed deposit म्हणुन ठेवावीच ठेवावी. समजा तुम्ही महिना १ लाख रुपये कमवत असाल तर तुमचे ६ लाख रुपये हे सुरक्षित आणि चांगल्या बँकेत ठेवलेले हवेच हवे.
हे का करायचे तर उद्या तुम्हाला Urgent liquidity लागली किंवा जॉब गेला किंवा इतर कारणे झाली तर तुम्हाला लगेच पैसे हे मिळाले पाहिजेत किंवा सहा महिने तुम्हाला कसलाही धोका निर्माण होणार नाही.
म्हणजे तुम्हाला पैश्याचे टेंशन येणार नाहीत. म्युचअल फंड , शेअर मार्केट हे नंतरच्या गोष्टी आहेत.
ब.
नंतर राहिलेले पैसे हे शेअर्स , म्युचअल फंड, सोने ,जागा इतर ठिकाणी गुंतवणुक करत रहावी.. लक्शात घ्या investment ही Process आहे, आज पैसे टाकले की उद्या लगेच तुम्हाला उत्पन्न मिळाणार नाही. ( हे आपण इतर धाग्यात पहात आहे / पाहणार आहोतच).
३. Personal growth
अ. पुस्तके आणी कोर्सेस
ज्ञान वाढवण्यासाठी आपण गुंतवणुक केलीच पाहिजे.. चांगली चांगली पुस्तके आपण वाचली पाहिजेत, आणि ह्या मध्ये आपण नक्कीच गुंतवणुक केली पाहिजे. तुमचे ज्ञान हे wealth creation चा भाग आहेच आहे, त्यावर नक्कीच तुमचा खर्च पाहिजे.
तुम्ही नव नविन गोष्टी शिकल्या पाहिजेत, नवनिविन तंत्रज्ञान तुम्ही शिकले पाहिजे नविन कोर्सेस लावुन आता काय चालु आहे त्याबद्दल तुमचे स्किल्स तुम्ही Develop केले पाहिजेत.
तुमच्या व्यवसायात सुद्धा याचा उपयोग तुम्ही केला पाहिजे
ब. Gym आणि आरोग्य
तुम्ही न चुकता तुमच्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे, तुम्हाला त्यासाठी काही खर्च करावा लागला, तर तुम्ही त्यावर तो केलाच पाहिजे.. तुम्ही Gym लावायची असल्यास तय साठी काही पैसे तुम्हाला बाजुला ठेवलीच पाहिजे.
४. घरखर्च
खरे तर ह्या सगळ्या गोष्टी सर्वांना माहीत असतेच, पण तुम्हाला एक स्ट्रक्चर फिक्स व्हावे म्हणुन हे पुन्हा सांगत आहे.
या मध्ये मुलांच्या शाळेच्या फी, इंटरेनेट आणि इतर खर्च आले.
medical आणि term Insurance चे premium ह्या सर्व गोष्टी यात येतात
५. दान
हा आदर्श असा भाग आहे, आपण पैश्या बद्दल बोलतो आहे तर तुम्ही पैसे द्यायला ही शिकले पाहिजे,
ज्ञान दान ही यातच येते, तुम्ही तुमचे ज्ञान मनापासुन पुढच्याला द्या तुम्हाला तुमचे ज्ञान दुप्पट झालेले कळेल..
मी येथे जे लिहितो आहे ते ज्ञानदानच आहे. यातुन नेहमी दुसर्याचा फायदा करायला जा तुमचा फायदा होईलच होईल.
वरती जे Tax, Business, saving, expense, wealth creation जे मी बोललो आहे, त्यात तुमच्याकडे उत्पन्न आले की तुम्ही ते तुम्ही वेगवेगल्या खात्यात टाकुन ठेवु शकता, त्यामुळे तुमच्या due गोष्टी तुम्हाला त्या त्या खात्यातुन भरता येते.
तुम्ही तुमच्या wealth creation साठी एक खाते उघडले असेल समजा मी त्यात महिन्याला १० % टाकतो, तर त्याच खात्यातुन मी माझी पहिले ६ महिने पुरेल येव्हडी सेविंग करावी आणि नंतरच शेअर मार्केट, म्युचअल फंड, गोल्ड यात गुंतवणुक करायची आहे
मला असे नक्की म्हणायचे आहे की ह्या पद्धतीने तुम्ही गुंतवणुक केल्यास कसलेच प्रॉब्लेम येणार नाहीत
मागील काही धाग्यांवर शेअर मार्केट आणि म्युचअल फंड याबाबत थोडी साशंकता मनात आलेली असेल तर मी येथे माझे गुंतवणुक मांडले आहे..
प्रत्येकाची स्वताची एक थेअरी असते, ती चुक नसते, काहींना म्युचअल फंड चांगले वाटतात काहींना नाही.. पण तुम्ही असेआर्थिक नियोजन केल्यास तुम्हाला कसला शंका उरणार नाहीत..
होप मी सर्व प्रश्नांना व्यवस्थित उत्तरे देवु शकलो आहे. आता शेअर मार्केट किंवा म्युचअल फंड नको असतील तर तुम्ही तुमच्या धंद्यात तुमची गुंतवणुक वाढवु शकता, प्रत्येक माणुस वेगळाच असतो.
मी आणि अमर जे सांगतो आहे ते ह्या पुर्ण गुंतवणक प्रकारातील फक्त १० ते २० % हिस्स्या बद्दल बोलतोय, आणि त्या पासुन भविष्यात कशी रक्कम निर्माण होईल त्याचे ते ज्ञान आहे.
थोडेसे माझे
थोडेसे माझ्याबद्दल तुम्हा सर्वांशी शेअर करायला मला आवडेल.
१. गेल्या वर्षी मी माझे नविन स्किल्स Spark जे big data मध्ये येते ते शिकुन त्यावर टीम बरोबर काम केले.. त्याचा मोबदला माझे २६ % पगार या महिन्यापासुन वाढला आहे.भले लॉकडाउन होता तरी.
२. मी स्वता खुप अभ्यास केला,शेअर मार्केट चा ही.. नंतर मला माझे मित्र भेटले त्यांना पण मी शेअर मार्केट मध्ये खुप शिकवले.. तुम्हाला आश्चर्य वाटेल मी १० लाख ते investment साठी देत असलेली रक्कम नाकारली आहे. मैत्रीत पैसे आले की मैत्री ही मैत्री राहत नाही.. उलट मी त्यांच्याच खात्यात पैसे ठेवुन त्यांना मेन मार्केट स्किल शिकवले , आता ते त्यांचे त्यांचे करत आहेत.ज्ञानदान करा.. तुमचा फायदा होईल, १ लाखाचे माझे तीप्पट पैसे झालेत शिवाय म्युचअल फंड वेगळे, हे सगळे इतरांना शिकवल्या मुळेच..
३. तरीही त्यांच्या खुप आग्रहा खातर आणि माझ्या अभ्यासामुळे त्यांना Insurance आणि medical मध्ये मदत पाहिजे होती ती केली, इतकी की मी स्वताचे लायसन्स घेतले आणि माझीच अकाउंट आणि Insurance कंपणी टाकली.. मला व्यवसाय चांगला करता येत नाही, पण ही आयडीआ मित्रांची आहे. आणि मी स्वता चांगल्या पद्धतीने यात निवड करु शकलो.. आता माझ्याकडे दोन Mechanical production (automation ) च्या कंपन्या बूक किपिंग साठी आहेत.. सुरुवात छोटी आहे पण ती ह्या सर्व गोष्टींमुळे माझ्याकडे आपोआप चालत आली..
४. स्वता माझे वजन मात्र गेल्या वर्षी वाढले आहे, तरी Gym , सायकल हे माझे चालु केले आहे पुन्हा.. लवकरच ट्रेक सुरु होतील. वजन लवकरच कमी होईल. आता या महिन्यात ३ किलो कमी केले आहे.
५, माझ्या पगाराच्या फक्त ७ % मी शेअर मार्केट मध्ये आणी ८% गोल्ड आणि म्युचअल फंड मध्ये टाकतो आहे.
६. क्रेडीट कार्ड बंद करण्याचे प्रयत्न चालुच आहे. लवकर सांगेल..
माझे एकच म्हणणे आहे, तुमच्याकडे ताकद आहे , तुमच्याकडे ज्ञान आहे, फक्त त्याचा वापर करा.. तुम्ही तुमचे जीवन आनंदी जगु शकता..
फक्त एक मनापासुन विनंती कधीच कोणाला पुर्ण चुकीचेच, कींवा फक्त स्वताच्या काही आर्थिक हेतु साठीच सगळे करतोय असे हिनवु नका..
काय माहीत प्रत्येक माणसाच्या मनात वेगळे विचार असतील.
आणि Consistency ही तुमच्या प्रत्येक यशाची चावी आहे, ती जरुर कायम आपल्या जवळ बाळगा..
- गणेशा
प्रतिक्रिया
8 Apr 2021 - 4:01 pm | गणेशा
अमर यांच्या म्युचअल फंड च्या धाग्यावर आलेले प्रश्न पाहता, मी उत्तर लिहायला घेतले
आणि त्याच वेळेस अमर यांनी ही तोच निर्णय घेतला आणि आम्हाला माहिती नव्हते.. मी तर मिटींग ला टांग देवुन लिहिला धागा :)
आणी एकाच पद्धतीचे आमचे दोन धागे आले (https://misalpav.com/node/48623)
कृपया माझा धागा उडवला तरी चालेल.. किंवा मर्ज केला तरी चालेल. वाचकांना संभ्रम नको :)
8 Apr 2021 - 4:49 pm | मुक्त विहारि
वाखूसा
मुलाला लिंक पाठवली
क्रेडिट कार्ड, अगदीच गरज असेल तरच वापरणे उत्तम
खर्चिक स्वभाव असेल तर, क्रेडिट कार्ड शक्यतो वापरू नये.
माझा स्वभाव खर्चिक असल्याने मी क्रेडिट कार्ड, परदेशी प्रवासाला गेलो तरच घेईन आणि बायकोच्या ताब्यात देइन...
8 Apr 2021 - 7:47 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धाग्यावर लक्ष आहे. काळजीपूर्वक वाचत आहे.
-दिलीप बिरुटे
8 Apr 2021 - 11:30 pm | बिटाकाका
अजून एक अतिशय चांगला विषय, चांगल्या पद्धतीने मांडल्या बद्दल पुनश्च अभिनंदन! या लेखमालेतील प्रत्त्येक लेख हा नवनवीन माहिती घेऊन येणारा ठरणार आहे याची खात्रीच पटली आहे. मी माझ्या परिचयातील २५ च्या खालच्या लोकांना हे लेख (आणि सोबतच या लेखमालेशी संबंधित इतर लेख) आवर्जून वाचायला लावत आहे. त्यातल्या काही लोकांना जरी या गोष्टींचे महत्व समजले तरी भरून पावेल. आम्हाला कुणी हे योग्य वेळी शिकवले असते तर फार बरे झाले असते असे राहून राहून वाटते.
पुनश्च आभार!
9 Apr 2021 - 12:42 am | अनन्त अवधुत
माझ्या परिचयातील लोकांना ही लेखमाला वाचायला सांगत आहे.
ह्या लेखमालेबद्दल धन्यवाद!
9 Apr 2021 - 10:00 am | चंद्रसूर्यकुमार
क्रेडीट कार्ड या प्रकाराविषयी बरीच मतेमतांतरे आहेत. मला वाटते की क्रेडीट कार्डावरील व्याज या चक्रात न अडकल्यास ते एक खूप चांगले साधन होऊ शकते. डॉ. खरे यांच्या गाईवरील लेखात उल्लेख आहे की युलिप वगैरे विकल्यानंतर पैसे अकाऊंटमध्ये जमा होईपर्यंत १५-२० दिवस जाऊ शकतात (माझा अनुभव ८ दिवसांचा आहे). अशावेळी क्रेडीट कार्ड आपल्या मदतीला येऊ शकेल. कार्डावर पहिल्यांदा खर्च करायचा आणि युलिपचे पैसे बँकेत जमा झाल्यावर ते बिल भरून टाकायचे.
मी स्वतः क्रेडीट कार्ड या प्रकाराचा अगदी उदंड वापर करतो. काही काळ कार्डावर व्याजही भरले होते पण आता क्रेडीट कार्ड हे डेबिट कार्डाप्रमाणे वापरतो म्हणजे अगदी खर्च केल्यानंतर लगेच नसले तरी बिल आल्यानंतर लगेचच सगळे बिल चुकते करतो. जिथे शक्य होईल तिथे सगळीकडे कार्डच वापरतो पण व्याज भरायला लागणार नाही याची काळजी घेतली की झाले.
त्यातून दोन फायदे झाले. पहिली गोष्ट म्हणजे माझा कार्डाचा वापर चांगला असल्याने गेल्या १३ वर्षांत बँकेने माझे कार्ड आणि क्रेडीट लिमिट या दोन्ही गोष्टी वाढवून दिल्या. दुसरे म्हणजे आता माझे कार्ड चांगले असल्याने त्यावर पॉईंट्स खूप मिळतात आणि त्याचा वापर करून विमानाची तिकिटे आणि हॉटेल्स यांचा खर्च करता येतो. आम्ही फिरतोही भरपूर त्यामुळे या पॉईंट्सचा खूप उपयोग होतो. विमान आणि हॉटेल्स यांच्या एकूण खर्चापैकी ७०% पॉईंट्स वापरून भरता येतो तर उरलेला परत कार्डावर करून त्यावरही आणखी पॉईंट्स मिळवता येतात. जानेवारीत गोव्याला आणि मार्चमध्ये चिकमागळूरला फिरायला गेलो होतो. या पॉईंट्समुळे साध्या हॉटेलात अन्यथा जितके बिल भरावे लागले असते तितक्याच खर्चात खूप चांगली हॉटेल्स राहायला मिळतात. नाहीतर माझ्यासारखे लोक अशा हॉटेलात कधी राहायला जाणार? विमानतळांवर अनेक लाऊंजेस केवळ अशा कार्डधारकांसाठी असतात. त्या लाऊंजमध्ये प्रवेश मिळायला अन्यथा ८०० ते १५०० रूपये लागतात ते या कार्डावर अवघ्या २५ रूपयात होते (आणि ते २५ रूपयेही २५ मिनिटाच्या आत परत क्रेडीट केले जातात- म्हणजे फुकटात लाऊंज मिळते). बाहेर सगळे दाटीवाटीने अरूंद खुर्च्यांमध्ये बसलेले असतात त्यापेक्षा लाऊंजमध्ये आरामात बसणे आणि आपल्या विमानाचे स्टेटस 'नाऊ बोर्डिंग' हे बदलल्यावर आपल्या गेटवर जाणे असले राजेशाही प्रकार करता येतात. इतकेच नाही तर लाऊंजमध्ये केवळ मदिरापानासाठी पैसे आकारतात (ते मी अन्यथाही करत नाही) पण इतर सगळे खाणे बफेमध्ये असते त्यावर कोणतेही पैसे आकारले जात नाहीत. याचा उपयोग असा की परतीच्या विमानाची वेळ रात्रीची असेल तर विमानतळावरून घरी येऊन परत जेवायचे बघायचा त्रास नाही. विमानात चढण्यापूर्वीच लाऊंजमध्ये जेवता येते.
तेव्हा सांगायचा मुद्दा म्हणजे क्रेडीट कार्ड ही एक दुधारी तलवार आहे. दुसर्या बाजूच्या धारीमुळे आपण कापले जाणार नाही याची काळजी घेतली तर कार्डाचे खूप उपयोग आहेत. पॉईंट्स-लाऊंजचा जरी वापर केला नाही तरी अचानक खर्च करायला लागला तर तो तात्पुरता कार्डावर करून मग आपली इन्व्हेस्टमेंट विकून पैसे यायला थोडा वेळ लागला तरी काही टेंशन नाही.
9 Apr 2021 - 10:33 am | अमर विश्वास
चंद्रसूर्यकुमार ... उत्तम प्रतिसाद
क्रेडिट कार्ड वापराचे फायदे असंख्य आहेत .... क्रेडिट कार्डाचा मुख्य तोटा जो लोक सांगतात ... तो क्रेडिट कार्डाचा दोष नसून आपल्यात आर्थिक शिस्त नसल्याचा परिणाम आहे.
जर तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करत असाल , भरपूर फिरत असाल (सध्याचा काळ जाऊदे) तर क्रेडिट कार्ड हवेच
9 Apr 2021 - 11:43 am | मुक्त विहारि
हा सध्या तरी, "खर्चिक वृत्ती", हा माझा स्वभावदोष असल्याने, दूरच राहतो...
9 Apr 2021 - 12:57 pm | सुबोध खरे
१९८८ पासून क्रेडिट कार्ड वापरत आहे पण आजतागायत एक दमडी सुद्धा व्याज भरलेले नाही. आणीबाणीच्या परिस्थितीत क्रेडिट कार्डासारखा मित्र नाही.
उदा ऍमस्टरडॅम मध्ये तातडीने विमानाचे तिकीट काढायचे होते तेंव्हा क्रेडिट कार्डावर ७८ हजार रुपये भरून दोघांचे तिकीट काढले आणि अर्ध्या तासात विमानात बसलो.
२०१९ मध्ये टाटा मध्ये आईची शल्यक्रिया करायची होती तारीख दुसऱ्या दिवसाचीच मिळाली तेंव्हा रोख पैसे घेऊन गेलो पण तेथे १ लाख ८० हजार पेक्षा जास्त रोख भरताच येत नाही आणि हि रोख रक्कम तर तिच्या चाचण्यांत संपत आली होती. लगेच २ लाख रुपये क्रेडिट कार्डावर भरून टाकले आणि सावकाश एक महिन्याने पैसे बँकेला परत दिले.
केवळ पैसे मिळत आहेत/ खिशात आहेत म्हणून खर्च करू या वृत्तीला आळा घालण्यासाठी मी मुलांना शाळेत असताना हजार रुपये खिशात देऊन मॉल मध्ये पाठवत असे. त्यामुळे दोन्ही मुलांचे पैशाबाबतचे अप्रूप संपले आणि आता कमवायला लागल्यावर खात्यात/खिशात भरपूर पैसे असले तरी ते वायफळ खर्च करत नाहीत. दोन्ही मुलांचे क्रेडिट कार्ड असून ते फुकटचे खर्च करत नाहीत.
9 Apr 2021 - 1:21 pm | चौकटराजा
ह्या धाग्याशी संबंधीत नाही तरी लिहितो ..
मी २०१७ मध्ये पत्नी व मी असे दोघेजण इटाली ,फ्रान्स , व स्वीस असा स्वतंत्रपणे १३ रात्री १४ दिवस प्रवास करून आलो. या काळात मला घरी संपर्क करण्यासाठी कुठेही कसलेही सीम कार्ड लागले. नाही. जिथे मी राहाणार आहे तिथे वाय फाय असल्याची खात्री करून घेतली होती. रोज घरी व्हिडीओ कॉल करून बोलत असे. अशीच मला कधीही क्रेडिट कार्ड ची गरज पडली नाही. प्रचंड ऑन लाइन खरेदी करीतच नाही ! मी भारतातही फिरतो पण क्रेडिट कार्ड कशाला हवे हा मला प्रश्न पडलेला आहेच . डेबिट कार्डावर माझे काम भागते .
9 Apr 2021 - 7:31 pm | सुबोध खरे
क्रेडिट कार्डच कशाला डेबिट कार्ड सुद्धा अत्यावश्यक सोडाच आवश्यक पण नाही.
लोक रोख पैसे घेऊन फिरतातच कि.
पण मी लिहिलंय तसं आणीबाणीच्या परिस्थितीत मला ६ लाख रुपये पर्यंत वापरता येतात.
टाटा मध्ये हेच खिशात रोख पैसे असूनही उपयोग झाला नाही. आणि डेबिट कार्डातून एवढे पैसे काढण्यासाठी बचत खात्यात तेवढे पैसे ठेवणे आवश्यक ठरले असते.
५ लाख रुपये बचत खात्यात ठेवणे फारसे शहाणपणाचे ठरणार नाही असे मला वाटते.
क्रेडिट कार्ड हि सुविधा आहे. ज्याला वापरता येते त्याला त्याचा भरपूर फायदा करून घेता येतो.
14 Sep 2021 - 1:46 pm | hrkorde
बचत खात्याला आजकाल एफ एफ डी म्हणुन सुविधा मिळते, त्यात बेसिक २५००० ठेवून उरलेली रक्कम आपोआप एफ डी त जाते, आपण चेक ने काढा वा कार्ड ने , ५००० च्या पटीत एफ डी आपोआप ब्रेक होते, पैसे जमा केले , पगार जमा झाला कि आपोआप एफ डी होते,
वर्शाच्या शेवटी फ्क्त इन्टरेस्ट सर्टिफिकेट मागितले कि आपोआप इण्टरेस्ट ची टोटल मिळते.
डेबिट कार्ड म्हातार्या लोकाना गरजेचे आहे, खेड्यातील एकटे म्हातारे लोक अजुन चेक वापरतात, स्वत जाऊ शकत नाहीत, मग शेजार्याच्या नावावर ५, १० हजाराचा चेक देऊन तो आणतो, पण हे फ़्त तो ऑफिस हवरस मध्येच करेल, डेबिट कार्ड दिले की तो कधीही काढून आणिल, अकाउण्टला रक्कम फक्त खर्चाइतकिच मुले पाठवतात. त्यामुळे जास्त धोकादायक नाही
16 Sep 2021 - 8:07 pm | सुबोध खरे
याला रिव्हर्स स्वीप इन सुविधा म्हणतात.
स्वीप इन सुविधेमध्ये आपल्या बचत खात्यात पुरेसे पैसे नसले तर पाहिजे तितके पैसे मुदत ठेवीतून आपोआप काढले जातात. यासाठी पूर्ण मुदत ठेव हि एक रुपयाच्या मुदत ठेवीत विभागलेली असते. म्हणजे १० हजार रुप्याच्या मुदतठेवींपैकी गरज असतील तितके म्हणजे १३ रुपये सुद्धा काढून घेतले जातात आणि उरलेल्या ९९८७ रुपयाची मुदत ठेव चालू राहते. हि सुविधा मी एच डी एफ सी बँकेत दोन दशके वापरत आहे.
रिव्हर्स स्वीप इन सुविधे मध्ये तुम्ही सुचवलेल्या रकमेपेक्षा खात्यात रक्कम जास्त झाली कि तितकी रक्कम आपोआप मुदत ठेवी मध्ये रूपांतर केली जाते यामुळे आपल्या खात्यात नुसत्याच पडून राहणाऱ्या पैशावर जास्त व्याज मिळतं. हि सुविधा आय सी आय सी आय बँकेत आहे.
16 Sep 2021 - 9:24 pm | शाम भागवत
साधारणत: व्याजदर काय असतो?
म्हणजे सेव्हींग खात्यावर मिळतो त्यापेक्षा किती जास्त असतो?
16 Sep 2021 - 11:49 pm | hrkorde
व्याज दर एफ डी चा मिळतो
पण आजकाल सेविंग अन एफ डीत असा किती फरक रहायलाय ?
सेविंग 4 % आणि एफ डी 6 % , पोष्टमध्ये 7 %
काँग्रेसच्या काळात हे 7 , 10 , 12 होते
गेले ते दिवस
17 Sep 2021 - 9:48 am | सुबोध खरे
आणि उद्योगधंद्याला कर्ज १८-२४ टक्के त्यामुळे भारतात कर्ज घेऊन उद्योग करणे हि अशक्य गोष्ट होती.
वर आयकराचा सर्वात जास्त दर ९७. ७५% श्रीमती इंदिरा गांधी यांच्या काँग्रेसी राज्यात होता.
म्हणजे १००० रुपये कमावले तर २५ रुपये आपल्याला आणि ९७७५ रुपये सरकारला
From an eye-watering 97.75 per cent as the highest tax rate and 11 tax slabs, to 30 per cent as the highest rate and three slabs, India and her taxpayers have come a long way since Independence
आणि गृह कर्ज १६ %.
बेसुमार झोपड्या वाढण्याचे ते एक कारण आहे.
सरकार सारखेच बँक सुद्धा दुसऱ्याचे घेतल्याशिवाय तिसऱ्याला काहीच देऊ शकत नाहीत.
16 Oct 2021 - 9:48 am | टीपीके
तुमच्या इतर प्रतिसादावरून असे जाणवते की तुम्ही डॉक्टर आहात, याच आणि आणखी एका धाग्यावरून असे दिसते की तुम्ही शेअर मार्केट मधे गुंतवणूक करता, ते ही वायदा बाजारात म्हणजे पैसा आणि त्या संबंधित विषयांशी आपली बऱ्यापैकी ओळख आहे. एकूण तुम्ही शिक्षित आहात आणि तरीही असा प्रतिसाद?
अशा प्रतिसादाचे मला सुचणारे कारण म्हणजे खोडसाळपणा, किंवा ज्यांना माहिती नाही त्यांच्यात भ्रम किंवा बुद्धिभेद पसरवणे.
तुमचे कारण काय? एखाद्यावेळेस आता तुम्ही उत्तर देणार नाही आणि इतर कुठेतरी अशीच घाण कराल. पण कधीतरी उत्तर द्या.
किंवा तुम्हाला चढे व्याजदर अर्थव्यवस्थेसाठी उत्तम असे वाटत असेल तर ते कसे हे समजावून सांगा.
16 Oct 2021 - 11:39 am | गणेशा
सर्वांना एक request आहे,
कृपया वयक्तिक हेवेदावे आणि राजकारण यावर या धाग्यांना नेऊ नये.
ह्या धाग्याचा उद्देश सोप्प्या भाषेत थोडेसे ज्ञान देणे आहे.
काही वेळेस इतरांचे पटले नसेल तर योग्य पद्धतीने विचारपूर्वक लिहावे..
16 Oct 2021 - 12:28 pm | टीपीके
माफ करा, मी फार क्वचित लिहितो, पण गणिताच्या धाग्यावर आत्मविश्वासाने २ + २ = ५ म्हणणारे, ते पण स्वतःच्या राजकीय अजेंडा पसरवण्यासाठी आलेले ट्रोल्स सहन नाही झाले म्हणून लिहिले. एखादा चांगला धागा खराब करण्याची सुपारी घेतात का हे लोक? Anyways, I'll not spoil this further from my side
16 Oct 2021 - 7:26 pm | सुबोध खरे
काँग्रेसच्या काळात हे 7 , 10 , 12 होते
हि पचपच कुणी आणली आहे?
3 Nov 2021 - 4:25 pm | चेतन सुभाष गुगळे
माझ्या पहिल्या नोकरीच्या वेळी आधी देवेगौडा, नंतर गुजराल आणि मग वाजपेयींचे सरकार होते तेव्हा मी तर मुदत ठेवींवर १६ टक्के दराने व्याज घेतले आहे. या व्याजदरांचा कोणत्या पक्षाचे सरकार आहे याच्याशी काहीच संबंध नाही. शिवाय तेव्हा माझा पगार फक्त चार अंकी असूनही चार वर्षांच्या पगारात पिंपरी चिंचवड नवनगरात एक चांगला फ्लॅट खरेदी करता आला असता (पण मी केला नाही ही गोष्ट वेगळी).
9 Apr 2021 - 2:00 pm | चौकस२१२
क्रेडिट कार्डाचा मुख्य तोटा जो लोक सांगतात ... तो क्रेडिट कार्डाचा दोष नसून आपल्यात आर्थिक शिस्त नसल्याचा परिणाम आहे.
अगदी बरोबर.. मला तर वापरावे लागते कारण गृहकर्ज आणि ऑफसेट अकाउंट याचयातच जे पैसे महिनाभर येतात ( येथे दर आठवड्याला पगार मिळतो ) आणि इतर काही आवक असले तर ती ऑफसेट मध्ये ठेवायची जेणे करून गृहकर्जावरील व्याज कमी होण्यास फायदा होतो ..मग महिन्याचाच सगळं खर्च क्रेडिट कार्ड वरून करायचा आणि वेळच्यावेळी ते भरून टाकायचे
( ऑफसेट अकौंट हि गोष्ट भारतातात नसल्यमुळे माझे हे विधान भारताला लागू होत नाही इतर देशात कदाचित होईल ! )
9 Apr 2021 - 12:41 pm | तुषार काळभोर
मी कॉलेजात असताना(२००६) पार्टटाईम जॉब करत होतो, तेव्हा आठ हजाराच्या पगारावर मला ५०००० प्रत्येक लिमिट असलेले सिटी क्रेडिट कार्ड मिळाले. मग त्यावरून आयसीआयसीआय चे अजून एक ५०००० लिमिटचे कार्ड मिळाले. पण आर्थिक अक्कल जवळपास शून्य असल्याने उत्पन्नापेक्षा खर्च जास्त झाला आणि दोन्ही मिळून ७२,००० डिफॉल्ट केले. ते एकून ४०,००० मध्ये सेटल केले, पण अजून माझ्या सिबिल मध्ये दिसतात.
पाच वर्षांपूर्वी एसबीआय मध्ये एफडी करून त्यावर क्रेडिट कार्ड घेतले. उद्देश होता क्रेडित रेटिंग सुधारणे. ते हळूहळू सुधारतंय. पण मी त्या कार्डचा भरपूर उपयोग करतो. दर महिना लिमिटच्या किमान पन्नास टक्के खर्च असतो. स्थानिक किराणा दुकान सोडून बाकी जवळजवळ सगळा खर्च क्रेडिट कार्ड्नेच करतो. क्वचित ८०% आणि फक्त एकदा ९०+ झाला होता. पण एक नियम पाळतो. पाच वर्षात एकदाही पार्शल पेमेंट केलेले नाही. २५ ला स्टेटमेंट जनरेट झाले की ३०/३१ ला पगाराचा एसेमेस आल्या आल्या पहिल्यांदा क्रेडिट कार्ड्चं पूर्ण बिल भरतो.
9 Apr 2021 - 12:58 pm | गणेशा
मी गेले १० वर्षे झाले cr card वापरतोय..
आणि माझा स्वभाव खुप खर्चिक असल्याने माझे management खुप म्हणजे खुपच चुकीचे होते, त्याची फळे खुप भोगावी लागली मला..
ती चूक सर्वस्वी माझ्या स्वभावा मुळे होती , आजकाल मी माझ्या वागण्यात कमालीचा change केलाय.. संयम हा नविन गुण शिकलोय..
पण आता ज्या मुळे माझे बरेच आर्थिक अडाखे चुकले त्याला मी बंद करणार आहे..
माझे cr limits खुप आहेत, खुप uregency मध्ये लागले तर म्ह्णून वरती सुटकेस मध्ये ठेवून देणार आहे cards... आणि सर्व त्याचा online data काढून टाकेल माझ्याकडून..म्हणजे online व्यवहार पण नाही करणार.. Manage करेल card तसे...
मला वयक्तिक रित्या कार्ड वापरता येत नाही..
माझी गरज ५ k च्या वस्तूची असेल आणि माझ्याकडे ८k असले तरी cr card मुळे मी त्यातील सगळ्यात भारी म्हणजे १५k ची वस्तू घेत, मग पगार झाला कि गेले पैसे.. आणि मग saving zero..
गेल्या २ वर्षांपासून हे टाळतोय पण आता नकोच cards आणि ते points पण नको इतका तोटा सहन केलाय मी..
--
साधे dmart चे पण माझे तसेच होते, २ हजार च्या सामानाला ५ हजार बिल केल्यावर बाहेर यायचो.
गेल्या काही वर्षांपासून जे पाहिजे ते लोकल किराणा दुकानातून चिठ्ठी देऊन घेतो, ते घरी पण आणून देतात..
आणि वर्षात एकदा time पास म्हणुन जातो dmart ला..
---
खाणे आणि फिरणे यावर मात्र मी खर्च करतो, पण तो debit नेच करेल हे नक्की..
9 Apr 2021 - 9:06 pm | बिटाकाका
आवडला प्रतिसाद! माझेही क्रेडिट कार्ड बद्दल असेच मत आहे. काही वर्षांपूर्वी माझे क्रेडिट कार्ड बद्दल अतिशय नकारात्मक होते, पण हळूहळू वापरानंतर मत पूर्णपणे बदलून गेले. आता शक्य असेल तिथे क्रेडिट कार्ड वापरायचा प्रयत्न करतो.
************
अमेरिकन security consultant Frank Abagnale यांचा हा एक व्हिडिओ मागे बघण्यात आला होता, बरीचशी मते पटण्यासारखी आहेत.
https://youtu.be/QzZPkdR6Xkk
9 Apr 2021 - 10:28 am | गोंधळी
गणेशा जी ब्रोकर कुठला निवडावा उदा. icici direct, Zerodha, Sharekhan, SBI Securities....
चांगली सेवा देणार्या दलाल पेढी कोणत्या आहेत? कुठले चार्जेस लागतात?
यावर ही जरा मार्गदर्शन करा.
9 Apr 2021 - 10:43 am | गणेशा
मागे पण हाच प्रश्न कोणी तरी विचारला होता तेंव्हा मी उत्तर दिले नव्हते..
मला वाटते full stack broker आणि discounted broker दोन्हीचे काही फायदे आणि काही तोटे आहेत..
Full stack चांगली सेवा देतात आणि चार्जेस पण..
Discounted broker प्लॅटफॉर्म चांगला देतात पण सेवा नाही..
आपण आपली गुंतवणूक कश्या पद्धतीने करतो आहे त्यावर हे निवडायचे.. मी stocks रोज खरेदी विक्री करत नाही, intra day नाही म्हणुन मला platform हवा म्हणुन zerodha वापरतो..
मला सोप्पे वाटते हे app..
पण याचे तोटे हि आहेतच..
मला थोडे दिवस द्या..
यावर जमल्यास स्वतंत्र लेख लिहिल सगळे फायदे तोटे..दोन्ही कडचे
किंवा येथे रिप्लाय करेल लहान प्रतिसाद असेल तर..
9 Apr 2021 - 1:06 pm | बिटाकाका
मीच विचारला होता प्रश्न. कोणता ब्रोकर किती ब्रोकरेज घेतो अशी तुलना नाही, तर ब्रोकर कुठल्या सेवा सुविधा देतोय, कुठले ऍनालिसिस पर्याय देतोय, प्लॅटफॉर्म कसा आहे, वापरण्याची सुलभता (ease of use) कशी आहे इ. इ. यावर एक धागा काढता येईल.
9 Apr 2021 - 1:10 pm | गणेशा
नक्कीच.. तुम्ही लिहाल काय जमल्यास, प्लिज.
9 Apr 2021 - 3:58 pm | बिटाकाका
मी काढू शकलो असतो पण मी फक्त आयसीआयसीआयच वापरले आहे त्यामुळे तुलना अनुभवावर आधारित होणार नाही. कुणी दोन किंवा जास्त प्लॅटफॉर्म वापरले असतील तर त्याला व्यवस्थित अनुभव मांडता येईल.
14 Sep 2021 - 1:54 pm | hrkorde
झिरोदा मस्त आहे, व्यवहार चोख आहेत , ग्राफ चाण्गले दिस्तात , मोबाइल वरुन हि चांगले होते, बोकरेज २० रु पर ट्रेड , पण ऑप्शन ट्रेडिन्ग मधले काहि लांबचे ऑप्शन बाय होत नाहीत, रिटेल इन्वेस्ट्रचे लिमिट संपले असे म्हणून ट्रेड अलाउ होत नाहीत
आक्सिस मध्ये आताच उघ्डले, पण चांगले वाटले नाहि, मोबाइल अॅपमध्ये लिमिटेड सोयी आहेत, बोकरेज १० रु पर लॉट
तुम्हि ट्रेड करा न करा , पण अभ्यास करायचा असेल तर झिरोदात अकाउण्ट उघडाच
9 Apr 2021 - 4:33 pm | असा मी असामी
धन्यवाद , share मार्केट कि mutual फंड कश्यामध्ये गुंतवणूक करावी असा गेले २-३ महिने विचार करत आहे त्या साठी लेखमालेची मदत होईल.
खरे सांगायचे तर share मार्केट मध्ये गुंतवणूक केली आहे पण पाहिजे तसे returns नाही मिळाले. त्याला कारण जास्त अभ्यास न करता गुंतवणूक करणे. पण जास्त तोटयात नाही कारण मी जेंव्हा सुरवात केली तेंव्हा एका मित्राने कानमंत्र दिला होता कि "मार्केट मध्ये तेच पैसे गुंतव कि जे परत नाही मिळाले तरी तुला काही फरक पडणार नाही "
9 Apr 2021 - 5:43 pm | गणेशा
असे मी बऱ्याच जणांकडून ऐकले आहे.
माझे मनातले सांगतो..
अश्या फरक पडणार नाही ह्या संकल्पने मुळे गेले तर गेले, आले तर आले असा आपण विचार करू लागतो .. आणि मग आपल्यातला अभ्यास, analysis पणा, आपण उपयोगात आणत नाही..
जे पैसे extra वाटतात आणि गेले तर गेले असे वाटत आहेत, ते तुम्ही mutual funds मध्ये टाका आणि विसरून जा , त्यात तुम्हाला नुकसान होणार नाही..उलट काही वर्षानंतर खुप फायदा दिसेल..
आणि share market मध्ये तेंव्हाच पैसे टाका जेंव्हा तुम्ही त्याकडे फक्त गुंतवणूक म्हणुन न पाहता, व्यवसाय किंवा income म्हणुन पाहताल..
आपला aproch आपला दृष्टीकोन ठरवत असतो..आणि ह्यात तुम्ही बदल केला तर फक्त येथेच नाही जीवनात सगळीकडे तुमचा पाहण्याचा दृष्टीकोन बदलेला असेल...
बाकी आता जे negative आहेत, ते असे समजा शिकण्याची fee होती.. आणि नविन सुरुवात करा..
10 Apr 2021 - 9:12 am | अभिजीत अवलिया
सहमत. मी वैयक्तिकरित्या शेअर मार्केटला माझा स्वत:चा बिझनेस समजतो. त्यामुळे सजगता राहते. आणि निर्णय काळजीपूर्वक विचार करुन घेतले जातात.
19 Apr 2021 - 11:21 am | मराठी_माणूस
इनफोसिस बाय बॅक करणार आहे अशी बातमी आहे (१७५०/-). सध्या भाव १३५७ च्या आसपास आहे. मग आता घ्यायला हवे का ?
19 Apr 2021 - 7:27 pm | तुषार काळभोर
पण फिक्स १७५० ला नाही.
रोजच्या रोज मार्केट प्राइस ला विकत घेणार आहे. आणि कंपनी १७५० चा पुढे विकत घेणार नाही.
म्हणजे उद्या अचानक शेअर १८०० वर गेला तर कंपनी शेअर विकत घेणे थांबवेल.
12 Sep 2021 - 10:05 pm | hrkorde
ऑप्शनवर इथे कुणी लिहीत किंवा करत नाही का ?
17 Sep 2021 - 6:13 am | चौकस२१२
https://www.theocc.com/Company-Information/Investor-Education
खूप गुंतागुंतीचा विषय आहे .. येथे उत्तम माहिती ( खुलासा हे अमेरिकेतील आहे भारतातील ऑप्शन कसे असतात त्यांचे मुल्याकंन, सेटलमेंट वेगळे असू शकते, तपासून घेणे )
13 Sep 2021 - 12:30 am | आग्या१९९०
शेअर मार्केटमध्ये महिन्याला १०% कोणी रिटर्न्स मिळवत असेल असा विश्वास नसणाऱ्यांची इथे संख्या जास्त असल्याने असे विषय येथे कोणी काढल्यास त्याची मनसोक्त चेष्टा करतात. ऑप्शन म्हणजे जुगार की हो त्यांच्यासाठी.
17 Sep 2021 - 5:50 am | चौकस२१२
शेअर मार्केटमध्ये महिन्याला १०% कोणी रिटर्न्स मिळवत असेल असा विश्वास नसणाऱ्यांची इथे संख्या जास्त असल्याने
अश्या विधानावर अविश्वास दाखवणाऱ्या पैकी मी एक होतो असे मी कबुल करतो हे असले विधान कोणत्या पद्धीतीने केलं यावर सगळे अवलंबून आहे
महिना १०% म्हणजे वार्षिक १२०% एवढा परतावा जगात कोन आणि किती कमी लोक मिळवू शकत असतील यावर ज्यांनि थोडा अभ्यास केला आहे ते म्हणणार कि असे सरसकट विधान करू नका म्हणून
"महिना १०% परतावा" काय किंवा "ऑप्शन म्हणे जुगारच (च) हि दोन्ही विधान टोकाची आहेत
मी ऑप्शन आणि फुचर सारखया लिव्हरेज्ड इन्स्ट्रुमेंट मध्ये काम केलं आहे तरी मी म्हणेन कि शेअर मध्ये १०% महिना परतवा हे प्रचंड म्हणजे प्रचंड अवघड काम आहे. पण हे तुम्ही नक्की काय वापरताय यावर पोण अवलंबून आहे प्रत्यक्ष शेअर ( डिलिव्हरी ) , लिव्हरेज डे ट्रेडिंग कि शार फुचुर जयंत अनंतरभूत लिव्हरेज असते .. काही का असेना १०% महिन्याला हा फार फार मोठा दावा झाला
बरेचदा एकतर विधान करणारे आधी हे स्पष्ट करीत नाहीत कि ते "लिव्हरेज वापरतात कि नाही" हा फार मोठा मुद्दा आहे. लिव्हरेज वपरून महिना १०% काय दिवस १००% पण कमवीत येतात किंवा घालविता येतात ..
साधे हे बघा कोणी म्हणाले कि "मी शेअर बाजारात शिरू इच्छितो" कीवा "मी त्यात काम करतो" तर प्राथमिक प्रश्न पडतो कि हा माणूस
१) गुंतवणूक कि उलाढाल? बद्दल बॊलतोय?
२) उलाढाल असले तर शेअर प्रत्यक्ष विकत घेणे विकणे कि त्यावरील फुचार किंवा ऑप्शन मध्ये खेळणे ? या बद्दल बोलतोय?
बर ऑप्शन बद्दल, याला जुगर म्हणायचे दोन करणे असतात १) त्याची वेळेनुसार ह्रास होत जाणारी किंमत २) लिव्हरेज आणि अमर्याद तोटा होण्याची शक्यता पण तुम्ही ऑप्शन कशासाठी वापरता त्यावर हे सगळे अवलंबून आहे ( यावर आंतरजालावर सी एम इ एकचेन्ज वॉर बरच माहित मिळेल)
साध्या शेअर मधील उलाढाली पेक्षा ऑप्शन मध्ये खूप गुंतागुंत आणि वेगवेगळे मुद्दे लक्षात घयावे लागतात त्यामुळे कदाचित या पासून नवशिक्यांनी जरा दूर राहावे असे म्हणले जात असावे पण म्हणून ते संपऊर्ण जुगार आहे असे म्हणणे हि टोकाचं होईल
आर्थिक ऊलढाल हे गंभीर आहे यात वारंवार माहिती आणि विधाने कोणी केली तर नवशिक्यांचाच तोटा होऊ शकतो म्हणून काळजी घेणे जरुरीचे आणि जबाबदारी चे आहे
चहर बाजूने विचार करणे महत्वाचे..
17 Sep 2021 - 6:07 am | चौकस२१२
"जुगार" आणि "बाजारात पत्करलेला धोका" यात थोडं फरक आहे असे म्हणले जाते
कसे ते उदाह्रणसकट
-घोडयावर "जिकणार" म्हणून बुक मेकर किंवा टोट वर पैसे लावणे हा जुगार कारण त्याचे एकदा पैसे लावले आणि जर्र तुम्ही हरताय असे दिले तर त्यातून तुम्हाला "ट्रेंड आऊट" करता येत नाही आणि दुसरे असे कि बेत फक्त "अमुक अमुक जिकणार" यावरच लावता येते
- घोडयावर बेटिंग एक्सचेंज मध्ये तुम्ही एक तर दोनही बाजूने ( जिकेलं किंवा हरेल) असे पैसे लावू शकता आणि लावल्यानंतर जर हरताय असे दिसले तर उलटी बाजूने बेत लावून आपलं १००% होणार तोटा कमी करता येतो याला म्हणतात ट्रेडिंग
शेवटी जोखिम हि आहेच
17 Sep 2021 - 7:46 am | hrkorde
ऑप्शनवर स्वतंत्र धागा काढत आहे. पण तिथे अर्थकारण सेक्शन दिसत नाही आहे. चर्चा विभागात लिहायचे का ?
28 Sep 2021 - 10:40 am | कर्नलतपस्वी
पहिल्यांदाच वाचले , शेअर मार्केट ची वाट कधी धरली नाही पण क्रेडिट कार्ड मात्र खुप वर्षा पासून मनसोक्त वापरले. शिस्तबद्ध जीवन जगल्यामुळे याचा खुपच फायदा झाला. धन्यवाद आता बाकी धागे पण वाचेन.
13 Oct 2021 - 5:01 pm | mangya69
Today's Day is TATA'S Day:
TATAMOTORS 19%++
TATAPOWER 15%++
TATA STEEL 3%++
TATASTLLP 3%++
NELCO 5%++
RALLIS 6%++
TINPLATE 6%++
TATA COFFEE 6%++
TATA METALIC 3%++
INDIAN HOTEL 5%++
TATA CHEMICALS 17%++
TATA COMMUNICATIONS 5%++
TATA ELXSI 2%++
TATA INVESTMENT 14%++
TITAN 4%++
TATASTEEL BSL 3%++
Cost of AIR INDIA acquisition nikal gai in just 3 hrs
TATA Group has added 70,000 crore to the market cap today....!! That too without TCS...
13 Oct 2021 - 5:01 pm | mangya69
शेअर मार्केटचे बेसिक तत्व आहे
Buy on rumours
And sell on news
आता जेंव्हा नफ्यातोट्याचे प्रत्यक्ष आकडे येतील , तेंव्हा पडायचे तेंव्हा पडेल
11 Jan 2022 - 6:52 pm | धर्मराजमुटके
एकीकडे सरकार सरकारी कंपन्या विकून बाहेर पडत असताना वोडाफोन आयडीया मधे ३५.८% चा वाटा घेऊन नक्की काय करणार आहे कळत नाही ? भविष्यात वोडाफोन / बीएसएनएल विलिनिकरण होऊ शकेल काय ? किंवा दुसर्या कोणत्या प्रकारचा तांत्रिक सामंजस्य करार वगैरे ?
12 Jan 2022 - 1:21 pm | सॅगी
लिंक
या बातमीनुसार, वोडाफोन आयडीया मॅनेज करण्यात सरकारचा काहीही हात असणार नाही. त्यामुळे बीएसएनएल सोबत विलीनीकरण वगैरे काही होणार नाही.
12 Jan 2022 - 8:51 pm | धर्मराजमुटके
बातम्या फक्त म्हणायला. सरकार बदलली की मते बदलतात, कधी कधी आहेच त्या सरकारचे मतपरिवर्तन होते. आज तोट्यात आहे म्हणून कदाचित रस नसेल, उद्या कोंबडी अंडी द्यायला लागली की काही सांगता येत नाही. असो...
बघूया काय होते ते.
14 Jan 2022 - 9:17 am | सॅगी
पण सध्या तरी आहे हे असे आहे. तसेही सरकारला दूरसंचार कंपनी सक्षमपणे चालवता येत असती तर आज बीएसएनएल पहिल्या नंबरवर असती... :)
हे ही खरंच...आयआरसीटीसीचे उदाहरण आहेच की डोळ्यासमोर. ;)
11 Jan 2022 - 7:34 pm | आग्या१९९०
भविष्यात वोडाफोन / बीएसएनएल विलिनिकरण होऊ शकेल काय ?
तोंडात साखर पडो.