तक्रार

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जे न देखे रवी...
13 Apr 2009 - 4:30 pm

सखे मी शोधीतो तुझाच चंद्र कधीचा
पाणावले नयन दर्शना तरसले

का चांदणे सदा बरसले तुजवरी
बरसताना कसे मलाच विसरले

मोहरला देह ओलावली काया तुझी
वाटेवरुन माझ्या मेघही परतले

सावरले तुज पाहता मुग्ध दंवबिंदु
क्षितीजावरले माझ्या धृवही सरकले

थांबली पुनव, सखे तुज स्वागता
स्वप्नातले बघ माझ्या चंद्रही फिकुटले

विशाल

कविता

प्रतिक्रिया

अनंता's picture

13 Apr 2009 - 5:52 pm | अनंता

तक्रार नोंदवून घेतलीये.
बघेन कोणते कलम लावायचे ते.
कृ. ह.घ्या.
आपला- फुकट फौजदार , बिनपगारी , पुर्ण अधिकारी -अनंता.
घरी आमच्या शब्दाला काडीचीही किंमत नसल्याने, संस्थळावर आम्ही फुकट समुपदेशन करत असतो ;-)

प्राजु's picture

13 Apr 2009 - 6:22 pm | प्राजु

खूप छान .

का चांदणे सदा बरसले तुजवरी
बरसताना कसे मलाच विसरले

मोहरला देह ओलावली काया तुझी
वाटेवरुन माझ्या मेघही परतले

या ओळी विशेष आवडल्या. :)

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

शितल's picture

13 Apr 2009 - 6:25 pm | शितल

तक्रार आवडली..
कवितेतील छान कल्पना आहे. :)

क्रान्ति's picture

13 Apr 2009 - 7:50 pm | क्रान्ति

खूप छान कविता.
:)
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com