शब्दखेळ : विरंगुळा (भाग २)

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
20 Jul 2020 - 11:32 am

भाग १

नव्या धाग्यावर स्वागत.

नवा खेळ : शब्दव्यूह आणि अंताक्षरी

खाली ओळीने नऊ अक्षर समूह दिले आहेत. प्रत्येक समूहातून तुम्हाला एक अर्थपूर्ण शब्द ( दिलेल्या अक्षरसंख्येचा आणि शोधसूत्रानुसार काढायचा आहे). आता पुढे अंताक्षरी अशी चालू होईल:

• पहिल्या समूहातून योग्य शब्द निघाल्यावर त्याचे शेवटचे अक्षर पहा.
• त्या अक्षराने सुरू होणारा सूत्रानुसार योग्य शब्द दुसऱ्या समुहात आहे. तो ओळखा.
• पुन्हा वरील शब्दाचे शेवटचे अक्षर घेऊन तिसऱ्या समुहातील शब्द शोधा.

• असे क्रमाने खाली जात राहा.
• आठव्या शब्दाच्या शेवटच्या अक्षराने सुरू होणारा शब्द शेवटच्या समूहातून ओळखा. आता या शब्दाचा क्रमांक १ मधील शब्दाशी अर्थाने जवळचा संबंध आहे. तो सिद्ध झाल्यासच कोडे पूर्ण झाले असे समजावे.

• कोडे मध्यावर असताना जर तुम्ही पर्यायी शब्द काढलेत तर ते चूक ठरतील. कारण अंताक्षरी जुळली पाहिजे आणि शेवटी १ व ९ ची अटही पूर्ण झाली पाहिजे. म्हणून अनुक्रमेच उत्तरे द्या.

• १ व २ ची उत्तरे एकदम लिहा. पुढे एकेक सुटे चालेल.
………………………………………………………………………………
१. उ प ड्या र व्या स न को. ( ४ अक्षरी, खाण्याचा पदार्थ).

२. डे र व्या स धो ज्ञा दा की वो र ( ५ अ, मानाचे पद ).

३. मु ल द की शा मी र्ती दु ख म ( ४, देवळाशी संबंधित)

४. डी ळ धी ख व शु ळा ढो ब शी ट री ( ५, धुमश्चक्री)

५. गौ ण बु ट की शू रा मी का जा (४, प्रहार ).

६. र घु शी रा ख डा गे म ख ग ळी ( ५, दाटी)

७. का व ल शु डा मी ण च स पे रा (४, युक्ती ).

८. बा ड न का च स बु मी हा तो च दी ( ६, गोपनीय बाबी सांगणारा).

९. स ण मा झा का शी श व द ल ट ( चार अक्षरी आणि शब्द १ शी अर्थाने संबंधित).
………………………………….

नवा प्रयोग आहे. चु भू दे घे !

भाषाविरंगुळा

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

13 Aug 2020 - 10:43 am | कुमार१

३ अनुदेशन
४ अनुभवाधारित
५ गुणवत्ताविकास

……
अक्षरसांगड हा एक नवा खेळ सुचवतो.

आपण यात ९ सुटी अक्षरे देतो. त्यापासून जमतील तितके किमान ३ अक्षरी शब्द करायचे.. (जास्तीत जास्त ९ पर्यंत कितीही अक्षरी शब्द चालेल ).

कोडेनिर्माता आधी शब्दांची किमान संख्या जाहीर करतो.
काही तासानंतर सहभागीं नी त्यांची यादी द्यायची.

३-४ जण इच्छुक असतील तर खेळू.
तसे लिहा
धन्यवाद.

ज्ञानोबाचे पैजार's picture

13 Aug 2020 - 1:51 pm | ज्ञानोबाचे पैजार

बरेच दिवस वाटच बघत होतो नव्या खाद्याची
टाका लवकर टाका
पैजारबुवा,

कुमार१'s picture

13 Aug 2020 - 2:17 pm | कुमार१

अक्षरसांगड खेळ

खाली दिलेल्या ९ अक्षरांतून किमान १५ सामान्य शब्द बनवा. सर्व शब्द किमान ३ अक्षरी. पण एक ७ अक्षरी हवा. बाकी कसेही. १ शब्द करताना १अक्षर एकदाच वापरा; पुढच्या शब्दासाठी पुन्हा घेऊ शकता.

न त इ

डी इ बा

मा र स

उत्तरे तुमच्याकडे फक्त तयार ठेवा. ४ तासांनी उघड करू.
……

काही नियम :
१. सर्व शब्द सामान्यनामे हवीत आणि मूळ रूपातले शब्द.
२. एकाच शब्दाचे एकवचन घेतले असल्यास त्याचे अनेकवचन चालत नाही.
३. सर्व शब्द अर्थातच अधिकृत हवेत.
४. जोडशब्द ( मध्ये – असलेले) नकोत.
५. हृस्व दीर्घ महत्त्वाचे.
........

एकेक शब्द इथे लिहू नका

ज्ञानोबाचे पैजार's picture

13 Aug 2020 - 3:25 pm | ज्ञानोबाचे पैजार

एवढा वेळा डोके फोडून फक्त दोन शब्द मिळाले
पैजारबुवा,

कुमार१'s picture

13 Aug 2020 - 4:07 pm | कुमार१

४ तास दिलेत !
नंतर मजा समजेल .

कुमार१'s picture

13 Aug 2020 - 6:17 pm | कुमार१

यादी सादर करू शकता.

खुप दिवसांनी आलो धाग्यावर..
प्रयत्न करून व्यनि करून ठेवतो तुम्हाला

गणेशा's picture

13 Aug 2020 - 7:08 pm | गणेशा

थोडा घाईत आहे, कॉल आहे..

15 शब्द आणि त्यातील एक 7 अक्षरी शब्द झालेत.

व्यनि करतोय.. येथे नंतर ड्या तुम्ही

कुमार१'s picture

13 Aug 2020 - 6:39 pm | कुमार१

चालेल !

गणेशा's picture

13 Aug 2020 - 7:19 pm | गणेशा

20 शब्द व्यनि केलेत.. नंतर बोलू.. :-)
काही चुकले असतील

कुमार१'s picture

13 Aug 2020 - 7:23 pm | कुमार१

बघतो !
धन्यवाद

कुमार१'s picture

14 Aug 2020 - 10:02 am | कुमार१

ज्ञा पै गायब ?

ज्ञानोबाचे पैजार's picture

14 Aug 2020 - 12:19 pm | ज्ञानोबाचे पैजार

दोनच शब्द झाले अन पुढे काही जमले नाही.
आज काही आपले डोके चालत नाहीये.
पैजारबुवा,

कुमार१'s picture

14 Aug 2020 - 12:33 pm | कुमार१

गणेशा यांचे शब्द:

मानस, इमारत, , बारस, सरमाडी, बारडी,
इतबार,, तरस, इतर, , इमान, तरडी, नरडी, समान,
इमानइतबार

... भर घालू शकता

गामा पैलवान's picture

14 Aug 2020 - 5:25 pm | गामा पैलवान

इ दोनदा आल्याने ८ च अक्षरं आहेत.
-गा.पै.

कुमार१'s picture

14 Aug 2020 - 5:58 pm | कुमार१

९ दिलेली अक्षरे असा अर्थ घ्यावा.
प्रकार नव्हे

गामा पैलवान's picture

15 Aug 2020 - 1:06 pm | गामा पैलवान

कुमारेक,

अक्षरांचा प्रकार हे काय आहे? तुम्ही केवळ ८ भिन्न अक्षरं दिलेली आहेत. इ हे अक्षर दोनदा दिलंय. म्हणजे दोन इ वापरता येतील, असं काही आहे का? उदा. : मानेतबारे

धन्यवाद.

आ.न.,
-गा.पै.

कुमार१'s picture

15 Aug 2020 - 1:28 pm | कुमार१

बरोबर.
१ शब्द करताना १अक्षर एकदाच वापरा; पुढच्या शब्दासाठी पुन्हा घेऊ शकता.

कुमार१'s picture

15 Aug 2020 - 1:29 pm | कुमार१

इ दोनदा असल्या ने एका शब्दातही दोनदा चालेले.

कुमार१'s picture

15 Aug 2020 - 9:43 am | कुमार१

सर्व शब्दप्रेमींना स्वातंत्र्य वर्धापनदिनाच्या शुभेच्छा .

कुमार१'s picture

16 Aug 2020 - 10:53 am | कुमार१

अन्य काही शब्द :

तनसडी रतन बासन बासर रसन रसडी
तसर

रतन सोडल्यास इतर शब्द कधीच ऐकलेले नाहीत मी.

रतन हे विशेषनाम आहे असे वाटल्याने मी दिलेले नव्हते.

कुमार१'s picture

18 Aug 2020 - 9:43 pm | कुमार१

रतन = रत्न
म्हणून चालेल

कुमार१'s picture

19 Aug 2020 - 2:40 pm | कुमार१

एक सोपे देतो.
खाली दिलेल्या अक्षरांत मिळून एका शब्दाचे ६ समानार्थी दडलेले आहेत.

कारकुन पुडी देशवरी हयात

ते ओळखा.
एक अक्षर फक्त एकदाच घ्या. सर्व ६ शब्द एकदम लिहा. तेव्हा उत्तर उघडच असेल !

सत्यजित...'s picture

9 Oct 2020 - 7:45 am | सत्यजित...

देह,काया,शरीर,तन,वपु,कुडी!

कुमार१'s picture

9 Oct 2020 - 9:25 am | कुमार१

छान !
बरेच दिवसांनी भेट !

कुमार१'s picture

2 Jan 2021 - 10:12 am | कुमार१

येथील जुन्या सहकारी बंधूभगिनींना नववर्षाच्या शुभेच्छा !

पुन्हा खेळ सुरु करावेत काय ?
जरूर कळवा.

मराठी_माणूस's picture

2 Jan 2021 - 11:42 am | मराठी_माणूस

तुम्हास ही नववर्षाच्या शुभेच्छा !

पुन्हा खेळ सुरु करावेत काय ?

हो !!!! :)

कुमार१'s picture

2 Jan 2021 - 12:08 pm | कुमार१

एका छोट्याने प्रारंभ :

६ अक्षरी मराठी शब्द (उपशब्दांसह) ओळखायचा आहे. त्यामध्ये समाविष्ट असलेल्या काही उपशब्दांची शोधसूत्रे अशी :
(अंक =अक्षरक्रम)

१२ - हगवण
३४ - नळकांडे
५६ - मेंढपाळास हाक मारली

संपूर्ण शब्द - वृत्तमाध्यमांचे अनिष्ट वर्तन

मराठी_माणूस's picture

3 Jan 2021 - 9:33 am | मराठी_माणूस

कोडे समजण्यास अवघड वाटत आहे.

कुमार१'s picture

3 Jan 2021 - 9:55 am | कुमार१

शब्द असा आहे :
१२३४५६
१२ हाही छोटा शब्द
तसेच ३४ व ५६ .
हे सर्व ओळखायचे. शेवटी पूर्ण शब्द तयार होईल.

मराठी_माणूस's picture

6 Jan 2021 - 4:37 pm | मराठी_माणूस

हरलो :)

कुमार१'s picture

6 Jan 2021 - 6:10 pm | कुमार१

इथे न सुटल्याने हेच कोडे अन्यत्रही दिले आहे.
तिकडचा निकाल लागला की इथे उत्तर लिहितो
धन्यवाद

कुमार१'s picture

7 Jan 2021 - 2:58 pm | कुमार१

उत्तर
१२ - हगवण = फोक
३४ - नळकांडे = नाड
५६ - मेंढपाळास हाक मारली = बाजी

संपूर्ण- वृत्तमाध्यमांचे अनिष्ट वर्तन = फोकनाडबाजी
...................................

इथून घेतला :
माध्यमांची फोकनाडबाजी!
प्रवीण बर्दापूरकर
https://www.aksharnama.com/client/trending_detail/4787

ज्ञानोबाचे पैजार's picture

7 Jan 2021 - 4:47 pm | ज्ञानोबाचे पैजार

आता फोकडान्स पहाताना सुध्दा बेक्कार हसायला येणार
पैजारबुवा,

कुमार१'s picture

7 Jan 2021 - 5:10 pm | कुमार१

😀 😀 😀 .....

कुमार१'s picture

13 Jan 2021 - 3:27 pm | कुमार१

अक्षरमिसळ

एक ८ अक्षरी शब्द ओळखायचा आहे. हा खेळ २ टप्प्यात आहे.

टप्पा १:
दोन गटांत मिळून ८ अक्षरमिसळ दिल्या आहेत. प्रत्येक गटातील प्रत्येक मिसळीतून (फक्त) एकेक अक्षर निवडा. त्या ४ अक्षरांतून (योग्य तो क्रम लवून ) प्रत्येक गटाचा एक अर्थपूर्ण शब्द तयार करा. त्यासाठी शोधसूत्र दिले आहे.

गट १:
अधूसरपणामूळचाच
सकातकरीचाचाला
वावरतानाचहालात्या
विसरमिसळीतूनह्या

४ अक्षरी शब्दाचे सूत्र : धातूची अवजड वस्तू
.........................
गट २ :

धुरंधरच्यापायाशी
विशहाजोगपणाने
तोदबण्यासाठीच
सरकारदादताना

४ अक्षरी शब्दाचे सूत्र : व्यक्तीविशेषण
.....................
टप्पा २:

आता पहिल्या गटाच्या शब्दाला दुसऱ्या गटाचा शब्द जोडा. = अर्थपूर्ण शब्द.
(हा अर्थपूर्ण झाल्यासच खेळ पूर्ण).

मराठी_माणूस's picture

17 Jan 2021 - 11:54 am | मराठी_माणूस

अजुन काही क्लु देऊ शकता का ?

धातूची अवजड वस्तू>>> चांगलीच जड. ती उचलणे पांढरपेशा चे काम नाही !
ही आली की २ समजेल

सोपे करू. योग्य क्रम लावला आहे.
आता एकेक अक्षर निवडा.
गट १
सकातकरीचाचाला
अधूसरपणामूळचाच
वावरतानाचहालात्या
विसरमिसळीतूनह्या

गट २ :

तोदबण्यासाठीच
विशहाजोगपणाने
सरकारदादताना
धुरंधरच्यापायाशी

मराठी_माणूस's picture

22 Jan 2021 - 4:04 pm | मराठी_माणूस

अजुनही जमत नाही

कुमार१'s picture

22 Jan 2021 - 4:34 pm | कुमार१

गट १ मध्ये शस्त्र आहे !

गोरगावलेकर's picture

22 Jan 2021 - 10:42 pm | गोरगावलेकर

तरवार बहादर ?

ज्ञानोबाचे पैजार's picture

23 Jan 2021 - 7:39 pm | ज्ञानोबाचे पैजार

तरवार म्हणजे काय? आम्हाला फक्त तलवार माहिती होती.
पैजारबुवा,

कुमार१'s picture

23 Jan 2021 - 7:43 pm | कुमार१

अर्थ एकच .

गोरगावलेकर's picture

23 Jan 2021 - 11:41 pm | गोरगावलेकर

म्यानातुनि उसळे तरवारीची पात
वेडात मराठे वीर दौडले सात !

कुमार१'s picture

23 Jan 2021 - 6:41 am | कुमार१

बरोबर !

मराठी_माणूस's picture

23 Jan 2021 - 11:15 am | मराठी_माणूस

तरवार -> धातुची अवजड वस्तु हे पटत नाही.

कुमार१'s picture

23 Jan 2021 - 11:21 am | कुमार१

वजनदार असते ना.

गामा पैलवान's picture

23 Jan 2021 - 3:44 pm | गामा पैलवान

शिवकालीन तलवार जड नसायची म्हणे. हलकी व मजबूत असायची. यासंबंधी मिपावर एक लेख आलेला यापूर्वी.
-गा.पै.

कुमार१'s picture

23 Jan 2021 - 3:55 pm | कुमार१

दखल घेतली आहे.

कुमार१'s picture

4 Feb 2021 - 1:06 pm | कुमार१

एक गंमत खेळ.

प्रत्येकाने आपल्या मनाप्रमाणे एखादे वाक्य तयार करायचे आहे. या वाक्याचे वैशिष्ट्य असे आहे:

वाक्यातील पहिला शब्द हा एकाक्षरी असेल. यानंतरचा प्रत्येक पुढचा शब्द फक्त एकेक अक्षराने वाढत जाईल. उदाहरणार्थ, ‘मी तुला पाहिले(१,२, ३)
अशा प्रकारचे जास्तीत जास्त लांबीचे अर्थपूर्ण वाक्य तयार करा. केव्हाही तुमच्या सवडीने लिहा. जेव्हा आपले वाक्य लिहायला याल, तेव्हा ते त्याआधी कुणी लिहिलेल्या वाक्याइतके तरी लांब असावे किंवा किमान एका शब्दाने अधिक.

आपापले वाक्य स्वतंत्रपणे करा.

तुम्ही करा सुरवात ४ शब्दांच्या ((१, २, ३, ४) अशा तुमच्या स्वतंत्र वाक्याने....

प्रत्येकाचे वाक्य वेगळे चालेल. आधीचे पुढे खेचायची गरज नाही.

ज्ञानोबाचे पैजार's picture

4 Feb 2021 - 1:47 pm | ज्ञानोबाचे पैजार

तू आज जास्तच जेवलास
मी त्याला इप्सीत जागेवर पोहोचवले
ई! किती गलिच्छ बोलतोस अक्कलशुन्य गाढवाच्यालेका

पैजारबुवा,

कुमार१'s picture

4 Feb 2021 - 1:41 pm | कुमार१

ज्ञा पै . छान.

आता पुढेचे येउद्या ६ शब्दी .

कुमार१'s picture

4 Feb 2021 - 1:58 pm | कुमार१

छान !
आता पुढचे आव्हान आहे सात शब्दाचे.
वर बुवांनी केला आहे तसा (पूर्णविराम सोडून) अन्य विरामचिन्हांचा वापर जरूर करता येईल.

कुमार१'s picture

4 Feb 2021 - 1:59 pm | कुमार१

छान !
आता पुढचे आव्हान आहे सात शब्दाचे.
वर बुवांनी केला आहे तसा (पूर्णविराम व प्रश्नचिन्ह सोडून) अन्य विरामचिन्हांचा वापर जरूर करता येईल.

कुमार१'s picture

4 Feb 2021 - 3:43 pm | कुमार१

हे घ्या ७ वाले :

ही तर तुमच्या मनातली आनंददायी समाधानयुक्त आत्मसंतुष्टताच !

कुमार१'s picture

8 Feb 2021 - 6:56 pm | कुमार१

एकाच शब्दाचे ७ वेगळे अर्थ ओळखायचे आहेत. प्रत्येक शब्दार्थ ओळखण्यासाठी स्वतंत्र शोधसूत्र आणि अपेक्षित शब्दाची अक्षरसंख्या कंसात दिली आहे.

किमान दोन शब्दार्थ शोधल्यावर एकदम उत्तर द्या. म्हणजे परस्परसंबंध समजून येतो.
मूळ शब्द या ७ मध्ये नाही. तो सर्वात शेवटी ओळखा.

१. शेवटाकडेचा (४)
२. धान्यावरची विशेष जागा (२)

३. ही गाद्यांवरून जाते किंवा चालते (२)
४. स्वामी (३)

५. मिळण्याची इच्छा होणारे काल्पनिक स्थान (४)
६. म्हटला तर सद्गुण, म्हटला तर दुर्गुण (४)

७. यात नीट बघायला दृष्टी निर्दोष हवी (२)
.......................

कुमार१'s picture

22 Apr 2021 - 5:38 pm | कुमार१

सहा अक्षरी आंब्याची जात ओळखा .
शोधसूत्र :

गुरु मध्ये निवडलेला मिळवा !

कुमार१'s picture

29 Dec 2021 - 8:44 am | कुमार१

गूढकोडे
पाच अक्षरी शब्द ओळखा :

सूत्र : प्राण्याच्या बारशाची तयारी करणे फारच कंटाळा आणणारे बुवा !