पिन
आम्ही बायकांनी कितीही ठरवलं तरी पिनशिवाय आमच पान हलत नाही.
पिन म्हणाल की डोळ्यासमोर अनेक प्रकार उभे राहतात.सेफ्टी पिन,टिक टोक पिन,डोक्याची पिन,साडी पिन.
घरी किती जरी पिनांचा साठा असला तरी लग्न समारंभाला एक जरी वेळेवर सापडेल तर शपथ!मग मागामाग सुरु होते.आणि जिच्याकडे पर्स उघडल्यावर जास्त साठा असेल आणि जी सर्वाना पिन पुरवते ती सर्वात श्रीमंत बाई असते. .पूर्वीच्या महिलाना किती कदर या पिनेची मंगळसूत्राला नाहीतर डझनभर बांगड्यांना दोन चार पिना पुरवणी म्ह्नणून कायम असायच्या.आता त्या फावल्या वेळात दातांवर अन्याय करण्यासाठी याचा वापर करायच्या तो भाग वेगळाच!
अहोंनी गजरे आणले तर पिनापण आणाव्यात ना !पण नाही.मी आता फुलवाल्यालाच हा साईड उद्योग सुरु करायला सांगणार आहे.गजरा बरोबर पिना घ्याव्याच लागतील.
साडी पिनाची तर कथाच वेगळी...शेकडोंनी यांवर पैसे खर्च करावेत,आणि ऐनवेळी सुंदर नक्षीदार कोंदणात बसवलेल्या मामुली पिनने कुठतरी धडपडून घ्यावे,आणि आख्ख्या पिनेचे ऐनवेळी वाटोळे व्हावे.
साडी फाडणारी एखादी पिन भेटतेच ,स्वर्गात गेली तरी पुढे आयुष्यभर तिला शिव्याशाप खाव्या लागतात...
अशी ही पिन टोचून जरी घेतली तरी महत्व राखणारी ...लेडीज स्पेशल
-भक्ती
(ता.क.इथे पेन हा धागा वाचून मला पिन आठवली अल्पसा प्रयत्न ..धन्यवाद)
प्रतिक्रिया
19 Jan 2021 - 7:18 pm | मुक्त विहारि
नेहमीच उपयोगी पडते.
आमच्या बायकोच्या पर्स मध्ये, हमखास सापडणारी वस्तू आहे.
19 Jan 2021 - 7:58 pm | गामा पैलवान
माझ्या आवडीची पिन ही आहे : https://en.wikipedia.org/wiki/Bobby_pin
माझ्या आईकडे मी नेहमी ही मागायचो. बायको मात्र ही पिन वापरंत नाही.
ही माझी अत्यंत आवडती आहे कारण हिच्या मागच्या बाजूने कानातला मळ कसलीही इजा न होता अलगदपणे काढता येतो.
-गा.पै.
20 Jan 2021 - 9:57 am | जगप्रवासी
कानातला मळ या पिनने काढत बसायची सवय आहे. कधीही पाहावं त्याच्या हातात पिन असतेच.
20 Jan 2021 - 10:47 am | मराठी_माणूस
हीला आम्ही क्लिप म्हणायचो.
19 Jan 2021 - 8:07 pm | Nitin Palkar
पिनचा हा अतिशय महत्वाचा उपयोग समजला. अधिक महत्वाचे... या पिनला बॉबी पिन म्हणतात हे तुम्ही दिलेल्या दुव्यावरून कळले.
20 Jan 2021 - 3:38 am | विंजिनेर
हात्तीच्या. ही पिन आहे तर! मला वाटलं पिन्ट्रेस्ट वरची कुठली पिन की इथे दाखवतायेत का काय. तसं पिन्ट्रेस्टसुद्धा लेडीज स्पेशल अस्तं म्हणा ;)
20 Jan 2021 - 8:01 am | प्रचेतस
पिनेच्या पाठोपाठ पिन शोधायला लै फिरत होतो एकदा :)
20 Jan 2021 - 9:55 am | जगप्रवासी
आणि तेव्हा कळलं की नेमकं शर्टाचं वरच बटण नाहीये, आमच्या "अगं" ला तसं सांगितलं. चित्रपटात दाखवल्याप्रमाणे आता बायको येऊन अंगावर शर्ट असतानाच बटण शिवून देईल आणि उरलेला दोरा दाताने तोडेल तेव्हा मी तिला बाहुपाशात घेईन असं मी मनात कल्पना करत होतो पण हाय रे मेरी किस्मत तिने येऊन दोन सेकंदात पिन लावून दुसरं काम करायला निघून गेली. मी मात्र त्या पिनकडेच पाहत राहिलो :)
22 Jan 2021 - 1:08 pm | चौथा कोनाडा
रोमॅण्टिक सीनला सामोरे जाता जाता वंचित झालात .. !
😘
20 Jan 2021 - 9:27 pm | Bhakti
सर्वांचे प्रतिसाद वाचून पिन या विषय लेडीज वा जेन्ट्स असा नसून बहु सामायिक आहे हे कळल
गामा बर झाल तुम्ही दुवा दिला नाहीतर माझ्या डोळ्यासमोर नाचकांडची पिन उभी राहिली ...आमची आजी पोरासोरांना हि पिन कधीच नाही द्यायच
बर नाव घेतलं .. याचापण चांगला नाद लागला होता...खिशाला मोठा खड्डा पडला तेव्हापासून ह्यापासून कानाला खड्डा म्हणजे खडा
अर्रर प्रचेतस तुम्हाला चांगलीच पिन टोचाली असेल (हे हे)
जगप्रवासी चालायचंच !!
20 Jan 2021 - 9:30 pm | Bhakti
बर नाव घेतलं ...Pinterest वाचा आधी
20 Jan 2021 - 9:28 pm | Bhakti
विषय निघालाच तर पुरवणी घेते
आकड्याची पिन (यु पिन) सरळ करायला मज्जा यायची,,ती टिक टोक( माफ करा मला ते डोक्यावर अर्ध चंद्र नाही देता आला.tok वाचा) संगीत निर्माण करण्याची कला आम्ही हिच्यापासुंच शिकलो.
22 Jan 2021 - 1:11 pm | चौथा कोनाडा
टॉक साठी " TOK " ही अक्षरे टंकायची.
ऑ साठी कॅपिटल " ओ" टंकावे लागते.