सर्व मिपाकरांना विनंती, वारंवार सूचना देऊनही 'चालू घडामोडी' आणि इतरही काही धाग्यांत व्यक्तिगत पातळीवर केली जाणारी टीका दिसून येते. पक्षांचे प्रमुख, पक्ष यांच्यावर केल्या जाणा-या टिकाही संयमित असाव्यात अशी अपेक्षा आहे, नव्या कायद्यांमुळे संकेतस्थळावरील सर्वांचा वावर कायद्यातील नियमाबरोबर, सार्वजनिक संस्थळावरील सभ्यतेचे किमान निकष पाळणारा असावे असे मिपा व्यवस्थापनाचे मत आहे, यापुढे असे आढळून येत राहिल्यास कोणतेही स्पष्टीकरण न देता असे प्रतिसाद, धागे सरसकट अप्रकाशित केल्या जातील किंवा खाते निष्कासित करण्यासारखी कठोर कारवाई केली जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे.

- मिपा व्यवस्थापन


चमन के फुल

Primary tabs

नीलकंठ देशमुख's picture
नीलकंठ देशमुख in जनातलं, मनातलं
31 Oct 2020 - 10:08 am

अति मधुर मधुर..

   -गाणी ऐकायची सवय  फार जुनी ।
एकोणीसशेसाठ ते सत्तर,चे दशकाच्या आसपासचा,पन्नास।साठ वर्षापूर्वी चा काळ । ।हा काळ ,हिंदी चित्रपटांचा
सांगितिक सुवर्णयुग मानले जाते।
त्या काळातअनेकसंगीतकार ,गायक,
गायिका  ,गीतकार यांनी आपल्या अलौकिक प्रतिभेने , गीत संगीताचे जे  अक्षर,अतुट.अतुलनीय,रेशमी ,मधुर ,मायाजाल विणले आहे,
त्याच्या बंधनामध्ये अजुनहीसंगीत प्रेमी गुंतलेले ,आहेत।बाहेर यायला तयार नाहीत।
  आपल्या आयुष्यातले अनेक  क्षण ,
त्या  अविस्मरणीय गाण्यांनी भारुन टाकलेे सुख दु:खाच्या प्रसंगात
सोबत केली ।

त्या सुवर्णकाळातील अनेक संगीत कार  आपल्या मनात अजूनही  स्थान  टिकवून आहेत ।
पण  दुर्दैवाने, काही गुणी संगीतकार
मात्र विस्मरणात गेले आहेत।
कै. जि.एस.कोहली हे असेच एक
विस्मृतीत गेलेले नाव।

एकापेक्षा एक दिग्गज संगीत कार
एकाच वेळी एकमेकांशी स्पर्धा करत होते ,त्या काळात ,त्या प्रतिभावंतांच्या गर्दीत,कै.कोहलीना एखाद्याचित्रपटात स्वतंत्र पणे संगीत देण्याची संधी मिळणेच अवघड होते ।
महान संगीत कार ओ.पी.नय्यर यांचे सहाय्यक म्हणूनच  त्यांची ओळख।
ओ.पीं.च्या अगणित  मधुर गाण्यांचे
वैशिष्ट्य पूर्ण संगीत संयोजन  वाद्यमेळांचे नियोजन व ठेका याचे बरेचसे श्रेय कोहलींचे पण निश्चितच असणार। आपल्या कारकिर्दीत  बोटावर मोजण्याइतके   चित्रपटांना स्वतंत्र  संगीत देण्याची संधीत्यांना मिळाली ।नमस्ते जी, फौलाद,चार दरवेश व शिकारी ई.ते  चित्रपट।
हे सारे बी किंवा सी ग्रेड चित्रपट मानले जातात।पैकी  शिकारी ( १९६३)मधे,
अजीत( मोना डार्लिंग वाला  ) नायक व रागिणी,नायिका।हेलन ,मदन पुरी हे सहकलाकार।
निर्मिता,दिग्दर्शक,कलावंत या पैकी कुठलेही नाव मोठे नाही ।गीतकार फारुख कैसर।पण मिळालेल्या संधीचा पूर्ण फायदा घेत
कै. कोहलींनी आपल्या उत्कट प्रतिभेचा परीचय करून दिला या चित्रपटात ।अन अविट गोडीची ,ए1 दर्जाची अतिशय सुरेल  गाणी दिली।
या चित्रपटातील सहा पैकी माझ्या आवडत्या  चार गाण्यांविषयी ...
१'चमन के फुल भी तुझको..'

लतामंगेशकर व महमद रफी यांनी गायिलेल्या या  युगलगीतात  सतार ,बासरी वायोलीन चा सुरेख वापर आहे । दोन्ही कडव्यांमधील फिलर्सला सतारीचे जे  अति गोड तुकडे वाजवले आहेत त्यांचं ,'आप युंही अगर' (  एक मुसाफिर एक हसीना -ओ.पी.नय्यर)मधील सतारीशी कमालीचं साधर्म्य आहे ।
तेच तुकडे इथे वापरलेलेअसावे अशी शंका यावी ।हे एवढे गालबोट(?) सोडल्यास,बहुतेक केदार रागाच्या अंगाने जाणारे हे  गाणं अप्रतिम।
२'अगर मै पुंछु जवाब देदो'

हे पण या दोघांच्याच आवाजातील ग्रेट द्वंद्व गीत ।यमनकल्याणाची छाप असलेल्या गाण्यात  एका ओळीत
शुध्द सारंग चा ही आभास होतो।
पूर्ण गाण्यात,सेक्सोफोन चा सुरेल वापर वारंवार हे एक वैशिष्ट्य।
ही पण ओ.पी .चीखासियत।
हे गाणं ऐकताना,एक वेगळी शांतता (सुकुन )जाणवते ।
या दोन्ही गाणे प्रेक्षणीयसुध्दा आहेत ।
रागिणी यांच्या अदावरुन ,त्या
किती कुशल नर्तिका व चांगल्या अभिनेत्री होत्या ,हे कळते ।
३'ओ तुमको पिया दिल दिया '
हेलतादिदी व उषा मंगेशकर यांनी गायलेले ,भांगडा ठेक्यावरचे नृत्यगीत
मेंडोलीन  चा मस्त वापर ।
खमाज धाटाच्या अंगाने जाणारे ,गाण्यात एके ठिकाणी कोमल गांधाराचा उपयोगाने बागेश्री चा मस्त फील येतो।
या गाण्यात 'दिया' व 'पिया' हे शब्द लताजी जसे गातात ,ते ऐकून कान मन धन्य होतात।उडत्या पक्षाच्या  पंखांची हळूवार फडफड जणू।

४ '   ये ऱगीन महफील गुलाबी गुलाबी    या चित्रपटातले, माझे सर्वात
आवडीचे हे गाणे ,बहुधा क्लायमॅक्स वेळी  असावे। खलनायकाच्या कैदेतल्या नायकाला सोडविण्यासाठी सहनायिका आपल्या सौंदर्यअस्त्राचा वापर , खलनायकावर करते त्या वेळ चे नृत्यगीत। असा  प्रसंग।पण गाणे
लाजवाब बेमिसाल अवीट गोडीचे ।
किती विशेषणे द्यायची?
हेलन यांच्या वर चित्रीत झालेले,
आशाताई च्या मधाळ आवाजातील
रेशमी गाणे ...
 
यमन रागात बांधलेल्या चालीला कडव्यांमधील फीलर्स साठी  पाश्च्यात्य ठेकामेंडोलीन,व्हायोलीन,पियानो एकॉरडिअन सारखी  पाश्चात्य वाद्ये असे मस्त मिश्रण  ऐकायला मिळते।
या गाण्यात आशाजींची शब्दफेक कसली जबरदस्त आहे.. ग्रेट ।
शेवटच्या कडव्या अगोदर 'ये' हा शब्द असा जीवघेणा उच्चारलाय की त्याने होणारी सुखद वेदना 'कायम ठुसठुसतच राहावी वाटते ।
अशी गाणी ऐकताना वाह वाह ,क्या बात.है म्हणताना ,मानडोलावताना दमछाक होते अक्षरशः।लताजी व आशाजी यांनी गायलेल्या प्रत्येक गाण्यातत्यांचे शब्दोच्चार ,शब्दफेक
,शब्दांचा ,गाण्याचा भावार्थ नेमका पोहचविण्याची पध्दत , वेगवेगळ्या हरकती या विषयांवर स्वतंत्र अभ्यास होउ शकतो ।
गाणे सामान्य ,सुमार  चालीचे असले ( अनेकदा ती असायची  )तरीही
त्या कधीच बेसूर कशा होत नाहीत ,
हा एक प्रश्न। नेहमीच पडतो।
आपले सुदैवाने आपण त्यांच्या काळात जन्माला आलो ।त्यांना पाहिले ।त्यांना ऐकले।ऐकतो आहोत ।ऐकत राहू ।पुढच्या पिढ्या सुध्दा।

आणि  शेवटी. हा लेख ज्यांच्या साठी आहे ते महान कै.जी.एस.कोहलीजी ।
आम्ही त्यांचे सदैव ऋणी राहू अशी अवीट मधुर गाणी दिल्या बद्दल।
वाईट एका गोष्टीचे वाटते की या गुणी संगीतकारास हवी तेवढी संधी ,प्रसिद्धी ,मान मिळाला नाही ।
पण ते एकटेच असे नाहीत। हे ही खरे 
त्यांच्या आठवणी जाग्या करण्यासाठी
त्यांची ही गाणी ऐकूया ।पून्हा पून्हा।

हम ही नही, हम ही नही
है सभी ,लाजवाब कहते है ।
             नीलकंठ देशमुख
            ८७९३८३८०८०
nilkanthvd1@gmail.com

संगीतप्रकटन

प्रतिक्रिया

मराठी_माणूस's picture

31 Oct 2020 - 11:25 am | मराठी_माणूस

छान आठवणी जाग्या केल्यात. वर उल्लेख केलेली गाणी माझीही आवडती आहेत (विशेष करुन "तुमको पिया दिल दिया....)
अजुन एक त्यांचे गाणे आठवले,

https://www.youtube.com/watch?v=-MGTaiQMCgo

नीलकंठ देशमुख's picture

31 Oct 2020 - 12:42 pm | नीलकंठ देशमुख

माना मेरे..पण खूप छान गाणे आहे

नीलकंठ देशमुख's picture

31 Oct 2020 - 12:40 pm | नीलकंठ देशमुख

धन्यवाद

महासंग्राम's picture

31 Oct 2020 - 1:53 pm | महासंग्राम

आठवणी चांगल्या असूनही फॉरमॅटिंगमुळे रसभंग होतो विशेषतः पॅराग्राफ आणि पूर्णविराम याकडे लक्ष देता आले तर पहा.

मोबाईल वर जर टाईप करत असाल. कि पॅड वर मराठी टायपिंग बंद करून उभ्या दांडी ऐवजी पूर्णविराम देता येतो.