विद्या बाळ यांचे अखेरचे आवाहन

प्रकाश घाटपांडे's picture
प्रकाश घाटपांडे in काथ्याकूट
14 Oct 2020 - 4:26 pm
गाभा: 

विद्या बाळ गेल्यानंतर त्यांच्या आदरांजली सभेत उल्लेख केलेले त्यांचे शेवटचे रेकॉर्डिंग. मार्च 2020 च्या मिळून सार्‍याजणी मधे आले आहे. स्वेच्छामरण या विषयी त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात त्यांची मते काय होती हे जाणुन घेण्याची उत्सुकता होती.
-------------------------------------------------------------------------
अखेरच आवाहन...
मी विद्या बाळ, १०१, नचिकेत सोसायटी, प्रभात रोड, पुणे - ४, वय ८३ पूर्ण. आज मनाच्या एका अत्यंत गंभीर अशा; पण निर्णायक अवस्थेत बोलते आहे. हा विचार मी आजवर शेकडो लोकांशी बोललीये, पण कुणाला तो इतका गंभीर वाटला, कुणाला नाही, मीही कदाचित थोडी द्विधा मनस्थितीत असेन. पण आज मी अतिशय निर्णायक मनस्थितीत बोलतीये. माझे दात काढल्यामुळे थोडी अस्पष्टता येतीये ती समजून घ्या.
मला असं म्हणायचंय की, मला केव्हापासूनच वाटतंय की माझ्या आयुष्याला आता अर्थ राहिलेला नाही. सगळे माझे प्रियजन सांगताहेत मला की, तुला खूप करण्यासारखं आहे, खूप आयुष्य पुढे आहे, पण मला स्वतःला प्रामाणिकपणे असं वाटतं की, त्याला अर्थ नाहीये, या पुढे बरं होणं, काम करणं, पहिल्या उमेदीनी बरं होऊन काही करणं ही माझी इच्छाही नाहीये आणि मला करायचंही नाहीये. जोशी हॉस्पिटलमध्ये मी ई.ओ.एल. फॉर्म भरलाय - ‘एण्ड
ऑफ लाईफ' म्हणून. काही त्याला अर्थ नाहीये. कारण जोपर्यंत मी प्रत्यक्षात मरण्याच्या स्थितीत येत नाही. तोपर्यंत त्याचा काही उपयोग नाहीये हे माझ्या प्रत्यक्ष अनुभवातून लक्षात आलंय. तेव्हा हा जो विचार करून, विशेषतः आज विचार करून, मी असं ठरवते आहे की, मला यातून सुटकेचा मार्ग हवा आहे. तो लीगल नाही, हे मला २००% माहितीये; पण तरी तो मला हवा आहे.
मला यावर एक मार्ग सुचतो तो असा : तो ४-८ दिवसात होणारा नाही, त्यामुळे सगळ्यांना सांगण्यास, जाहीर करण्यात आता अर्थ नाही, पण मी बोलतीये. माझ्या असं लक्षात आलं की, याच्यात माणसाच्या जवळ, सज्जन माणसाजवळ, जे नाही (त्याची गरज आहे). पण मला आज एक नवा विचार सुचलाय तो असा की, जी माणसं खरोखरच सुपारी देऊन काम करतात, त्या माणसांच्याकडे कदाचित म्हणजे उदाहरणार्थ क्रूर असे किंवा उद्देश नसलेले (लोक), सर्पमित्र (ज्यांच्याविषयी मला आदर आहे) किंवा त्या प्रकारचे लोक शोधणं आणि त्यांच्या मदतीनी यावर काहीतरी उपाय काढणं शक्य आहे. त्याला वेळ लागेल, पण ते कदाचित शक्य आहे. त्याला काही काळ लागेल तो घ्यावा. आणि माझी इच्छा आहे की त्यांनी तो (मार्ग) पूर्ण करावा ज्यामुळे तशी कुणावरच आरोपाची वेळ येणार नाही. कसं, काय, याचे डिटेल्स सिरिअसली ठरवावे लागतील.
आज मी मनाच्या अत्यंत निर्णायक, भावनाविवश नसलेल्या अवस्थेत बोलतीये. इथे आज या बैठकीला सविता ही माझी सध्याची सेवक, विनीता माझी मुलगी, उर्मिला माझी सून, डॉ. मंगला नाही माया (हजर आहेत). इथे हॉस्पिटलमध्ये मी आत्ता ॲडमिट आहे, तिच्याशीही (मायाशीही) मी बोलले आहे. या सगळ्यांनी कृपया याचा नीट नीट नीट विचार करावा आणि जे जे लोक मृत्युशय्येवर आहेत, किंवा लवाटे यांच्यासारखे प्रामाणिकपणे अशाच अवस्थेत मृत्यूची वाट पाहताहेत त्यांना मार्ग मोकळा करून द्यावा. कृपया तुम्ही सगळ्यांनी इथे विचार करावा. आत्ता ही गोष्ट मोठ्यांनी बोलण्याची नाहीये; पण काही महिन्यात, वर्षात, याचा विचार करावा. आत्ता ते शक्य नाही मला माहितीये. मी तोवर थांबायला तयार आहे; पण कधीच न निघणाऱ्या मार्गापेक्षा हा मार्ग खूप चांगला आहे, अनेकांसाठी चांगला आहे, तुम्ही सर्वांनी यावर विचार करावा. हे सगळे विचार ऐकून घेतलेत आणि त्यातनं सगळे जण शांत, शहाण्यासारखा विचार करतील अशी मला आशा आहे.
माझ्यावर लोकांनी इतकं अपार प्रेम केलंय की, मी असा निर्णय घेणं हे एका परीने खूप क्रूर आणि कृतघ्नतेचं लक्षण आहे. मला असं वाटतं की, अनेक लोकांच्या पुढील हितासाठी हा खूपच आणि विशेषतः माझ्यासाठी उपयुक्त (मार्ग) आहे. कृपया विचार करावा. माझ्या निर्णयाचं काही भलं करावं आणि व्यापक जनतेच्यासाठी काहीतरी करावं.
विद्या बाळ २९ जानेवारी २०२०
संध्या. ७.३०

प्रतिक्रिया

प्रकाश घाटपांडे's picture

14 Oct 2020 - 4:42 pm | प्रकाश घाटपांडे

यापुर्वी परमसखा मृत्यू: किती आळवावा या लेखात इच्छामरण या विषयावर इथे चर्चा झाली होती.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Oct 2020 - 8:49 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एखाद्या परिस्थितीत दया मरण मागणे ठीक आहे, परंतु अनेक अडचणींच्या गोष्टीही या मागे निर्माण होऊ शकतात तेव्हा दया मरणाची मुभा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय वाचता येईल. इच्छा मरण चांगले पण....

-दिलीप बिरुटे

चौथा कोनाडा's picture

14 Oct 2020 - 10:05 pm | चौथा कोनाडा

दिवा विझताना फडफडतो तशी विचार करण्याची शेवटची तडफड.
हा विचार सर्वांनाच करावा लागणार आहे आगामी काळात, कायदेशीर मार्ग सुद्धा उपलब्ध होईल कदाचित

सुखान्त या मराठी सिनेमात सिनेमात हाच विषय हाताळला होता .. आणि त्यातले प्रमुख पात्र त्याच्या पद्धतीने हा प्रश्न सोडवतो.
( सिनेमा सुंदर आहे, मिळाला तर नक्की पहा, गुजारिश या हिंदी सिनेमाचा इच्छामरण हाच विषय होता, पण सामाजिक भोवतालाच्या दृष्टीकोना तून " सुखान्त " उजवा आहे असं मला वाटतं.)

प्रकाश घाटपांडे सर, धन्यवाद, इथं टाकल्याबद्दल !

प्रकाश घाटपांडे's picture

15 Oct 2020 - 8:46 am | प्रकाश घाटपांडे

आगामी काळात, कायदेशीर मार्ग सुद्धा उपलब्ध होईल कदाचित

प्रयत्नांना चळवळीचे स्वरुप आल्याशिवाय ते होणार नाही. त्यासाठी अगोदर प्रबोधन हवे. विषय लोकांपर्यंत सातत्याने पोहोचवत राहणे हाही एक मार्ग आहे.

प्रकाश घाटपांडे's picture

17 Oct 2020 - 8:14 pm | प्रकाश घाटपांडे

चौथा कोनाडा, सुखांत या चित्रपटाच्या निमित्त्ताने झालेले चर्चा सत्रावर २००९ मधे लिहिले आहे. पहा
http://www.misalpav.com/node/10219

चौथा कोनाडा's picture

18 Oct 2020 - 6:11 pm | चौथा कोनाडा

सुंदर कव्हरेज, प्रघा सर !

घाईत आटोपलेला शेवट सोडला तर हा सिनेमा मला खुप आवडला. कायमचा लक्षात राहिला !

माहितगार's picture

15 Oct 2020 - 11:03 am | माहितगार

विद्या बाळांच्या मुख्य कारकिर्दीवर इतर फारशी चर्चा मिपावर पहाण्यात न येताच थेट इच्छा मरणाच्या विषयाच्या समर्थनार्थ विद्या बाळांचे शेवटचे मनोगत सादर केले जाणे जरासे ऑकवर्ड वाटते. अगदी इच्छा मरण असा शब्द वापरला जात नसला तरी कृतकृत्यतेनंतर जिवंत समाधी नावाचा प्रकार संत ज्ञानेश्वर ते १९ व्या शतका पर्यंत होत राहीलेले त्यामुळे अशा विचारधारेत फार काही नाविन्य आहे असे म्हणवत नाही. संत ज्ञानदेव असोत संत नामदेव असो सावरकर अथवा विद्या बाळ समाजाला काही देऊ शकण्याची क्षमता असलेल्या लोकांची आधीच कमतरता असते त्यातले 'काही' स्वेच्छा मरणाने कमी व्हावेत हे भावनीक नव्हे वैचारीक दृष्ट्या सुद्धा न पटणारे वाटते.

या सर्वा पलिकडे जाऊन कोण तात्कालिक मानसिक आणि इतर दबावांखाली असे निर्णय घेत असेल हे सांगणे कठीण जाते. दवाखान्यात माणसाचे शरीर बदलून अगदीच कायमचे संपूर्ण यांत्रिकीकरण टाळणे कदाचित श्रेयस्कर असेल पण गर्भात दाखल झाल्या पासून ते निसर्गाने जगणे पूर्ण नाकारे पर्यंत शक्यतोवर प्रत्येक मनुष्य प्राणी 'आदरपुर्वक' जगवणे हेच मानवी लक्ष्य कायम रहाणे श्रेयस्कर असावे.

प्रकाश घाटपांडे's picture

15 Oct 2020 - 4:33 pm | प्रकाश घाटपांडे

संत ज्ञानदेव असोत संत नामदेव असो सावरकर अथवा विद्या बाळ समाजाला काही देऊ शकण्याची क्षमता असलेल्या लोकांची आधीच कमतरता असते त्यातले 'काही' स्वेच्छा मरणाने कमी व्हावेत हे भावनीक नव्हे वैचारीक दृष्ट्या सुद्धा न पटणारे वाटते. >>>> विद्या बाळ पुरेसे जगून गेल्यात. जेवढ शक्य आहे तेवढ समाजासाठी त्यांनी दिल आहे. मृत्यू अप्रिय असल्याने लोक त्या विषयापासून पळ काढतात हे त्यांनी एका भाषणात सांगितले होते.

माहितगार's picture

15 Oct 2020 - 6:34 pm | माहितगार

...मृत्यू अप्रिय असल्याने लोक त्या विषयापासून पळ काढतात हे त्यांनी एका भाषणात सांगितले होते.?

मी श्रोत्यात असतो तर, 'नेमके कोण पळ काढतेय म्हणालात ?' असा प्रश्न विचारला असता. :)

प्रकाश घाटपांडे's picture

15 Oct 2020 - 6:47 pm | प्रकाश घाटपांडे

मैत्रीणी, चळवळीतील सहकारी, आजूबाजूचे लोक ज्यांच्याशी त्या हा विषय बोलत त्यातील बहुतेक लोक असे सविस्तर त्यांनी सांगितले होते. आपण त्यांची भाषणे संवाद लेखन वेळोवेळी वाचले असेल असे गृहित धरतो.

अनरँडम's picture

15 Oct 2020 - 7:50 pm | अनरँडम

प्रतिसाद इतका प्रचंड 'ऑकवर्ड' आहे की न राहवून या संयत मनोगताच्या संवेदनशील धाग्यावर हा उपप्रतिसाद टंकवला.

मृत्यू सहजेनं कसा येईल या विषयी शून्य संशोधन झालं आहे याचं कायम नवल वाटतं. एक वेळ शास्त्रज्ञांना या विषयाला हात घालायची इच्छा नसणं समजू शकतं पण अध्यात्मिक धुरंधरानी इतक्या महत्त्वाच्या विषयाला चाट मारली हे आश्चर्य आहे. ज्या मंडळींना आपण देह नाही याचा उलगडा झाला होता त्यांच्या उच्च कोटीच्या अनाकलनीय देहत्यागाची निरुपयोगी वर्णनं मात्र भारंभार आहेत. त्यातल्या त्यात संथारा (अन्नत्याग) हा सामान्यांनी अवलंबलेला एकमेव मार्ग आहे पण त्याविषयीची सुद्धा स्टेप-बाय-स्टेप माहिती उपलब्ध नाही आणि ती सुद्धा तशी दीर्घकालिन प्रक्रिया आहे. स्वेच्छेनं आणि सहजपणे श्वास थांबवता आला तर मृत्यूची इच्छा आणि घटना यातला कालावधी कमीतकमी होईल. वेळ मिळाला की यावर संशोधन करुन एक सोपा आणि सामान्यांना सहज अनुसरता येईल असा उपाय नक्की शोधणार आहे.

प्रकाश घाटपांडे's picture

16 Oct 2020 - 10:10 am | प्रकाश घाटपांडे

वेळ मिळाला की यावर संशोधन करुन एक सोपा आणि सामान्यांना सहज अनुसरता येईल असा उपाय नक्की शोधणार आहे. >>>>> सध्या विषयाबद्द्ल साहित्य उपलब्ध आहे पण उपायांबद्दल फारसे दिसत नाही

अनरँडम's picture

15 Oct 2020 - 7:55 pm | अनरँडम

खरोखर लोकांना प्रचंड वेळ पृथ्वीवर घालवल्यावर त्याचा कंटाळा येऊ शकतो. लोक जर घर सोडू शकतात, दुसर्‍या देशाचे नागरिकत्व पत्करू शकतात तसेच पृथ्वीवरचे वास्तव्य का 'कायदेशीरपणे' संपवू शकत नाही यावर प्रगल्भ समाजाने विचार होणे आवश्यक आहे. हे मनोगत इथे डकवल्याबद्दल धन्यवाद.

आंबट चिंच's picture

15 Oct 2020 - 8:28 pm | आंबट चिंच

वि. सावरकरांनी केलेलं प्रायोपवेशन म्हणजेच संथारा काय ?

दोन्ही वेगळं असेलं तर काय फरक असतो. आणि हे करताना सरकारची परवानगी घ्यावी लागते काय ?

संजय क्षीरसागर's picture

15 Oct 2020 - 9:34 pm | संजय क्षीरसागर

२०१५ मधे राजस्थान हायकोर्टानी आत्महत्येचा प्रयत्न या कलमाखाली यावर बंदी आणली होती पण नंतर सुप्रिम कोर्टानं ती उठवली. थोडक्यात, बाय निगेशन, तो आत्महत्येचा प्रयत्न धरला जात नाही त्यामुळे सरकारी परवानगी जरुरी नाही.

ही महावीरानं सांगितलेली प्रणाली असल्यानं जैन धर्मात तिला परमोच्च महत्व आहे. सुप्रिम कोर्टासमोर हे दोन मुद्दे मांडले गेले : १) तो भावनाविवशतेनं घेतलेला निर्णय नाही आणि २) त्यात कोणत्याही शस्त्राचा किंवा विषाचा प्रयोग होत नाही.

संजय क्षीरसागर's picture

15 Oct 2020 - 9:37 pm | संजय क्षीरसागर

संथारा ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे, आत्महत्येसारखी ती क्षणिक घटना नाही.

अनरँडम's picture

15 Oct 2020 - 10:31 pm | अनरँडम

मी फार अन्नत्याग वगैरे करून युफेमिष्टिकलि (ओढूनताणून होकारात्मक) 'आत्मसमर्पण' केले तर काय बिघडते असे मलाही वाटत असे, पण पण सुशांत गेला नी म्हटले आपण जावू पण आपल्या आप्तेष्टांचा छ्ळ झाला तर...(छ्ळकिडे मेल्यानंतरही सोडत नाहीत)

गोंधळी's picture

15 Oct 2020 - 8:58 pm | गोंधळी

विषय खुपच कठीन आहे. लवाटे मॅडम ह्या आमच्या शाळेत उपप्राचार्य होत्या.त्यांची बातमी वाचुन खुप वाईट वाटल होत.
आता सगळ्यांना नैसर्गीक मरण याव असेच वाटत. पण जेव्हा आपण त्या अवस्थेत जाउ तेव्हा काय??? ह्याच उत्तर नाही मिळत.

प्रकाश घाटपांडे's picture

16 Oct 2020 - 10:11 am | प्रकाश घाटपांडे

लवाटे मॅडम ह्या आमच्या शाळेत उपप्राचार्य होत्या.त्यांची बातमी वाचुन खुप वाईट वाटल होत.>>>>>????

या सगळ्यांनी कृपया याचा नीट नीट नीट विचार करावा आणि जे जे लोक मृत्युशय्येवर आहेत, किंवा लवाटे यांच्यासारखे प्रामाणिकपणे अशाच अवस्थेत मृत्यूची वाट पाहताहेत त्यांना मार्ग मोकळा करून द्यावा.

त्यांनी यासाठी कोर्टात याचिका दिली होती.
https://indianexpress.com/article/cities/mumbai/their-euthanasia-plea-tu...

चौथा कोनाडा's picture

20 Oct 2020 - 12:20 pm | चौथा कोनाडा

भारी लेख आहे गोंधळी साहेब !
इथं दिल्याबद्दल धन्यवाद !

प्रकाश घाटपांडे's picture

16 Oct 2020 - 4:30 pm | प्रकाश घाटपांडे

मला तेच विचारायच होत. लवाटे दांपत्याची बातमी टीव्हीवर आली होती. मुलाखत ही पाहिली होती. सध्या किमान दयामरणाचा तरी कायदा झाला आहे. संसदेत बिल असताना सरकारने लोकांच्या प्रतिक्रिया मागवल्या होत्या http://www.misalpav.com/comment/845330#comment-845330

चौथा कोनाडा's picture

15 Oct 2020 - 10:39 pm | चौथा कोनाडा

मरण आणि इच्छामरण या विषयावर चर्चा सुरु पाहुन आज म.टा. मध्ये वाचलेली ही बातमी आठवली:
https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/pune-13-day-old-baby-...

छापिल आवृत्तीत आलेल्या वॄत्तानुसार बाळाचे आई वडिल अत्यंत गरीब होते, बाळाचे पालन पोषण करू शकणार नाही म्हणून दत्तक देण्याचे ठरविले, पण जन्माला आलेले बाळ दिव्यांग होते, या बाळावर काहीच उपचार होऊ शकणार नाहीत आणि याच्यात काहीच सुधारणा होऊ शकणार नाही अशी डॉक्टरानी स्पष्ट कल्पना दिली होती. दिव्यांग बाळ कोणीच दत्तक घेणार नाही म्हणुन त्यांच्या कडे असलेला एकमेव पर्याय, बाळाला मृत्यूदान दिले. हृदयद्रावक आहे हे. पोलीसांनी अटक करून पुढील कारवाई सुरु केलीय, त्यांना शिक्षा वै होईलच.

पण, त्या असाह्य आई वडिलांची मजबुरी कोण समजून घेणार ?

प्रकाश घाटपांडे's picture

16 Oct 2020 - 10:14 am | प्रकाश घाटपांडे

पण, त्या असाह्य आई वडिलांची मजबुरी कोण समजून घेणार ?>>>>> माध्यम ही टिपिकल विचारांच्या आशयाची भाषा बातमीत वापरतात. हा मुद्दा वैचारिक लेखांमधे मात्र घेतला जातो.

चौथा कोनाडा's picture

16 Oct 2020 - 5:15 pm | चौथा कोनाडा

माध्यम ही टिपिकल विचारांच्या आशयाची भाषा बातमीत वापरतात.

ते फक्त "बातमी"दार असतात, ही माध्यमांची मजबुरी म्हणायला हवी !

हा मुद्दा वैचारिक लेखांमधे मात्र घेतला जातो.

हे खुपच आश्वासक आहे. असे प्रॉब्लेम्स क्वचित सोडवत देखील असतील, काही संस्था / व्यक्ती पुढं येऊन योग्य ती मदत देखील करत असतील, पण शासकीय पातळीवर असे प्रश्न सोडवण्यासाठी यंत्रणा तयार झाल्या तर उत्तमच !

या गिरिश प्रभुणे यांनी समरसता मंचाच्या माध्यमातून पारधी जमातीचे एकेक प्रश्न कसे हाताळले, उपाय केले हे त्यांनी लिहिलेल्या "पारधी " या पुस्तकात वाचायला मिळते.

अथांग आकाश's picture

15 Oct 2020 - 11:49 pm | अथांग आकाश

विद्या बाळ कोण होत्या आणी त्यांचे कर्तुत्व काय याची मला माहिती नाही! त्यांच्या अखेरच्या आवाहनात म्हणल्या प्रमाणे

मला यावर एक मार्ग सुचतो तो असा : तो ४-८ दिवसात होणारा नाही, त्यामुळे सगळ्यांना सांगण्यास, जाहीर करण्यात आता अर्थ नाही, पण मी बोलतीये. माझ्या असं लक्षात आलं की, याच्यात माणसाच्या जवळ, सज्जन माणसाजवळ, जे नाही (त्याची गरज आहे). पण मला आज एक नवा विचार सुचलाय तो असा की, जी माणसं खरोखरच सुपारी देऊन काम करतात, त्या माणसांच्याकडे कदाचित म्हणजे उदाहरणार्थ क्रूर असे किंवा उद्देश नसलेले (लोक), सर्पमित्र (ज्यांच्याविषयी मला आदर आहे) किंवा त्या प्रकारचे लोक शोधणं आणि त्यांच्या मदतीनी यावर काहीतरी उपाय काढणं शक्य आहे. त्याला वेळ लागेल, पण ते कदाचित शक्य आहे. त्याला काही काळ लागेल तो घ्यावा. आणि माझी इच्छा आहे की त्यांनी तो (मार्ग) पूर्ण करावा ज्यामुळे तशी कुणावरच आरोपाची वेळ येणार नाही. कसं, काय, याचे डिटेल्स सिरिअसली ठरवावे लागतील.

असे विचार वाचले आणी त्यांची विचारसरणी नक्षलवादाकडे झुकणारी असावी असा दाट संशय आला!
गेलेल्या लोकांविषयी वाईट बोलूनये हे मान्य आहे! वरील बोलण्यातून जो छुपा अर्थ ध्वनित होतो आहे तो फार भयंकर आहे! त्यांच्या या विचारांचे समर्थन त्यांचे पंखे,भक्त,अनुयायी,समर्थक कसे करतात हे वाचण्याची मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे! म्हातारपणी बुद्धी भ्रष्ट होते म्हणतात तसे काही झाले असेल का???

याचे समर्थन करण्याची गरज नसावी. तुम्हाला पाहिजे तो अर्थ लावला तरी सध्या (कायदेशीरपणे) स्वतःचा सहवास संपवण्याचा मार्ग उपलब्ध नाही. प्रश्नाला अनेक कंगोरे आहेत. माझ्या व्यक्तिगत पाहण्यात हा प्रश्न डाव्या/उजव्या बाजूचा नाही. अनेक अतिवयस्क ज्येष्ठ नागरिकांचा आहे. विचारपूर्वक समाजाला सर्व बाजू स्मजुन घेऊन याविषयी काहीतरी कायदेशीर करावेच लागणार आहे. केव्हा केव्हा अगतिक लोक व्यक्तिगत प्रसंगी अतार्किक युक्तिवाद करतात. सोडून द्या.

अथांग आकाश's picture

16 Oct 2020 - 12:25 pm | अथांग आकाश

कैच्या कैच युक्तिवाद

याचे समर्थन करण्याची गरज नसावी. तुम्हाला पाहिजे तो अर्थ लावला तरी सध्या (कायदेशीरपणे) स्वतःचा सहवास संपवण्याचा मार्ग उपलब्ध नाही.

सध्या स्वतःचा सहवास संपवण्याचा कायदेशीर मार्ग उपलब्ध नाही म्हनुन बेकायदेशीर मार्गांचा अवलंब करायचा? सुपारी घेऊन मुडदे पाडणाऱ्यांना स्वतःच्या हत्येची सुपारी द्यायची?? सर्प मित्रांकडून विषारी सर्प मिळवून सर्पदंश करवून घ्यायचा?

केव्हा केव्हा अगतिक लोक व्यक्तिगत प्रसंगी अतार्किक युक्तिवाद करतात. सोडून द्या.

पण त्यांच्या असल्या अत्तार्किक,नक्षलवादी, गुन्हेगारी विचारांचा प्रसार मिसळपाव सारख्या प्रतिष्ठित व्यासपीठावरून केला जातो यात कोणालाच काही आक्षेपार्ह वाटत नाही? संपादक मंडळालाही नाही?? आश्चर्य आहे!
1

प्रकाश घाटपांडे's picture

16 Oct 2020 - 1:25 pm | प्रकाश घाटपांडे

पण त्यांच्या असल्या अत्तार्किक,नक्षलवादी, गुन्हेगारी विचारांचा प्रसार मिसळपाव सारख्या प्रतिष्ठित व्यासपीठावरून केला जातो यात कोणालाच काही आक्षेपार्ह वाटत नाही? संपादक मंडळालाही नाही?? आश्चर्य आहे!

मला यात काही ही आश्चर्य वाटत नाही. आपल्या सदस्यत्वाचा कालावधी २ व.१ महिना आहे. मिसळपाव गेली १३ वर्षे सर्व विषयांवरील चर्चापीठ म्हणून अस्तित्वात आहे.

माहितगार's picture

17 Oct 2020 - 6:53 pm | माहितगार

सदस्य आथांग आकाश यांनी लक्षवेधलेला मुद्दा विद्या बाळ नक्षलवादी होत्या की नाही हे बाजूस ठेऊन ही महत्वाचा आहे. अगदी ईच्छा मरणाच्या समर्थकांनी मरणासाठीचे इतर असंख्य उपाय सोडून स्वमरणासाठी इतरांना सुपारी देण्याचा विचार पसरवणे हे वयासोबत विवेक आणि बुद्धी हरवल्याचे नक्कीच लक्षण म्हणवता येऊ शकेल . विद्द्या बाळांना त्यांच्या मृत्यूशय्येवरील वयामुळे दुर्लक्षता येईल पण ईच्छा मरणाच्या इतर समर्थकांनी असा विचार अविचारीपणे गौरवणे स्पृहणिय कसे असू शकते हे समजण्या पलिकडचे आहे.

अविचारी ,नक्षलवादी, गुन्हेगारी किंवा देशविरोधी प्रकारच्या विचारांचा प्रसार करण्यास मिपामालकांची परवानगी असण्याबद्दल आता पर्यंत तरी बघण्यात / ऐकिवात नव्हते. तरीही, मिसळपाव गेली १३ वर्षे सर्व विषयांवरील चर्चापीठ म्हणून अस्तित्वात आहे, याचे टोक गाठून अविचारी ,नक्षलवादी, गुन्हेगारी विचारांचा प्रसार मिसळपाव सारख्या प्रतिष्ठित व्यासपीठावरून केला जातो यात काही वावगे नाही असा अर्थ कळत नकळत निघणे (बहुधा आपणासही अभिप्रेत नसावे) हे मिपा मालकांच्या संमतीने असल्यास तसा पुरावा द्यावा अन्यथा शब्द विनाअट वापस घ्यावेत, हि नम्र विनंती सुज्ञास समजण्यासारखी आहे असा विश्वास आहे .

प्रकाश घाटपांडे's picture

17 Oct 2020 - 6:57 pm | प्रकाश घाटपांडे

.

चौकटराजा's picture

16 Oct 2020 - 12:14 pm | चौकटराजा

काही माणसे अधिक ईहवादी,अधिक प्रयोगवादी ,अगदी भावनाशून्य नव्हेत पण भावना हा आयुष्याचा कणा आहे हे नाकारणारी असतात त्यानाच आपण डाव्या विचारसरणीची माणसे म्हणतो का ? तसे असेल तर मी पक्का डाव्या विचारसरणीचा माणूस आहे. डॉ. मीना प्रभू आपल्या पुस्तकात म्हणतात " लोक मरणाला इतकी वाईट घटना का समजतात ? जन्मासारखीच ती एक जैविक घटना आहे ! "

खरे तर माणूस हा प्राणी फार दांभिक आहे. तो जितका दांभिक तितका तो उलट आयुष्याविषयी खास करून मरणाविषयी अधिक उदात्ततेच्या कल्पना मांडत बसतो. आत्महत्या पळपुटेपणा वगैरे आहे पण युद्धांत मरण आले तर ते वंद्य आहे अशा काही खुळचट कल्पना मांडत बसतो. मरण हे मरण असते आपले स्वार्थ त्याला अमंगळ की युक्त ठरावीत असतात.

यात असे एक तत्वज्ञान मांडले जाते की तुझ्या देहावर निसर्गाचा हक्क आहे तुझा नाही . सबब नैसर्गिक रित्या मग तो अपघाती का असेना मृत्यू आला तरी तो समाजाला स्वीकारार्ह आहे. आता माणूस व त्यांचे मन हा ही निसर्गाचा एक भाग आहे ना मग आत्महत्या हा मरणाचा गर्हणीय मार्ग कसा ? ज्याला हवे त्याला स्वतः: मरण स्वीकारण्याचा हक्क असला पाहिजे जसा खाणे पिणे तसा . तो जर समाजाने दिला तो मरणारा किमान आनंदाने तरी मरेल. मरणाची कल्पना खास करून स्वतः:च्या मरणाची कल्पना ही माणसाने अगदी आयुष्यात खूप जगण्यासारखे असताना पासून मनोमन स्वीकरली पाहिजे त्याने जगण्यातील मजा निघून काही जात नाही असा माझा दावा आहे !

प्रकाश घाटपांडे's picture

16 Oct 2020 - 1:18 pm | प्रकाश घाटपांडे

जगायचीही सक्ती आहे हे मंगला आठलेकर यांचे पुस्तक अतिशय वाचनीय आहे. त्यात या विषयी वेगवेगळ्या मतांचा उहापोह केला आहे.

प्रकाश घाटपांडे's picture

16 Oct 2020 - 1:19 pm | प्रकाश घाटपांडे

विद्याताईंचे विचार विस्कळीत वाटले आणि अर्थ कळला नाही. खूपच ओपन एन्ड्स सोडलेत. सुपारी घेणारे, सर्पमित्र* वगैरे उल्लेख प्रचंड खटकले आणि त्याच वेळी गोंधळात पाडणारे वाटले. अखेरच्या काळातले निवेदन असेल तर वयानुसार कदाचित सुस्पष्टता, सुसंबंद्धता कमी झाली असेल.

* बाय द वे, हे दोन्ही एकाच संदर्भात उल्लेखलेले पाहून अचंबा झाला. असो.

प्रकाश घाटपांडे's picture

16 Oct 2020 - 1:47 pm | प्रकाश घाटपांडे

गवि आपण हे तर विसरत नाही ना! कि ते मृत्युशय्येवर असतानाचे विचारस्पंदने आहेत. स्वेच्छामरणाच्या चळवळीतील त्यांचा सहभाग आपल्याला ठाउक असेल कदाचित. जेव्हा त्यांना आदरांजली व्यक्त करण्यासाठी सभा झाली होती त्याला मी हजर होतो. त्यात या रेकॉर्डिंगचा उल्लेख झाला होता. ते प्रसिद्ध करावे की नाही याबाबतही ठरले नव्हते. आता काही लोकांना मृत्युचा विचारच अपशकुनी अशुभ विकृत असा वाटतो. त्यामुळे मृत्युचे नियोजन हा अर्थपूर्ण जगण्याचा विषय आहे हे त्यांना झेपत नाही.पारंपारिक विचारांच्या मुशीत मृत्यु हा अप्रिय विषय असतो त्यामुळे टाळला जातो.

मी त्यांना व्यक्तिश: ओळखत असे. अनेकदा भेटलोय.

त्यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे. सन्मानाने मरण्याचा हक्क याबद्दलही मला पूर्ण आदर आणि पाठिंबा आहे. याबद्दल कायदा व्हावा म्हणून चळवळ करणारे आणखी एक खंदे कार्यकर्ते सांगलीत होते. त्यांनाही भेटलोय खूप वर्षांपूर्वी.

सुपारी घेणारे, सर्पमित्र वगैरे उल्लेखापुरता तो प्रतिसाद होता.

प्रकाश घाटपांडे's picture

16 Oct 2020 - 4:11 pm | प्रकाश घाटपांडे

याबद्दल कायदा व्हावा म्हणून चळवळ करणारे आणखी एक खंदे कार्यकर्ते सांगलीत होते.

ते वि.रा.लिमये. त्यांचे जगायचे की मरायचे, वृद्धांसाठी निवडीचा हक्क- स्वेच्छामरण व सन्मानाने मरण्याचा हक्क अशी पुस्तके आहेत.

गवि's picture

16 Oct 2020 - 5:51 pm | गवि

बरोबर.

त्यांचा मोठा बंगला होता. एकटेच राहायचे. पंचवीसेक वर्षांपूर्वी एकदा त्यांना भेटायला गेलो होतो. बरेच वय झाले होते.

बोलता बोलता तीन तास झाले तरी भान राहिले नाही अशा गप्पा रंगल्या. जगावेगळेच व्यक्तिमत्व होते. बहुधा वायदेबाजार, फ्युचर्स यात घरबसल्या सौदे करुन चरितार्थ चालवत असावेत असे वाटले. विचार भन्नाट आणि जगावेगळे होते. मरण्याच्या पद्धती वगैरे अगदी शांतपणे सहज मुद्देसूद बोलताना ऐकून अंगावर काटाच आला होता. आता मात्र तपशीलवार आठवत नाही. परत जाणे झाले नाही.

सन्मानाने कायदेशीर मरण मिळावे यासाठी मी थांबलो आहे असे ते म्हणाले होते. अखेरीस ती इच्छा पूर्ण झाली नसावी.

ते अद्याप हयात असल्यास हे वाक्य सहर्ष मागे.

करुन शेवटापर्यंत वाट पहात बसले. त्यांची इतकी गोची झाली की कोर्टानं त्यांचा अर्ज सुनावणीला घेतला नाही आणि त्यांना स्वतःला जीवाचं काही करता येईना. मग असेच हॉस्पिटलाईज होऊन काही वर्षांनी गेले.

संजय क्षीरसागर's picture

16 Oct 2020 - 1:48 pm | संजय क्षीरसागर

विद्या बाळ काय म्हणतात याचे अर्थ काढण्यापेक्षा सुखद मरण हा अत्यंत वॅलीड विषय आहे, त्याची चर्चा फलदायी होईल असं वाटतं .

चौकटराजा's picture

16 Oct 2020 - 1:58 pm | चौकटराजा

मरण अटळ आहे ! ते एक रूपांतरण आहे ! हे एकदा "मनोमन" स्वीकारले की आपलया हातात राहातो फक्त ते येण्याची प्रक्रिया ठरविण्याचा अधिकार ! मरताना खरोखरीच यातना होतात का ? की त्या कळण्याच्या पलीकडे गेल्यावरच मरण येते हे आजही ठामपणे कोणाला सांगता सांगता येणार नाही. जीवनाची आसक्ती असेल तर वेदनेची तयारी ठेवली पाहिजे हा निसर्गाचाच नियम आहे !

गवि's picture

16 Oct 2020 - 3:18 pm | गवि

इच्छामरण आवश्यक पण कॉम्प्लिकेटेड विषय आहे.

अ. जबाबदारीतून सुटका म्हणून तो वापरला जाऊ नये (त्या अनुषंगाने कर्जे, कौटुंबिक जबाबदारी हे पाहणे आले. कर्जे मोजता येतात.. इतर नैतिक जबाबदार्या मोजता येत नाहीत)

ब. झटका प्रतिक्रिया म्हणून हा निर्णय अंमलात येऊ नये. (त्या अनुषंगाने निर्णय नोंदणी आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यात बरेच अंतर राखणे आवश्यक. काही महिन्यांनी पुन्हा एकदा कन्फर्मेशन घेऊन मग अंमलबजावणी आवश्यक)

क. स्वत:च्या जिवावर खरोखर सर्वार्थाने आपला एकट्याचा हक्क असतो का? हे एकदा ठरवावे लागेल.

ड. पूर्ण वेदनाविरहीत वैद्यकीय उपाय शोधला पाहिजे. असे उपाय अस्तित्वात असले तरी डॉक्टरी व्यवसायिक प्रतिज्ञा आणि नैतिकतेची व्याख्या बदलावी लागेल. हा खूप मूलभूत बदल असेल.

ई. स्वेच्छामरण हा उपाय कितीही कमी जास्त वयाच्या आणि अगदी ठणठणीत प्रकृती आणि उत्तम मानसिक आरोग्यावस्था असतालेल्या व्यक्तींनाही द्यावा लागेल. केवळ असाध्य आजारी, वेदना होत असलेले, वृद्ध लोक यांनाच पात्र ठरवता येता येणार नाही. किंबहुना याबाबत योग्य निर्णय त्या अवस्थेत घेण्यास ते लोक पात्र नसतील.

या अनुषंगाने चर्चा करता येईल.

संजय क्षीरसागर's picture

16 Oct 2020 - 5:09 pm | संजय क्षीरसागर

पण एकूणात मृत्यू झोपेसारखा सुखद यायला हवा असं वाटतं !

मरण आणण्याची नेमकी पद्धत हा अगदी गौण तांत्रिक मुद्दा आहे.

बाकीचे मुद्दे किचकट आहेत.

प्रकाश घाटपांडे's picture

16 Oct 2020 - 6:29 pm | प्रकाश घाटपांडे

मरण आणण्याची नेमकी पद्धत हा अगदी गौण तांत्रिक मुद्दा आहे.

वेदनाविरहीत मृत्यु हा महत्वाचा मुद्दा आहेच की! काही लोक मृत्युपेक्षा त्याच्या वेदनामयी स्थितीला घाबरतात. सिझेरियन ने जर वेदनाविरहीत प्रसुती होते तर वेदनाविरहीत मृत्यु का असू नये. विज्ञानाने जन्मात हस्तक्षेप केला मग मृत्युत का करु नये?

अहो म्हणजे तसे उपाय व्यवस्थित मिळतील. आहेतच अस्तित्वात.

कसा यावा याबद्दल शांतपणे यावा हे अंमलात आणणे ही समस्या किंवा कायदा येण्यातली अडचण नसून त्या आधीचे एथिकल सोशल इ इ मुद्दे कॉम्प्लेक्स आहेत असं म्हटलं.

संजय क्षीरसागर's picture

16 Oct 2020 - 7:15 pm | संजय क्षीरसागर

सुखानी मरायचा मुद्दाच बाजूला पडेल ! 😄

एखादी सोपी, सहज आणि सुखानं मरायची युक्ती (कोणत्याही मेडीकल किंवा तत्सम उपायांखेरिज) माणसानं इतक्या अनंत वर्षात का शोधली नाही असं मला वाटतं !

सुबोध खरे's picture

17 Oct 2020 - 12:15 pm | सुबोध खरे

एखादी सोपी, सहज आणि सुखानं मरायची युक्ती (कोणत्याही मेडीकल किंवा तत्सम उपायांखेरिज) माणसानं इतक्या अनंत वर्षात का शोधली नाही असं मला वाटतं !

हि युक्ति १९३४ पासून उपलब्ध आहे.

भूल देण्याचे औषध शिरेतून घेतले तर एक ते दहा आकडे मोजून होईपर्यंत माणूस गाढ बेशुद्धीत जातो.

आणि हेच औषध अतिरिक्त मात्रेत दिले तर माणूस चिरनिद्रेत जातो.

अशी अनेक औषधे उपलब्ध आहेत.

परंतु हे औषध देण्याची कायदेशीर परवानगी समाजाने/न्यायसंस्थेने द्यायची असते.

कारण मृत्यू हा अपरिवर्तनीय (इर्रेव्हर्सिबल) आहे. हि प्रक्रिया उलट फिरवणे अशक्य आहे. त्यामुळे याची जबाबदारी कायद्याने घेणे आवश्यक आहे, वैद्यकीय तज्ज्ञाने नव्हे.

अमेरिकेत मृत्युदंडाची शिक्षा अशीच दिली जाते. (Lethal injection).

दुर्दैवाने एखाद्याला असाध्य असा वेदनादायी रोग झाला असेल तरी त्याचे आयुष्य दुःखहीन( painless) करता येणारी औषधे पण अस्तित्वात आहेत

त्यामुळे त्याला इच्छा मृत्यू दिला पाहिजे कि नाही हा प्रश्न वैद्यकीय नसून सामाजिक आहे.

मला स्वतःला वैद्यकीय तज्ज्ञ म्हणून एखाद्याला असे इंजेक्शन देणे फार कठीण जाईल. अगदी तो माणूस समाजासाठी अत्यंत धोकादायक/ उलट्या काळजाचा निर्ढावलेला गुन्हेगार असेल तरी. डॉक्टर म्हणून मी कितीतरी मृत्यू डोळ्यासमोर पाहिलेले असले तरी.

अतिदक्षता विभागात एका रात्रीत दारूमुळे यकृत खराब होऊन तीन मृत्यू मी पाहिले आहेत आणि त्याचे प्रमाणपत्र हि दिले आहे. परंतु या सर्व वेळा त्यांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्नही केला होता. तेथे हतबलताही येते.

परंतु आपल्या हाताने एखादे आयुष्य संपवणे हि प्रक्रिया फार वेदना दायक आहे.

टेस्ट ट्यूब बेबीच्या उपचारात एका वेळेस तीन गर्भ असतील तर त्यातील एक किंवा दोन गर्भ असे "कमी" (EMBRYO REDUCTION) केले जातात.

७-८ आठवड्याला सोनोग्राफी करून जो सर्वात चांगला ( एक किंवा दोन)गर्भ असेल तो ठेवून इतर गर्भ पोटॅशियम क्लोराईडचे इंजेक्शन देऊन "कमी" केले जातात.

सोनोग्राफी करत असताना त्या गर्भाचे हृदयाचे ठोके दिसत असताना पोटॅशियम क्लोराईडचे इंजेक्शन दिल्याने १० -१५ सेकंदात हळूहळू ठोके थांबतात

हि प्रक्रिया मी कॉर्पोरेट रुग्णालयात केली आहे. परंतु आपल्यासमोर एखादे आयुष्य आपल्या कृत्याने संपते हे पाहणे हे फार वेदनादायक असते. यामुळे मी माझ्या क्लिनिक मध्ये या प्रक्रियेसाठी लागणारे लायसन्स घेतलेच नाही आणि हे मी करत नाही.

https://en.wikipedia.org/wiki/Selective_reduction

प्रकाश घाटपांडे's picture

17 Oct 2020 - 12:48 pm | प्रकाश घाटपांडे

त्यामुळे त्याला इच्छा मृत्यू दिला पाहिजे कि नाही हा प्रश्न वैद्यकीय नसून सामाजिक आहे

खर आहे. पण हा सामाजिक प्रश्न हाताळताना वैद्यकीय क्षेत्रातील सामाजिक जाणीवा असलेले लोकांची मते विचारात घ्यावी तर लागतातच. डॉ शिरिष प्रयाग हे आपल्या भाषणात नातेवाईक व डॉक्टर यांच्या समन्वयातुन हा प्रश्न सोडवता येतो असे नेहमी सांगतात. लिव्हिंग विल हे पुर्ण पणे कायदेशीर नसले तरी डॉक्टरांसाठी ते महत्वाचे असते. डॉक्टरांनाही आपली सुरक्षितता पहावी लागते.

चौथा कोनाडा's picture

17 Oct 2020 - 9:11 pm | चौथा कोनाडा

डॉ. साहेब, समर्पक लिहिलं आहे, आपल्या प्रतिसादांतून एक वेगळेच जग जे आमच्या सारख्यांना माहित नसते, ते उलगडते.

मला स्वतःला वैद्यकीय तज्ज्ञ म्हणून एखाद्याला असे इंजेक्शन देणे फार कठीण जाईल.

फाशीच्या गुन्हेगाराला त्याच्या तोंडावर काळे कापड झाकून फाशी देतात, त्यात फाशी देणार्‍या व पाहणार्‍यांना वेदना व तडफड दिसू नये म्हणून असे केलेले असते (अशी माझी समजूत आहे) पुढे मागे जर इंजेक्शन देऊन मृत्यू देणे अशी प्रथा प्रत्यक्षात आली आली तर अशी कोणती काळजी घ्यावी लागेल.
सध्या अमेरिकेत मृत्युदंडाची शिक्षा अशीच दिली जाते. (Lethal injection) असे आपण लिहिले आहे, तिथे काय करतात या विषयी जिज्ञासा आहे !

गवि's picture

17 Oct 2020 - 9:15 pm | गवि

@ डॉक्टर खरे,

एका डॉक्टरला ही कृती करणे अत्यंत त्रासदायक ठरेल हे अत्यंत मान्य आहे. कायद्याचे संरक्षण दिले तरीही, स्वत:च्या मनाला ते कितपत करवेल प्रत्यक्ष हा मुद्दा आहेच.

अमेरिकेत मृत्युदंडाची शिक्षा अशीच दिली जाते. (Lethal injection).

याबाबत वाचीव, ऐकीव माहिती अशी की ही लिथल इंजेक्शन प्रोसेसदेखील डॉक्टर करत नाहीत. हे इंजेक्शन तुरुंग अधिकारी/ कर्मचारी देतात.

त्यातही तीन इंजेक्शने मशीनद्वारे जोडून तीन अधिकारी आपापले बटण किंवा जे काही असेल ते ट्रिगर करतात.

प्रत्यक्षात त्यातल्या एकाच इंजेक्शनमधे द्रव्य असतं आणि मृत्यू घडतो. नेमक्या कुणाच्या हाताने ते ट्रिगर झालं हे त्या अधिकार्यांना कळत नाही. नैतिक ओझं इतकं तीव्र असावं की त्यातून थोडी सुटका म्हणून हा उपाय.

अर्थात हे खरं असेलच असा दावा नाही.

एखादी सोपी, सहज आणि सुखानं मरायची युक्ती (कोणत्याही मेडीकल किंवा तत्सम उपायांखेरिज) माणसानं इतक्या अनंत वर्षात का शोधली नाही असं मला वाटतं !

हे माझं वाक्य अधोरेखित करुन, पुन्हा तुम्ही मेडीकल उपाय काये ते सांगत भरघोस प्रतिसाद दिला आहे.

प्रकाश घाटपांडे's picture

18 Oct 2020 - 9:09 am | प्रकाश घाटपांडे

आता मरायची युक्ती
१) सोपी पाहिजे
२) सहज उपलब्ध पाहिजे
३) सुखकारक पाहिजे
आता ती युक्ती वैद्यकीय किंवा तशा प्रकारच्या अन्य क्षेत्राशी निगडी नको. अशा चौकटीत विचार करायचा आहे. म्हणजे यनावालांच्या भाषेत तर्कक्रिडा. तुम्ही शाब्दिक कैची पकडले हे बरोबर पण वाचकांना प्रतिसादात काही नाविन्य व माहिती असेल तर ते जाणून घेण्यात रस असतो. त्यामुळे डॉक्टरांनी तसा प्रतिसाद दिला असावा असा माझा कयास आहे. :)

ती साधनविरहित, नॉन-मेडीकल प्रक्रिया आहे आणि अनेकांनी त्यानुसार देह ठेवला आहे. शिवाय ती आत्महत्या सदरात येत नसल्यानं कायदेशीर लफडं पण नाही. व्यवस्थित आर्ग्युमंट केलं तर वारसांना इंशुरन्स क्लेम पण मिळेल. अन्नत्यागामुळे दिवसेंदिवस देहशुद्ध होत जाऊन जागृकता वाढत जाते. ज्यांना खरंच सुखानी मरायचंय त्यांना सध्या तरी हा राजमार्ग उपलब्ध आहेच.

तर मला याच प्रथेनं देहत्याग करणं आवडेल !

प्रकाश घाटपांडे's picture

18 Oct 2020 - 2:15 pm | प्रकाश घाटपांडे

यनावाला उपक्रमवर तर्कक्रीडा ही लेखमाला चालवत.

संजय क्षीरसागर's picture

18 Oct 2020 - 2:40 pm | संजय क्षीरसागर

तुम्हाला मुद्दा लक्षात आला असेलच.

प्रकाश घाटपांडे's picture

18 Oct 2020 - 3:24 pm | प्रकाश घाटपांडे

फक्त आधुनिक विज्ञानाच्या मदतीने आपण याच निकषांवर उपलब्ध असलेले मार्ग आपण का स्वीकारु नयेत?

संजय क्षीरसागर's picture

18 Oct 2020 - 3:46 pm | संजय क्षीरसागर

श्वास अगदी सहजतेनं बंद होईल असा नॉन-मेडीकल आणि साधनरहित, काय उपाय आहे ?

शा वि कु's picture

18 Oct 2020 - 3:56 pm | शा वि कु

नॉन मेडिकल आणि साधनरहितच का? उपलब्ध साधने का वापरू नयेत ?

संजय क्षीरसागर's picture

18 Oct 2020 - 4:00 pm | संजय क्षीरसागर

ती आत्महत्या होते !

सुबोध खरे's picture

19 Oct 2020 - 10:14 am | सुबोध खरे

श्वास अगदी सहजतेनं बंद होईल असा नॉन-मेडीकल आणि साधनरहित, काय उपाय आहे ?

तुम्ही आपला श्वास फक्त ३ मिनिटे रोखून धरा. पुढचं सगळं आपोआप होतंय.

अन्नत्यागासारखंच प्राणवायू त्याग

एकदम नॉन-मेडीकल आणि साधनरहित

संजय क्षीरसागर's picture

19 Oct 2020 - 12:01 pm | संजय क्षीरसागर

हे तीन मिनीटांचं नक्की आहे का ? यावर काही ठोस पुरावा असेल तर नक्की द्या म्हणजे या अँगलनं (स्वतःच्या) मृत्यूकडे पाहता येईल.

सुबोध खरे's picture

19 Oct 2020 - 12:18 pm | सुबोध खरे

(स्वतःच्या) मृत्यूकडे पाहता येईल.

मेल्यावर काहीही दिसत नाही.

मग वेगळ्या "अँगल" ने कसं पाहणार

काही ठोस पुरावा

तीन मिनिटं श्वास बंद कराच म्हणजे पुरावा आपोआप मिळेलच आणि वेगळ्या अँगलने हि दिसेल

सुबोध खरे's picture

19 Oct 2020 - 12:19 pm | सुबोध खरे

एकदम नॉन मेडिकल आणि साधनरहितच

अर्थात दम गेल्यावर एकदम म्हणता येईल का?

एक अवांतर शंका

बाकी शब्दच्छल नंतर करु.

सुबोध खरे's picture

19 Oct 2020 - 7:35 pm | सुबोध खरे

तुम्ही आपला श्वास फक्त ३ मिनिटे रोखून धरा. पुढचं सगळं आपोआप होतंय.

अन्नत्यागासारखंच प्राणवायू त्याग

एकदम नॉन-मेडीकल आणि साधनरहित

बाकी शब्दच्छल नंतर करु.

सुबोध खरे's picture

19 Oct 2020 - 10:11 am | सुबोध खरे

ज्यांना खरंच सुखानी मरायचंय त्यांना सध्या तरी हा राजमार्ग उपलब्ध आहेच.

संथारा किंवा सल्लेखना हे आपली सगळी संपत्ती दान केल्यानंतर शेवटची प्रक्रिया म्हणून देह ठेवण्यासाठी असते.

त्यामुळे त्यात कायदेशीर लफडी काय येतील ते माहिती नाही.

व्यवस्थित आर्ग्युमंट केलं तर वारसांना इंशुरन्स क्लेम पण मिळेल.जर देह ठेवायचाच असेल तर अर्ग्युमेंटचे करायची गरजच काय? जिवंत असताना वारसांना सर्व संपत्ती वाटून मोकळे व्हावे.

मुळात आत्महत्या हा आता गुन्हा नाही असे २०१७ मध्ये पास केलेल्या मानसिक आरोग्य कायद्यात म्हटलेले आहे तर तो एक मानसिक आजार आहे आणि त्यासाठी वैद्यकीय उपचार सरकरने उपलब्ध करून द्यायचे आहेत.

अन्नत्यागामुळे दिवसेंदिवस देहशुद्ध होत जाऊन जागृकता वाढत जाते.याला काही पुरावा वगैरे?

कारण अन्न त्यागाने माणूस ग्लानीत जातो आणि नंतर बेशुद्ध होतो असे वैद्यकीय शास्त्र म्हणते.

ज्यांना खरंच सुखानी मरायचंय त्यांना सध्या तरी हा राजमार्ग उपलब्ध आहेच.

हे फार सोपं आहे म्हणणं.

असंख्य माणसे केवळ आत्महत्या करण्याचे धैर्य नाही म्हणून जगत असतात.

आणि अन्नत्याग करण्यासाठी फार मोठे मानसिक धैर्य लागते. अगदी विकोपाला आजार गेलेल्या माणसांना हा धीर होत नाही. सुखाने मारायचा राजमार्ग तर नाहीच नाही.

आमच्या शेजारी राहणारे एक सद्गृहस्थ ७५ वयाला अचानकपाठदुखी होते म्हणून तपासणी साठी गेले असताना मणक्यात कर्करोग पसरलेला आढळला. यानंतर त्यांनी कोणतेही उपचार घेण्याचे नाकारले. सर्व संपत्तीची निरव निरव केली आणि जेंव्हा आजार बळावला तेंव्हा स्वच्छ शब्दात मला कोणतेही उपचार करू नयेत असे लिहून ठेवले आणि त्या दिवसापासून अन्न आणि पाणी त्याग करून काही दिवसात आपला देह ठेवला.

असे धैर्य असणारी माणसे अक्षरशः एक कोटी मध्ये एखादा असतो.

मला आत्महत्या करण्याचे धैर्य नाही तसेच कुणाचा जीव घेण्याचेही धैर्य नाही. मग मी भूल देत असताना (एके काळी) आपण या माणसाला मृत्यूच्या किती जवळ घेऊन जात आहोत आणि आपली एखादी क्षुल्लक चूक सुद्धा या माणसाला महाग पडू शकते याचे प्रत्येक क्षणी भान असे.

तरुणपणात निर्धास्तपणे एखादे शौर्याचे काम करणे हे वेगळे.

तरुणपणी मृत्यू हे एक सुंदर काव्य असते.

मध्यावयात ते एक रुक्ष गद्य होऊन राहते.

श्री व्यंकटेश माडगूळकर

नाही हो > स्वेच्छेनं मृत्यू स्वीकारायला, आपण देह नाही हा उलगडा झाला की काम झालं !

देह कार सारखा आहे आपण आत-बाहेर दोन्हीकडे आहोत, पण आपण सतत देहातूनच जगाचा वेध घेतो त्यामुळे आपण देहच आहोत असा भास होतो. त्यामुळे देह गेला की आपण संपलो असं वाटतं. या भानगडीमुळे देह सोडवत नाही.

चौथा कोनाडा's picture

19 Oct 2020 - 1:39 pm | चौथा कोनाडा

तरुणपणी मृत्यू हे एक सुंदर काव्य असते.
मध्यावयात ते एक रुक्ष गद्य होऊन राहते.

- श्री व्यंकटेश माडगूळकर

हे आवडले.

सोत्रि's picture

18 Oct 2020 - 7:17 pm | सोत्रि

नैसर्गिक मृत्यु हीच सहज आणि सुखानं मरायची युक्ती आहे, निसर्गाने योजलेली. त्याशिवायची कोणतीही युक्ती नैसर्गिक मृत्यु असणार नाही.

नैसर्गिक मृत्यु नसलेली कोणतीही युक्ती ही आत्महत्या / अपघात असते.

- (नैसर्गिक) सोकाजी

संजय क्षीरसागर's picture

18 Oct 2020 - 7:25 pm | संजय क्षीरसागर

१. नैसर्गिक मृत्यू म्हणजे नेमकं काय ? तो कसा येतो ? तसा मृत्यू येण्यासाठी पूर्वतयारी काय असते का काहीही नसते ?
२. अशाप्रकारे झालेले किती मृत्यू तुम्ही पाहिले आहेत ?
३. संथारा ही आत्महत्या आहे की स्वेच्छा मरण ? या दोन्हीत नक्की काय फरक आहे ?

१. नैसर्गिक मृत्यु ही जैविक घटना आहे. निसर्गाने ठरविलेला शेवटचा श्वास घेतला की तो येतो. त्यासाठी काहीही करावे लागत नाही, म्हणूनच तो नैसर्गिक.
२. लहानपणी शेजारचे एक आजोबा असे मरताना पाहिले आहेत. त्यावेळी २-३ रीत होतो. त्यांच्या आजूबाजूला धूप लावला होता. भजनीमंडळ भजनासाठी बोलावले होते. एकंदरीत वातावरण तणावरहित करण्याचा प्रयत्न होता. ते आमच्यासमोर शेवटच्या घटका मोजत होते आणि त्यांचा शेवटचा श्वास जातानाचे सर्वजण साक्षी होते.
३. निसर्गाने ठरविलेला मृत्यु सजीवाने आपल्या हातात घेतला की तो अपघातीच असतो. त्यामुळे स्वेच्छामरण ही आत्महत्याच, कितीही गोंडस व्याख्या किंवा कारणमिमांसा दिली तरीही.

- (जे पटतं ते बोलणारा) सोकाजी

शा वि कु's picture

19 Oct 2020 - 10:37 am | शा वि कु

तो मुद्दा नाही पटला. पण हे पुरेपूर पटले-
स्वेच्छामरण हि आत्महत्याच हे योग्य पॉईंट केले आहे. आत्महत्या ऍक्टिव्ह, आणि स्वेच्छामरण पॅसिव्ह.आऊटकम तोच.

आकलन असणार ?

अर्थात, मृत्यू ही चिरनिद्रा असल्यानं, सजग व्यक्तीला रोजच्या झोपेप्रमाणे तिचीही चाहूल लागतेच; पण अगदी शांत झोपून शेवटचा श्वास घेणारे एक ओशो सोडता माझ्या माहितीत दुसरं कुणीही नाही.

निसर्गाला व्यक्ती जागृत आहे किंवा नाही याच्याशी काहीही घेणं-देणं नाही, तस्मात नैसर्गिक मृत्यू आणि कमालीची सजगता हे काँबिनेशन फार दुर्मिळ आहे.

त्यात शारिरिक व्याधींनी देह घेरला तर पुढची सगळी व्यवस्था हॉस्पिटलच्या हातात जाते त्यामुळे तुमचा अपवादात्मक कल्पनाविलास योग्य असला तरी प्रॅक्टिकली फारसा कामाचा नाही.

Gk's picture

19 Oct 2020 - 2:06 pm | Gk

ओशोनि आत्महत्या केली ना ?

संजय क्षीरसागर's picture

19 Oct 2020 - 7:35 pm | संजय क्षीरसागर

ओशोंना नैसर्गिक मृत्यू आला. त्या वेळी त्यांच्या इनर सर्कलचे लोक आसपास होते.

Rajneesh died on 19 January 1990, aged 58, at the ashram in Pune, India. The official cause of death was heart failure, but a statement released by his commune said that he had died because "living in the body had become a hell" after alleged poisoning in US jails.

नंतर मृत्यूपत्रावरुन बरेच वादंग झाले.

सुबोध खरे's picture

20 Oct 2020 - 9:19 am | सुबोध खरे

ओशोंना नैसर्गिक मृत्यू आला

५८ व्या वर्षी ? नैसर्गिक मृत्यू?

शरीर एवढे गलितगात्र कसे काय झाले बुवा?

बढिया है!

एकदा एकाला गुरु मानला कि त्याचे कोणतेही कार्य हे अवतारकार्यच असते अशा अंधविश्वास असणाऱ्या संप्रदायाचे हे उत्तम उदाहरण आहे.

सुबोध खरे's picture

20 Oct 2020 - 9:26 am | सुबोध खरे

https://www.thequint.com/news/india/was-osho-killed-7-haunting-questions...

1. What Went Wrong At 1pm?

२. Did Osho Die at 5pm?

3. What Was the Real Cause of Death?

4. Why the Hurry For Cremation?

5. Why Was Osho’s Mother Kept In the Dark?

6. Why Was the Will Kept Secret?

7. Were Osho’s Signatures Photocopied?

जीवंत असतांना ते काय म्हणाले या मला रस होता. आणि ते मी पूर्णपणे आत्मसात केलं आहे.

त्यांना नैसर्गिक मृत्यू आला की त्यांची हत्या झाली की अमेरिकेत त्यांच्यावर झालेल्या विषप्रयोगामुळे (रेडिएशन) त्यांचा अकाली मृत्यू झाला या विषयाची चर्चा अज्ञानी लोकांनी लावून धरावी.

सुबोध खरे's picture

20 Oct 2020 - 7:36 pm | सुबोध खरे

आमच्यापैकी कुणालाच ओशो चा मृत्यू कशामुळे झाला यात अजिबात रस नाही.

पण तुम्हीच लिहिलं आहे कि त्यांना नैसर्गिक मृत्यू आला. पण अगदी शांत झोपून शेवटचा श्वास घेणारे एक ओशो सोडता माझ्या माहितीत दुसरं कुणीही नाही.आणि एकंदर नैसर्गिक मृत्यू बद्दल भाष्य केलंय

त्यावरुन आपले म्हणणे साफ चूक आहे एवढंच लिहायचं आहे.

ते जिवंत असताना काय म्हणाले याचा या लेखाशी काहीही संबंध नाही.

असलेली त्यांची स्वीय-सहायिका यांची निवेदनं, मृत्यू पश्चात त्यांचे प्रकाशित झालेले फोटो, त्यांचं मृत्यूपूर्वी प्रकाशित झालेलं साहित्य आणि त्यांचं सिद्धत्व या माहिती वरुन तसं म्हटलं आहे.

२.

ते जिवंत असताना काय म्हणाले याचा या लेखाशी काहीही संबंध नाही.

अती विनोदी कमेंट !

मृत्यूपूर्वी विदेहत्व कळणं अशी सिद्धत्वाची व्याख्या आहे. मृत्यू पश्चात व्यक्ती काय बोलणार ? अर्थात, तुमचा त्याच्याशी सुतराम संबंध नाही त्यामुळे असा विनोदी प्रकार तुम्ही करु शकता.

सुबोध खरे's picture

21 Oct 2020 - 11:00 am | सुबोध खरे

लेखाचा विषय काय आहे?

आपलाच खरं करण्यासाठी( ओशो यांचा मृत्यू नैसर्गिक होता असे एकदा म्हणायचं आणि ते खोटं ठरलं तर शब्दांचा कुभांड रचणे असला भंपकपणा सोडून द्या.

ज्या त्या विषयात आपलं भंपक अध्यात्म आणून धाग्याचा काश्मीर करणं सोडून द्या.

विषयाला धरून लिहिण्यासारखं असेल तर लिहा

उगाच थापा मारणं मग ते उघडकीस आला कि वैयक्तिक पातळीवर उतरून प्रतिसाद्कर्त्याला दूषणं देणं सोडून द्या

१. नैसर्गिक मृत्यू याचा अर्थ जो आत्महत्या, हत्या, प्रायोपवेशन (अथवा तशी प्रक्रिया) किंवा अपघात यांनी झाला नाही असा मृत्यू. ओशोंचा मृत्यू त्या अर्थानी नैसर्गिक झाला.

२. तुम्हाला अध्यात्मच कळत नसल्यानं मृत्यू हा अध्यात्मिक विषय आहे ही बेसिक गोष्ट कळण्याची शक्यता शून्य.

३. एकतर इच्छामरणाच्या प्रक्रिये विषयी तुम्हाला काही माहिती नाही आणि तरीही तुम्ही प्रतिसाद रेटतायं ही कमाल आहे.

सुबोध खरे's picture

21 Oct 2020 - 6:46 pm | सुबोध खरे

१. नैसर्गिक मृत्यू याचा अर्थ जो आत्महत्या, हत्या, प्रायोपवेशन (अथवा तशी प्रक्रिया) किंवा अपघात यांनी झाला नाही असा मृत्यू. ओशोंचा मृत्यू त्या अर्थानी नैसर्गिक झाला.

त्यांचं शवविच्छेदन झालं होता का
? नाही मग तो अनैसर्गिक मृत्यू नाही किंवा आजारपणामुळे मृत्यू नाही हे कसं छातीठोक पणे सांगताय? तुमचे चेले चमचे फार तर ऐकून घेतील

२. तुम्हाला अध्यात्मच कळत नसल्यानं मृत्यू हा अध्यात्मिक विषय आहे ही बेसिक गोष्ट कळण्याची शक्यता शून्य.

मृत्यू हा अध्यात्मिक विषय आहे कि नाही ते मला माहिती नाही पण ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि हा माझ्या अभ्यासाचा विषय आहे त्यामुळे ते मला नक्की माहिती आहे. गांडूळांचा मृत्यू पण अध्यात्मिक असतो का? ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे एवढं नक्की

३. एकतर इच्छामरणाच्या प्रक्रिये विषयी तुम्हाला काही माहिती नाही आणि तरीही तुम्ही प्रतिसाद रेटतायं ही कमाल आहे.

एकतर इच्छामरणाच्या प्रक्रिये विषयी तुम्हाला काही माहिती नाही हे सांगणारे तुम्ही कोण टिकोजीराव?

मीच तेवढा शहाणा आणि दुसरे सर्व मूर्ख हे समजणे हा मानसिक आजार आहे ( delusion of gradeur)

एक वेळ शास्त्रज्ञांना या विषयाला हात घालायची इच्छा नसणं समजू शकतं पण अध्यात्मिक धुरंधरानी इतक्या महत्त्वाच्या विषयाला चाट मारली हे आश्चर्य आहे.

वेळ मिळाला की यावर संशोधन करुन एक सोपा आणि सामान्यांना सहज अनुसरता येईल असा उपाय नक्की शोधणार आहे.

वा ! काय आत्मप्रौढी आहे?

मानसिक आजारातून बरे व्हा हि शुभेच्छा

१. नैसर्गिक मृत्यू झाल्यावर शवविच्छेदनाची गरज नसते इतकी साधी गोष्ट तुम्हाला माहिती नसावी हे आश्चर्य आहे !

२.

गांडूळांचा मृत्यू पण अध्यात्मिक असतो का?

फारच छान प्रश्ण ! मृत्यू हा अध्यात्मिक विषय आहे आणि इथे मानवी मृत्यूबद्दल चर्चा चालू आहे. अध्यात्म हा अमृताचा शोध आहे.

३.

एकतर इच्छामरणाच्या प्रक्रिये विषयी तुम्हाला काही माहिती नाही हे सांगणारे तुम्ही कोण टिकोजीराव?

चर्चेचा विषयच तो आहे ! आणि तुम्ही सुरुवातीपासून इंजेक्शन देऊन मारण्याच्या गोष्टी लिहितायं !

४. मनोरुग्णता ही वैयक्तिक शेरेबाजी आणि मुद्दा सोडून लिहिलेले प्रतिसाद यातून दिसते.

सुबोध खरे's picture

21 Oct 2020 - 7:49 pm | सुबोध खरे

नैसर्गिक मृत्यू झाल्यावर शवविच्छेदनाची गरज नसते इतकी साधी गोष्ट तुम्हाला माहिती नसावी हे आश्चर्य आहे !परत मी च शहाणा.

हे कोणत्या कायद्यात लिहिलेले आहे?

नैसर्गिक मृत्यूची कायदेशीर व्याख्या काय आहे हे जरा स्पष्ट करून सांगा मग त्याला शवविच्छेदनाची गरज असते कि नसते ते ठरवता येईल.

नैसर्गिक मृत्यू झाल्यावर प्रमाणपत्र कुणी द्यायचं ? डॉक्टरनेच ना? त्यात मृत्युचे कारण काय लिहायचे आणि आंतरराष्ट्रीय आजार संहितेतील कोणता कारण द्यायचं? हे जरा अभ्यास करून सांगा.

हां ओशोंसारखे इकडे तिकडे पैसे दाबून त्यांच्या आईला सुद्धा न कळवता गुपचूप जाळून टाकायचं असेल तर गोष्टच वेगळी

एकतर इच्छामरणाच्या प्रक्रिये विषयी तुम्हाला काही माहिती नाही हे सांगणारे तुम्ही कोण टिकोजीराव? हे आपल्याला माझ्याज्ञानाविषयी किती माहिती आहे याबद्दल लिहीलंय. चर्चेचा विषयच तो आहे !

आणि तुम्ही सुरुवातीपासून इंजेक्शन देऊन मारण्याच्या गोष्टी लिहितायं !

ते तुमच्या दर्पोक्तीला दिलेले उत्तर आहे.

मीच सर्वात शहाणा इतपत ठीक आहे दुसरे मूर्ख हा तुमचा अविर्भाव डोक्यात जातो.

नैसर्गिक मृत्यू चे प्रमाणपत्र कसे लिहायचे याचा अभ्यास करून उत्तर दिलेत तर पुढे चर्चा होऊ शकेल

अन्यथा दीड शहाण्याची अवास्तव बडबड म्हणून तुम्हाला फाट्यावर मारण्यात येत आहे

The official cause of death was heart failure असं सर्टीफिकेट तुमच्या पेशातल्या डॉक्टरनं दिलंय.

नीट वाचाल तर इतकं भारंभार आणि मुद्दा सोडून लिहावं लागणार नाही.

सुबोध खरे's picture

22 Oct 2020 - 9:32 am | सुबोध खरे

हार्ट फेल्युअर हे नैसर्गिक कारण नाही इतकं मूलभूत ज्ञानही आपल्याला असू नये याचं आश्चर्य वाटतं.

अर्थात म्हणूनच आपला इतका शब्दांचा डोलारा उभा करण्याचा केविलवाणा प्रयत्न असेल

संजय क्षीरसागर's picture

22 Oct 2020 - 11:23 am | संजय क्षीरसागर

नीट वाचा :

१. In simple terms, natural causes refer to internal factors — like a medical condition or a disease — as opposed to external factors, like trauma from an accident. In other words, natural causes could be anything from cancer to heart disease to diabetes.

२. "It just means there was nothing non-natural that happened in [the patient's] cause of death," said Dr. Patricia Allenby, director of autopsy services at the Ohio State University Wexner Medical Center. [Top 10 Leading Causes of Death]

३. On a death certificate, natural causes actually refers to the "manner of death" rather than the specific cause. Authorities indicate whether the manner of death was natural, accidental, or due to suicide or homicide, Allenby said.

आणि ही घ्या लिंक

तुमच्यासारखी हातला लागेल ती लिंक फेकलेली नाही, पुढचा प्रतिसाद देण्यापूर्वी शांतपणे वाचा

सुबोध खरे's picture

22 Oct 2020 - 11:50 am | सुबोध खरे

याच्या उलट अभिप्राय असणाऱ्या असंख्य लिंक मी देऊ शकेन.

आणि कर्करोग हृदयविकार हे नैसर्गिक मृत्यू असतील तर बोलायलाच नको

मग ४५ व्य वर्षी हृदयविकाराने माणूस मृत्यू पावला तर तो नैसर्गिक मृत्यू समजायचा का?

किंवा ओशों चा ५८ व्या वर्षी झालेला मृत्यू नैसर्गिक समजायचा का?

आंतरराष्ट्रीय आजार संहिते मध्ये नैसर्गिक मृत्यू असे कारण नाही.

आपल्याच म्हणण्याप्रमाणे १. नैसर्गिक मृत्यू म्हणजे नेमकं काय ? तो कसा येतो ? तसा मृत्यू येण्यासाठी पूर्वतयारी काय असते का काहीही नसते ?
२. अशाप्रकारे झालेले किती मृत्यू तुम्ही पाहिले आहेत ?

मग मी तर असे असंख्य नैसर्गिक मृत्यू पहिले आहेत.

आर यु जोकिंग?

नैसर्गिक मृत्यू चे प्रमाणपत्र कसे लिहायचे याचा अभ्यास करून उत्तर दिलेत
तर पुढे चर्चा होऊ शकेल

अन्यथा दीड शहाण्याची अवास्तव बडबड म्हणून तुम्हाला फाट्यावर मारण्यात येत आहे

संजय क्षीरसागर's picture

22 Oct 2020 - 12:45 pm | संजय क्षीरसागर

कर्करोग हृदयविकार हे नैसर्गिक मृत्यू असतील तर बोलायलाच नको

आता हे तुम्ही Dr. Patricia Allenby, director of autopsy services at the Ohio State University Wexner Medical Center यांच्यापेक्षा जास्त माहिती असल्यागत आणि तेही कुणाला न पटणारं लिहितायं !

सोत्रि's picture

19 Oct 2020 - 3:50 pm | सोत्रि

मी फक्त नैसर्गिक मृत्यु म्हणजे काय ह्याबद्दल बोलतो आहे. त्यात कसलाही कल्पनाविलास नाही.

- (बादरायण सबंध न जोडणारा) सोत्रि

त्या वेळी सुद्धा, आजोबा जाणारचेत तर आजूबाजूला भजन चालू ठेवा असा विचार असेल.

सजग नैसर्गिक मृत्यूसाठी जीवंत असतांना, देह झोपला आहे आणि आपल्याला कळतंय इतकं विदेहत्व साधायला लागतं : या निशा सर्व भूतानां, तस्यां जागर्ती संयमी ही ती अवस्था आहे.

कळत्या वयात तुम्ही असा मृत्यू पाहिला आहे का ?

सोत्रि's picture

19 Oct 2020 - 8:13 pm | सोत्रि

मी फक्त नैसर्गिक मृत्यु म्हणजे काय ह्याबद्दल बोलतो आहे. त्यात माझ्या वयाचा काहीही संबंध नाही.

नैसर्गिक = निसर्गदत्त!

- (बादरायण सबंध न जोडणारा) सोत्रि

Rajesh188's picture

16 Oct 2020 - 5:55 pm | Rajesh188

मी आधुनिक विज्ञान च्या युगात राहतो.
म्हणून इच्छ्या मरणाची माझी कल्पना वेगळी आहे.
असा काही शोध लागावा की मरण हे माणसाच्या इच्छ्येवर असावे.
जो पर्यंत मरणाची ईच्छा होत नाही तो पर्यंत मरण येणार आहे..
माणसाला अमर करण्याच्या क्षेत्रात काही तरी संशोधन होत असेल त्याला नक्कीच यश येईल.
तसे तर मृत्यू कोणालाच नको असतो.

कंजूस's picture

16 Oct 2020 - 8:00 pm | कंजूस

बरेच आहेत. पण जेव्हा व्यक्ती एका ठिकाणी शय्येवर पडलेली असते तेव्हा ती काही करू शकत नाही. गळफास, विष, रेल्वेतून उडी, झोपेच्या गोळ्या वगैरे.
दुसऱ्या कुणाची मदत घेतली तर त्याच्यावर खून करणे, आत्महत्या करायला भाग पाडणे, मृत्यू आणण्यास दबाव आणणे वगैरे नियम लागू शकतात.

अवांतर :

लोकहो,

आत्महत्या व प्रायोपवेशन ( म्हणजे उपास करून मरण) याविषयी पारंपरिक हिंदू मत नोंदवत आहे.

एकदा का घास तोंडातनं आंत सारला की माणसाचा त्या घासावरील ऐच्छिक ताबा संपतो. दुसरी यंत्रणा त्याचा ताबा घेऊन पचन आणि पोषण घडवून आणते. त्यामुळे मानवी शरीर हे ईश्वराधीन मानले गेले आहे. अगदी आपले स्वत:चे शरीर असले तरी त्याचा स्वेच्छेने नाश करणे अनुचित आहे. त्यामुळे आत्महत्या हे पाप धरले जाते.

मात्रं असं असलं तरी हे शरीर जिवंत ठेवण्यासाठी खाणं खावं लागतंच. अन्ननिर्मिती करतांना इतर जीवाला त्रास होतोच. पीडाविरहित अन्ननिर्मिती जवळजवळ अशक्य आहे. त्यामुळे अन्नाचा घास हा पापजनक आहे. म्हणून स्वत:चे खाणेपिणे थांबवून केलेल्या शरीरनाशास आत्महत्या समजण्यात येत नाही.

इच्छामरणाची पार्श्वभूमी स्पष्ट असावी म्हणून उपरोक्त माहिती दिली आहे.

आ.न.,
-गा.पै.

प्रायोपवेशन , संथारा वगैरे करून करायचेच असेल तर करता येते.

प्रकाश घाटपांडे's picture

17 Oct 2020 - 11:30 am | प्रकाश घाटपांडे

विद्या बाळांचे आवाहन हा प्रसिद्धीचा सोस वाटतो की प्रायोपवेशन संथारा हा प्रकार प्रसिद्धीचा सोस वाटतो?

Gk's picture

17 Oct 2020 - 12:48 pm | Gk

विद्या बाळ ह्यांचा लेख प्रसिद्धी सोस वाटतो

ज्याला मरायचेच आहे , तो प्रायोपवेशन करून , संथारा घेऊन मरेल

ज्याला खरोखरच मरायचे आहे तो गळफास , विष घेऊनही मरेल

पण ह्यांच्या अपेक्षा भलत्याच आहेत , घरात मरण यावे , लगेच मरण यावे , गादी वर झोपून मरण यावे , कुणीतरी साप आणावा , कुणीतरी इंजेक्शन द्यावे , त्याचे बिल कोण भरणार , की तेही सरकारनेच भरायचे ? रेशन कार्डावर दोरी उपलब्ध करून द्या , डेथ सर्टिफिकेट अगदी सहजतेने पोराला मिळावे , त्यावर कारण काय लिहायचे ? आजकाल ईसीजी फ्लॅट लाईन चा कागद जपून ठेवूनच डॉकटर डेथ डिक्लेर करतात , नुसते पल्स बीपी डोळ्यात बेटरी पाडा वगैरेही करतातच , पण हॉस्पिटलात ईसीजी काढणे करतातच , हिला घरी मरायचे , मग हिचा ईसीजी कोण काढणार ?

आवा चालली पंढरपूरला , वेशिपासून आली घरा
तसे आहे हे
मरायचे तर नाही , उगाच सरकार , साप हे आणि ते

सन्मानाने मरण्याचा हक्कासाठी चळवळ आहे. ज्याला मरायचेच आहे , तो प्रायोपवेशन करून , संथारा घेऊन मरेल ज्याला खरोखरच मरायचे आहे तो गळफास , विष घेऊनही मरेल हे आक्षेपाचे नेहमीचे मुद्दे आहेत. आत्महत्या व इच्छामरण यात मूल्यात्मक फरक आहे.
जीके तथा कृष्णमार्जार आपण त्यांचे इच्छामरणावरील कार्य जाणुन घेउन लिहित आहात असे गृहीत धरतो. मतभिन्नता असणे स्वाभाविक आहे पण ती प्रत्येक वेळी उपहास व तुच्छता या प्रकारेच व्यक्त करावी असे नाही ना! मृत्युशय्येवर असतानाची विचार स्पंदने ही प्रसिद्धीच्या सोसासाठी असतील असे आपल्याला खरोखर वाटते का?

फार फरक नाही.

Gk's picture

17 Oct 2020 - 3:55 pm | Gk

माझे किंवा त्यांचे या विषयातील कार्य तुला माहीत आहे का ? असे सुनावण्याची इच्छा बाळगणे , ह्यालाच तर सोस म्हणतात ना ?

मरायचे आहे तर गप मरावे , हॉस्पिटलात आजारी असेल तर डी एन आर भरावे नाहीतर बाहेर असेल तर ज्याला रूढार्थाने आत्महत्या म्हणतात , ते मुकाट्याने करून मोकळे व्हावे. दोन्ही मार्ग समाजाने उपलब्ध करून दिले आहेत.

माहितगार's picture

17 Oct 2020 - 7:20 pm | माहितगार

ईच्छा मरण आणि आत्महत्या हे दोन्ही करू नयेत या साठी सुखकर परिस्थिती निर्माण करण्यातले समाजाचे अपयश आले तरी जिवन सुखकर करण्याच्या दृष्टीने प्रगती करणे समाजाचे उद्दीष्ट असू शकते, मृत्यू नैसर्गिकपणे झालाच तर त्यातल्या त्यात सूखकर व्हावा पण जिवन क्षमता वाढवण्यानेच समाजाची धारणा होते ती धारणा विस्कळीत करणे कोणत्याही समाजाचे उद्दीष्ट असू नये. यामुळेच समाजाने ईच्छा मरण आणि आत्महत्या पैकी कोणतेही स्विकारावेअसे वाटत नाही.

एका अपत्याचा जन्म होताना एका पित्याची बहुधा सकारात्मक भावनिक गुंतवणूक असते, आईची त्यापेक्षाही अधिक असते, त्यांना असा निर्णय घेण्यास साहाय्य करणार्‍या समाजाचीही सकारात्मक भावनिक गुंतवणूक असते, समाजाच्या धारणेच्या प्रत्यक्ष अनुभवातील मर्यादा लक्षात घेऊनही अशी भावनिक गुंतवणूक कमी लेखता येत नाही. व्यक्ती जन्मास येताना सृजक पालक गुरूजन आप्त मित्र समाज देश यांचे अपरिमीत भावनिक ऋण घेऊनच जगात आलेली असते आणि मृत्यूपर्यंत प्रसंगी स्वभावना बाजूस ठेऊन इतरांच्या भावनांसाठी माणसाने अखेरच्या नैसर्गिक श्वासा पर्यंत प्रयत्न करावयास हवेत.

शा वि कु's picture

17 Oct 2020 - 8:02 pm | शा वि कु

असहमत.
{आयन रँड वैगेरे :)) }

इतरांनी पण रोगी व्यक्तीच्या भावना बघून त्याचा त्रास कमी केला पाहिजे, त्याच्या "भावनां"ची काळजी घेतली पाहिजे, आणि आपल्या भावना बाजूला ठेऊन रोग्याला सोप्प्यात सोप्प्या आणि समाजमान्य पद्धतीने मोकळे करावे.

त्यामुळे सर्क्युलर रेफरन्स होतो आहे असे वाटते.

सॅगी's picture

17 Oct 2020 - 8:07 pm | सॅगी

सहमत आहे.

सुबोध खरे's picture

19 Oct 2020 - 10:27 am | सुबोध खरे

हॉस्पिटलात आजारी असेल तर डी एन आर भरावे

डी एन आर (DO NOT RESUSCITATE) या फॉर्म ला भारतात कोणताही कायदेशीर आधार नाही. ते फॉर्म भरणारे किंवा भरून घेणारे हे केंव्हाही कायद्याच्या कचाट्यात अडकू शकतात.

BC

सार्वजनिक न्यासावर कोणत्याही बाबतीत मनाला येईल ते लिहिण्याच्या अगोदर जरा गंभीर पणे विचार करून लिहीत जा.

The Do Not Resuscitate (DNR) order is still not documented legal practice in India. It is a verbal communication between the clinician and the patient’s relative or caregiver. The autonomy of the patient also remains a weak concept. Even the right to live a dignified life or die a dignified death has not been extensively discussed. The law is silent or ambiguous on most issues related to end-of-life care.

the Indian Journal of Medical Ethics

https://ijme.in/articles/do-not-resuscitate-orders/?galley=html#:~:text=...(DNR,also%20remains%20a%20weak%20concept.

Gk's picture

21 Oct 2020 - 12:16 pm | Gk

हो , ते अनावधानाने लिहिले.

सुबोध खरे's picture

19 Oct 2020 - 10:16 am | सुबोध खरे

प्रसिद्धीचा सोस वाटतो

जिथे तिथे पचपच करणं हा पण प्रसिद्धीचा सोस वाटतो

मग ती प्रसिद्धी - कु प्रसिद्धी का असेना?

any publicity is publicity- good or bad

चौथा कोनाडा's picture

19 Oct 2020 - 12:55 pm | चौथा कोनाडा

+१
अनुमोदन

प्रकाश घाटपांडे's picture

17 Oct 2020 - 7:57 pm | प्रकाश घाटपांडे

विद्या बाळ यांच्या मते इच्छामरण म्हणजे जगणे ’नकोसे’ झाले म्हणून नव्हे पण जगणे”पुरेसे ’झाले या भावनेतून असलेला मृत्युचा जाणीवपुर्वक स्वीकार. पुरेसे हे ठरवण्याचा अधिकार अर्थातच त्या व्यक्तीचा.

गणेशा's picture

17 Oct 2020 - 10:36 pm | गणेशा

मुळ लेख वाचला.. मला तरी हे विचार पटतात.. अगदी माझे हेच म्हणणे आहे..

प्रतिसाद हि बरेचसे वाचले.. काही पटले..

आपला कार्यभाग आटोपला आणि आता आपली गरज नाही असे वाटले तर इच्छा मरण हा मार्ग असावा असे वाटते..

मागे माझ्या शशक कथेत हाच विषय घेतला होता.. शब्द मर्यादा मुळे मात्र जास्त बोलता आले नाही..
उलट तेथे निगेटिव्ह रिप्लाय पहायला मिळाले..

तरी हा विषय महत्वाचा आहे असे मला वाटते..

शशक धागा - विषय सेम असल्याने लिंक देतोय.
इच्छा मरण

प्रकाश घाटपांडे's picture

18 Oct 2020 - 9:59 am | प्रकाश घाटपांडे

आपला कार्यभाग आटोपला आणि आता आपली गरज नाही असे वाटले तर इच्छा मरण हा मार्ग असावा असे वाटते..

आता आपली गरज नाही हे कुणी ठरवायचे? त्या व्यक्तीने की समाजातल्या अन्य व्यक्तींनी? असा तो तिढा आहे. चौकट राजा यांच्या प्रतिसादात त्याचा काही भाग आहे. विद्या बाळांनी व्यक्त केलेली अखेरची स्पंदने व एकूण आतापर्यंत मांडलेले इच्छामरणाविषयीचे विचार या दोन्हीचा भाग प्रतिक्रियेत येणे इष्ट आहे. काहींना इच्छामरण व त्याच्या समर्थनार्थ मांडलेले विद्या बाळांचे विचार हे अत्तार्किक,नक्षलवादी, गुन्हेगारी विचारांचा प्रसार वाटला. पुढे काहींनी त्यात अविचारी व देशद्रोही ही विशेषणे पण अ‍ॅड केली. जे विचार आपल्याला पटत नाहीत त्या विचारांना अशी विशेषणे देणे हे कुठल्याही वैचारिक चर्चांमधे खर तर अभिप्रेत नसते. तिथे विचारांचे खंडन मंडन अभिप्रेत असत. पण विचार पुर्वक प्रतिक्रिया द्यायच्या ऐवजी इन्स्टंट प्रतिक्रिया देउन मोकळे होतात.मग वितंडवाद चालू होतात. अशावेळी पुर्णविराम देणे चांगले. सुदैवाने काही लोक नंतर तरी विचार करतात. जालीय अस्तित्व अर्थात आयडीसमूह प्रबोधन या लेखात मी त्याचा काही उहापोह केला आहे. वर दिलेल्या मंगला आठलेकर यांच्या जगण्याचीही सक्ती आहे... या पुस्तकात अशा समाजातल्या वेगवेगळ्या प्रतिक्रियांचा आढावा घेतला आहे.

Rajesh188's picture

18 Oct 2020 - 9:12 am | Rajesh188

भारतात कायदेशीर करणे अत्यंत धोकादायक आहे.
त्याचा गैर फायदा संपत्ती साठी किंवा बाकी स्वार्थ साठी घेतला जावू शकतो..
इच्छ्य मरण हे फक्त शरीर पूर्णतः निकामी झाले असेल,माणूस खूप वर्ष कोमात असेल,गंभीर आजाराने सर्व अवयव बाद झाले असतील.
अशा विशिष्ट परिस्थिती च तो अधिकार दिला गेला पाहिजे..
आणि इच्छा मरण चा अधिकार कोणाला असावा स्वतः त्या व्यक्ती ला की अजुन कोणाला हा पण गंभीर प्रश्न च आहे.
आता हत्या हा गुन्हा आहे हा कायदाच ह्या साठी असावा की कोणत्या ही अनैसर्गिक मृत्यू ची पोलिस मार्फत सखोल चोकशी व्हावी.
आत्महत्या हा गुन्हा नाही कायद्यानं ठरवलं
असते तर आत्म हत्या च्या आडून खून झाले असते आणि त्याची कसलीच चोकशी झाली नसती.
त्या मुळे इच्छा मरण विषयी काही निर्णय घेण्ापूर्वी सर्व धोक्याचा विचार होणे गरजेच आहे.
माणसाला मारायला ते पण त्या व्यक्ती ला कसलाच त्रास न होता खूप मार्ग आहेत.

माहितगार's picture

18 Oct 2020 - 11:29 am | माहितगार

अगदी बरोबर आहे, आत्महत्या / इच्छामरण कायदेशीर नसतानाही खूनाच्या घटनांना आत्महत्या / इच्छामरण दाखवण्याचा प्रयत्न आरोपीपक्षा कडून केला जाताना दिसतो; भारतात काय जगात कुठेही एकदा आत्महत्या काय किंवा ईच्छामरण काय कायदेशीर आणि सार्वत्रिक म्हटले की त्यांना आत्महत्या म्हणून दाखवणे मानवी मन अधिक सहज स्विकारू लागते आणि परिणाम खूनांच्या चौकश्या मागे पडण्यावर होऊ शकतो. त्या शिवाय दोन मोठ्या अनुषंगिक समस्या असतात.

१) आत्महत्या किंवा ईच्छामरण अगदी कागदोपत्री साक्ष पुरावे ठेऊन जरी जाहीर केले तरी, आत्महत्या किंवा ईच्छामरण केलेल्या व्यक्तीस ते जगले तर जिवनाची उमेद पुन्हा येऊ शकली असती हि शक्यता शिल्लक राहतेच.

२) आत्महत्या किंवा ईच्छामरण अगदी कागदोपत्री साक्ष पुरावे ठेऊन जरी जाहीर केले तरी अगदी अंतीम क्षणी संबंधीत व्यक्तीस मृत्यू एवजी अजून जगण्याची इच्छा झाली आणि व्यक्तीच्या मृत्यूत वेस्टेड इंटरेस्ट असलेल्याने अशी इच्छा जिवनेच्छा दाबली आणि मृत्यू होऊ दिला अथवा चक्क खून केला तर ती आत्महत्या नव्हती खून होता हे कळण्याचे मार्ग संकुचित होऊन जातात.

३) दबाव टाकून किंवा मानसिक अस्थिरतेचा फायदा घेऊन आत्महत्या किंवा ईच्छामरण अगदी कागदोपत्री साक्ष पुरावे तयार करून घेऊन मग इच्छामरण दाखवणे पण प्रत्यक्षात तो क्रम खूनी मनोवृत्तीचा परीणाम असणे संभवते; आत्महत्येस दबाव टाकला होता हे सिद्ध करणे तसेही कठीण प्रक्रीया असते आणि एकदा आत्महत्या/इच्छामरण प्रक्रीया कायदेशीर केली की कुणि दबाव टाकला होता अथवा मानसिक अस्थिरतेचा फायदा घेतला होता हे सिद्धाकरणे आणखीच अवघड होऊन जाते.

४) अगदी मागच्या शतकापर्यंतच्या सती प्रथेचे उदाहरणच घ्या, मानवी समुह कशाचे उदात्तीकरण करतील हे सांगणे कठीण असते शतकोंन शतके भारतीय उपमहाद्वीपातील हिंदू स्त्रीया पतीच्या चितांवर हकनाक जळत राहील्या आणि ज्या मानवी समुहात असे उदात्तीकरण आणि दबाव नव्हते तिथे स्त्रीया जिवंत राहण्याची संधी आणि शक्यता वाढली. एकदा ईच्छामरण कायदेशीर केलेकी कुणालाही कोणासोबतही सती जाण्याची मुभा दिल्यासारखे होणार नाही का?

महत्वाने अखेरचा नव्हे पण क्रमाने शेवटचा आक्षेप; एकीकडे सटर फटर व्यक्ती कुठेतरी एखाद्या मागणी साठी स्वतःला जाळून घेण्यापर्यंतचे मार्ग ब्लॅकमेलिंग साठी वापरतात माणूस मेला की मागणीला चेव येऊन दंगली होतात आणि सर्वच व्यक्तिगत मागण्या उचित असतात असे नव्हे सरकारला अनुचित मागण्या मान्य करण्याचे दबाव वाढले तर कोणतेही सरकार सरकार म्हणून चालवणे कठीण होऊन जाऊ शकते. शिवाय नैसर्गिकपणे मानवी स्वभाव हे व्यक्तीपुजक असतात, कोणत्या व्यक्तीची किती व्यक्तीपुजा करतील ते सांगता येत नाही आणि असे व्यक्तीपुजा करुन घेणारे नेतृत्वाने एखादी गैरमागणी मनवून घेण्यासाठी गांधीगिरी म्हणून आमरण ऊपोषणाच्या धाकाने मागण्या पदरात पाडून घेतल्या किंवा अशी आमरण उपोषण करणारी व्यक्ती दगावल्याने सामाजिक अस्थिरता निर्माण होऊन काही दंगली सारख्या विपरीत परिणाम झाले तर त्याची जबाबदारी कोण घेणार ?

प्रकाश घाटपांडे's picture

18 Oct 2020 - 1:07 pm | प्रकाश घाटपांडे

कुठलाही कायदा केला तरी दुरुपयोग होण्याची भीती ही असतेच. प्रभाकर नानावटी यांचे दोन लेखाची लिंक खाली देत आहे

पुन्हा एकदा सुखांत!

सन्मानाने मरण्याचा हक्क

यात काही चांगले मुद्दे मांडले आहेत.

चौथा कोनाडा's picture

22 Oct 2020 - 5:42 pm | चौथा कोनाडा

दोन्ही लेख छान आहेत.
पैकी" सन्मानाने मरण्याचा हक्क" हा लेख खूपच माहितीपूर्ण आहे.
धन्यवाद, सर.

सुबोध खरे's picture

22 Oct 2020 - 7:03 pm | सुबोध खरे

दोन्ही लेख कायद्याच्या दृष्टीने कालबाह्य झालेले असले तरी त्यात उपस्थित केलेले मुद्दे विचार करण्यासारखे आहेत.

पहिल्या लेखात म्हटले आहे तसे आता औषधाचा डोस नियंत्रित करून माणूस न मरता त्याची वेदनेतून सुटका करता येते.

उदा कमरेच्या मणक्यात गेलेल्या कर्करोगामुळे असह्य वेदना होत असतील तर एक अत्यंत पातळ अशी नळी ( बॉलपेनच्या रिफील च्या अर्ध्या व्यासाची) मणक्यापर्यंत नेऊन त्यातून लांब कालपर्यंत प्रभाव असणारी वेदना नाशके देता येतात ज्यामुळे रुग्ण मृत्यू येईपर्यंत वेदनेपासून मुक्तता मिळवू शकतो.

भारतात अशी वेदना मुक्तीचे दवाखाने सरकारी रुग्णालयात सुद्धा सुरु झालेले आहेत.

सुबोध खरे's picture

22 Oct 2020 - 7:28 pm | सुबोध खरे

दुसऱ्या लेखात श्रीमती अरुण शानभाग बद्दल लिहिलंय त्यात सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने त्यांना मृत्यू देण्यास नकार दिला होता कारण त्यांच्या अनेक सहकारी के इ एम रुग्णालयात त्यांची अतीव काळजीने ३५ वर्षे काळजी घेत होत्या. त्यांच्या इतक्या कार्याला तिलांजली दिली गेली असती आणि याचिकाकर्त्या या त्यांच्या अत्यंत जवळच्या नात्यातील किंवा मैत्रीतील नव्हत्या आणि हे इच्छामृत्यू प्रकरण पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे सोपवण्याची शिफारस केली.
२०१५ मध्ये श्रीमती अरुण शानभाग यांचा न्यूमोनिया मुळे मृत्यू झाला.
परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्णपीठाने २०१८ मध्ये या प्रकरणात निर्णय देताना काही मार्गदर्शक तत्वे घालून दिली आहेत ज्यात सक्रिय मरणास Active euthanasia (इंजेक्शन देऊन किंवा वैद्यकीय उपचाराने) परवानगी नाकारली आहे

परंतु निष्क्रिय (इच्छा) मरणास passive euthanasia सशर्त परवानगी दिली आहे. यात त्या व्यक्तीच्या अन्न किंवा वैद्यकीय उपचार ज्यामुळे आयुष्य लांबवले जाऊ शकते अशा गोष्टी थांबवून मृत्यू येण्यास संमती दिली आहे.
Passive euthanasia, as it is called, will apply only to a terminally ill person with no hope of recovery, a panel of five judges said. Active euthanasia, by administering a lethal injection, continues to be illegal in India.

Said five judges headed by Chief Justice Dipak Misra, “Should we not allow them to cross the door and meet death with dignity? For some, even their death could be a moment of celebration.”

The court also permitted individuals to decide against artificial life support, should the need arise, by creating a “living will”.

The decision makes it legal for the terminally ill to decide against using life support systems to continue living, and frees the doctors and families of those who slip into incurable comas to halt such measures, in the patients’ best interest.

सुबोध खरे's picture

19 Oct 2020 - 10:38 am | सुबोध खरे

इच्छ्य मरण हे फक्त शरीर पूर्णतः निकामी झाले असेल,माणूस खूप वर्ष कोमात असेल,गंभीर आजाराने सर्व अवयव बाद झाले असतील.
अशा विशिष्ट परिस्थिती च तो अधिकार दिला गेला पाहिजे..

माझ्या भावाचा वर्गमित्र जी VJTI मधुन मेकॅनिकल इंजिनियर झाला होता. एकदा ब्रोन्कोस्कोपी करताना त्याचे स्वरयंत्र आकुंचन पावल्याने मेंदू अर्धमृत झाला.

गेली ३० वर्षे तो चिरनिद्रेत आहे. बायको त्याची काळजी घेत आहे. शरीर व्यवस्थित आहे. दाढी वाढते. पण चेतना नाही.

मुलगा तेंव्हा १ वर्षाचा होता. तो आता मोठा होऊन लग्नही झालेले आहे.

अशा माणसाला अधिकार (?) दिला तरी तो अधिकार कसा कार्यवाहीत आणायचा हे कायद्याला सांगता येत नाही.

Rajesh188's picture

18 Oct 2020 - 1:07 pm | Rajesh188

उतार वयात शेवटची काहीच वर्ष लोकांची असहाय अवस्थेत जातात.
शारीरिक क्रिया करण्यासाठी पण दुसऱ्या वर अवलंबून राहवे लागते.
तो जो काळ आहे तो जास्ती जास्त 3 ते 4 वर्षाचा असतो.
फक्त ही 3 ते 4 वर्ष अंथरुणावर पडून असल्या
मुळे आणि कोणी काळजी घेण्याची जबाबदारी घेत नसल्या मुळे त्या व्यक्ती ला जगवसे वाटत नाही ती त्याची मजबूरी असते .
त्या काळात त्याची काळजी घेणारी यंत्रणा असेल तर कोणालाच मरण नको आहे.
आत्ताच्या काळात जीवन फास्ट असल्या मुळे,एकत्रित कुटुंब पद्धती नसल्या मुळे अजुन च केविलवाणी स्थिती व्यक्ती ची होते.
सरकारी पातळीवर असहाय वृध्द व्यक्ती ची मोफत आणि दर्जेदार व्यवस्था यंत्रणा उभी राहिली तर इच्छा मरण ही कल्पना मागे पडेल.
आणि हाच मार्ग योग्य आहे.

सुबोध खरे's picture

19 Oct 2020 - 10:31 am | सुबोध खरे

सरकारी पातळीवर असहाय वृध्द व्यक्ती ची मोफत आणि दर्जेदार व्यवस्था यंत्रणा उभी राहिली

सरकार जिवंत व्यक्तींची वाजवी पैसे देऊनही व्यवस्था करणे अशक्य आहे तर असहाय वृध्द व्यक्ती ची मोफत आणि दर्जेदार व्यवस्था झाली पाहिजे हि अत्यंत आदर्शवादी अपेक्षा झाली.

आणि हि आपल्या आयुष्यभरात पूर्ण होणार नाही.

एवढी चर्चा झाली पण विद्या बाळ यांचा नैसर्गिक मृत्यू झाला की त्यांना je हवं होतं ते साध्य केलंच शेवटी आणि त्यामुळे निधन झालं त्यांच ?
हे चर्चेनंतरही कळलं नाही.

प्रकाश घाटपांडे's picture

19 Oct 2020 - 8:36 pm | प्रकाश घाटपांडे

ट्रीटमेंट नाकारण्याने येणार मृत्यु हा नैसर्गिक समजावा का असा खरा तुमचा प्रश्न आहे का? नक्की काय झाल असेल ते माहीत नाही.

विद्या बाळ ह्या आजाराने त्रस्त होत्या आणि उपचार सुरू असताना च त्यांचा वयाच्या 84 वर्षी मृत्यू झाला.
ठराविक वया नंतर शरीरातील सर्व अवयव जवळ जवळ निकामी झालेले असतात.
आणि अशा अवस्थेत त्यांच्या वर उपचार करून ते दुरुस्त होत नाहीत किंवा त्यांची कार्य क्षमता पण वाढत नाही.
उपचार करा किंवा करू नका काहीच महिन्यात तो व्यक्ती मरणार असतो उपचार नी तो वाचू शकत नाही.
त्या मुळे उपचार थांबवणे म्हणजे इच्छा मरण असे फक्त technically म्हणता येईल पण काही सत्य नाही.

चौथा कोनाडा's picture

19 Oct 2020 - 9:59 pm | चौथा कोनाडा

उपचार थांबवणे म्हणजे इच्छा मरण असे फक्त technically म्हणता येईल पण काही सत्य नाही.
असहमत.

उपचार करा किंवा करू नका काहीच महिन्यात तो व्यक्ती मरणार असतो उपचार नी तो वाचू शकत नाही.

दिवस, आठवडे, महिने, वर्ष ... नक्की कसं सांगणार ? इच्छा मरण म्हणजे ठरवलेल्या वेळी खात्रीनं मृत्यू देता आला पाहिजे.

1. इच्छा मरणाचे एकूण 4 प्रकार आहेत , पैकी महत्वाचे 2 आहेत , एकाला एक्टिव्ह एथुनिसिया म्हणतात , एकाला पेसिव्ह एथुनिसिया म्हणतात. एक्टिव्ह म्हणजे धडधाकट किंवा आजारी माणसाला कसले तरी इंजेक्शन देऊन मारणे, याला भारतात आज मान्यता नाही व भविष्यातही मिळण्याची शक्यता आलमोस्ट शून्य आहे, त्यामुळे मला आता जगण्यात रस नाही , म्हणून मी अवतार समाप्त करत आहे , वगैरेला कायद्याने काहीतरी साप , इंजेक्शन शोधून काढावे , असे ज्यांना जे वाटते , ते तसे सध्या तरी होणार नाही. त्यांच्यासाठी रूढार्थाने आत्महत्या हाच मार्ग उपलब्ध आहे.

2. पेसिव्ह म्हणजे काय ? तर आजारी मनुष्य ऑलरेडी लाईफ सपोर्टवर असेल तर त्याचे ते सपोर्ट बंद करणे , उदा व्हेंटिलेतर बंद करणे , ऑक्सिजन बंद करणे इ इ

3. मला गंभीर रोगात फार मोठे उपचार करून जगवू नका वगैरे
इच्छा पत्र लिहिणे हा पेसिव्ह चाच एक प्रकार / भाग होईल. त्याला भारतात अंशतः परवानगी आहे , बहुतांश वेळेला आर्थिक कारणाने रुग्ण , नातेवाईक असे निर्णय घेत असतात . अर्थात , यावर एक उपाय आहे , सरकारी हॉस्पिटलात मोफत उपचार घेण्याचा, तोही त्याच पत्रात उल्लेख करून रुग्ण , नातेवाईक तेही नाकारून घरी जातात , ह्याला DAMA म्हणतात म्हणजे डिस्चार्ज अंगेंस्ट मेडिकल एडव्हाईज म्हणतात , मग त्याचे जे घरी किंवा रस्त्यात होईल ते होईल.
महागडे उपचार टाळून किरकोळ उपचार करत हॉस्पिटल मध्येच शेवट होऊ द्यावे , असेही करतात , तेदेखील या पेसिव्ह प्रकारातच येईल.

4. आता महत्वाचा प्रश्न आहे , सही कोण कोण व कुठे करणार ? असे इच्छा पत्र लिहून तीन साक्षीदार वगैरे सही घेऊन लिहून ठेवा , वगैरे कुणी म्हणत असेल तर असे पत्र कायद्यानुसार शून्य आहे. असे पत्र म्हणजे काही आधार कार्ड नव्हे की एकदा काढून लेमीनेट करून ठेवले की झाले.

हे पत्र त्या हॉस्पिटलायझेशन मध्येच सही करून द्यावे लागते म्हणजे एडमिशन झाल्यानंतर त्या हॉस्पिटल मध्येच , ते त्या हॉस्पिटलच्या नमुन्यात किंवा हॉस्पिटल देईल त्या केस पेपरवर तारीख वार वेळ घालून लिहायचे असते , आधीच लिहून खिशात ठेवायचे नसते.

कायद्यानुसार दोन साक्षीदार व एक मॅजिस्ट्रेट हजर असावा लागतो , शिवाय हॉस्पिटल इंचार्ज , ट्रीटिंग डॉकटर आणि तिथले डॉकटर पेनेल ह्यांच्या सह्या असतात.

साक्षीदार दोन असतात , पैकी एक रुगणाचा नातेवाईक असतो व एक हॉस्पिटलचा स्टाफ असतो. हॉस्पिटल बाहेरच्या कुणा तरी 3 लोकांच्या सह्या घेऊन आधीच केलेले लेटर व्हॅलीड होत नाही.

5. रुगणाचीही सही लागते , रुग्णा ऐवजी नातेवाईक सही करू शकतो , पण फक्त 4 च कारणांनी

रुग्ण मायनर असेल , बिलो 18
रुग्ण कोम्यात असेल
रुग्ण मानसिक दृष्ट्या विकलांग असेल
रुगणाच्या त्या हातालाच काहीतरी झाल्याने रुग्ण सही करू शकत नसेल

ह्यातले कारणही त्या पत्रात लिहावे लागते.

6. एकदा दिलेले पत्र फक्त फक्त त्या हॉस्पिटलायजेशन मध्येच चालते , थोडा बरा झाला म्हणून रुग्ण घरी घेऊन गेले व पुन्हा एडमिट केले , तर पुन्हा नवीन लेटर लिहावे लागते.

म्हणून असे कुणास वाटत असेल की इच्छा पत्र ह्या नावाने असे पत्र लिहून ठेवा , तर अशा हॉस्पिटल बाहेरील पत्राचा काडीमात्र उपयोग होत नाही.

मुळात इच्छापत्र वगैरे संकल्पना येथील लोकांत 2015 च्या सुमारास आल्या, 2020 येईतो काही कायदे बदलले गेले आहेत.

चौकस२१२'s picture

21 Oct 2020 - 4:59 am | चौकस२१२

स्वेच्छामरण कायदेशीर करण्याचा प्रयत्न अनेक देशात चालू आहे
\पाश्चिमात्य देशात जिथे खूप उदारमतवादी समाज आणि खूप "प्रथेनुसार/ धार्मिक तत्वावर चालणार समाज " अशी दोन टोके आहेत तिथे यान्चायत यात तुंबळ वैचारिक युद्ध चालू आहे
"असिसिस्टेड युथेनेशिया" यावर डॉकटर फिलिप निष्की यांनी बरेच काम केले आहे
हे कायदेशीर केले तर त्याचा दुरुपयोग कोणी करणार नाही ना आणि ते कसे टाळता येईल हा एक अगदी व्यवहारी प्रश्न भेडसावतो परंतु खास करून रोमन कॅथॉलिक लोकांचा याला विरोध आहे तो केवळ धार्मिक कारणामुळे (गर्भपाताला जसा विरोध तसाच काहीसा ) व्यवहारी कारणांमुळे नाही ..इतर धर्मांसाचे यावर काय भाष्य आहे कोण जाणे

चौथा कोनाडा's picture

21 Oct 2020 - 12:08 pm | चौथा कोनाडा

+१

आपल्या येथील ही काही तुरळक अपवाद वगळता विचारवंत, धर्ममार्तंड या वर काही बोलत असल्याचे दिसत नाही.

Rajesh188's picture

22 Oct 2020 - 8:04 pm | Rajesh188

मृत्यू विषयी माणसाची मत ठाम नसतात.
खरे सांगायचे तर कोणत्याच व्यक्ती ल मरावे असे वाटत नाही.
जगायची खूप इच्छा प्रत्येकाची असते .
म्हणून जगण्यासाठी स्वतः चा स्वाभिमान माणूस हरावून बसतो.
मरणाच्या भीती नी सर्व त्याग करू शकतो जो त्याला जीवदान देईल त्याच्या साठी.
मला आता जगायचे नाही ,माझे सर्व कार्य पूर्ण झाले आहे तर आता मला मरण ध्या असा सरळ विचार जगातील 1 पण माणूस करत नसेल.
तर नैराश्य आल्यावर.
रोगांनी त्रस्त झाल्यावर.
च थोड्या वेळा साठी मरावसे वाटत पण काही वेळातच तो विचार निघून जातो आणि परत जगावं असे वाटते.
असे जर मत बदलत असेल तर कायदा काय करणार.

चौथा कोनाडा,

आपल्या येथील ही काही तुरळक अपवाद वगळता विचारवंत, धर्ममार्तंड या वर काही बोलत असल्याचे दिसत नाही.

मी स्वयंघोषित धर्ममार्तंड आहे. मी माझं मत सांगतो.

त्याचं काये की कुठल्याशा वैदिक ग्रंथात (की संहितेत) म्हटलंय की आयुष्याच्या अखेरपर्यंत माझी इंद्रियं व्यवस्थित चालू राहोत. ती तशी चालण्यासाठी योग व प्राणायाम करायला हवा. मग मरायची वेळ आली की बरोबर ऊर्ध्व लावता येतो. हे असं महिनोनमहिने शरीरात अडकून पडावं लागंत नाही. 'जीवेत शरद: शतं' वगैरे याच विचारधारेचे भाग आहेत.

आता सद्यस्थितीकडे वळूया. मानवी जीवन जरी अमूल्य असलं तरी आत्म्याची इच्छादेखील विचारांत घ्यायला हवी. त्यामुळे जीव जर संक्रमण शिबिरात अडकून पडला असेल तर त्याला पुढे जायला किंवा मागे यायला मदत करावी असं माझं मत आहे.

जीव गेलाय हे कसं ठरवायचं याविषयी एक युगमान्य निकष आहे. कृतयुगात हाडं नाहीशी झाली की जीव गेल्याचं समजंत. त्रेतायुगात देहावरचं मांस झडलं की मृत समजण्यात येई. द्वापारयुगात चर्मविघटन म्हणजे कातडीस भोकं पडली की जीव गेल्याचं धरंत. तर कलियुगात श्वास थांबला की माणूस मृत समजावा, असं वचन आहे.

यानुसार श्वासोत्तेजक ( = व्हेंटिलेटर ) वापरून जीव जगवणे अनुचित आहे.

आ.न.,
-गा.पै.

मग मरायची वेळ आली की बरोबर ऊर्ध्व लावता येतो

गामा पैलवान's picture

23 Oct 2020 - 11:15 pm | गामा पैलवान

संजय क्षीरसागर,

अनेक योगी लोकांनी असा ऊर्ध्व श्वास लावून जीव सोडला आहे. पण मला नक्की प्रक्रिया माहीत नाही.

आ.न.,
-गा.पै.

आयुर्वेदात श्वासाचे महाश्वास, उर्ध्वश्वास, छिन्नश्वास, तमकश्वास, क्षुद्रश्वास असे पाच प्रकार सांगितले आहेत. श्वासांच्या वेगाची भिन्नता व लक्षणांची तीव्रता यांच्यावरून हे प्रकार पाडले आहेत. वायूची (प्राणाची) उर्ध्वगति वेगानें होणें, हे श्वासाचे सामान्यरुप पांचहि प्रकारांना साधारण असें असतें.

पैकी महाश्वास, उर्ध्वश्वास आणि छिन्नश्वास हे मृत्युशी निगडीत आहेत.
महाश्वास - मृत्युच्या वेळचे नैसर्गिक शेवटचे श्वास. ह्यावर कोणाचेही अधिपत्य नाही.

उर्ध्वश्वास श्वासोच्छ्वासाची गती आणि लय उर्ध्व दिशेला लागून प्राणाचा (वायूचा) सहस्त्रार चक्राकडे वेगाने प्रवास हा उर्ध्वश्वास. ह्यावर साधनेच्या बळाने कंट्रोल करता येऊन प्राण सहस्त्रारचक्रातून विलग करता येऊ शकतो. जे मुक्तावस्थेतल्या योग्यांना शक्य होते. त्यासाठी कर्मसंस्कारांचे निर्मूलन (मोक्ष) झालेले असणे अत्यंत महत्वाचे आहे!

- (साधक) सोकाजी

गामा पैलवान's picture

24 Oct 2020 - 1:16 pm | गामा पैलवान

माहितीबद्दल धन्यवाद, सोकाजी! :-)
आ.न.,
-गा.पै.

परमहंस योगानंदांच्या आत्मचरित्रात त्यांनी अशा एका योग्याचा उल्लेख केला आहे. शेवटचे प्रवचन, महाप्रसाद वगैरे आटपुन त्यांनी "आता हे शेवटचं क्रियायोगाचं आवर्तन आटपुन मी देह ठेवतोय" असं डिक्लेअर करुन श्वासासंबंधी असंच काहि तरी करुन देहत्याग केला.

चौथा कोनाडा's picture

24 Oct 2020 - 1:19 pm | चौथा कोनाडा

व्वा, माहितीपुर्ण +१ !

तर कलियुगात श्वास थांबला की माणूस मृत समजावा, असं वचन आहे.
यानुसार श्वासोत्तेजक ( = व्हेंटिलेटर ) वापरून जीव जगवणे अनुचित आहे.

अश्या प्रकारचा युक्तिवाद इच्छामरणाच्या कायदेशीर प्रकरणात केला असावा का या बद्दल उत्सुकता !

मग मरायची वेळ आली की बरोबर ऊर्ध्व लावता येतो.

ज्यांना ऊर्ध्व लावणे ही विद्या / कला अवगत नसेल तर त्यांना मदत करावी लागणार. बाह्य यंत्रणा प्र"दान" करावी लागणार !

प्रकाश घाटपांडे's picture

24 Oct 2020 - 8:49 pm | प्रकाश घाटपांडे

स्वेच्छामरणाच्या चळवळीचा भाग म्हणून काही कार्यक्रम होत असतात. एका कार्यक्रमात नंतरच्या अनौपचारिक चर्चात एकाने मुद्दा मांडला की शरीर ही माझी संपत्ती आहे . कायद्याने प्रत्येकाला आपल्या संपत्तीचा विनियोग करण्याचा अधिकार आहे. मग माझ्या शरीराचा विनियोग मी कसा करायचा हे मीच ठरवणार. माझा तो अधिकार आहे. त्यांना मी म्हटल सध्या दयामरणावर भागवून घेउ. आपला समाज इतका पुढे जायला बराच कालावधी लागेल. तत्वत: तुमचे म्हणणे मान्य आहे.

सुबोध खरे's picture

31 Oct 2020 - 12:35 pm | सुबोध खरे

शरीर ही माझी संपत्ती आहे . कायद्याने प्रत्येकाला आपल्या संपत्तीचा विनियोग करण्याचा अधिकार आहे.

संपत्ती दुसऱ्याला दिली आणि नंतर असे समजले कि या माणसाने अफरातफर करून हि संपत्ती मिळवली आहे तर ती संपत्ती मूळ मालकाला परत केली जाऊ शकते.

परंतु एकदा प्राणज्योत मालवली तर त्या शरीरात परत प्राण फुंकणे हे सध्या तरी शक्य नाही यामुळेच फाशीची शिक्षा देण्याच्या अगोदर कायद्यातील सर्व रस्ते आणि पळवाटा बंद झाल्यावरच फाशी दिली जाते. यासाठीच अफझल गुरूला फाशी देण्याच्या अगोदर अपरात्री सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने आपले दरवाजे उघडले होते.

एखाद्या वस्तूचा विमा त्या वस्तूच्या वाजवी किमतीपेक्षा जास्त असू शकत नाही.किंवा एकाच वस्तूचे दोन विमे असू शकत नाहीत

परंतु मानवी आयुष्याचा विमा काही अपवाद सोडले तर कितीही किमतीचा असू शकतो आणि एकाच व्यक्तीचे अनेक कंपन्यांतर्फे अनेक विमे असू शकतात.

हे विमा कायद्यातील अत्यंत महत्त्वाचे मार्गदर्शक तत्व आहे.

तेंव्हा हा मुद्दा गैरलागू आहे.

शा वि कु's picture

25 Oct 2020 - 10:38 am | शा वि कु

गर्भपातासंदर्भात पण "स्त्रियांचा आपल्या शरीरावरचा हक्क" वि. "अर्भकाचा जगायचा हक्क" वाद आठवला.
इथे "शरीरावरचा हक्क" आणि "जगण्याचा हक्क" यात कॉन्फलिक्ट आहे.
याबाबतीत अमेरिकेत कित्येक वर्षे हा वाद फक्त आणि फक्त अर्भक हा "मनुष्य" असतो का नाही आणि त्यामुळेच, अर्भकाला मारणे नैतिक कि अनैतिक इतपतच होता. त्यामुळे गर्भपाताकडून बोलण्यासाठी "माणूस म्हणजे काय, माणूस कोणत्या पायरीवर निर्माण होतो" इतकाच वाद चालू असे, आणि अर्भकाचे माणूस नसणे यावरच पूर्ण मुद्दा अवलंबून होता.जो कि तर्कांच्या चाचणीत खरा नव्हे, अर्भकाला माणूस न म्हणण्याचे काहीच कारण नाही, कारण ते पोटाबाहेर आल्यावर निःशंक माणूस असणार आहे.

पण मुळात स्त्रीचा bodily convinience हा अर्भकाच्या जगण्याच्या हक्काला मागे टाकतो का ? जर हो, तर अर्भक मनुष्य आहे मान्य केले तरी काही फरक पडू नये.

स्त्रीचे शरीरावरचे स्वातंत्र्य, अनुषंगाने गर्भपात करण्याचे, हे अर्भकाच्या जिवाच्या हक्कापेक्षा जास्त आहे हे दाखवण्यासाठी एक विचित्र परिस्थिती कल्पली जाऊ शकते.

एका व्यक्तीला जर दुसऱ्या व्यक्तीशी डायलिसिस सदृश्य प्रक्रियेसाठी जोडलं, कि व्यक्ती अ च्या मूत्रपिंडाचा वापर करून व्यक्ती ब जगत आहे, व्यक्ती अ ने हे कनेक्शन तोडले तर व्यक्ती ब मरून जाईल.

हि अरेंजमेंट व्यक्ती अ च्या परवानगीने किंवा परवानगी शिवाय झाली असू शकते.

व्यक्ती अ प्रत्येक क्षणी व्यक्ती ब च्या खोलीतच असायला हवा, तो इतरत्र जाऊ शकत नाही. व्यक्ती ब नैसर्गिकरीत्या किंवा इतर कारणांनी मरेपर्यंत हे असेच चालेल.

तर, व्यक्ती अ ला हे अर्थातच जाचक आहे. त्याला स्वतःचे शारीरिक स्वातंत्र्य गमवावे लागले आहे.

तर, व्यक्ती अ ला हे कनेक्शन तोडून निघून जाण्याचा हक्क असावा का ? म्हणजेच, व्यक्ती अ चे शारीरिक स्वातंत्र्य व्यक्ती ब च्या जगण्यापेक्षा कमी, कि जास्त महत्वाचे ?

यातून अर्थातच व्यक्ती अ च्या कनेक्शन तोडण्याचा हक्क मान्य आहे असे उत्तर मिळते. म्हणजेच, इतरत्र कोठेही शारीरिक स्वातंत्र्य डावलून इतरांचा जगण्याचा हक्क बजावला जात नाही. म्हणजेच गर्भपातावर बंदी आणल्यावर केवळ गर्भार स्त्रीवरच स्वतःचा bodily convinience डावलून जीवाचे रक्षण करण्याची जबाबदारी टाकली जाते, जी इतरत्र कोठेही दिसत नाही.

ह्या व्हिडिओमध्ये हा मुद्दा मांडला गेला आहे-https://youtu.be/c2PAajlHbnU

तसे जर गर्भपाताबद्दल मांडले जाऊ शकते, तर निःशंकपणे स्वतःला मारून टाकण्याबद्दल पण मांडले जाऊ शकते. जर bodily convinience हा सर्वोच्च हक्क असेल, तर कायद्याने स्वतःला मारण्याचा हक्क निःसंशय असावा.

अर्भकाचा जगायचं हक्क सर्वोच्च मानला तर बलात्कारातून झालेली संतती सुद्धा स्त्रीला वाढवावीच लागेल.

यात पूर्ण नऊ महिने तिच्यावर मानसिक बलात्कार चालूच राहील.

शिवाय आपल्या रक्त मांसा वर वाढलेले मूळ हे आपल्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमाचे आहे हे रोज पाहत राहणे हा पुढची अनेक वर्षे ( कदाचित आयुष्यभर) होत राहणार मानसिक बलात्कार आहे.

दुर्दैवाने अमेरिकेत काही राज्यात असा कायदा आहे कि स्त्रीने त्या राज्यातच नव्हे तर दुसऱ्या राज्यात जाऊन केलेला गर्भपात सुद्धा बेकायदेशीरआहे.

https://www.amnesty.org/en/latest/news/2019/06/abortion-laws-in-the-us-1...

यामुळे भारतीय कायद्यात अर्भक जोवर स्वयंपूर्ण होत नाही (प्रसूती केल्यास स्वतः श्वास घेऊन जगू शकत नाही) तो वर म्हणजे साधारण २८ आठवड्यापर्यंत गर्भपातास परवानगी दिलेली आहे. यात स्त्रियांची पाळी अनियमित असली तर सुरक्षित असे अंतर ठेवून गर्भपात २० आठवडे पर्यंतच कायदेशीर आहे.

अर्धवटराव's picture

29 Oct 2020 - 11:15 pm | अर्धवटराव

इच्छा मरणाच्या कायदेशीर परवानगीचे काय होईल माहित नाहि... पण हि चर्चा वाचुनच एखाद्याला मरायची इच्छा व्हायची.

प्रकाश घाटपांडे's picture

30 Oct 2020 - 9:51 am | प्रकाश घाटपांडे

तशी इच्छा झाली तर ती इच्छा सुप्तावस्थेत होती अस म्हणता येईल. तशीही डेथ इन्स्टिंक्ट असते काहींबाबत.

स्विझरलंड मध्ये इच्छा मरण कायदेशीर आहे, नव्हे ती तिथली टुरिझम नंतरची किंवा बहुतेक त्यापेक्षा ही मोठी इंडस्ट्री असावी. [ https://en.wikipedia.org/wiki/Suicide_tourism ]
काही काळापूर्वी या विषयावर मी एक व्हिडियो पाहिला होता ज्यात एक कंपनी एका व्यक्तीसाठी त्याच्या मरणाची सगळी व्यवस्था करते, ती व्यक्ती आणि त्याची पत्नी यांची शेवटचा काळ एकत्र बसुन बोलण्यात घालवतात आणि याचे चित्रिकरण देखील करुन दिले जाते.
बादवे... देवी सतीने आत्मदहन केल्याचे आपल्याला पुराण कथां मधुन ठावूक आहेच [ योग बळाने देहास तप्त करुन ज्वाळांची निर्मीती झाली / यज्ञकुंडात स्वतःची आहुती दिली. अशा दोन पद्धती माझ्या वाचनात आलेल्या आहेत. ] याच बरोबर जड भरत कथेत मृग जन्म मिळालेल्या मुनीनीं पाण्यात प्रवेश करुन मृग जीवन संपवल्याचा उल्लेख देखील आहे. शेवटी हे एक चक्र आहे, एक बाजु संपवली तरी दुसरीकडे परत उत्पत्ती आहेच...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Pak should be blacklisted by FATF, India stands vindicated after Islamabad’s admission on Pulwama: VK Singh