[शशक' २०२०] - इच्छा

गणेशा's picture
गणेशा in स्पर्धा
19 Apr 2020 - 10:50 pm

इच्छा

(पुणे)

अग, तुला लॅपटॉप तरी लावता येतो का? कशाला घेतेस?
असुद्या, सिडीज पण घेतल्यात.

(विमानामध्ये)

सुनबाईने मस्त नाष्टा केला होता नाही ? प्रसादनेहि तुमच्या आवडीच्या बाकरवड्या दिल्यात.
सुधाकरः आणि चिऊ तर माझ्या कडेवरुन परत माघारीच जात नव्हती.

(हॉटेल, केरळ)

मी: कितीदा पहायची लग्नाची सिडी ? असे करा अनु झाल्या पासुन लावा..
सुधाकरः yes majesty.
मी: अनु कशी गोड बाहुली दिसते आहे ना ? प्रसाद चिडकाच होता.
सुधाकरः तो बघ, आपण लपल्यावर कसा कावराबावरा झालाय, रडतोय बघ कसा.
.
.
मी: चार वाजले पहाटेचे, झोपायचे आहे की नाही, पार अनुच्या लग्नाचे फोटो पण पाहिले आत्ता.

प्रसादः काय लिहिले होते चिठ्ठी मध्ये ?
हॉटेलमॅनेजरः इच्छामरण.. कोणीही जबाबदार नाही.

body {
background: url(https://i.postimg.cc/NM70Z4Dn/147450-abstract-purple-and-white-blur-ligh...);

background-size: 1900px;
}

प्रतिक्रिया

पलाश's picture

19 Apr 2020 - 11:51 pm | पलाश

+१
धक्कातंत्र जमलं आहे.
सगळं चांगलं चाललेलं असताना कोणी असं का करेल?
ही शंका आलीच. त्यानंतर असा विचार केला की मनाप्रमाणे जगून झाल्यावर सगळं चांगलं चाललेलं असताना एकत्र जगाचा निरोप घेणं ही काहींची निवड असू शकते. भविष्यातील अनिश्चिततेपेक्षा हा जास्त चांगला मार्ग वाटला असेलही!

तुषार काळभोर's picture

20 Apr 2020 - 7:35 am | तुषार काळभोर

कथा आणि सर्व सुरळीत सुरू असताना समाधानाने निरोप घेण्याची कल्पना आवडली.
पण असं करायला पराकोटीचं धैर्य असावं लागतं. वाईट होत असताना जीवन संपवणं बऱ्याचदा सोपं असू शकतं. पण सुख समाधान असलेलं आयुष्य ...

शेखर's picture

20 Apr 2020 - 8:34 am | शेखर

+१

जव्हेरगंज's picture

20 Apr 2020 - 10:18 am | जव्हेरगंज

फारच तरल आणि अप्रतिम!
माझ्यासाठी विजेती कथा!!
+१

वामन देशमुख's picture

20 Apr 2020 - 11:46 am | वामन देशमुख

+१

मोहन's picture

20 Apr 2020 - 1:20 pm | मोहन

+१

शा वि कु's picture

20 Apr 2020 - 5:10 pm | शा वि कु

+1

चौथा कोनाडा's picture

20 Apr 2020 - 5:49 pm | चौथा कोनाडा

+१

दुदैवी !

OBAMA80's picture

21 Apr 2020 - 7:19 am | OBAMA80

अप्रतिम!

+१

गणेशा's picture

22 Apr 2020 - 6:25 pm | गणेशा

+1

मी पुन्हा पुन्हा ही कथा वाचली... दरवेळेस वाटायचे ह्याचा शेवट वेगळा हवा राव.. पण ती शेवटची ओळ यायची आणि मी पुन्हा वरती वाचायला जायचो..

पुन्हा विमानतले न लिहिले गेलेले संवाद काय असू शकतात ते आठवायचो... हॉटेलातले, मधले काही क्षण, काही माझ्याच मनातले अलबम पुन्हा पुन्हा डोळ्यासमोर आणायचो..
आणि शेवट वेगळा असेल या खोट्या आशेने शेवट वाचायचो.. एक दोनदा लास्ट लाईन ने डोळ्यात पण पाणी आले..
खूप वेळा वाचली ही कथा.. कदाचीत आपला शेवट ही असाच होईल काय असे वाटून गेले...

श्वेता२४'s picture

22 Apr 2020 - 9:23 pm | श्वेता२४

+१

सौंदाळा's picture

22 Apr 2020 - 9:27 pm | सौंदाळा

+१
चटका लागला शेवटी

शशिकांत ओक's picture

22 Apr 2020 - 9:42 pm | शशिकांत ओक

+1

प्रमोद देर्देकर's picture

23 Apr 2020 - 9:17 am | प्रमोद देर्देकर

+१

गोंधळी's picture

23 Apr 2020 - 11:14 am | गोंधळी

+१

मायमराठी's picture

23 Apr 2020 - 12:20 pm | मायमराठी

खूप स्वार्थी विचार. मागे राहणाऱ्यांची दैना ? त्यांच्या मनातले अनुत्तरीत प्रश्न? आणि त्यांचा विचार करायचाच नसेल तर मग गोतावळा हवाच कशाला? सगळं चांगलं काय आणि वाईट काय, हा निर्णय घ्यायचा अधिकार कुटुंब असलेल्याला नाही.

न मे मम पार्थ न अस्ति न विद्यते कर्तव्यं त्रिषु अपि लोकेषु किञ्चन किञ्चिदपि। कस्मात् न अनवाप्तम् अप्राप्तम् अवाप्तव्यं प्रापणीयम् तथापि वर्ते एव च कर्मणि अहम्।।
काहीही हवं आहे असं नाही. काही हवं असेल तर मिळणार नाही, असंही नाही. तरीही हे अर्जुना, मी कर्मात व्यक्त होतो.
जे वाटलं ते प्रामाणिकपणे व्यक्त केलं.

मुक्त विहारि's picture

24 Apr 2020 - 11:08 pm | मुक्त विहारि

4-5 वर्षे अंथरुणावर पडून राहण्या पेक्षा, हसतखेळत निरोप घेतला तर उत्तम.

माझ्या बाबतीत, मी आणि बायकोने, ह्या बाबतीत सविस्तर चर्चा केली आहे. त्यामुळे, माझ्या बाबतीत तरी काही काळजीचे कारण नाही.

एकाच नाण्याच्या असंख्य बाजू असतात.

संजय क्षीरसागर's picture

23 Apr 2020 - 5:12 pm | संजय क्षीरसागर

आपल्या जवळच्या लोकांना कमीत कमी ताप होईल इतकं बघावं. केरळला जाऊन करण्यापेक्षा घरच्याघरी हा उद्योग करता आला असता !

जव्हेरगंज's picture

23 Apr 2020 - 5:17 pm | जव्हेरगंज

&#128512
पटला!!

संजय क्षीरसागर's picture

23 Apr 2020 - 5:33 pm | संजय क्षीरसागर

किराणा तरी भरता आला असता घरच्यांना !

आयर्नमॅन's picture

21 May 2020 - 11:15 pm | आयर्नमॅन

अन संजयदादा किराणाच्या वार्ता कर्त्यात... हे थॉर !

गणेशा's picture

24 Apr 2020 - 5:10 pm | गणेशा

हा हा हा, रिप्लाय भारी. लॉकडाउन कथेला हा रिप्लाय वाचल्यावर कळाला नव्हता.
-
हनिमुन चे हॉटेल असेल कदाचीत, जिधर शुरुवात उधर ही खतम

संजय क्षीरसागर's picture

24 Apr 2020 - 7:55 pm | संजय क्षीरसागर

प्रतिसादात फार गूढ अर्थ आहे !

मुक्त विहारि's picture

24 Apr 2020 - 11:00 pm | मुक्त विहारि

+1

आमच्या (मी आणि बायको) मनातले इच्छामरण. ..योग्य वेळ आली की, संसाराला जिथून सुरूवात केली तिथेच संसाराचा शेवट करण्याचे, आम्ही (मी आणि बायको) पण ठरवले आहे.

+१ शंभर शब्दात कथानक बसवण्याचे आव्हान पेलताना 'between the lines' हा घटक खूपच महत्वपूर्ण ठरतो. त्यामुळे 'साठी बुद्धी नाठी' म्हणतात त्या प्रमाणे डोकरा-डोकरीची बुद्धी भ्रष्ट होऊन असा अचरटपणा त्यांच्या कडून घडला असे काही लेखक/लेखिकेला सुचवायचे असावे, असे वाटल्याने +१ दिलाय.
परंतु तसे काही नसून, म्हातारा-म्हातारी नॉर्मल असतील आणि असा उद्योग त्यांनी केला असेल तर मात्र काहीच्या काहीच कथा आहे असेही नमूद करून ठेवतोय.

बिपीन सुरेश सांगळे's picture

27 Apr 2020 - 7:17 pm | बिपीन सुरेश सांगळे

+1

निशाचर's picture

29 Apr 2020 - 11:46 pm | निशाचर

+१