तुझ्यासाठीच क्षण प्रत्येक जगावा
माझ्या आधी 'तू ' होण्यात जगावा
अस कस भरलं खूळ ,कोड पडावे
सोडवण्याआधी मी आणखी गुंतावे
साऱ्या दूनियेने कोठेही धावावे
तुझ्या पावलांभोवती जग शोधावे
खुडतांना दुःख होते फुलांनीही सांगावे
नको त्यागाची 'वाहवाही' फक्त प्रेम दिसावे
-भक्ती
(२०१६)
प्रतिक्रिया
5 Sep 2020 - 2:13 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
खासच, नको त्यागाची वाहवाही हे, जबराच होते. लिहिते राहा.
-दिलीप बिरुटे
5 Sep 2020 - 2:27 pm | Bhakti
हो .. शेवट मलापण भावला..
धन्यवाद सर!
5 Sep 2020 - 3:56 pm | गणेशा
खुडतांना दुःख होते फुलांनीही सांगावे
नको त्यागाची 'वाहवाही' फक्त प्रेम दिसावे
भारी
5 Sep 2020 - 4:53 pm | Bhakti
धन्यवाद गणेशा!
7 Sep 2020 - 7:25 am | चित्रगुप्त
'कोड' पडावे ??? म्हणजे काय, समजले नाही.
अंगावर 'कोड' येतात वा उमटतात, ते असावे असे वाटत नाही. 'कोड लँग्वेज' मधील 'कोड' ही वाटत नाही.
पडावे.. गुंतावे...धावावे.. शोधावे... सांगावे.. दिसावे... या एकारांत शब्दांवरून 'कोडे पडावे' असे म्हणायचे आहे असे वाटते.
कृपया खुलासा करावा.
7 Sep 2020 - 11:25 am | ज्ञानोबाचे पैजार
या वरुन तुम्ही म्हणता तसाच तो शब्द "कोडे" असा असावा.
बाकी कविता आवडली
पैजारबुवा,
7 Sep 2020 - 1:26 pm | Bhakti
चित्रगुप्त काका आणि पैजारबुवा आपण बरोबर लिहिले आहे.तो शब्द 'कोडे' असा पाहिजे होता.ही कविता मी त्या काळात लिहिली आहे जेव्हा लिहीत राहणे हा माझा 'श्वास ' होता.तेव्हा proofreading ची सवय कमी झाली होती.पुन्हा हळूहळू शुद्धलेखन तपासण्याची आणि शब्दसंपत्ती वाढवण्याचा प्रयत्न करत आहे.