कोविड_एक_अनुभव

अक्षय देपोलकर's picture
अक्षय देपोलकर in जनातलं, मनातलं
13 Aug 2020 - 1:21 pm

ज्याने २-३ महिने धुमाकूळ घातलाय त्या कोरोनाची भेट झालीच . तसही ह्या मित्राला, नातेवाईक यांना झालाय आणि अशी लांबून भेट होतीच कोरोनाची.कंपनी मधल्या मित्राला कोरोना झाला आणि माझं quarantine चालू असताना १० व्या दिवशी ताप आल्यावर कुठे तरी मनात धाकधूक चालू झाली.पण डॉक्टरांचा सल्ला घेतल्यावर थोड हायसं वाटल, कोरोनाचा ताप एवढ्या दिवसांनी शक्यतो येत नाही.पण जर लक्षणं आली तर मात्र टेस्ट करावी लागेल, असं डॉक्टरांनी सांगून prescription दिलं.

दुसऱ्या दिवशी मात्र अचानक घश्यात कफ येणं आणि खोकला चालू झाला.म्हणून टेस्ट करण्या शिवाय गत्यंतर नव्हतं. मग टेस्ट करून परत २४ तास संपले ते positive रिपोर्ट येऊनच(पहिला धक्का)..सो थोडं हबकलो. आता पुढे काय करायचं आणि कसं? परत एकदा डॉक्टरांशी बोलून हॉस्पिटल मध्ये admit व्हायचं ठरवलं. गव्हर्नमेंट हॉस्पिटल मध्ये जाण्यापेक्षा , प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये मित्र असल्या मुळे तिथेच ऍडमिट व्हायचं ठरवलं.मग ऍम्ब्युलन्स कंपनीने दिल्यामुळे ती चिंता मिटली. आयुष्यात ambulance मध्ये बसायची पहिली वेळ.

हॉस्पिटलला गेल्यावर मात्र डॉक्टरांनी ऍडमिट करतानाच सांगितलं,"५ दिवसांत बरा होऊन बाहेर पडणारेस!" हे ऐकुन बरं वाटलं. सगळ्या फॉर्मलीतीज पूर्ण झाल्यावर लगेच ट्रिटमेंट चालू झाली. ट्रिटमेंट म्हणजे फक्त व्हिटॅमिन गोळ्या , गरम पाणी , लक्षणं जशी असतील तशी औषधे, सलाईन्स , इंजेक्शन चालू होती. ५ व्या दिवशी डॉक्टर येऊन सांगून गेले उद्यापासून २४ तास under observation मग डिस्चार्ज. पण दुसऱ्या दिवशी सकाळ पासून खोकला आणि धाप लागणं सुरू झालं.खोकला आला की छातीत दुखणं सुरू झालं. धाप लागत असल्यामुळे ५ मिनिट चालणं पण मुश्किल झालेलं.मग छातीच CT scan केल्यावर लक्षात आलं की न्युमोनिया ची सुरुवात झालेली होती(दुसरा धक्का). मग डॉक्टरांनी परत ती औषधे चालू केली.हे होऊन दोन दिवस जातायात तर त्याच दिवशी संध्याकाळी ताप येऊन ऑक्सिजन लेव्हल ८५ पर्यंत खाली गेली.(तिसरा धक्का) मग लगेच डॉक्टरांनी आयसीयू मध्ये शिफ्ट करून ऑक्सिजन चालू केला.२ दिवस ऑक्सिजनमास्क ऑक्सिजनची लेव्हल होई पर्यंत होताच. मग २ दिवस under observation ठेवून काही त्रास नाही बघून १३व्या दिवशी डिस्चार्ज होऊन घरी आलो.पुढचे १४ दिवस सर्दी खोकला कमी कमी होत गेला. आणि १४ दिवस पूर्ण झाल्यावर टेस्ट केल्यावर रिपोर्ट निगेटिव्ह आल्यावर जीव भांड्यात पडला. सेल्फ quarantine चा आठवडा पूर्ण झाल्यावर मात्र हलका व्यायाम सुरू केला. आणि एवढे दिवस मात्र अनुलोम,विलोम, कपालभाती चालूच होत जेवढं जमेल तेवढं.

या १४ दिवसात लोकांच्या नजरा बदलल्या. तिथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांनी मात्र पूर्ण १४ दिवस नाश्ता आणि जेवणाची जबाबदारी घेतलेली.आणि मी फक्त कधी तरी शाळा कॉलेजात असताना संघाचं काम केलेलं हीच काय ती ओळख.

हा सगळा त्रास तरुणांना पण होऊ शकतो , सो कोणी सांगत असेल तर तरुणांना काही होत नाही तर फार मोठा गैरसमज आहे हा.आणि असेच माझ्याच वयाचे ५-६ पेशंट होते हॉस्पिटलला.
सो काळजी घेणं खूप महत्त्वाचे.आता हळू हळू सगळं नॉर्मल होतंय. थोडा थकवा जाणवतोय अजुन पण तो ही निघून जाईल.

एवढं सगळं होत असताना positive राहणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणून जवळ जवळ महिनभर बातम्या बघायचं बंदच केलं. खूप साऱ्या लोकांचे मेसेजेस ,कॉल्स चालू होते कधीच त्यांनी एकटं वाटू दिलं नाही. हे करत असतानाच स्वामींचा तारक मंत्र होताच. ज्यामुळे फार काही त्रास जाणवला नाही.

थोडं मागे वळून बघितल्यावर काही गोष्टी करायला हव्या होत्या अस वाटतयं:
१. social distancing must
२. Use of sanitizer ,soap water frequently.
३. दुसऱ्याची वस्तू शक्यतो वापरणं टाळा, जर नसेल शक्य तर वस्तू वापरल्यावर हात sanitize करणं
४. जी माणसं घरच्या बाहेर पडतायत त्यांनी steam घेणं must..
५. आणि काही लक्षणं दिसत असतील तर मात्र लगेच डॉक्टरांना भेटा. अंगावर काही काढू नका.

आणि लास्ट बट नॉट द लिस्ट हा मंत्र लक्षात ठेवा "मी बरा होणारच!"

धन्यवाद!

हे ठिकाणलेख

प्रतिक्रिया

चिगो's picture

13 Aug 2020 - 1:27 pm | चिगो

बरे झालात, ह्याबद्दल अभिनंदन.. कोविड-१९चे काही दुरगामी परीणाम तुम्हाला जाणवलेत का? जवळपास दोनेक महीन्यांनी त्यावर लिहावं, ही विनंती.

अक्षय देपोलकर's picture

14 Aug 2020 - 6:24 am | अक्षय देपोलकर

धन्यवाद..नक्की लिहीन काही जाणवलं तर

वामन देशमुख's picture

14 Aug 2020 - 7:35 am | वामन देशमुख

कोविड-१९चे काही दुरगामी परीणाम तुम्हाला जाणवलेत का? जवळपास दोनेक महीन्यांनी त्यावर लिहावं, ही विनंती.

हो, सविस्तर लिहाच.

चौथा कोनाडा's picture

13 Aug 2020 - 1:31 pm | चौथा कोनाडा

बाप रे ! अगदी सहीसलामत बाहेर पडलात त्या बद्दल मनापासून अभिनंदन !
या अवस्थेला आल्यावर जीवाला धोका पोहचू शकतो हे माहित असलेल्या नातेवाईका संदर्भात झालेले माहित आहे.

अक्षय देपोलकर, स्वतःचा अनुभव प्रांजळपणे नीट्नेटका मांडला आहे, याचा सर्वांनाच काळजी घेण्यासाठी उपयोग होईल !

अक्षय देपोलकर's picture

14 Aug 2020 - 6:25 am | अक्षय देपोलकर

धन्यवाद...होय म्हणूनच लिहिलंय..

ज्ञानोबाचे पैजार's picture

13 Aug 2020 - 2:01 pm | ज्ञानोबाचे पैजार

तुम्हाला झालेला न्युमोनिया हा कोरोनाचाच साईड इफेक्ट होता का? डिसचार्ज मिळून किती दिवस झाले?

रच्याकने :- खरे सांगायचे तर सध्याच्याच्या काळात आळाशी पणा आणि निष्काळाजीपणा वाढत चाललेला दिसतो.
जेव्हा कोरोनाचे आकडे दहा हजारच्या आत होते त्या वेळी आपंण सगळे घाबरुन अतिशय काळाजी घेत होतो आणि आता सर्व नियमांचे सरसकट उल्लंघन करत असतो.
तुमचा लेख वाचून थोडेफार लोक जरी परत सावध झाले तर त्याचा नक्की फायदा होईल.

पैजारबुवा,

अक्षय देपोलकर's picture

14 Aug 2020 - 6:26 am | अक्षय देपोलकर

होय त्याचाच side-effect..
डिस्चार्ज मिळून झाले आत्ता २० दिवस..
दुर्दैवाने जसे आकडे वाढत गेले तसे काळजी कमी होत गेली.

बलि's picture

13 Aug 2020 - 3:57 pm | बलि

बरे होऊन बाहेर आलात त्याबद्दल अभिनंदन,

खाजगी इस्पितळात होतात, बिल किती आलं?

अक्षय देपोलकर's picture

14 Aug 2020 - 6:27 am | अक्षय देपोलकर

धन्यवाद..
१३ दिवसा साठी १.२५ लाख

संजय क्षीरसागर's picture

13 Aug 2020 - 5:43 pm | संजय क्षीरसागर

वृतांत अगदी चोख लिहिला आहे. तुमचा पॉजिटीव अप्रोच सगळ्यांना उपयोगी होईल. मनःपूर्वक धन्यवाद !
कोणत्या हॉस्पिटलला होता आणि किती बिल झालं या गोष्टी पण कळवा.

अक्षय देपोलकर's picture

14 Aug 2020 - 6:27 am | अक्षय देपोलकर

धन्यवाद...
सेंट्रल हॉस्पिटल बदलापूर

शेखरमोघे's picture

13 Aug 2020 - 8:54 pm | शेखरमोघे

करोनावर मात केल्याबद्दल अभिनन्दन. आपला अनुभव सगळ्यानाच उपयोगी ठरणारा.
पुढील काही विधानान्बद्दल जास्त माहिती मिळेल का?
१. जी माणसं घरच्या बाहेर पडतायत त्यांनी steam घेणं must..
२. तिथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांनी मात्र पूर्ण १४ दिवस नाश्ता आणि जेवणाची जबाबदारी घेतलेली: जे काही लोक अशी इतरान्ची काळजी घेत होते ते आपली स्वतःची काळजी घेण्यासाठी काय करत होते? ज्यान्चा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी सम्बन्ध नव्हता त्यान्च्या खाण्यापिण्याची काळजी कशी घेतली जात होती?

अक्षय देपोलकर's picture

14 Aug 2020 - 6:31 am | अक्षय देपोलकर

धन्यवाद..
वाफे बाबत सगळ्यांची मत वेगवेगळी आहेत पण मला तरी फायदा झाला..
सर्दी कफ काही असेल तर तो माझा कमी झाला..

आणि after discharge मी एकटाच इकडे राहत असल्याने आणि जेवण येत नसल्याने अडचण झाली ती संघाच्या लोकांनी सोडवली..

वामन देशमुख's picture

14 Aug 2020 - 7:39 am | वामन देशमुख

बरे झाल्याबद्धल अभिनंदन. दीर्घायुरारोग्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा.

तुमच्या माहितीचा योग्य व्यक्तींना नक्कीच उपयोग होईल. शक्य झाल्यास प्रतिसादातून अजून निरीक्षणे, निष्कर्ष, भविष्यातील अंदाज इ. सविस्तर लिहाल ही अपेक्षा.

Gk's picture

14 Aug 2020 - 8:01 am | Gk

छान

लई भारी's picture

16 Aug 2020 - 2:19 pm | लई भारी

आपण यातून व्यवस्थित बरे झालात याबद्दल अभिनंदन आणि सविस्तर लिहिल्याबद्दल धन्यवाद!

असे फर्स्ट हॅन्ड अनुभव येणे गरजेचे आहे.

संपादक मंडळाला विनंती आहे की असा काही वेगळा विभाग करता येईल की जिथे मुख्यत्वेकरून कोविड बद्दलचे अनुभव असतील. बऱ्याच लोकांना फायदा होईल असे वाटते.

आपण यातून व्यवस्थित बरे झालात याबद्दल अभिनंदन
प्राणायाम खूप वर्षांपासून करत असू तर कोरोनाची लागण होणार नाही असं असू शकेल का?

काल माझी आणि बायकोची टेस्ट केली त्यात ती पॉसिटीव्ह आणि मी निगेटिव्ह आलो, पण मला सुद्धा खोकला आणि अंग दुखी आहे तर पुन्हा टेस्ट करायला हवी का?

माहितगार's picture

18 Aug 2020 - 2:34 pm | माहितगार

मला वाटते हा प्रश्न डॉ. कुमार / डॉ. खरे यांच्या धाग्यावर अधिक उचित ठरला असता पण इकडेही त्यांचे लक्ष जाईल अशी अपेक्षा करुया.

तो पर्यंत तुमची स्वतःची खोकला आणि अंग दुखी लक्षणे टेस्टच्या आधीपासून आहेत की नंतरची आहेत? मला वाटते टेस्टचेही प्रकार असतात तर तुमच्या टेस्टचा प्रकार कोणता टेंपरेचर आणि ऑक्सिजन लेव्हल माहित असल्यास हे सांगून ठेवलेत तर त्यांना आणि तुमच्या फॅमिली डॉक्टरांशी संवाद करणे कदाचित बरे पडेल असे वाटते.

तसे संसर्ग टेस्ट करून निगेटीव्ह आल्यावरही होऊ शकत असावा. म्हणून डॉक्टर मंडळींशी संवाद साधणे श्रेयस्कर असावे असे माझे व्यक्तिगत मत. (मी स्वतः डॉक्टर नाही )