पुरोगामी, लिबरल्स लोकांनी आता करायचे तरी काय ??? कोणती नवी चाल खेळायची?

सुधीर मुतालीक's picture
सुधीर मुतालीक in जनातलं, मनातलं
6 Aug 2020 - 10:53 pm

संघाचे काल भूमी पूजनाच्या निमित्ताने झालेले भव्य दर्शन त्या समस्त तथाकथित बुद्धिवंत पुरोगामी आणि लिबरल लोकांस किती त्रासदायक असेल ??? संघाच्या एक एक अजेंड्याची अशी पूर्तता होताना बघून किती यातना होत असतील ? चार पाच वर्षांपूर्वी पर्यंत स्वप्नात देखील या देशात कुणी कल्पना केली नव्हती की 370 कलम इतक्या लवकर हटवले जाईल. संघ गेली सत्तर वर्षे सातत्याने समस्त परिवारातल्या कार्यकर्त्याना 370 कलम हटविण्या संबंधीचा नारा देत होता आणि आपल्या उरीचे ते स्वप्न कार्यकर्ता जगत होता. सत्ता अशा स्वप्नांसाठी करायची आहे याची पदोपदी जाण होती आणि आहे. हमे राज नही, समाज बदलना है - कार्यकर्ता हेच तत्व जगतो आहे. त्यामुळे समाज बदलण्याच्या हेतूने सत्तेचा अट्टाहास केला. त्यात यश मिळाल्यावर - सत्ता मिळाल्यावर - देखील दांडगाईने पहिल्याच पाच वर्षात नव्हे, तर संपूर्ण संयत भूमिका घेऊन कायदेशीर मार्गानी, दंगेधोपे, गोंधळ न करता. सात्त्विक समाधानाची पखरण करत. हा हा म्हणता ते सत्तर वर्षाचे दुखणे असणारे 370 कलम हटवले गेले, शेतकरी एकशे चौतीस वर्षांनी बाजाराच्या बंधनातून मुक्त केला गेला, शेकडो वर्षे शाब्दिक घटस्फोटाच्या धाकात जगणाऱ्या मुस्लिम महिलेला मुक्त केले गेले आणि आता पाचशे वर्षे हिंदू समाजाच्या हृदयात बोचणारी सल नाहीशी केली, काल आत्मनिर्भर भारताची सुवर्ण वीट रचली. संघाचे हे विराट दर्शन किती छळत असेल त्या पुरोगामी, लिबरल्स वगैरे व्याख्या आणि बिरुदावली घेऊन समाजात वावरणाऱ्या ढोंगी लोकांना ??? अगदी ठामपणे सांगतो आज किंवा गेल्या काही वर्षात, दशकात ही लेबले लावून, खादीचे झब्बे घालून, खांद्यावर झोळी, अडकवून दाढीचे खुंट, वाढवून कपाळावर लालबुंद मोठी बिंदी लावून, कधी हातात डफली घेऊन, कधी गोलात बसून जागतिक हवामानाच्या मोठ्या मोठ्या गप्पा मारणारे, कधी ह्या पक्षाच्या कधी त्या पक्षाच्या खांद्यावर बंदूक ठेवणारे, इस्लाम खतरेमें है चा नारा देऊन गरीब पीडित मुसलमानांना फितवणारे आणि भारतीय समाजात फूट पाडून आपले अस्तित्व टिकवण्याच्या प्रयत्नात कोणत्याही नीचतम स्तराला जाणारे हे लोक ते खरे पुरोगामी नव्हेत. नवरा गेल्यावर पोरीला चितेवर ढकलणाऱ्या समाजाला जागेकरून पोरीला मुक्त करणारे किंवा जातीच्या उतरंडीमध्ये पिचून गेलेल्या दलित समूहांना माणूस म्हणून त्यांचे स्थान आणि प्रतिष्ठा मिळवून देणारे किंवा आजारी पडलेल्या माणसाला मांत्रिकाकडे नाही तर डॉक्टरकडे घेऊन जाण्यासाठी इथल्या अडाणी जनतेला शिक्षित करणारे किंवा भारतीय लेकीच्या हाती पाटी पेन्सिल देणारे इत्यादी हे सगळे खऱ्या अर्थाने आमच्या हृदयात सदैव आदरणीय असणारे पुरोगामी. आज आजुबाजुला दिसणारे पुरोगामी ते हे नव्हेत. हे कोण आहेत माहितीय ? कुठून आले कळलंय ??
गांधीजींच्या दांडी यात्रेत शेवटी शेवटी असणारे आणि ट्रॅफिक पोलिसाच्या थाटात रस्त्यात मध्येच 'चलो चलो आगे बढो' म्हणत लोकांना हाकणारे. पण अगदी पुढल्या फळीतल्या गांधींवर लाठी चार्ज करत इंग्रजांचा पोलीस पुढे सरकतो आहे असे समजल्यावर हळूच रस्त्याच्या कडेला उभे असणाऱ्या आजुबाजुच्या बघ्यांमध्ये सामील होणारे किंवा त्या मागच्या झाडीमध्ये लपून बसणारे, गांधी आमरण उपोषणाला बसले की त्यांच्या तंबूत काहीकाळ आपण देखील उपोषणाला बसलो आहोत असा आव आणणारे पण धोतराच्या वळचणीला बायकोने दिलेला नागलीचा लाडू लपविणारे, जेपींच्या चळवळीत गल्ली बोळातून हातात झेंडा घेऊन बिल्ले लावून फिरणारे पण आणिबाणी पुकारल्यावर घरी बायकोला सांडगे पापड बनवायला मदत करणारे, मोरारजीभाईंना खुर्चीवर बसवून सत्तेच्या जवळपास गेले पण ज्या साठी एकत्र आलो त्या संकल्पाशी प्रामाणिक न राहता सत्ता गमवायला भाग पडणारे, नंतर मात्र फक्त घरी बसून राहिलेले आणि संध्याकाळी घरी आल्यावर विजार घालताना बायकोला फर्मास शिरा करण्याचे फर्मान सोडणारे ते सगळे असे तेच ! मग लिंबाचे लोणचे खोचलेला शिरा मिटक्या मारत खात "एक दिवस हा देश विकणार लेकाचा" "हे लोक घातक" "ते ही घातक" "शिक्षणाची फार दुरावस्था झाली आहे" "मंदिर काय लेको शाळा किंवा हॉस्पिटल बांधा म्हणावं तिथे" "शेवटी हे निधर्मी राष्ट्र आहे म्हणावं..... " अशी रोज एक दोन वाक्ये बायकोसमोर आरामखुर्चीत बसून टाकणारे ! पुढे फेसबुक व्हॉट्सऍप आल्यावर साने गुरुजी, गांधी, विनोबा इत्यादींच्या जयंत्यांना त्यांच्या विषयी फोटोसह पोस्टी टाकणारे आणि उर्वरित दिवसात विचारधन गुरुजी मोदी यांची टिंगल टवाळी करणाऱ्या पोस्टी फॉरवर्ड करणारे....! . यांचा ना समाजाला कधी उपयोग झाला ना या जमातींनी कधी काही करण्याची तसदी घेतली. संघटीत होऊन समाजासाठी भरीव काही केल्याचे दाखले भारतीय इतिहासात सापडतात का बघाना ! यांना साधे संघटीत देखील होता आले नाही, रचनात्मक काही काम उभे करणे तर दूरच राहिले. एकोणीसशे पन्नास सालापासून संघाच्या नावाने सतत खडे फोडणाऱ्या या फुटकळ लोकांनी पर्यायी व्यवस्था का उभी केली नाही ? एखादी ग्राम पंचायत तरी स्वतःच्या तत्वावर उभा केलेल्या पक्षाच्या जोरावर यांना कधी घेता आली आहे काय ? माफीवीर, तडीपार, हिटलर अशी गलिच्छ टीका टिपण्णी करण्याव्यतिरिक्त या लोकांनी काय केलं आपल्या देशात आजवर ? फक्त आणि फक्त ढोंग आणि ते करत संघाला बदनाम करण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या शोधणे. बस्स. हिंदू मुस्लिम अशी फूट पाडण्याचे आणि ती पाडून संघाला बदनाम करण्याचे डाव सातत्याने हे लोक खेळत आले. आपण काही करू शकलो नाही याचे वैफल्य पदरी होतेच पण संघ दिसामाजी वाढतो आहे याची चरफड देखील. याच मुळे या तमाम जनतेने या देशात मुस्लिम समाजाला संघाविरुद्ध फितविण्याचे सातत्याने प्रयत्न केले. अर्थात संपूर्ण मुस्लिम समाजावर किंवा ख्रिस्ती समाजावर प्रभाव उत्पन्न करण्याची क्षमता आणि लायकी यांच्याकडे कधीच नव्हती. त्यामुळे संघाला बदनाम करण्याचे यांचे प्रयत्त्न कधीच यशस्वी होऊ शकले नाहीत ना कोणत्या धर्मियांनी यांच्या आवईला कधी भीक घातली. कालचे भूमीपूजन झाल्यावर देशभरात पसरलेल्या समाधानाने आणि शांततेने हे दाखवून दिले की यांचे समाजात दुफळी माजविण्याचे गेल्या सत्तर वर्षातले प्रयत्न उध्वस्त झाले आहेत. यांना प्रश्न असा पडला असेल की आता काय करायचे ? नेहरू तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्रबाबूंवर सोमनाथच्या जीर्णोद्धार समारंभाला गेले म्हणून उखडले होते. आपले राष्ट्र निधर्मी असल्यामुळे आपल्यापैकी कुणी अशा समारंभांना जाणे हा गुन्हा आहे असे नेहरूंचे म्हणणे होते. इथे तर चक्क पंतप्रधान आणि सरसंघचालक यांच्या नावाने निमंत्रण पत्रिकाच छापली असे नव्हे तर दोघांनी एकत्रित एका मंदिराचे भूमिपूजन केले ! त्या समस्त पुरोगामी लिबरल इत्यादी लोकांनी आता काय स्वतःला उलटे टांगून मिरचीची धुरी लावून घ्यायची काय ??? सत्तर वर्षाच्या षडयंत्राचा असा खेळखंडोबा झाल्यावर आता पुढे काय आणि कसे करायचे या विवंचनेत असतील मंडळी. त्यामुळे गेल्या दोनचार दिवसात फारशा पोस्टी नाहीत. हिंदू मुस्लिम या विषयात तंटे दंगे धोपे झाले नाहीत तर प्रश्न या जमातींच्या अस्तित्वाचा आहे !!!
@सुधीर मुतालीक

मांडणी

प्रतिक्रिया

कपिलमुनी's picture

6 Aug 2020 - 11:39 pm | कपिलमुनी

१. राम मंदिराची पहिली केस कधी झाली ?
२. या प्रकरणा संदर्भात ज्या केसेस दाखल झाल्या त्यात किती केस मध्ये संघ वादी / प्रतिवादी होता.
३. होय संघाने बाबरी पाडली हे कोणी आणि कुठे सांगितले

या तीन प्रश्नांची उत्तरे गोल गोल ना घुमावता एका वाक्यात द्या

सुधीर मुतालीक's picture

7 Aug 2020 - 7:32 am | सुधीर मुतालीक

असंबंध !

कपिलमुनी's picture

7 Aug 2020 - 12:01 pm | कपिलमुनी

उत्तरे नसलि की असे प्रतिसाद येतात ,
संघावर एवढी मोठी जिलेबी असंबध आहे ..
तीन प्रश्नांची उत्तरे नाहीत आणि बड्या बड्या बाता ..

सुधीर मुतालीक's picture

7 Aug 2020 - 10:17 pm | सुधीर मुतालीक

धन्यवाद

Gk's picture

7 Aug 2020 - 7:58 am | Gk

साक्षात फडनवीसांवर आक्षेप ?

कार सेवेत फडणवीस होते म्हणे , 3 डिग्री तापमान असताना अपुऱ्या चादरी घेऊन ते दिवस कंठायचे, देवळात जेवत होते आणि पोलिसांनी गोळीबार केला तर त्यांच्या अंगा खांद्यावरून गोळ्या गेल्या होत्या

ते स्वतः असे सांगत असल्याचे व्हिडीओ फिरत आहेत.

इतके महान राम भक्त की मुख्यमंत्री पदाची फाळणी होण्यापेक्षा लहान बंधुला पूर्ण सत्ता देऊन ते वनवास पत्करून विरोधी पक्ष नेते बनले.

आणि तुम्ही म्हणताय आंदोलनात संघ नव्हता ?

Gk's picture

7 Aug 2020 - 7:44 am | Gk

आपले राष्ट्र निधर्मी असल्यामुळे आपल्यापैकी कुणी अशा समारंभांना जाणे हा गुन्हा आहे असे नेहरूंचे म्हणणे होते

कधी बोलले होते नेहरू ?

1954 साली कुंभमेळ्याच्या गर्दीत चेंगराचेंगरी होऊन लोक मेले होते , त्यामुळे राजकारण्यांनी अशी गर्दी करणे टाळावे , असे नेहरूंचे मत होते

सुधीर मुतालीक's picture

7 Aug 2020 - 8:26 am | सुधीर मुतालीक

राजेंद्रबाबुंच्या हस्ते शिलान्यास समारंभ झाला मे 1951 मध्ये.
22 एप्रिल 1951 या दिवशी नेहरूंनी राजेंद्र बाबूंना लिहिलेले पत्र मिळवून वाचा. मी लिहिलेल्या विधानाचा पुरावा मिळेल.
अन्य संदर्भ :
1. K.M. Munshi, 1922, in East and West. As quoted in ‘Somanath: Fulfilment of a Collegian’s Dream’, Bhawan’s Journal, Jan.1, 1967.
2. K.M. Munshi, 1967, Pilgrimage to Freedom,Appendix 105, p. 560.
3. Ibid.
4. K.M. Munshi, 1951, Pilgrimage to Freedom, pp. 560-64.
5. K.M. Munshi’s letter to Jawaharlal Nehru dated 24 April, 1951. In K.M. Munshi, above.
6. Also reproduced in Makkhan Lal, 2008, Secular Politics Communal Agenda, pp. 150-154.
7. K.M. Munshi had written to all the Ambassadors for the water and soils from the country in which they were posted. This was to be used, as per the provisions of shashtras at the time of Pran-Pratistha and the inauguration ceremony of the temple.
8. N.V. Gadgil, 1968, Government From Inside,Meerut, pp. 185-186;

Gk's picture

7 Aug 2020 - 8:42 am | Gk

नेताजींना पकडा म्हणून नेहरूंनी रशियाला लिहिलेलीही बोगस पत्रे व्हाट्सअपवर फिरत असतात

In another letter more than a month later, when the Somnath issue became a matter of considerable debate, he again explained that his objection was to the association of the government with the temple. On April 22, 1951, he wrote: “My dear Rajendra Babu, I am greatly worried about the Somnath affair. As I feared, it is assuming a certain political importance. Indeed, references have been made to it internationally also. In criticism of our policy in regard to it, we are asked how a secular Government such as ours can associate itself with such a ceremony which is, in addition, revivalist in character. Questions are being put to me in Parliament and I am replying to them saying that Government has nothing to do with it and those persons who are connected in any way are functioning entirely in their personal capacity.”..

संसदेत कुणीतरी याबद्दल विचारले तेंव्हा नेहरूंनी वरील प्रमाणे उत्तर दिले,

नेहरूंना पत्र लिहायचेच असते तर त्यांनी राजेंद्र बाबू सोमनाथला जायच्या आधीच पत्र लिहिले असते की

नंतर संसदेत असा मुद्दा निघाला म्हणून त्यांनी उत्तर दिले की राजेंद्रबाबू पर्सनली हजर राहिले होते

....

त्या बातमीवरून तरी असे वाटते
मी पत्र पाहिलेले नाही

https://www.nationalheraldindia.com/india/insight-nehrus-misgivings-on-s...

सुधीर मुतालीक's picture

7 Aug 2020 - 9:07 am | सुधीर मुतालीक

आपल्याशी चर्चेतून मी रजा घेण्याचा हा उत्तम मुहूर्त आहे.
अभ्यासे प्रकटावे, अथवा झाकोनी असावे
प्रकटोनी नासावे, हे बरे नव्हे I

चौकस२१२'s picture

7 Aug 2020 - 9:18 am | चौकस२१२

निधर्मी अमेरिकेचा अध्यक्ष जर घरात ख्रिसमस ट्री ( कुटुंब म्हणून नव्हे तर अध्यक्ष म्हणून ) थवेउन जाहीर साजरी करू शकतो
निधर्मी कानडा, ऑस्ट्रेलिया, नऊ झीलंड मध्ये जर राज्य, पालिका सरकार तर्फे ख्रिसमस ची रोषणाई केली जाऊ शकते
निधर्मी भारत जर हाज यात्रेला निधी देऊ शकतो
इस्राएल चा पंतप्रधान जर आपलं धर्म उघडपणे मिरवू शकतो
तर निधर्मी भारताचा (ज्याची ८० % जनता हिंदू आहे ) पंतप्रधान जर देशातील एका महत्वाच्या ( आवडो किंवा ना आवडो) हिंदू समारंभाला उपस्थित राह्तो तर कोणाची का जळते? केवळ विरोध ...
या कोर्टाच्या निर्णयाने आणि हे देऊळ उभे राहणार यामुळे करोडो हिंदू आणि फारसे धार्मिक नसलेले सुद्धा जर "हे चांगले झाले" असे म्हणत असतील तर ते सर्व काही "नमस्ते सदा वत्सले" घोकणारे नसतात हे लक्षात घ्या.
हि अशी नकारघंटा चालू ठेवलीत तर सर्वसामान्य हिंदू पण अजून कडवा होत जाईल...
सहिष्णू हिंदूंचा असा अंत पाहू नका... एक दिवस खरंच बोलती बंद होईल .. अशी वेळ येऊन नये हीच प्रार्थना

अनिरुद्ध.वैद्य's picture

7 Aug 2020 - 10:58 am | अनिरुद्ध.वैद्य

म्हणजे निधर्मी? मी उगाच सर्व धर्म समभाव वगैरे समजत होतो.

Gk's picture

7 Aug 2020 - 8:56 am | Gk

1984 ला इंदिरा गांधींना धर्मातर केल्याचे कारण दाखवून जगन्नाथ पुरी मंदिरात प्रवेश नाकारला होता, नेहरूंचेही वाडवडील मुसलमान होते वगैरे व्हॅटसप वरून फिरत असतेच

तेही हिंदू धर्मापासून दूर होते आणि हिंदू धर्मानेही त्यांना व त्यांच्या घरच्यांना दूर असल्याचे दाखवून दिले आहे.

मग पुन्हा परत परत नेहरू आणि टेम्पल रन गेम कशाला जोडाजोडी करत बसायची ?

चौकस२१२'s picture

7 Aug 2020 - 9:07 am | चौकस२१२

मस्तच... सुधीर मुतालीक
"काड्या घालणे" याशिव्या या लोकांकडे दुसरा उद्योग नाही ..यातील काही काड्या हा विनोद म्हणून आपण दुर्लक्ष करू शकतो पण काही चाळे हे दूरगामी देशविरोधीच ठरतात ...
२०२४ साली जर 'सामान नागरी कायदा" यावर निवडणूक झाली आणि परत भाजप जिकली तर या लोकांचे काय होईल.....अर्रर्रर्र विचार हि करवत नाही

गेल्या काही वर्षात अजून "काय करावे कळेना" अशी परिस्थिती येण्याची अजून २-३उदाहरणे
१) प्रणव मुखर्जी पाहुणे म्हणून संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले !
२) अरिफ मोहमद खान यांसारखे लोक परत बोलते झाले!
३) भाजप सत्तेवर आला म्हणजे "प्रचंड प्रमाणात मुस्लिमांना मारले जाईल" हि जी आवई उठवली होती ती फोल ठरली हे कळले तेव्हा !
बरं हे सर्व भारतातातील
भारताबाहेरील दृष्टिकोनातून १-२ मुद्दे
- संघ आणि भाजपनं त्यांची 'फॅसिष्ट " हि प्रतिमा खास करून बलाढ्य पाश्चिमात्य/ ख्रिस्ती देशात आहे ती कमी करण्यात प्रयत्न करणे , त्या देशातील उजवे जरी जवळचे वाटत असले ( ट्रम्प वैगरे ) तरी थेतील मजूर / डावे यांच्या मनातील हि समजूत कमी केली पाहिजे ...
- आधी या देशात करावे, मुस्लिम बहुल देशात ( खास करून वहाबी) हि प्रतिमा असली काय आणि नसली काय .. त्यांचा अजेंडा माहित आहेच त्याला तोंड द्व्यावे लागेलच
- २०२४ पर्यंत आता फक्त सामाजिक/ आर्थिक गोष्टींवर भर दिला ( धार्मिक बाबींपेक्षा) तर जास्त उपयोगी ठरेल... एकदा का पोट भरले कि माणूस बाकी ऐकायला तयार असतो हे साधे तत्व

सुधीर मुतालीक's picture

7 Aug 2020 - 11:59 pm | सुधीर मुतालीक

प्रणवदा संघ मुख्यालयात गेलें होते आणि अप्रतिम भाषण ठोकले होते हा मिर्ची लावणारा प्रसंग मी विसरलोच होतो. आठवण दिल्या बद्दल धन्यवाद _/\_

Bhakti's picture

7 Aug 2020 - 9:45 am | Bhakti

अगदी , आधुनिक पुरोगाम्यांची मी व्याख्या शोधत होते ती इथे मिळाली.मोठ्या आशेने मी ,घरच वातावरण संघपुरक असताना एका अशाच पुरोगामी चळवळीला साहित्य कार्यासाठी जोडले गेले होते. पण माझी घोर निराशा झाली.आधुनिक पुरोगामी खरोखर कधीच समाधानी नाहीत केवळ दोष काढण्यात यांचा वेळ वाया घालवून ढोंग रचतात.पारतंत्र्यात शिक्षणासाठी ज्यांनी बहुमूल्य काम केले ते खरे पुरोगामी होते.संघ संघटित आहे हे त्याचा पाया भक्कम राहो.

सुधीर मुतालीक's picture

8 Aug 2020 - 12:05 am | सुधीर मुतालीक

एका शब्दात अर्थ सांगायचा तर फ्रॉड ! नथिंग एल्स ! मी देखील संघ सोडून चक्क दहा वर्षे खुप आंत मधून समस्त डाव्यांच्या - पुरोगामी, बुद्धिवंत, डावे, मधले...यांच्या सोबत होतो. बैठका केल्या वगैरे ! पण 2007 / 8 च्या सुमारास कळायला लागले की ही मंडळी कमालीची भंपक आहेत. वेळेत 2009 / 10 च्या सुमारास जागा झालो अन पुन्हा संघ संपर्कात आलो !

सुबोध खरे's picture

7 Aug 2020 - 9:55 am | सुबोध खरे

एक वामपंथी बडे जोरो से बोल रहा था. की मंदिर गिराया था तो क्या हुआ उसकी जगह अस्पताल बनवा देते!

ज्यादा लोगों का फायदा होता!

उसे एक सज्जन ने बोला बारिश मे आपका घर ढह गया ,

तो ज्यादा लोगोंके फायदे के लिये वहां *सुलभ शौचालय* बनवा दे?

सुबोध खरे's picture

7 Aug 2020 - 9:56 am | सुबोध खरे

एक वामपंथी बडे जोरो से बोल रहा था. की मंदिर गिराया था तो क्या हुआ उसकी जगह अस्पताल बनवा देते!

ज्यादा लोगों का फायदा होता!

उसे एक सज्जन ने बोला बारिश मे आपका घर ढह गया ,

तो ज्यादा लोगोंके फायदे के लिये वहां *सुलभ शौचालय* बनवा दे?

प्रसाद_१९८२'s picture

7 Aug 2020 - 10:25 am | प्रसाद_१९८२

छान लेख !
--

जहाल पण योग्य लिखाण. भारत हे एक सेक्युलर राश्ट्र आहे. सेक्युलर शब्दाचा अर्थ not connected with religious or spiritual matters आहे. याचा अर्थ सर्व धर्म समभाव असा नाही.

NiluMP's picture

7 Aug 2020 - 3:57 pm | NiluMP

can you name any muslim country with multiculturalism and secular?

सुबोध खरे's picture

7 Aug 2020 - 7:34 pm | सुबोध खरे

मुस्लिम राष्ट्रात सर्मधर्मसमभाव, सहिष्णुता, विविध संस्कृतीच नाहीत तर लोकशाही सुद्धा नाही.

एका तरी मुस्लिम देशात लोकशाही आहे का?

इस्लामला लोकशाही मान्यच नाही

बाकी चालू द्या

Gk's picture

7 Aug 2020 - 8:00 pm | Gk

मग इथले स्कॉलर लोक तिकडे नोकर्या करायला का जातात ?

चौकस२१२'s picture

8 Aug 2020 - 6:36 am | चौकस२१२

मग इथले स्कॉलर लोक तिकडे नोकर्या करायला का जातात ?
संबंध काय दोन्हीचा?
लोकशाही आहे कि राजेशाही ? तो त्या त्या देशांचा प्रश्न आहे, लोकशाही आणि इस्लमिक राजवट यांचे जुळत नाही एवढेच दाखवून द्यायचे आहे

माझा भाडेकरू मुस्लिम आहे २ वेळा म्हणून माझे काही "इस्लामची सहिष्णुता" यावरील मत बदलेले नाही

दिगोचि's picture

7 Aug 2020 - 11:45 am | दिगोचि

माझ्या मते अमेरिका कानडा, ऑस्ट्रेलिया, न्युझीलंड हे देश निधर्मी नाहित. ते तसे वागतात. याचे कारण त्यान्ची मल्तीकल्चरलिझम पॉलिसी. या अन्वये सरकार कोणालाही धर्म, जात, एथ्निसिटी, सेक्षुअल ओरिएन्तशन अशा कारणावरून दिस्क्रिमिनेट करता येत नाही.

मराठी_माणूस's picture

7 Aug 2020 - 12:01 pm | मराठी_माणूस

याच विषयावर , "सर्वधर्मसमभाव मानणाऱ्या राज्यघटनेला आमुचा रामराम..?" शिर्षकाखाली आज आलेले एक पत्र
https://www.loksatta.com/lokmanas-news/loksatta-readers-response-letter-...

मराठी_माणूस,

हे पत्र दत्तप्रसाद दाभोळकरांचे आहे. ते येणेप्रमाणे :

सर्वधर्मसमभाव मानणाऱ्या राज्यघटनेला आमुचा रामराम..?

घटनाकारांनी या देशासाठी सांगितलेला सर्वधर्मसमभाव पंडित नेहरूंनी फार सजगपणे जपला आणि जोपासला. ७ ऑगस्ट १९४७ रोजी राजेंद्रप्रसादांनी नेहरूंना पत्र पाठवून ‘या देशात गोहत्या बंदीचा कायदा हवा. बापूजींची इच्छा अशीच आहे,’ म्हणून कळविले. नेहरूंनी त्यांना लगेच पत्र पाठवून कळविले, ‘बापूजींना असा कायदा नको आहे. त्यांना गाईंचे रक्षण व्हावे, असे वाटते. हा देश ज्यांना पाकिस्तानच्या मार्गाने नेऊन त्याला ‘हिंदुराष्ट्र’ बनवायचे आहे, त्यांना तो हवा आहे. बापूंनी आपल्याला सांगितलेय, आपण अल्पसंख्य असलेल्या लोकांना केवळ संरक्षण देऊन चालणार नाही, तर आपण त्यांच्या भावनांची काळजी घ्यावयास हवी.’ २ एप्रिल १९५५ रोजी शेठ गोविंददास यांनी गोहत्या बंदीचा कायदा व्हावा म्हणून एक विधेयक लोकसभेत आणले. त्याला विरोध करताना नेहरूंनी सांगितले, ‘असा काही कायदा या लोकसभेत पारीत झाला, तर नेहरू उद्यापासून या देशाचे पंतप्रधान नसतील.’

या साऱ्याला छेद देत संघ परिवार उभा होता. संघाचे उदारमतवादी समजले जाणारे सरसंघचालक देवरस यांनी सांगितलेय, ‘संघाचा फक्त एककलमी कार्यक्रम आहे. ‘हिंदूंचाच हिंदुस्थान’ म्हणजे हे हिंदुराष्ट्र आहे.’ आपल्या ‘हिंदू स्टेट’ या पुस्तकात बलराज मधोक यांनी म्हटलेय, ‘संघाची एक शाखा म्हणून जनसंघ स्थापन केला. संघ सांस्कृतिक संघटना आहे, ती राजकारणात भाग घेणार नाही म्हणून सरदार पटेल यांनी गुरुजी गोळवलकरांकडून लिखित स्वरूपात वचन घेतल्याने ते गरजेचे होते. जनसंघाच्या घटनेत ‘हिंदुराष्ट्र’ हा शब्द आम्हाला घालावयाचा होता. पण पटेलांची दहशत एवढी होती, की तो शब्द आम्ही गाळला. मात्र, डिसेंबर १९५२ रोजी कानपूर येथे झालेल्या पहिल्या राष्ट्रीय अधिवेशनात ‘शिक्षणात उपनिषदे, भगवद्गीता, रामायण यांचा समावेश असावा व संस्कृत ही अनिवार्य भाषा म्हणून शाळा-कॉलेजात शिकविली जावी, हे दोन ठराव आम्ही पारीत केले.’

त्यानंतर, या देशात काही शतके उभी असलेली व देशातील २० कोटी एवढी लोकसंख्या असलेल्या मुसलमान समाजाचे श्रद्धास्थान असलेली एक वास्तू न्यायालय व संसद यांच्याकडून मान्यता न घेता रस्त्यावर प्रचंड गर्दी उभी करून नामशेष करण्यात आली. आपल्या न्यायालयीन प्रक्रियेतही वास्तू उद्ध्वस्त करणाऱ्यांना २८ वर्षांत शिक्षा झालेली नाही. ती वास्तूही तेथे उभी करण्यात आली नाही. मात्र, त्या ठिकाणी दुसऱ्या धर्माचे श्रद्धास्थान असलेले मंदिर उभारायला सुरुवात झाली आहे.

सर्वधर्मसमभाव मानणाऱ्या या देशाच्या घटनेला आमुचा रामराम घ्यावा म्हणून सांगत, आपण हिंदुराष्ट्र निर्माण केले आहे किंवा त्या दिशेने अपरिवर्तनीय अशी वाटचाल सुरू केली आहे, असे काही आहे का?

– दत्तप्रसाद दाभोळकर, सातारा

उपरोक्त पत्रात वादग्रस्त वास्तू मुसलमान समाजाचे श्रद्धास्थान होती असं म्हंटलंय. हे धडधडीत खोटं आहे. तिथे बाबरी नावाची कोणतीही मशीद नव्हती. तिथे कधीही नमाज पढला गेला नाही. फार काय, मक्केची दिशा दाखवणारा किबला नामक दगड त्या वास्तूत कुठेही नव्हता. ती वास्तू म्हणजे बाटवलेलं जुनं राममंदिर होतं. बाबरी मशीद हा उल्लेख म्हणजे तद्दन भंपकपणा आहे.

हे सगळं दत्तप्रसाद दाभोळकरांना सांगणार कोण?

आ.न.,
-गा.पै.

Gk's picture

7 Aug 2020 - 6:49 pm | Gk

संस्कृत अनिवार्य करा,

ज्यांनी ही मागणी केली त्यांना तरी संस्कृत येते का ?

संस्कृत मध्ये बी ए एम ए करता येते , आनंदाने करावे

ज्यांनी ही मागणी केली त्यांना तरी संस्कृत येते का ?

मोगा खान

काय भंपक प्रश्न आहे?

माझ्या मुलाने भरपूर शिकावे अशी इच्छा निरक्षर माणसाची असू शकत नाही का?

Gk's picture

7 Aug 2020 - 8:02 pm | Gk

संस्कृत ची मागणी करणारे निरक्षर नव्हते

आणि संस्कृत बीए एमए चा ऑप्शन असताना ते का झाले नाहीत , हा माझा मुद्दा आहे

सुबोध खरे's picture

7 Aug 2020 - 7:35 pm | सुबोध खरे

असल्या फडतुस माणसांचे पत्र कचऱ्यात फेकण्याचा लायकीचेच आहे. कशाला प्रसिद्धी देताय?

त्यांना काहि सांगायची जरजच नाहि. त्यांना कळत नसेल असे अजीबात नाहि. पण प्रथम स्वतःला आणि मग इतरांना मुर्ख बनवुन डोळ्यांवर कातडे ओढलेली जमात आहे ति.
वार्‍याची दिशा बदलली तर हे लोक बदलतात, किंवा आपोआप गप्प होतात्/विस्मृतीत जातात. हेच त्यांचं भाग्य.

प्रकाश घाटपांडे's picture

7 Aug 2020 - 1:10 pm | प्रकाश घाटपांडे

मंदीर वही बनाएंगे लेकीन तारीख नही बतायेंगे असे करुन डिवचले होते काही पुरोगामी विश्लेषकांनी. राममंदीर विषय मागे पडला होता तर उगीच डिवायचायचे कशाला?

NiluMP's picture

7 Aug 2020 - 3:53 pm | NiluMP

:-)

बोलघेवडा's picture

7 Aug 2020 - 1:22 pm | बोलघेवडा

इतिहासाचा विपरीत अर्थ काढून समाजात विष पेरणाऱ्या वराह पंथी, गर्दभ पंथी फुरोगामी लोकांना मिरच्या झोबल्या असतील या निमित्ताने.

अथांग आकाश's picture

7 Aug 2020 - 1:57 pm | अथांग आकाश

लेख आवडला!
अफजल गुरुची पुण्यतिथी साजरी करणाऱ्यांच्या जातकुळीतील लोकांना दुःख अनावर होऊन त्यांनी कितीही टाहो फोडला तरी त्यांचे सांत्वन करण्याच्या फंदात न पडता त्यांच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करणे श्रेयस्कर !!

यश राज's picture

7 Aug 2020 - 3:04 pm | यश राज

लेख आवडला

मूकवाचक's picture

7 Aug 2020 - 4:40 pm | मूकवाचक

'राम काल्पनिक आहे' पासून 'राम सगळ्यांचा आहे' इथवर काहीं पुरोगाम्यांचे मतपरिवर्तन होताना दिसते आहे. आपल्या समाजातल्या सर्वार्थाने महत्वाच्या असलेल्या एका घटकाला कारण नसताना गुन्हेगार ठरवण्यात आणि वाळीत टाकण्यात काहीच 'राम' नाही हे तथाकथित पुरोगामी/ बुद्धीवादी अशी बिरूदे मिरवत असलेल्या लोकांच्या हळूहळू लक्षात येते आहे हे सुचिन्हच आहे!

Gk's picture

7 Aug 2020 - 6:51 pm | Gk

राम सगळ्यांचा आहे तर मंदिर कमिटीत एकाच जातीचे लोक का आहेत ?

कांदा लिंबू's picture

7 Aug 2020 - 7:24 pm | कांदा लिंबू

मंदिर कमिटीत एकाच जातीचे लोक का आहेत ?

पुरावा?

सुबोध खरे's picture

7 Aug 2020 - 7:40 pm | सुबोध खरे

जमा मशिदीचे शाही इमाम आणि असदुद्दीन ओवैसी याना पण कमिटी वर घ्या.

म्हणजे रडारड नको.

त्यांना पण सांगता येईल कि आम्ही किती सहिष्णू आहोत

असं घडलं तर भारताचा स्वर्ग होईल..:)

बाप्पू's picture

7 Aug 2020 - 9:04 pm | बाप्पू

ते पुरावा देत नसतात.. फक्त काड्या टाकून पळून जायचे..

कांदा लिंबू's picture

7 Aug 2020 - 10:26 pm | कांदा लिंबू
कांदा लिंबू's picture

7 Aug 2020 - 10:26 pm | कांदा लिंबू

एक पोस्ट राममंदीरच्या दरम्यान खुप वायरल झाली, तीच ज्यामधे मंदीराच्या विश्वस्तांमधे सगळे ब्राम्हण आहेत वगैरे... मला बर्याच लोकांनी याचे खंडण मागीतले, मुळात खंडण हा प्रकारच मला आवडत नाही. तुम्हाला कोणी तुमच्या बापावर शंका उपस्थित केली तर तुम्ही त्याला खंडण द्याल की त्याच्या खांडोळ्या कराल? पण दुर्दैवाने आज हिंदू समाजातील पौरूषत्व मृतप्राय झाल्याने या मुर्दाड नपुंसक समाजासाठी, ज्याला खंडण मागणार्याच्या पाश्वभागात सणसणीत लाथ घालण्याची हिंमत नाही त्या समाजासाठी हा लेखप्रपंच...
सर्वप्रथम आरोप हा आहे की विश्वस्तांमधे (ट्रस्टीज) सगळे सदस्य ब्राम्हण आहेत एकही दलित नाही. हे धादांत खोटे आहे. यात श्री कामेश्वर चौपाल हे दलित आहेत. दुसरे म्हणजे श्री चंपत राय हे ब्राह्मण नसून कायस्थ आहेत तिसरे म्हणजे पंधरा पैकी तीन नियुक्त्या ह्या आय ए एस दर्जाच्या अधिकार्यांच्या शासकीय नियुक्त्या आहेत. आता ते स्वतःच्या परिश्रमावर तिथे पोहचले आहेत. आरक्षण घेऊन नाही. त्यांना तर आरक्षण पण नसतं. राहीला प्रश्न इतरांचा तर के. पराशरण ह्यांचा अयोध्येच्या निकालात सिंहाचा वाटा आहे ही गोष्ट सर्वांना माहीत आहे. त्यांच्या सदस्यत्वावर बोट उचलण्याचा नैतिक अधिकार घरात बसून राम मंदिराच्या विश्वस्तांवर चकात्या ओढणाऱ्या तुमच्यासारख्या उपटसुंभना तर अजिबात नाही. आता शेवटचं म्हणजे अध्यक्ष असलेल्या महंत नृत्य गोपाल दासजी महाराज; असं म्हणतात की संतांचं कूळ शोधू नये पण हा शास्त्रीय संकेत पाळला जावा ही अपेक्षा तुमच्या सारख्या जातीवादी कीड्यांकडून आम्हाला नाही. तरीपण महंत असलेले दास आणि इतर विश्वस्त ज्यामधे दोघे गिरी आहेत गिरी आणि दास हे कुठल्या शास्त्रा नुसार ब्राह्मण आहेत हे तथाकथित पोस्ट लिहिणार्याने सिद्ध करावे. उचलली जीभ लावली टाळाला, फक्त जातीचे राजकारण करून लोकांची माथी भडकवण्याची एवढेच उद्योग असल्या लोकांना जमतात. काय तर म्हणे एखादा वारकरी विश्वस्त म्हणून का घेतला नाही? वारकरी म्हणजे पण काय? काय म्हणतात संत तुकाराम महाराज? 'विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म' हा विष्णू तुमच्या मान्यतेनुसार वैदिकांचा देव आहे ना? सोयीनुसार वारकरी संप्रदाय आणि तुकोबांचा उपयोग करणारे तुम्ही तुम्हाला वारकरी संप्रदायाचं कवडीचाही ज्ञान आहे का? समर्थ रामदास आणि ज्ञानेश्वर माउलींची जात आणि कुळ काढणारे तुम्ही, तुमच्या सारख्यांना खंडन देणे हाच मुळात अपराध आहे. राम मंदिर हे तुमच्या जातीच्या राजकारणाचे केंद्र नाही, तो करोडो हिंदूंच्या विश्वासाचा आणि आस्थेचा भाग आहे. कार सेवकांनी कारसेवा मंदिराचे विश्वस्त होण्यासाठी केली नव्हती की आम्ही राम मंदिराचे समर्थन तिथला मलिदा खाण्यासाठी करत नाही. झालेल्या नियुक्त्यांना आमचे पूर्ण अनुमोदन आणि समर्थन आहे. आम्ही क्षत्रिय आहोत, आम्ही मंदिराचे राखनदार आहोत मंदिराच्या गाभाऱ्यातले पुजारी नव्हे. ते शास्त्रानुसार ज्यांच काम आहे तेच करतील. मंदिराच्या पैशावर तुमच्यासारख्या नीच लोकांचाच डोळा असू शकतो. अंगणातली तुळस मंदिरांचे कळस राखणे आम्हाला छत्रपती शिवरायांनी शिकवले आहे. गाय आणि ब्राह्मण यांचे प्रतिपालन त्यांचे रक्षण करणे हे क्षत्रिय म्हणून माझे कर्तव्य आणि माझे कर्तव्य पार पाडणे माझे सौभाग्य आहे. प्रत्येक गोष्टीवर असले भिकारडे चाळे करणे बंद करा. ते राम मंदिर आहे तुमची रोजगार हमी योजना नाही. पण हे समजायला अंगात घरंदाज रक्त लागतं, 'तलवार के सामने सलवार उतारने वाले' आणि दोन किलो तांदूळासाठी धर्म बदलणारी मानसिकता नव्हे
हर हर महादेव! जय श्रीराम!जय शिवराय
सचिन पाटील

चौकस२१२'s picture

8 Aug 2020 - 6:58 am | चौकस२१२

'गाय आणि ब्राह्मण यांचे प्रतिपालन त्यांचे रक्षण करणे हे क्षत्रिय म्हणून माझे कर्तव्य'
येथे " ब्राह्मण रक्षण " याचा अर्थ "ब्राह्मण जातीचे" असं ना घेता हिंदू धर्मातील पूज्य स्थानांचा देखभाल करण्याचे काम / शिक्षणाचे काम ज्याच्याकडे दिले आहे तो " असा घयावा
ब्राहमण हा प्रतीकात्मक शब्द आहे फक्त .
मग त्यात गुरव समाज हि येतो , आणि आज जर ब्राह्मणांचे पारंपरिक काम ब्राह्मणेतर करीत असतील तर त्यांचे हि रक्षण म्हणजे एक अर्थाने हिंदू धर्म / चालीरीतींचे रक्षण असा आहे .
जसे कि "मराठा साम्राज्य" याचाच अर्थ मराठा जातीचे साम्राज्य असे नसून छत्रपतींच्या नेतृत्वखालील आज जो महाराष्ट भाग आहे तो भाग आणि तेथील मराठी बोली बोलणारा समाज" असा आहे .
पण हे सगळं समजून अनेक लोकांना घ्याचे नाही ,, कारण मग जातीच्या काड्या कश्या घालणार!
- सातारा आणि कोल्हापूर गादीचे वंशज जेवहा काँग्रेसशी पाठिंबा ना घेता संसदेत गेले तेव्हा ज्या लोकांची जाम जळली ते हे लोक
- सांगली भागात भिडे नामक "बामनाचं" ऐकणारी अनेक बहुजन आहेत हे ज्यानं पचतच नाही ते हे लोक
- संघावर भटजींची पकड आहे असा आरोप करणारे जेवहा मोदींसारखे आणि शहांसारखे "ब्राह्मणेतर " सत्तेवर येतात हे पाहून ज्यांची जाम जळली ते हे लोक

परत एकदा लक्षात घ्या, अब्राहमीक धर्मांचा हा पद्धतशीर डाव आहे
हिंदूंच्यात फूट पडणे
- दलित सवर्ण वाद
-ब्राह्मण मराठा वाद
- दलित मुस्लिम एकत्र असल्या घोषणा ( इसिस समोर आली कि जणू ते म्हणणार आहेत कांबळे तू मला प्यारा , जोशी ला कापतो,)

Gk's picture

8 Aug 2020 - 2:59 pm | Gk

ती तर मुसलमान , ख्रिश्चन यायच्या आधीपासूनच आहे

चौकस२१२'s picture

8 Aug 2020 - 3:44 pm | चौकस२१२

ती तर मुसलमान , ख्रिश्चन यायच्या आधीपासूनच आहे ( हिन्दुन्च्यतिल फुट )
मग त्य्यत तुम्हाल अनद आहे का? ति कमि व्हवि असे नहि वाटत ?
निदान एवढा तरी लक्षात घेता येत का बघा कि अभ्रमिक धर्मांना हिंदू / बुद्ध शीख नष्ट झाले तर पाहिजेच आहे ..
आणि त्यास खतपाणी म्हणून फूट आधी होती कि नवीन आहे यावर कंठकूट करत बसू...

'तलवार के सामने सलवार उतारने वाले' आणि दोन किलो तांदूळासाठी धर्म बदलणारी मानसिकता नव्हे

-------
हे हिंदू धर्माला लांच्छन ना ? म्हणजे स्त्रियांचे शील रक्षणयात आणि तळागाळातील लोकापर्यंत अन्न पोचवण्यात तुम्ही कमी पडलात , 10000 वर्षे सत्तेत असूनही

Gk's picture

8 Aug 2020 - 6:52 pm | Gk

2 किलो तांदूळ दे , भिकार्याना मिठी मार अन हो मदर तेरेसा अन घे नोबेल पारितोषिक

हिंदूंना कोण अडवले आहे ?

गामा पैलवान's picture

8 Aug 2020 - 10:29 pm | गामा पैलवान

Gk,

प्रश्न समर्पक आहे. हिंदूंना कोणीही अडवलं नाहीये. हिंदुधर्माचा प्रसार व प्रचार आम्ही करणारंच.

धन्यवाद!

आ.न.,
-गा.पै.

Gk's picture

8 Aug 2020 - 10:33 pm | Gk

इंग्लण्डात राहून इंग्लंडच्या राणीला हिंदू करा

शुभेच्छा

गामा पैलवान's picture

8 Aug 2020 - 11:02 pm | गामा पैलवान

Gk,

मल्टीकल्चरालिझम आणल्याने ती झालीच आहे हिंदू.

आ.न.,
-गा.पै.

चौकस२१२'s picture

9 Aug 2020 - 5:03 am | चौकस२१२

तुमच्या या प्रतिक्रियेतच उत्तर आहे
- असली भडभुंजेगिरी हिंदूंना करायची नाहीये
- आणि मुळातच "दुसऱ्यांना आपल्यात धर्मांतर करून आणले तरच त्यांना मोक्ष वैगरे मिळेल" असली समजूत हिंदूंची नाही (कि जी ख्रिस्ती आणि इस्लाम ची आहे )
अर्थात याचा अर्थ असा होतो का कि हिंदूंनी आपले धर्मांतर होत असेल तर गप्पा बसावे?
असो... जिके आपल्याला नक्की काय म्हणायचेय / नक्की कसला विरोध हे ज्या दिवशी कळेल तो दिवस "सोनियाचा" ! ( नो पन इंटेंडेड )
असा म्हण्यायचा कारण असा कि मुद्दा सापडला नाही कि "इंग्लडात राणीला हिंदू करा" असली व्यक्तवे सुचतात !

Gk's picture

9 Aug 2020 - 8:10 am | Gk

ते इंग्लंडमध्ये असतात , म्हणून त्यांना अधून मधून गमतीने तसे बोलतो

तुम्हाला न आवडणारी लोकं काय करतात हे बाजूला ठेवा. तुम्ही ह्या शब्दांसमोर स्युडो शब्द लावता, तोही बाजूला ठेवा. (स्युडो न होणे हा पर्याय व्यक्तिगतरीत्या तुम्हाला उपलब्ध आहे, म्हणून. इतरांच्या ऐवजी तुम्ही काय विचार करता, ह्याची उत्सुकता आहे.)

काय व्याख्या निघेल ? आणि ह्या गोष्टी नाहीत, तर तुम्ही स्वतःला काय म्हणाल ? जेन्युईन प्रश्न आहे.

सुधीर मुतालीक's picture

7 Aug 2020 - 10:32 pm | सुधीर मुतालीक

आता मात्र तुम्हाला नेमके काय म्हणायचे आहे हे जाणून घ्यायची उत्सुकता निर्माण झालीय हं ! काय हो काय म्हणायचं आहे तुम्हाला ???

Rajesh188's picture

8 Aug 2020 - 8:57 am | Rajesh188

इथले ढोंगी लोकांचा खरा चेहरा दाखवला तुम्ही.
पुरोगामी शब्दाला बदनाम केले इथल्या ढोंगी लोकांनी.

डँबिस००७'s picture

8 Aug 2020 - 3:59 pm | डँबिस००७

लेख खुप आवडला !!

काही लोकांची जाम जळ्ळी !!

सौंदाळा's picture

8 Aug 2020 - 7:58 pm | सौंदाळा

आवडला

Gk's picture

9 Aug 2020 - 8:12 am | Gk

अयोध्या भूमीपूजनाच्या खड्ड्याचे फोटो आहेत का ? त्यात 3 गाठोडी पुरली म्हणे , एक निळे , एक पांढरे , एक हिरवे

खरे आहे का ?

Gk's picture

9 Aug 2020 - 8:21 am | Gk
Gk's picture

9 Aug 2020 - 8:32 am | Gk

निळे , पांढरे , हिरवे खड्ड्यात आणि वर सर्वत्र भगवी पिवळी वस्त्रे विलसत आहेत , अहाहा , किती मनोहारी दृश्य ते !

Rajesh188's picture

9 Aug 2020 - 9:37 am | Rajesh188

भारतीय राज्य घटने प्रमाणे स्थापित सर्वोच्च न्यायलया नी निवडा केल्या नंतर सुद्धा त्या निवड्या वर अविश्वास दाखवणे हे राज्य घटनेवर अविश्वास दाखवण्या सारखे आहे.
तुमचा न्यायालय वर विश्वास नाही,सरकार वर विश्वास नाही,इतिहास वर विश्वास नाही,ज्या जाणकार व्यक्ती नी पुराव्याचे विश्लेषण करून काही निष्कर्ष काढले आहेत त्या वर विश्वास .
मग विश्वास कशावर आहे.
झुंडशाही वर.
एकदा निवडा झाल्या नंतर निळे,हिरवे, खडय्यात आहेत हे वाक्य कस काय lihle जाते.
मी च शाहणा बाकी सर्व मूर्ख ही आपल्या येथील ढोंगी,हिंदू द्वेशी पुरोगामी चे ठळक वैशिष्ट्ये आहे.

Gk's picture

9 Aug 2020 - 9:39 am | Gk

मी फक्त चित्राचे वर्णन केले आहे.

Gk's picture

9 Aug 2020 - 1:39 pm | Gk

त्यात अजून 2 गाठोडी आहेत
एक पांढरे , एक काळे

पंचमहाभूते आहेत म्हणे

सुबोध खरे's picture

10 Aug 2020 - 10:20 am | सुबोध खरे

हायला

तुम्हाला खरंच आनंद झालाय?

काय म्हणताय?

मग तुम्ही पण भगवी वस्त्रे केंव्हा नेसताय?

दिगोचि's picture

9 Aug 2020 - 10:01 am | दिगोचि

इंग्लंडच्या राणीला हिंदू करा असे जे म्हणतात त्याना एक माहित नसावे (कदचित मुद्दाम पण अव्हान देत असतील) की हिन्दु धर्मात इतरान्चे धर्मान्तर कसे करावे हे सान्गितलेले नाही. म्हणुन हिन्दु धर्म बाहेर पसरला नाही.

सक्ती नी धर्मांतर करणे, लालच देवून धर्मांतर कर,मदतीच्या बदल्यात धर्म परिवर्तन करण्यास भाग पाडणे हे सर्व गैर मार्ग आहेत.

धर्म पाळणारी लोक पर धर्मावर टीका करत असतात हे एक वेळ समजू शकतो पण धर्म न पाळणारी निधर्मी लोक हिंदू धर्मा वर टीका करतात हे समजणे अवघड आहे.
हे पण घोड्याचा पाय गाढवाला लावून समजून घेता येईल .
पण अत्यंत द्वेष पूर्वक अत्यंत नीच पातळीवर जावून हिंदू धर्मावर हे निधर्मी का टीका करतात हे मात्र समजत नाही.
अगदी कट्टर मुस्लिम किंवा कट्टर ख्रिश्नांच्या कडून सुद्धा तेवढ्या नीच पातळीवर जावून टीका होत नाही.(मी कट्टर हा शब्द वापरला आहे धर्मांतरित लोक म्हणजे कट्टर धार्मिक नाहीत ते संधी साधू आहेत)

Gk's picture

9 Aug 2020 - 1:13 pm | Gk

सलवारीचे रक्षण अन दोन किलो तांदूळ ना ? जे तुम्ही देऊ शकला नाहीत.

मग आता जे उरले आहे , त्यांच्याबरोबर आनंदाने राहा.

इंग्लडची राणी हे मी उपहासाने बोललो नाही , तेच बोलले हिंदूंना हिंदू विचार प्रसारित करण्यास कुणी अडवले नाही , म्हणून मी बोलले , शुभेच्छा

जर येणार असतील कुणी तांडळासाठी , तर त्यांनाही घ्याच की , जत्रा म्हटले की हौसे गवसे नवसे सगळे येणार , शिवाय भक्तीचेही 4 प्रकार तुमच्याच बुकात छापलेत ,

आर्त, जिज्ञासु, अर्थार्थी और ज्ञानी- ये चार प्रकार के भक्त मेरा भजन किया करते हैं। इनमें से सबसे निम्न श्रेणी का भक्त अर्थार्थी है। उससे श्रेष्ठ आर्त, आर्त से श्रेष्ठ जिज्ञासु, और जिज्ञासु से भी श्रेष्ठ ज्ञानी है।

असे असले तरी मला सगळेच प्रिय आहेत , असे लिवले आहे म्हणे

त्यामुळे तांदळासाठी आले तरी घ्या,

सगळेच काय मोदी योगी नसतील ना ? तांदळासाठी काँग्रेसमधून भाजपात येणारेही घेताच ना ? आणि सगळ्यांना कमळ एकच छाप लावता ना , तसेच.

सुबोध खरे's picture

10 Aug 2020 - 10:22 am | सुबोध खरे

धर्मांध आणि निधर्मांध (यात कम्युनिस्ट फुरोगामी बुद्धिवादी इ सर्व येतात) तितकेच कडवट आणि असहिष्णू असतात.

माझा_डूआइडी's picture

9 Aug 2020 - 3:18 pm | माझा_डूआइडी

जगभरात मुस्लिमांची जनसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
गैरमुस्लिमांना त्यांची जनसंख्या वाढवायला कोण रोकले आहे?

का तशी क्क्षमता नाही त्यांच्यात?