शब्दखेळ : विरंगुळा (भाग २)

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
20 Jul 2020 - 11:32 am

भाग १

नव्या धाग्यावर स्वागत.

नवा खेळ : शब्दव्यूह आणि अंताक्षरी

खाली ओळीने नऊ अक्षर समूह दिले आहेत. प्रत्येक समूहातून तुम्हाला एक अर्थपूर्ण शब्द ( दिलेल्या अक्षरसंख्येचा आणि शोधसूत्रानुसार काढायचा आहे). आता पुढे अंताक्षरी अशी चालू होईल:

• पहिल्या समूहातून योग्य शब्द निघाल्यावर त्याचे शेवटचे अक्षर पहा.
• त्या अक्षराने सुरू होणारा सूत्रानुसार योग्य शब्द दुसऱ्या समुहात आहे. तो ओळखा.
• पुन्हा वरील शब्दाचे शेवटचे अक्षर घेऊन तिसऱ्या समुहातील शब्द शोधा.

• असे क्रमाने खाली जात राहा.
• आठव्या शब्दाच्या शेवटच्या अक्षराने सुरू होणारा शब्द शेवटच्या समूहातून ओळखा. आता या शब्दाचा क्रमांक १ मधील शब्दाशी अर्थाने जवळचा संबंध आहे. तो सिद्ध झाल्यासच कोडे पूर्ण झाले असे समजावे.

• कोडे मध्यावर असताना जर तुम्ही पर्यायी शब्द काढलेत तर ते चूक ठरतील. कारण अंताक्षरी जुळली पाहिजे आणि शेवटी १ व ९ ची अटही पूर्ण झाली पाहिजे. म्हणून अनुक्रमेच उत्तरे द्या.

• १ व २ ची उत्तरे एकदम लिहा. पुढे एकेक सुटे चालेल.
………………………………………………………………………………
१. उ प ड्या र व्या स न को. ( ४ अक्षरी, खाण्याचा पदार्थ).

२. डे र व्या स धो ज्ञा दा की वो र ( ५ अ, मानाचे पद ).

३. मु ल द की शा मी र्ती दु ख म ( ४, देवळाशी संबंधित)

४. डी ळ धी ख व शु ळा ढो ब शी ट री ( ५, धुमश्चक्री)

५. गौ ण बु ट की शू रा मी का जा (४, प्रहार ).

६. र घु शी रा ख डा गे म ख ग ळी ( ५, दाटी)

७. का व ल शु डा मी ण च स पे रा (४, युक्ती ).

८. बा ड न का च स बु मी हा तो च दी ( ६, गोपनीय बाबी सांगणारा).

९. स ण मा झा का शी श व द ल ट ( चार अक्षरी आणि शब्द १ शी अर्थाने संबंधित).
………………………………….

नवा प्रयोग आहे. चु भू दे घे !

भाषाविरंगुळा

प्रतिक्रिया

मराठी_माणूस's picture

20 Jul 2020 - 2:50 pm | मराठी_माणूस

१. कोरड्यास
२.सरदारकी

कुमार१'s picture

20 Jul 2020 - 3:00 pm | कुमार१

अगदी बरोबर,
छान !
... आता पुढे सुरु....

मराठी_माणूस's picture

20 Jul 2020 - 3:16 pm | मराठी_माणूस

४.खळबळाट

कुमार१'s picture

20 Jul 2020 - 3:26 pm | कुमार१

४.खळबळाट >>> बरोबर, पण ३ नका सोडू मध्ये.
ओळीनेच जाऊ.

मराठी_माणूस's picture

20 Jul 2020 - 3:29 pm | मराठी_माणूस

३.किर्तीमुख

मराठी_माणूस's picture

20 Jul 2020 - 3:34 pm | मराठी_माणूस

५.टणकारा

मराठी_माणूस's picture

20 Jul 2020 - 3:41 pm | मराठी_माणूस

६.रामरगडा

मराठी_माणूस's picture

20 Jul 2020 - 3:42 pm | मराठी_माणूस

७.डावपेच

मराठी_माणूस's picture

20 Jul 2020 - 3:47 pm | मराठी_माणूस

८.चहाडबुचका

मराठी_माणूस's picture

20 Jul 2020 - 3:48 pm | मराठी_माणूस

९.कालवण

कुमार१'s picture

20 Jul 2020 - 3:59 pm | कुमार१

सुटले !
अभिनंदन !

कुमार१'s picture

20 Jul 2020 - 4:18 pm | कुमार१

अशा खेळात सुटी अक्षरे द्यावीत की देऊ नयेत ?

मराठी_माणूस's picture

20 Jul 2020 - 5:04 pm | मराठी_माणूस

सुट्या अक्षराने बर्‍यापैकी गोंधळ उडतो. त्यामुळे असायला हरकत नाही.

कुमार१'s picture

20 Jul 2020 - 5:06 pm | कुमार१

त्यामुळे खेळ फार लवकर संपतो , असे वाटते का?

मराठी_माणूस's picture

20 Jul 2020 - 5:20 pm | मराठी_माणूस

असे तर वाटत नाही.

कुमार१'s picture

23 Jul 2020 - 3:00 pm | कुमार१

नवा खेळ : शब्दव्यूह आणि अंताक्षरी

खाली ओळीने नऊ शोधसूत्रे दिली आहेत. त्यानुसार तुम्हाला प्रत्येकी एक अर्थपूर्ण शब्द ( दिलेल्या अक्षरसंख्येचा) शोधायचा आहे. त्या अपेक्षित शब्दाचे शेवटचे अक्षर दिले आहे. आता पुढे अंताक्षरी अशी चालू होईल:

• पहिला योग्य शब्द शोधल्यावर त्याचे शेवटचे (दिलेले) अक्षर घ्या.
• त्या अक्षराने सुरू होणारा दुसरा योग्य शब्द ओळखा.

• पुन्हा वरील शब्दाचे शेवटचे (दिलेले) अक्षर घेऊन तिसरा शब्द शोधा.
• असे क्रमाने खाली जात राहा.
• नऊव्या शब्दाचे शेवटचे अक्षर हे पहिल्या शब्दाचे सुरवातीचे अक्षर आहे. असे सिद्ध झाल्यासच कोडे पूर्ण झाले असे समजावे.

• कोडे मध्यावर असताना जर तुम्ही समानार्थी पर्यायी शब्द काढलेत तरी अंताक्षरी जुळलीच पाहिजे. आणि शेवटी १ व ९ ची अटही पूर्ण झाली पाहिजे. म्हणून अनुक्रमेच उत्तरे द्या.
१ व २ ची उत्तरे एकदम लिहा. पुढे क्रमाने एकेक सुटे चालेल.
………………………………………………………………………………

१. अलंकार (६ अक्षरी) शेवटी ल

२. कसेतरी (६) ड

३. प्राण्याचा आवाज (६) व

४. हिशेब (७) त

५. शोधक अधिकारी (६) स

६. थकीत देणे (६) की

७. माळा (४) ना

८. हात (५) ब

९. कुप्रसिद्धी (४) क्र १ चे पहिले अक्षर.
.........................................

कुमार१'s picture

24 Jul 2020 - 9:58 am | कुमार१

१ सोपे करतो.
कानातील अलंकार ***** ल

मराठी_माणूस's picture

24 Jul 2020 - 10:37 am | मराठी_माणूस

कानातीलवेल ?

कुमार१'s picture

24 Jul 2020 - 10:59 am | कुमार१

नाही. कारण पहिले अक्षर ( १ व ९ जोडी ) वेगळे आहे.

आवडाबाई's picture

24 Jul 2020 - 12:29 pm | आवडाबाई

मकरकुंडल ?

कुमार१'s picture

24 Jul 2020 - 12:31 pm | कुमार१

मकरकुंडल >>> बरोबर !
आता सुटूद्या गाडी ....

मराठी_माणूस's picture

24 Jul 2020 - 2:13 pm | मराठी_माणूस

९ वा शब्द "बदनामी" असावा असे वाटले कारण , हिंट "कुप्रसिद्धी " ही इकारत्मक होती. आणि मी , "मि" पासुन शब्द शोधत बसलो .
तसेच हा "अलंकार" भाषेशी संबधीत आहे का आभूषणाशी ते समजत नव्हते

कुमार१'s picture

24 Jul 2020 - 2:16 pm | कुमार१

"कुप्रसिद्धी " ही इकारत्मक >>> होय.

पण "बदनामी" नाही.
"बदनाम पण नाही.

वेगळा शब्द... शोधा !
...
२ घेउया ..

श्वेता२४'s picture

24 Jul 2020 - 12:39 pm | श्वेता२४

कारण शेवटचे ९) बदनाम - आहे असे वाटते

कुमार१'s picture

24 Jul 2020 - 12:44 pm | कुमार१

क्रमानेच जाऊ या !
आता २.

रातराणी's picture

24 Jul 2020 - 1:19 pm | रातराणी

हा हा मजेशीर कोडे.
क्रमांक 3 डराव डराव आहे काय? :D :D

कुमार१'s picture

24 Jul 2020 - 1:34 pm | कुमार१

3 डरावडराव >>> थोडे सुधारुन हवे.
शब्द शुद्ध हवा !

पलाश's picture

24 Jul 2020 - 2:42 pm | पलाश

२. लळतलोंबत ??
रडतखडत अर्थानेआधिक जवळचा वाटला पण ल ने सुरवात नाही.

मराठी_माणूस's picture

24 Jul 2020 - 2:46 pm | मराठी_माणूस

कोड्याप्रमाणे शेवटी "ड" हवा ना ?

हो. शोधताना अखेरचं अक्षर चुकलंच.

कुमार१'s picture

24 Jul 2020 - 2:48 pm | कुमार१

२. लळतलोंबत ?? >>> नाही.
शब्द ल ****
असा आहे.

कुमार१'s picture

24 Jul 2020 - 3:13 pm | कुमार१

कसेतरी, निष्काळजीपणाने

मराठी_माणूस's picture

24 Jul 2020 - 4:38 pm | मराठी_माणूस

ओबडधोबड ?

कुमार१'s picture

24 Jul 2020 - 5:08 pm | कुमार१

ल **** ड असा आहे ना ...

समजा, आपण त्याचे दोन समान हिस्से केले आणि ते दोन्ही लागोपाठ म्हणू लागलो,
तर आपला उच्चारगोंधळ होऊ लागेल !

श्वेता२४'s picture

24 Jul 2020 - 7:57 pm | श्वेता२४

:)

गामा पैलवान's picture

25 Jul 2020 - 2:05 am | गामा पैलवान

२. कसेतरी (६) ड ==> लवडसवड ?
-गा.पै.

कुमार१'s picture

25 Jul 2020 - 6:21 am | कुमार१

२. कसेतरी, निष्काळजीपणाने असे आहे.

लवडसवडी असा शब्द असून = लगबग, त्वरा असा अर्थ आहे

कुमार१'s picture

25 Jul 2020 - 7:40 am | कुमार१

साठी सर्वांचा चांगला प्रयत्न.
आता उत्तर जवळ येत आहे !

गामा पैलवान's picture

25 Jul 2020 - 2:12 am | गामा पैलवान

९. कुप्रसिद्धी (४) क्र १ चे पहिले अक्षर. ==> मलकीर्ती ?

कुमार१'s picture

25 Jul 2020 - 6:22 am | कुमार१

९ हा

ब **म असा आहे

गामा पैलवान's picture

25 Jul 2020 - 12:15 pm | गामा पैलवान

५. शोधक अधिकारी (६) स ==> तपासनवीस
-गा.पै.

कुमार१'s picture

25 Jul 2020 - 12:30 pm | कुमार१

तपासनवीस >> नाही.
तुम्ही हा कोशात पाहिलाय का ?
.....
अंत्य 'नीस' च आहे.

कुमार१'s picture

25 Jul 2020 - 12:35 pm | कुमार१

मोल्स्वर्थ, वझे आणि शब्दरत्नाकर तिन्ही तपासनीस हाच शब्द देताहेत.

गामा पैलवान's picture

25 Jul 2020 - 1:07 pm | गामा पैलवान

अहो, मीच बनवलाय तो शब्द. पाच अक्षरांची सहा करायला!
-गा.पै.

कुमार१'s picture

25 Jul 2020 - 1:19 pm | कुमार१

मग पुन्हा प्रयत्न करा.
शेवट मी सांगितलाच आहे.
तुम्हाला येणार ! :))

कुमार१'s picture

25 Jul 2020 - 2:39 pm | कुमार१

एकंदरीत
कोड्यातील मराठी शब्दांवर २ इस्लामी भाषांचा पगडा आहे.....

गामा पैलवान's picture

25 Jul 2020 - 8:20 pm | गामा पैलवान

अवांतर :

कुमारेक,

फारसी आणि अरबी या इस्लामपूर्व भाषा आहेत. त्यांना इस्लामिक म्हणणं कितपत सार्थ?

त्यातूनही जर यांना इस्लामिक म्हंटलं तर मग त्या ख्रिश्चन भाषाही होतात. कारण ईसाई पंथ उगम पावला तो अरबस्थानात व किमान एक शाखा तरी वाढली ती पर्शियात.

आ.न.,
-गा.पै.

कुमार१'s picture

25 Jul 2020 - 8:25 pm | कुमार१

फारसी आणि अरबी या इस्लामपूर्व भाषा आहेत >>>
माहितीसाठी धन्यवाद !

आवडाबाई's picture

25 Jul 2020 - 9:14 pm | आवडाबाई

तजकरनीस ?

२. ला मात्र पास - हात टेकले

आवडाबाई's picture

25 Jul 2020 - 9:18 pm | आवडाबाई

लगडतगड ?

शेवटचा प्रयत्न

कुमार१'s picture

25 Jul 2020 - 9:20 pm | कुमार१

बरोबर !

कुमार१'s picture

25 Jul 2020 - 9:19 pm | कुमार१

५. तजकरनीस >>> बरोबर, छान

गामा पैलवान's picture

25 Jul 2020 - 10:31 pm | गामा पैलवान

कुमारेक,

तजकर हा भाग तस्कर वरून आलेला वाटतो. तर नीस हा प्रत्यय फारसी आहे. हा मिश्र शब्द दिसतो, उदा. दखलपात्र सारखा.

आ.न.,
-गा.पै.

कुमार१'s picture

26 Jul 2020 - 9:32 am | कुमार१

तस्करा = फिर्याद; तक्रार.

तजकरा, तज्करा = लांचलुचपत; खोटी नोंद; हिशेबांत लबाडी;

तजकरनवीस (फा) >>>>> तजकरनीस (म)

कुमार१'s picture

25 Jul 2020 - 9:22 pm | कुमार१

४. हिशेब (७) त

६. थकीत देणे (६) की

७. माळा (४) ना

८. हात (५) ब

९. कुप्रसिद्धी (४) क्र १ चे पहिले अक्षर.

आवडाबाई's picture

25 Jul 2020 - 9:55 pm | आवडाबाई

सनवदबाकी

कुमार१'s picture

26 Jul 2020 - 8:06 am | कुमार१

सनवदबाकी >>> बरोबर

श्वेता२४'s picture

26 Jul 2020 - 9:54 am | श्वेता२४

डरावडराव? आधी सांगितल्याप्रमाणें

कुमार१'s picture

26 Jul 2020 - 10:09 am | कुमार१

डरावडराव >>> फक्त रा ऐवजी रां

कुमार१'s picture

26 Jul 2020 - 12:00 pm | कुमार१

४. अरबी उगम
७. घरातील नकोशा वस्तूंची जागा

८. हात >> एका प्रसंगातील प्रतीकात्मक वापर
९. हिंदी उगम

गामा पैलवान's picture

26 Jul 2020 - 12:15 pm | गामा पैलवान

३. प्राण्याचा आवाज (६) व ==> डरकाळीरव

एका प्राण्याचा आवाज असं धरलं तरंच उपरोक्त उत्तर लागू पडेल.

-गा.पै.

कुमार१'s picture

26 Jul 2020 - 12:24 pm | कुमार१

पर्यायी उत्तर .
ठीक ते आता झालंय

आवडाबाई's picture

26 Jul 2020 - 2:25 pm | आवडाबाई

४ वसूलवासलात
७ कीलखाना

आवडाबाई's picture

26 Jul 2020 - 2:27 pm | आवडाबाई

बदनाम नाही म्हणता ? मग बदलाम ?

कुमार१'s picture

26 Jul 2020 - 2:30 pm | कुमार१

४ वसूलवासलात
७ कीलखाना
बदलाम......

सर्व बरोबर !

कुमार१'s picture

26 Jul 2020 - 2:33 pm | कुमार१

८. हात >> एका प्रसंगातील प्रतीकात्मक वापर
ना * * * ब

आवडाबाई's picture

26 Jul 2020 - 5:55 pm | आवडाबाई

येत "नाहीसाहेब" :-)

कुमार१'s picture

26 Jul 2020 - 5:58 pm | कुमार१

नाहीसाहेब >>>
आता फक्त १ अक्षर दूर आहात ......!

आवडाबाई's picture

26 Jul 2020 - 6:01 pm | आवडाबाई

नाडी*** असे काही आहे कि काय ? कधी पासून ही फोडच शोधते आहे

कुमार१'s picture

26 Jul 2020 - 6:08 pm | कुमार१

साहेब बरोबर आहे....
आता फक्त.....

मराठी_माणूस's picture

26 Jul 2020 - 6:43 pm | मराठी_माणूस

नालसाहेब ?

कुमार१'s picture

26 Jul 2020 - 6:50 pm | कुमार१

नालसाहेब च !
छान हो

आवडाबाई's picture

26 Jul 2020 - 9:58 pm | आवडाबाई

माहित नाही . डिटेल्स ?

कुमार१'s picture

27 Jul 2020 - 8:02 am | कुमार१

नालसाहेब : पंजा;

मोहरमांत एका उंच काठीला वर पंजा बांधून व त्याला पुष्पमाळा वगैरे घालून गांवांतून मिरवीत नेतात, ही काठी हातीं धरणाराच्या अंगांत दैवी संचार होतो असें समजतात. याला भाविक लोक नालसाहेब म्हणतात.

कुमार१'s picture

26 Jul 2020 - 6:58 pm | कुमार१

अखेर हा ३ दिवसांचा सामना सुफळ संपूर्ण झाला. सर्व छान खेळले.
आवडाबाई = सचिन/विराट ! एकहाती !

म मा यांचा विजयी चौकार !
बरेच शब्द वापरातले नाहीत मान्य.
डोक्याला खुराक आणि इतिहासात डोकावणे हा हेतू .
धन्यवाद !

... तरी मजा आली
खरच डोक्याला खुराक मिळाला आणि तो भरपूर दिवस पुरला
ह्या सगळ्या शब्दांसोबत अजून कितिक शब्द डोळ्याखालून गेले

कुमार१'s picture

29 Jul 2020 - 6:23 pm | कुमार१

विषय : शिक्षणशास्त्र

खाली दिलेल्या ९ प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एकाच शब्दात द्यायची आहेत. शब्द शोधण्यासाठी अशी माहिती प्रश्नांच्या कंसात दिलेली आहे:
१. शब्दाची अक्षरसंख्या आणि
२. त्या शब्दातील तिसरे अक्षर.

काही प्रश्नांची उत्तरे एकमेकाशी निगडित आहेत. हा विचार करून उत्तरे द्यावीत. पहिले उत्तर बरोबर ठरल्यावरच पुढच्या क्रमांकाकडे जावे. उत्तर देण्यापूर्वी शब्दातील अक्षरसंख्या व तिसरे अक्षर ताडून पाहावे. .
............................................................................
प्रश्न:
१. शिक्षण समाजाच्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचविण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? (7, त्रि)

२. शिकवण्याच्या पद्धतीला तंत्रज्ञानाची पूरक जोड कोणत्या साधनांनी देता येते ? (7, श्रा )

३. शिक्षकाने फक्त कथन आणि विद्यार्थ्यांनी निव्वळ श्रवण करणे, या पद्धतीला काय म्हणतात ? ( 5, दे)

४. विद्यार्थ्यांना निव्वळ बंदिस्त पुस्तकी शिक्षण न देता अजून कुठल्या प्रकारचे शिक्षण दिले पाहिजे? (7, भ )

५. शिक्षणाचा हेतू विद्यार्थ्यांचे निव्वळ परीक्षेतील गुण वाढवणे हा नसून ---------- हा असावा. ( 7, व)

६. वरील ५ मधील प्रगती मोजण्याला काय म्हणतात ? (5, मा).

७. शिक्षणाचे केंद्रीय नियंत्रण कोणते सरकारी खाते करते? ( 8, ष्य ).

८. भारत सरकारतर्फे शिक्षणातील विद्वान व व्यासंगी व्यक्तींना दिली जाणारी मानद उपाधी कोणती? ( 7, म).

९. शाळेची पायरी कधीही न चढता देखील समाजात वावरून जे शिक्षण घेता येते, ते कुठल्या प्रकारचे असते ? शास्त्रीय शब्द हवा. (6, प )
.....................................................

मराठी_माणूस's picture

29 Jul 2020 - 7:43 pm | मराठी_माणूस

१. सार्वत्रिकशिक्षण ?

कुमार१'s picture

29 Jul 2020 - 7:45 pm | कुमार१

चालेल.
‘सार्वत्रिकीकरण’ असे उत्तर आहे.
छान !

गामा पैलवान's picture

29 Jul 2020 - 8:23 pm | गामा पैलवान

२. शिकवण्याच्या पद्धतीला तंत्रज्ञानाची पूरक जोड कोणत्या साधनांनी देता येते ? (7, श्रा ) ==> दृकश्राव्यपद्धती

३. शिक्षकाने फक्त कथन आणि विद्यार्थ्यांनी निव्वळ श्रवण करणे, या पद्धतीला काय म्हणतात ? ( 5, दे) ==> उपदेशन

४. विद्यार्थ्यांना निव्वळ बंदिस्त पुस्तकी शिक्षण न देता अजून कुठल्या प्रकारचे शिक्षण दिले पाहिजे? (7, भ ) ==> ?

५. शिक्षणाचा हेतू विद्यार्थ्यांचे निव्वळ परीक्षेतील गुण वाढवणे हा नसून ---------- हा असावा. ( 7, व) ==> ज्ञानवर्धनकारी

६. वरील ५ मधील प्रगती मोजण्याला काय म्हणतात ? (5, मा). ==> बुद्धीमापन

७. शिक्षणाचे केंद्रीय नियंत्रण कोणते सरकारी खाते करते? ( 8, ष्य ). ==> मनुष्यविकासखाते (पण आता नव्या शैक्षणिक धोरणानुसार बदललंय)

८. भारत सरकारतर्फे शिक्षणातील विद्वान व व्यासंगी व्यक्तींना दिली जाणारी मानद उपाधी कोणती? ( 7, म). ==> महामहोपाध्याय

९. शाळेची पायरी कधीही न चढता देखील समाजात वावरून जे शिक्षण घेता येते, ते कुठल्या प्रकारचे असते ? शास्त्रीय शब्द हवा. (6, प ) ==> ?

-गा.पै.

गामा पैलवान's picture

29 Jul 2020 - 8:24 pm | गामा पैलवान

९. शाळेची पायरी कधीही न चढता देखील समाजात वावरून जे शिक्षण घेता येते, ते कुठल्या प्रकारचे असते ? शास्त्रीय शब्द हवा. (6, प ) ==> अनौपचारिक

-गा.पै.

कुमार१'s picture

29 Jul 2020 - 8:34 pm | कुमार१

दृकश्राव्यपद्धती >>> दृकश्राव्यमाध्यमे

३, ५, ६ >> नाही. जरा वेगळी आहेत.
बाकी बरोबर.
छान !

Prajakta२१'s picture

29 Jul 2020 - 9:20 pm | Prajakta२१

५. मूल्यमापन ?

Prajakta२१'s picture

29 Jul 2020 - 9:24 pm | Prajakta२१

५. चारित्र्यसंवर्धन
६. मूल्यमापन

कुमार१'s picture

29 Jul 2020 - 9:28 pm | कुमार१

६. मूल्यमापन >>> बरोबर.
५ चूक ....( 7, व) असे बघा.

गामा पैलवान's picture

30 Jul 2020 - 2:25 am | गामा पैलवान

कुमारेक,

मूल्यमापन म्हणजे assesment. ही एक सर्वसाधारण संज्ञा आहे. शैक्षणिक प्रगती मोजण्याची असेल तर माझ्या मते अधिक समर्पक शब्द हवा.

आ.न.,
-गा.पै.

कुमार१'s picture

30 Jul 2020 - 7:42 am | कुमार१

या कोड्यात केवळ एकाच शब्दात उत्तर द्यायचे असल्याने अशा काही मर्यादा आहेत. प्रश्न 5 व 6 याचे उत्तर जोडीने द्यायचे आहे. या दोघांची उत्तरे मी एका शिक्षणतज्ञांच्या लेखातून घेतली आहेत. एका शब्दाचे बंधन घातल्याने एकंदरीत कोड्याला मर्यादा आहेत हे कबूल.

तेव्हा पर्यायी शब्द जरूर असतील आणि सुचवा.

गामा पैलवान's picture

30 Jul 2020 - 1:11 pm | गामा पैलवान

कुमारेक,

कलमापन हा पर्यायी होऊ शकेल काय? अन्यथा ही संज्ञा नव्याने उत्पन्न करावी लागेल. नव्या शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम शोभून दिसावी. मी प्रयत्न करेन. बघूया काय होतं. सूचनेबद्दल धन्यवाद! :-)

आ.न.,
-गा.पै.

कुमार१'s picture

30 Jul 2020 - 1:18 pm | कुमार१

संपले की शांतपणे विचार करतो.

कुमार१'s picture

29 Jul 2020 - 9:42 pm | कुमार१

३ ४ ५ राहिलेत.
उद्या भेटू.