गन्धः

चौकस२१२'s picture
चौकस२१२ in मिपा कलादालन
10 Jul 2020 - 5:53 pm

रस, रंग, स्वाद आणि वास
यातील वासावरून काही आठवणी

- सांगलीतील छोट्या टपरी तील बसाप्पा च्य दुकानातील वास ( त्या भागात कर्नाटक जवळ असल्यामुळे अनेक नावांचं मागे अप्पा लावला जाते कीव आलिंग्यतांच्यात ती सवय असावी ) शेंगदाणे , तंबाखू , आणि इतर किराणा याचा मिश्रित वास
- आखाती देशातील धुपाचा वास ( बखुर नावाचा )
- ऑस्ट्रेलियातील "लेमन मर्टल" म्हणजे निलगिरी आणि लिंबू याचा भास होणाऱ्या झाडाच्या अर्क पासून बनवलेला काह्ही साबण, मॉईस्टचराईसार
- चंद्रसेनी उद (? ) Frankincense
- कस्तुरी
-ऑस्ट्रेलियन "टी ट्री ऑइल"
-स्पेनचे केशर
-उन्हाळ्यात निलगिरी च्या लागवडीतून फिरताना येणार सुगंध ( निलगिरी च्या पानात तेलाचे प्रमाणात खूप असते त्यामुळे उन्हाळ्यात हा वास जास्त दरवळतो !) नुसत्या निलगिरी च्या तेलाचा वास एरवी खूप उग्र वाटतो

प्रतिक्रिया

सिरुसेरि's picture

11 Jul 2020 - 3:29 pm | सिरुसेरि

छान लिहिलय . लेख अजुन विस्तारीत हवा होता असे वाटले .
हे बसाप्पाचे दुकान म्हणजे राम मंदीर कॉर्नरचे का ?

चौकस२१२'s picture

11 Jul 2020 - 6:11 pm | चौकस२१२

हो राम मंदिर कोपऱयावरचे
असे लेख इतर लोक हि लिहितील अशी अपेक्षा म्हणून सूर केला , विस्तारित फक्त वास यावर लिहिणे अवघड आहे मला तरी

शा वि कु's picture

11 Jul 2020 - 6:31 pm | शा वि कु

राम मंदिर कॉर्नरला सिरवी बंधू आहे. बसाप्पा विश्रामबागला आहे, अयंगार बेकरी बाजूला.

चौकस, तुंम्ही १९८० ते ८५ मधल्या जुन्या आठवणी जाग्या केल्या. शाळेतून घरी जाताना फुटाणे, वाटाणे, लाल वाटाणे घेतले आहेत बस्साप्पांकडून कैक वेळा. फाऊंटन पेनात शाईही भरून मिळायची त्यांच्याकडे. उंच आसनावर मधे बस्साप्पा आणि सर्व बाजूंनी खचाखच भरलेला माल, आणि तो वास अगदी ताजा आठवला. सांगलीतले रम्य दिवस…

सिरुसेरि's picture

5 Aug 2020 - 10:25 pm | सिरुसेरि

हा धागा आणी त्यावरील प्रतिसादांमधुन सांगलीतील अनेक ठिकाणांच्या , दुकानांच्या आठवणी जाग्या झाल्या . पहाटेची दुर्गामाता दौड , राम मंदीर कॉर्नरवरील बसाप्पा आणी त्या समोरील परिवार बेकरी , सकाळी संध्याकाळी मधुसुदन डेअरीमधे होणारे दुध वाटप , वेलणकर कार्यालयासमोरील मगदुम डेअरीमधे मिळणारे वारणा दुध , वारणा लस्सी , फुले मंडई , लोकमान्य ज्युस सेंटर , महालक्ष्मी फरसाण हाउस , प्रतापसिंह उद्यानासमोरील गणेश , त्रिमुर्ती , बॉम्बे , स्टार टेक्सास हि भेळेची दुकाने अशी अनेक ठिकाणे आठवली .

स्वधर्म's picture

5 Aug 2020 - 10:34 pm | स्वधर्म

मला वाटतं झाडून सार्या दुकानात स्वातंत्र्यदिनी आणि प्रजासत्ताक दिनी जिलेबी सरळ निम्म्या किमतीत मिळणारं सांगली हे एकमेव गाव असावं. ही प्रथाही बहुधा सांगलीतच सुरू झाली असावी. या दोन दिवशी सांगली फार मिस करतो.
सिरूसेरी, भगवानलाल कंदींचा कुंदा, मसाला दूध राहिले.

चौकस२१२'s picture

11 Jul 2020 - 6:40 pm | चौकस२१२

आपण कदाचित वेगळ्या वर्षीचे बोलत असू... मी ८० च्या आधीचे बोलतोय

शा वि कु's picture

11 Jul 2020 - 6:49 pm | शा वि कु

बरोबर. मग शक्य आहे.

qसश्रुशीके का काही असंच नाव होतं ब्वा त्याचं. मोरया गोसावी मठापाशी एक अगरबत्ती वाला आहे, त्यावर यांनी थोडं लिहीलेलं. माणसं मठात गेली की चौकशी करायची ब्रह्म कमळाच्या वासाची अगरबत्ती आहे का.

पुणवडी मधे मंगला टाकीच्या मागे एक मसाल्याचा दुकानदार आहे, त्याच्या दुकानाजवळ मसाल्याचा खमंग वास येतो.

कधीकाळी साखर कारखान्यात कामाला होतो तेव्हा ची गोष्ट आहे. एकाच ठिकाणी ओकारी आणतील असे कितीतरी वास तिथे वास करत असतात. मील मधुन निघनारा ताजा रस बघायला खुप सुंदर वाटतो, पण हाच रस सांडला तर अतिशय गलिच्छ वास मारतो. मोलॅसीस चा भयानक वास, प्रेसमड चा तो विचित्र दर्प, चुन्याचा अजून वेगळा वास, व्हॅक्युम हेडर च्या पाण्याचा रासायनिक वास. स्पेंटवाश, गरम वाफेचा वास, प्रोसेस च्या पाण्याचा वास, सिरपचा गुळा सारखा वास आणि सगळ्यात शेवटी तयार साखरेचा तो मोहक वास. इतकं वैविध्य होतं, तरी सुद्धा आमच्या कडे डिस्लरी युनिट नव्हतं.

चौथा कोनाडा's picture

21 Jul 2020 - 9:14 pm | चौथा कोनाडा

झकास विषय, अन मस्त ट्रिगर केलंय !
पण लेख एवढ्यात आटोपलात ?
रस, रंग, स्वाद आणि वास ओके, पण कुठायत काही आठवणी ?
वेगळा सविस्तर धागा येऊ द्यात !

चौकस२१२, पुलेप्र.

Nitin Palkar's picture

21 Jul 2020 - 9:59 pm | Nitin Palkar

मासळी मार्केट समोरून जाताना येतो तो वास आणि धुपाचा, उदबत्तीचा येतो तो सुवास असं वर्गीकरण उगीचच डोक्यात बसलेलं. मक्याचं कणीस भाजताना येणारा, कांद्याची भाजी तळताना येणारा गंध, सोनचाफा, मोगऱ्याचा किंवा जुईचा गजरा हुंगल्यावर येणारा सुगंध, फणस पिकल्यावर, आंब्याची आढी पिकल्यावर येणार गंध, सणासुदीला घरात गोडधोड होत असताना येणारा क्षुधा उत्तेजक सुवास, आणि रविवारी मटण शिजताना किंवा मासे तळत असताना येणार गंध. यादी करायला लागल्यावर सहज आठवणारे हे अनंत गंध. मराठीत यांच्यासाठी वापरले जाणारे वास, सुवास, गंध, सुगंध आणि दुर्गंध हे मोजकेच शब्द. इंग्रजीत मात्र Scent, fragrance, balm हे सर्व सुगन्ध, अन्नचा Aroma आणि दुर्गन्धासाठी Odur असे विविध शब्दप्रयोग होतात अर्थात ही सुद्धा जंत्री अपूर्ण असू शकेल....

Nitin Palkar's picture

22 Jul 2020 - 8:03 pm | Nitin Palkar

चंदनासी परिमळ .... संत ज्ञानेश्वरांनी गंधासाठी वापरलेला हा एक शब्द आणि इंग्रजीतील Smell ... हे दोन शब्द प्रतिसाद टंकल्यानंतर आठवले.

सिरुसेरि's picture

23 Jul 2020 - 9:12 pm | सिरुसेरि

गंध नावाचा मराठी चित्रपट आहे . त्यामधे गंध याच विषयावर आधारीत ३ स्वतंत्र कथा मांडल्या आहेत .

चौथा कोनाडा's picture

24 Jul 2020 - 5:57 pm | चौथा कोनाडा

हिंदीतील अय्या हा सिनेमा देखील याच संकल्पनेवर आधारीत आहे. दिग्दर्श्क सचिन कुंडलकरच आहेत !

बालगंधर्व पूल (विठ्ठल रामजी शिंदे पूल) वरून, झाशीचीराणी चौक किंवा विरुद्ध काँग्रेस भावनाकडे जाताना, मस्त गरमागरम खमंग वडापाव मधील वड्यांचा आणि तळलेल्या मिरच्यांचा वास...

शेखरमोघे's picture

23 Jul 2020 - 11:34 pm | शेखरमोघे

"सांगलीतील मिश्रित वास" या शीर्षकाखालच्या यादीतला, कदाचित आता लुप्त झालेला - एक वास.

मी प्रथम सान्गलीला १९६६ साली गेलो असताना कुठल्याही उपहारगृहात जे काही खाल्ले त्यात जोरदार हळदीचा वास असायचा. जसे पन्जाब मध्ये "मलाइ मारके" किन्वा "मक्खन मारके" सारखी काही चमचे जास्त हळद वापरल्यासारखा. पण नन्तर कधी तो तसा जाणवला नाही. सवय झाली म्हणून असेल किन्वा हळद महागल्यामुळे हळदीचा वापर कमी झाल्यामुळेही असेल.

आता तर ऐकले की काही काळापूर्वीच्या पुरात हळद साठवण्याच्या काही विशिष्ट पद्धतीत, पुरामुळे हळदीचे अत्यन्त नुकसान झाले आणि सान्गली बाजाराचे हळदीच्या व्यापारातले महत्व एकदम कमी झाले.

चौकस२१२'s picture

3 Aug 2020 - 4:35 am | चौकस२१२

स्वाद सांगली...
- इंदिरा भुवन तेथील शाकाहारी कुर्मा पुरी
- "आवड निवड" मधील जेवण ( तुपाची वाटी )
- विलिंग्डन कॉलेज जावळी फक्त संध्याकाळी चालू असणारे एक खोपटात चालणारे दुकान जिथे खरपूस उत्तप्पा , आंबोळी आणि त्याबरोबर ताक + बारीक कांदा असलेली चटणी /ताक मिळायचे ( पै प्रकाश नव्हे ते फक्त quarter आणि अंडा करी साठी !)

Gk's picture

16 Aug 2020 - 5:39 pm | Gk

शुद्ध शाकाहारी होते ना ?

त्याच्याच मागे गल्लीत सरोवर म्हणून एक होते

सिरुसेरि's picture

21 Aug 2020 - 11:51 pm | सिरुसेरि

लोणी काढल्यावर तूपाचा मंद दरवळ..त्या तूपामध्ये रवा भाजल्यावरचा खरपूस गंध..केळ्याचे काप आणि बेदाण्यांची गोड गंध रेलचेल..वरून पुन्हा तुपाची धार.. वाफेतून सर्वत्र दरवळणारा सुगंध.. अहाहा.

Bhakti's picture

2 Aug 2020 - 2:06 pm | Bhakti

कढल्यावर

मला सर्वात जास्त सुगंध आवडतो तो पहिल्या पावसाचा , मातीचा सुगंध, मला कधी आठवण झाली की आमच्या घरात मातीच्या भिंती होत्या, प्लास्टर नसलेल्या त्यावर पाणी शिंपडले की काहीसा तसाच सुगंध येत असे मी खूप वेळ तास करत असे, आता ती माजा नाही,तरीही एक शिल्लक आहे नवीन माठ घरी आणला की त्यावर पाणी शिंपडून तोच दरवळ अनुभवता येते, अजून ही सवय कायम आहे, आठवलं तरीही तो गंध माझ्या मेंदूत तयार होतो

नीलस्वप्निल's picture

30 Aug 2020 - 8:03 pm | नीलस्वप्निल

+१

कानडाऊ योगेशु's picture

1 Sep 2020 - 12:40 am | कानडाऊ योगेशु

मला नव्या पुस्तकांचा वह्यांचा वास आवडतो. एखादे नवे पुस्तक घेतले कि ते उघडुन आधी मनसोक्त वास घेतो.

कोहंसोहं१०'s picture

31 Aug 2020 - 2:36 am | कोहंसोहं१०

वासाबाबतच्या माझ्या काही जुन्या आठवणी - बॉलपेन किंवा शाईपेनातील शाईचा वास, खोडरबराचा वास, कॉलेज मधील ब्लॅकस्मिथ किंवा लेथ रूम मधील मशिनरीचा वास, नवीन वही, कापड, दप्तर, आणि इंजिनीरिंग ड्रॉइंग पेपर चा वास, फर्निचर पॉलिशिंग (खास करून शाळेतील नूतनीकरण केलेले बाक) चा वास, नवीन रबरी बॉल आणि लाकडी बॅटच्या रबराचा वास इत्यादी