गूगल ड्राइववर अपलोड केलेले फोटो, ओडिओ, विडिओ वेबसाईटवर देणे.
Google Drive प्रत्येक जीमेल अकाउंटला सर्व फोटो,पिडिएफ, ओडिओ, विडिओ फाईल मिडियाचे धरून १५ जीबी फ्री स्टोरेज देते. शिवाय सिक्युअरटी आहेच.
भाग पहिला ) सुरुवात -
प्रथम ब्राउजरमध्ये
drive.google.com/drive/my-drive
साइट ओपन करून आपल्याला हव्या असलेल्या जीमेल अकाउंटने साइन इन करायचे.
मोबाईलवरही साइट उघडा आणि डेस्कटॉप पेज ओप्शन करावे. App नको कारण पुढे शेअरिंग लिंक काढण्यास साइट बरी पडते.
भाग २ ) मिडिया फाईल अपलोड करून शेअरिंग लिंक मिळवणे.
+ new बटण वापरून मिडिया फाइल अपलोड करा. अपलोड झाल्यावर ती वर दिसेल. त्यामधल्या मेनूतून 'share' क्लिक करा.
शेअरिंग लिंकचे दोन पर्याय दिसतील त्यातील "anyone with this link can view" select करा.
जी लिंक येइल ती कॉपी करा. याला आपण मेन लिंक म्हणूया. ती साधारण
https://drive.google.com/file/d/xxxxxxxxxxxxxxxxxxx/view?usp=sharing
अशी दिसेल.
पण ही लिंक वेबसाइटवर चालत नाही. त्यात बदल करावा लागतो. मिडिया फाइलप्रमाणे खालील बदल करून ते वेबसाईटवर वापरता येतात.
अ) फोटो शेअरिंगचे Template
<img src="https://drive.google.com/uc?export=download&id=xxxxxxxxxxxxxxx" width="80%" /><br /><br />
मेन लिंकधला xxxxxxxxxxx ने दर्शवलेला आइडेंटिफायर कोड या टेम्प्लेटातल्या xxxxx ठिकाणी टाका.
मग सर्व कॉपी करून लेखात टाकले की फोटो लेखात उमटेल.
ब) ओडिओ mp3 file प्लेअरचेTemplate
<audio controls ><source src="https://drive.google.com/uc?export=download&id=xxxxxxxxxxx"></source></audio><br />
मेन लिंक मधला xxxxxxxxxxx हा आइडेंटिफायर कोड या टेम्प्लेटातल्या xxxxx ठिकाणी टाकून सर्व कॉपी करून लेखात टाकल्यास ओडिओ प्लेअर लेखात उमटेल.
क) विडिओ प्लेअरचे टेम्प्लेट
विडिओ प्लेअर टेम्प्लेट
<iframe frameborder="0" width="100%" src="https://drive.google.com/file/d/xxxxxxxxxxxxxxxxx/preview" ; allowfullscreen="true" > </iframe>
मेन लिंक मधला xxxxxxxxxx आइडेंटिफायर कोड या टेम्प्लेटातल्या xxxxxxxxx ठिकाणी टाकून लेखात टाकल्यास विडिओ प्लेअर उमटेल.
((
गूगल ड्राइव मिडिया शेअरिंग लिंक मिळवण्यासाठी इथे पाहा.
या साइटचा उपयोग होतो.
https://www.wonderplugin.com/online-tools/google-drive-direct-link-gener...))
प्रतिक्रिया
25 Jun 2020 - 12:04 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
माहितीपूर्ण विषय. आभार.
-दिलीप बिरुटे
25 Jun 2020 - 1:13 pm | चौथा कोनाडा
फोटो टाकण्याचा प्रयत्न केला पण जमले नाही, काही तरी चुक झाली असावी लिंक मध्ये.
https://drive.google.com/file/d/1EKWPuCVBGEMeId15Jg2e1iHfrIMeg-KG/view?u...
हा तो फोटो आहे. काय चुक झाली असावी ?
धन्यवाद कंजुस साहेब, फोटो, ओडिओ, विडिओ वेबसाईटवर देण्याबद्दल हा आणखी एक मार्ग सांगितलात !
25 Jun 2020 - 3:00 pm | कंजूस
हा फोटो?
<img src="https://drive.google.com/uc?export=download&id=1EKWPuCVBGEMeId15Jg2e1iHf..." width="80%" />
25 Jun 2020 - 3:05 pm | कंजूस
<img src="https://drive.google.com/uc?export=download&id=1EKWPuCVBGEMeId15Jg2e1iHf..." width="80%" /><br /><br />
27 Jun 2020 - 10:32 pm | चौथा कोनाडा
धन्यवाद कंजूसजी ! समजायला जरा जड गेलं, खटपटी केल्यानंतर जमलं. आता हे नीट ध्यानात ठेवायला हवं.
पुनश्च आभार कंजूसजी _/\_
30 Jun 2020 - 9:14 am | चौकटराजा
हे मान्डूचे आहे का,,,,,, ?
30 Jun 2020 - 10:23 am | कंजूस
हो, जहाजमहलच्या बाजूचा वाटतोय.
30 Jun 2020 - 1:08 pm | चौथा कोनाडा
चौरासाहेब आणि कंजूसजी, बरोबर ओळखलेत !
फोटो मांडू (मांडवगड) मप्र येथील जहाजमहलच्या जवळच्या तलावाचा (बहुधा मुंजा तलाव) आहे !
27 Jun 2020 - 10:32 pm | चौथा कोनाडा
हो, हाच !
25 Jun 2020 - 3:05 pm | प्रचेतस
एकदम उपयुक्त माहिती
25 Jun 2020 - 3:08 pm | कंजूस
कोड कॉपी करताना तो बऱ्याचदा - पर्यंत अपूर्ण कॉपी होतो.
इथे
Meg-KG असे शेवटी आहे, Meg पर्यंत कॉपी झाले असेल.
1 Jul 2020 - 8:51 pm | चौथा कोनाडा
व्हिडो चिटकवायला देखील जमलंय !
कंजूसजी धन्यवाद _/\_ _/\_
2 Jul 2020 - 5:59 pm | गामा पैलवान
कंजूसकाका,
मुख्य दुव्याच्या उजव्या वरच्या कोपऱ्यात तीन उभ्या टिंबांवर टिचकी मारली की embed असा पर्याय दिसतो. तो उघडला की iframe खोचण्याचा कोड मिळतो. तो ही थेट वापरता यावा. हा प्रकार स्थिरचित्रं, चलचित्र व ध्वनिमुद्रण तिन्हींसाठी वापरता येईल बहुतेक.
आ.न.,
-गा.पै.
2 Jul 2020 - 7:22 pm | कंजूस
आँ? फक्त share आणि इतर पर्याय दिसताहेत. पूर्वी "embed" पर्याय मलाही दिसायचा आणि त्यातून फोटोही टाकलेला आठवतो. पण तुमचा ब्राउजर किंवा डिवाइस कोणता?
2 Jul 2020 - 8:55 pm | गामा पैलवान
कंजूसकाका,
मी आगीनकोल्हा म्हणजे फायरफॉक्स वापरतो.
त्रिबिंदू इथे पाहायला मिळतील :
आ.न.,
-गा.पै.
3 Jul 2020 - 6:48 am | कंजूस
मी पण आगीनकोल्हा म्हणजे फायरफॉक्स वापरतो.
त्यात हा embed option येतच नाही. पुन्हा खात्री केली. शिवाय अशा नवीन शेअरिंग लिंकस कशा बदलायच्या यावर लोकांनी साइट्सही आल्या.
ब्राउजर आणि ड्राइव अपडेट न केल्याने ते जुने पान दिसत असावे.
3 Jul 2020 - 6:56 am | कंजूस
नवीन मेन्यु पान असे दिसते
3 Jul 2020 - 1:42 pm | गामा पैलवान
कंजूसकाका,
ते पान तुम्ही मोबाईलवर पाहताय म्हणून बहुतेक वेगळं दिसतंय. मी हेच पान सफारी (आयफोन) वर बघितलं तर फक्त details हाच मेन्यू दिसला. मग सफारीला डेस्कटॉप साईट दाखव म्हणून सांगितलं तर सगळे पर्याय दिसू लागले.
तुमच्या अँड्रॉईडवर डेस्कटॉप साईट दाखवायची युक्ती बघा कुठे मिळते का. सफारीत रीलोड वर बोट दाबून ठेवल्यास request desktop site म्हणून पर्याय उमलतो.
आ.न.,
-गा.पै.
3 Jul 2020 - 4:34 pm | कंजूस
हे डेस्कटॉपमधूनच घेतले आहे.
ठीक आहे. जर कुणाला असेच पान दिसत असेल तर लेखात उपाय दिला आहेच.
मोबाइलच्या गूगल स्टोरमधून तिन्ही ब्राउजरस आणि गूगल ड्राइव नेहमीच अपडेट करतो त्यामुळे ते embed गेलं असेल.
4 Jul 2020 - 4:53 am | सुमो
तसं नाही! एंबेड ऑप्शन आहे.
गूगल ड्राइव्ह मधील शेअर्ड टू पब्लिक लिंक कोणत्याही ब्राऊझर मधे डेस्कटॉप मोड वर उघडली की त्या मिडिया लिंकचा एंबेड कोड मिळतो .
वर चौथा कोनाडा यांनी एक फोटो आणि एक व्हिडिओच्या लिंक्स दिल्यात. त्या डेस्कटॉप मोडमधे उघडून बघा.
ही Beethoven Moonlight Sonata ची ड्राइव्ह लिंक. डेस्कटॉप मधे उघडून बघा.
4 Jul 2020 - 1:47 pm | चौथा कोनाडा
+१
सुमोजी
(इमोजी सारखं हे सुमोजी छान वाटतंय !)
4 Jul 2020 - 7:32 am | कंजूस
हो आहे.
4 Jul 2020 - 7:39 am | कंजूस
म्हणजे जी शेअर लिंक येते प्रथम ती नवीन ट्याब/ विंडोमध्ये उघडून पुन्हा तीन टिंबे मेन्यू उघडल्यास embed पर्याय दिसतो.
धन्यवाद गामा पैलवान आणि सुमो.
5 Jul 2020 - 1:37 pm | चौथा कोनाडा
embed असा पर्याय वापरणं सोपं आहे.
मी हे क्रोममधून खोचलंय :
ही फीत अलिबाग जवळच्या फणसाड पक्षी अभयारण्याला आम्ही मित्रांनी भेट दिली होती तेंव्हाची आहे !
धन्यवाद गामा पैलवान आणि सुमो
8 Sep 2020 - 5:19 am | निनाद
या दुव्यावर फोटो टाकायला यातले काहीच चालत नाहीये. embed हा पर्याय नाहीये कुठेही.
https://www.misalpav.com/comment/1079159#comment-1079159
येथे सांगितलेला: अ) फोटो शेअरिंगचे Template
मेन लिंकधला xxxxxxxxxxx ने दर्शवलेला आइडेंटिफायर कोड या टेम्प्लेटातल्या xxxxx ठिकाणी टाका.
मग सर्व कॉपी करून लेखात टाकले की फोटो लेखात उमटेल. आइडेंटिफायर कोड कुठे असतो?
(सर्व क्रोम मध्ये डेस्क्टॉप्वर)
मी शेयर वर क्लिक केले की एक तर गुगलवरच शेयर करायला नावे येतात अथवा खाली फेबु आणि ट्विटर क्रिएट लिंक असे पर्याय येतात. क्रिएट लिंक हा पर्याय वाप्रून दुवा दिला आहे. त्याने चित्र दिसत नाहीत.
8 Sep 2020 - 10:35 am | कंजूस
@ निनाद, ही लिंक दिली आहे
https://photos.app.goo.gl/MWIzU09pYUpjZnAwTDVCMWZ2NUZuS3g1ZGNTZXZ3
ती 'google photos' मधल्या फोटोची आहे. ही डिरेक्ट चालत नाही. आणि हा धागा फक्त 'google drive' वर अपलोड केलेल्या फोटोंसाठी आहे.
--------------
Google photos मधून फोटो शेअरिंग करण्यासाठी वेगळा धागा आहे.-
http://misalpav.com/node/42977
या धाग्यात दिलेली माहिती सुद्धा अपडेट करायची आहे. कारण क्रोम आणि एज ब्राउजरांनी खूप बदल केले आहेत. शिवाय ctrlq dot org site नेही किचकट केले आहे.
---------------------------
तुमचा फोटो उघडून
१) Share करा - option - anyone with the link can view
२) create link and copy.
३) ही लिंक फायरफॉक्स ब्राउजरमध्ये डेस्कटॉप पेजमध्ये उघडा.
४) फोटो दिसल्यावर फोटोतल्या मेनूतून 'copy image location' करा.
ती लिंक
https lh3googleuser content.... अशी सुरू होते. ती कॉपी करा.
५) ती या टेंम्प्लेटात टाका
<img src="लिंक" width="80%"/>
६) मग ते टेम्पलेट पेस्ट करा. फोटो येतो।
(( तुमची लिंक क्र (२) प्रमाणे दिसते आहे पण शेअरिंग झालेलं नाही.))
12 Sep 2020 - 5:31 pm | चौथा कोनाडा
या धाग्याचा आणि चर्चेचा मला श्रीगणेश लेखमाला २०२० या विषेशांकात ऑडियो कथा देण्यासाठी खुप उपयोग झाला !
धन्यवाद, कंजूसजी _/\_
12 Sep 2020 - 6:13 pm | कंजूस
धन्यवाद @चौथा कोनाडा. हे धागे सतत अपडेट ठेवण्याची गरज आहे कारण त्या साइट्स बंद पडतात किंवा बदल करतात किंवा फ्री वर्शन काढून घेतात. गूगल तसे करत नाही पण मोबाईल मध्ये सेटपला लावलेल्या जीमेल अकाउंटशिवाय दुसऱ्या जीमेलला मिडिया अपलोड करणे क्रोममध्ये त्रासदायक ठरते. दुसरा ब्राउजर वापरावा लागतो.
26 Sep 2020 - 3:39 pm | नयना माबदी
https://drive.google.com/file/d/0B5-4x-24LDGlbHpNMk81NlE3dlk/view?usp=sh... हि ओरिजनल लिंक आहे.
हि एडिट केल्यावर. पण नाही दिसत. हेल्प मी.
26 Sep 2020 - 3:42 pm | नयना माबदी
मि जेव्हा पुर्वप्रकाशित करते तेव्हा नाही दिसत.
26 Sep 2020 - 3:43 pm | शा वि कु
लिंक शेअरिंग बंद आहे. चालू करा. मग दिसेल.
26 Sep 2020 - 5:40 pm | कंजूस
१)प्रथम शेअरिंग करा,
२) नंतर लिंक पुन्हा काढा. अगोदरची चालणार नाही.
३) या नव्या लिंकवर बदल करा.
(( केवळ शेअरिंग करून जुनी लिंक वापरू नका.))
11 Oct 2020 - 2:41 am | अमरेंद्र बाहुबली
11 Oct 2020 - 2:44 am | अमरेंद्र बाहुबली
11 Oct 2020 - 2:51 am | अमरेंद्र बाहुबली
11 Oct 2020 - 5:46 pm | चौथा कोनाडा
चित्र दिसत नाहीय.
कंजुस यांनी सांगितल्यानुसार "शेअर एव्हरीवन" हे सेटींग करा.
11 Oct 2020 - 11:18 pm | सतिश गावडे
मिपाच्या भाषेत तुमचा "गणेशा झाला आहे". माझाही झालाच आहे म्हणा. :)
11 Oct 2020 - 7:15 am | कंजूस
शेअरिंग लिंक काढताना
१) शेअर विद पिपल हा पर्याय असतो तो बदलून
- शेअर विद anyone निवडून मग लिंक काढा.
22 Nov 2021 - 6:44 pm | चौथा कोनाडा
22 Nov 2021 - 8:09 pm | कंजूस
हो.
22 Feb 2024 - 6:01 pm | चौथा कोनाडा
गुगल ड्राईव्ह वरून इमेजेस शेअरिंग बंद पडले आहे का ?
..... कारण आत्ता मी प्रयत्न करतोय पण मिपावर प्रिव्युव्ह मध्ये दाखवत नाहीये ..... आणि जुने इमेजेस सुद्धा मिपा पेजवर दिसत नाहीयेत पण त्या इमेज राईट क्लिक करून "ओपन न्यू इन न्यू टब असं केल्यास दिसतायेत !
ही काय भानगड आहे ?
22 Feb 2024 - 6:58 pm | Bhakti
हो अशाप्रकारे शेअरिंग ओप्शनला प्रोब्लेम आलाय,जुने असे अपलोड केलेले फोटोपण दिसत नाहीयेत आता.
22 Feb 2024 - 9:59 pm | चौथा कोनाडा
धन्यवाद Bhakti, माहितीसाठी
आता दुसरी साईट वापरावी लागेल. आपण कोणती सुचवाल ?
23 Feb 2024 - 3:42 am | कंजूस
काहीतरी बदल झाला वाटतोय गूगल ड्राईव्हला.
शोधून काढतो लवकरच.
23 Feb 2024 - 4:00 am | कंजूस
फोटो शेअरिंग साईट.पर्याय
सर्वच शेअरिंग साईटसनी त्यांचे फ्री स्टोरेज कमी करत आणले आहे. काहींनी ते paid केले आहे. गूगल backup photo फुकट देत होते ( कमी रेझलूशनचे फोटो कितीही unlimited storage) ते बंद केले आहे. ते आता एका जीमेल अकाउंटला १५ जीबी देत आहे त्यात मोजले जातात. तिथे driveमध्ये full resolution साठवता येतात. पण ते लवकरच भरणार. काही जण फोटो backup करतात ते करता कामा नये. त्याऐवजी मेमरी कार्ड्स घेऊन त्यात साठवावे. यातले फोटो बघण्यासाठी इंटरनेट लागत नाही.
स्टोरेज कोणतीही सोय वापरली तरी त्यात प्रत्येकात दोष असतात. मेमरी कार्ड सदोष होणे (corrupted). परंतू cloud backup आता महाग होत जाणार.
फोटो शेअरिंगसाठी Facebook, किंवा Imgur या सोशल मिडिया साईट्स फ्री आहेत. पण फेसबूक चे फोटो तीन वर्षांनी गायब होतात. Imgur अजून सुरू आहे. मी वापरतो.
Postimages site अजून चालू आहे. पण high resolution photosसाठी वापरता येत नाही.
23 Feb 2024 - 6:06 pm | चौथा कोनाडा
धन्यवाद, कंजुस जी ! अगदी नेमकी माहिती दिली.
मी अधुन मधुन FLICKR वापरतो. ते बरे चालले आहे असे दिसते. जुने फोटो अजुन तरी दिसताहेत,
बाकी तुम्ही सुचवलेले, त्यांनी प्रयत्न करून बघावे लागतील.
23 Feb 2024 - 4:45 am | कंजूस
चाचणी
लिंक मध्ये बदल करण्यासाठी
https://www.labnol.org/embed/google/drive/
ही साईट वापरली.
पूर्वी Google photos हा फोल्डर गूगल ड्राईव्ह मध्ये जोडावा लागतो होता. आता तसे न करता ड्राईव्हवरून लिंक मिळवता येते.