✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

गूगल ड्राइव'वरचे फोटो, ओडिओ, विडिओ वेबसाईटवर देणे.

क
कंजूस यांनी
Mon, 06/22/2020 - 18:33  ·  लेख
लेख
गूगल ड्राइववर अपलोड केलेले फोटो,
ओडिओ, विडिओ वेबसाईटवर देणे.
Google Drive प्रत्येक जीमेल अकाउंटला सर्व फोटो,पिडिएफ, ओडिओ, विडिओ फाईल मिडियाचे धरून १५ जीबी फ्री स्टोरेज देते. शिवाय सिक्युअरटी आहेच.

भाग पहिला ) सुरुवात -
प्रथम ब्राउजरमध्ये
drive.google.com/drive/my-drive
साइट ओपन करून आपल्याला हव्या असलेल्या जीमेल अकाउंटने साइन इन करायचे.
मोबाईलवरही साइट उघडा आणि डेस्कटॉप पेज ओप्शन करावे. App नको कारण पुढे शेअरिंग लिंक काढण्यास साइट बरी पडते.

भाग २ ) मिडिया फाईल अपलोड करून शेअरिंग लिंक मिळवणे.
+ new बटण वापरून मिडिया फाइल अपलोड करा.
अपलोड झाल्यावर ती वर दिसेल.
त्यामधल्या मेनूतून 'share' क्लिक करा.
शेअरिंग लिंकचे दोन पर्याय दिसतील त्यातील
"anyone with this link can view" select करा.
जी लिंक येइल ती कॉपी करा. याला आपण मेन लिंक म्हणूया. ती साधारण
https://drive.google.com/file/d/xxxxxxxxxxxxxxxxxxx/view?usp=sharing

अशी दिसेल.
पण ही लिंक वेबसाइटवर चालत नाही. त्यात बदल करावा लागतो. मिडिया फाइलप्रमाणे खालील बदल करून ते वेबसाईटवर वापरता येतात.

अ) फोटो शेअरिंगचे Template
<img src="https://drive.google.com/uc?export=download&id=xxxxxxxxxxxxxxx" width="80%" /><br /><br />

मेन लिंकधला xxxxxxxxxxx ने दर्शवलेला आइडेंटिफायर कोड या टेम्प्लेटातल्या xxxxx ठिकाणी टाका.
मग सर्व कॉपी करून लेखात टाकले की फोटो लेखात उमटेल.

ब) ओडिओ mp3 file प्लेअरचेTemplate

<audio controls ><source src="https://drive.google.com/uc?export=download&id=xxxxxxxxxxx"></source></audio><br />

मेन लिंक मधला xxxxxxxxxxx हा आइडेंटिफायर कोड या टेम्प्लेटातल्या xxxxx ठिकाणी टाकून सर्व कॉपी करून लेखात टाकल्यास ओडिओ प्लेअर लेखात उमटेल.

क) विडिओ प्लेअरचे टेम्प्लेट

विडिओ प्लेअर टेम्प्लेट
<iframe frameborder="0" width="100%" src="https://drive.google.com/file/d/xxxxxxxxxxxxxxxxx/preview" ; allowfullscreen="true" > </iframe>

मेन लिंक मधला xxxxxxxxxx आइडेंटिफायर कोड या टेम्प्लेटातल्या xxxxxxxxx ठिकाणी टाकून लेखात टाकल्यास विडिओ प्लेअर उमटेल.
((
गूगल ड्राइव मिडिया शेअरिंग लिंक मिळवण्यासाठी इथे पाहा.
या साइटचा उपयोग होतो.
https://www.wonderplugin.com/online-tools/google-drive-direct-link-generator/

))
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
49457 वाचन

💬 प्रतिसाद (47)

प्रतिक्रिया

पोच.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 06/25/2020 - 12:04 नवीन
माहितीपूर्ण विषय. आभार. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

फोटो टाकण्याचा प्रयत्न केला

चौथा कोनाडा
गुरुवार, 06/25/2020 - 13:13 नवीन
फोटो टाकण्याचा प्रयत्न केला पण जमले नाही, काही तरी चुक झाली असावी लिंक मध्ये. https://drive.google.com/file/d/1EKWPuCVBGEMeId15Jg2e1iHfrIMeg-KG/view?usp=sharing हा तो फोटो आहे. काय चुक झाली असावी ? धन्यवाद कंजुस साहेब, फोटो, ओडिओ, विडिओ वेबसाईटवर देण्याबद्दल हा आणखी एक मार्ग सांगितलात !
  • Log in or register to post comments

हा फोटो?

कंजूस
गुरुवार, 06/25/2020 - 15:00 नवीन
हा फोटो? Image removed.

<img src="https://drive.google.com/uc?export=download&id=1EKWPuCVBGEMeId15Jg2e1iHfrIMeg-KG" width="80%" />
  • Log in or register to post comments

<img src="https://drive

कंजूस
गुरुवार, 06/25/2020 - 15:05 नवीन
<img src="https://drive.google.com/uc?export=download&id=1EKWPuCVBGEMeId15Jg2e1iHfrIMeg-KG" width="80%" /><br /><br />
  • Log in or register to post comments

धन्यवाद कंजूसजी ! समजायला जरा

चौथा कोनाडा
Sat, 06/27/2020 - 22:32 नवीन
धन्यवाद कंजूसजी ! समजायला जरा जड गेलं, खटपटी केल्यानंतर जमलं. आता हे नीट ध्यानात ठेवायला हवं. Image removed.

पुनश्च आभार कंजूसजी _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

मान्डु .... ?

चौकटराजा
Tue, 06/30/2020 - 09:14 नवीन
हे मान्डूचे आहे का,,,,,, ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

हो, जहाजमहलच्या बाजूचा वाटतोय

कंजूस
Tue, 06/30/2020 - 10:23 नवीन
हो, जहाजमहलच्या बाजूचा वाटतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

चौरासाहेब आणि कंजूसजी, बरोबर

चौथा कोनाडा
Tue, 06/30/2020 - 13:08 नवीन
चौरासाहेब आणि कंजूसजी, बरोबर ओळखलेत ! फोटो मांडू (मांडवगड) मप्र येथील जहाजमहलच्या जवळच्या तलावाचा (बहुधा मुंजा तलाव) आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

हो, हाच !

चौथा कोनाडा
Sat, 06/27/2020 - 22:32 नवीन
हो, हाच !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

एकदम उपयुक्त माहिती

प्रचेतस
गुरुवार, 06/25/2020 - 15:05 नवीन
एकदम उपयुक्त माहिती
  • Log in or register to post comments

कोड कॉपी करताना तो बऱ्याचदा

कंजूस
गुरुवार, 06/25/2020 - 15:08 नवीन
कोड कॉपी करताना तो बऱ्याचदा - पर्यंत अपूर्ण कॉपी होतो. इथे Meg-KG असे शेवटी आहे, Meg पर्यंत कॉपी झाले असेल.
  • Log in or register to post comments

व्हिडो चिटकवायला देखील जमलंय

चौथा कोनाडा
Wed, 07/01/2020 - 20:51 नवीन
व्हिडो चिटकवायला देखील जमलंय ! कंजूसजी धन्यवाद _/\_ _/\_
  • Log in or register to post comments

खोचण्याचा पर्याय

गामा पैलवान
गुरुवार, 07/02/2020 - 17:59 नवीन
कंजूसकाका, मुख्य दुव्याच्या उजव्या वरच्या कोपऱ्यात तीन उभ्या टिंबांवर टिचकी मारली की embed असा पर्याय दिसतो. तो उघडला की iframe खोचण्याचा कोड मिळतो. तो ही थेट वापरता यावा. हा प्रकार स्थिरचित्रं, चलचित्र व ध्वनिमुद्रण तिन्हींसाठी वापरता येईल बहुतेक. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

मुख्य दुव्याच्या उजव्या

कंजूस
गुरुवार, 07/02/2020 - 19:22 नवीन
मुख्य दुव्याच्या उजव्या वरच्या कोपऱ्यात तीन उभ्या टिंबांवर टिचकी मारली की embed असा पर्याय दिसतो.
आँ? फक्त share आणि इतर पर्याय दिसताहेत. पूर्वी "embed" पर्याय मलाही दिसायचा आणि त्यातून फोटोही टाकलेला आठवतो. पण तुमचा ब्राउजर किंवा डिवाइस कोणता?
  • Log in or register to post comments

त्रिबिंदू

गामा पैलवान
गुरुवार, 07/02/2020 - 20:55 नवीन
कंजूसकाका, मी आगीनकोल्हा म्हणजे फायरफॉक्स वापरतो. त्रिबिंदू इथे पाहायला मिळतील : Image removed. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

मी पण आगीनकोल्हा म्हणजे

कंजूस
Fri, 07/03/2020 - 06:48 नवीन
मी पण आगीनकोल्हा म्हणजे फायरफॉक्स वापरतो. त्यात हा embed option येतच नाही. पुन्हा खात्री केली. शिवाय अशा नवीन शेअरिंग लिंकस कशा बदलायच्या यावर लोकांनी साइट्सही आल्या. ब्राउजर आणि ड्राइव अपडेट न केल्याने ते जुने पान दिसत असावे.
  • Log in or register to post comments

नवीन मेन्यु पान असे दिसते

कंजूस
Fri, 07/03/2020 - 06:56 नवीन
नवीन मेन्यु पान असे दिसते Image removed.
  • Log in or register to post comments

मोबाईल वर वेगळं दिसतंय बहुतेक ....

गामा पैलवान
Fri, 07/03/2020 - 13:42 नवीन
कंजूसकाका, ते पान तुम्ही मोबाईलवर पाहताय म्हणून बहुतेक वेगळं दिसतंय. मी हेच पान सफारी (आयफोन) वर बघितलं तर फक्त details हाच मेन्यू दिसला. मग सफारीला डेस्कटॉप साईट दाखव म्हणून सांगितलं तर सगळे पर्याय दिसू लागले. तुमच्या अँड्रॉईडवर डेस्कटॉप साईट दाखवायची युक्ती बघा कुठे मिळते का. सफारीत रीलोड वर बोट दाबून ठेवल्यास request desktop site म्हणून पर्याय उमलतो. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

हे डेस्कटॉपमधूनच घेतले आहे.

कंजूस
Fri, 07/03/2020 - 16:34 नवीन
हे डेस्कटॉपमधूनच घेतले आहे. ठीक आहे. जर कुणाला असेच पान दिसत असेल तर लेखात उपाय दिला आहेच. मोबाइलच्या गूगल स्टोरमधून तिन्ही ब्राउजरस आणि गूगल ड्राइव नेहमीच अपडेट करतो त्यामुळे ते embed गेलं असेल.
  • Log in or register to post comments

त्यामुळे ते embed गेलं असेल.

सुमो
Sat, 07/04/2020 - 04:53 नवीन
तसं नाही! एंबेड ऑप्शन आहे. गूगल ड्राइव्ह मधील शेअर्ड टू पब्लिक लिंक कोणत्याही ब्राऊझर मधे डेस्कटॉप मोड वर उघडली की त्या मिडिया लिंकचा एंबेड कोड मिळतो . वर चौथा कोनाडा यांनी एक फोटो आणि एक व्हिडिओच्या लिंक्स दिल्यात. त्या डेस्कटॉप मोडमधे उघडून बघा. ही Beethoven Moonlight Sonata ची ड्राइव्ह लिंक. डेस्कटॉप मधे उघडून बघा.
  • Log in or register to post comments

+१

चौथा कोनाडा
Sat, 07/04/2020 - 13:47 नवीन

+१

सुमोजी (इमोजी सारखं हे सुमोजी छान वाटतंय !)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुमो

हो आहे.

कंजूस
Sat, 07/04/2020 - 07:32 नवीन
हो आहे.
  • Log in or register to post comments

म्हणजे जी शेअर लिंक येते

कंजूस
Sat, 07/04/2020 - 07:39 नवीन
म्हणजे जी शेअर लिंक येते प्रथम ती नवीन ट्याब/ विंडोमध्ये उघडून पुन्हा तीन टिंबे मेन्यू उघडल्यास embed पर्याय दिसतो. धन्यवाद गामा पैलवान आणि सुमो.
  • Log in or register to post comments

embed असा पर्याय वापरणं सोपं

चौथा कोनाडा
Sun, 07/05/2020 - 13:37 नवीन

embed असा पर्याय वापरणं सोपं आहे.

मी हे क्रोममधून खोचलंय : ही फीत अलिबाग जवळच्या फणसाड पक्षी अभयारण्याला आम्ही मित्रांनी भेट दिली होती तेंव्हाची आहे ! धन्यवाद गामा पैलवान आणि सुमो
  • Log in or register to post comments

फोटो टाकायला यातले नाही चालले

निनाद
Tue, 09/08/2020 - 05:19 नवीन
या दुव्यावर फोटो टाकायला यातले काहीच चालत नाहीये. embed हा पर्याय नाहीये कुठेही. https://www.misalpav.com/comment/1079159#comment-1079159 येथे सांगितलेला: अ) फोटो शेअरिंगचे Template Image removed.

मेन लिंकधला xxxxxxxxxxx ने दर्शवलेला आइडेंटिफायर कोड या टेम्प्लेटातल्या xxxxx ठिकाणी टाका. मग सर्व कॉपी करून लेखात टाकले की फोटो लेखात उमटेल.
आइडेंटिफायर कोड कुठे असतो? (सर्व क्रोम मध्ये डेस्क्टॉप्वर) मी शेयर वर क्लिक केले की एक तर गुगलवरच शेयर करायला नावे येतात अथवा खाली फेबु आणि ट्विटर क्रिएट लिंक असे पर्याय येतात. क्रिएट लिंक हा पर्याय वाप्रून दुवा दिला आहे. त्याने चित्र दिसत नाहीत.
  • Log in or register to post comments

@ निनाद, ही लिंक दिली आहे

कंजूस
Tue, 09/08/2020 - 10:35 नवीन
@ निनाद, ही लिंक दिली आहे https://photos.app.goo.gl/MWIzU09pYUpjZnAwTDVCMWZ2NUZuS3g1ZGNTZXZ3 ती 'google photos' मधल्या फोटोची आहे. ही डिरेक्ट चालत नाही. आणि हा धागा फक्त 'google drive' वर अपलोड केलेल्या फोटोंसाठी आहे. -------------- Google photos मधून फोटो शेअरिंग करण्यासाठी वेगळा धागा आहे.- http://misalpav.com/node/42977 या धाग्यात दिलेली माहिती सुद्धा अपडेट करायची आहे. कारण क्रोम आणि एज ब्राउजरांनी खूप बदल केले आहेत. शिवाय ctrlq dot org site नेही किचकट केले आहे. --------------------------- तुमचा फोटो उघडून १) Share करा - option - anyone with the link can view २) create link and copy. ३) ही लिंक फायरफॉक्स ब्राउजरमध्ये डेस्कटॉप पेजमध्ये उघडा. ४) फोटो दिसल्यावर फोटोतल्या मेनूतून 'copy image location' करा. ती लिंक https lh3googleuser content.... अशी सुरू होते. ती कॉपी करा. ५) ती या टेंम्प्लेटात टाका <img src="लिंक" width="80%"/> ६) मग ते टेम्पलेट पेस्ट करा. फोटो येतो। (( तुमची लिंक क्र (२) प्रमाणे दिसते आहे पण शेअरिंग झालेलं नाही.))
  • Log in or register to post comments

या धाग्याचा आणि चर्चेचा मला

चौथा कोनाडा
Sat, 09/12/2020 - 17:31 नवीन
या धाग्याचा आणि चर्चेचा मला श्रीगणेश लेखमाला २०२० या विषेशांकात ऑडियो कथा देण्यासाठी खुप उपयोग झाला ! धन्यवाद, कंजूसजी _/\_
  • Log in or register to post comments

धन्यवाद @चौथा कोनाडा. हे

कंजूस
Sat, 09/12/2020 - 18:13 नवीन
धन्यवाद @चौथा कोनाडा. हे धागे सतत अपडेट ठेवण्याची गरज आहे कारण त्या साइट्स बंद पडतात किंवा बदल करतात किंवा फ्री वर्शन काढून घेतात. गूगल तसे करत नाही पण मोबाईल मध्ये सेटपला लावलेल्या जीमेल अकाउंटशिवाय दुसऱ्या जीमेलला मिडिया अपलोड करणे क्रोममध्ये त्रासदायक ठरते. दुसरा ब्राउजर वापरावा लागतो.
  • Log in or register to post comments

हेल्प मी.

नयना माबदी
Sat, 09/26/2020 - 15:39 नवीन
https://drive.google.com/file/d/0B5-4x-24LDGlbHpNMk81NlE3dlk/view?usp=sharing हि ओरिजनल लिंक आहे. Image removed.

हि एडिट केल्यावर. पण नाही दिसत. हेल्प मी.
  • Log in or register to post comments

मि जेव्हा पुर्वप्रकाशित करते

नयना माबदी
Sat, 09/26/2020 - 15:42 नवीन
मि जेव्हा पुर्वप्रकाशित करते तेव्हा नाही दिसत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नयना माबदी

लिंक शेअरिंग

शा वि कु
Sat, 09/26/2020 - 15:43 नवीन
लिंक शेअरिंग बंद आहे. चालू करा. मग दिसेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नयना माबदी

शेअरिंग नाही.

कंजूस
Sat, 09/26/2020 - 17:40 नवीन
१)प्रथम शेअरिंग करा, २) नंतर लिंक पुन्हा काढा. अगोदरची चालणार नाही. ३) या नव्या लिंकवर बदल करा. (( केवळ शेअरिंग करून जुनी लिंक वापरू नका.))
  • Log in or register to post comments

(No subject)

अमरेंद्र बाहुबली
Sun, 10/11/2020 - 02:41 नवीन
Image removed.

  • Log in or register to post comments

(No subject)

अमरेंद्र बाहुबली
Sun, 10/11/2020 - 02:44 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

(No subject)

अमरेंद्र बाहुबली
Sun, 10/11/2020 - 02:51 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

चित्र दिसत नाहीय.

चौथा कोनाडा
Sun, 10/11/2020 - 17:46 नवीन
चित्र दिसत नाहीय. कंजुस यांनी सांगितल्यानुसार "शेअर एव्हरीवन" हे सेटींग करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

मिपाच्या भाषेत तुमचा "गणेशा

सतिश गावडे
Sun, 10/11/2020 - 23:18 नवीन
मिपाच्या भाषेत तुमचा "गणेशा झाला आहे". माझाही झालाच आहे म्हणा. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

अमरेंद्र बाहुबली

कंजूस
Sun, 10/11/2020 - 07:15 नवीन
शेअरिंग लिंक काढताना १) शेअर विद पिपल हा पर्याय असतो तो बदलून - शेअर विद anyone निवडून मग लिंक काढा.
  • Log in or register to post comments

जमले का ?

चौथा कोनाडा
Mon, 11/22/2021 - 18:44 नवीन
Image removed.

  • Log in or register to post comments

जमले.

कंजूस
Mon, 11/22/2021 - 20:09 नवीन
हो.
  • Log in or register to post comments

गुगल ड्राईव्ह वरून इमेजेस

चौथा कोनाडा
गुरुवार, 02/22/2024 - 18:01 नवीन
गुगल ड्राईव्ह वरून इमेजेस शेअरिंग बंद पडले आहे का ? ..... कारण आत्ता मी प्रयत्न करतोय पण मिपावर प्रिव्युव्ह मध्ये दाखवत नाहीये ..... आणि जुने इमेजेस सुद्धा मिपा पेजवर दिसत नाहीयेत पण त्या इमेज राईट क्लिक करून "ओपन न्यू इन न्यू टब असं केल्यास दिसतायेत ! ही काय भानगड आहे ?
  • Log in or register to post comments

हो अशाप्रकारे शेअरिंग ओप्शनला

Bhakti
गुरुवार, 02/22/2024 - 18:58 नवीन
हो अशाप्रकारे शेअरिंग ओप्शनला प्रोब्लेम आलाय,जुने असे अपलोड केलेले फोटोपण दिसत नाहीयेत आता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

धन्यवाद Bhakti, माहितीसाठी

चौथा कोनाडा
गुरुवार, 02/22/2024 - 21:59 नवीन
धन्यवाद Bhakti, माहितीसाठी आता दुसरी साईट वापरावी लागेल. आपण कोणती सुचवाल ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti

काहीतरी बदल झाला वाटतोय गूगल

कंजूस
Fri, 02/23/2024 - 03:42 नवीन
काहीतरी बदल झाला वाटतोय गूगल ड्राईव्हला. शोधून काढतो लवकरच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

फोटो शेअरिंग साईट.पर्याय

कंजूस
Fri, 02/23/2024 - 04:00 नवीन
फोटो शेअरिंग साईट.पर्याय सर्वच शेअरिंग साईटसनी त्यांचे फ्री स्टोरेज कमी करत आणले आहे. काहींनी ते paid केले आहे. गूगल backup photo फुकट देत होते ( कमी रेझलूशनचे फोटो कितीही unlimited storage) ते बंद केले आहे. ते आता एका जीमेल अकाउंटला १५ जीबी देत आहे त्यात मोजले जातात. तिथे driveमध्ये full resolution साठवता येतात. पण ते लवकरच भरणार. काही जण फोटो backup करतात ते करता कामा नये. त्याऐवजी मेमरी कार्ड्स घेऊन त्यात साठवावे. यातले फोटो बघण्यासाठी इंटरनेट लागत नाही. स्टोरेज कोणतीही सोय वापरली तरी त्यात प्रत्येकात दोष असतात. मेमरी कार्ड सदोष होणे (corrupted). परंतू cloud backup आता महाग होत जाणार. फोटो शेअरिंगसाठी Facebook, किंवा Imgur या सोशल मिडिया साईट्स फ्री आहेत. पण फेसबूक चे फोटो तीन वर्षांनी गायब होतात. Imgur अजून सुरू आहे. मी वापरतो. Postimages site अजून चालू आहे. पण high resolution photosसाठी वापरता येत नाही.
  • Log in or register to post comments

धन्यवाद, कंजुस जी ! अगदी

चौथा कोनाडा
Fri, 02/23/2024 - 18:06 नवीन
धन्यवाद, कंजुस जी ! अगदी नेमकी माहिती दिली. मी अधुन मधुन FLICKR वापरतो. ते बरे चालले आहे असे दिसते. जुने फोटो अजुन तरी दिसताहेत, बाकी तुम्ही सुचवलेले, त्यांनी प्रयत्न करून बघावे लागतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

चाचणी

कंजूस
Fri, 02/23/2024 - 04:45 नवीन
चाचणी Image removed. लिंक मध्ये बदल करण्यासाठी https://www.labnol.org/embed/google/drive/ ही साईट वापरली. पूर्वी Google photos हा फोल्डर गूगल ड्राईव्ह मध्ये जोडावा लागतो होता. आता तसे न करता ड्राईव्हवरून लिंक मिळवता येते.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा