२ऑक्टो अर्थात गांधी जयंती ला खास वार चित्रपट प्रदर्शित केला गेला
होता बुधवार आम्ही पण पण बघतील मग वार
तुम्ही बघितला असेल तर कोणी पण मदत करू शकत नाही आणि तिकीट बुक केली असेल तर आत्ताच रिफंड मागा
१) टायगर श्रॉफ ह्याने एक मोठी कमी भरून काढली आहे ,अभिनयाची ची नाही तर आयटम बॉय ची
त्याचा अभिनय बघून म्हणाल टायगर सोड ,चित्रपट करणे नाही तर श्वास घेणे
२) जेव्हा जेव्हा टायगर चे डायलॉग सुरु होतात तुम्ही उभे राहणार
टाळी किंवा शिटी वाजवायला नाही तर समोरच्या माणसाला गप्प करायला जो शिव्या द्याल उभा राहिलेला असणार आहे
३) वार मूवी बघताना तुम्ही चित्रपट समरस व्हाल
डोके ह्रितिक आणि काळीज टायगर होऊन एक दुसऱ्याची वार करेल
४) संगीत एकदम मस्त आहे
तुम्ही कितीपण जोराने डिरेक्टर ला शिव्या दिल्या तरी शेजारच्याला कळणार नाही
५) अनपेक्षित णालकनीय घटना
पहिल्या अर्ध्या भागात काय चालले आहे ते कळणार नाही व दुसऱ्या भागात का व कुठे चालले आहे ते कळणार नाही
६) वाणी कपूर १० मिंट येते तरी चित्रपट तिचे नाव श्रेय नामावलीत आहे ,अनुप्रिया गोएंकाचा रोल मोठा असून नाव नाही
वाणी ला बघून १० मिंट पण खूप दिले असे वाटते
७) ह्रितिक प्रत्येक बाबती टायगर हुन सर्रास आहे
ओव्हर ऍक्टिंग मध्ये पण
८) चित्रपट पूर्ण देशभक्तीपर आहे
सुरुवातीची राष्ट्रगान फक्त आपण देशभक्त नंतर सुन्न
९) क्लायमॅक्स एकदम मस्त
चित्रपट संपला म्हणून सुस्कारा टाकतो आणि पार्ट २ येणार असे कळते
१० ) चित्रपट कमी यु ट्यूब विडिओ जास्त
पुण्यात बसून मोरोक्को इराक सिडनी पुर्तगाल
शेवट तर अचानक केरळ आणि लगेच ऑस्ट्रेलिया
पण दक्षिण ध्रुव
११) सगळ्यात चांगली गोष्ट २ तास ४० मिन संपतो चित्रपटाला २ स्टार एक ह्रितिक आणि दुसरा टायगर
आज गांधीजी असते वाढदिवसाचा बट्ट्याबोळ केल्याबद्दल दोघांना पण कुटून मारले असते
अतर्क्य ऍक्शन बघायची तर साऊथ चे चित्रपट बघा नाच बघायचा तर सपना चौधरी बघा
बाकी सुद्य असा
कळावे
लोभ
प्रतिक्रिया
9 Oct 2019 - 4:34 pm | बोलघेवडा
हस्तरभाऊ, वाचकांची थोडी तरी काळजी करा की राव!!!
शुद्धलेखन, व्याकरण जाऊ देत, वाचकाला किमान वाक्याचा अर्थ तरी लावायची वेळ येऊ नये.
प्रकाशित करायच्या आधी नीट तपासून करावा हि विनंती.
9 Oct 2019 - 4:48 pm | जॉनविक्क
आता तुमी तुमच्या जबाबदारीवर हस्त्ररजींना काही बोलायचे कारणच नाही।
9 Oct 2019 - 5:48 pm | आनन्दा
हेच्च म्हणणार होतो. अगोदरच शीर्षक वाचून कमी अपेक्षा ठेवून आलं की मग त्रास होत नाही.
9 Oct 2019 - 6:08 pm | धर्मराजमुटके
मा. बोलघेवडा,
हस्तर हे एक जराजर्जर झालेलं कित्येक शतकांपासून तळघरात कोंडून ठेवलेलं पात्र आहे. त्यामुळे त्याला सद्ययुगीन भाषा बोलणे अवघड जाते. तरीदेखील कोणतीही भाषा संवादाच्या आड येत नाही ही त्यांची तात्विक भुमिका आहे. त्यामुळे प्लीज त्यांना समजून घ्या. मिपाच्या एक्स मालकांनी व्याकरण, शुद्धलेखन याचा 'मनोगत' संस्थळावर झालेला त्रास लक्षात घेऊनच मिपाची स्थापना केली होती. त्यामुळे भाषा हा काही मोठा मुद्दा नसावा. शिवाय असे लिखाण वाचले की आपण किती खोल पाण्यात आहे हे कळते. त्यामुळे स्वःताची परीक्षा घेण्यासाठी असे लेख उत्तम ठरतात.
10 Oct 2019 - 7:48 am | अर्धवटराव
थेटरात जाऊन हा सिनेमा बघणार होतो... बरं झालं, पैसे वाचले =))
10 Oct 2019 - 11:29 am | हस्तर
ब्यांग ब्यांग आवडला असेल तर हा पण आवडेल
10 Oct 2019 - 10:07 am | लोनली प्लॅनेट
हा टायगर श्रॉफ झालं तो रणवीर सिंग झालं..कुठून असली धेंड येतात काही कळत नाही..यांना बघूनच ओकारी येते
10 Oct 2019 - 11:30 am | हस्तर
आम्ही अरमान कोहली ,सुमीत सैगल ,किशन कुमार असल्यांना झेललंय
10 Oct 2019 - 11:58 am | जॉनविक्क
13 Oct 2019 - 10:14 am | दुर्गविहारी
अत्यंत सहमत ! टायगर श्रॉफला बघीतले कि या माणसाने किती दिवस अन्घोळ केलेली नाही, असा प्रश्न मनात येतो. मी त्याला "स्टेशन छाप" म्हणतो. स्टेशनवर जे भिकारी असतात त्यातला एक वाटतो हा.
रणवीर सिंह हा फक्त हिजड्यांचे कपडे घालून वावरणे बाकी आहे. बाकी त्याने सर्व प्रकारचे कपडे घातले आहेत.
14 Oct 2019 - 11:07 am | लोनली प्लॅनेट
खि खि खि
आणि मुली पंखा असतात म्हणे यांच्या..हा म्हणजे कहरच झाला
14 Oct 2019 - 12:00 pm | हस्तर
मुली राहुल रॉय आणि नितीश भारद्वाज मागे पण पळत होत्या
10 Oct 2019 - 2:43 pm | असंका
ऑ...!!
(फाटेल एर्रोर ची आठवण झाली...)
बाकी लिहायची शैली आवडली.
धन्यवाद!!
10 Oct 2019 - 2:45 pm | हस्तर
फाटेल एर्रोर ?
10 Oct 2019 - 5:16 pm | राजेंद्र मेहेंदळे
इंगलिश स्पेलिंग जसेच्या तसे मराठीत आणले की असे होते. जसे की कॉपी पेस्ट- चोप्य पस्ते
10 Oct 2019 - 5:12 pm | फुटूवाला
:)
15 May 2020 - 4:45 pm | हस्तर
धन्यवाद
12 Oct 2019 - 9:31 pm | अनन्त्_यात्री
हस्तरी प्रमाणलेखन.
समसमा संयोग.
29 Oct 2019 - 4:24 pm | हस्तर
धन्यवाद
2 Oct 2020 - 1:49 am | हस्तर
एक वर्ष झाले
2 Oct 2020 - 2:15 am | अथांग आकाश
ड्राय-डे च्या काळ्या दिवशी .....नका ना गडे अशा भयानक आठवणी जागवू!
6 Oct 2020 - 11:46 am | विजुभाऊ
हस्तर परीक्षण वार बुधवारी वारला
हे शीर्षक वाचून काही समजेचना ते कशाबद्दल आहे ते. ना स्वल्पविराम ना पूर्ण विराम. अर्थच लागत नव्हता.
आणि शीर्षकात ते हस्तर हे काय आहे तेही कळत नव्हते.
धागा उघडल्यावर समजले की ते लेखकाचे नाव आहे म्हणून.
कवितेच्या अंती कविचे नाव लिहायची पद्धत होते ,,म्हणजे नामा म्हणे तुका म्हणे, दास रामाचा . हे माहीत होते.
पण लेखाच्या नावात लेखकाचे नाव घालायची ही पद्धत प्रथमच पहातोय.
तसे झाले असते तर जीए पिंगळावेळ, जी ए स्वामी, किंवा तेंडूलकर गिधाडे, तेंडुलकर सखाराम बाईंडर. अशी नावी वाचायला लागली असते.
हस्तर भाऊ / ताई लेखाच्या नावात स्वतःचे नाव घालायची नवी स्टाईल फारशी आवडली नाही.
दुसरे हे की लेख कशा बद्दल आहे ते कळाले पण परिक्षणापेक्षा त्यात टीकाच जास्त आहे. निदान चित्रपटाचा विषय तरी साम्गायचा.
6 Oct 2020 - 4:58 pm | हस्तर
कोन्तिहि नविन गोश्त लोकन अव्दत नस्ते
हेल्मेत सक्ति, गी येस ती ,चोरोना
आनि ह्य चित्रपटा वर टिका कराय्कच पाहिजे
7 Oct 2020 - 11:18 am | विजुभाऊ
_/\_० साष्टांग नमस्कार साहेब.
लेखाच्या नावात स्वतःचे नाव लिहीणे अणि हेल्मेट सक्ती हे एकाचा तागडीत तोलताय.
लेख वाचला ही चूक आमचीच आहे.तुम्ही काही का लिहाना.
त्याउपर सजेशन दिली ही दुसरी चूक.
21 Oct 2020 - 8:57 am | हस्तर
via GIPHY
5 Oct 2021 - 10:10 pm | गॉडजिला
हा कोण महात्मा फाईट करत आहे ?
4 Oct 2021 - 8:28 pm | हस्तर
धन्यवाद