असे काही चित्रपट असतात जे आपण कितीही वेळा न कंटाळता बघू शकतो चॅनेल surfing करताना हे picture असतील तर रिमोट खाली ठेवून तो चित्रपट बघितलाच जातो,PC वर डाउनलोड करून ठेवतो असे
ऑल टाइम फेवरीट सारखे
माझे
१. कल हो ना हो - ह्यात सगळेच जमून आले आहे मध्ये मध्ये मेलोड्रॅमटिक केले असले तरी पूर्ण मूवी वाहता ठेवलाय आनंद ह्या जुन्या चित्रपटावर आधारित असला तरी पूर्ण वेगळी हाताळणी केली असल्यामुळे आणि NRI लोकांचे जीवन दाखवल्यामुळे तेवढे कळून येत नाही नाही म्हणायला बऱ्याच चित्रपटांमध्ये NRI जीवन दाखवले आहे पण ह्या चित्रपटासारखे वास्तववादी तरीही उदास न करणारे कुठेच नाही दाखवले थोडा आचरट पणाकडे झुकलेला असला तरी
२००३ सालाप्रमाणे गल्ला जमवायला तेवढे दाखवणे चालवून घ्यायचे (करण जोहर चा चित्रपट आहे शेवटी)
२. मुंबई पुणे मुंबई भाग १ -फक्त दोन पात्रांवर अक्खा चित्रपट खेचला आहे अर्थात mukta बर्वे आणि स्वप्नील जोशी ची acting पण तेवढीच चांगलीये.दिग्दर्शन,अभिनय हे दोन्ही जमून आलेय
३. वेलकम - एकदम टाईमपास चित्रपट
४. अंदाज अपना अपना - वेगळ्या धाटणीचा कॉमेडी चित्रपट
५. छोटी सी बात - आजच्या काळात पण लागू होणार चित्रपट विशेषतः अशोककुमार चे training
६. परिचय - गुलज़ार यांचा अप्रतिम चित्रपट.साऊंड ऑफ music चे बेमालूम भारतीयीकरण . उत्तम कथा आणि सगळ्यांचे तोडिस तोड काम
७. the कराटे kid - लहान मुलाच्या जिद्दीचा आणि त्याच्या प्रवासाचा चित्रपट
८. OMG -ओह my गॉड -आवडतो असाच एकदम वेगळ्या विषयावरचा
९. pk -विरंगुळा
१०. विकी डोनर -हटके तरीही entertaining चित्रपट
असेच चित्रपट आणि त्यांची थोडी ओळख share करावी हि विनन्ती
ह्याच विषयावर आधी धागा पाहिल्याचे आठवतेय पण धागा सापडत नाहीये म्हणून नवीन
अवांतर-मिपावर चित्रपट गाणी हे विषय थोडे बॅकसीट वरच असतात असे वाटते माझ्या आधीच्या गाण्यांविषयीच्या धाग्यावर जास्त प्रतिसाद नाहीयेत ज्यांनी दिलेत त्यांचे आभार तरी पण हा धागा काढतीये
धन्यवाद
प्रतिक्रिया
3 May 2020 - 1:59 pm | मन्या ऽ
तुमची आणि माझी लिस्ट जवळपास सेम.
कल हो ना हो पेक्षा मी आनंद कितीही वेळा पाहु शकते.
१. बनवाबनवी
२. जिंदगी ना मिलेगी दोबारा
३. Mr. India
४. ये जवानी है दिवानी
५. दयालु(तेलुगु)
६. हॅपी जर्नी
७. एक मैं और एक तु
८. चेन्नई एक्सप्रेस
९. मार्ले &मी
१०. कोको
अजुन भरपुर आहेत. आठवेल तशी ऍड करेल.
रच्याकने नं 5 & 6 कुठे बघता येतील?
3 May 2020 - 3:02 pm | Prajakta२१
धन्यवाद
छोटी सी बात -you tube वर आणि सोनी liv app वर आहे
the karate kid हा चित्रपट UTV Action channel वर बऱ्याचदा लागतो मी पाहिलाय
3 May 2020 - 4:21 pm | मन्या ऽ
धन्यवाद!
कराटे किड पाहिलाय अनेकदा. परिचय कुठे बघता येईल?
3 May 2020 - 4:25 pm | Prajakta२१
https://www.youtube.com/watch?v=a5XseSu66yM
you ट्यूब
zee ५ app तसेच झी क्लासिक ह्या चॅनेल वर लागतो मधून मधून
3 May 2020 - 5:11 pm | कुमार१
ओह my गॉड
अमोल पालेकरांचे बहुतेक सगळे.
3 May 2020 - 7:08 pm | चौकटराजा
१९६५ साली मी "स्टील क्लॉ " नावाचा सिनेमा पहिला त्यानन्तर आजपावेतो सुमारे ३५०० चित्रपट पाहिलेत. ( अतिशयोक्ती नाही ) .सर्व प्रकारचे चित्रपट आवडत असते तर हा आकडा कुठे गेला असता कुणास ठाउक तरीही यादीचा प्रयत्न करतो.
१. गन्स ऑफ नॅव्हरॉन
२. एअर फोर्स वन
३. चार्ली अँड चॉकलेट फॅक्टरी
४. कास्ट अवे
५. वेन्सडे
६. महारथी
७. नॉक आउट
८ जगाच्या पाठीवर
९ प्रपंच
१०.सिंहासन
3 May 2020 - 7:47 pm | Nitin Palkar
चौरा यांनी म्हटल्याप्रमाणे यादी देणे कठीण आहे तरी....
१) शोले - हिंदी- ऑल टाइम फेवरीट किती वेळा बघितला असेल हे देखील सांगू शकणार नाही.
२) नारबाची वाडी -मराठी - मुख्य अभिनेता दिलीप प्रभावळकर. पण सर्वच लहान मोठ्या पत्रांचा देखील अत्यंत कसदार अभिनय.
३) ब्लॅक फ्रायडे - हिंदी- अनुराग कश्यप दिग्दर्शित, के. के. मेनन अभिनित.
४) पडोसन - हिंदी धमाल कॉमेडी. किशोर कुमारचा अतिशय सहज सुंदर अभिनय.
.....आणखीही काही आहेत आठवतील तसे लिहीन.
गाणी अनेक पुन्हा पुन्हा बघायला ऐकायला आवडतात, शम्मी कपूरची अनेक गाणी खूपवेळा बघतो, गुमनाम मधील 'इस दुनिया मी जिना है तो...' हा हेलन सुंदर नाच, धर्म चित्रपटातली प्राण आणि बिंदू यांच्या अभिनयाची जुगलबंदी असलेली 'इशारोन्को अगर समझो ताज को राज रहने दो' हि कव्वाली ही काही निवडक.
एक हटके धागा काढल्या बद्दल अभिनंदन .
3 May 2020 - 10:34 pm | Prajakta२१
आभारी आहे
3 May 2020 - 7:54 pm | जव्हेरगंज
Fight Club (1999 ) अगणित वेळा पाहिलाय!!
3 May 2020 - 9:10 pm | गोंधळी
Netflix ची chopsticks ही मुव्ही कालच फेवरीट च्या यादित एडवली.
जरुर पहावी. मस्त आहे.
3 May 2020 - 11:06 pm | स्मिताके
पडोसन
जाने भी दो यारों
अशोक सराफ यांचे चित्रपट
मराठी नाटकं -
खरं सांगायचं तर
डबल गेम
सॉरी राँग नंबर
यूट्युबवर हे सर्व सापडतील बहुतेक. आणखी आठवली की लिहीन.
4 May 2020 - 10:23 pm | Prajakta२१
दे दे प्यार दे
हा पण चांगला आहे थोडा बोल्ड आहे पण तरीपण हसता हसता आधुनिक जगण्यातील बऱ्याच गोष्टींवर बोट ठेवले आहे
प्रासंगिक विनोद चांगला रंगवलाय
5 May 2020 - 12:17 am | मराठी कथालेखक
बोल्डवरुन आठवलं...
कभी अलविदा ना कहना.. कथानक म्हणून बोल्ड आहे. मला याचे कथानक आवडते.
वैहाविक बंधनाकडे बघण्याचे हे हिंदी चित्रपटाचे एक टोक "वो सात दिन" तर दुसरे टोक "कभी अलविदा ना कहना".. वो सात दिन, हम दिल दे चुके सनम वगैरे चित्रपट बघण्याची सवय असलेल्या प्रेक्षकांकरिता "कभी अलविदा.. " नक्कीच एक सांस्कृतिक धक्का आहे. मला आवडलं ते कथानक..( वो सात दिन ची थीम माझ्या डोक्यात जाते) बाकी गाणी आणि शाहरुखही आवडतातच..
5 May 2020 - 7:18 pm | अन्कुश शिन्दे
१.इस रात कि सुबह नही
२. मिर्च मसाला
३. खामोश ( शबाना आझ्मि, अमोल पालेकर, विधु विनोद चोप्राचा पहिला चित्रपट
४. एक गाव बारा भानगडी
४. मुक्काम पोस्ट धॅबेवाडी
5 May 2020 - 10:29 pm | एस
'राजा हरिश्चंद्र' हा पहिला भारतीय मूकपट.
देविका राणी यांचा 'अछूत कन्या'.
'प्रभात' चे अनेक चित्रपट, उदा. 'अमृत मंथन', 'संत तुकाराम', 'माणूस', इ.
राजा परांजपे यांचे काही जुने चित्रपट, उदा. 'पेडगावचे शहाणे', 'लाखाची गोष्ट', 'पाठलाग' इ.
डॉ. काशिनाथ घाणेकरांचा 'मधुचंद्र';
'सामना', 'सिंहासन' इ. रामदास फुटाणे यांचे चित्रपट;
चंद्रकांत-सूर्यकांत मांढरे बंधू, अरुण सरनाईक, जयश्री गडकर, हंसा वाडकर इ. प्रभूतींचे चित्रपट, उदा. 'साधी माणसे', 'सवाल माझा ऐका', 'मुंबईचा जावई', 'एक गाव बारा भानगडी';
'पांडू हवालदार', 'सोंगाड्या', असे दादांचे चित्रपट;
रंजनाचे 'अरे संसार संसार', 'चानी' इ.;
'जैत रे जैत', 'निवडुंग' असे मंगेशकर भावंडांचे चित्रपट; त्यालाच जोडून स्मिता पाटीलचे 'उंबरठा' वगैरे;
अलीकडील काळातील स्मिता तळवलकरचे चित्रपट, उदा. 'चौकट राजा', 'कळत नकळत', 'सवत माझी लाडकी';
'हळद रुसली कुंकू हसले', 'भस्म', 'सरकारनामा', 'वजीर', 'बनगरवाडी', 'अशी ही बनवाबनवी', 'आयत्या घरात घरोबा', 'आत्मविश्वास', 'देवराई', डॉ. जब्बार पटेलांचा 'दोघी', 'घराबाहेर' इ.; त्यानंतर 'रेस्टॉरंट', 'श्वास', 'फँड्री', 'नाळ'...
अजून आठवतील तसे लिहितो.
30 May 2020 - 6:59 pm | Prajakta२१
अजून एक- पंगा
पंगा -कंगना राणावत ,रिचा चड्ढा
संसारात रमलेल्या (अपरिहार्य कारणामुळे खेळ सोडावा लागणाऱ्या ) आणि पुनरागमन करणाऱ्या कबड्डी खेळाडूवर आहे
एवढ्यातच पहिला आणि चांगला वाटला
11 Jun 2020 - 10:53 pm | Prajakta२१
सोनू के टिटू कि स्विटी
हा पण असाच एक हलकाफुलका पिक्चर
दिल्ली साईडच्या उच्चभ्रू जीवनाचे चित्रण केले आहे
11 Jun 2020 - 11:41 pm | शा वि कु
आवडते दुःखी/रडायला लावणारे सिनेमे
सुपर 30
उडान
आनंदी गोपाळ
अमेरिकन हिस्टरी X
तारे जमी पर
इतर-
स्लमडॉग मिलीनेअर मधला "I fly like paper get high like planes" मोंटाज मी कितीही वेळा पाहू शकतो.
ला ला लँड अगदी वेगळा सिनेमा. खूप आवडतो.
हाणामारी मध्ये जॉन विक, किल बिल, Django unchained, मॅट्रिक्स.
हॉरर- तुंबाड खूप आवडला. भुलभलय्या, पछाडलेला. हेरेडिटरी नावाच्या सिनेमाने थरकाप तर उडालाच पण बरेच दिवस डोक्यातून विचारही गेले नाहीत काही प्रसंगांचे.
विनोदी/हलकेफुलके- फ्रेंड्स विथ बेनेफिट्स, जिम कॅरीचे बरेच सिनेमे, शॉन ऑफ द डेड, मुरांबा, वायझेड, जाने तू या जाने ना, पिकू, बधाई हो
युद्धपट- 1917,डनकर्क, सेविंग प्रायव्हेट रायन
13 Jun 2020 - 11:30 am | बिपीन सुरेश सांगळे
छान धागा
मुलांचं चांगले सिनेमे सुचवा
13 Jun 2020 - 11:43 am | गणेशा
मला आवडलेले सिनेमे
१. भाग मिल्खा भाग ( कायम बघतो टीव्ही वरती लागल्यावर.. जेंव्हा लागेल तेंव्हा तेंव्हा )
२. जिंदगी ना मिले दोबारा .. ( कॅट लव यु )
३. चौकट राजा ... ( गणा गणा मी असा कसा .. असा कसा वेगळा .. ., एक झोका चुके काळजाचा ठोका अहाहा)
४. कट्यार काळाजात घुसली..
५. प्रकाशवाटा..
६. जाउ द्या ना बाळासाहेब ( लय आवडला हा सिनेमा.. थेअटर मध्ये तर मज्जा आलेली... मी शब्द शोधतो :-)) )
७. फॉरेस्ट गंप (इंग्लिश-हिंदी)
८. अंधाधुन
९. हेराफेरी..