कोरोना चे परिणाम - नोकरीवर गदा - व्यवसायाचा मुहूर्त

उमेश पाटील's picture
उमेश पाटील in जनातलं, मनातलं
28 Apr 2020 - 2:04 pm

कोरोना चे परिणाम - नोकरीवर गदा - व्यवसायाचा मुहूर्त

असे होईल असे अपेक्षित होते पण इतक्या लवकर होईल हे अपेक्षित नव्हते,

३० मार्च ला आमच्या कंपनीने काम नाही या कारणास्तव माझासहित ८ कर्मचाऱ्यांना जून पर्यंतचा पूर्ण पगार देऊन राजीनामा द्यायला लावला आणि वर सांगितले कि काम पूर्वतत झाले कि परत घेऊ असं, धक्का बसला पण काय करणार आणि मी ज्या प्रॉडक्ट वर काम करतो ते rare स्किल या प्रकारात असल्याने (Infor ERP - System Admin पूर्ण देशात फक्त १७ जण) नोकर्या पण कमी अगदी ६-८ कंपनी मध्ये संधी असते. मग आहेत त्या सर्वांना संपर्क साधून नोकरीचा शोध सुरु केला पण सर्वांनी नोकर भरती बंद केली असल्याने त्याची शक्यता नव्हतीच. तरी पण प्रयत्न चालू आहेत आणि एकदोघांकडून सकारात्मक रिप्लाय पण आला आहे. तरी आता जोपर्यंत काही कन्फर्म होत नाहो तोपर्यंत काय. तर खाली लिहिल्या प्रमाणे काम चालू केले आहे.

घरची १२ एकर शेती आहे ती करायला घेतली आहे - सध्या १ विहीर असून चांगले पाणी आहे आहे आणि अजून एक विहिरीचे लवकरच काम चालू करतो आहे , जमीन चुलतभावालाच निम्मी हिश्श्याने करायला दिली आहे (आधी २० हजार वर्षाला अशी दिली होती आणि नोकरीमुळे वेळ देता येत नाही असे कारण सांगायचो - तरी घरूनच काम करतो - पुण्यात राहून) आधी जिच्याकडे कधी डुंकून पण नाही पहिले आता कोपरा कोपरा फिरवते आहे. पण हि वेळ आली नसती तर मला अजून २ वर्षात डॉक्टर ने मधुमेहाचे औषध दिले असते आणि डायट सांगितले असते पण आता तशी वेळ येणार नाही.

थोडा वेळ काढून - टेलर भावाकडून शिवणकाम शिकतो आहे आणि नोकरी परत लागल्यावर स्वतःचा छोटा गारमेंट्स प्रोडूकशन युनिट चालू करण्याचा प्लॅन आहे - त्याची तयारी करतो आहे, अगदी सर्व शिकून घेतल्यास अडचण येणार नाही अशी अपेक्षा. अजून एक कापड व्यावसायिक आहेत पिंपरीचे ते पण मार्गदर्शन करता आहेत.

त्याच पिंपरीतील व्यावसायिक बंधुंचे प्लेसमेंट आहे (मॅनुफॅक्टरिंग मध्ये) आणि त्यांना IT मधला माणूस पाहिजे होता तर मला तिथे पण संधी मिळाली आणि त्यांच्या टीम ला योग्य प्रोफाइल शोधण्यासाठी मदत करतो आहे.

एकंदरीत जर नोकरी गेली नसती तर मी या गोष्टींचा कधी विचार नसता किंवा काहीच केलं नसता केला पण कदाचित जे होते ते चांगल्यासाठी या अर्थाने १ जाऊन २-३ कामे चालू झालीत.

परिस्थिती पूर्वतत झाल्यावर किंवा त्या आधीच नोकरीपण मिळेल पण मी भविष्यात कधीच त्यावर १०० टक्के विसंबून राहणार नाही आहे आणि नोकरीबरोबर माझी जमीन आणि व्यवसाय दोन्ही सांभाळणार आहे.

मानसिक आणि कौटुंबिक त्रास पण झाला आणि होतोय थोडा पण तो थोडे दिवस असतोच पण यापुढचे आयुष्य नक्कीच चांगले असेल.

जीवनमानप्रकटन

प्रतिक्रिया

अगदी सुरुवातीलाच तुमच्यावर कठीण प्रसंग गुदरलाय, पण ह्यातून हळूहळू मार्ग काढत आहात हे उत्तमच. सकारात्मक राहा. संधी मिळतच जातील.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Apr 2020 - 4:33 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कोणाचंही नौकरीचं असं ऐकलं की एक वाचकही म्हणून त्रास होतो, वाईट वाटतं. तरीही आपण आपल्यावर आलेल्या प्रसंगातून काहीतरी नवीन मार्ग शोधलाय आणि तो तुम्हालाचा त्याचा आनंद देईल, यशस्वी करेल. चांगले प्रयत्न करीत आहात. वल्ली प्रतिसादात म्हणतात तसे संधी मिळत जाईल, मिळालेल्या संधीचं सोनं होईल. आयुष्य पुन्हा नव्या जोमाने अधिक आनंदी होईल. लढत राहा.

शुभेच्छा आहेतच.

-दिलीप बिरुटे

चांदणे संदीप's picture

28 Apr 2020 - 4:33 pm | चांदणे संदीप

तुम्हाला मनापासून शुभेच्छा!

सं - दी - प

कुमार१'s picture

28 Apr 2020 - 6:02 pm | कुमार१

मार्ग शोधल्याबद्दल...
तुम्हाला मनापासून शुभेच्छा!

खिलजि's picture

28 Apr 2020 - 6:08 pm | खिलजि

हो नक्कीच चांगले असेल उर्वरित आयुष्य,, तथास्थु .. वाईट वाटलं आणि तुमचा लढा बघून हुरूपही आलाय.. हे असं काही सकारात्मक ऐकल कि रक्त पेटून उठतं.. काय करू आणि काय नको असं होऊ लागतं ... तुम्हाला पुढील वाटचालीला शुभेच्छा ..

शेवटी मार्ग शोधायला लागतातच आणि त्यात तुम्ही यशस्वी होत आहात. तेव्हा पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा...

कठीण परिस्थितीला आपण धैर्याने सामोरे गेलात याचे कौतुक करायला हवे !
आपल्या चिंता कमी व्हाव्या आणि पुढील वाटचालीस अधिकचे बळ मिळावे म्हणुन परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Mere Dil Ka Tumse Hai Kehna ( Cover) | Armaan | Shankar Ehsaan Loy & Chitra

प्रमोद देर्देकर's picture

29 Apr 2020 - 9:45 pm | प्रमोद देर्देकर

वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा आणि पुढे तुम्ही कसं कसं आणि काय काय केले ते पण येऊ द्या आ म्ही वाट बघतो आहोत

उमेश पाटील's picture

30 Apr 2020 - 9:43 pm | उमेश पाटील

नमस्कार, पुढची वाटचाल नक्की कळवेन

उमेश पाटील's picture

30 Apr 2020 - 9:45 pm | उमेश पाटील

नमस्कार, पुढची वाटचाल नक्की कळवेन

Prajakta२१'s picture

29 Apr 2020 - 9:50 pm | Prajakta२१

शुभेच्छा

तुषार काळभोर's picture

29 Apr 2020 - 10:09 pm | तुषार काळभोर

ओढवलेल्या परिस्थिती च तुम्ही संधीत रूपांतर करताय हे खूप छान.

कानडाऊ योगेशु's picture

29 Apr 2020 - 10:30 pm | कानडाऊ योगेशु

संकटातुनही संधी शोधण्याच्या व हिंमत न हारण्याच्या तुमच्या विजीगीषु वृत्तीला सलाम.
आणि बिलिव मी... ह्या करोना प्रॉब्लेम मधुन बाहेर पडल्यानंतरचे जग बरेच वेगळे असेल. बरेच पॅरॅडिम शिफ्ट होतील.

उमेश पाटील's picture

29 Apr 2020 - 11:07 pm | उमेश पाटील

नमस्कार मित्रांनो,

तुमच्या सर्वांचे सकारात्मक प्रतिसाद आणि शुभेच्छांबद्दल खूप खूप धन्यवाद आणि मनापासून आभारी आहे

/उमेश

नावातकायआहे's picture

30 Apr 2020 - 9:13 am | नावातकायआहे

शुभेच्छा!

Jayant Naik's picture

30 Apr 2020 - 10:14 am | Jayant Naik

आपल्या कडे असे सांगितलेच आहे उत्तम शेती .... ती आणि बाकी सर्व करत आहात हे अतिशय उत्तम आहे. .

नोकरी सरकारी असू नाही तर खासगी तिच्या वर पूर्ण विसंबून राहणे अतिशय धोकादायक असते.
माझ्या वडिलांची सरकारी नोकरी होती सर्व मस्त मजेत चाललं होते .
सरकारी नोकरी म्हणजे जन्म भर अशी घ्याती असल्या मुळे bindast.
प्रामाणिक वागण्या मुळे अनेक जन दुखावले गेले आणि कुंबाड रचून दुखावलेल्या लोकांनी बदला घेतला आणि त्यांची अचानक नोकरी गेली.
मी तेव्हा ६ वी ल असेन .
त्या प्रसंगाची जबरदस्त झळ पोहचली आणि पूर्ण आर्थिक स्थिती उलटी झाली.
संघर्ष करणे लहान वयातच माहीत पडले,दुनिया माहीत पडली आणि अनुभव पण मिळाला.
त्या मुळे आज पण नोकरी ही आज पुरतीच आहे उद्या नसेल सुद्धा असा विचार मनात ठेवूनच मानसिक तयारी आहे.
प्लॅन कार्यान्वित आहे.
उद्या नोकरी गेली तरी मोठा शॉक बसणार नाही अशी तयारी आहे.

स्वराजित's picture

12 May 2020 - 2:23 pm | स्वराजित

शुभेच्छा

जेडी's picture

9 Jun 2020 - 7:04 am | जेडी

शुभेच्छा!