लॉकडाऊन: सहावा दिवस

मोदक's picture
मोदक in काथ्याकूट
30 Mar 2020 - 10:59 am
गाभा: 

लॉकडाऊनचा सहावा दिवस.. (मुद्दाम करोनाबद्दल कांहीही लिहिणार नाहीये - सगळीकडून माहितीचा ओघ सुरू आहेच.)

.

वर्क फ्रॉम होम हे नित्याचेच असल्याने सध्या घरी असल्याने निवांत आहे.. रिकामा वेळ आहे.. वेळ जातच नाहीये असे प्रश्न सुदैवाने पडलेले नाहीयेत आणि हे प्रश्न पडू नयेत याची काळजी ऑफिसवाले घेत आहेतच. तरीही प्रवासाचा वेळ वाचत असल्याने जो रिकामा वेळ मिळतो आहे त्याचा सदुपयोग करूया आणि नवीन कांहीतरी शिकूया म्हणून किचनमध्ये लुडबूड करून नेहमी न बनवल्या जाणार्‍या पाककृतींवर हात साफ करायला सुरूवात केली आहे.

लॉकडाऊन मध्ये शिकलेल्या पाककृती.

भाजीचे लोणचे..

सर्वात महत्वाचे - जर ४ लोकांसाठी लोणचे बनवणार असलात तर फोडणी सोडून इतर सर्व साहित्य ५ लोकंच्या प्रमाणात घ्या.

साहित्य -
फ्लॉवर आणि गाजर - लहान चौकोनी आकारात कापून
बेडेकर / केप्रं कैरी लोणचे मसाला
दोन - तीन लिंबू
तिखट
हिंग, जिरे, हळद आणि मोहरीची फोडणी - गार करून
..और नमक स्वादानुसार.

.

१) फ्लॉवर आणि गाजर लहान लहान कापून घ्या - हे कंटाळावाणे काम असू शकते.. पण स्टेटस अपडेटवाले ऑफिस कॉल्स आणि मिटींग्ज वगैरे आणखी कंटाळवाण्या गोष्टी सुरू असताना हे काम करा. (रिमेंबर.. लोहा लोहे को काटता है..!)

२) त्यात मटार मिसळा - व्यवस्थीत मिसळून घ्या.

३) त्यात प्रमाणानुसार कैरी लोणचे मसाला, मीठ आणि तिखट घाला, लिंबू पिळा व पुन्हा व्यवस्थीत मिसळून घ्या.

४) थोडा वेळ हे मिश्रण तसेच ठेवा म्हणजे पाणी सुटेल आणि लिंबाच्या रसामुळे सगळे मिश्रण छान रसरशीत होईल.

(असे रॉ फ्लेवरचे लोणचे चव बघण्यातच थोडे संपेल - काळजी करू नका, त्यासाठी सुरूवातीला प्रमाण जास्ती दिले आहे.)

सर्वात शेवटी गार केलेली फोडणी मिसळा व फ्रिजमध्ये रात्रभर ठेऊन द्या. सकाळी पोहे, चिवडा, शिरा, उपीट असे जे असतील त्या पदार्थांसोबत लोणच्याचा डबा रिकामा होण्यास सुरूवात होईल.

.

(शेफ केडीने मी काढलेल्या फोटोंवर अप्रतीम संस्करण केले आहे)

*********************************

१) तुम्ही या लॉकडाऊन मध्ये नवीन काय शिकणार आहात..? पाककृती.. एखादे नवीन अ‍ॅप्लिकेशन.. काहीही असेल ते इथे द्या. बाकीच्यांना कळूद्या म्हणजे स्वतःवरती एक बंधन येते.

२) सिनीयर सिटीझन आणि लहान मुले यांना शक्यतो घरातच थांबूद्या. आपल्या आजूबाजूला कोणी सिनीयर सिटीझन असतील तर त्यांना काय हवे नको ते आवर्जून विचारा. आपल्या घराजवळ कोणी मित्रमंडळ असेल तर त्यांनाही न विसरता फोन करा.. आपण २ लिटर दूध घेत असताना त्याच्यासाठी एखादा लिटर दूध आपल्या पिशवीला नक्कीच जड होणार नाही.

३) सिनीयर सिटीझननी मार्केट / बँकेत बाहेर कुठेही फालतू कामाकरता जाणे टाळा.. वेळ आहे म्हणून पासबुक प्रिंट करणार्‍यासाठी बँकेत फिरायला गेलेल्या आणि तिथे वचावचा भांडणार्‍या वयस्कर काकांचा व्हिडीओ बघितला असेलच. ३ दिवसांपूर्वी मी रिलायन्सच्या फ्रेशच्या लाईन मध्ये उभा होतो तेंव्हा एक असेच आजोबा नंबर लवकर येत नाही म्हणून सिक्युरिटी गार्डसोबत वाद घालत होते - या गोष्टीची खरंच आवश्यकता आहे का याचा विचार करा.

४) करोना या एकाच विषयावर सतत चर्चा करणार्‍या ग्रुपमध्ये स्पष्ट सांगा की "आता विषय बदला" सगळीकडून तीच ती माहिती आपल्याकडे येत असल्याने आधीच आलेल्या तणावामध्ये अधिक भर नको.

स्वतःची व कुटुंबियांची काळजी घ्या.. सुरक्षित रहा.. आणि छान वेळ जाईल असे कांहीतरी नवीन शोधून त्यात मन रमवा..!!

धन्यवाद - मोदक.

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

30 Mar 2020 - 12:03 pm | ज्ञानोबाचे पैजार

माझा गणेशा झाला आहे.
पैजारबुवा,

छान झाले असावे भाजांचे लोणचे. ( गच्चीतल्याच असणार)
पण
पण
पण
फोटो दिसत नाहीत.

ज्ञानोबाचे पैजार's picture

30 Mar 2020 - 12:06 pm | ज्ञानोबाचे पैजार

काल चेस.कॉम वर चेस खेळताना माझ्या प्रतिस्पर्ध्याचा उरलेला वेळ अचानक वाढला आणि मला वेळ संपल्याने हार पत्करावी लागली.
असे का झाले असेल?
पैजारबुवा,

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Mar 2020 - 12:18 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वल्लीसेठ, तेच सांगू शकतील. मी सध्या सारखं हरतोय म्हणून बंद करून टाकलं खेळनं. एकतर पराभव सहन होत नाही. कशाकशाचा तान घ्यायचा आपण. ;)

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

30 Mar 2020 - 12:33 pm | प्रचेतस

खेळत राहा भो.

प्रचेतस's picture

30 Mar 2020 - 12:32 pm | प्रचेतस

असं तर व्हायला नको. झालंच तर तुमचा किंवा प्रतिस्पर्धी खेळाडूच्या इंटरनेट लॅग मुळे झालं असावं. मोबाईलवर मधूनच फोन आला तरी हे होऊ शकतं.

कंजूस's picture

30 Mar 2020 - 12:07 pm | कंजूस

**भाज्यांचे**

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Mar 2020 - 12:14 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

फोटो दिसत नै. आणि आता 'विषय बदला' या मुद्द्याशी सहमत.
बाकी सायकलवाले काय करीत असतील असा प्रश्न पडतोच. आमच्याकडे एक सायकलवाले आमकं किलोमीटर गेलो आणि तमके किलोमीटर गेलो हे सांगणे बंद झाले आहे. मी नाव घेणार नाही.

बरं तुमच्या सायकली भारी असतात. नाय तर मधल्या stand वर सायकल उभी करून त्याला ग्रेंडर बसवून चाक़ू सु-या यांना धार लावून तरी दिल्या असत्या तुम्हा लोकांनी. ;) (ह.घ्या)

बाकी, रूटीन सुरु. ऑनलाइन पेपरं वाचून झाली. बाकी, नेटावर फूल पडिक आहे.

-दिलीप बिरुटे

मोदक's picture

30 Mar 2020 - 12:19 pm | मोदक

आता बघा हो डीबी... लिंका बदलल्या आहेत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Mar 2020 - 12:23 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आभार फोटो दिसत आहेत. पाककृती छान.

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

30 Mar 2020 - 12:28 pm | प्रचेतस

व्वा...!
लोणचं जबरदस्त झाले आहे मोदका.
आज थोडं ऑफिसचं काम आहे तेच करतोय.

मोदक's picture

30 Mar 2020 - 12:41 pm | मोदक

धन्यवाद वल्ली.!!

चौकटराजा's picture

30 Mar 2020 - 12:59 pm | चौकटराजा

ओ भाउ . तुम्ही हडवैरी विजनेर हात नव्ह मंग , घरून कसच काम करून र्हायला राव ... ! आसंल म्हना ... कायबी चालतया आजकाल !! )))))

सतिश गावडे's picture

30 Mar 2020 - 1:04 pm | सतिश गावडे

प्रत्यक्षात "लॉर्ड ऑफ द रिंग्ज" पाहत असतील ब्ल्यू रे डिस्कवर. =))

प्रचेतस's picture

30 Mar 2020 - 1:57 pm | प्रचेतस

=))

थोडेफार कॉनकॉल असतात कधीतरी, ते झूम किंवा वेबेक्सवर करावे लागतात.

लॉर्ड ऑफ द रिंग्स बघायचे आहे ब्लू रे वर अजून, नुसते ट्रायल लावून पाहिलेत :)

दिसले. कलर भारी आलाय त्याचे श्रेय बेडेकर / केप्रं कैरी लोणचे मसाला'ला. भाजी चिरणे एकसारखी बारीक त्याचे तुम्हाला.

चौकटराजा's picture

30 Mar 2020 - 12:56 pm | चौकटराजा

साडेसहाला उठलो . दाराला लावलेली बी बस्केट ची पिशवी रिकामी, अजून परवानगी मिळालेली नसावी. खाली बेकरीत गेलो. चौकोनात उभा राहून दूध घेतले.
पन्चवीस मिनिटे चाललो. आज एन दत्ता यानी चाल दिलेली गाणी ऐकली.चालताना . मग की बोर्डावर , अखेरचे येतील माझ्या.... मैने चान्द और सितारोन्की तमन्ना की थी.... व अजून त्या झुड्पान्च्या मागे सदाफुली दोघाना हसते ही वाजवली. आजचा नाश्टा रव्याचा चीक व भाज्यान्चे सूप . मग युरोप सहलीचा ११ वा दिवस टंकायला घेतला. बेडरूमचा केर काढून पी सी , टेबल, साईड टेबल. खालची लाकडी जमीन सुगन्धी फिनेल ने पुसली. काही वेळ ब्लॉकू डोकू हा गेम खेळत वेळ घालविला.

विजुभाऊ's picture

30 Mar 2020 - 3:41 pm | विजुभाऊ

रव्याचा चीक?????
रेशीपी देता का दादा

चौकटराजा's picture

30 Mar 2020 - 6:27 pm | चौकटराजा

अगोदरच्या दोन दिवस बारीक रवा पाण्यात भिजत टाकणे.दरम्यान रोज पाणी बदल करावा . तिसरे दिवशी सकाळ पर्यंत ते मिश्रण आंबते. बरेचसे पाणी काढून टाकावे , त्यात मीठ , व हिंग घालावा. मग कढई ठेवून तेल टाकावे . व ते मिश्रण हळू हळू ओतून ढवळावे . साता आठ मिनिटात चीक तयार. बशी किंवा बाउल मध्ये सर्व्ह करावा . आवड असल्यास कच्चे तेल टाकावे.

चिकवड्याचा कच्चा माल म्हणजे रव्याचा चीक.

प्रशांत's picture

30 Mar 2020 - 12:59 pm | प्रशांत

लोणचं बनवता येईल ,फक्त भाज्या मिळायला पाहिजे.

उत्तम विषय काढलास मोदका.

मर्यादित जिन्नस (घटकपदार्थ) वापरून तेच तेच पदार्थ जेवणात आणि नाश्त्याला रिपीट होण्याची शक्यता येत्या काही काळात होईल.

त्यासाठी कणीक, बेसन, डाळी, पोहे, रवा , ब्रेड, बटाटा , कांदा असे नेहमीचे घटक वापरून पण जरा वेगळे पदार्थ बनवून व्हरायटी / चव बदल कसा आणता येईल त्यावर चर्चा करावी. उद्या नवीन धागा आला तर तिथेही चालू ठेवावी.

तेच तेच घटक वापरून वरण / आमटी भात, पिठलं, उसळ पोहे, उपमा , मॅगी हेच रिपीट होत राहू नये म्हणून उदा. पोहेच, पण पद्धत जरा वेगळी किंवा बेसन धिरडे पण अंडे फेटून घालून वगैरे, बटाट्याची नवीन डिश अशा काही युक्त्या.

चौकटराजा's picture

30 Mar 2020 - 1:56 pm | चौकटराजा

हरबरा डाळ व पीठ
१ वाटली डाळ
२, बेसन लाडू
३. डाळवडे
४. कान्दा गोल भजी
५, कान्दा खेकडा भजी
६ कान्दा चकती भजी
७, पालक भजी
८ चाकवत पानान्ची भजी ( सीझनल )
९ कोबी भजी
१० केळी भजी
११ मिरची भजी
१२ म्हैसूर
१३,सुरळीच्या वड्या
तान्दूळ पदार्थ
१ नैवेग्र्या
२. ताक घालून उकड
३. तान्दळाच्या पापड्या
४. तान्दूळ शेवई उपमा
५ इडी अप्पम
६ तान्दूलाचे घावन
७ फोडणीचा भात
८ उकडीचे मोदक ( हे नाष्त्याला अतीच होते आहे )
९ प्लेन डोसा
१० इडली
बटाटा पदार्थ
१ बटटयाचा ओला कीस
२. बटाटा वडा
३. फ्रेच फ्राईज
४ बटाटा भजी
५ पोटॅतो टोस्ट
६ आलू परोठा
७ आलू चाट
पोहे
१. दही पोहे
२ दूध पोहे
३ दडपे पोहे
४ कांदा पोहे
५ वांगी पोहे
५ कोबी पोहे
६ बटाटे पोहे
७ मटार पोहे
८ गुळ नारळ पोहे
९ पोह्याची लाटी
गहू
१ दलिया
२ रव्याचा चीक
३ कणकीचे घावन
४ पुर्या
५ सांजा
६ गोड शिरा
७ रवह्यांचे लाडू
८ रवा घावन
९ रवा आपे
साबुदाणा
१ खिचडी
२ वडे
३ पापदड्या
४ थालीपीठ
७ साबुदाणा चकली
८ साबुदाणा चिवडा

सस्नेह's picture

30 Mar 2020 - 8:29 pm | सस्नेह

मस्तच !
यातले जमतील तितके ट्राय करणार.

कोरोनाची सुट्टी करणी लावायची असं ठरवलं आहे. घरून काम करत आहेच. काम संपल्यानंतर ज्योतिष शास्त्राचा अभ्यास नेमाने सुरू केला आहे. गेले दोन वर्षांपासून शिकत आहे. आधी थोडे पारंपरिक म्हणजे वैदिक पद्धतीचे शिक्षण घेतले. मग आता कृष्णमूर्ती पद्धती चा आभ्यास सुरू आहे.
जोडीला अता रामायण आणि महाभारत बघत आहे.

मदनबाण's picture

30 Mar 2020 - 3:16 pm | मदनबाण

माझे आवडते लोणचे !

बादवे... अनेक वेब सिरीज पाहण्याचा चंग बांधल्याने जसा वेळ मिळेल तसे मन वेब सिरीज मध्ये रमवतो आहे.
सध्या Breathe पहायला घेतली आहे. आर माधवन असल्या कारणाने पहायचे ठरवले.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- अच्युतानन्तगोविन्द नामोच्चारण भेषजात्। नश्यन्ति सकला रोगा: सत्यं सत्यं वदाम्यहम्।।

सस्नेह's picture

30 Mar 2020 - 3:41 pm | सस्नेह

मोदका, एवढ्या फ्रेश फ्रेश भाज्या कुठून मिळवल्यास ?
पाकृ (दिसायला तरी ) भारी आहे.
कधी खाऊ घालशील तेव्हा चवीचं सांगेन हो ;)

पुण्याई कामास येते हो.. ;)

तुम्ही काय म्हणताय..? लोकांच्या लायटी कट करताय का..? का त्यालापण सुट्टी..

लाॅक डाउन असून पुर्ण वेळ कार्यालयात. त्यामुळे घरी राहून वेगवेगळे उद्योग करता येत नाहीत

पावनं.. तुम्ही पोलीस, फायर ब्रिगेड की डायरेक डॉक्टर..?

mahayog's picture

30 Mar 2020 - 8:24 pm | mahayog

महसूल

Nitin Palkar's picture

30 Mar 2020 - 7:32 pm | Nitin Palkar

लोणचं हा शब्द नुसता उच्चारला तरी तोंडाला पाणी सुटतं. मोदाक्राव, तुम्ही तर सविस्तर, सचित्र पाकृ दिलीय. करून बघणे आलं.... पक्षी कलत्रास सांगणे आलं... फोटो, पाकृ दोन्ही सुंदर हे वेगळे सांगणे न लगे.

हे करोनाचे संकट संपूदे... मोठा डबा आणून पोहोचवतो तुमच्या घरी.

एखाद्या रविवारी सकाळी शक्यतो १० वाजता येतो.. म्हणजे सोडे घातलेले पोहे आणि.. आणि.. बाकीचे व्यनीत बोलू. :D

जुइ's picture

30 Mar 2020 - 8:26 pm | जुइ

लोणचे झक्कास दिसत आहे!

मुद्दाम करोनाबद्दल कांहीही लिहिणार नाहीये - सगळीकडून माहितीचा ओघ सुरू आहेच

हे best.
लोणचे करतो मी अन सांगतो.

गाजर नाहीये पण..