✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

लॉकडाऊन: सहावा दिवस

म
मोदक यांनी
Mon, 03/30/2020 - 10:59  ·  लेख
लेख
लॉकडाऊनचा सहावा दिवस.. (मुद्दाम करोनाबद्दल कांहीही लिहिणार नाहीये - सगळीकडून माहितीचा ओघ सुरू आहेच.) . वर्क फ्रॉम होम हे नित्याचेच असल्याने सध्या घरी असल्याने निवांत आहे.. रिकामा वेळ आहे.. वेळ जातच नाहीये असे प्रश्न सुदैवाने पडलेले नाहीयेत आणि हे प्रश्न पडू नयेत याची काळजी ऑफिसवाले घेत आहेतच. तरीही प्रवासाचा वेळ वाचत असल्याने जो रिकामा वेळ मिळतो आहे त्याचा सदुपयोग करूया आणि नवीन कांहीतरी शिकूया म्हणून किचनमध्ये लुडबूड करून नेहमी न बनवल्या जाणार्‍या पाककृतींवर हात साफ करायला सुरूवात केली आहे. लॉकडाऊन मध्ये शिकलेल्या पाककृती. भाजीचे लोणचे.. सर्वात महत्वाचे - जर ४ लोकांसाठी लोणचे बनवणार असलात तर फोडणी सोडून इतर सर्व साहित्य ५ लोकंच्या प्रमाणात घ्या. साहित्य - फ्लॉवर आणि गाजर - लहान चौकोनी आकारात कापून बेडेकर / केप्रं कैरी लोणचे मसाला दोन - तीन लिंबू तिखट हिंग, जिरे, हळद आणि मोहरीची फोडणी - गार करून ..और नमक स्वादानुसार. . १) फ्लॉवर आणि गाजर लहान लहान कापून घ्या - हे कंटाळावाणे काम असू शकते.. पण स्टेटस अपडेटवाले ऑफिस कॉल्स आणि मिटींग्ज वगैरे आणखी कंटाळवाण्या गोष्टी सुरू असताना हे काम करा. (रिमेंबर.. लोहा लोहे को काटता है..!) २) त्यात मटार मिसळा - व्यवस्थीत मिसळून घ्या. ३) त्यात प्रमाणानुसार कैरी लोणचे मसाला, मीठ आणि तिखट घाला, लिंबू पिळा व पुन्हा व्यवस्थीत मिसळून घ्या. ४) थोडा वेळ हे मिश्रण तसेच ठेवा म्हणजे पाणी सुटेल आणि लिंबाच्या रसामुळे सगळे मिश्रण छान रसरशीत होईल. (असे रॉ फ्लेवरचे लोणचे चव बघण्यातच थोडे संपेल - काळजी करू नका, त्यासाठी सुरूवातीला प्रमाण जास्ती दिले आहे.) सर्वात शेवटी गार केलेली फोडणी मिसळा व फ्रिजमध्ये रात्रभर ठेऊन द्या. सकाळी पोहे, चिवडा, शिरा, उपीट असे जे असतील त्या पदार्थांसोबत लोणच्याचा डबा रिकामा होण्यास सुरूवात होईल. . (शेफ केडीने मी काढलेल्या फोटोंवर अप्रतीम संस्करण केले आहे) ********************************* १) तुम्ही या लॉकडाऊन मध्ये नवीन काय शिकणार आहात..? पाककृती.. एखादे नवीन अ‍ॅप्लिकेशन.. काहीही असेल ते इथे द्या. बाकीच्यांना कळूद्या म्हणजे स्वतःवरती एक बंधन येते. २) सिनीयर सिटीझन आणि लहान मुले यांना शक्यतो घरातच थांबूद्या. आपल्या आजूबाजूला कोणी सिनीयर सिटीझन असतील तर त्यांना काय हवे नको ते आवर्जून विचारा. आपल्या घराजवळ कोणी मित्रमंडळ असेल तर त्यांनाही न विसरता फोन करा.. आपण २ लिटर दूध घेत असताना त्याच्यासाठी एखादा लिटर दूध आपल्या पिशवीला नक्कीच जड होणार नाही. ३) सिनीयर सिटीझननी मार्केट / बँकेत बाहेर कुठेही फालतू कामाकरता जाणे टाळा.. वेळ आहे म्हणून पासबुक प्रिंट करणार्‍यासाठी बँकेत फिरायला गेलेल्या आणि तिथे वचावचा भांडणार्‍या वयस्कर काकांचा व्हिडीओ बघितला असेलच. ३ दिवसांपूर्वी मी रिलायन्सच्या फ्रेशच्या लाईन मध्ये उभा होतो तेंव्हा एक असेच आजोबा नंबर लवकर येत नाही म्हणून सिक्युरिटी गार्डसोबत वाद घालत होते - या गोष्टीची खरंच आवश्यकता आहे का याचा विचार करा. ४) करोना या एकाच विषयावर सतत चर्चा करणार्‍या ग्रुपमध्ये स्पष्ट सांगा की "आता विषय बदला" सगळीकडून तीच ती माहिती आपल्याकडे येत असल्याने आधीच आलेल्या तणावामध्ये अधिक भर नको. स्वतःची व कुटुंबियांची काळजी घ्या.. सुरक्षित रहा.. आणि छान वेळ जाईल असे कांहीतरी नवीन शोधून त्यात मन रमवा..!! धन्यवाद - मोदक.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
17705 वाचन

💬 प्रतिसाद (35)

प्रतिक्रिया

मस्त पाकृ...

ज्ञानोबाचे पैजार
Mon, 03/30/2020 - 12:03 नवीन
माझा गणेशा झाला आहे. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

छान झाले असावे भाजांचे लोणचे.

कंजूस
Mon, 03/30/2020 - 12:05 नवीन
छान झाले असावे भाजांचे लोणचे. ( गच्चीतल्याच असणार) पण पण पण फोटो दिसत नाहीत.
  • Log in or register to post comments

अजून एक.. वल्ली किंवा प्राडॉ सांगु शकतात...

ज्ञानोबाचे पैजार
Mon, 03/30/2020 - 12:06 नवीन
काल चेस.कॉम वर चेस खेळताना माझ्या प्रतिस्पर्ध्याचा उरलेला वेळ अचानक वाढला आणि मला वेळ संपल्याने हार पत्करावी लागली. असे का झाले असेल? पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

या विषयातले तज्ञ

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 03/30/2020 - 12:18 नवीन
वल्लीसेठ, तेच सांगू शकतील. मी सध्या सारखं हरतोय म्हणून बंद करून टाकलं खेळनं. एकतर पराभव सहन होत नाही. कशाकशाचा तान घ्यायचा आपण. ;) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

खेळत राहा भो.

प्रचेतस
Mon, 03/30/2020 - 12:33 नवीन
खेळत राहा भो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

असं तर व्हायला नको. झालंच तर

प्रचेतस
Mon, 03/30/2020 - 12:32 नवीन
असं तर व्हायला नको. झालंच तर तुमचा किंवा प्रतिस्पर्धी खेळाडूच्या इंटरनेट लॅग मुळे झालं असावं. मोबाईलवर मधूनच फोन आला तरी हे होऊ शकतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

*भाज्यांचे**

कंजूस
Mon, 03/30/2020 - 12:07 नवीन
**भाज्यांचे**
  • Log in or register to post comments

पहिल्या छूट सांगतो की...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 03/30/2020 - 12:14 नवीन
फोटो दिसत नै. आणि आता 'विषय बदला' या मुद्द्याशी सहमत. बाकी सायकलवाले काय करीत असतील असा प्रश्न पडतोच. आमच्याकडे एक सायकलवाले आमकं किलोमीटर गेलो आणि तमके किलोमीटर गेलो हे सांगणे बंद झाले आहे. मी नाव घेणार नाही. बरं तुमच्या सायकली भारी असतात. नाय तर मधल्या stand वर सायकल उभी करून त्याला ग्रेंडर बसवून चाक़ू सु-या यांना धार लावून तरी दिल्या असत्या तुम्हा लोकांनी. ;) (ह.घ्या) बाकी, रूटीन सुरु. ऑनलाइन पेपरं वाचून झाली. बाकी, नेटावर फूल पडिक आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

आता बघा हो डीबी... लिंका

मोदक
Mon, 03/30/2020 - 12:19 नवीन
आता बघा हो डीबी... लिंका बदलल्या आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Yes

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 03/30/2020 - 12:23 नवीन
आभार फोटो दिसत आहेत. पाककृती छान. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

व्वा...!

प्रचेतस
Mon, 03/30/2020 - 12:28 नवीन
व्वा...! लोणचं जबरदस्त झाले आहे मोदका. आज थोडं ऑफिसचं काम आहे तेच करतोय.
  • Log in or register to post comments

धन्यवाद वल्ली.!!

मोदक
Mon, 03/30/2020 - 12:41 नवीन
धन्यवाद वल्ली.!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

घरून ..... ?

चौकटराजा
Mon, 03/30/2020 - 12:59 नवीन
ओ भाउ . तुम्ही हडवैरी विजनेर हात नव्ह मंग , घरून कसच काम करून र्हायला राव ... ! आसंल म्हना ... कायबी चालतया आजकाल !! )))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

ते गंडवतेत लोकांना

सतिश गावडे
Mon, 03/30/2020 - 13:04 नवीन
प्रत्यक्षात "लॉर्ड ऑफ द रिंग्ज" पाहत असतील ब्ल्यू रे डिस्कवर. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

=))

प्रचेतस
Mon, 03/30/2020 - 13:57 नवीन
=)) थोडेफार कॉनकॉल असतात कधीतरी, ते झूम किंवा वेबेक्सवर करावे लागतात. लॉर्ड ऑफ द रिंग्स बघायचे आहे ब्लू रे वर अजून, नुसते ट्रायल लावून पाहिलेत :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

दिसले. कलर भारी आलाय त्याचे

कंजूस
Mon, 03/30/2020 - 12:45 नवीन
दिसले. कलर भारी आलाय त्याचे श्रेय बेडेकर / केप्रं कैरी लोणचे मसाला'ला. भाजी चिरणे एकसारखी बारीक त्याचे तुम्हाला.
  • Log in or register to post comments

साडे अकरा पर्यन्त

चौकटराजा
Mon, 03/30/2020 - 12:56 नवीन
साडेसहाला उठलो . दाराला लावलेली बी बस्केट ची पिशवी रिकामी, अजून परवानगी मिळालेली नसावी. खाली बेकरीत गेलो. चौकोनात उभा राहून दूध घेतले. पन्चवीस मिनिटे चाललो. आज एन दत्ता यानी चाल दिलेली गाणी ऐकली.चालताना . मग की बोर्डावर , अखेरचे येतील माझ्या.... मैने चान्द और सितारोन्की तमन्ना की थी.... व अजून त्या झुड्पान्च्या मागे सदाफुली दोघाना हसते ही वाजवली. आजचा नाश्टा रव्याचा चीक व भाज्यान्चे सूप . मग युरोप सहलीचा ११ वा दिवस टंकायला घेतला. बेडरूमचा केर काढून पी सी , टेबल, साईड टेबल. खालची लाकडी जमीन सुगन्धी फिनेल ने पुसली. काही वेळ ब्लॉकू डोकू हा गेम खेळत वेळ घालविला.
  • Log in or register to post comments

रव्याचा चीक?????

विजुभाऊ
Mon, 03/30/2020 - 15:41 नवीन
रव्याचा चीक????? रेशीपी देता का दादा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

रेसिपी

चौकटराजा
Mon, 03/30/2020 - 18:27 नवीन
अगोदरच्या दोन दिवस बारीक रवा पाण्यात भिजत टाकणे.दरम्यान रोज पाणी बदल करावा . तिसरे दिवशी सकाळ पर्यंत ते मिश्रण आंबते. बरेचसे पाणी काढून टाकावे , त्यात मीठ , व हिंग घालावा. मग कढई ठेवून तेल टाकावे . व ते मिश्रण हळू हळू ओतून ढवळावे . साता आठ मिनिटात चीक तयार. बशी किंवा बाउल मध्ये सर्व्ह करावा . आवड असल्यास कच्चे तेल टाकावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

चिकवड्याचा कच्चा माल म्हणजे

कंजूस
Mon, 03/30/2020 - 19:16 नवीन
चिकवड्याचा कच्चा माल म्हणजे रव्याचा चीक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

लोणचं

प्रशांत
Mon, 03/30/2020 - 12:59 नवीन
लोणचं बनवता येईल ,फक्त भाज्या मिळायला पाहिजे.
  • Log in or register to post comments

उत्तम विषय काढलास मोदका.

गवि
Mon, 03/30/2020 - 13:07 नवीन
उत्तम विषय काढलास मोदका. मर्यादित जिन्नस (घटकपदार्थ) वापरून तेच तेच पदार्थ जेवणात आणि नाश्त्याला रिपीट होण्याची शक्यता येत्या काही काळात होईल. त्यासाठी कणीक, बेसन, डाळी, पोहे, रवा , ब्रेड, बटाटा , कांदा असे नेहमीचे घटक वापरून पण जरा वेगळे पदार्थ बनवून व्हरायटी / चव बदल कसा आणता येईल त्यावर चर्चा करावी. उद्या नवीन धागा आला तर तिथेही चालू ठेवावी. तेच तेच घटक वापरून वरण / आमटी भात, पिठलं, उसळ पोहे, उपमा , मॅगी हेच रिपीट होत राहू नये म्हणून उदा. पोहेच, पण पद्धत जरा वेगळी किंवा बेसन धिरडे पण अंडे फेटून घालून वगैरे, बटाट्याची नवीन डिश अशा काही युक्त्या.
  • Log in or register to post comments

खालील प्रमाणे

चौकटराजा
Mon, 03/30/2020 - 13:56 नवीन
हरबरा डाळ व पीठ १ वाटली डाळ २, बेसन लाडू ३. डाळवडे ४. कान्दा गोल भजी ५, कान्दा खेकडा भजी ६ कान्दा चकती भजी ७, पालक भजी ८ चाकवत पानान्ची भजी ( सीझनल ) ९ कोबी भजी १० केळी भजी ११ मिरची भजी १२ म्हैसूर १३,सुरळीच्या वड्या तान्दूळ पदार्थ १ नैवेग्र्या २. ताक घालून उकड ३. तान्दळाच्या पापड्या ४. तान्दूळ शेवई उपमा ५ इडी अप्पम ६ तान्दूलाचे घावन ७ फोडणीचा भात ८ उकडीचे मोदक ( हे नाष्त्याला अतीच होते आहे ) ९ प्लेन डोसा १० इडली बटाटा पदार्थ १ बटटयाचा ओला कीस २. बटाटा वडा ३. फ्रेच फ्राईज ४ बटाटा भजी ५ पोटॅतो टोस्ट ६ आलू परोठा ७ आलू चाट पोहे १. दही पोहे २ दूध पोहे ३ दडपे पोहे ४ कांदा पोहे ५ वांगी पोहे ५ कोबी पोहे ६ बटाटे पोहे ७ मटार पोहे ८ गुळ नारळ पोहे ९ पोह्याची लाटी गहू १ दलिया २ रव्याचा चीक ३ कणकीचे घावन ४ पुर्या ५ सांजा ६ गोड शिरा ७ रवह्यांचे लाडू ८ रवा घावन ९ रवा आपे साबुदाणा १ खिचडी २ वडे ३ पापदड्या ४ थालीपीठ ७ साबुदाणा चकली ८ साबुदाणा चिवडा
  • Log in or register to post comments

मस्तच !

सस्नेह
Mon, 03/30/2020 - 20:29 नवीन
मस्तच ! यातले जमतील तितके ट्राय करणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

कोरोनाची सुट्टी करणी लावायची

बोलघेवडा
Mon, 03/30/2020 - 14:20 नवीन
कोरोनाची सुट्टी करणी लावायची असं ठरवलं आहे. घरून काम करत आहेच. काम संपल्यानंतर ज्योतिष शास्त्राचा अभ्यास नेमाने सुरू केला आहे. गेले दोन वर्षांपासून शिकत आहे. आधी थोडे पारंपरिक म्हणजे वैदिक पद्धतीचे शिक्षण घेतले. मग आता कृष्णमूर्ती पद्धती चा आभ्यास सुरू आहे. जोडीला अता रामायण आणि महाभारत बघत आहे.
  • Log in or register to post comments

माझे आवडते लोणचे !

मदनबाण
Mon, 03/30/2020 - 15:16 नवीन
माझे आवडते लोणचे ! बादवे... अनेक वेब सिरीज पाहण्याचा चंग बांधल्याने जसा वेळ मिळेल तसे मन वेब सिरीज मध्ये रमवतो आहे. सध्या Breathe पहायला घेतली आहे. आर माधवन असल्या कारणाने पहायचे ठरवले.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- अच्युतानन्तगोविन्द नामोच्चारण भेषजात्। नश्यन्ति सकला रोगा: सत्यं सत्यं वदाम्यहम्।।
  • Log in or register to post comments

ऑं ?

सस्नेह
Mon, 03/30/2020 - 15:41 नवीन
मोदका, एवढ्या फ्रेश फ्रेश भाज्या कुठून मिळवल्यास ? पाकृ (दिसायला तरी ) भारी आहे. कधी खाऊ घालशील तेव्हा चवीचं सांगेन हो ;)
  • Log in or register to post comments

पुण्याई कामास येते हो.. ;)

मोदक
Mon, 03/30/2020 - 19:11 नवीन
पुण्याई कामास येते हो.. ;) तुम्ही काय म्हणताय..? लोकांच्या लायटी कट करताय का..? का त्यालापण सुट्टी..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

लाॅक डाउन असून पुर्ण वेळ

mahayog
Mon, 03/30/2020 - 17:19 नवीन
लाॅक डाउन असून पुर्ण वेळ कार्यालयात. त्यामुळे घरी राहून वेगवेगळे उद्योग करता येत नाहीत
  • Log in or register to post comments

पावनं.. तुम्ही पोलीस, फायर

मोदक
Mon, 03/30/2020 - 19:10 नवीन
पावनं.. तुम्ही पोलीस, फायर ब्रिगेड की डायरेक डॉक्टर..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mahayog

महसूल

mahayog
Mon, 03/30/2020 - 20:24 नवीन
महसूल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

लोणचं....

Nitin Palkar
Mon, 03/30/2020 - 19:32 नवीन
लोणचं हा शब्द नुसता उच्चारला तरी तोंडाला पाणी सुटतं. मोदाक्राव, तुम्ही तर सविस्तर, सचित्र पाकृ दिलीय. करून बघणे आलं.... पक्षी कलत्रास सांगणे आलं... फोटो, पाकृ दोन्ही सुंदर हे वेगळे सांगणे न लगे.
  • Log in or register to post comments

हे करोनाचे संकट संपूदे...

मोदक
Mon, 03/30/2020 - 20:04 नवीन
हे करोनाचे संकट संपूदे... मोठा डबा आणून पोहोचवतो तुमच्या घरी. एखाद्या रविवारी सकाळी शक्यतो १० वाजता येतो.. म्हणजे सोडे घातलेले पोहे आणि.. आणि.. बाकीचे व्यनीत बोलू. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nitin Palkar

वाह!

जुइ
Mon, 03/30/2020 - 20:26 नवीन
लोणचे झक्कास दिसत आहे!
  • Log in or register to post comments

मुद्दाम करोनाबद्दल कांहीही

गणेशा
गुरुवार, 05/14/2020 - 20:24 नवीन
मुद्दाम करोनाबद्दल कांहीही लिहिणार नाहीये - सगळीकडून माहितीचा ओघ सुरू आहेच हे best. लोणचे करतो मी अन सांगतो. गाजर नाहीये पण..
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा