"तसं मी आधीच क्लिअर केलं होतं तुला, तरीही तुला का अशी भीती वाटतेय? मला तुझ्या past बद्दल काहीही हरकत नव्हती तेव्हा सुद्धा, आणि आजही नाहीये.. रावी मी तुला तुझा present मागितला होता, आणि future आपलं सोबतच राहिलं असतं याची खात्री होती..
"मग का घेतलेला तू तो gap?"
"कारण तू लहान होतीस, तुझं शिकायचं वय.. मला वाटलेलं तू कमिट केलंय एकदा तर काय पुन्हा पुन्हा insecure feel करत राहायचं. विश्वास होता माझा, स्वतःवर आणि तुझ्यावर"
"इथंच चुकलं तुझं, तू गृहीत धरलं मला, मला हवं होतं प्रेम.. माहितीय मला की गोडूल्या, शोनुल्या, हागला का, जेवला का वगैरे फालतूगिरी तुला आवडत नाही, प्रेम व्यक्त करायला आवडत नाही, का तर तुझा असण्यावर विश्वास आहे.. पण नव्हतास ना तू.. मी काय करणार होते तुझ्याशिवाय?"
"...."
"हे असं गप्प राहणं तुझं, अवि बोलत जा रे मनातलं.. please, i request you"
"आबांना सांगितलेलं मी, ते तयार होतेच की.. तुझ्या घरी आपल्या पोरासाठी शब्द टाकला असता तर तो वाया जाणार नाही याची खात्री होती त्यांना, तसंच झालं, सगळं ठरलं आणि आता तुला का हे सुचतंय"
"अवि, १०वीत होते मी, जेव्हा तू मला propose केलंस.. प्रेम कशाशी खातात हे कळत नसताना मी हो म्हटले तुला, दीड वर्षं सगळं सुरळीत सुरू असताना एक दिवस तुझा सगळा कॉन्टॅक्ट बंद.. काय करणार होते मी, अक्कल नव्हती, रडायचे मी तुझ्या आठवणीत.. पण मग तो भेटला, त्याने धीर दिला आणि हळू हळू मित्र, त्याहुन खास मित्र बनत बनत पुढची अडीच तीन वर्षं मला दिली त्याने.. असेल बेरोजगार, पण म्हणून मी त्याला आता दूर का लोटू? जेव्हा तुझी गरज होती तेव्हा तो होता.. एवढंच प्रेम होतं तर का नाही हिम्मत केलीस तेव्हाच.."
"मला वाटलेलं तुला वेळ द्यावा, सारखं बांधून ठेवणं मला जमलं नसतं आणि पटलंही नसतं.. शारीर पातळीवर..."
बोलता बोलता अचानक अविनाशने रावीकडे बघितलं, तिच्या डोळ्यात आव्हान होतं, प्रश्न होता ज्याचं उत्तर अविनाशकडे नव्हतं..
"एक मिनिट, don't you dare lie to me in my face! विसरलास, गच्चीवर एकटा झोपायचास तू, पाणी द्यायला आले तेव्हा काय केलं होतंस? विसरलास?"
"रावू, we just kissed, it was in the heat of the moment.."
"Yes it was, for you.. पण एक मुलगी जेव्हा तुझे intension माहीत असताना, तुला जवळ येऊ देते, किस करते, then it's not just a matter of a kiss.. she gives you her everything.. कारण तिला माहीत असतं की या पुढे काहीही होऊ शकतं.. मान्य आहे मला की तू कंट्रोल केलं असशील स्वतःला, फार मोठा सज्जन माणूस तू, पण माझा विचार? तो नाही आला का तुझ्या मनात?"
"..."
"अरे किती दिवस पळ काढशील.. मान्य कर की जे घडलं त्यात तुझी सुद्धा चूक होतीच, माझी जास्त होती, पण मला trigger करणारा तूच होतास! You were the bloody first person who introduced me to the concept of love.. who taught me what the love is.. but never let me do it to you!"
"चुकलंच माझं, तेव्हा तुला सोडून जाणं पण चुकलं, आज शक्य आहे सगळं म्हणून परत येणं सुद्धा चुकलं.. तुझ्या आयुष्यात आलोच नसतो तर कदाचित.. things could have been better.."
"इकडे ये, मी कधीकाळी फक्त तुझी होते, माझं पहिलं प्रेम होतास तू.. पण आता गोष्टी बदलल्यात.. accept it and give it a proper closure.. come on hug me the way you did.. on that day, 8th March 2014..
अविनाशने चमकून तिच्याकडे पाहिलं, आणि तिने मिठीसाठी उघडलेल्या हातांकडे पाहत.. तो निघुन गेला..
आजही तो प्रसंग आठवत होता, हातात जॅकचा large पेग, समुद्राचा किनारा, पायांवर येणारं लाटांचं पाणी.. आणि डायरी मध्ये शेवटची ओळ लिहिता लिहिता मागून आदितीने दिलेला आवाज.. या अवखळ पोरीला हा माझा past माहीत असूनही ही एवढी खुश कशी म्हणत.. पुढचा पेग घ्यायला तो उठला.. डायरीतलं पान आज एक नवीन गझल घेऊन फडफडत होतं.. काश...
बदल देते अतीत अगर बदल पाते
काश हम अपना मुकद्दर बदल पाते!
बडे हसीन थे वो जिन्होने है सितम ढाये
काश के हम एक सितमगर बदल पाते!
अपने आप को बदल दिया हमने खूब
खस्त ना होते जो, थोडा उधर बदल पाते!
बदली थी राहे हमसफर बदलकर
पिछे जाकर काश हम सफर बदल पाते!
बडी कडवी गुजर रही है जिंदगी आज
मिठा चुन लेते काश, जहर बदल पाते!
- अजिंक्य 'राव पाटील'
११ ऑक्टोबर २०१९
प्रतिक्रिया
10 Jan 2020 - 7:58 am | धनावडे
छान
10 Jan 2020 - 8:54 am | गणेशा
वा.. मस्त.
गझल तर अप्रतिम, निव्वळ अप्रतिम
अपने आप को बदल दिया हमने खूब
खस्त ना होते जो, थोडा उधर बदल पाते!
बदली थी राहे हमसफर बदलकर
पिछे जाकर काश हम सफर बदल पाते!
पुन्हा पुन्हा वाचली गझल...
10 Jan 2020 - 12:56 pm | चौथा कोनाडा
छान, भावनोत्कट लेखन आवडले !
गजल तर सुंदर आहेच !
12 Jan 2020 - 12:15 pm | अजिंक्यराव पाटील
धन्यवाद!
13 Jan 2020 - 10:56 am | चांदणे संदीप
सुंदर गजल!
हे अप्रतिम!
सं - दी - प
5 Feb 2020 - 2:54 pm | अजिंक्यराव पाटील
सन्दीप