कुठे ललाटी, निष्प्रभ आभाळ रे..
पोटाच्या खळगीची, ही आबाळ रे..
तुमचे सूर्य तारे, तुमचेच मळे हिरवे गार रे,..
आटलेल्या पाण्यातला, आम्ही गाळ रे..
काळ्या जमीनीवर फक्त तुमचाच मान रे
पाण्याविना आमचे रान सारे खडकाळ रे
भविष्यात नसलेले माझे हे गाव रे
भुकेले बालपण आमचे तू सांभाळ रे ..
क्रुर नियतीचा नशिबी खोल वार रे
मरण लिहिलेला माझा हा भाळ रे
- -शब्दमेघ ... मेळघाट डायरी
२७/११/२०१९
(खुप वर्षांनी काव्य विभागात पुन्हा या शिघ्र कवितेतुन)
प्रतिक्रिया
27 Nov 2019 - 1:11 pm | मुक्त विहारि
तुम्ही खूप मनापासून लिहिलं आहे.
पण.... खूप मनाला लावून घेऊ नका.
27 Nov 2019 - 1:13 pm | मनिष
कवितेत पुनःप्रवेशाच्या शुभेच्छा.
प्रत्ययाकारीपणे अंगावर येतंय रे.
27 Nov 2019 - 4:21 pm | खिलजि
"" आटलेल्या पाण्यातला, आम्ही गाळ रे.. ""
इथे थोडं काहीतरी भारदस्त हवं होत असं वाटतंय .. जसं कि "" आटलेल्या पाण्यातला, आमच्यासाठी गाळ रे.."' किंवा काहीतरी वेगळं .. पण एकंदरीत हेलावून टाकणारी झालीय .. मस्त
27 Nov 2019 - 11:02 pm | गणेशा
तुम्ही जास्त करेक्ट लिहिले आहे ... आमच्यासाठी गाळ रे भारी एकदम
28 Nov 2019 - 1:41 am | जॉनविक्क
तुझ्या सारखे मिपाकर दिसतात म्हणूनच माणुसकीवर थोडाफार विश्वास उरला आहे
28 Nov 2019 - 8:45 am | प्रचेतस
मेळघाटातील बहुतांश आदिवासी पाड्यांचे आता बाहेरील भागात विस्थापन झालेले आहे त्यामुळे त्यांच्यातील कुपोषणाचे प्रमाण नक्कीच काहीअंशी कमी झालेले आहे आता.
30 Nov 2019 - 3:07 pm | ज्ञानोबाचे पैजार
आवडली कविता,
चांङली लिहीली आहे
पैजारबुवा,
30 Nov 2019 - 4:20 pm | श्वेता२४
क्रुर नियतीचा नशिबी खोल वार रे
मरण लिहिलेला माझा हा भाळ रे
:(