दसरा आणी श्रीखंड

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं
8 Oct 2019 - 5:13 pm

आला दसरा............

दसरा आणी श्रीखंड

दसरा आणी श्रीखंडा चे एक अतूट नाते आहे..
लहान पणी चक्का तयार करणे म्हणजे साधारण ३-४ आधी दिवस तयारी असायची.
साय साठवणे ..व सा~याना पुरेल इतक्या श्रीखंडा इतके दही झाले कि मग ते एका फडक्यात बांघून ते भिंतीला टेकेल अश्या रितेने खुंटीला टांगले जायचे..ज्या मूळे त्यातले पाणी भिंत शोषून घेई व घट्ट चक्का बनत असे.
पूर्वी भिंती भेनड्याच्या म्हणजे मातीच्या विटाच्या असायच्या..
सकाळीच चक्का व प्रमाणात साखर .. दुध घालून घोटणे सुरु व्ह्यायचे..
मग सहाणीवर दुधात जायफळ उगाळणे. ..व ते मिश्रंण चक्यात मिसळले जायचे..
केशर वा रंग घालून शेवटचा हात फिरवला कि झाले श्रीखंड तयार..
काळ पुढे सरकत गेला अन तयार चक्का मिळू लागला व घरी चक्का बनवणे जवळ जवळ कालबाह्य झाले.
चक्कात हि साधा व मलाई चा असे २ प्रकार असायचेच..
केंव्हा ते आठवत नाही पण एका चतुर बल्लावाचार्याने हापूस च्या आंब्याचा रस चक्कात मिसळून आम्रखंड हा प्रकार शोधला.
अन हा प्रकार खूप लोकप्रिय झाला..खर तर त्याचे श्रेय देसाई व चितळे याना असावे का???.
काना मागून आला अन ह्या म्हणी प्रमाणे आम्रखंड हा प्रकार श्रीखंडा पेक्षा ज्यादा पॉप्युलर आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही..
हल्ली तर १२ हि महिने श्रीखंडा /आम्रखंड तयार स्वरूपात मिळते.
मला श्रीखंड हा प्रकार आवडतो...तो हि घरी केलेला ..पण बहुमत आम्रखंड च्या बाजूने असते.
दसरा आला कि मन भूतकाळात जाते अन सारे आठवते..

अन आज हयात नसलेली आई पण
----------------------------..

कथा

प्रतिक्रिया

अभ्या..'s picture

8 Oct 2019 - 6:03 pm | अभ्या..

आज हयात नसलेली आई पण

अर्रर्रर्र बिच्चारी.....

रमेश आठवले's picture

8 Oct 2019 - 7:34 pm | रमेश आठवले

हल्ली केळ्याचे घड लट्कवण्या साठी ही उपकरणे मिळतात. त्यांचा उपयोग चक्क्याचे दहि लट्कवण्या साठी होऊ शकतो.
https://www.amazon.com/s?k=wood+banana+holder&gclid=EAIaIQobChMIienSqOiM...
https://www.walmart.com/ip/Home-Basics-Black-Fruit-Basket-with-Banana-Tr...

दोरीने बांधुन खिळ्याला टांगणे सोईस्कर होईल.

रमेश आठवले's picture

9 Oct 2019 - 9:54 pm | रमेश आठवले

घरातील शिंके उतरवुन तेथे काही वेळा साठी दह्याची पोटली टांगली तर भिंतीत नवीन खिळा ठोकण्याची तसदी घ्यावी लागणार नाही.

जॉनविक्क's picture

8 Oct 2019 - 10:44 pm | जॉनविक्क

अफलातून फोटो.

पाषाणभेद's picture

10 Oct 2019 - 3:33 am | पाषाणभेद

दसरा आणी श्रीखंड ?!?!

श्रीखंड गुढीपाडव्याला असते ना!
दसर्‍याला पुरणपोळी असते. देवीला नैव्यद्य असतो पुरणावरणाचा. पुरणाचे दिवे असतात आरतीचे.

नविन पायंडा नका पाडू दसर्‍याला श्रीखंडाचा.

दसर्‍याला पुरण पोळीच.

गुढीपाडव्याला श्रीखंड. पण तो मौजमजा म्हणून करत असावे अन मग तो सर्वदूर प्रचलीत झाला असावा. बाकी जाहीरातबाजी करून दुकानदार काहीही कधीही पसरवतील त्या नवरात्राच्या नऊ दिवसाच्या साड्यांसारखे.