याज्ञसेनी !

मृणालिनी's picture
मृणालिनी in लेखमाला
8 Sep 2019 - 6:05 am

h3 {
font-size: 22px;
font-family: 'mukta', sans-serif;
}
h4 {
font-size: 19px;
font-family: 'mukta', sans-serif;
color:#333333;
}
h6 {
font-size: 18px;
font-family: 'Noto Sans', sans-serif;
line-height: 1.5;
text-align: justify;
margin-left:18%;
}

p {
font-size: 18px;
font-family: 'Noto Sans', sans-serif;
text-align: justify;

}

a: {
color: #990000;
}

a:link {
text-decoration: none;
}

a:hover {
text-decoration: underline;
}
div.chitra {
max-width:400px;
margin: auto;
}
div.chitra1 {
min-width:360px;
margin: auto;
}
div.chitra2 {
max-width:300px;
margin: auto;
}

याज्ञसेनी !

ज्ञात आहे याज्ञसेनी? दुर्जनांची ती सभा?
दास होत्या सोंगट्याही, ना कुठे न्याया मुभा!

फास बनला द्यूत जेव्हा आणि फासे नाचले,
संपला पुरुषार्थ तेव्हा हात वस्त्रा लागले

ज्येष्ठ ते अन् श्रेष्ठ जे, हे धर्म पंथी मूक का?
भीष्म येथे, द्रोण येथे, का तरी शोकांतिका?

अंध म्हणूनी काय झाले? ऐक राजा ही व्यथा
वर्ज कर या मूढ लोका, रोख काळाच्या रथा!

कोरड्या चेहऱ्यावरी ना रेष, ना संतप्तता,
कौरवांच्या या कृतीला सहमती जणू दावता?

काय झाले धर्मराजा? काय झाले अर्जुना?
आठवा तुमच्या हितार्थ साहिली मी वल्गना!

मान झुकवून मौन पाळून बैसले अधोवदन
पांडवांनो शौर्य तुमचे जाहले कोठे दहन?

गंजले शस्त्रास्त्र कि गोठले बाहुंत बल!
आसवांचा तप्त अग्नी भासले कोणास जल!

आज ही अवहेलना कोरली भाळी खरी
या सखीच्या रक्षणाला धाव घेई श्रीहरी!

श्रीगणेश लेखमाला २०१९

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

8 Sep 2019 - 8:06 am | यशोधरा

छान!

श्वेता२४'s picture

8 Sep 2019 - 9:15 am | श्वेता२४

आवडली

दुर्गविहारी's picture

8 Sep 2019 - 10:07 am | दुर्गविहारी

छान !

ज्योति अळवणी's picture

8 Sep 2019 - 11:21 am | ज्योति अळवणी

खूपच सुंदर.

याज्ञसेनी होतीच तडफदार! तिला अनेक प्रसंगी तिच्या मनाविरुद्ध शरण जावे लागले होते

ज्योति अळवणी's picture

8 Sep 2019 - 11:21 am | ज्योति अळवणी

खूपच सुंदर.

याज्ञसेनी होतीच तडफदार! तिला अनेक प्रसंगी तिच्या मनाविरुद्ध शरण जावे लागले होते

ज्योति अळवणी's picture

8 Sep 2019 - 11:21 am | ज्योति अळवणी

खूपच सुंदर.

याज्ञसेनी होतीच तडफदार! तिला अनेक प्रसंगी तिच्या मनाविरुद्ध शरण जावे लागले होते

जालिम लोशन's picture

8 Sep 2019 - 1:50 pm | जालिम लोशन

आवडली

पद्मावति's picture

8 Sep 2019 - 1:55 pm | पद्मावति

आवडली.

मृणालिनी's picture

8 Sep 2019 - 5:25 pm | मृणालिनी

सर्वांचे आभार! :)

तुषार काळभोर's picture

8 Sep 2019 - 5:51 pm | तुषार काळभोर

आवडली.

आताच्या कुणा द्रौपदीने कुठला कृष्ण येईल या अपेक्षेने राहु नये. तो सुद्धा कसा होता, अर्जुनाच्या कानात सगळी गीता ओतली शस्त्र धर युद्ध कर म्हणून. पण तुझा बाजार मांडणारे नवरे, लिलाव पहाणारे सासरे आणि निऱ्या खेचणारे दिर यांना सरळ करायला तुच तलवार उचल नाही म्हणाला.

जॉनविक्क's picture

9 Sep 2019 - 8:59 pm | जॉनविक्क

तुच तलवार उचल नाही म्हणाला.

बास, आता हेच काय ते ऐकायचं राहिले होते.

मृणालिनी's picture

9 Sep 2019 - 12:05 am | मृणालिनी

दोघांचे आभार!

खिलजि's picture

9 Sep 2019 - 6:55 pm | खिलजि

" द्र " अक्षरापासून खरे तर महाभारत सुरु झाले .. द्रुपद आणि द्रोणाची गुरुकुलातील मैत्री आणि तिचा विसर पडलेला माजलेला द्रुपद .. द्रोणाची प्रतिज्ञा आणि तिच्यापासून वाचण्यासाठी द्रुपद राजाने केलेला यद्न्य .. त्यापासून उत्पन्न झालेले दृष्टद्युन्य आणि द्रौपदी ..

मृणालिनी's picture

9 Sep 2019 - 8:50 pm | मृणालिनी

खरे आहे.

प्राची अश्विनी's picture

10 Sep 2019 - 7:55 am | प्राची अश्विनी

वा! फारच सुरेख!

मृणालिनी's picture

11 Sep 2019 - 3:15 am | मृणालिनी

धन्यवाद!