मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

याज्ञसेनी !

मृणालिनी · · लेखमाला

याज्ञसेनी !




ज्ञात आहे याज्ञसेनी? दुर्जनांची ती सभा? दास होत्या सोंगट्याही, ना कुठे न्याया मुभा!
फास बनला द्यूत जेव्हा आणि फासे नाचले, संपला पुरुषार्थ तेव्हा हात वस्त्रा लागले
ज्येष्ठ ते अन् श्रेष्ठ जे, हे धर्म पंथी मूक का? भीष्म येथे, द्रोण येथे, का तरी शोकांतिका?
अंध म्हणूनी काय झाले? ऐक राजा ही व्यथा वर्ज कर या मूढ लोका, रोख काळाच्या रथा!
कोरड्या चेहऱ्यावरी ना रेष, ना संतप्तता, कौरवांच्या या कृतीला सहमती जणू दावता?
काय झाले धर्मराजा? काय झाले अर्जुना? आठवा तुमच्या हितार्थ साहिली मी वल्गना!
मान झुकवून मौन पाळून बैसले अधोवदन पांडवांनो शौर्य तुमचे जाहले कोठे दहन?
गंजले शस्त्रास्त्र कि गोठले बाहुंत बल! आसवांचा तप्त अग्नी भासले कोणास जल!
आज ही अवहेलना कोरली भाळी खरी या सखीच्या रक्षणाला धाव घेई श्रीहरी!



वाचने 23131 वाचनखूण प्रतिक्रिया 17

भीमराव Sun, 09/08/2019 - 20:23
आताच्या कुणा द्रौपदीने कुठला कृष्ण येईल या अपेक्षेने राहु नये. तो सुद्धा कसा होता, अर्जुनाच्या कानात सगळी गीता ओतली शस्त्र धर युद्ध कर म्हणून. पण तुझा बाजार मांडणारे नवरे, लिलाव पहाणारे सासरे आणि निऱ्या खेचणारे दिर यांना सरळ करायला तुच तलवार उचल नाही म्हणाला.

खिलजि Mon, 09/09/2019 - 18:55
" द्र " अक्षरापासून खरे तर महाभारत सुरु झाले .. द्रुपद आणि द्रोणाची गुरुकुलातील मैत्री आणि तिचा विसर पडलेला माजलेला द्रुपद .. द्रोणाची प्रतिज्ञा आणि तिच्यापासून वाचण्यासाठी द्रुपद राजाने केलेला यद्न्य .. त्यापासून उत्पन्न झालेले दृष्टद्युन्य आणि द्रौपदी ..