आपल्या इथे गाजलेल्या हिंदी-मराठी सिनेमांची संख्या कमी नाही. गुरुदत्त पासून ते अनुराग कश्यपपर्यंत अनेक निर्माता-दिग्दर्शकांचे सिनेमे गाजले. सिनेमे येतात...गाजतात....आणि जातात. मागे उरते ती त्यांची चर्चा. त्या सिनेमातल्या चांगल्या गाण्यांची, प्रसंगांची आणि कलाकारांच्या अभिनयाची चर्चा पुढे वर्षानुवर्षे सुरु असते. उदाहरणार्थ...शोले म्हटल्यावर पहिल्यांदा आठवतो तो म्हणजे गब्बरसिंग आणि त्याच्या एंट्रीचा सीन....कितने आदमी थे????
गब्बरसिंगची एंट्री ह्याहून जबरदस्त होऊच शकली नसती. मान्य....एकदम मान्य!! पण मुद्दा जरा वेगळा आहे. ह्याच सिनेमात पुढे काही असे प्रसंग आहेत जे गब्बर ह्या व्यक्तिरेखेची व्यापकता जास्त परिणामकारकरीत्या दाखवतात.किंबहुना गब्बरच नव्हे तर संपूर्ण शोले सिनेमाचा इम्पॅक्ट त्या प्रसंगांमुळे जास्त वाढलेला आहे. पण असे प्रसंग लक्षात राहत नाहीत आणि त्यांची चर्चा होत नाही. अश्याच दुर्लक्षित पण जबरदस्त प्रसंगांची, संवादांची आणि अभिनयाची दखल घेण्यासाठी हा लेखनप्रपंच.
सुरवात शोलेपासूनच...सिनेमाच्या उत्तरार्धात अहमदला (सचिन पिळगावकर) गब्बरची माणसं पकडून नेतात.
"सरदार ये रामगढ का लौंढा है.स्टेशन जा राहा था.हमने उठा लिया"
हे ऐकताच खाटेवर झोपलेला गब्बर अहमदकडे न बघता स्वत:च्या हातावर फिरणाऱ्या किड्याला निर्दयीपणे चिरडून टाकतो. कट टू..अहमदचं प्रेत घेऊन घोडा हळूहळू गावात शिरतो.
निर्दयी गब्बरसिंगमधला कोल्ड ब्लडेड मर्डरर इथे दिसून येतो. गब्बरच्या लेखी रामगढ, तिथले रहिवासी ह्यांची काय किंमत आहे हे तो मुंगीला चापट मारून दाखवतो.
दुसरा सिनेमा : दिवार (दिग्दर्शक: यश चोप्रा)
गाजलेला प्रसंग आणि डायलॉग : मेरे पास माँ है.. / मैं आज भी फेके हुए पैसे नही उठाता
ह्या सिनेमात विजय (अमिताभ बच्चन) श्रीमंत झाल्यावर एक इमारत विकत घेतो असा प्रसंग आहे. त्यात इमारतीचा सौदा पूर्ण झाल्यावर मूळ मालक विजयला म्हणतो,
"अब सौदा पुरा हो गया. पर एक बात कहू. आपने घाटे का सौदा किया. अगर आप केहते तो इस पुरानी इमारत के मैं पाच-दस लाख रुपये कम भी कर देता. माफ किजीये, पर आपको धंदा करना नही आता."
यावर विजय उत्तरतो," धंदा करना तो आपको नही आता सेठ. ये इमारत जब बन रही थी, तो मेरी माँ ने यहाँ इटे उठाई थी. और आज ये ईमारत मैं उसे तोहफे में देने जा रहा हु. अगर आप तो इस ईमारत के मैं पांच-दस लाख रुपये और दे देता. धंदा करना तो आपको नही आता."
आईवर झालेला अन्याय, तिने घेतलेले कष्ट ह्याचा विजयवर किती परिणाम झालेला असतो हे ह्या प्रसंगात अधोरेखित होते. विजयने स्वीकारलेल्या चुकीच्या मार्गाची पाळेमुळे त्याच्या आईच्या अश्रूमध्ये असतात. बांधकामावर असलेला मुकादम जेंव्हा विजयाच्या आईचा अपमान करतो तेंव्हा विजय त्याला दगड फेकून मारतो. हा दगड विजयने त्या संपूर्ण समाजवरंच फेकलेला असतो. इथूनच नैतिक-अनैतिकतेचे सगळे बंधनं झिडकारून तो आईचे अश्रू पुसायचे ठरवतो. मुळात समाजाची सिलेक्टिव्ह नैतिकता त्याने जवळून अनुभवली असते. आणि वरील प्रसंग हे विजयने समाजाला दिलेले उत्तर आहे. ह्या सिनेमात शेवटी नैतिकता जिंकताना दाखवली असली तरी का कोण जाणे अनैतिक विजय जास्त जवळचा वाटतो.
ह्या सिनेमात एका प्रसंगात, विजय आणि त्याचे सहकारी चर्चा करत असतात.
"विजय, इतने खतरे में तुम्हारा अकेले जाना ठीक नहीं. क्या तुम्हे लगता है के ये काम तुम अकेले कर सकते हो?"
"नहीं ! मैं जानता हु के ये काम मैं अकेले कर सकता हु"
अफाट प्रसंग आहे हा. धंद्यात नवीन असल्याने विजयवर काही लोकांचा फारसा विश्वास नसतो. पण विजयाचा स्वत:वर जबरदस्त विश्वास असतो. ह्यात अमिताभचे डोळे आणि संवादफेक पाहावी.
ह्या सिनेमात आधी एक विनोदी म्हणावा असा प्रसंग आहे. विजयाचा धाकटा भाऊ रवी (शशी कपूर) नोकरीसाठी वणवण फिरत असतो. एकदा तो मैत्रिणीच्या वडिलांना भेटतो. ते पोलीस कमिशनर असतात.
ते विचारतात," तो रवी बेटा आजकल क्या कर रहे हो?"
स्वतःच्या बेरोजगारीची लाज वाटून रवी म्हणतो," अब आपसे क्या छुपाना सर. मैं आजकल कुछ नही कर रहा हू."
कमिशनर सहजतेने म्हणतात," कुछ नही करते तो पुलिस में भरती हो जाओ."
मुंबई पोलीस कमिशनरच्या तोंडी काही करत नसशील तर पोलिसात ये हे वाक्य देऊन लेखकाला काय दाखवायचे होते देवाला माहिती !
सिनेमा: त्रिशूल
गाजलेला प्रसंग/संवाद : मैं यहा आपसे पाच लाख का सौदा करने आया हू और मेरी जेब मी पाच फुटी कवडीया भी नही है !
त्रिशूल सिनेमातला प्रत्येक प्रसंग अगदी डोळ्यात भरून घ्यावा असाच आहे. कथा वेगळी असली तरी मूळ आशय अन्याय आणि त्याविरुद्ध घेतलेला प्रतिशोध असाच आहे. दिवार आणि त्रिशूलमधली अमिताभची व्यक्तिरेखा बरीचशी सारखी आहे. पण दिवारमधला विजय एका संधीच्या प्रतीक्षेत असतो. ती मिळताच तो स्वतःवरचा अन्याय झुगारून देतो. तर त्रिशूलमधला विजय अन्यायाला झुगारून देण्यासाठी स्वतः संधी निर्माण करतो. दोघांचाही आत्मविश्वास अमिताभने नजरेतूनच दाखवला आहे. त्रिशूलमध्ये विजय हा बिल्डर आर के गुप्ता ह्यांचा अनौरस पुत्र असतो. वडिलांनी आईवर आणि पर्यायाने स्वतः वर केलेला अन्याय त्याला सहन होत नाही. बिल्डर आर के गुप्ता ह्यांना त्यांच्याच बिझीनेसमध्ये पराभूत करून बरबाद करण्यासाठी विजय शहरात येतो. आणि हळूहळू तो यशस्वी होतो.
ह्यात काही फार सुंदर प्रसंग आहेत,
बिझनेसमध्ये शिरल्यावर कुठल्याश्या एका टेंडरमध्ये आर के गुप्तांच्या कंपनीला विजय मात देतो आणि तो प्रकल्प मिळवतो. ह्या यशासाठी तो शहरातल्या इतर उद्योजकांना एक जंगी पार्टी देतो. ह्या पार्टीविषयी बोलताना विजय गीताला (राखी गुलजार) म्हणतो,
"गीता इस पार्टी के लिये शहर के तमाम बडे लोगोको न्योता भेजो. और हा.. आर के गुप्ता और फॅमिली को बुलाना मत भुलना. वो अबतक इस शहर के बडे आदमी है !"
आपण आर के गुप्ताला हारवणारच ह्याविषयी विजयला कमालीचा आत्मविश्वास असतो. तोच त्याच्या प्रत्येक कृतीतून दिसतो. विजय प्रत्येक टेंडर केवळ एका रुपयाच्या फरकाने जिंकतो. ही थोडीशी अतिशयोक्ती असली तरी आर के गुप्ताला त्याची लायकी दाखवण्यासाठी वापरेललं हे एक रुपयाचं रूपक खूप समर्पक आहे. आर के गुप्ता हुशार असतात. मेहनती असतात. आणि धंद्यात प्रामाणिकसुद्धा असतात.पण हा सिनेमा विजयाच्या दृष्टीकोनातून बघायचा आहे. त्याची माणसं ओळखण्याची आणि हाताळण्याची पद्धत वेगळी असते.
ह्याच सिनेमात आधी एक प्रसंग आहे. गीता (राखी गुलजार) ही आधी आर के गुप्तांच्या कंपनीत कामाला असते. आर के गुप्तांच्या टेंडरची किंमत जाणून घ्यायला विजय त्यांच्याचं एका कारकुनाला (भंडारी) पैसे देतो. पण पैसे घेतल्याचा आळ गीतावर येतो. आर के गुप्ता तिला नोकरीवरून काढून टाकतात. हे विजयला कळताच तो तडक आर के गुप्तांना भेटतो आणि सत्य परिस्थिती सांगतो. गीतासारख्या प्रामाणिक मुलीवर तुम्ही अन्याय केला हे ही सांगतो. आर के गुप्ता ओशाळतात.
ते म्हणतात," मिस्टर विजय, माना की मैने गलती की है. पर भंडारी तुम्हारी मदत कर रहा था. गीताको बचाने के लिये तुमने खुद का नुकसान क्यो करवाया?"
ह्यावर विजय सडेतोड उत्तर देतो,
"जिंदगी में कुछ बातें फायदे और नुकसान से ऊपर होती है मिस्टर आर के गुप्ता.... मगर अफ़सोस के कुछ लोग इसे समझ नहीं पाते."
माझ्या मते, हिंदी सिनेमातल्या काही सर्वोत्कृष्ट संवादांमध्ये हा संवाद येतो. ह्यात विजयच्या डोळ्यातले बदलणारे भाव बघावेत. आर के गुप्तांच्या आचारविचारांविषयी असलेला राग, त्याविषयी वाटणारी घृणा अन त्याचवेळी वाटणारी कीव हे तीनही भाव अमिताभने दाखवले आहेत. विजयचं ध्येय खूप स्पष्ट असते. त्याला स्वतःच्या फायद्यापेक्षा आर के गुप्तांचे नुकसान करण्यात जास्त रस असतो. पण हे करताना कोणाही निर्दोष व्यक्तीला त्रास देऊन त्याला दुसरा आर के गुप्ता बनायचं नसतं.
सिनेमात शेवटी आणखी एक जबरदस्त प्रसंग आहे. ज्यात सिनेमाचे त्रिशूल हे नाव सार्थ होते. विजयमुळे आर के गुप्ता धंद्यात पूर्णतः बरबाद होतात. हा विजयाचा पहिला वार! विजय आणि आर के गुप्तांचं खरं नातं कळल्यानंतर त्यांची मुलेसुद्धा दुरावतात. हा विजयचा दुसरा वार!
घरात हताश अवस्थेत बसलेल्या आर के गुप्तांना भेटायला विजय येतो. विजय स्वतः ची ओळख सांगून त्यांची पूर्ण मालमत्ता त्यांना वापस करतो. त्यावेळचा संवाद,
" जिस दौलत के लिए आपने ने मेरी माँ को दुनिया की ठोकरे खाने के लिए अकेला छोड़ दिया था. आज वही दौलत मैं मेरी माँ के तरफ आपको देने आया हु. आज आपके पास आपकी सारी दौलत है, लेकिन आपसे बड़ा गरीब मैंने नहीं देखा !!"
हा विजयचा तीसरा वार !!
त्रिशूल !!
समाप्त
प्रतिक्रिया
23 Aug 2019 - 2:59 pm | आनन्दा
सावकाश वाचतो. छान आहे
23 Aug 2019 - 4:26 pm | जॉनविक्क
सलीम जावेद चा.
23 Aug 2019 - 4:39 pm | जॉनविक्क
विनोद खन्नाचे पाकिट मारताना रणधीर कपूर पकडला जातो तेंव्हा त्याला विनोद खन्ना सुनावतो
"बच्चे, तुम जिस स्कूल में पढ़ते हो हम उसके हॆड़मास्टर रह चुके हैं"
और इस पर्स में रुपयों से भी ज़्यादा एक क़ीमती चीज़ है जिसे चुराना आसान नहीं, जाओ अपने हाथ में और सफ़ाई पैदा करो. जाओ. ती कीमती चीज म्हणजे विनोद खन्नाचा बालपणी त्याच्या हरवलेल्या भावाचा फोटो.
आणि कहर म्हणजे रणधीरच तो भाउ असतो जे अजुन स्पष्ट झालेले नसते. मेलोड्रामा एट इट्स पिक
23 Aug 2019 - 4:51 pm | तुषार काळभोर
हे एक वेगळंच रसायन होतं!!
23 Aug 2019 - 5:00 pm | उपेक्षित
गिरिश कुलकर्णी चा अग्ली मधला हा लयी एपिक आहे - https://www.youtube.com/watch?v=V7wxlK8HQ6M
'हे करणार लफडे आपण बसणार .....' :)
'फेणे' मधले गिरीशचेच काही प्रसंग पण लक्षात राहतात.
23 Aug 2019 - 8:10 pm | कानडाऊ योगेशु
शोले मधल्या अहमदच्या हत्येच्या प्रसंगाबाबत
ह्याचा ओरिजिनल अनएडिटेड भाग युट्युब वर आहे. पण फारच क्रूर वाटेल म्हणुन सेन्सॉर बोर्डाने तो काढायला लावला. तसेच शोलेचा खरा शेवट हा गब्बरला मारले असा दाखवला होता. हा भागही युटुब वर आहे. (ठाकूरचे हात दिसतात ह्यात). पण त्याच वेळेला फुलन देवीने आत्मसमर्पण केले व सेन्सॉरने हा ही शेवट बदलायला लावला. पण हा शेवटच योग्य वाटतो. ( सेक्वेल काढायची एक संधी आहे.)
27 Aug 2019 - 1:14 am | फारएन्ड
मला त्यातही कोठे हात दिसल्याचे लक्षात नाही. मुख्य म्हणजे रिलीज करता तयार केलेल्या आवृत्तीत दिसत नाहीत. कल्पना करा,१९७५ सालचे तंत्रज्ञान वापरून चित्रीत आणि संकलित केलेला चित्रपट आहे. आज अनेक प्रकारचे व्हिडीओ अॅनेलीसीस, झूम, पॉज वगैरे करायचे प्रकार उपलब्ध असूनही कोणत्याही सीन्स मधे ब्लूपर सहज मिळत नाहीत. काय मेहनत घेतली असेल यावर! हे सगळे श्रेय आपले मराठी संकलक एम एस शिंदे यांचे.
हेच शिंदे कारकीर्दीच्या अखेरीस मुंबईत हलाखीत जीवन जगत होते. ही बॉलीवूडच्या सिस्टीम मधली एक दुर्दैवी गोष्ट.
मात्र या व्हर्जन पेक्षा रिलीज केलेलीच व्हर्जन जास्त चांगली आहे हे मात्र नक्की.
24 Aug 2019 - 8:10 am | जेम्स वांड
इंग्रजीत कुंग फु पांडा ह्या एनिमेशनपटातील पहिल्या भागात टाय लंगला (व्हिलन असलेला हिमालयन बिबट्या) रोकायसाठी मास्टर शिफु ड्रॅगन योद्धा शोधत असतो, नियती पो पांडाला तिथे नेऊन पोचवते, शेवटी जेव्हा शिफु नियती मान्य करून पो ला कुंगफु शिकवायला "पूल ऑफ सेक्रेड टियर्स" जवळ नेतो तिथे त्याला म्हणतो "डु यु वाना लर्न कुंग फु, देन आय एम युवर मास्टर" त्याला ट्रेन करायला मार्ग अन्नातून जाणारा असतो , शेवटी ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर पो शिफुकडून एक डंपलिंग जिंकून घेतो अन शिफु त्याला खायची परमिशन देतो, तेव्हा डोळे मिटून उभा असलेल्या शिफुच्या हातात ते डंपलिंग देऊन पो म्हणतो
"आय एम नॉट हंगरी"
माझ्यालेखी/माझ्यासाठी शब्दातीत सीन आहे तो.
24 Aug 2019 - 9:01 am | ज्ञानोबाचे पैजार
जरा सोचिये.... एक बच्चा..... महेज आठ या नौ सालका.....
जो पढ नही पाता लिख नही पाता रोज मर्रा के मामुली काम कर नही पाता......
वो सारी चिजे नही कर पाता जो उसके उम्रके बच्चे बडी आसानीसे करते है.........
क्या बितती होगी उसपर?
उसके सेल्फ कॉनफीडन्स की तो धज्जीया उडजाती होगी........
अपनी खामीयोंको टेढे पनके लिबास मे लपेटकर दुनियासे लडता होगा हर रोज....
गदर मचाता होगा..... गदर यहा......
क्यु बताउ दुनियाको की नही आता? नही करना कहेके टाल न दू?........
बडो से ही तो सिखते है बच्चे...
अब तो..... ये गदर भी कुचल दिया गया है वहा,..........
मुझे अफसोस है उसने पेंटींग करना बंद कर दिया.
पैजारबुवा,
24 Aug 2019 - 5:02 pm | विजुभाऊ
डोळ्यात पाणी आले होते हा प्रसंग पहाताना
यातलाच दुसरा प्रसंग म्हणजे
मुलाचा बाप मुलाकडे आपण लक्ष देतो हे सांगतो त्यावेळेस चित्रकला शिक्षकना त्याला सुनावलेले बोल.
त्या नंतर बापाच्या चेहेअॅर्यावरचे भाव विसरता येत नाहीत.
24 Aug 2019 - 3:27 pm | जॉनविक्क
सगळे कैंटीन उध्वस्त होते :D
24 Aug 2019 - 6:15 pm | अभ्या..
डेफिनेट का असली नाम का है
डेफिनेट हि है असली नाम डेफिनेट हि है.
ऐ गुड्डु, डेफिनेट का असली नाम क्या है?
डेफिनेटही है भैय्या.
अरे, डेफिनेटसे पहले कुछ तो नाम रक्खे होगे अब्बू. जैसे पर्पेंडिकुलरका असली नाम बबुआ था.
भैय्या हमको तो डेफिनेटही मालूम है.
हा पर डेफिनेटका मतलब का है?
जो डेफिनेट होता है उसी को डेफिनेट कहते है.
अरे डेफिनेट का होता है?
भैय्या डेफ का मतलब तो बहेरा होता है...
...और नेट का मतलब जाली.
.
.
जो पक्का हो उसे डेफिनेट कहते है
.
फैजल अंग्रेजी नही बोलता था,
उसके गँगमेंभी कोई नही बोलता था.
.
इखलाख बोलता था.
.
परफेक्ट इन्ट्रोडक्शन.
24 Aug 2019 - 6:44 pm | नाखु
आणि समयोचित
ओरिजनल ते ओरिजनल
27 Aug 2019 - 12:59 am | फारएन्ड
वरती जॉनविक्क यांनी म्हंटल्याप्रमाणे सलीम जावेद या जोडीचा यात खूप हात आहे. साधारण १९७५-१९८१ पर्यंत यांनी लिहीलेल्या स्क्रिप्ट्स - विशेषतः अमिताभच्या चित्रपटांच्या - फार जबरदस्त होत्या. अमिताभनेही सादर करताना ते संवाद वेगळ्याच उंचीवर नेले.
त्यांच्या 'विजय' या रनिंग कॅरेक्टर मधला आत्मविश्वास हा फार मोठा भाग आहे. त्या त्रिशूल व दीवार मधल्या संवादांमधून ते दाखवले आहे. याउलट हाच विजय काला पत्थर मधे तोच आत्मविश्वास हरवलेला व धुमसणारा फार चपखल लिहीलेला आणि अमिताभने उभा केलेला आहे.
सलीम जावेद वाला अमिताभ हा अनटचेबल आहे. इतर कोणीही जवळपास सुद्धा येउ शकत नाही. जंजीर, शोले, दीवार, त्रिशूल, काला पत्थर, डॉन, शान, शक्ती आणि बहुधा दोस्तानाही.
दीवार मधला 'लंबी रेस का घोडा' वाला सीन व डॉयलॉगही असाच ऑल टाइम फेवरिट!
https://www.youtube.com/watch?v=1URSDuCgV-I
27 Aug 2019 - 11:46 am | मायमराठी
लक्षात राहिलेल्या प्रसंगाबद्दल बोलतोय मग ' अग्निपथ' (अर्थात अमिताभचाच) चा उल्लेख न होणं म्हणजे महत्पापं. खरं तर सगळाच सिनेमा प्रत्येक फ्रेमसह हृदयांत एक प्रसंग म्हणून कोरून ठेवला आहे. तरीही भेदभाव करणाऱ्या मातेप्रमाणे वागायचं झालं तर काही ओक्साबोक्शी आवडते आहेत.
लहान अमिताभ रात्री रस्त्यावर झोपलेल्या आई व बहिणीच्या बाजूला बसलेला, काही चोरटी पोरं सामानाची उचकाचकी करत असताना, हातातला चाकू उघडून तोंडासमोर धरतो आणि ती मुलं मागच्यामागे पळतात. Al Pacino च्या'स्कारफेस' वरून घेतलेले पार्श्वसंगीताचे तुकडे तुमचा ताबा कधी घेतात ते कळतंच नाही.
विजयची पोलीस स्टेशनमध्ये होणारी एन्ट्री, त्यांत बोलता बोलता मागे वळून एका हवालदाराला ऐटीत हात करणं."...तरक्की करने के लिए ना बोलना बहोत जरुरी होता है, मालूम?" असं म्हणत सगळ्या विश्वाला खिशात टाकणं.
बहीण व कृष्णन् ला एकत्र फिरताना बघताना तर त्याच्या डोळ्यावर गॉगल आहे, तरी त्याचा राग माझ्या डोळ्यापर्यंत पोचतोच. तसंच "दिनकरराव, टोपी संभालो..." विजयच्या जुन्या घराकडे बघत असताना मागून गोगा कपूर, मास्टर दीनानाथ व त्याच्या कुटुंबाबद्दल काहीबाही बरळत असतो. अमिताभचे फक्त खांदे , पाठ बघूनही त्याचा क्रोधावेश जाणवल्याशिवाय राहत नाही.
आईच्या घरी खूप महिन्यांनी जेवायला आला असतानाही, आईने करत असलेल्या कानउघडणीला थांबवत तिला सफाई देणं आणि म्हणणं ," अभी बोलो किसी हरामजादे को....काट के रख देगा साला।" (हा सीन बघताना मी मनातल्या मनात करोडोवेळा विजय चौहान झालोय आणि दुष्टतेच्या परिसीमा वगैरे ओलांडल्यात. )पार्श्वसंगीतातकोणीतरी जीवघेणी बासरी ऐकू येत राहते. आईसमोर राग बाहेर येत नाही, तो गाडीत बसल्यावर ज्वालामुखीसारखा फुटून बाहेर येतो.
दीपक शिर्केची खांडोळी करायच्या आधी त्याला जेव्हा विजय बघतो तेव्हा असं वाटतं की हा मरणापलीकडे जाऊन मारणार ह्या बेण्याला. अण्णा मरतो, तलवार दमते, हाताचे मुटके मग लाथा मग आरडाओरडा. विजयला पकडून धरलेल्या 5- 6 माणसांना धक्का देऊन स्वतःला सोडवून उजव्या हाताच्या अंगठ्याने उजव्या डोळ्याखालील घाममिश्रित अश्रू पुसत पुसत एक कटाक्ष शिर्केच्या प्रेताकडे टाकून तिथून चालता होतो. मी फक्त नरकासुराचा वध केल्याबद्दल मिठाई वाटत दिवाळी साजरी करायची बाकी ठेवतो.
डॉक्टरसमोर असहाय्य, अगतिक विजय मिथुनचा जीव वाचवण्याची विनंती करत असतो, हात जोडून " ये मेरी माँ का अच्छा बेटा है, ये गुंडा नही है।" कपाळभर पसरलेला गुलाल, अजूनच लाल झालेले डोळे त्यात सगळ्या भावना कोंबून, एकेक शब्दांतून त्या बाहेर काढणं हे अमिताभच करू जाणे.
त्या डॉक्टरच्या जागी मी असतो तर मला तिथंच मोक्ष मिळाला असता.
शेवटी कांचा त्याला आव्हान देतो तेव्हा 3 क्लोजअपमध्ये अमिताभचे डोळे वेगवेगळे जाणवतात. त्यातला राग हळूहळू वाढत जातो, दुसऱ्या क्लोजअपला ते उदासीनतेच्या जवळ जाऊन तिसऱ्याला त्यांत होळी दिसू लागते. आईला हिंसा सोडणार असं वचन देऊन गणपतीची पूजा केलेली असते. त्यानंतर हे सगळे लोचे पुन्हा करायला लागल्यामुळे, मुकुल आनंदला ते तसे भाव डोळ्यात हवे होते. खूप वर्षापुर्वी एका मासिकात मुकुलच्या मुलाखतीत वाचलं होतं.
भवतु, फार पाल्हाळ लावलं, पण जिव्हाळ्याचा विषय ओलांडून जाता येत नाही. फार घाईघाईत अमिताभप्रेमापोटी काय काय लिहिलं माहीत नाही.
अमिताभ कळायला अमिताभ व्हावं लागतं, नाही?
27 Aug 2019 - 12:23 pm | साबु
क्या ठाकुर ..तुझे कितनी बार बुलाया तु आता ही नहि... >सरफरोश
दीवार मधला 'लंबी रेस का घोडा' वाला सीन +१
दीवार मधला ..फाइटिन्ग करुन नन्तर नळाखाली बसतो तो सीन..
ब्लैक फ्रायडे मधला दाउद ला भेटण्याचा सीन..
अजुन खुप आहेत ..सध्या एवढेच आठवलेत..
27 Aug 2019 - 12:31 pm | प्रकाश घाटपांडे
सतीच वाण मधे ललिता पवार ही खाष्ट सासू शेंगदाणे खातान गुळाची ढेप फोडताना दाखवलय तो प्रसंग एक लक्षात राहिला.
27 Aug 2019 - 10:30 pm | सौन्दर्य
दीवार मधील प्राण पोलिस स्टेशनमध्ये आल्यावर बसायला सहज खुर्ची ओढतो, त्यावेळी पोलिस इन्स्पेक्टर अमिताभ (सिनेमातील नाव लक्षात नाही, बहुतेक विजयच असावे) त्या खुर्चीला लाथ मारून उडवतो व 'ये पोलिस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नही' असे त्याला सुनावतो तो प्रसंग.
27 Aug 2019 - 10:32 pm | सौन्दर्य
दीवार की जंजीर ? बहुतेक जंजीर असावा. चूक भूल द्यावी घ्यावी.
28 Aug 2019 - 2:12 pm | आजी
सिनेमा मधुमती. दिलीपकुमार ,वैजयंतीमाला. दिलीपकुमार जंगलात हिंडत असतो. जंगल अधिकच घनदाट होत जात असतं. इतक्यात दिलीपला एक कठडा दिसतो.तिथं पाटी असते"prohibited area""अंदर जाना मना है."
दिलीप ती पाटी वाचतो.वेगानं समोरची फांदी दूर सारतो. आणि शांतपणे,निश्चयपूर्वक कठडा पार करुन पुढे जातो. त्यावेळी दिलीपच्या डोळ्यांतील निश्चय,बेडरपणा पाहण्यासारखा,लक्षात राहण्यासारखा आहे.
28 Aug 2019 - 2:19 pm | जॉनविक्क
आणि लगेच सुरू होणारे ओ मेरे सोना आठवते :)
28 Aug 2019 - 2:19 pm | जॉनविक्क
आणि लगेच सुरू होणारे ओ मेरे सोना आठवते :)
28 Aug 2019 - 2:23 pm | जॉनविक्क
दोन प्रतिसादांच्या सबमीशन मधे 30 सेकंदाचा विराम देता आला व या कालावधीत युजरचा शेवटचा प्रतिसाद क्रॉसचेकवला तर बरेच डुप्लिकेट प्रतिसाद टाळता येणार नाहीत काय ?
28 Aug 2019 - 5:37 pm | mayu4u
अजून काही:
ब्लॅक फ्रायडे मधले इन्ट्रोगेशन चे सीन्स... विशेषतः राजकुमार खुरानाचं इन्ट्रोगेशन.
रुमाल टाकून ठेवतो.
28 Aug 2019 - 5:56 pm | मराठी कथालेखक
काय बोलता ? हे समाजावर वगैरे दगड भिरकावणं तेव्हा पण होतं का ? मला वाटलं फँड्रीनेच सुरु केला हा प्रकार :)
28 Aug 2019 - 6:00 pm | मराठी कथालेखक
अशोका मधली अनेक दृश्य लक्षात राहण्याजोगी आहेत, काही नर्म विनोदी तर काही अर्थपुर्ण
28 Aug 2019 - 8:36 pm | बबन ताम्बे
अजून बरेच सांगता येतील.
शोलेतील असरानीचा जेलर, जगदीपचा सुरमा भोपाली देखिल जबरदस्त मनोरंजन करतात...
खळखळुन हसवणारी अजून काही सिनेमांतील दृश्ये खूप सांगता येतील.
दोन प्रसंग मला खूप आवडतात.
- मिस्टर इंडिया मधे संपादक गायतोंडे समोर ऑफिसमधे अदृश्य मिस्टर इंडिया अवतरतो तेंव्हा अन्नू कपुरने दाखवलेली तारांबळ लाजवाब. सोबत श्रीदेवी आणि अनिल कपूरची साथ ही भन्नाट.
- मालामाल वीकली मधे राजपाल यादवचा शिडीला अटकून आवाज जातो आणि घरातून त्याला खाटेवर बसवून बाहेर आणतात तो प्रसंग. राजपाल यादवने सही अभिनय केला आहे.